Bhagy Dile tu Mala - 6 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ६

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ६


प्रत्येक नात्यात महत्त्वाचे असतात प्रेम , आदर आणि विश्वास. एकमेकांवर प्रेम होणं नक्कीच सोपं आहे पण एकमेकांचा आयुष्यभर आदर करून त्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळी स्पेस देणे आणि कशीही परिस्थिती आली तरीही तो विश्वास कमी होऊ न देणे ह्यातच नात्यांच यश लपलेलं असत. ह्यातली एकही गोष्ट नाहीशी व्हायला लागली की प्रेम आपोआप संपत जात. जे प्रेम अथांग असत त्याला सुरुंग लागतो आणि ते हळूहळू केव्हा नाहीस होत कळत सुद्धा नाही. स्वरा त्याच्या घरी गेली तेव्हापासून त्याच्यावरचा विश्वास आणखीच प्रबळ झाला होता. त्याच्या आईवरून कुटुंब किती शांत संस्कारी आहे हे तिला कळून चुकलं होत. प्रेमात कुटुंबही तर महत्त्वाचं असतच कारण आपण कितीही प्रेम केलं तरी शेवटी कुटुंबातच राहावं लागतं. स्वयमचा आदर तिला आधीपासूनच होता.

अलीकडे कियारा आणि ती दोघीच रूमवर असल्या की स्वरा तिला स्वयमबद्दल सतत विचारत असे. कियाराही त्याची शाळेपासूनची मैत्रीण त्यामुळे अशी एकही गोष्ट नव्हती जी तिला त्याच्याबद्दल माहिती नव्हती. जेव्हा जेव्हा कियारा स्वयमबद्दल बोलत असे तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असे. तिच्या शब्दात त्याच्याप्रति कायम आदरच भासत असे. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव ही त्याची विशेषता. ज्याचे सर्वच फॅन होते. असा कुठलाच मित्र नव्हता जो त्याच्याबद्दल वाईट बोलत असे. त्यामुळे तीच गोष्ट तिच्याही अंगी भिनली होती. शांत शांत राहणाऱ्या स्वयमने तिच्या मनाच्या साम्राज्यावर काहीच दिवसात राज्य करायला सुरुवात केली होती आणि ती स्वतःहून त्याच्या जवळ जाऊ लागली. अल्लड वयात झालेलं पहिल प्रेम असतच खास. त्याला ना मर्यादा असतात ना जबाबदारी फक्त असते ती ओढ एकमेकांची. जरी स्वयम - स्वरा एकमेकांना बोलले नव्हते तरीही त्यांच्याबद्दल सर्वच मित्रांना कल्पना आली होती. जशा कियारा, पूजा स्वराची गंमत करत असत तसेच त्याचे मित्रही त्याची गंमत करत असत. स्वरा - स्वयमला आपल्या मनातलं सांगायची जेवढी आतुरता नव्हती त्याहीपेक्षा जास्त आतुरता त्यांच्या मित्रांना होती कारण सर्वानाच वाटत होतं की ते फक्त एकमेकांसाठी बनले आहेत. हळूहळू ती घडीही जवळ येऊ लागली.

अशीच एक सायंकाळ. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि पेपरचे दिवसही जवळ येऊ लागले होते. अलीकडे तिने त्याला आपल्या मनातलं सांगायचा प्लॅन पुढे ढकलला होता. तिला अभ्यासात विघ्न येऊ द्यायचे नव्हते शिवाय हा असा एक क्षण होता जो तिला खास पद्धतीने साजरा करायचा होता म्हणून तिने आताच त्याला सर्व सांगण्यापासून वंचित ठेवले होते. तिचा जोरदार अभ्यास सुरू झाला. तसा तिला जेव्हा जेव्हा निवांत वेळ मिळत होता तेव्हा तेव्हा त्याचा विचार करत असे पण अलीकडे तिने सर्व विचार बाजूला ठेवून आपलं लक्ष फक्त अभ्यासात घातलं होत. दिवसभर क्लास आणि रात्री शक्य असेल तेवढ्या वेळ अभ्यास असा तिने आपला दिनक्रम बनवून घेतला होता. स्वरा - स्वयमची फक्त कॅन्टीन मध्ये भेट व्हायची तेवढ्याच वेळ ते सोबत असायचे, एकमेकांशी दोन - चार मिनिट बोलायचे आणि हसून एकमेकांना विदा करायचे. स्वयम देखील अभ्यासात हुशार विद्यार्थी त्यामुळे त्याने सुद्धा हाच दिनक्रम ठरवला होता. दिवस कितीही बिजी असला तरीही दिवसात एकदा त्यांची नजरा - नजर व्हायची आणि ते सर्व टेन्शन आपोआप विसरून जायचे.

सायंकाळची वेळ होती. पूजा, स्वरा क्लास करून पूर्णता थकल्या होत्या म्हणून केव्हा एकदा फ्रेश होऊन थोडा वेळ बेडवर टेकतो अस त्यांना झालं होतं त्यामुळे पटापट पावले टाकत त्या हॉस्टेलकडे निघाल्या. त्यांनी हॉस्टेलची पायरी चढलीच होती की समोरून वॉर्डनने स्वराला आवाज दिला. वॉर्डनचा आवाज येताच स्वरा , पूजा दोघीही थांबल्या होत्या. काहीच क्षणात वॉर्डन त्यांच्या जवळ पोहोचल्या आणि हातात चावी देत म्हणाल्या, " स्वरा आजसे तुम जीस रूम पर रेह रही हो वो किसीं और को दि गयी है. तुम्हारी नयी रूम सुरेश तुम्हे दिखाकर आयेगा. "

स्वराची आता कियारा सोबत छान गट्टी जमली होती म्हणून त्यांना सोडून जाण तिला नक्कीच आवडल नव्हतं. वॉर्डन समोर जातच होत्या की स्वरा त्यांना थांबवत म्हणाली, " मॅडम प्लिज नयी लडकीयो को दुसरे कमरे मे शिफ्ट कर दिजीये ना. अभि फिर से नयी शुरुवात करणी पडेगी. "

वॉर्डन आता रागावतच म्हणाली, " स्वरा धीस इज नॉट माय डिसीजन. ऑथोरिटी टेक्स अ डिसीजन. दे हॅव अ पॉवर. माय वर्क इज टू फोल्लो द ऑर्डर सो प्लिज गेट द बॅग्स अँड जॉईन न्यू रूम. धीस इज द फायनल ऑर्डर. अंडरस्टॅण्ड ! "

वॉर्डन सुरेशला सांगून निघाल्या तर सुरेश त्यांना रूम दाखवायला समोर समोर जाऊ लागला. स्वराची आता फार चिडचिड होत होती. एक तर आधीच पेपरच टेंशन आणि त्यात हे पुन्हा शिफ्टिंग म्हणून मन मारतच ती सुरेशच्या मागे जाऊ लागली होती. काही क्षण गेले आणि ते एका रूमवर पोहोचले. सुरेशने त्यांच्या हातून चावी घेतली आणि दार खोलू लागला. त्याने दार खोलताच तिथून प्रस्थान केले. स्वरा आतमध्ये पोहोचली आणि आतापर्यंत तिची होणारी चिडचिड आपोआप गायब झाली. ती रूम इतकी सुंदर होती की कुणीही तिथे राहायला नकार देऊच शकत नव्हत. खूप मोठी रूम आणि त्यात फक्त दोघांसाठी बेडची व्यवस्था. एकदम कोपऱ्यावर रूम असल्याने कुणाच्या आवाजाचा तिला त्रास होणार नव्हता शिवाय समोर बाल्कनी. ज्यातून पाहिलं की मूल ग्राउंड गर खेळताना दिसायचे. रात्री चांदणे पाहण्याची मज्जा पण त्यातून काही खासच असायची. रूमची पेंटिंग इतकी सुंदर केली होती की तिथे पोहोचताच त्यांना प्रसंन्न वाटू लागलं. आपल्याला ही रूम मिळाली आहे बघून स्वरा - पूजा दोघीही खुपच खुश झाल्या आणि सरळ जुन्या रूममध्ये परतल्या. त्यांनी कियाराला सर्व काही सांगितलं आणि त्याही रूम बघायला उत्सुक झाल्या होत्या. जरी त्या दोघीना वेगळी रूम मिळणार होती तरीही त्यांची मैत्री इतकी खास होती की त्या केव्हाही जाऊ शकत होत्या. कियारा, शोभनाने रूम बघितली आणि मनोमन खुश होऊ लागल्या. त्या सर्व इतक्या आनंदी होत्या की रातो - रातच सर्वांनी मिळून दोघांच्या सामानाची शिफ्टिंग केली होती.

सामान शिफ्ट करून झालं आणि दोघीही खूप थकल्या. त्यामुळे आता केव्हा जेवतो नि केव्हा नाही त्यांना अस झाल होत. त्या मेसमध्ये पोहोचल्या. मेसच जेवण म्हणजे अगदी कंटाळवाणे. ते फक्त पोट भरायच काम करायचं पण आज त्यांना खूपच भूक लागली असल्याने त्यांना जे मिळालं ते खाव लागणार होतं. ते शिफ्टिंग करून उशिरा आले होते म्हणून त्यांचा नंबर शेवटी लागला होता. काही मुलींच्या ताटात त्यांना ती पत्ता कोंभीची भाजी दिसली होती. ज्यात भाजी कमी आणि पाणी जास्त असायचं. पत्ता कोभिची भाजी बघताच तिचा मूड खराब झाला होता तरीही मन मारत ती समोर जाऊ लागली. तिने जेवण घ्यायला ताट समोर केलंच होत की तिच्या ताटात कॉंटिनेंटल वाढल्याच लक्षात आलं. तिने खुप दिवस झाले कॉंटिनेंटल खाल्लं नव्हतं म्हणून चमकतच म्हणाली, " अंकल आज कॉंटिनेंटल कुछ खास है आज? "

तिला पाहताच ते काका हळूच म्हणाले, " कुछ नही है बस आज गलती से खाना खतम हो गया. अभि तुम्हे भुखा तो नही रख सकते इसलीये जलदी जलदी मे ये बनाना पडा. "

तिला त्याच्या बोलण्यावर विश्वास तर बसला नव्हता पण तिला त्याच करायचं काय होत. ती कॉंटिनेंटल समोर सर्व विसरली. स्वरा तर आज खूपच खुश होती. तिला मनासारखं जेवण मिळालं आणि ती जेवनावर तुटून पडली. आज खूप दिवसाने तिने भरपेट खाल्लं होत. तिच्यासोबतच ज्या मुली मागून आल्या होत्या त्यांनाही तेच जेवण मिळालं म्हणून सर्वच खुश होत्या. सर्विकडे आज काय खास आहे म्हणून चर्चा सुरू होत्या पण ते गुपित काही उघडलं नाही. जेवण झालं आणि पुन्हा ती रूमवर निघाली. रात्रीचे जवळपास ११ वाजले होते . जेवण जास्त झालं असल्याने पूजा बेडवर पडताच झोपी गेली तर स्वरा गॅलरीमध्ये येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर द्विगुणित आनंद होता. ती आज खूप दिवसाने असे चंद्र चांदने बाहेर उभी राहून बघत होती आणि तो रंग तिच्यावर चढला होता.

स्वरा आपल्या चंद्राकडे बघत होती तर राज दुरूनच आपल्या चंद्राकडे पाहत होता. तिला त्याच्याबद्दल कधीच काही माहिती नव्हतं पण त्याला तिच्याबद्दल सर्व काही माहिती असायचं. स्वरा आकाशाकडे बघत स्वयमचा विचार करत होती तर राज तिच्याकडे बघुन आपल्या भविष्याचा विचार करत होता. स्वराच्या आयुष्यात नकळत एकाच वेळी दोन गोष्टी आल्या होत्या. एक म्हणजे प्रेम आणि दुसर पागलपन. प्रेम ते जे ती स्वयमवर करत होती तर पागलपन जे राजला स्वराबद्दल होत. प्रेम आणि पागलपन मध्ये नक्की फरक काय ?

प्रेम निरागस असत तर पागलपण अपेक्षा घेऊन येत.

प्रेमात मर्यादा असतात तर पागलपण मर्यादेच्या पलीकडे असत ज्याबद्दल कुणीच शाश्वती देऊ शकत नाही.

प्रेमात समजूतदारपण असतो तर पागलपणात काहीतरी मिळविण्याचा क्रेज असतो.

प्रेम नाही मिळालं तर माणूस काही दिवसात सावरू शकतो पण पागलपणमध्ये ?????

विचार न केलेलाच बरा. स्वरा आज खूप खुश होती आणि राजही. प्रेम दोघांनाही होत पण त्यांच्या प्रेमात भरपूर फरक होता. एकाच वेळी स्वरा प्रेमाचे सुंदर अनुभव घेत होती आणि राजही.

पण पुढे स्वराच्या आयुष्यात हेच प्रेम उलथापालथ घालणार होत हे स्वराला माहीत नव्हतं. प्रेम पाहता आयुष्य बनवतो आणि जर चुकीच्या व्यक्तीवर झालं किंवा चुकीच्या व्यक्तीने केलं तर काय होत हे स्वरा पुढे अनुभवणार होती.

क्रमशा ....