Bhagy Dile tu Mala - 41 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ४१

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ४१

गुजर जाता है वक्त
कुछ मनचाही यादो के साथ
नही गुजरता वो लम्हा
जीसने दिलं का सुकून चुराया है....

आयुष्याचे वेगवेगळे रंग आहेत. कोणता रंग कधी समोर येईल आणि तुमचे विचार बदलतील सांगता येत नाही. स्वराच आयुष्य बेरंग होत पण त्यात रंग भरायला कुणीतरी आलं होतं. माधुरीने तिला समजावलं होत पण अन्वय तिच्या हृदयात खोलवर शिरू शकणार होता का हा प्रश्न माधुरीला सतावत होता. इकडे अन्वयला तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे माहिती नव्हतं त्यामुळे तो तिच्या स्वप्नात आणखीच बुडत होता आणि दुसरीकडे होती स्वरा. जिच्या मनात काय सुरू होत तीच तिलाच माहिती नव्हतं. तिने त्याच्यावर शंका घेतली होती पण हीच शंका तिला आयुष्यात नव्याने प्रवास सुरु करायला मदत करणार होती. ती आता त्याची प्रत्येक हालचाल नजरेने टिपू लागली. त्याची ऑफिसच्या मुलीकडे बघण्याची नजर असो की त्याच्या हसण्यामागच रहस्य. तिला त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटू लागली. कितीतरी वर्षानी हे अस घडत होतं की तिला कुणाला तरी जाणून घेण्याची इच्छा मनात जागृत झाली आणि नकळत ती वाट तिला अशा मार्गावर घेऊन जाऊ लागली जीचा तिने स्पप्नात पण विचार केला नव्हता. हे शंकेच भूत आता तिला खऱ्या अर्थाने जीवनाचे रंग दाखवणार होत. जे तिने मागच्या काही वर्षात मिस केले होते.

ऑफिसचा पुन्हा असाच एक दिवस. मागे महिन्याचा कालावधी उलटून गेलेला. त्या क्षणापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. सुरुवातीला त्याच्यासोबत हसणार्या स्वराने अचानक दुरी बनवायला सुरुवात केली होती. ती फक्त कामापूरत त्याच्याशी बोलायची बाकी वेळ त्याच्याबद्दल जाणून घेत होती. जसजशी ती त्याला ओळखू लागली होती, त्यातल्या खरा तो तिला सापडू लागला होता. आता प्रोजेक्टच काम जवळपास झालंच होत तेव्हा काही शंका तिला क्लिअर करायच्या होत्या म्हणून ती त्याच्या केबिनसमोर गेली. ती त्याला आतमध्ये यायची परवानगी मागणारच की काही शब्द तिच्या कानावर आले आणि तिथेच थांबली. खर तर कुणाच चोरून बोलणं ऐकणे बर नसत पण आज तिला ते सर्व ऐकण्याची खूपच आतुरता होती म्हणून ती काही क्षण तिथेच थांबली होती. जवळपास १५ मिनिट झाले ती तिथेच उभी होती. आता केबिनमध्ये येणारा आवाज बंद झाला आणि ती देखील शांतपणे उभे राहिली. काहीच क्षणात कुणीतरी बाहेर आल. ती व्यक्ती स्वराकडे हसून समोर निघाली तर स्वरानेही त्या व्यक्तीला हसून उत्तर दिलं. खर तर आतापर्यंत स्वराला काहीतरी काम होत म्हणून ती अन्वयच्या केबिनच्या बाहेर आली होती पण तिला अचानक काय झालं माहिती नाही. ती केबिन सोडून पुन्हा आपल्या डेस्कवर जाऊन बसली. तिने कॉन्ट्रॅक्टची फाइल बाजूला ठेवली आणि लॅपटॉपमध्ये बघत शांत बसली. ऑफिसच वातावरण शांत वाटत होतं आणि त्यांचं ते संभाषण जसच्या तस तीला ऐकू येत होतं. जणू कानात ते शब्द फिट्ट बसले होते. काही क्षण तिने कामात मन लावण्याचा प्रयत्न केला पण तीच मन लागत नव्हत. त्याच शब्दांनी आता तीच चैन उडवल होत. ती विचार करतच होती की दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सर्व आपापले टिफिन घेऊन जमा झाले तसाच अन्वय बाहेर आला. खर तर आज स्वराच्या बाजूला बसायला जागा नव्हती त्यामुळे तो दुसरीकडे बसायला जाऊ लागला तेव्हाच स्वराने एक खुर्ची आणून स्वतःच्या बाजूला ठेवली आणि अन्वय हसतच बाजूला बसला. मागील काही दिवसापासून स्वरा अन्वयशी फार कमी बोलत होती त्यामुळे अन्वयनेही तिच्याशी बोलणं कमीच केलं होतं. तिने आपल्याला चुकीच समजू नये म्हणून अलीकडे अन्वयदेखील थोडं अंतर ठेवत होता. मागील महिनाभर त्यांचं फारस बोलणं झालं नव्हतं त्यामुळे थोडा फार दुरावा त्यांच्यात दिसत होता. अन्वय जेवायला बसला आणि नेहमीप्रमाणे सर्वांच्या पोळ्या त्याच्याकडे आल्या. त्याने खायला सुरुवात केलीच होती की नकळत एक हात त्याच्यासमोर आला. तिने पोळी त्याच्या ताटात ठेवली आणि हळुवार भाजी टाकली. अन्वय रोज स्वतःहून तिच्याकडून पोळी घ्यायचा पण आज स्वतःहून समोरून पोळी भाजी आली म्हणून तो क्षणभर हसलाच. त्याने तिच्याकडे डोळे वर करून बघितले नव्हते पण तिची पोळी भाजी येताच त्याने तिच्या जेवनापासून सुरुवात केली. तो आज निवांत जेवण करत होता. खर तर त्याला बोलायची खूप सवय होती पण आज तो का माहिती नाही शांत होता तर स्वरा अधून मधून त्याच्याकडे बघत होती. अन्वयने आज सवयीच्या विरुद्ध लवकर जेवण आटोपलं आणि केबिनमध्ये जाऊन बसला तर स्वराही जेवण आटोपून काकाकडे गेली. काका एकटेच बसून होते. स्वराला बघताच अरुण काकांनी तिला बसायला खुर्ची दिली. स्वरा त्यांच्या अगदीच समोर बसली. काही क्षण तिने त्यांच्याकडे डोळे भरून बघितल आणि चेहऱ्यावर शांत भाव ठेवत तिने विचारले," काय झालं काका? आज इतके शांत शांत का? काही घडलंय का?"

तिच्या शब्दांनी काकांच्या डोळ्यात अश्रू आले. तिने तरीही काहीच म्हटलं नाही. काही क्षण असेच गेले आणि काका डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले," काही नाही बाळा. बस एक अनुभव मिळाला!!"

स्वराने हसतच विचारले," कसला अनुभव?"

काका क्षणभर मिश्किल हसत उत्तरले," लोक चुकीच सांगतात की देव मूर्तीत असतो. बाळा देव मूर्तीत नसतो तर असतो माणसात. जेव्हा- जेव्हा आपल्यासमोर समस्यां येतात ना तो माणसाच्या रुपात धावून येतो. तो कधीच कुणासोबत वाईट होऊ देत नाही. आज प्रचिती आली मला त्याची. असे लोक देव जन्माला घालतो म्हणून हे जग सुरू आहे. देव अशा लोकांना कायम सुखी ठेवो अशीच प्रार्थना करेन त्याला."

त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते. स्वरा त्यांच्याकडे कुतूहलाने बघतच होती की त्यांना अन्वयने आवाज दिला आणि ते बाहेर गेले. काका काय बोलून गेले हे तिला समजलं होत म्हणून त्यांना पुढे काही विचारायची गरजच पडली नाही. स्वरा क्षणभर आता हसत होती. तिला हसायला नक्की काय झालं होतं तीच तिलाच माहिती. तिला आज थोड्या वेळ शांतता हवी होती म्हणून आज ती तिच्या जुन्या केबिनमध्ये परतली. हाताने त्या खुर्चया स्पर्श करत तिने तो स्पर्श मनात साठवून घेतला आणि त्या खुर्चीला टेकून बसली. त्या खुर्चीवर बसल्यावर तिच्या मनाला क्षणात शांतता मिळाली आणि तिने लगेच डोळे मिटले. तिने डोळे मिटले आणि काही क्षणापूर्वी घडलेला तो किस्सा जसाच्या तसा आठवू लागला. हेच ते कारण होत की तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल होत..

काही क्षणापूर्वी ...

स्वरा केबिन बाहेर पोहोचली. काका आणि अन्वय ह्यांच्यामध्ये संभाषण सुरू असल्याने ती बाहेरच थांबली आणि काहीच क्षणात ती त्यांचं बोलणं ऐकण्यात एकाग्र झाली. अन्वयच्या केबिनमध्ये काका आणि अन्वय होते. अरुण काका अन्वयशी बोलायला घाबरते होते आणि अन्वय त्यांना खर्चीवर बसवत म्हणाला," काका बोला ना इतके शांत का? मला माहित आहे तुम्हाला काहीतरी बोलायच आहे. सकाळपासून तुम्ही इकडून तिकडे चकरा मारत आहात, चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. काही घडलंय का काका? बिनधास्त सांगा, मला काय घाबरायचं? मी तुमच्या मुलासारखा आहे. मला टेन्शन सांगा आणि मुक्त होऊन जा टेन्शनमधून."

अन्वय हसत होता पण काका जरा बोलायला घाबरत होते. अन्वयने त्यांना पाणी दिलं आणि त्यांनी ते पटापट घशात ओतलं. अन्वय त्यांच्याकडे बघत होता आणि ते हिम्मत करत म्हणाले," सर, प्रत्येक वडील बघतो त्याप्रमाणे मीही माझ्या मुलीसाठी काही स्वप्न बघितली होती. तिने आयुष्यात काहीतरी करून आमची गरिबी हटविण्याची. तशी माझी लेक मेहनती त्यामुळे तिने मला अभ्यासात कधीच निराश केलं नाही. तिने मागच्या वर्षी १२ वी केली आणि मनात बघितलं एक स्वप्न. तिला नक्की काय करायचं आहे हे माहिती नव्हत पण मी स्वरा मॅडमबद्दल तिला रोज सांगायचो आणि तिनेही एक स्वप्न पाहिलं. स्वरा मॅडमसारख मोठं होण्याच. माझ्या मुलीने त्यासाठी खूप प्रयत्नही केले. दिवसरात्र अभ्यास करताना मी तिला बघितलं आहे. ती जेव्हा जेव्हा खचायची ना तेव्हा मी तिला स्वरा मॅडमच उदाहरण द्यायचो आणि ती पुन्हा थकलेली असतानाही पुन्हा मेहनत करायची. ती मला म्हणते की बाबा मी आपली ही परिस्थिती नक्की बदलणार ! ती ते करत आहे. तिनेही स्वरासारखं स्वप्न पाहिलं आणि स्वरा मॅडम दिल्लीतून शिकल्या म्हणून तीनेही दिल्ली आय.आय.टी. शिक्षणासाठी निवडल. हुशारीत माझी मुलगी कुठेच कमी नाही पण तिला शिकवायला माझी गरिबी आता आड येतेय. आम्ही ओपन कास्टमध्ये येत असल्याने तिला वर्षाची लाखो रुपये फिज द्यावी लागते आणि अगदी पहिल्याच वर्षी फीमुळे माझ्या मुलीची स्वप्न तुटायला आली. मी तिला सांगितलं की पैशाची करतो व्यवस्था. तू काळजी नको करुस पण लाख रुपयांची व्यवस्था एवढ्या लवकर कुठून करू? खूप कठीण आहे हो सर गरिबांनी शिक्षण घेणं. आमच्यात हुशारी आहे पण पैसे नाही म्हणून कदाचित आमचं सर्वच अडत. सर मुलीने पैसे मागितले आहेत. मला इथून लोन मिळेल का? मी लवकरात लवकर पैसे परत करेन प्लिज!! ती आशेवर बसली आहे माझ्या. मी पैसे नाही दिले तर तीच मन कायमस्वरूपी तुटेल आणि ती काय करेल माझं मलाच नाही माहिती. मिळेल का मदत सर?"

अन्वयने सर्व ऐकलं आणि क्षणभर उदास होत म्हणाला, " काका मी फक्त इथे काही दिवसासाठी आलोय तेव्हा माझ्याकडे ते अथॉरिटीज नाहीत. दिल्लीला मेन ब्रँचला कळवावे लागेल पण प्रॉब्लेम असा आहे की तिथून लोन मान्य व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत मृण्मयीच्या शिक्षणाच काही खर नाही. सॉरी काका पण सध्या माझ्या हातात काहीच नाही. कमीत कमी दोन महिने तरी लागतील तिकडून लोन पास व्हायला."

त्याच्या शब्दांनी काका आता खूपच नाराज झाले होते. अन्वयला त्यांची उदासी बघवली नाही आणि अन्वय त्यांच्या बाजूला येत म्हणाला," काका तुम्ही आपल्या मुलीला स्वप्न दाखवलं आहे ना मग आता ते नक्की पूर्ण होईल. उदास होऊ नका. तिला सांगा की स्वरासारखिच जिद्द मनात ठेव म्हणा. स्वप्न बघ आणि ते पूर्ण केल्याशिवाय हार मानू नकोस. तिने जेवढं नाव कमावलं ते सोपं नव्हतं. तिचे मार्ग सोपे नव्हते, वाटाही अस्पष्ट होत्या तरीही तिने स्वतःच्या आयुष्याशी संघर्ष करून सर्व मिळवल आहे तेव्हा तिचाच आदर्श समोर ठेवून मेहनत करत राहा म्हणावं. स्वरासारखं होणं सोपं नाही पण स्वरासारखी मेहनत करून खूप नाव कमव म्हणावं. मला विश्वास आहे पुन्हा एक मुलगी गरिबीतून वर येईल आणि आपल्या आई- वाडीलांच नाव रोशन करेल."

काका रडतच उत्तरले, " सर ती मेहनत करेलही पण पैसे? ते कुठून आणायचे आम्ही गरिबांनी. आम्हाला कुणी दारावर बघितलं तरी लाथ मारून हाकलून देतात. ऐपत नाही तर शिकविता कशाला असे प्रश्न विचारले जातात मग तुम्हीच सांगा कशी स्वप्न पहायची आम्ही गरिबांनी??"

अन्वय हसतच आपल्या खुर्चीवर गेला आणि त्याने एक चेक साइन करत त्यांच्यासमोर धरला. ते चेककडे बघतच होते की अन्वय पुन्हा म्हणाला, " काका कंपनीतून पैसे मिळणार नाही तर काय झालं मी आहे ना तुमचा मुलगा. मी असताना माझ्या बहिणीला काही प्रॉब्लेम होईल का? हा घ्या एक लाखाचा चेक आणि बर का आतापासून तुम्ही तिच्या पैशाच टेन्शन सोडा. आजपासून तीच शिक्षण पूर्ण होईपर्यंत मीच सर्व पैसे देणार आहे. माझ्या लहान बहिणीच पूर्ण शिक्षण आता माझी जबाबदारी!! आता तर कुणी लाथ मारून हकलनार नाही ना काका?"

काकांच्या चेहऱ्यावर थोडं हसू होते पण ते पुन्हा म्हणाले, " पण सर एवढे पैसे एकाच वेळी कसे परत करणार तुम्हाला?"

अन्वय त्यांचा हातात हात घेत म्हणाला, " खर सांगू तर काका माझ्याकडे पैसे काही कमी नाहीत. इथे दीड लाख सॅलरी आहे मला शिवाय घरीही काहिच कमी नाही सो एवढ्या पैशाने माझं काहीच जाणार नाही. तसे पण बँक मध्ये पळूनच असतात सो कुणाच्या तरी कामी येईल आणि स्वाभिमान दुखावणार असेल तर हे सर्व पैसे पुढे कुणाला जर मदत लागली तर तिला द्या आणि पुन्हा अशा हजारो स्वराला वर आकाशात झेप घ्यायला मदत करा. आता तरी चालेल ना? खर सांगू तर मी माझ्या बहिणीला देतोय पैसे तेव्हा गरज नाही पैसे परत करण्याची."

काका त्याच्या चेहऱ्यावरून हात फेरत जाऊ लागले तेव्हाच तो पुन्हा म्हणाला," काका मृण्मयीला एक गोष्ट सांगायला विसरू नका की मिस टॉपरचा रेकॉर्ड तिने तोडला ना तर माझ्याकडून पार्टी. पक्क सांगा हा!! तिने अस केलं ना तर सर्वात खुश मी असेल. सांगाल ना?"

काका हसून बाहेर गेले.

स्वरा खुर्चीवर टेकून बसली होती आणि कुणाच्या तरी आवाजाने तिचे डोळे उघडले. बाहेर दीपिका तिला बोलावत होती त्यामुळे ती पकटन बाहेर आली. लंच ब्रेक संपला होता. सर्व कामाला लागले होते म्हणून तीही कामाला लागली. पण आज तो क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर थोडं फार हसू खुलल होत. अन्वय सर्वांची मदत निस्वार्थीपणे करतो हे बघून तिची भीती क्षणभर दूर झाली होती. तिला माधुरीचे शब्द पटले होते. स्वरा केवळ प्रेम ह्या दृष्टिकोनातून विचार करत होती पण आता तिला जाणवलं की अन्वयने माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते सर्व केलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. आज ती चुकली होती अन्वयबद्दल विचार करताना तरीही तिला आनंद झाला होता आणि आपण एका चांगल्या व्यक्तीला चुकीच समजलं नाही ह्यामुळे तिच्या चेहऱ्यावर समाधान देखील आलं होतं.

आज ती आनंदाच्या भरात सर्व काम पटापट करत होतीे. जवळपास ४ तास ती काम करत होती पण तिला कंटाळा आला नव्हता. काम करताना तिला स्वताचच भान नव्हतं. आजच थोडस काम बाकी असल्याने ती सर्व गेल्यावरही ती काम करतच होती. काही क्षण गेले. ६.१५ वाजून गेले होते. समोरून अन्वय देखील घराकडे जायला निघाला होता. त्याला बघताच स्वराने सर्व काम सोडून लॅपटॉप बंद केला आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधून धावू लागली. अन्वय खूप समोर निघाला होता त्यामुळे त्याला भेटायला ती धावतच निघाली. सुमारे २-३ मिनिट ती धावतच त्याच्या जवळ पोहोचली. तिला बघताच अन्वय क्षणभर थांबला आणि त्याने हसत विचारले," बोला मिस टॉपर आज काय प्रश्न आहे तुमचा? इतक्या फॅसि धावत आल्या आहात तर प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार, हो ना??"

स्वरा क्षणभर हसली. तिच्या चेहऱ्यावर हसू होत तरीही काही क्षण तिचे श्वास घेण्यातच गेले होते. काही क्षण तो तिची शांत होण्याची वाट बघत होता. तिच्या हार्ट बिट नॉर्मल झाल्या, आता ती नॉर्मल वाटत होती आणि ते दोघेही सोबतच चालू लागले. काहीच पावले टाकली असेल की स्वरा उत्तरली," सर तुम्ही मला कायम मिस टॉपर का म्हणता? किती सुंदर नाव ठेवलं आई-बाबांनी स्वरा!!! स्वरा मोहिते... नावाने नाही बोलावू शकत का? तुम्हाला पण भीती वाटते का एका मुलीला हरण्याची? राज पण तसाच होता. "

अन्वयने हसत विचारले, " कसा होता राज?"

स्वरा थोडी शांत होत उत्तरली, " होता जरा गर्विष्ठ! कुणाचच न ऐकणारा स्वार्थी व्यक्ती! त्याला ना हरायला कधीच आवडत नव्हतं तुमच्यासारख म्हणून तर त्याने एक गालावर पडताच माझी ही स्थिती केली. इगो दुसर काय? स्वतःची चूक मान्य करायची नाही आणि स्वतःची चूक कुणी दाखवली की अशी अवस्था करायची. हे झालं राजपुराण! आता तुम्ही सांगा, तुम्हालाही भीती वाटते का एका मुलीला हरण्याची. तुम्हींच म्हणत होतात ना जिंकण्याची नशा तुला नाही कळणार स्वरा!! म्हणून मिस टॉपर म्हणून स्वतःला आठवण करून देता ना स्वतःला की आपण एका मुलीला हरलो. ह्याचा बदला घ्यायचा आहे वगैरे वगैरे. शेवटी काय ते जिंकण्याची नशा महत्त्वाची. त्यासमोर दुसर काय काहीच नाही."

अन्वय तिचा प्रश्न ऐकून क्षणभर हसतच होता आणि हळूच म्हणाला, " मिस टॉपर खर उत्तर देऊ की खोटं?"

स्वरा त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली, " कोणतही द्या पण द्या अटलिस्ट. बघू तर किती फरक आहे त्याच्या आणि तुमच्या विचारात."

अन्वय पुन्हा हसला आणि शांत झाला. त्याने तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि म्हणाला, " भीती नाही वाटत हरण्याची उलट मिस टॉपर बोलून स्वतःला सांगतो की तू एका योग्य व्यक्तीला हरला आहेस. नवरा बायकोला मॅडम म्हणतो ना त्यात कसा आदर असतो तसच मी तुला टॉपर बोलून माझा आदर व्यक्त करतो. तुझं आयुष्य बघितलं स्वरा की वाटत आपण तुझ्यासमोर काहिच नाही. तू जे गमावून मिळविल आहेस ना त्याला काहिच तोड नाही. तेव्हा मिस टॉपर संबोधून मी स्वतालाच सांगतो की अन्वय तुला मिस स्वरा पेक्षा सुद्धा काहीतरी चांगलं करायचं आहे हे आठवण ठेव. खर सांगू तर मला अभिमान आहे मी तुला हरलो त्याचा. कदाचित तोच अभिमान मी तुला मिस टॉपर संबोधून व्यक्त करत असतो. इथे मी तुझा बॉस आहे तेव्हा तुझी स्तुती करणं योग्य नाही पण ह्या दोन शब्दात मी स्वतःला जाणीव करून देतो की अन्वय तू योग्य संगतीत आहेस तेव्हा जेवढ्या वेळ इथे आहेस तेवढ्या वेळ तिच्याकडून शिकून घे जगायच कस ते? संघर्षावर मात कशी करायची? तिच्याकडे भरपूर काही आहे तुला देण्यासारखं. तेच मी शिकत असतो. सो मिस टॉपर म्हणजे माझा तुमच्या प्रति आदर. राज कसा होता मला नाही माहिती पण मला आपल्या मानसासमोर हरायला कमीपणा वाटत नाही उलट आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद बघितला की हरण्याचही समाधान मिळत. नशा नक्की आहे पण ती जिंकन्याची नाही तर समाधानाची. सर्व काही जिंकून समाधान नाही मिळाल तर काय फायदा??"

त्याच उत्तर ऐकून ती शांत झाली होती. तिला त्याच उत्तर ऐकून खूप आनंद झाला होता पण आज का माहिती नाही तिला बोलायला शब्द सुचत नव्हते. ती त्याच्याकडे क्षणभर बघत तर कधी समोर बघत जाऊ लागली. तेवढ्यात तो म्हणाला , " कस वाटलं माझं खोट खोट उत्तर?"

तो हसत होता तर स्वराही क्षणभर त्याच्याकडे बघून क्षणभर हसली. त्याच्या नजरेत आज तिला खूप काही सापडत होत. तिला आदर जेवढ्या त्याच्या शब्दात जाणवला नव्हता तो तिच्या डोळ्यात दिसत होता म्हणून काही वेळ आधी राजशी तूलना करणारी ती त्याला एकटक बघत होती.

ते समोर जात होते आणि काहीच क्षणात त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तो अजूनही हसत हसत तिला बाय करत होता तर आज नकळत तिचे हात त्याला बाय करायला वर झाले. तो काहीच क्षणात डोळ्यांसमोरून नाहीसा झाला पण स्वराची नजर अजूनही तिथून हटत नव्हती. ती तिकडे बघतच होती की ट्रेनच्या हॉर्नने तीच लक्ष विचलित झालं. तिने पुन्हा एकदा तिकडे बघितलं पण तो तिथे नव्हता त्यामुळे तिने स्टेंशनकडे प्रस्थान केले.

ट्रेन सुरू होऊन १० मिनिट झाले होते. ती अजूनही शांतच होती. तिला आनंद झाला होता पण आज बोलायला शब्द नव्हते. ट्रेन वांद्रेला थांबली आणि माधुरी तिच्या जवळ येऊन थांबली. ट्रेन सुरू झाली. स्वराने तिला बघितलं तरीही काहिच बोलली नाही. माधुरी काही क्षण शांत राहत उत्तरली," कायम एखादा प्रश्न विचारून दुसर्यांना शांत करणारी व्यक्ती आज स्वता शांत आहे विश्वास बसत नाहीये!! बहुतेक आज मॅडमला कुणीतरी प्रश्न विचारला ज्याच उत्तर मॅडमकडे नाही, हो ना? कोणता प्रश्न विचारला कळू तरी द्या आम्हाला?? "

स्वरा हळुवार स्वरात उत्तरली, " मधू तू बरोबर होतीस अन्वयबद्दल!! मीच चुकले. मी जास्तच विचार केला बहुतेक त्यांच्याबद्दल. पूर्वानुभावाने काढलेले निष्कर्ष कधी कधी आपल्याच साठी घातक दिसतंय हे मला आज जाणवत आहे. कुणी प्रश्न विचारला म्हणून नाही तर मी त्याच्यावर शंका घेतली म्हणून आज शांत आहे. मला माझंच वाईट वाटत आहे. मी खूप मोठी चूक केली त्याचा राग येतोय मला म्हणून शांत बसले आहे. त्यांनी ते तर माणुसकीच्या नात्याने केलं होतं आणि मो बावळट काहीही विचार करत बसले होते."

माधुरी तिला अडवत म्हणाली, " माणुसकीच्या नात्याने ते कसं?"

स्वरा तिच्याकडे बघत उत्तरली, " आज मी बघितलं प्रत्यक्ष म्हणून विश्वास बसला. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी एका साध्या क्लर्कच्या मुलीला एक लाखाचा चेक दिला शिवाय ते पूर्ण खर्च करणार आहे तिच्या शिक्षणाचा. अनोळखी लोकांसाठी ते कायम करताय अस जाणवत. मीही काही खास नाही त्यात. तेच त्याने माझ्यासाठी केलं आणि मी वेंधळी काहीही विचार करत बसले होते. मलाच आज लाज वाटत आहे स्वतःच्या विचारांची. इतक्या चांगल्या व्यक्तीला मी वाईट समजले म्हणून. नशीब तू वाचवलस नाही तर गमावून बसले असते एवढ्या चांगल्या व्यक्तीला. नंतर नसते मिळाले ते मला।कितीही प्रयत्न केले असते तरीही.."

स्वराचा चेहरा उदास जाणवत होता. तिला त्याच खूपच वाईट वाटत होतं आणि माधुरी क्षणभर विचार करत म्हणाली, " आणि समजा एवढ्या चांगल्या व्यक्तीने माणुसकीसोबतच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून हे सर्व केलं असेल तर?? मग सर्व क्षणात चुकीच होईल बरोबर ना? त्याच फक्त प्रेम आहे म्हणून त्याला आयुष्यातून काढून टाकायला तू मागे पुढे बघणार नाहीस. बरोबर बोलतेय ना मी? काय चूक असेल बर त्या चांगल्या माणसाची?"

माधुरीने आज असा एक प्रश्न केला होता ज्याच उत्तर ना स्वराकडे होत ना माधुरी कडे. तशी मागच्या सात वर्षात स्वरा फार कमी बोलायची पण एखाद्याला असा प्रश्न विचारायची की सर्व शांत व्हायचे आणि तिच्या प्रश्नासमोर हार मानायचे पण आज पहिल्यांदा स्वरा कुणाच्या तरी प्रश्नाने शांत झाली होती. एवढंच काय ती माधुरीला फेस करू शकत नव्हती. माधुरी तिच्याकडे बघत होती तर स्वरा आज आपली नजर चोरत होती. काय होत स्वराच्या मनात? खरंच एक व्यक्ती माणूस म्हणून चांगला वाटत असेल पण प्रेमाला आपण नाही म्हणतो? स्वराच्या मनात काय सुरू होत तीच तिलाच माहिती पण ह्या शंकेमुळे तिला अन्वय कसा आहे समजलं होत. कधी कधी प्रत्यक्ष अनुभव कामी येतात. नाही तर ओरडून ओरडून सांगितलं तरीही काहीच फायदा नसतो. स्वराला आयुष्यात एक नवीन अनुभव मिळाला होता. प्रत्येक माणूस वाईट असेलच असे नाही. त्याला ओळखून मग निर्णय घेणे केव्हाही बेटर नाही तर एक चांगला व्यक्ती आपण आयुष्यातून क्षणात गमवू...

ईश्क की पहेली का जवाब
भला कैसे दिया जाये
एक तरफ ताजे मेरे जखम है
तो दुसरी तरफ है जखम पर मरहम लगाणे वाला

क्रमशा...