Bhagy Dile tu Mala - 32 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ३२

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ३२

कुछ पंक्तीया लिखी थी बरसो पेहले
ना जाणे वो कहा गुम हो गयी है
जबसे देखी है दुनिया की सरफारोशी
कलमनेभी मुझसे बेवफाई कर ली है

अन्वय घरी तर पोहोचला होता पण दीपकच्या शब्दांनी त्याला विचार करायला भाग पाडल. स्वराला एवढी मोठी शिक्षा का मिळावी आणि त्याला कुणी साधा विरोधही करू नये ह्या विचाराने अन्वयची झोप उडाली होती. आज त्याने कसतरी जेवण आवरल पण स्वराला न भेटूनही आज तो फक्त तिच्याबद्दलच विचार करत होता. त्याच्या मनात ती गोष्ट तशीच फिरत राहिली. स्वरावर ऍसिड अटॅक झालाय ही गोष्ट त्याला कळली होती पण तो का झाला आणि तिने हे सर्व कस सफर केलं ह्याबद्दल अन्वयला जाणून घ्यायची आता उत्सुकता निर्माण झाली होती. आज तो बेडवर एकटाच पडून होता. वारंवार कुस बदलत होता पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याला झोप येणे तर दूरच पण तिचा विचार बाजूला सारनेही दूर झाले होते. स्वराबद्दल जाणून घेण्याची त्याला अशी ओढ लागली होती की नकळत त्याच्यासमोर कित्तीतरी प्रश्न उभे राहिले.

तेरी बातो का किस कदर असर हुआ है
न मिलते हुये भी दिलं मचल रहा है
सोच रहा हु कैसी होगी तेरी कहाणी
जवाबसेभी ज्यादा मुझे तेरा दर्द सता रहा है

रात्रीचे ११ वाजत आले होते. त्याला आज झोप येण्याची चिन्हे काही दिसेना म्हणून त्याने दीपकला कॉल केला. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का हे जाणून घ्यायला त्याने कॉल केला होता पण दीपकला तिच्या कॉलेजच नाव सोडता काहीच माहिती नव्हतं त्यामुळे अन्वय पुन्हा एकदा विचारात पडला. स्वरा त्याच्यासाठी पुन्हा एकदा कोड बनली होती पण तिच्याबद्दल माहिती जाणुन घेतल्याशिवाय त्याच मन काही मानेना. आज त्याच्या रूममध्येही बऱ्याच येरझारा झाल्या होत्या. तो आयुष्यात इतका बेचैन कधीच कुणासाठी झाला नव्हता त्यामुळे त्याच्यासोबत हे काय होतंय हे त्यालाच कळत नव्हतं. सायंकाळी दीपक सोबत बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर असणार हसू आता कुठेतरी गायब झाल होत आणि त्याची जागा आता बेचैनीने घेतली होती. त्याला स्वरा हे कोड लवकरात लवकर सोडवायच होत पण ते सुटत नव्हतं आणि तो अधिकच बेचैन होत राहिला. बेचैनीने त्याला काही सुचत पण नव्हत. तो बराच वेळ विचार करत राहिला आणि अचानक त्याला काहीतरी सुचल. त्याचा चेहरा आनंदाने उजळून निघाला आणि त्याने बाजूला पडलेला फोन हातात घेऊन कुणाला तरी कॉल लावला. त्याला कॉल करायची इतकी घाई झाली होती की रात्रीचे ११ वाजून गेलेत ह्याच त्याला भान सुद्धा नव्हतं. त्यांने कॉल लावला पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही आणि तो मोठ्यानेच ओरडला," डॅम ईट प्लिज रिसिव्ह द कॉल. फालतू वेळी कॉल उचलत असता पण वेळेवर तुम्हाला काय होत माहिती नाही!! " तो स्वतःवरच चिडला आणि पुन्हा एकदा त्याला कॉल लावला. ह्यावेळी समोरून फोन उचलल्या गेला आणि तो हसतच म्हणाला," आज कुछ खास है क्या अन्वय? एक तो तेरा कॉल कितने दिनो से आया नही और आज आया है तो देर रात को. लगता है मेरे दोस्त को मेरी बहोत याद आ रही है. तभी तो देर रात को फोन किये जा रहे है."

अन्वय जरा हसतच म्हणाला," सौरभ ये सब बाद मे बात करते हैे. मैने गॉसिप के लिये नही काम के लिये फोन किया है. तभी देर रात को किया है. मुझे एक काम है पेहले वो करते है. मुझे एक बात बता तू दिल्ली आय.आय.टी. मेही प्रोफेसरकी जॉब करता है ना?"

सौरभ हसतच उत्तरला," हा ! कही सालो से पर आज तूम ये क्यू पुछ रहे हो? पढाई तो नही करणी फिरसे? कही फिरसे टॉपर तो नही आणा है ना. कोई बात नही आ जाणा फ्री मे ऍडमिशन मिल जायेगी. तेरा ये दोस्त कब काम आयेगा."

त्याच बोलणं ऐकून अन्वय स्वतःवरच चिडला . एक तर तर त्याची आधीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती त्यात तो फालतू जोक मारत बसला होता त्यामुळे तो क्षणभर चिडला होता पण तो आजही तिथेच जॉब करतो हे ऐकताच अन्वयचा चेहरा खुलून निघाला. तो हसतच उत्तरला," हा कर लुंगा मेरे बाप. पेहले मेरी बात सून. मुझे एक लडकी के बारे मे तुझसे कुछ जाणकारी चाहीये. अगर पता है तो अभि बता या पता करके बता. जरुरी बात है. करेगा ना काम?"

अन्वय एखाद्या मुलीबद्दल विचारतोय हे ऐकून सौरभ क्षणभर हसलाच होता कारण पूर्ण कॉलेज लाइफमध्ये त्याने मुलीबद्दल कधीच विषय काढला नव्हता. मुलीबद्दल नाव काढल की पळ काढणारा तो आज चक्क कॉल करून एवढ्या रात्री मुलीबद्दल विचारतोय म्हणजे काहीतरी खास होत म्हणून तो हसतच उत्तरला," किसके बारे मे? मेरे भाभी के बारे मे? पुछ, फिर तो पुरी कॉलेज धुंड के जाणकारी ले सकता हु. तेरे लिये इतना नही कर सकता तो क्या फायदा मेरी दोस्ती का? तू सिर्फ हुकूम कर. देख मै अपनी भाभी को लेकर हाजीर हो जाऊंगा."

अन्वय हसतच उत्तरला," तू अभि बकवास बंद करेगा क्या? या फोन फेक कर मारू यहा से?"

त्याचा आवाज मोठा झाला म्हणजे तो चिडला हे त्याला समजलं आणि सौरभ शांत बसला तर अन्वय नम्र स्वरात उत्तरला," स्वरा मोहिते. मुझे उसके बारे मे सब कुछ पता करणा है."

स्वराच नाव ऐकताच सौरभच हसन आपोआप गायब झालं. काही वेळ तो शांत राहिला. दोन्हीकडून आता फक्त श्वास वाढण्याचे आवाज येत होते. थोडा वेळ तो शांत होत उत्तरला," आज बहोत दिनो के बाद उसका नाम सून रहा हु पर तुझे उसके बारे मे क्यू जाणना है? वो दर्दभरी किताब तुझे खोलकर क्या मिलेगा?"

अन्वय जरा विचार करत म्हणाला," सब कुछ बताता हु लेकिन पेहले तू बता उसके बारे मे. ऐसा समझले की ये बात मेरी जिंदगी की सबसे अजीज बात है. प्लिज बताना यार."

सौरभ दीर्घ श्वास घेत म्हणाला, " ये नाम नही अन्वय अपने आपमे कहाणी है. मुझे अच्छे से याद है, वो उसका लास्ट इयर था जब मेरी यहा पर जॉब लगी थी और कॉलेज के पेहले दिनही पेहली बार उसका जिक्र सुना. उसके बारे मे सूनतेही मै भी तेरेही तरहँ उसके बारे मे जाणणे के लिये तिलमीला उठा.वो पेहली बार था जब मैने उससे बात की. चेहरा जला हुआ फिर भी मिठीसी मुस्कान. आंखे बाते करते हुयी और आवाज मे मिठास. क्या थि वो पता नही पर पेहलेही दिन उसको सलाम करणे के लिये मन मचल राहा था. उसे देखकर उसके बारे मे जाणणे की मंशा हुयी और मै जाणकारी की खोज मे लाग गया. उसने किसीं राज नामके लडके को प्यार के लिये ना कहा. बात तो तब बिगडी जग राजने उसका हात पकडा और स्वराने तमाचा जड दिया. ऊस दिन पुरा कॉलेज शांत था. चार पाच दिन कुछ हुआ नही तो लगा की राजने उसके सामने हार मानली पर सब गलत थे. उसके दोस्त की मददसे ऍसिड अटॅक कारवाया और उसने स्वराकी जिंदगी नर्क बना दि. सुना है अपणे कॉलेज के गेट के बाहर वो तडप रही थि और उसे पुरी दिल्ली देख रही थि. बहोत बडा हादसा था वो. उस हादसे के बाद लोगो ने मदद करणे के बजाय और उसका जीना हराम कर दिया पर ना वो रुकि ना थकी. एक बार तो मैने खुद कुछ लडको से उसे बचाया था इसलीये पता है मुझे उसके बारे मे. लगा था वो हादसा होणे के बाद वो कभी लौट कर नही आयेगी पर उसने लोगो को चौका दिया और वो सिर्फ दो महिने मे लौट आयी. उसने खुदके साथ नही तो पुरे दुनिया से लढकर अपना मुकाम पाया है. उसकी लास्ट स्पीच मैने सुनी थी और आंखे भर आयी. वो आखरी बार था जब मैने उसे देखा था और आज तुम्हारे मूह से उसके बारे मे सून रहा हु. पर एक बात जरूर कह सकता हु. उसके जैसी लडकी मैने देखी नही. शी इज द परफेक्ट एक्साम्पल ऑफ ब्रेवरी!! मैने तो सिर्फ उसे जले चेहरे के साथ देखा है पर सुना है की उसके जैसी सुंदर लडकी पुरे कॉलेजमे नही थी. जब भी इस कॉलेज मे उसका जिक्र होता है तो सबकी आंखे नम होती है और दिलं सम्मान से भर आता है. थि वो दुनिया को हराने की हिम्मत रखणे वाली. स्वरा मोहिते एक दर्दभरी कहाणी. अब तू बता उसका जिक्र कैसे आज?"

स्वराबद्दल सांगताना सौरभचा आवाज भरून आला होता. तिच्याबद्दल ऐकून अन्वयही शांतच झाला होता. तिची कहाणी ऐकताना त्याच्या अंगावर शहारे आले आणि उर अभिमानाने भरून आला होता. काही वेळ शांत राहिल्यावर तो विचार करत म्हणाला," कुछ नही! आज मै मुंबई की ब्रँच मे शिफ्ट हुआ हु. वहा पर है वो. उसके बारे मे पता चला तो पुरी बात जाणणे से रहा नही गया इसलीये देर रात फोन किया. कितनी देर से उसके बारे मे सोचकर निंद नही आ रही थि पर अब लगता है, आ जायेगी. थँक्स बडी!!"

स्वराला आपल्याच कंपनीत अशी वागणूक मिळते आहे हे अन्वयला सौरंभला सांगणं जमलं नाही त्यामुळे त्याने ती गोष्ट सहज लपवली तर सौरभ थोडा हसत म्हणाला,"वो हैही ऐसी की किसिकाभी दिलं करे जाणणे के लिये. टॅलेंटकी कोई कमी नही. लोगो ने उसे पेहलेही बहोत परेशान किया है और अब लोग परेशान ना करे ये ध्यान रखना. सूनकर अच्छा लगा की वो तेरे साथ है. अन्वय संभाल लेना उसे बहोत दिनो बाद तुझसे बात करके अच्छा लगा अन्वय ऐसें ही कॉल करते रेहना. मुझे कल कॉलेजके लिये देर हो जायेगी इसलीये रखता हु. अगली बार वक्त मिले तो दिन मे कॉल करणा बाय. "

अन्वयनेही बाय म्हणत कॉल ठेवला.

स्वराची जिद्द ऐकून अन्वयचा जरा मन शांत झाल होत पण तिच्या हुशारी बद्दल, दिसण्याबद्दल ऐकून आता तिला बघायची त्याला उत्सुकता लागली होती. त्याने कॉल कट करताच फेसबूक सुरू केले आणि त्यावर स्वरा मोहिते हे नाव शोधू लागला. फेसबूकवर स्वरा मोहिते नावाच्या खूप मुली होत्या त्यामुळे त्याला हवी ती स्वरा मिळत नव्हती. १५-२० मिनिटे झाली होती तो शोधत होता पण त्याला तिच्याबद्दल काहिच मिळालं नाही. काहीच क्षण गेले त्याची नजर गेली ती रेड कलरचा वन पिस घातलेल्या त्या फोटोवर. तो फोटो अन्वय झुम करून पाहत होता. आधी तो बफरिंग होत असल्याने स्पष्ट दिसत नव्हता पण बफरिंग झाली आणि तिचा तो चेहरा स्पष्ट समोर आला. अन्वयने तिच्या चेहऱ्याकडे बघितले आणि बघतच राहिला. सौरभ म्हणत होता ते खरं होत. स्वरा सारखी सुंदर मुलगी त्यानेही कधीच पहिली नव्हती त्यामुळे जेव्हापासून त्याची नजर तिच्या फोटोंवर गेली तो तिचे एक एक फोटो बघू लागला. स्वराचा प्रत्येक फोटो काहीतरी वेगळा आणि खास होता. प्रत्येक फोटोमध्ये असणारी तिची स्माईल आणि सिम्प्लिसिटी बघून अन्वय भारावून गेला होता. क्षणभर तर त्याला हाही विसर पडला होता की तिच्यावर ऍसिड अटॅक झाला आहे. मुळात अन्वयने प्रत्यक्षात तिला अजूनही पाहिलं नसल्याने तो तिच्या आधीच्या फोटोतच हरवला होता. त्याने पटकन तिच्या सर्व फोटोंचे स्क्रीनशॉट काढून घेतले आणि फेसबुक बंद केलं. आजची रात्र अन्वय साठी विचित्रच होती . सुरुवातीला तिच्याबद्दल ऐकून त्याला फार वाईट वाटलं होत तर आता तो तिच्या त्या सुंदर फोटोत हरवला होता. आज कितीतरी वेळ तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते शक्य होत नव्हत. राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर तिचा तो सुंदर फोटो येत होता आणि मिटलेले डोळे पुन्हा उघडले जायचे. काय जादू होती तिच्या चेहऱ्यात माहिती नाही पण अन्वयला काहीच क्षणात तिने वेड लावलं होत. तो तिला बघताच, तिच्याबद्दल ऐकताच तिच्याकडे आकर्षल्या जाऊ लागला आणि त्याच्याही हातात ते राहील नव्हतं. आज स्वराने अन्वयची नकळत झोप उडवली होती आणि तिला त्याच काहीच भान नव्हतं तर दुसरीकडे तिलाही आज झोप लागली नव्हती. आपला नवीन बॉस कसा असेल, उद्या काय होईल ह्या विचाराने स्वराची झोप उडाली होती. आज दोघेही झोपले नव्हते पण काय होणार होत जेव्हा ते उद्या समोरासमोर येणार होते? अचानक तो त्याला सुंदर वाटणारा चेहरा क्रूर तर वाटणार नव्हता ना? आणि इतरांप्रमाणे त्यानेही तिला पाहताच नजरेपासून दूर केले असते तर??

तेरे सफर का एक हिस्सा बन जाऊ
अगर मिल जाये तू, तो तेरी कहाणी का किस्सा बन जाऊ

आज अन्वय, स्वरा आपापल्या विचारात हरवले आणि त्यांना झोप लागली नव्हती. दोघेही वेगवेगळ्या कारणांसाठी जरी जागे होते तरीही नकळत ते एकमेकांबद्दलच विचार करत होते. स्वराला अन्वय कसा असेल, तो आपल्याशी कसा वागेल ह्याची भीती होती तर अन्वय स्वराला प्रत्यक्षात ओळखून घेण्यास उत्सुक होता. त्यात तिच्या सुंदरतेने त्याला आधीच भुरळ घातली होती पण जेव्हा तिचा तो सर्वाना नकोसा झालेला चेहरा त्याच्यासमोर येणार होता तेव्हाही तो असाच वागणार होता का? देव जाणे पण अजूनपर्यंत तरी सर्व ठीक होत.

दोघांनाही पहाटे उशिराच झोप लागली त्यामुळे उठायला देखील उशीर झाला. स्वराला उठायला उशीर झाला असल्याने आज ती पटापट काम आवरत होती. एक तर तिला सर्वांआधी जावं लागतं होत त्यात तिला सरांच टेन्शन आणि आज नेमका तिला झालेला उशीर त्यामुळे स्वराची नेमकी धांदल उडाली होती. आज सरांच्या भीतीने स्वराने आपले बरेच काम तसेच ठेवून दिले आणि ऑफिसकडे निघाली. इकडे अन्वय एकटाच राहत असल्याने त्याला कशाचं टेन्शन नव्हतं. त्याला उठायला उशीर झाला होता पण तो आपलं निवांत आवरत होता. त्याची तयारी झाली होती तरीही अजून ऑफिसला निघायला वेळ होता. तो बेडवर बसलाच होता की त्याची नजर फोनवर गेली आणि त्याने फोन बेडवरून उचलत हातात घेतला. काहीच क्षणात कुलकर्णी सरांना त्याने फोन लावला आणि कुलकर्णी सर कॉल रिसिव्ह करत म्हणाले," व्हॉट अ सरप्राइज अन्वय!! आज कसा काय कॉल केलास?"

अन्वय हळूच हसत म्हणाला," काही नाही सर. इकडे आलो तेव्हा समजलं की तुमची ट्रान्सफर झाली कालच म्हणून म्हटलं कॉल करून बघावं."

कुलकर्णी सर हसतच म्हणाले," क्या बात है! म्हणजे तू मुंबई ब्रँचला आला आहेस. आता कलीगच काही खर नाही बाबा? काहीच दिवसात त्यांची चांगली जिरणार आहे. तू त्यांना काहीच दिवसात सरळ करशील. "

कुलकर्णी सर आणि अन्वय दोघेही काही क्षण हसतच राहिले. अन्वय शिस्तप्रिय होता. तो कामात कधीच हयगय खपवून घेत नसे. त्यामुळे तो जिथे जिथे जाई तिथे तिथे काम एके काम असायचं. मज्जा मस्ती असायची पण त्यालाही वेळ होता, नाही तर साहेब लगेच ओरडायचे. कुलकर्णी सरांना ह्याबद्दल माहिती होत म्हणून ते हसत होते. काही क्षण असेच हसण्यात गेले आणि कुलकर्णी सर हसू आवरत म्हणाले, " बर झालं अन्वय तू कॉल केलास. मला तुझ्याशी कुणाबद्दल तरी बोलायच आहे?"

अन्वयला माहिती होत की ते स्वराबद्दल बोलणार आहेत. अन्वयनेही तेच माहिती करून घ्यायला कॉल केला होता तरीही त्यांना वाईट वाटू नये म्हणून अन्वयने त्यांना कळू दिलं नाही आणि हळूच स्वरात उत्तरला," कुणाबद्दल सर?"

सर आता थोडे उदास झाले होते. त्यांचा आवाजही जड वाटत होता आणि ते नम्र स्वरात म्हणाले, " स्वरा मोहिते नाव आहे त्या मुलीच! अन्वय ती ऍसिड अटॅक पीडित आहे. तिला गरज होती म्हणून मी जॉब दिली पण जॉब देताना एक अट टाकली आणि तीच पूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेतल्या गेलं. मला वाटलं माझा हा निर्णय कालांतराने लोक बदलतील पण तस काहीच झालं नाही आणि स्वरा एका केबिनमध्ये अडकून राहिली. खर सांगू तर मी इथून जातोय पण खूप मोठं ओझं घेऊन जातोय. ती जोपर्यंत त्या केबिनमधून स्वातंत्र्य होत नाही मला चैन पडणार नाही. प्लिज अन्वय तिला बाहेर काढशील ह्यातून? "

अन्वयने तो विचार आधीच केला होता त्यामुळे हळूच उत्तरला," सर मी प्रयत्न करेन ह्यावर आता काहीही बोलू शकणार नाही."

सर पुन्हा एकदा म्हणाले, " थॅंक्यु अन्वय. तस जर करू शकलास तर माझ्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल. अन्वय त्या मुलीने खूप काही सहन केलंय. काहीच कमी नाहीये तिच्यात तेव्हा तिला तिचे अधिकार परत मिळवून दे. तुझ्यानंतर कोण येईल माहिती नाही तेव्हा तू असतानाच त्यातून तिला मुक्त कर पण एक गोष्ट लक्षात घे तिने ह्या काही वर्षात खूप काही सहन केल आहे तेव्हा तिला अस दान म्हणून काहीच देऊ नकोस उलट तिला सर्व मिळाव ते तिच्या अधिकाराने. तिला सर्वांनी स्वता स्वीकारावं अस काहीतरी कर. मला विश्वास आहे तू करशील तरीही सांगतोय. करशील ना माझं हे काम आणि मुक्त कर मला ह्या जाचातून."

अन्वय नम्र स्वरात उत्तरला, " सर मी पक्क सांगू शकत नाही पण जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत प्रयत्न नक्की करेन. "

त्याच्या उत्तराने सरांच्या चेहर्यावर समाधान पसरल होत आणि ते हळूच म्हणाले, " ऑल द बेस्ट. माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्यासोबत. चल अन्वय मी आता समान घेऊन निघतोय सो आपण नंतर बोलू. "

सरांनी फोन ठेवताच अन्वयनेही फोन ठेवला. घड्याळात बघितले तर १० वाजले होते आणि आता ऑफिसलाही निघणे गरजेचे होते .

******************

वेळ १०.४५ मिनिटे झाली होती. स्वरा अन्वयचा विचार करत चालली होती तर अन्वय स्वराचा विचार करत चालला होता. त्यांना ते कुठे आहेत ह्याच सुद्धा भान नव्हतं. ते आज एकमेकांच्या सोबतीने चालत आले होते तरीही त्यांचं एकमेकांकडे लक्ष गेलं नव्हतं. ते ऑफिसच्या दारावर पोहोचले होतेच की नकळत स्वराचा अन्वयला धक्का लागला. अन्वयला धक्का लागताच स्वरा अन्वयकडे बघत उत्तरली," सॉरी सर! "

तिने सॉरी म्हणताच तो तिच्याकडे पाहतच राहिला. आतापर्यंत तो फक्त तिचाच विचार करत होता त्यात आज तिच्या गोड आवाजाचे आणि आकर्षक नजरेचे दर्शन झालं होते. त्याने रात्रभर तिचे फोटो पाहणे काही सोडले नव्हते पण आज तेच डोळे समोर बघण्याचा मोह त्याला काही आवरला नाही. पण ते फक्त क्षणभरच होत. ती सॉरी म्हणून समोर जाऊ लागली आणि अन्वय आता भानावर आला. ती समोर जात आहे हे बघताच अन्वय हळूच म्हणाला," गुड मॉर्निंग मिस स्वरा मोहिते. "

स्वराच नाव अन्वयच्या तोंडून ऐकताच स्वरा तिथेच उभी राहिली. अन्वय तिच्याकडे हसून समोर जात होता आणि स्वरा हळूच आवाजात बोलून गेली, " गुड मॉर्निंग सर!"

तिचा पुन्हा एकदा आवाज येताच अन्वयने तिच्याकडे वळून पाहिले आणि एक क्युटशी स्माईल देत आपल्या केबिनमध्ये पोहोचला. इकडे स्वरा वेगळ्याच विचारात हरवली होती. तिची आणि सरांची अजूनही ओळखी झाली नव्हती तेव्हा त्यांना आपलं नाव कस कळलं ह्याबद्दल तिच्या मनात विचार सुरू होते. ती काही क्षण तशीच उभी राहिली. तिला जाणवलं की समोरचे लोक इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांना कशाची तरी घाई झालीय. तिने त्याच वेळी घड्याळात बघितले. अकरा वाजायला फक्त पाच मिनिटे बाकी होते हे दिसताच ती आपले विचार बाजूला करून धावतच केबिनमध्ये पोहोचली.

स्वरा केबिनमध्ये पोहोचली. सरांनी तिला स्वतःहून समोरून विश केल्याने तीच थोडस टेन्शन गेलं होतं पण अजूनही पूर्ण टेन्शन कमी झालं नव्हतं. अशा स्थितीत सरांनी तिच्यावर ओरडू नये म्हणून तिने पटकन कामाला सुरुवात केली तर इकडे सर्व कलीग मिटिंग रूममध्ये पोहोचले होते. आज अन्वयसोबत सर्वांची पहिलीच मिटिंग होती त्यामुळे सर्वच घाबरले होते. बरोबर ११.१५ झाले असतील जेव्हा मिटिंग सुरू झाली. घाबरत-घाबरतच प्रशांतने प्रेझेन्टेशन द्यायला सुरुवात केली. तो इतका घाबरला होता की अधा-मधात अडकत होता. अन्वयला ते समजलं होत पण कदाचित तो त्याला बघून घाबरला असेल म्हणून त्याने प्रशांतला काहीच म्हटलं नाही. पुन्हा काही मिनिट गेले. प्रशांत आज नीट पद्धतीने प्रेझेन्टेशन सादर करू शकत नव्हता आणि अन्वय ओरडतच म्हणाला, " व्हॉट अ हेल आर यु डूइंग? मी काल स्पष्ट स्पष्ट सांगितलं होतं ना नीट तयारी करून या. मग हा काय खेळ लावला आहे. प्रशांत मला कामात हलगर्जीपणा केलेला अजिबात आवडत नाही. काय केलंस तू ह्या प्रोजेक्ट वर काम तुला तरी कळत आहे का? आणि केलं असणार तर हे काम केलंस? शेम ऑन यु गाईज!! मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. इतकं खराब काम चालत असेल इथे खरच वाटलं नव्हतं. "

अन्वय पहिल्याच दिवशी प्रशांतवर ओरडत होता तर प्रशांत दबक्या आवाजात म्हणाला, " सॉरी सर! पण मला वेळ मिळाला नाही. हे काम खर तर स्वरा मॅडमच आहे. त्यांनीच सर्व काम केलं आणि मला काल सायंकाळी फाइल सोपवली. मला एका रात्री सर्व करायला जमलं नाही. सॉरी सर!! पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही. "

अन्वय ओरडतच म्हणाला," मग एकमेकांचे काम घेताच कशाला? ज्याच त्यानेच करावं. मूर्ख कुठले!! कुठे आहे ही स्वरा बोलवा तिला. तीच काम आहे ना तिलाच छान माहिती असेल ह्याबद्दल."

त्याच्या एका वाक्याने मिटिंग रूममध्ये सन्नाटा पसरला होता कारण स्वरा ह्याआधी कधीच केबिनबाहेर पडली नव्हती. त्यातला कुणीतरी एक व्यक्ती बोलणारच तेवढयात अन्वय ओरडत म्हणाला," बाहेर कुणी आहे का?"

अन्वय एक-दोनदा मोठ्याने ओरडला आणि बाहेर असलेले अमर काका धावतच मिटिंग रूममध्ये अन्वयच्या समोर येऊन उभे राहिले. ते त्याला बघतच होते की अन्वय पुन्हा म्हणाला," काका जा त्या मिस स्वरा मोहितेला घेऊन या. ती काय महाराणी आहे का? तिचे काम दुसर्याने करायला. तिला म्हणावं एक मिनिट पण उशीर व्हायला नको."

काका अन्वयच बोलणं ऐकून क्षणभर उभेच राहिले. त्यांना वाटलं की त्यांनी काहीतरी चुकीच ऐकलं म्हणून ते बाहेर गेले नाही तेव्हाच अन्वय ओरडत म्हणाला," तुम्हाला सर्वाना १० वेळ सांगावं लागत का ? म्हटलं ना तिला बोलवा."

ह्यावेळी मात्र काका धावत-पळतच सुटले आणि तिच्या केबिनला जाऊन थांबले. तिला सरांचा निरोप मिळाला आणि तिलाही घाम सुटला. तिला नक्की काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं. तिने काकांना वारंवार विचारलं होत की नक्की तिलाच बोलावलं आहे का? काकांनी तिला तेच सांगितलं आणि स्वरा घाबरत-घाबरतच मिटिंग रूममध्ये पोहोचली. आधीच रूमच वातावरण तापल होत त्यात स्वराच्या येण्याने ते आणखीच तापल. सर्व लोक स्वराला वेड्यासारखं बघत होते आणि तीही सर्वांच्या नजराना नजर देत होती. ती इकडे-तिकडे बघतच होती की अन्वयने तिच्या हातात फाइल देत म्हटले," मिस स्वरा ही फाइल तुम्ही तयार केलीय का?"

स्वराने इतरांवरून नजर वळवून त्या फाइलवर टाकली . ती एक-एक पान पलटवत म्हणाली," हो सर मीच तयार केलीय. काही प्रॉब्लेम झालाय का? "

अन्वय थोडा वरच्या आवाजात म्हणाला," फाइल तुम्ही तयार केलीय ना मग प्रेझेन्टेशन दुसर कस सादर करू शकत? तुम्हाला इतकाही सेन्स नाहीये का? असो चला समोर व्हा आणि सादर करा."

स्वरा अन्वयकडे डोळे फाडून बघत होती. तिला त्याच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. कदाचित आपण काहीतरी चुकीच ऐकलं असा तिला भास झाला असेल अस वाटलं म्हणून ती उभीच होती तर अनव्य पुन्हा ओरडत म्हणाला, " ह्या ऑफिसमध्ये एकच गोष्ट सर्वाना दहा वेळ सांगावी लागते का? मिस स्वरा गो अहेड!! सादर करा. माझ्याकडे वेळ नाहीये जास्त. "

स्वराने त्याच्या डोळ्यांकडे बघितलं. त्यात संताप होता म्हणून ती लगेच समोर गेली. तिने बाजूला फाइल ठेवली आणि प्रेझेन्टेशन द्यायला सुरुवात केली. तिने सुरुवात केलीच होती की अन्वय तिला अडवत म्हणाला," मिस स्वरा इथे फॅशन शो सुरू आहे का? असेल तर मलाही सांगा! मीही भाग घेतो. तो स्कार्फ काढा आधी. तुम्हाला एवढ्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात का? आता मी आलोय ना सर्वाना सरळ करतो. ओए कुठे सर्वांकडे बघत आहात? काढा तो स्कार्फ!! त्या स्कार्फमुळे नीट संवाद होणार नाही सो आधी तो काढा आणि मग काय ते काम करा. प्लिज लवकर वेळ नाहीये जास्त."

स्कार्फ म्हणजे स्वराची ओळख. आता तोच स्कार्फ तिला काढावा लागतोय म्हणून ती जरा घाबरली आणि काही वेळ इकडे-तिकडे बघू लागली. तिने पुन्हा एकदा अन्वयच्या डोळ्यात बघितले. अन्वयला काहीच वाटत नव्हतं आणि आज पहिल्यांदा तिने ऑफिसमध्ये स्कार्फ काढला. तिने स्कार्फ काढताच सर्व तिच्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहू लागले. पहिल्यांदा तो चेहरा सर्वांसमोर आला होता आणि अचानक सर्वांच्या चेहऱ्यावर कुत्सित भाव निर्माण झाले. काहींनी तिला पाहताच डोळे खाली केलेहोते. आजपर्यंत स्वराबद्दल सर्वांनी ऐकलं होतं पण आज बघितलं आणि जाणवलं की लोक बोलतात त्याहीपेक्षा तिचा चेहरा खराब आहे. आज तिला प्रत्यक्ष बघण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. तिने हळूहळू सर्वांवर नजर फिरवली. तिला बघून बहुतेक सर्वांच्या नजरा खाली झाल्या होत्या. तिला स्वतःचीच क्षणभर लाज वाटली. तिला तो त्यांचा राग त्रास देऊ लागला होता. तिची नजर फिरता-फिरता अन्वयवर येऊन पडली आणि तिथेच थांबली. तो पहिला असा होता ज्याला तिला बघून भीती वाटली नव्हती उलट तो हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कारयुक्त भाव नव्हते की त्याच्या पाहण्यात घृणा नव्हती आणि खूप दिवसाने तिच्या डोळ्यातून पहिल्यांदा अश्रू पडले. ते बहुतेक अन्वयच्या लक्षात आले होते पण त्याने ते तिला जानवु दिल नाही उलट हसऱ्या चेहऱ्यानेच तिला प्रेझेन्टेशन सादर करायची परवानगी दिली. स्वरा फक्त आपल्या चेहऱ्यामुळे घाबरत होती बाकी तिला काहीच कठीण नव्हतं. तिने सुरुवात केली आणि अन्वय तिच्या भाषनशैलीकडे बघतच राहिला. तिची सादर करायची पद्धत, बोलण्यावर कमांड, आवाजातले उतार-चढाव आणि समोरच्याला समजावून सांगण्याची पद्धत ह्यामुळे अन्वय आज भारावून गेला होता. ही फक्त अन्वयची स्थिती नव्हती तर आतापर्यंत ज्यांनी तिच्याकडे पाहायला त्रास केला होता आता तेच कितीतरी वेळ तिच्याकडे एकटक बघत होते. आज पहिल्यांदाच तिला प्रेझेन्टेशन सादर करताना बघत होते आणि पहिल्याच दिवशी तिचे सर्व फॅन झाले. ती अर्धा तास प्रेझेन्टेशन देत होती. त्यात तिने एकदाही फाइलचा वापर केला नाही. ती बोलत राहिली आणि अन्वय तिच्यात हरवत गेला. तीच प्रेझेन्टेशन पूर्ण झालं तरीही अन्वयला कळलं नाही. शेवटी मिटिंग रूममधून टाळ्यांचा कळकळाट येताच अन्वय भानावर आला आणि त्याचेही हात टाळ्या वाजवायला थांबले नाही. सर्व टाळ्या वाजवत होते तर स्वरा त्यांना बघत होती. आज खऱ्या अर्थाने कुणीतरी तिला चेहऱ्यावरून नाही तर टॅलेंट वरून जज केलं होतं आणि अगदी फॅन झाले. तिला त्या क्षणी स्वतःला आवरता आलं नाही तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. आज तिच्या चेहऱ्यावर हसू-अश्रूंचा खेळ सुरू होता. प्रेझेन्टेशन पूर्ण झालं आणि सर्व जाऊ लागले तेवढ्यात पुन्हा अन्वय म्हणाला, " मिस मोहिते हे ऑफिस आहे हे लक्ष्यात ठेवा. इथे पुन्हा मला स्कार्फ मध्ये दिसलेलं आवडणार नाही आणि ह्यापुढे तुमचे काम तुम्हींच करणार आहात हे लक्षात असू द्या."

अन्वयच बोलणं पूर्ण होताच सर्व जाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा काही आनंद जाणवत नव्हता पण आज दोन चेहरे खूप खुश होते. एक म्हणजे अन्वय आणि दुसरा म्हणजे स्वराचा.

स्वरा आपल्या केबिनमध्ये पोहोचली आणि आनंदाने न्हाहू लागली तर अन्वय तिला आपल्या केबिनमधून बघत होता. आज पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता. जरी अन्वयने रागावून तिला हे सर्व करायला लावलं होत पण त्याहीपेक्षा पहिल्याच दिवशी त्याने तिला बंधनातून मुक्त करण्यास पाऊल टाकले होते. ती खुश होती आणि तोही. गंमत अशी की अन्वयची अजूनही तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नव्हती. लोकांना तिचा जळलेला चेहरा दिसत होता पण अन्वय अजूनही तिच्या त्या फोटो वाल्या चेहऱ्यातच हरवला होता. त्याने तिचा जळालेला चेहरा बघितला होता पण त्याच्या नजरेला तो चेहरा कदाचित दिसलाच नाही. ती आताही त्याला खूपच सुंदर भासत होती. काय फरक होता अन्वयच्या आणि इतरांच्या नजरेत..?? नजरेचाच तर फरक असतो. त्याने तिला सुंदर मानले आणि त्याची तिच्यावरून नजर हटत नव्हती आणि लोकांनी तिला कुरूप मानले तेव्हापासून तिच्यातल त्यांना काहीच चांगलं दिसलं नाही.

रेह गयी होगी कुछ तो कमी तेरी रेहमत मे ए खुदा
वरणा तू कही ताजमहल तो कही कब्रस्तान न बनाता

क्रमशा ....