सब कुछ खोकर मैने पाया है खुदको
तो बता-ए-जिंदगी मैने गवाया क्या है??
आजपर्यंत स्वराच्या डोळ्यावर एक पट्टी बांधल्या गेली होती. नकारात्मक विचारांची पण आज तिने पहिल्यांदा डोळे उघडून बघितले तेव्हा तिला जाणवू लागल की आपल्या दुखापेक्षाही ह्या जगात भरपूर दुःख आहेत. एका व्यक्तीसोबत जेव्हा काहीतरी वाईट घडत तेव्हा फक्त त्या व्यक्तीसोबत वाईट घडत नाही तर त्या सोबतच पूर्ण फॅमिली सफर करते. कधी कधी तर फॅमिली स्वतःच कंटाळून त्या व्यक्तीला उलटे सुलटे बोल सूनावतात पण इथे अस काहीच नव्हतं. उलट स्वराला कुणाचे बोल ऐकावे लागू नये म्हणून तिचे आई-वडील तिला प्रोटेक्ट करत होते. आईचे शब्द ऐकताच आज स्वरा स्वतःचा विचार सोडून घरच्यांचा विचार करू लागली आणि तिला जाणवलं की आपल्यापेक्षाही जास्त त्रास ते सहन करत आहेत आणि आपण काय करतोय तर संघर्ष करण्याऐवजी पळवाट शोधतोय. हाच विचार त्यांनी केला असता तर कदाचित आज आपण इथपर्यंत आलोच नसतो. आज स्वराला स्वतःच्याच कर्मावर लाज वाटू लागली आणि तिने आज सर्व जगाशी लढण्याचा निर्णय घेतला.
" जिंदगी मे सब कुछ खो दो चल जायेगा
पर वो उम्मीद ना खोना जीससे सब कुछ पाया जा सकता है."
स्वराची स्थिती सुधारली नव्हती पण तिने आपलं मन घट्ट करून घेतलं होतं आणि आता प्रॉब्लेम फेस करायला ती तयार झाली. आज पहिल्यांदा तिने बुक्स हातात घेतले होते आणि कसलाही विचार न करता दिवसरात्र वाचत होती. स्वराच्या आईला ते बघून आनंद झाला होता त्यामुळे तिच्या आईने दिवसा घडलेला किस्सा तिच्या बाबांना सांगितला नव्हता. ह्या एका क्षणाने एक चांगली गोष्ट घडली होती की ती आता नकारात्मक विचारातून बाहेर पडली. जेव्हा आयुष्यात कुणीच नसत तेव्हा पुस्तक साथ देतात अस तिने फक्त ऐकलं होतं पण आता त्याचा प्रत्यय तिला येऊ लागला होता.
अलीकडे स्वराने चार भिंतीच्या मध्ये अडकून राहणं सोडलं. ती रात्री थोड्या वेळ वर माडीवर जाऊन बसत असे. पाहणाऱ्याच्या नजरा बदलल्या नव्हत्या की शब्द बदलले नव्हते पण तिचा त्याकडे पाहण्याचा नजरिया मात्र बदलला होता. ते जेव्हा सर्व तिच्याकडे हसून बघत होते तेव्हा तीही त्यांच्याकडे हसूनच बघत होती आणि आज पहिल्यांदा तिला जाणवू लागल की आपण लोकांकडे जेवढं जास्त लक्ष देतो तेवढं ते जास्त त्रास देतात याउलट आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना भाव दिला नाही तर ते स्वताच कंटाळून आपली वाट सोडतात. स्वरा अलीकडे खुश राहू लागली होती. पुन्हा एकदा तिच्या घरात सुंदर वातावरण तयार झालं होत. स्वराच घर तिच्या चेहर्याने नाही तर तिच्या आवाजाने बहरत हे तिने काहीच दिवसात घरच्यांना लक्षात आणून दिल होत. स्वराला अस बघून स्वराच्या आई-वडिलांत आणखी उत्साह वाढू लागला होता आणि ते पुन्हा जोमाने आपल्या मुलीसाठी मेहनत करू लागले होते.
स्वरा आता सकारात्मक झाली होती तरीही राज नावाची घंटा तिच्या गळ्यात कायमची बांधल्या गेली होती. त्याला पोलीस कस्टडीमधून ज्यूडीशीअल कस्टडीमध्ये स्थानांतरित करण्यात आलं होतं. त्याची बेल नाकारली होती पण तिला केस भांडायला दिल्लीला जावं लागणार होतं. दिल्लीला जायचं म्हणजे पुन्हा तेच ते सर्व आठवणार होत म्हणून स्वरा जरा घाबरली होती. तिने हे सर्व घरच्यांना कळू दिलं नव्हतं पण त्याबद्दल तिच्या मनात विचार सतत सुरू होते.
एका रात्रीची गोष्ट. स्वरा बेडवर पडली आणि झोपायचा विचार करू लागली पण तिला आज झोप येत नव्हती. रात्रही बरीच झाली होती. तिला करमत नव्हतं म्हणून ती माडीवर जायला निघाली पण तिला जाणवलं की आई-बाबा अजून झोपले नाहीत आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं सुरू आहे तेव्हा त्यांचं बोलणं ऐकू येताच ती बेडरूमच्या दाराजवळ थांबली आणि त्यांचं बोलणं ऐकू लागली. स्वराची आई म्हणाली," अहो ऐका ना!! स्वरा आता बरी होत आहे पण हे आपले दिवस असेच किती दिवस राहतील?? तुम्हाला तर माहिती आहे तिच्या शिक्षणासाठी आधीच कर्ज घेतल आहे त्यात सर्वांनी पैशांची मदत करणं बंद केलं आहे. कर्जाच डोंगर वाढत आहे, लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली आहे. कस करायचं हो सर्व ? डोकं बधिर झालंय माझं तर विचार करून करून. "
तिचे बाबा हळूच म्हणाले," हो ग कळतंय मला पण मग काय मुलीला फेकून द्यायचं आहे? आता तिला आयुष्यभर आपणच सावरायच. कदाचित ती जगाला इतकी घाबरून आहे की बाहेर पडणार नाही. आपण तिला जन्म दिला आहे सो शेवटच्या श्वासापर्यंत तिची काळजी घेऊ बाकी आपल्यानंतर तिचं नशीब!! काळजी करू नका हो!! मी आणखी जास्त मेहनत करेन. कर्जही फेडल्या जातील आणि स्वराचही सर्व मॅनेज करतो. तुम्ही निवांत झोपा बर उगाच टेन्शन नका घेऊ."
त्यांच्यात पुढे बरच काही बोलणं झालं पण स्वराची ते सर्व ऐकण्याची हिम्मत काही झाली नाही. ती पटकन जाऊन बेडवर पडली. आतापर्यंत तिला झोप लागत नव्हती पण आता विचारांनी तिच्या डोक्यावर ताबा मिळविला. तिला नक्की काय करायला हवं काहीच कळत नव्हतं म्हणून बराच वेळ ती विचार करत होती. एकीकडे होती दिल्ली ज्या शहराने तिच्याकडून सर्व हिरावून घेतलं होतं तर दुसरीकडे होत्या पालकांच्या अपेक्षा. एकीकडे दिल्ली शहराणे तीच अस्तित्त्व हिरावून घेतलं होत तर दुसरीकडे होती तिच्या घरच्यांची स्वप्न जी फक्त दिल्ली शहर पूर्ण करू शकत होती. तिला दिल्लीला जाण्याची भीती होती पण दुसरीकडे आईवडिलांना हतबल झालेलं बघन तिला असह्य करत होत. तिला विचार येऊन गेले होते की काही वर्षात आईवडील म्हातारे होतील तेव्हा ते आपल्याला सांभाळतील की आपण त्यांना सांभाळाव. ते कदाचित म्हणणार नाहीत की तू काहीतरी कर पण हेही सत्य होत की जे काही झालं त्यात स्वरा सहभागी होती त्यामुळे त्यातून तिलाच वाट काढावी लागणार होती. आज पूर्ण रात्र ती चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करत होती आणि तिने फायनली एक निर्णय घेतला. दिल्ली पुन्हा गाठण्याचा.
सोचा ना था तेरे शहर मे फिरसे आणा होगा
बिती बातो को फिरसे गले लगाना होगा
अगर है किस्मत को मंजूर तो किस बात की खलिश
लढणे आये थे तो लढनाही होगा !
दुसऱ्या दिवसाची सकाळ होती. ती आज जाणूनच बाहेर फिरायला निघाली होती. लोकांच्या नजरा त्याच होत्या पण कदाचित तिला हे सर्व समोर फेस करावं लागणार होतं म्हणून तिने आपलं मन घट्ट केलं होत शिवाय तिने स्कार्फ सुद्धा बांधला नव्हता. लोक बघत होते आणि ती चालत राहिलीे. सुरवातीला थरथर कापणार्या स्वरामध्ये कुठून हिम्मत आली माहिती नाही पण तिच्या चेहऱ्यावर आता भीतीचा लवलेशही नव्हता. ती ओढ्याच्या चबूतर्यावर बसली आणि तिने पूजाला पटकन फोन लावला. पूजा समोरून फोन उचलत म्हणाली , " बापरे!! हे काय बघतेय मी!! आज चक्क मॅडमचा फोन . सूर्य दुसरीकडून तर उगवला नाही ना??"
स्वराने गोड स्मित केले आणि हळूच म्हणाली," हो आजपासून सूर्य दुसऱ्याच बाजूने उगवणार आहे."
पूजाला तिच्या बोलण्यातल काहीच कळाल नव्हतं म्हणून ती विचार करत म्हणाली," काय म्हटलं समजलं नाही? "
स्वरा पुन्हा हळूच हसत म्हणाली, " समजून पण घेऊ नकोस. तुझ्या डोक्यात नाही शिरणार त्यापेक्षा माझं एक काम कर. "
पूजाने लगबगीने विचारले," कोणतं काम?"
स्वरा चिंतीत होत म्हणाली," पूजा मी टाइम टेबल चेक केला आहे. अजूनही फार उशीर झाला नाही. १५ दिवसाने पेपर आहेत सो प्लिज माझं एक काम करं नाहीं तर फार उशीर होईल. आज प्रिन्सिपाल सरांना भेट आणि त्यांना सांग की स्वराला या सेमचे पेपर द्यायचे आहे ती पेपर देऊ शकते का? कारण मी प्रॅक्टिकल वगैरे केले नाहीत म्हणून म्हणतेय. करशीलना माझं काम? विचारशील ना सरांना? "
पूजा थोडी उदास होत म्हणाली, " करेन ग! हे काय विचारण झालं पण मला दुसरेच विचार सतावत आहेत. तू पुन्हा दिल्लीला येणार आहेस. पक्क आहे तुझं? ज्या शहराने तुझं सर्व हिसकावून घेतल त्याच शहरात तू पुन्हा परत येणार आहेस. इकडे राहू शकशील समाधानाने? "
स्वरा आता हसतच उत्तरली, " पूजा शहर कोणतंही असो मुलींची स्थिती सरविकडे सारखीच. दोष कुणाचा आहे हे बघणार नाहीत बस बोलायला हवं त्यांना. हो येणार आहे मी दिल्ली. माहिती आहे की सोपं नाही माझ्यासाठी पण घरच्यांची परिस्थिती बघता जर मी अशीच बसून राहिले तर कदाचित काहीच उरणार नाही करायला त्यामुळे थोडा त्रास होईल तर सहन करेन पण याशिवाय दुसरा पर्याय नाही. करशील ना माझं काम?"
पूजा हसतच उत्तरली," मला आवडेल!! मला छान वाटत आहे की मला तीच स्वरा पुन्हा पाहायला मिळेल. मी कळवते तुला सायंकाळी. चल बाय."
पूजा फोन ठेवणारच की स्वरा नाराज होत म्हणाली," पूजा तुला ह्या भुतासोबत राहायला काही प्रॉब्लेम तर नाही ना? "
पूजा काही वेळ शांत होती तर स्वरा उत्तर ऐकण्यास उत्सुक. पूजा हळूच हसत म्हणाली," तू ये तर आपण दोघीही रूम मध्ये भूत भूत खेळू. पागल यु आर माय जाण!! म्हटलं होतं ना कधीच साथ सोडणार नाही तुझी!! तू पण ना काहीही बोलतेस. मी कळवते तुला मग लवकरच भेटू. मिस यु डार्लिंग!! "
पूजाच्या उत्तराने तीच मन शांत झाल होत. कुणीतरी आहे आपल्या आयुष्यात ज्याला आपल्याबद्दल काळजी आहे हे ऐकून ती जरा मनातून सुखावली होती.
पूजाशी बोलणं झालं आणि स्वरा दिवसभर टेन्शन मध्ये होती. सर काय म्हणतील काय नाही ह्या विचाराने तिला खूप टेन्शन आलं होतं त्यामुळे दिवसभर ती इकडून तिकडे चकरा मारत होती. तर स्वराला अस बघून आई घाबरल्या होत्या. स्वराच्या डोक्यात आणखी काय शिजत आहे हे त्याना कळत नव्हतं. आईला राहावलं नाही आणि आईने तिच्या डोक्यात काय चालल आहे ह्याबद्दल विचारलं देखील होत पण ती सायंकाळी सांगेन म्हणून आईला उत्तर देण टाळत होती. आज दिवसभर विचार करून करून तीच डोकं दुखू लागलं होतं. जीवाला चैन तर अजिबातच नव्हतां पण तिने कसातरी पूर्ण दिवस काढला. सायंकाळचे पाच वाजले होते. पूजाला सुट्टी झाली असणार हे तिला जाणवलं. तिला आता पूजाच्या कॉलची वाट पाहायची नव्हती म्हणून तिने स्वतःच कॉल केला. पूजाने समोरून कॉल रिसव्ह केलाच होता की स्वरा म्हणाली," किती उशीर पूजा? सांग ना सर काय म्हणाले?"
पूजा हसतच म्हणाली," हो बाई जरा धीर धर सांगते सांगतेे. सो ऐक सर म्हणाले आम्हाला आनंद आहे की ती अशा परिस्थितीतही शिक्षणाला महत्त्व देते आहे. आम्हाला आनंदच होईल जर तिने पेपर दिला तर आणखी एक गुड न्यूज अशी की सरांनी तुझी एक्साम फी माफ केली आहे. आता फक्त दिल्लीची ट्रेन पकड. ये लवकर मी आतुर झालेय तुझ्या भेटीला. "
पूजाने इतकी सुंदर बातमी दिली होती की स्वरा आनंदात ओरडलीच होती. स्वराचा आवाज येताच आई तिच्याकडे धावत आल्या आणि आणि मोठ्यानेच म्हणाल्या," काय झालं स्वरा?"
स्वराने फोन कट केला आणि उड्या मारतच म्हणाली," आई सरांनी माझी पेपर फी माफ केली आहे सो आता मी पुन्हा दिल्लीला जाऊ शकते."
स्वरा आनंदाने उड्या मारत होती तर आई उदास होऊन खुर्चीवर बसली. आई का काहीच बोलत नाहीये ह्याच कारण तिला कळलं होतं म्हणून ती आईजवळ बसत म्हणाली," माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. खर सांगू तर भीती मलाही वाटते आहे तिकडे जाण्याची पण आई घरात बसून नक्की काय मिळणार आहे? घरी बसून माझ्या डोक्यात नको ते विचार येणार आहेत त्यापेक्षा तिथेच जाते, अभ्यासात मन तरी लागेल माझं. एक सांगू आई, आता ना माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. जे काही आहे ते फक्त मिळवायच आहे. मला फक्त हवीय तुमची साथ जी कायम देत आला आहात मग मी काहीही करू शकते. तुला आहे ना माझ्यावर विश्वास आई?"
आईने स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले," गुणाची ग माझी बाय तू!! वाटलं नव्हतं की एवढं सर्व होऊनही एवढ्या लवकर पुन्हा जबाबदारी हाती घेशील. आज पुन्हा एकदा अभिमान वाटतोय तुझा. जा आणि यशस्वी होऊन परत ये. आम्ही आहो सोबत तुझ्या. "
बाबा हे सर्व दारावरून एकत होते आणि ते म्हणाले," विजयी भव!! "
स्वराने त्यांना धावतच मिठी मारली. आज ते तिघेही खूप दिवसाने खुश होते. त्यांच्या मनात आशा निर्माण झाल्या होत्या. स्वराने जायचा निर्णय घेतला आणि सर्व काही बदललं पण खरंच तिला समाजात कुणी स्वीकारणार होते का आणि तिचा प्रवास सोपा जाणार होता?
क्रमशा ....