Bhagy Dile tu Mala - 31 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ३१

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ३१





आरजु नही कोई , ना कोई ख्वाहिश है
जिना मेरा खुद ही एक रंजीश है
किससे की जाये सिफारीश जिने की
यहा तो हर तरफ लोगो की साजिश है


अलीकडे स्वराच आयुष्य सेटल व्हायला आलं होतं. ती नाईलाजाने का होईना पण ऑफिसमध्ये गुंतली होती पण कुलकर्णी सरांनी बदलीची बातमी सांगताच स्वरा जरा घाबरली. स्वराच्या घाबरण्यामागे काही कारण होत. एक म्हणजे स्वराला जॉब शिफारशीमुळे मिळाली होती आणि दुसर कारण म्हणजे कुलकर्णी सरांनी तिला सांभाळून घेतले होते पण दुसरा कुणी नवीन येईल आणि त्याला आपल्याबद्दल कळलं तर इतर लोकांनी जशी आपल्याला नौकरी दिली नाही तसच त्यानेही काढून टाकले तर पुन्हा तीच आयुष्य रस्त्यावर येईल अशी भीती तिला वाटत होती. सहसा जॉबवर लागल्यावर कुणी काढत नाही पण स्वराच्या आयुष्याबद्दल काहीच सांगता येत नव्हतं. तिच्या आयुष्यात शाश्वत काहीच नव्हतं फक्त तिचा चेहरा सोडून म्हणून स्वराला भीती वाटत होतीं. आजची पूर्ण रात्र तिने ह्याच भीतीत काढली होती.

सकाळीं उठून नेहमीप्रमाणे ती ऑफिसला जायला तयार झाली पण आज तिचे पाय ऑफिसकडे वळतच नव्हते. नवीन व्यक्ती म्हटलं की स्वराचे त्यांच्याबद्दल फार काही चांगले अनुभव नव्हते त्यामुळे आज पुन्हा एकदा तिला धडकी भरली होती. कशीतरी हिम्मत करून तिने ऑफिस गाठल. ती ऑफिसच्या बाहेर पोहोचलीच होती की तिला जाणवलं आज पूर्ण ऑफिस गच्च भरलेलं आहे. वेळेआधी सहसा कुणीच येत नसत त्यामुळे आज सर्वाना आधीच बघून स्वराच्या भीतीत आणखिच वाढ झाली. ती दबक्या पायाने, नजर खाली करत सरळ आपल्या केबिनला पोहोचली. सर्वांच्या नजरेपासून दूर जाताच स्वराच मन शांत झाल. तिने काही क्षण दीर्घ श्वास घेण्यात घालवला आणि कॉफीसाठी अमर काकांना सांगितले आणि ती कॉफीची वाट पाहू लागली. कॉफी घेताच स्वराच थोडं टेन्शन कमी होईल म्हणून तिने कॉफी बोलावून घेतली होती पण स्वराने ऑर्डर केल्यावरही बराच वेळ झाला तरीही कॉफी आली नाही म्हणून स्वरा जरा वैतागलीच होती. तिने पुन्हा एकदा अमर काकांना आवाज दिला आणि ते धापा टाकतच तिच्याजवळ पोहोचले. त्यांनी तिला कॉफीचा कप दिला आणि पुन्हा धावतच जाऊ लागले. स्वराला ते सर्व विचित्र वाटत होतं म्हणून तिने त्यांना अलगद थांबवत विचारले," काय झालं काका आज कॉफी आणायला एवढा उशीर का? आणि तुम्ही असे दम टाकत धावत का आहात?"

अमर काका हळूच आवाजात म्हणाले," सॉरी स्वरा मॅडम!! आज नवीन सर येणार आहेत. मी अस ऐकल आहें की त्यांचा स्वभाव फार कडक आहे म्हणून तर आज सर्व वेळेआधीच आले आहेत. शिवाय मला त्यांची केबिन आवरायची आहे. आज पहिल्याच दिवशी मला त्यांचा ओरडा खायचा नाही म्हणून ही सर्व धावपळ सुरू आहे. मॅडम मी नंतर बोलतो तुमच्याशी आता काम आवरून घेतो."

काका जेवढ्या फास्टमध्ये बोलून गेले तेवढ्याच फास्टमध्ये ते केबिनबाहेर पडले. स्वरा त्यांचं बोलणं एकूणच शॉक झाली होती. एक तर तिला रात्री नीट झोप आली नव्हती त्यात आता हे सर्व ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर भीतीच्या रेषा स्पष्ट जाणवू लागल्या होत्या. ती त्यांच्या बोलण्यात अशी हरवली होती की समोर पडलेली कॉफी थंड होतेय हे सुद्धा लक्षात आलं नाही. काही वेळ ती तशीच होती. आज पूर्ण ऑफिस शांत वाटत होतं. स्वराने ऑफिसमध्ये नजर फिरवली. कधीतरी ह्याच ऑफिसमध्ये लोक एकमेकांशी गप्पा मारायचे पण आज सर्व काही बदलल होत. स्वरालाही आज नक्की काय होणार आहे ह्याची भीती वाटत होती.

स्वराने आज कामाला तर सुरुवात केली होती पण तीच चित्त थार्यावर नव्हतं. तिच्या हातून आज एक काम नीट होत नव्हतं. राहून-राहून तिची नजर दारावर जायची. दारावर कुणीच आलं नाही हे बघून पुन्हा ती कामात लक्ष लावायची. टेन्शनमुळे आज तिच्या किती कॉफी झाल्या होत्या तिलाच माहिती नाही. तिची सतत नजर दारावर फिरत होती. तिच्या नजरांचा हा खेळ बऱ्याच वेळ सुरू होता पण सर काही आले नाही. आता दुपार झाली होती. ऑफिसमधले सर्वच टिफिन खायला बसले होते. स्वराही आता निवांत बसली होती. दुपार झाली म्हणून तिला वाटलं आता सर येणार नाहीत म्हणून ती निशिंत झाली होती. काहीच क्षणात टिफिन खाऊन झाला आणि स्वरा खुर्चीला टेकलीं. ती आता थोडी रिलॅक्स वाटत होती आणि त्याच वेळी ऑफिसमधले सर्व कलीग ऑफीसच्या मधोमध गोळा झालेले तिला दिसले. सर्व कलीगनी मिळून मोठा बुके आणला होता. तोच बुके ते कुणाला तरी देत होते. स्वरा आपल्याच जाग्यावरून ते सर्व बघत होती. तिला ऑफिसमधील कलीग दिसत होते पण सर गर्दीत कुठेतरी हरवले होते त्यामुळे ते आलेले असतानाही तिला मात्र त्यांचे दर्शन झाले नाही. १० मिनिट सर्व असच सुरू होत. आता हळूहळू गर्दी नाशीही झाली आणि मधातून एक व्यक्ती बाहेर आला. दिसायला रुबाबदार, अगदी तरुण भासत होता. अंगावर ब्लू कोट सोबत फॉर्मल ब्लॅक शु, रंग गोरा आणि चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. ती त्यांच्याकडे बघतच होती की त्याच वेळी सरांची तिच्यावर नजर पडली. सरांची नजर पडताच ती जरा गोंधळली आणि मान खाली करून पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली. सरांची काहीच क्षण तिच्यावर नजर गेली आणि ते तसेच आपल्या केबिनमध्ये पळाले. तर स्वरा त्यांच्या नजरेपासून वाचले म्हणून स्वतःला शांत करत होती पण तिच्या हृदयाचे ठोके अजूनही कमी झाले नव्हते. तरुण बॉस म्हणजे अग्रेशन जास्त म्हणजे राग जास्त आणि तडकाफडकी बोलणारे. कदाचित त्यांनाही एक मुलगीच चुकीची तर वाटणार नाही ह्या विचाराने स्वरा कोलमडली होती. तीच डोकं आज जरा जास्तच फास्ट चालत होते. त्यात दुनियेपेक्षा पुढचे विचार धावत होते. ती स्वतःच्या नर्व्ह कंट्रोल करू पाहत होती पण आज तिला ते काही जमत नव्हतं. एक तर नवीन व्यक्ती तोही तरुण त्यामुळे स्वरा खूपच घाबरली होती. तरुण मुलांबद्दल तिचे अनुभव सर्वात वाईट होते म्हणून आज ती स्वतःला शांत करू शकली नव्हती. तिची नजर सतत भिरभिर फिरत होती पण तिला काहीच सापडत नव्हत.

काहीच क्षण गेले. स्वरा आपल्या केबिनमध्ये बसून काम करण्यात मन लावंतच होती की तिला जाणवलं ऑफिसमधला प्रत्येक व्यक्ती सरांच्या केबिनमध्ये जातोय आणि नंतर १० मिनिटात परत येतोय. सुरुवातीला स्वराच त्यावर लक्ष गेलं नाही पण आता प्रत्येक व्यक्तीच केबिनमध्ये जातोय हे बघून स्वराची पुन्हा शिट्टी बिट्टी गुल झाली. सर्व जात आहेत म्हणजे काही वेळाने तिलाही जावं लागणार हे माहिती होत. स्वराला असच काहीतरी आज होणार ह्याची भीती वाटत होती आणि जेव्हा तेच प्रत्यक्ष समोर घडताना दिसू लागलं तेव्हा स्वराच अवसान गळून पडाल. ती खुर्चीवर एकाच जागी घट्ट बसून राहिली. ती हलायला तयार नव्हती. आता जवळपास सर्वांचे नंबर झाले. दीपक सरच मध्ये जायचे बाकी होते आणि तेही मध्ये जाऊ लागले. स्वरा हे सर्व आपल्या केबिनमध्ये बसूनच बघत होती.

दीपक केबिनच्या समोर पोहोचला आणि हळूच आवाजात उत्तरला, " मे आय कम इन सर ?"

केबिनमधून भारदस्त आवाज बाहेर आला," प्लिज कम."

आवाज येताच दीपक मध्ये पोहोचला. दीपकही सर कसे असतील ह्या विचाराने घाबरला होता. दीपकने मध्ये जाताच काही फाइल्स त्यांच्या हातात दिल्या. सर त्या फाइल्स चेक करत होते. काही क्षण त्यांचं लक्ष फाइल्सवरच होत. पूर्ण फाइल्स चेक झाल्यावर सर आनंदात म्हणाले, " एक्सलंट वर्क!! पहिल्याच दिवशी मला इम्प्रेस केलंस तू!! वाटलं नव्हतं इथे कुणी इतकं हुशार असेल. गुड जॉब दीपक!!"

दीपक हसतच उत्तरला," थॅंक्यु सर पण हे माझं काम नाही. हे काम स्वरा मॅडमने केलं आहे."

सर हसतच उत्तरले," ओ आय सी!! त्यांच काम आहे तर मग त्या का घेऊन नाही आल्या? आज सुट्टीवर आहेत का त्या?"

दीपक हळूच हसत म्हणाला," नाही सर! त्या तिथे केबिनमध्ये बसून आहेत."

दीपक समोर काही बोलणार त्याआधीच सर हसत म्हणाले," ओ ! येताना बघितलं मी तिला. ऑफीसच्या ओनरची मुलगी आहे का रे दीपक ती? नाही म्हटलं मॅडम केबिनच्या बाहेर सुद्धा आल्या नाही. मला वाटलं या राज्याच्या राणी तर नाहीत त्या मिस स्वरा."

सर हसतच होते आणि दिपक थोडा शांत झाला. दीपकला सरांना काहीतरी सांगायचं होत. त्याने बोलणं सुरू केलंच होत की सरांना फोन आला. तो फोन सरांच्या आईचा होता. सर आता फोन मध्ये बिजी झाले आणि दीपक परवानगी घेऊन केबिनच्या बाहेर पडला.

दीपक बाहेर येताच स्वरा आणखीच घाबरली. तिला वाटलं आता तिला बोलावण्यात येईल पण तस काहिच झालं नाही. पाहता पाहता ऑफीस सुटायची वेळ झाली आणि स्वराचा जीव भांड्यात पडला. सर्व कलीग ऑफिसमधून निघाले आणि स्वराही वेळ न हरवता बाहेर पडली. स्वरा ऑफिसच्या दारात पोहोचलीच होती की त्याच वेळी सर दारावर आले. तिला सरांची भीती वाटत होती पण काहीच बोलली नसती तर सरांचा अपमान झाला असता म्हणून स्वरा हळूच आवाजात म्हणाली," गुड इविनिंग सर!"

तिच्या गोड आवाजाने त्यांचं लक्ष सहज तिच्याकडे वळाल. सर तिला वळून बघणारच तोपर्यंत स्वरा समोर निघून गेली होती पण त्या आवाजाने सरांच लक्ष हरवल होत. स्वरा बऱ्याच समोर निघाली आणि आता सरही बाहेर पार्किंगमध्ये पोहोचले. त्यानी पार्क केलेली कार बाहेर काढली आणि चालवू लागले. त्यांनी कार सुरूच केली होती की त्यांना पुन्हा एकदा दीपक दिसला आणि सर त्याच्याजवळ गाडी थांबवत म्हणाले," दीपक स्टेशनला जातो आहेस ना चल मी सोडून देतो."

दीपक त्यांना नाही म्हणू शकला नाही आणि गाडीचे दार उघडून तो मध्ये बसला. तेवढ्यात सर हसत म्हणाले," माझं नाव माहिती आहे ना तुला?"

दीपकच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं आणि तो म्हणाला, " हो सर ! अन्वय इनामदार."

त्याच उत्तर ऐकून अन्वयच्या चेहऱ्यावर हसू आलं. काही सेकंद शांततेत गेले आणि पुन्हा अन्वय म्हणाला," अरे हो! दीपक आपला विषय अर्धवट राहिला आईचा फोन आल्याने. काय सांगत होतास तू त्या महाराणीबद्दल?"

दीपकच हसू पुन्हा गायब झाल आणि तो नम्र स्वरात उतरला," सर ऑफिसमध्ये सर्वाना ह्याबद्दल थोडं फार माहिती आहे पण कितपत खर आहे माहिती नाही. माझ्या एकदा कानावर पडलं म्हणून मला ह्याबद्दल थोडं फार माहिती झालं. "

अन्वय पुन्हा गमतीत हसत म्हणाला," काय ती ब्रिटनची महाराणी आहे ह्याबद्दल?"

अन्वय हसत होता तर दीपकच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी पसरली होती. अन्वयच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही त्यामुळे तो गप्प बसला आणि त्याच पूर्ण लक्ष आता दीपकच्या बोलण्यावर होत.

दीपक पुन्हा हळूच उत्तरला," सर ती महाराणी नाहीये उलट तिला शिक्षा मिळाली आहे."

अन्वय पुन्हा मधातच बोलला," ऑफिसमध्ये शिक्षा हे काहीतरी नवीनच ऐकतोय? जरा समजेल अशा भाषेत सांगशील का?"

दीपक पुन्हा हळूच म्हणाला," हो सर सांगतो. ती स्पेशल केबिन नसून शिक्षा आहे! ही शिक्षा ऑफिसने नाही तर तिला कुलकर्णी सरांनी दिली आहे. मी एकदा त्यांना बोलताना ऐकलं होतं की स्वरा ऍसिड अटॅक पीडित आहे. मला त्याबद्दल खर वाटलं नाही म्हणून मी माहिती काढली तेव्हा मला माहिती पडलं की ती गोष्ट बरोबर होती. तिचा चेहरा खूप खराब झाला त्यामुळे तिला कुणीच जॉब देत नव्हते. मग एके दिवशी कुलकर्णी सरांना शिफारस आली की स्वराला जॉब देण्यात यावी. तेव्हा सरांनी तिला जॉब तर दिली पण एक अट टाकली?"

कारमधील वातावरण एकदम गंभीर झालं होतं. अन्वयच्या चेहऱ्यावरच हसू काहीच क्षणात गायब झाल आणि त्याच्या तोंडून पटकन आवाज आला," कुठली अट?"

दीपक पुन्हा शांत चेहऱ्याने म्हणाला," की तिला जॉब दिल्या जाईल पण ऑफिसच वातावरण खराब करता येणार नाही म्हणून तिला वेगळी केबिन दिल्या जाईल. त्यातूनच तिला काम करावं लागेल व लोकांना भेटता पण येणार नाही. तिची आर्थिक स्थिती त्यावेळी खूपच खराब होती, घरी कर्ज परत मागणाऱ्याची लाइन लागली होती, घरात हजारो टेन्शन होते म्हणून तिने ती अट स्वीकारली आणि त्या केबिनमध्ये कायमची बंदिस्त झाली. वर्ष झाले इथे जॉब करतेय ती पण तिला कुणी पाहिलं नाही की तिच्याबद्दल कुणाला काही माहिती नाही. फक्त नाव माहिती आहे स्वरा मोहिते. नावही ह्यासाठी कारण मॅडमच काम खूप छान आहे. यांच्यासारख काम ऑफिसमध्ये कुणीच करू शकत नाही. कामात त्यांचा हात पकडणे कदाचित कठीणच पण ह्या पलीकडे त्यांची काहीच ओळखी नाही."

अन्वय मन लावून सर्व ऐकत होता. तेवढ्यात दीपक ओरडत म्हणाला," सर स्टेशन आलं."

दीपकच्या ओरडल्याने अन्वय भानावर आला आणि त्याने पटकन गाडीचा ब्रेक मारला. गाडी थांबवताच दीपक बाहेर निघाला आणि काही क्षणात पसार झाला तर अन्वय आजूनही तिथेच होता. काही क्षण त्याला आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याने नक्की हे सर्वच ऐकलं की दुसर काही ह्याबद्दल त्याला शंका येत होती. तो विचार करत होताच की गाडीच्या हॉर्नने तो विचारातून बाहेर आला. त्याने कार सुरू तर केली पण त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू होत.

इकडे स्वरा लोकलच्या डब्यात काहीतरी विचार करत चालली होती. आज तर ती बचावली होती पण उद्या काय होईल ह्या विचाराने ती पुन्हा एकदा घाबरली होती.

खोये हुये है हम
खुदकेही खयालो मे
क्या खयाल वो जरिया है
जो हमारी मंजिल एक बनायेगा ....

क्रमशा ....