श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींनी सांगितल्यावर त्राटीकेचा वध केला आणि अखेर यज्ञ संपन्न झाला.
यज्ञ संपन्न झाल्यावर श्रीराम व लक्ष्मण यांनी ऋषी विश्वामित्र यांना स्वगृही परतण्याची आज्ञा मागितली पण विश्वामित्र ह्यांनी त्यांना त्यांच्या समवेत मिथिला नगरीत चलण्यास आग्रह केला.
"हे श्रीरामा आम्हास राजा जनक यांचं त्यांच्या राज दरबारात होणाऱ्या यज्ञासाठी आमंत्रण आहे. मिथिला नगरी तर सुंदर आहेच पण त्याही पेक्षा तिथला जनक राजा खूप चांगला आहे. तेथील यज्ञ मंडपी राजा जनकाने सुनाभ नामक धनुष्य ठेवलेला आहे. जो धनुष्य साक्षात शंकरांनी जनकाला दिला. त्याच धनुष्यानी महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता.
त्या धनुष्याची जनक राजा रोज पूजा करतो. धनुष्य एवढा जड आहे की ठीक ठिकाणचे देशोदेशोचे अनेक पराक्रमी राजे आले, देव, दैत्य, यक्ष,किन्नर सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांना तो धनुष्य उचलणं तर दूर पण हलवणे सुद्धा शक्य झाले नाही.
सगळ्यांना आता वाटू लागले आहे की त्या धनुष्याला उचलून त्याला प्रत्यंचा लावणारा अजून निर्माण झालाच नाही या पृथ्वीवर.
मला वाटते की तुम्ही दोघे अत्यंत वीर धनुर्धर आहात त्यामुळे एकदा त्या धनुष्याला तुम्ही बघावे असे मला मनोमन वाटते.
बघा श्रीरामा! लक्ष्मणच्या डोळ्यात ते धनुष्य बघण्याची उत्सुकता दिसते आहे.
आम्ही सगळे मुनीजन चाललो आहोत. तुम्ही पण आमच्यासोबत चललात तर ते आम्ही आमचे भाग्य समजू."
श्रीरामांना ऋषींची आज्ञा मोडवत नाही त्यामुळे ते त्यांच्या सोबत मिथिलेला जायला निघतात.
(रामायणात पुढे काय होईल बघू पुढच्या भागात. जय श्रीराम🙏)
*******************
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षी तो जनक नराधिप
नराधिपे त्या नगरीमाजी यज्ञ नवा मांडिला
यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक
ज्यास पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवे त्याच धनूनें त्रिपुरासुर मारिला
शिवधनुते त्या सदनी ठेवुन
जनक तयाचें करितो पूजन
पूजनीय त्या विशाल धनुला जगात नाही तुला
देशदेशिचे नृपती येउन
स्तिमित जाहले धनुष्य पाहुन
पाहताच ते उचलायाचा मोह तया जाहला
देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलु न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वाकला
कोण वाकवुन त्याला ओढिल?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल?
सोडिल त्यातुन बाण असा तर कोणी ना जन्मला
उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
बघा राघवा, सौमित्री तर औत्सुक्ये दाटला
उत्साहाने निघती मुनिजन
चला संगती दोघे आपण
आपण होता सहप्रवासी भाग्यतरू ये फला
★★★★★★★★★★★★★★★★★★★★