Bhagy Dile tu Mala - 10 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १०

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १०






स्वयमने वाढदिवसाच्या दिवशी झालेला किस्सा जाऊ दिला होता पण आता जे त्याने स्वराच्या तोंडून ऐकलं होतं ते तो काहीही केल्या विसरू शकत नव्हता. त्याच्या डोक्यात ते घट्ट बसल होत. काहीतरी नक्कीच विचित्र आहे हे त्याला जाणवलं होत आणि आता तो स्वराच्या वागण्यावर बारीक लक्ष देऊ लागला. एक तर तो आधीच शांत पण शंकेमुळे तो आणखीच शांत झाला होता. तिच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे ह्याचा तो शोध घेऊ लागला होता आणि त्याला वाटत होतं तस खरच घडू लागलं होतं. स्वराच एखादं काम निघालं की ते आपोआप पूर्ण व्हायचं. अभ्यासासाठी सर्व साधने, हॉस्टेलमध्ये सर्व सोयी सुविधा तिला अशाच मिळाल्या नव्हत्या. त्याला पूर्णतः खात्री झाली होती की तिच्यावर कुणीतरी नजर ठेवून आहे. त्यामुळे तो हळूहळू तिच्यावर नजर ठेवू लागला आहे पण राज स्वता कधीच तिच्यासमोर येत नसे उलट तो आपल्या मित्रांद्वारे तिच्यावर लक्ष ठेवत असे आणि तेही रोज वेगळा मित्र तर कधी मैत्रीण त्यामुळे राज ह्या सर्वांच्या मागे आहे हे त्याला कळालं नव्हत. त्याच्या काही मैत्रिणी तिच्या क्लास, हॉस्टेलमध्ये होत्या त्यामुळे त्याला तिच्याबद्दल अचूक माहिती मिळत होती तर स्वयमच्या हाती काहीच लागलं नव्हतं म्हणून तो निराश झाला होता. आता त्याच स्वराशी बोलणं देखील कमी झालं होतं. त्याच्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले होते पण स्वराला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हत. तो आधीच शांत असल्याने तिला त्याच्या वागण्याबद्दल एकदाही शंका आली नव्हती.

स्वयम जरा विचारात हरवला असे त्यामुळे सध्या त्याच कुठेच मन लागत नव्हत तर स्वराने आता त्याला मनातलं सांगायचं पक्क केलं. आज पुन्हा एक रविवार. तिने त्याला काल रात्रीच फोन करून सांगितलं होतं की उद्या तिला काही शॉपिंग करायची आहे सो सोबत चल. खर तर शॉपिंग हा बहाणा होता तिला त्याच्यासोबत काही क्षण घालवायचे होते आणि मग मनातलं सांगायचं होत. स्वयम आधी नाही नाही म्हणत होता पण तिच्या हट्टासमोर त्याच काहीच चाललं नाही आणि तो नाईलाजाणे यायला तयार झाला.

आज ती मस्त तयार होऊन कॉलेजगेट समोर पोहोचली. तो अजूनही आला नव्हता म्हणून त्याची वाट पाहतच त्याला कॉल करू लागली. ती कॉल करत होती पण तो कॉल घेत नव्हता म्हणून तिची चिडचिड सुरू झाली. काही क्षण झाले आणि तो गाडी घेऊन समोर आला. ती त्याला रागावनारच पण त्याने आल्या आलीच सॉरी म्हटले आणि तिचा राग क्षणात नाहीसा झाला. तो आला तर होता पण आज त्याने कार आणली नव्हती . आज स्वयम बुलेट घेऊन आला होता. खर तर त्याच्यासोबत तस बसण तिलां सोपं नव्हतं पण आजच्या दिवसांनंतर त्यांचं नात आणखीच पक्क होणार होत त्यामुळे आता त्याच्यासोबत अस गाडीवर बसायला काहिच प्रॉब्लेम नव्हता. ती गाडीवर बसली आणि स्वयम गाडी चालवू लागला. आज स्वरा पहिल्यांदा अशी कुणाच्या तरी गाडीवर बसली होती त्यामुळे थोडी ऑकवर्डनेस तर होतीच पण स्वयमसोबत जसजसा प्रवास समोर जाऊ लागला तशी ती ऑकवर्डनेस कमी झाली आणि ती भारी फिल करू लागली. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत पण आज त्याच्यासोबत अस पहिल्यांदा बसत असल्याने ती त्याच्याशी बोलायची हिंमत करू शकली नव्हती. काही क्षण गेले असाच शांत शांत प्रवास सुरु होता. ती मागच्या मागे लाजतच होती की त्यांच्या गाडीसमोर अचानक गाडी आली आणि स्वयमने ब्रेक मारला. स्वयमने अचानक ब्रेक मारला आणि तो रागातच समोरच्या व्यक्तीला शिव्या देऊ लागला पण अचानक ब्रेक मारल्याने तिचे हात त्याच्या खांद्यावर गेले आणि ती मनोमन सुखावली होती. हा प्रवास ती कधीच विसरू शकत नव्हती . स्वयम समोरच्या माणसावर ओरडला आणि पुन्हा गाडी चालविण्यावर त्याने लक्ष घातले. काही क्षण गेले आता तो शांत वाटत होता आणि त्याने हळूच म्हटले, " स्वरा आगे से राइट मे कुछ शॉप्स है. देख लो अगर तुम्हे कुछ अच्छा लगता हो तो ! "

त्याच्या आवाजाने ती भानावर आली. खर तर तिचा शॉपिंगचा प्लॅन कधीच नव्हता त्यामुळे आता काय बोलावं तिला कळत नव्हतं पण बोलली नसती तर तो खरच तिला शॉपिंगला घेऊन गेला असता म्हणून हळुच गोड आवाजात म्हणाली, " स्वयम, सुनो ना !! मुझे शॉपिंग करणीही नही थी. मुझे तो इंडिया गेट देखणा था इसलीये तुम्हे लेकर आयी थि. प्लिज चले क्या? "

ती बोलून तर गेली पण थोड्या वेळ घाबरली होती. तो काही क्षण शांतच होता आणि हळूच म्हणाला, " बहोत नटखट हो गये हो तुम स्वरा! अब क्या दुसरा ऑप्शन है मेरे पास. चलो अभि. वैसे भी गुस्सा होंकर क्या फायदा ना? "

स्वयमचा होकार येताच ती आणखी आनंदी झाली. स्वयमने होकार जरी दिला असला तरी ते विरुद्ध बाजूला निघाले होते त्यामुळे त्याने गाडी पलटवली. त्यांना निघून १५ मिनिट झाले होते त्यामुळे त्यांना आता इंडिया गेटला जायला पाऊण तास लागणार होता शिवाय तिथे गेल्यावर सुद्धा त्यांना वेळ लागणारच होता म्हणून दोघांनी आधी नाशता केला आणि आता निवांत जाऊ लागले. स्वराने दिल्ली ह्याआधी कधीच बघितली नव्हती. दिल्लीबद्दल फक्त ऐकण्यात आलं होतं त्यामुळे ती आपली नजर चौफेर फिरवत होती. छान मोठ्या - मोठ्या इमारती, वेगवेगळी मोठं मोठी दुकाने तिच्या नजरेतून जाऊ लागली. खर तर आज रविवार असल्याने फार जास्त ट्रॅफिक नव्हती त्यामुळे तो पाऊण तासाचा प्रवास तिला भरपूर आनंद देऊन गेला होता.

फायनली ते तिथे पोहोचले. आजपर्यंत इंडिया गेट तिने टीव्हीमध्येच बघितला होता. ती इंडिया गेटच्या समोर पोहोचली आणि तिची मान अभिमानाने ताठ झाली. आज त्यांचं नशीब सुद्धा इतकं छान होत की 26 जानेवारी जवळ येत असल्याने तिथे परेड सुरू होती. सैनिकांची परेड बघून तिचा उर अभिमानाने भरून आला आणि तिने सैनिकांना बघून कडक सॅल्युट मारले. कितीतरी वेळ ती परेडकडे बघून तशीच सावधान स्थिती मध्ये उभी होती पण तीच काही मन भरत नव्हतं. सैनिकांची परेड विरुद्ध बाजूने गेली आणि स्वराने हात खाली केला. तीच आता त्याच्यावर लक्ष गेलं आणि तो आपल्यावर हसत असल्याचं तिला जाणवलं. तो हसत असतानाही ती त्याच्यावर रागावली नव्हती उलट प्रेमाने तिने त्याला विचारले, " क्या हुआ स्वयम ?? तुम ऐसें क्यो हस रहे हो? "
स्वयम हसत - हसतच तिला म्हणाला, " एक खयाल आया है दिलं मे की बाहर के लोग यहा पर आते है तो सब तुम्हारे जैसे ही क्यू सॅल्युट करते है? कुछ खास वजह? "

त्याच उत्तर द्यायला ती उत्सुक होती. तीचा उर अभिमानाने भरून आलं होता आणि ती निधड्या छातीने म्हणाली, " स्वयम शायद तुम ये हर रोज देखते हो इसलीये तुम्हे कुछ स्पेशल नही दिखता होगा लेकिन मै पेहली बार ये सब देख रही हु. देश की धरोहर सिर्फ कल्चर नही होता, सम्मान भी होता है और देश का सम्मान बनाने के लिये हर सिपाही रात दिन बलिदान देता है. जो हमारे देश के सम्मान के लिये इतना कुछ करते है उनके लिये ये सॅल्युट मतलब हमारा सम्मान है. हमे गर्व है अपणे सिपाहीयो पर बस येही हम उन्हे बताना चाहते है. "

तीच उत्तर ऐकताच त्याच हसू आपोआप गायब झाल आणि काही क्षण तर तो त्या स्मारकाकडे बघत राहिला. बाजूला कुणीतरी गाईड त्याबद्दल इतिहास सांगत होता. अस नव्हतं की त्याने हा इतिहास कधी ऐकला नव्हता. जवळपास तो रोज ऐकायचा पण आज स्वराच्या शब्दाने स्वयम तो इतिहास इंडिया गेटकडे बघून फिल करू लागला होता. काही क्षण दोघेही तसेच त्या स्मारकाकडे बघत होते. स्वयम पूर्णता शांत झाला होता आणि स्वरालाही त्याच्या चेहऱ्यावर अभिमान जाणवताच तिचा चेहरा खुलून निघाला. काही क्षण ते तसेच उभे राहून बघत होते आणि शेवटी पुन्हा बाहेर पडू लागले. "

स्वयम आता खूप शांत भासत होता आणि त्याने स्वराला विचारले, " स्वरा अब कहा जाना है? "

स्वरा गमतीत म्हणाली, " जहा तुम लेकर चलो! बस साथ रहे तुम्हारा. "

तिच्या उत्तराने तो क्षणभर हसला. त्याची शांतता आपोआप भंग झाली. स्वरा होती पण कार्टून कधी काय बोलून देईल तिलाही कळायचं नाही पण हा तो तिच्या उत्तराने खुश झाला होता. तो लाजतच होता की ती पुन्हा म्हणाली, " फिलहाल किसीं पार्क मे चलकर बैठते है. मुझे कुछ तुमसे बात करणी है. बहोत दिन से सोच रही हु पर मुमकीन नही हो रहा था पर चलो आज बात करही लेते है . "

ती आज सर्व सर्व स्पष्ट स्पष्ट बोलत होती त्यामुळे त्याला कल्पना आली होती की ती आज नक्की काय बोलणार आहे. आज त्याचही स्वप्न पूर्ण होणार होत त्यामुळे नकार द्यायचा विषयच नव्हता. त्याने हळूच तिला म्हटले, " यहा से 20 मिनिट की दुरी पर है एक पार्क है सो चलते है वही पर. "

त्याने गाडी काढली आणि ती त्याच्या गाडीवर बसून निघू लागली. आतापर्यँत फक्त स्वराच्या चेहँऱ्यावर आनंद होता पण तिच्या मनातलं ऐकायला मिळेल म्हणून त्याचाही चेहरा आनंदाने बहरून निघाला होता. स्वराच्या नजरेने ते सहज हेरले होते . आज तो स्वराला इतका लाजत होता की त्याने तिच्याकडे नजर वर करून पाहिले नव्हते. बोलायच तर दूरच. गाडीवरून जातानाही स्वराने कुठून सुरुवात करायची ते सर्व मनात ठरवलं होतं. ती थोडी घाबरली होती पण आज ती थांबणार नक्कीच नव्हती. काही क्षण गेले त्याने गाडी पार्क समोर थांबवली आणि दोघेही पावले टाकत टाकतच समोर जाऊ लागले. पार्क मध्ये छान हिरवळ होती. १० ते ११ च्या दरम्यानची वेळ असेल. फार गर्दी नव्हती पण अजूनही काही लोक तिथे होते. स्वराला दूरवर एक बाक रिकामा दिसला आणि ती त्याकडे जाऊ लागली. ते थोडस अंतर पार करतानाही दोघांना बराच वेळ लागला कारण डोक्यात हजार विचार होते म्हणून ते हळुहळू पाऊल टाकत समोर चालू लागले. फायनली ते बाकावर बसले तरीही कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं. त्या भावना असतातच अशा की सहज बोलून जाण सोपं नसत. तिने आतपर्यंत तर मन मजबूत केलं होत पण तो समोर असताना मात्र तिला शब्द सुचतच नव्हते. काही क्षण ते तसेच होते आणि बाजूला ताई स्वराच्या हातात एका मुलाला देत म्हणाली, " दीदी प्लिज पकडो ना इसे. दोनो भाई बडे शैतान है वो देखो दुसरा कहा भाग रहा है. मै उसे पकडकर लाती हु तब तक इसे पकडो. "

त्या ताई त्या छोटूला सोडून पळाल्या. तो मुलगा खूप गोलू मोलू होता . त्याला पकडताच स्वरा एकदम खुश झाली. त्याची स्किन इतकी सॉफ्ट होती की त्याला पकडून ती खूपच सुखावली होती शिवाय त्याची ती क्युट स्माईल तर विचारूच नका. त्याला पकडताच ती स्वतःला आवरु शकली नाही आणि त्याच्या दोन तीन गोड किस्सी तिने घेतल्या. तिला अजून त्याच्यासोबत वेळ मिळणार तेंव्हापर्यंत त्याची आई दुसऱ्या मुलाला घेऊन परत आली आणि स्वराला थॅंक्यु बोलून पुन्हा निघाली. त्या गोलू मोलूला पकडून तिचा आनंद पुन्हा वाढला आणि तिने ठरवलं की आता बस बोलायच म्हणजे बोलायच. तिने डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आता तिच्यात हिम्मत आली होती पण ती डोळे उघडणारच तेव्हाच स्वयमला फोन आला. तिने डोळे उघडले तेव्हा तो कॉल वर बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर उदासी साफ साफ दिसत होती. काहीच सेकंदात त्याने फोन ठेवला आणि तिला म्हणाला, " सॉरी स्वरा नेक्स्ट टाइम बात करते है. पापा को अस्थमा की बिमारी है. उनकी तबीयत बिघड गयी है. ममी लेकर गयी है उन्हे हॉस्पिटल लेकिन मुझे भी जाना पडेगा. सॉरी मै तुम्हे भी छोड नही पाउंगा. चलो मै तुम्हे रिक्षा कर देता हु. "

तो खूपच घाबरला होता म्हणून पटापट बोलून तो समोर निघून गेला तर स्वराची पावले निघायला मानत नव्हती. तिला आज त्याला कोणत्याही स्थितीत मनातलं सांगायचं होत पण परिस्थिती अशी होती की ती त्याला सांगू शकणार नव्हती. ती तिथेच थांबली होती. स्वयमच्या आवाजाणे ती भानावर आली आणि हळूहळू पावले टाकत ती समोर चालू लागली. तो खूपच घाबरला होता त्यामुळे लवकरात लवकर निघायचा विचार करत होता. ती बाहेर येत नाही तोपर्यंत त्याने समोरून रिक्षा आणली होती. रिक्षा येताच स्वरा त्यात बसली आणि काही सूचना देऊन तो धावत - पळत निघाला. रिक्षा सुरू होताच स्वरा कॉलेजकडे निघाली पण तिच्या डोक्यात अजूनही विचार सुरू होते. ती आजूबाजूला बघत तर चालली होती पण तीच मन अजूनही त्या बाकावर होत. रिक्षा समोर जात होती आणि ती आपल्या वेड्या मनाला समजावु लागली. आज नाही तर उद्या पण बोलायच तर आहे पण ह्याक्षणी तिचं मन नक्कीच ते मानायला तयार नव्हत.

इकडे राज आपल्या घरी निवांत बसला होता. तो कुणाशी तर कॉल वर बोलतच होता की सूरज त्याच्या रूम मध्ये धावत जातच म्हणाला, " भैया मैने आपसे कहा था ना वो लडका भाभी के साथ कुछ ज्यादा ही नजदिक आ रहा है. देखो आज भाभी उसके साथ घुमने गयी है. मैने अपनी आंखो से देखा है उनको बाईक पर जाते हुये. "

सुरजचा आवाज येताच राजच्या हातातला फोन खाली पडला. त्यांच्या डोळ्यात राग सामावला होता. त्याने ड्रॉवरमधील गाडीची चावी घेतली आणि कुठंतरी निघाला
. " काय होत त्याच्या डोक्यात? "

क्रमशा .....