Bhagy Dile tu Mala - 1 in Marathi Moral Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १

मेरे अलावा कोई नही
मुझें जाणणे के लिये
इसलीये बैठ जाती हु अकेले कही
खुद को जाणणे के लिये

दिल्ली दिलंवालो की दिल्ली. कधी कधी ही फ्रेज ऐकली की काहीतरी कमी असल्यासारख वाटत. जरी दिल्लीमध्ये दिलदार लोक लाखोच्या संख्येने राहत असले तरीही हे तेच शहर आहे ज्याने ऐतिहासिक काळापासून फक्त आणि फक्त विनाश बघितला आहे. क्षणात राजगाद्या नाहीशा होताना तर कधी बसताना बघितल्या आहेत . एकेकाळी देशावर वर्चस्व असलेल्या राज्याना देशातून हाकलून लावताना पाहिले आहे. काळ बदलला पण दिल्ली शहराच स्वरूप काही बदलताना दिसत नाही. देशाची राजधानी असल्याने हे शहर कायम चर्चेत असतच पण इतर गोष्टी ह्यांना खास बनवितात. मग आप सरकारचे केंद्र सरकारसोबत असलेले भांडण असो की जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधताना त्यांनी महिनो न महिने दिलेला धरणा असो की संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी निर्भया. ह्या सर्व घटना बघितल्या तर खरच दिल्ली दिलवालो की आहे का असा प्रश्न पडतो. कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने हे शहर चर्चेत असतच. त्यात आणखी भर घातली तिच्या कहाणीने. कोण ती?

स्वरा आजही सवयीप्रमाणे अगदी पहाटे पहाटे उठली होती. घरचे अजूनही शांत झोपले होते. सवयीप्रमाणे रोज बाहेर फिरायला जाण तिला नेहमीच आवडत असे. हीच वेळ होती जी ती स्वतासाठी काढत असे. ते क्षण फक्त तिचे होते. घरच्या, मनाच्या कटकटीपेक्षा दूर शांत ती काही क्षण मनमुराद जगत होती. त्यामुळे आजसुद्धा ती बाहेर जाऊ लागली. तस तिला एकट बाहेर निघायला आवडत नसे पण आज कुणीच सोबत नसल्याने ती एकटीच बाहेर निघाली होती. दिल्ली म्हणजे सर्वात प्रदूषित शहर म्हणून सकाळी सकाळी बाहेर निघणाऱ्यांची गर्दी काही कमी होत नाही.अगदी मैदाने तुडुंब लोकांनी भरलेली असतात. तीही रोज सकाळी सकाळी बाहेर निघायची आणि एकदा मन शांत झाल की मग घरातलं सर्व काही आवरायची. आजही ती बाहेर निघाली. नेहमीप्रमाणे कानात एअरफोन टाकत तिने प्रवास सुरु केला. तिने कानात एअरफोन टाकले आणि ती त्या शब्दात हरवली.

" गुड मॉर्निंग .. शब्बा खैर ... जय श्रीराम ... ये है ऑल इंडिया रेडिओ का दिल्ली स्टेशन. मै हु आपका अपणा दोस्त आर. जे. रिहान. आज मौसम का अपणा अलग एक मिजाज है. सुहानी सी हवा दिलं को थंडक दे रही है तो सूरज की किरणे आपके चेहरे को नयी ऊर्जा प्रदान कर रही है और इसी खिलखीलाहट के साथ हम लेकर आये है आपके पास प्यार भरे गीतो का नजराना. आज सुबहँ सुबहँ हमारे दोस्त विराटकी फर्माहिश आयी है. उनकी बिवी जया उनसे नाराज है और ये पेशकश खास उनके लिये. अगर आप को भी किसींसे मोहब्बत है, किसीं के लिये दिलं धडकता है तो ये गीत सिर्ग आपके लिये है. तो पेश है आपके लिये ये खूबसुरत सा गीत जो आपका दिन बना देगा. "

कच्ची डोरियों , डोरियों , डोरियों से
मैनु तू बांध ले
पक्की यारीयों , यारीयों , यारीयों में
होंदे ना फासले
ये नाराज़गी कागज़ी सारी तेरी
मेरे सोह्णेया सुन ले मेरी
दिल दियां गल्लां हाय
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के
दिल दियां गल्लां हाय
करांगे रोज़ रोज़ बह के
सच्चियाँ मोहब्बतां निभा के
सताये मैनु क्यो
दिखाए मैनु क्यों
ऐवें झूठी मुट्ठी रूस के रूसाके
दिल दियां गल्लां हाय
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के

तेनु लाखां तों छुपा के रखां
अक्खां ते सजा के
तू ऐ मेरी वफ़ा
रख अपना बना के
मैं तेरे लइयां तेरे लइयां यारा
ना पाविं कदे दूरिया
तेनु लाखां तों छुपा के रखां
अक्खां ते सजा के तू
ऐ मेरी वफ़ा
रख अपना बना के
मैं तेरे लइयां तेरे लइयां यारा
ना पाविं कदे दूरियां
मैं जीना हाँ तेरा मैं जीना हाँ तेरा
तू जीना है मेरा
दस् लेना की नखरा दिखा के
दिल दियां गल्लां
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के
दिल दियां गल्लां

रातां कालियाँ कालियाँ कालियाँ ने
मेरे दिल सांवले
मेरे हानियां हानियां हानियां जे
लग्गे तू ना गले
मेरा आसमा मौसमां दी ना सुने
कोई ख़्वाब ना पूरा बुने
दिल दियां गल्लां
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के
पता है मैनु क्यों
छुपा के देखे तू
मेरे नाम से नाम मिला के
दिल दियां गल्लां
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के
दिल दियां गल्लां

ती गाणं ऐकत आपल्याच धुंदीत चालत होती. आतीफच गाणं ऐकलं की ती वेगळ्याच जगात फिरायची. गाणं संपलं तसच तिचं समोर लक्ष जाऊ लागलं. तिच्या लक्षात आलं की सर्व लोक आपल्याकडेच पाहत आहेत. तस लोक तिला रोजच पहायचे पण आज त्या पाहण्यात काहीतरी विशेष होत. आधी लोक तिला पहायचे तेव्हा भाव तिरस्काराचे असायचे पण आज सर्वच तिला आश्चर्याने पाहत होते त्यामुळे तिचा अधिकच गोंधळ उडाला होता. ती नामवंत सोसायटी मध्ये राहत असल्याने बाजूलाच सर्वाना खेळायला एक छोटंसं गार्डन होत. त्यात लहानापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वच सकाळी सकाळी दिसायचे. तिला सर्वच न्याहाळत असताना ती सर्वाना इग्नोर करून समोर समोर जाऊ लागली. आज त्यांच्या बघण्यात काही खास असलं तरीही स्वराला ह्या सर्वांची सवय झाली होती.

ती पावले टाकत टाकत बाहेरची हिरवळ बघत चालू लागली. अगदीच समोर छोटे-छोटे मूल फुटबॉल खेळत होते. कुणीतरी बॉलला किक मारली आणि बॉल गोलच्या पलीकडे येऊन स्वराच्या पायाजवळ थांबला. स्वरा त्या बॉलच्या अगदी जवळ होती आणि तो छोटू बॉल घ्यायला तिच्याजवळ पोहोचला. स्वरा त्या बॉलच्या खूप जवळ होती तरीही तिने बॉल फेकला नाही उलट कधी त्या बॉलकडे तर कधी डोळे वर करून त्याच्याकडे बघू लागली. तिने वर पाहिले आणि तो तिला पाहण्यात असा गुंग झाला की तो नेमकं बॉल घ्यायचंच विसरला. काय होत तिच्यात अस की आज सर्वच तिच्याकडे पाहत होते? स्वरा कितीतरी वेळ बॉलकडे पाहतच होती की तो छोटू म्हणाला, " दीदी आप क्या देख रहे हो? बॉल पास करो ना प्लिज . हमे देर हो रही है!" तो इतका गोड बोलला होता की त्याचा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर क्षणिक हसू आलं. तिने बॉल हातात देण्याऐवजी बॉलला जोराने किक मारली आणि बॉल कुठेतरी दूर पळाला. त्या छोटूने धावता - धावता तिच्याकडे एकदा पाहिले. पुन्हा एकदा तो तिला बघून हसला आणि समोर सुसाट धावत पळाला. आज पहिल्यांदा अस झालं होतं की कुणीतरी समोरून तिच्याशी बोललं होत म्हणून ती शॉक होऊन सर्व बघत होती. तो छोटू समोर गेला आणि त्याच्याकडे एक नजर टाकत स्वरा सुद्धा समोर चालू लागली.

समोर चालताना लोक बदलत होते पण स्थिती मात्र तशीच होती. लोकांच्या नजरानी काही तिचा पिच्छा सोडला नाही. शेवटी कंटाळून ती एका बेंचवर बसली. हा तोच बेंच ज्यावर ती रोज बसत असे. बाजूलाच एक छोटीशी मुलगी आपल्या आईसोबत मस्ती करत होती. तशी ती रोजच यायची आणि स्वराला पाहताच ती ताई आपल्या मुलीला घेऊन पटकन पळून जायची पण आज काय झालं माहिती नाही ती ताई सुद्धा तिथेच बसून राहिली. स्वरा बाजूला बसताच त्या छोट्या मुलीने स्वराला स्पर्श करायला सुरुवात केली. तिचा स्पर्श इतका सुखद होता की स्वराच मन आपोआप खुलून निघालं होत. त्या छोट्या मुलीला बघून तिला काहीतरी आठवलं कारण असाच एक क्षण तिच्यासोबत भूतकाळात घडला होता. त्या क्षणाची आठवण झाली आणि ती स्वतःला हसण्यापासून थांबवू शकली नाही. ती छोटी स्वराला हात लावत होती आणि त्या ताई म्हणाल्या, " परी आंटी को हाय बोलो .."

आईच ऐकून त्या छोट्या परीने तिला हात दाखविला. स्वराला तीच गोड हसू बघून इतका आनंद झाला होता की तिने अलगद तिच्या हाताना किस्सी केल. काही क्षण ती त्यांच्यासोबत असच खेळत होती आणि ती छोटी परी शेवटी बाय बोलून निघून गेल. ती दिसेनाशी होईपर्यंत स्वरा त्या मुलीकडे बघत होती. ती गेली आणि आता तिची पहिल्यांदा नजर समोर गेली. समोर वयोवृद्ध लोकांनी लाफिंग क्लब सुरू केला होता. ते हसत दिसले की स्वरा सतत त्यांच्याकडे पाहत असायची. अस दिलखुलासपणे ती कधी हसली होती हे तिलाच माहिती नव्हत. आपण का अस करू शकत नाही असा प्रश्न तिला कायम पडायचा त्यामुळेच तीच लक्ष त्यांच्यावरून हटत नव्हतं. तिला कधीतरी अस हसावस वाटत होतं पण गेले कित्येक दिवस तिची ही इच्छा अशीच इच्छा बनून राहिली होती पण आज मात्र सर्व उलट झालं. समोरचे सर्व आपलं हसन थांबवून तिच्याकडे पाहू लागले. तिला सर्व अस का बघत आहेत म्हणून स्वरा तिथूनही पळवाट काढणार तेवढ्यात एक आजोबा तिच्याजवळ जात म्हणाले, " बेटा आज आप हमे जॉईन करोगे?"

स्वराचा होकार येण्यापूर्वीच त्यांनी तिच्यासमोर हात केला आणि ती नकार देऊ शकली नाही. तिने त्यांच्या हातात आपला हात दिला आणि तीही त्यांच्यासोबत जाऊ लागली. ती जॉइन झाल्यावर सर्व दिलखुलासपणे हसू लागले. त्यांना बघूनच तिनेही हसायला सुरुवात केली. सुरुवात तिने हळूहळू केली होती पण आता खूप मोठ्याने हसू लागली. बऱ्याच दिवसाने ती इतक दिलखुलास हसत होती म्हणून की काय अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. हसता हसता रडन हे काय तिलाही कळत नव्हतं तरीही तिने हसन थांबविले नव्हतं. कदाचित ते मनातलं सर्व हसू तिला आज बाहेर काढायचं होत म्हणून सुमारे 10 मिनिटे ती वेड्यासारखं हसत होती. खूप दिवसांनी ती अस मनमोकळं जगली होती आणि ते अस जगणं तिला फारच आवडल होत. सर्व आजोबा तिला अस बघून खूप खुश होते.

काही क्षण गेले. सूर्य डोक्यावर येऊ लागला होता. स्वरा धावतच बेंचकडे आली. समोरच्या क्षणी तिने मोबाइल मध्ये लक्ष दिलं. तिच्या लक्षात आलं की आपण घरी जायला फार उशीर केला आहे आणि ती सर्वाना धन्यवाद मानून लगेच घराकडे निघाली. अगदी धावत धावतच ती फ्लॅटमध्ये पोहोचली. आत पोहोचताच फक्त आई उठल्या असल्याचं तिच्या लक्षात आलं. आईकडे तिरकस नजरेने कटाक्ष टाकत ती बेडरूममध्ये पोहोचली. घरातलं कुठलंही काम करायचं असेल तर आधी अंघोळ करायचा नियम असल्याने ती कपडे घेऊन बाथरूमकडे जाऊ लागली. जाताना मधातच तिने आईकडे एक नजर टाकली आणि आईच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू लागली. तिने नजर टाकावी आणि त्यांनीही तिच्यावर नजर टाकली. दोघांचीही नजरा - नजर व्हावी आणि स्वरा घाबरतच बाथरूममध्ये पोहोचली.

आज सर्व तिच्याशी अस का वागत आहे हे तिच्या लक्षात येत नव्हतं. ती उत्तर तर शोधत होती पण तिला ते काही मिळत नव्हत. शेवटी तिने हे सर्व विचार डोक्यातून काढून अंघोळीवर फोकस करायचं ठरवलं. तिने ठरवलं तर होत पण अंघोळ करतानाही आज सर्वांचे प्रश्नमय चेहरे तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते आणि ती विचारात पडली. तीच डोकं विचार करून करून हैराण झाल होत. तीच कशातच लक्ष लागत नव्हत एवढंच काय बादली पाण्याने भरून वाहत आहे ह्याच सुद्धा तिला भान राहल नाही. बादलीतल पाणी जेव्हा तिच्या पायांना स्पर्श करून जाऊ लागलं तेव्हा ती भानावर आली. त्यामुळे पाणी बंद करत तिने क्षणांसाठी आपले विचार बाजूला फेकले आणि पुन्हा एकदा आपलं सर्व लक्ष तिने अंघोळीत घातले.

साधारणतः १५ मिनिटांनी ती बाहेर आली. बाथरूममधून बाहेर येताच टॉवेलने केस पुसत ती बेडरूममध्ये पोहोचली. तिच्या डोक्यात अजूनही त्या सर्वांच्या भेदक नजरा तशाच होत्या. त्या नजरांच उत्तर ती शोधतच होती की केस पुसता-पुसता तीच लक्ष कोपऱ्यात असलेल्या आरशाकडे गेलं आणि ती क्षणात ड्रेसिंग टेबलसमोर बसली. व्यक्ती एका दिवसात कमीत कमी दोन - तीन वेळा तरी आपला चेहरा पाहतात पण स्वराने कितीतरी दिवस आपला चेहराच पाहिला नव्हता. याच तिलाही आश्चर्य वाटत होतं आणि हसू पण येत होतं. अगदी पहिल्यांदा हे सर्व ऐकणारा तिला वेडच म्हणेल पण ती वेडी नव्हती उलट तिला स्वतःला आरशात पहायची कधी गरजच पडली नाही. एकूणच विचित्र वाटत आहे ना? हा पण हे सत्य आहे.

आज ती स्वतःला खूप दिवसाने आरशात बघू लागली. तिच्या त्या सिल्की केसांनी तिचा चेहरा झाकला होता. त्यामुळे सर्वात आधी चेहऱ्यावरचे केस ती हळुहळु बाजूला करू लागली. हळूहळू करत तिने आपले संपूर्ण केस बाजूला केले आणि केसात लपून असलेला चेहरा अचानक समोर आला. आज कितीतरी दिवसांनी तिने आपला चेहरा बघितला होता. त्यामुळे आपल्या त्या सुंदर चेहऱ्याला ती हात लावून त्याची कोमलता अनुभवू लागली. कितीतरी वेळ ती चेहऱ्याला तशीच हात लावून होती. शरीराची हालचाल देखील होत नव्हती. काहीच क्षणात तीने चेहऱ्यावरचा हात काढून समोर आरशावर ठेवला. चेहऱ्यावरची कोमलता जशी तिने अनुभवली होती अगदी तसाच ती आपला हात आरशावर फेरु लागली. आपला चेहरा अगदीच आरशाला चिपकवत ती आरशात काहीतरी पाहू लागली. तिचे घारदार डोळे काहीतरी बोलत होते. त्या डोळ्यात समाजाप्रती, स्वताप्रति घृणा होती. तिचे ते डोळेच होते ज्यांनी समाजाच खर रूप पाहिलं होतं. समाजाच रूप पाहिल्यावर तिने कधीच आपला चेहरा पुन्हा आरशात पाहिला नाही. तिच्या डोळ्यात ज्वाला होत्या ज्या तिला प्रत्येक क्षणी तिच्या भूतकाळाची आठवण करून देत होत्या. असा भूतकाळ ज्याने तिला एक रात्र सुद्धा सुखाची झोप दिली नव्हती. त्या भूतकाळाने तिला जगापासून अस तोडल की ती त्यानंतर समाजाचा भागच होऊ शकली नाही. तिच्या डोळ्यातील ज्वाला तिला आज प्रश्न विचारत होत्या का अस घडलं? ह्यात तुझी काय चूक होती? ती उत्तर शोधता - शोधता एका भूतकाळात पोहोचली.

कोण ती? तिचं नाव स्वरा मोहिते. नावात जसे स्वर अगदी तशीच बोलायला गोड. आडनावाप्रमाणे सर्वाना आपल्या स्वभावाने, आपल्या सुंदरतेने मोहित करणारी पण तिच्या आयुष्यात एक पहाट अशी निघाली की तिच्या नावातला गोडपणा हिरावून घेतल्या गेला. तिची इतरांना मोहित करण्याची शक्ती कुठेतरी गायब झाली. एक वेळ अशी आली की तिला लोकांनी बघणे सुद्धा पसंद केले नाही. काय घडलं होत अस तिच्या आयुष्यात? कितीतरी प्रश्न निर्माण होतात ना विचारही करायला लावत असतील. त्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे तिचा भूतकाळ. तिचा हा भूतकाळ म्हणजेच तिच्या भाग्याची कहाणी. भूतकाळ प्रत्येकाचाच असतो पण तिचा काहीतरी वेगळाच आहे. कदाचित कुणाचाही नसेल इतका त्रासदायी. तिचा भूतकाळ समजून घ्यायला लागेल संवेदनशील मन..

क्रमशा ....

( मी खात्रीने सांगू शकतो की ह्या कथेचा विषय तुम्ही फार तर वाचला नसेल पण ही कथा क्रेज म्हणून वाचणार असाल तर नका वाचू कारण ही कथा तुम्हाला समजण्या पलीकडे आहे. जर तुमच्याकडे संवेदनशील मन असेल तर नक्की वाचा. मग वाटेल ही कथा फक्त तुमच्यासाठी बनली आहे. कथा वाचताना डोळे पाणावले जाणार नाही अस होऊ शकत नाही. विचार करा कोणत्या विषयावर कथा असेल आणि तो प्रवास कसा असेल? ह्या कथेचे सुरुवातीचे काही भाग जरा मी शॉर्ट केलेत जेणेकरून मला मेन विषयावर लिहायला मिळेल त्यामुळे फक्त दहा भाग निवांत वाचा त्यानंतर खरा विषय तुम्हाला सापडेल आणि खऱ्या अर्थाने तिथून कथेला सुरुवात होईल.)