Bhagy Dile tu Mala - 3 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ३

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ३

तरुण वयातले हे क्षणच जीवनात आनंद घेऊन येतात. कारण हीच तर वेळ असते जेव्हा आपल्यावर जबाबदारीच ओझं नसत . दुनियेच्या अपेक्षा असल्या तरीही मित्रांची निर्विवाद साथ असते. भावनांची सुंदर रांगोळी असते ज्यात आपण सतत वेगवेगळे रंग भरत जातो. हे क्षणच पुढे आठवणी बनतात ज्या आयुष्यात पुन्हा परतून कधीच येत नाहीत. बालपण असो की तरुणपण प्रत्येकाची आपली एक वेगळीच मज्जा असते. स्वराने आय.आय.टी. ला नंबर लागावा म्हणून जवळपास आपलं सर्वच सॅक्रीफाइस केलं होतं पण आता तिने आपलं स्वप्न पूर्ण करायला एक पाऊल पुढे टाकलं. आता जगत असताना तिला आपल्या प्रत्येक इच्छा मारून जगायची गरज नव्हती. ती आपलं तरुणपण सुद्धा एन्जॉय करत होती . त्यात लाजेचे भाव होतेच, अल्लडपणाही होता, जबाबदारी होती, मेहनतही होती आणि हे सर्व सोबत असताना अभ्यासही सोबत होताच.

कॉलेज आता बऱ्यापैकी सुरू झालं होतं. स्वरा त्या मुलाच्या मागे धावल्या नंतर तो कधीच तिच्या मागे आला नव्हता. स्वराने जरी त्या मुलाच्या मागे धावून त्याची मज्जा घेतलो होती तरीही त्याची कमी तिला जाणवत होती. तो तिला घाबरला आणि नंतर कधीच तिच्या मागावर आला नाही. कधीकधी तो तिला कॅन्टीनवर मित्रांसोबत दिसायचा पण तेव्हा तो तिच्याकडे बघण कायम टाळत असे. तो जेव्हा जेव्हा तिला पाहायचा तेव्हा स्वराच्या चेहऱ्यावर हसू असायचं पण आता ते हसू देखील कुठेतरी गायब झाल होत. तसा तो थोडा शांतच पण ती कॅन्टीनला असली की मग आपोआपच त्याची बोबडी वळायची बाहेर. आता थोडं उलट सुरू झालं. तो तिला बघायला मागे येत नसे तर स्वराला तो दिसला की तीच लक्ष त्याच्याकडे जाऊ लागलं.

तिला क्षणभर पाहण्यासाठी तिच्या मागे येणारा मुलगा समोर असताना तिच्याकडे नजर वर करून पाहत नाही याची स्वराला फारच मज्जा वाटत असे. कधीही कुण्या मुलाला जवळ न येऊ देणारी स्वरा तो प्रत्येक क्षण नव्याने अनुभवत होती. तिने नकळत त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवून घेतले होते. तो जरी मागावर येत नसला तरी कधी कधी तो तिच्याकडे लपून बघायची संधी सोडत नव्हता. त्याच अस लपून पाहणं देखील तिच्या मनात केव्हा घर करून गेलं हे तिला सुद्धा कळालं नव्हतं. दुसरा कुठला मुलगा जर अस वागला असता तर तिने त्याला सरळ शिव्या दिल्या असत्या पण त्याच्याबाबतीत मात्र सर्व उलट होत. ती त्याच्या नजरेत काहीतरी शोधत असायची. कदाचित आदर ! म्हणतात ना मुलीची नजर इतकी तीव्र असते की कुठला मुलगा चांगल्या किंवा गैर हेतूने बघतो हे त्यांच्या सहज लक्षात येत. स्वराने लक्ष दिलं. त्याच्या नजरेत आदर दिसला आणि ती आणखीच त्याच्याकडे खेचल्या जाऊ लागली. कॉलेज लाइफ ल, अभ्यास तर होताच पण हे क्षण तिला मनातून सुखावून जात होते आणि नकळत का होईना ती त्या क्षणात गुंतली जात होती.

मै देखती रही ख्वाबो मे जिस्को
वो सामने आकर छुप सा गया है
दोष तकदिर का है या मेरे खयाल का
जवाब दे दे जिंदगी ये इमतेहा बडा है ...

कॉलेजचे सुरुवातीचे दिवस अगदी मज्जा मस्ती करण्यात, इतरांना ओळखून घेण्यात जाऊ लागले पण नंतर अभियांत्रिकी नक्की काय असते हे स्वराच्या लक्षात येऊ लागलं. अगदी मोजके लेक्चर आणि त्यात डोक्यावरून जाणाऱ्या थेरीजनी स्वराच टेंशन आणखीच वाढवलं. कॉलेज सुरू होऊन काही दिवस झाले होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रांचे प्रॅक्टिकल सुरू झाले. आज रसायनशास्त्राच्या प्रॅक्टिकल्सचा पहिलाच क्लास होता. प्रत्येकाला प्रॅक्टिकल करण्यासाठी एक पार्टनर मिळाला होता. स्वरा लॅबमध्ये पोहोचली तेव्हा तिला कळालं की पूजा आज तिच्यासोबत नव्हती म्हणून ती थोडी उदास झाली परंतु पूजा पुढच्याच रोला तिच्या समोरा - समोर असल्याने तिला थोडं बर वाटल होत. ती लॅब मध्ये पोहोचली आणि आपल्या पार्टनरची वाट बघू लागली. स्वराला कुठल्याही मुलासोबत प्रॅक्टिकल करायला आवडत नसे आणि आज अनोळखी मुलाबरोबर प्रॅक्टिकल करावं लागणार असल्याने तिचा मूड आणखीच खराब झाला. तिने पार्टनर चेंज व्हावा म्हणून मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मॅडमने डोळे दाखवताच ती आपल्या जागेवर जाऊन उभी राहिली. तिची ही इच्छा तर पूर्ण झाली होती पण मॅडमकडून त्याच नाव नक्की माहिती पडलं. कुणीतरी स्वयम अगरवाल तिचा पार्टनर होता.

प्रॅक्टिकल सुरू होऊन ५ मिनिटे झाली होती पण तो काही आला नव्हता. तिला आज कुठल्याही मुलासोबत प्रॅक्टिकल करावं लागणार नाही म्हणून ती मनोमन खुश होऊ लागली. ती आपल्या आनंदातच प्रॅक्टिकल करत होती की काही क्षणातच कुणीतरी लॅबमध्ये धावतच आल. आपली बॅग बाजूला ठेवत तो मॅडमकडे पोहोचला. मॅडमने त्याच्याकडे रागावून पाहिल पण पहिलाच क्लास असल्यामुळे त्यांनी त्याला आत येण्याची परवानगी दिली. मॅडमने त्याला त्याच्या पार्टनरच नाव सांगितलं आणि स्वयम देखील आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. स्वराने आपल्या प्रॅक्टिकलला सुरुवात केलीच होती की तो तिला जॉईन झाला. आपल्या बाजूला हा कोण मुलगा उभा आहे हे पाहण्यासाठी तिने मान वर केली आणि पाहतच राहिली. त्याला पाहताना तिने आपले घारदार डोळे मोठे केले आणि बघून दचकलीच. गडबडीत तिच्या हातातून नरसाळे पडणार तेवढ्यातच त्याने ते सावरुन घेतले. ती आताही त्याच्याकडे पाहतच होती कारण स्वयम तोच मुलगा होता जो नेहमी तिच्या मागे येत होता. त्याला तिच्यावर हसू येत होतं पण स्वतःला सावरत त्याने तिला बाजूला व्हायला सांगितले.

आज लॅबमध्ये एच २ एस शोधून काढायच असल्याचं तिने त्याला सांगितलं आणि तोही प्रॅक्टिकल करायला तिची मदत करू लागला. स्वयम नव्हता तोपर्यंत ती प्रॅक्टिकलवर पूर्णपणे फोकस करत होती पण तो आला आणि रसायनाच सर्व गणितच बिघडल. तो बाजूला आहे हा विचार करूनच तिचा गोंधळ उडाला होता. ती एका रसायनाच्या जागी दुसरं रसायन टाकू लागली आणि हे सर्व पाहून स्वयम आणखीच हसू लागला. स्वयमच अस हसन तिला अजिबात आवडल नाही आणि ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तिने तस पाहावं आणि स्वयम क्लिन बोल्ड. तिच्या बोलक्या डोळ्यांसमोर त्याच काहीच चालायचं नाही. तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहावं आणि तो मान खाली टाकून शांत बसावा अशी स्थिती. तो आपल्याला बघून अजूनही घाबरतो हे बघून तिला आणखीच हसू येऊ लागलं. प्रॅक्टिकल जरी रसायनशास्त्राच होत तरी त्यात क्लास मात्र वेगळाच सुरू होता.

गमती जमती मध्ये सर्वांचे प्रॅक्टिकल्स पूर्ण होत आले होते तरीही त्यांचं काम अजूनही पूर्ण झालं नव्हतं. काम लवकर पूर्ण झालं नसत तर मॅडम ओरडल्या असत्या म्हणून मस्ती बाजूला ठेवत त्याने पुढची प्रकिऱ्या हातात घेतली. एच २ एस म्हणजे सडक्या अंड्याचा वास . प्रॅक्टिकल जसे पूर्ण झाले तसे सडक्या अंड्याचा वास पूर्ण क्लासभर पसरू लागला. स्वराला या सर्वांची ऍलर्जी होती त्यामुळे लॅबमध्ये वास येऊ लागताच ती जोराने शिंकली आणि समोर असलेले नरसाळे खाली पडले. काचेच्या जोरदार आवाजाने सर्वच त्यांच्याकडे पाहू लागले होते. सर्व त्यांच्याकडेच बघत असल्याने स्वरा तर क्षणभर घाबरलीच होती. काच फुटण्याचा मोठ्याने आवाज येताच लॅब असिस्टंट धावतच त्यांच्याकडे आल्या. त्यांच्यासाठी शिस्त अगदी प्रिय असल्याने अशी तोडफोड त्यांना आवडत नसे आणि म्हणूनच त्या मोठ्याने ओरडत म्हणाल्या, " हु डीड धीस. टेल मी फास्ट अदरवाईज आय विल पनिश यु? "

मॅडमच्या आवाजाने स्वरा पुरती घाबरली होती. तिला हात वर करायची हिम्मत देखील झाली नाही. हे स्वयमच्या लक्षात आलं आणि त्यानेच हात वर केला. पूजा हे अगदी समोरून पाहत होती. स्वयंमने चूक स्वीकारल्यामुळे मॅडम शांत झाल्या.

मॅडम शांत झाल्यावर सर्व मूल बाहेर निघू लागले. स्वयम देखील बाहेर गेला होता पण स्वरा अजूनही तशीच उभी होती. पूजाने तिला मागून हात लावला आणि दोघेही आपल्या बॅग भरून क्लासकडे निघाल्या. पूजाने जे घडल ते सर्व अगदी आपल्या समोरच बघितलं होत म्हणून ती खेचत म्हणाली, " स्वरा स्वयम म्हणजे तोच बिचारा न ग ..जो तुझ्या मागे सतत यायचा? "

स्वरा आताही वेगळ्याच विचारात हरवली होती त्यामुळे तिने फक्त मान हलवली आणि पूजा आणखीच खेचत म्हणाली, " हाऊ क्युट ना ! मला वाटलं होतं की असच मागे लागला असेल पण तू तर नशीबवान आहेस. स्वतःची चूक नसतानाही त्याने फक्त तुझ्यासाठी मॅडमचा ओरडा खालला ..! मस्त आहे हा तुझा बिचारा ..!! मला तर वाटत तुझ्या प्रेमात पुरता बुडाला आहे तो. तेव्हाच तर मॅडमचा ओरडा स्वतःवर घेतला त्याने. हाउ लकी यु आर ! "

स्वराच्या कानावर तिचे शब्द पडले आणि स्वरा आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाली, " पूजा शांत बस जरा. मनाला येत ते बोलत असते. तुला माहीत आहे ना माझी चूक कुणी स्वीकारावी हे मला अजिबात आवडत नाही. कुणी सांगितल त्याला हा शहाणपणा करायला? मी ना जाम चिडले आहे त्याच्यावर. समजतो कोण तो स्वतःला? "

पूजाला कळून चुकलं की मॅडमचा मूड खराब झालाय म्हणूनच ती स्थिती आवरत म्हणाली, " कूल डिअर ! किती चिडाव एखाद्या माणसाने? कदाचित तू घाबरली होतीस ना म्हणून वागला असेल तो अस !! चल सोड मूड खराब नको करू आता. "

पूजा तिच्याशी बोलली तर होती पण स्वराच अजूनही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तिला राग आला म्हणजे आवरण कठीण असत हे तिने अगदी काहीच दिवसात जाणलं होत त्यामुळे पूजाने तिला पुढे काहीच म्हटले नव्हते.

दुपारचे प्रॅक्टिकल संपले आणि कॉलेजला सुट्टी झाली. स्वराचा राग आताही कमी झाला नव्हता. ती स्वयमला शोधत होती पण त्याचा कुठेही पत्ता दिसत नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून ती कॅन्टीनला गेली आणि तिथे तिला स्वयम दिसला. स्वयम आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असल्याने त्याला तिथून तस बोलावणं तिला योग्य वाटलं नाही आणि त्याने तिच्याकडे पाहण्याची वाट पाहू लागली. काही क्षणात त्याची नजर तिच्याकडे गेली आणि नजरेने इशारा करून तिने त्याला बोलवून घेतले. स्वराने बोलावलं म्हटल्यावर स्वयम देखील आनंदी झाला आणि शक्य तितक्या लवकर मित्रातून कल्टी मारत तो तिच्याकडे पोहोचला. ती त्याची वाट पाहतच गार्डनमध्ये उभी होती. तो तिथे पोहोचला आणि स्वरा रागातच म्हणाली, " स्वयम थोडी देर पहले जो तुमने मेरे लिये किया ना वो मुझे अच्छा नही लगा. मेरी गलती खुद पर लेकर आखीर साबीत क्या करना चाहते हो? अगली बार से ध्यान रखना. मैं इंडिपेंडेंट लडकी हु. मैं अपणे प्रॉब्लेम खुद छुडा सकती हु तो मुझे बिना पुछे कभी मेरे लिये कुछ नही करणा. "

स्वयम गुपचूप तिचं सर्व बोलणं ऐकत राहिला पण पलटून त्याने तिला उत्तर दिले नाही. पूजा थोड्या दुरूनच हे सर्व ऐकत होती. स्वयमला अस शांत बघून तिला वाईट वाटलं. तिला आता हे सर्व सहन झालं नाही आणि ती स्वराचा हात ओढतच हॉस्टेल कडे घेऊन गेली. स्वरा पूजावर ओरडत होती तर स्वयम आताही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. काही वेळात स्वरा - पूजा दोघीही आपल्या हॉस्टेलला पोहोचल्या.

स्वरा रागात असल्याने पूजा तिला त्याक्षणी काहीच बोलली नव्हती. हॉस्टेलला आल्यावर दोघींचही एकमेकांशी बोलणं झालं नव्हतं. रूम मध्ये आज भयानक शांतता जाणवत होती. दोघांनीही एकमेकांशी बोलण्याऐवजी अभ्यासाचे नोट्स काढण्यात लक्ष घातले. नोट्स काढून झाले आणि दोघीही सरळ जेवण करायला मेसमध्ये पोहोचल्या. दोघात रुसवा इतका होता की एकमेकांसमोर बसून असताना देखील कुणीच कुणाशी काही बोलत नव्हत्या. शेवटी जेवण झालं आणि स्वरा आपल्या रूममध्ये जाऊ लागली. पूजाही तिच्या मागेच होती. स्वरा आत जाणार त्यापूर्वीच पूजा तिला गॅलरीत घेऊन आली आणि तिच्यावर भडकत म्हणाली, " तू जे काही वागली आहेस ना ते पूर्णतः चुकीचं वागली आहेस . तुला वाटलं असेल तो आपल्या मागावर येतो तर तुझा फायदा उचलेल, चुकीचा अर्थ काढेल म्हणून अशी वागलीस ना? पण मला सांग एवढ्या दिवसात तो कधीतरी चुकीचं वागला का तुझ्याशी? कधी जवळ येण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? आणि स्वरा तू लॅबला खूप घाबरली होतीस म्हणून त्याने ते सर्व स्वतःवर घेतलं. मीही त्याच्या जागीच असते तर तेच केलं असत. तू त्याला धन्यवाद म्हणायची तर उलट शिव्या देऊन आलीस. अशी कशी यार तू? एक तर त्याने आधी मॅडमच्या शिव्या खाल्ल्या आणि आता तुझ्या. तरीही बिचारा शांत होता . एक शब्दही काढला नाही त्याने. बिचार्याला किती वाईट वाटलं असेल काय माहीत? तरीही तुला गिल्ट वाटत नाहीये. कसं ग तुझं दगडासारख मन? "

पूजा पटापट सर्व काही बोलून आपल्या रूमला निघून आली तर स्वरा देखील तिचं बोलणं ऐकल्यावर मान खाली टाकत रूमला पोहोचली. पूजा त्या रात्री तिच्याशी काहीच बोलली नव्हती आणि स्वराला पूजा मुळे कळून चुकलं की आपण त्याच्याशी चुकीचं वागलो. आज आपल्याच शब्दांमुळे त्याला झोप लागली नसेल असे अनेक विचार तिच्या डोक्यात येऊ लागले आणि तिला आणखीच वाईट वाटू लागल. आजची रात्र तिला झोप लागत नव्हती आणि तिला आतुरतेने वाट होती ती उद्याच्या दिवसाची.

दुसरा दिवस उजाळला. स्वयमशी बोलायच असल्याने स्वरा आपली तयारी लवकर लवकर आटोपून कॉलेजला पोहोचली. तिला कॉलेजला येण्याची इतकी घाई झाली होती की तिने पूजाची वाट देखील पाहिली नाही. तिच्या डोक्यात फक्त त्याला सॉरी म्हणायचं आहे इतकंच सुरू होत. ती कॉलेजला पोहोचलीच होती की समोर स्वयम तिची वाट पाहताना दिसला. त्याला बघून तिलाही थोडं बर वाटल. सर्वांसमोर बोलणं नको म्हणून दोघेही गार्डनला गेले. खर तर स्वराला त्याची आधी माफी मागायची होती पण ती काही बोलणार त्यापूर्वीच स्वयम म्हणाला, " सॉरी कल के लिये पर तुम्हे दुखाना मेरा मकसद नही था. कल तुमने मुझे बोलणे ही नही दिया. मै यह बताना चाहता था की मॅडम मेरी करिबी है. मै उनको बहोत नजदिक से पहचानता हु. उन्हे डिसीप्लिन मे रहणे वाले लोग ज्यादा पसंद आते है और अगर कल तुम उनकी नजर मे आ जाती तो शायद पुरा साल वो तुम्हे परेशान करती. मै था इसलीये ऊनहोने कुछ नही कहा. फिर भी तुम्हे बुरा लगा हो तो सॉरी. अगली बार से ऐसा कुछ ना हो इसका प्रयास करुंगा. सॉरी ! "

त्याच बोलणं संपल आणि तिला आपल्याच वागण्याच वाईट वाटू लागलं. तो तिथून जायला निघणार तेवढ्यात स्वरा त्याला म्हणाली, " सॉरी स्वयम मेरीही गलती थी. मै ही तुमहें समझ नही पायी. प्लिज खुद को ब्लेम मत करो. सॉरी वन्स अगेन..!! "

तो फक्त इट्स ओके म्हणून निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला फार वाईट वाटलं आहे हे जाणवत होतं आणि स्वरा त्यासाठी स्वतःला त्रास करून घेत होती. त्याच अस उदास होऊन जाण तिला त्रास देऊ लागल. ती त्याच्याबद्दल विचार करत होती आणि तिला समजलच नाही की समोर उंच भाग आहे. तिचा पाय फसला आणि पायाला मोच आली. तिला खूपच दुखत होत पण सावरायला कुणीच नव्हतं. कशीतरी एक एक पाऊल टाकत ती क्लासकडे जाऊ लागली. तिने काही पावले टाकलीच होती की समोरून पूजा येताना दिसली. स्वराला फार त्रास होत असल्याने तिने तिला बोलावून घेतले होतेे. स्वराला अडखळत चालताना पाहून पूजाही आपला रुसवा विसरत तिच्याकडे आली. पूजाने तिच्या पायाला हात लावताच ती जोर्याने किंचाळली आणि पूजा रागात म्हणाली, " तू ना वेंधळटच आहेस !! काय करत असतेस अस की स्वतःचच भान राहत नाही तुला? अशा तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतेस पण वागतेस अगदी लहान मुलाप्रमाणे. बघ तरी किती पाय सुजला आहे चल हॉस्पिटलमध्ये जाऊ. "

हॉस्पिटलच नाव ऐकताच ती मोठ्याने ओरडत म्हणाली, " ए नाही हा. होईल पाय ठीक आणि नाही झाला तर सायंकाळी जाऊ. आता मला क्लासला घेऊन चल. "

स्वरासमोर पूजाच काहीच चाललं नाही आणि ती तिला क्लासमध्ये घेऊन गेली. आज स्वरा क्लासमध्ये बसून तर होती पण तिला इतका त्रास होत होता की तीच क्लासमध्ये लक्षच लागत नव्हत. कितीतरी वेळ पायाला हात लावून ती दुखणं पचवत होती पण तीच मन काही स्वस्थ बसल नव्हतं. कसेबसे तिने तीन लेक्चर पूर्ण केले आणि आता तिला ती क्लासच्या बाहेर पडली.

आता शेवटचा क्लास म्हणजे भौतिकशास्त्राचे प्रॅक्टिकल. पूजाने पुन्हा एकदा तिला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी विचारल पण स्वराच्या हट्टासमोर तीच काहीच चाललं नाही आणि अडखळत अडखळतच ती लॅब मध्ये पोहोचली. आज तिच्यासोबत स्वयम तर होताच पण आणखी तीन लोकांचा ग्रुप देखील होता. स्वराने आपली सीट पकडली आणि अगदी तशीच बसून राहिली. सर्व प्रॅक्टिकल करण्यात मग्न होते तर त्याच वेळी स्वराला फार वेदना होत होत्या. स्वयमच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती पण कालच्या बोलण्याने तो तिला काहीच म्हणू शकला नाही. तिला अस बघताना त्याला फारच वाईट वाटत होतं पण सर्वांसमोर तिच्याशी काही बोलणं देखील स्वयमला शक्य होणार नव्हतं. त्यामुळे स्वयम वाट पाहत होता तो प्रॅक्टिकल संपण्याची. एखादी तासात प्रॅक्टिकल संपल आणि स्वयम धावतच बाहेर पडला. स्वराचे ग्रुप पार्टनर देखील रूमच्या बाहेर पडले होते तर स्वरा फक्त एकटीच रूम मध्ये आपल्या पायाला पाहत बसली होती. पूजा आपलं प्रॅक्टिकल वर्क पूर्ण करत तिच्याजवळ पोहोचली. पूजाच्या हातात स्प्रे होता. स्वराच्या पायाच हाड सुजल्याने ती तो स्प्रे सोबत घेऊन आली होती. तिच्या हातात स्प्रे पाहताच ती म्हणाली, " कुठून आणला आहे ग? तुझ्याकडून कुठून आला हा स्प्रे? "

पूजा हसतच म्हणाली, " तू आम खा ना मेरी जान. गुठलीया क्यू गिन रही है? "

पूजाच्या बोलण्यावर ती किंचित हसली आणि पुढच्याच क्षणी तिने पायावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यावरही सुमारे पाच मिनिटे त्या तिथेच बसून होत्या. स्प्रे मारल्याने तिला होणाऱ्या वेदना कुठंतरु दूर पडून गेल्या होत्या आणि त्या दोघी बाहेर निघाल्या. आता स्वराही निवांत पाय टाकू शकत होती. तिला होणारा त्रास कुठेतरी दूर पळाला होता आणि त्याजागी चेहऱ्यावर हसू आलं. तेच हसू चेहऱ्यावर पसरवत ती म्हणाली, "आता तरी सांग स्प्रे कुठून आला? "

आणि पूजा तिची खेचत म्हणाली, "तेरे दिवाने ने दिया है मेरी जान !!..आणि देताना म्हणाला कसा की तिला नको सांगू की मी दिला आहे ते, नाही तर तलवार घेऊन मागे धावेल माझ्या. "

पूजाच्या अशा बोलण्यावर दोघीही मनमोकळं हसू लागल्या होत्या आणि पूजा पुन्हा म्हणाली, " बिचारा !! मॅडमचे आणखी किती नखरे सहन करावे लागतील काय माहिती? मॅडम तर त्याला भाव सुद्धा देत नाहीत. कस होईल काय माहीत त्याच? "

स्वरा आज खूपच खुश होती आणि त्याच आनंदांत म्हणाली, " वेडी आहेस तू ! तुझ्या तोंडात येईल ते बोलतेस. "

तिचा मूड आज चांगला वाटत होता म्हणून संधी शोधत पूजा म्हणाली, " मी वेडी आणि तू कोण? शिवाय आपल्या मराठीत एक म्हण आहे. पोरगी हसली म्हणजे फसली. " तीच बोलणं ऐकून आज स्वरा क्षणभर हसली आणि तिच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, " काहीही हा !! "

स्वयमच नाव घेऊनही आज तिला राग आला नव्हता . नाही तर मुलाचं नाव घेताच रागावणारी ती इतकी मनसोक्त हस्ते आहे यावर पूजालाच विश्वास बसत नव्हता आणि पूजाला स्वराच्या काहीही ह्या शब्दाचा खरा अर्थ सापडला. तीच ते मनमोकळ हसनच तिला खूप काही सांगून जात होतं आणि त्याच वेळी पूजाच लक्ष गेलं ते बाजूच्या बिल्डिंगकडे. तिथे स्वयम लपून सर्व काही पाहत होता आणि हे सर्व बघून पूजाच्याही चेहऱ्यावर नकळत हसू आलं. दोघांच्याची चेहऱ्याकडे बघताच तिच्या मनात एकच वाक्य दरवळू लागल " आग तो दोनो तरफ सेही लगी है ..बस देखणा है पहले कबूल कोण करता है. "

स्वराला तिचा आवाज आला होता पण तिला त्याचा अर्थ नक्कीच कळाला नव्हता. ती बोलत राहिली आणि स्वरा कुठेतरी हरवत गेली.

क्रमशः...