भाग – ९
तितक्यात पोलीस स्टेशन मध्ये एक वकील दाखल होतो. तो तेथे येऊन स्वतःचे नाव स्वामी म्हणून सांगतो. तो सावंत साहेबांशी बोलतो आणि म्हणतो, “ माझे नाव स्वामी आहे आणि मी मिस्टर निलेश यांचा वकील आहे. मी मिस्टर निलेश यांचा जामीनचे कागदपत्र सोबत आणले आहे. तर तुम्ही ते बघून घ्या आणि मिस्टर निलेशची लवकरात लवकर कोठडीतून सुटका करा.” सावंत साहेबांनी सगळे कागदपत्र बघितले आणि शिपायाला सांगितले सोडा मिस्टर निलेशला. कोठडीतून सुटका झाल्यानंतर निलेश वकिलांसोबत लगबगीने बाहेर निघून गेला. सावलीला मात्र आता आणखी राग आला होता. तर ती सावंत साहेबांना म्हणाली, “ साहेब हे काय आहे तुम्ही त्याला का बर सोडून दिल त्याला आता पुन्हा अटक नाही करू शकत का.” तेव्हा सावंत साहेब शांतपणे उत्तरले, “ सावली न्यायाचे दरवाजे आपल्यासाठी बंद नाही झाले आहेत. आपण न्यायालयात त्याचा विरुद्ध प्रकरण दाखल करू आणि न्यायालयात त्याला कठोर अशी शिक्षा देऊ .” मग त्यांनी सगळे कागदपत्र तयार केले आणि निलेश विरुद्ध सदर न्यायालयात प्रकरण दाखल केले.
तिकडे निलेशने सुद्धा आपल्या बचाव करण्यासाठी सावली विरुद्ध वेगळे प्रकरण दाखल केले. त्याने त्याचा बापाचा पैशांचा जोरावर न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी सावलीवर अनैतिक आचरणाचे आरोप केले. तीचावर वेश्यावृत्तीचा आरोप लावून तिला मानसिक त्रास दिला. हे सगळ प्रमाणित करण्यासाठी त्याने अमाप असा पैसा खर्च केला आणि सावलीलाच गुन्हेगार ठरवून कोठडीत पाठवले होते. संपूर्ण न्यायालयात आणि तिचा राहणाऱ्या परिसरात सावली आणि तिचा परिवाराचा बद्दल वेश्यावृत्ती करण्याचा आरोप सिद्ध करून संपूर्ण ओळखीचा लोकांत सावलीची बदनामी केली होती. त्यामुळे सावली आता आणखीनच मानसिक आजाराने ग्रसित झाली होती. तिची प्रकृती फारच वाईट होऊन गेली म्हणून न्यायालयाने तिला इस्पितळात दाखल करण्यास सांगितले. मग पुन्हा सावलीवर मानसिक उपचार सुरु झाले. त्यादरम्यान एके दिवशी सावलीचा फोनवर निलेशचा फोन आला. सावलीने तो उचलला तोच समोरून निलेश बोलला,” काय म्हणते मिस्स सावली, कशी आहेस. त्रास भोगून तुझ मन भरलंय कि आणखी त्रास सोसायची इच्छा आहे. तुला समजावलं होत मी परंतु,” तो बोलत असतांना सावली मध्येच बोलली, “ मला तुझ्याशी परस्पर भेटून बोलायचे आहे.” तेव्हा निलेश म्हणाला, “ काय तुला खरच माझ्याशी बोलायचे आहे कि माझी माफी मागायची आहे.” तेव्हा सावली बोलली, “ तुला काय समजायचे आहे ते तू समज परंतु मला तुझ्याशी एकट्यात भेटायचे आहे. विशेष म्हणजे तेथे तू सुद्धा एकटा असणार आणि मी सुद्धा एकटी येणार. ”
तेव्हा निलेश मस्खरी करतांना म्हणाला, “ काय मला मारणार आहेस काय,” मग तो स्वतःच पुन्हा बोलला, “ ठीक आहे ये तुला भेटायचे आहे तर परंतु यात माझी एक अट आहे. मी तुला ज्या ठिकाणावर बोलवीन त्या ठिकाणी तुला यावे लागेल आणि कसलीही चालाकी चालणार नाही अन्यथा.” मग सावली उत्तरली, “ मला मंजूर आहे तू मला पत्ता संग मी येते.” मग निलेशने म्हटले, “ मी तुला पत्ता मेसेज करतो, परंतु पुन्हा शेवटचे सांगतो, कसलीही हुशारी करायची नाही.” तेव्हा सावली म्हणते, “ अरे तू स्वतःला मर्द म्हणून संभोदतो तर एका मुलीशी एवढा घाबरतो काय. तुझी मर्दानगी काय फक्त स्त्रिया आणि मुलींसमोरच दिसते काय?” तेव्हा निलेश चीढून बोलला, “ ठीक आहे ये तू करून करून काय करून घेशील माझ वाकड सध्या तर अर्ध मरणापर्यंत पोहोचवलं आहे मी तुला संपूर्ण मरण येथे आल्यावर देऊन देईल.” असे म्हणून त्याने फोन ठेवला आणि सावलीचा फोनवर त्याचा मेसेज आला. सावलीने तो पत्ता एका कागदावर लिहून घेतला आणि तो मेसेज फोनमधून डिलीट करून टाकला. आता सावलीला इस्पितळातून कसे तरी करून बाहेर पडायचे होते म्हणून तिने तिची चतुर बुद्धी वापरली आणि सगळ्यांचा नजरेतून लपून ती बाहेर पडली. काही वेळाने ती सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. तेथे निलेश आधीच येऊन पोहोचला होता. शिवाय सावली एकटीच येते कि पोलिसांना बरोबर घेऊन येते ते बघण्यासाठी तो तेथे लपून बसला होता.
सावली तेथे पोहोचली तर तेथे तिला कुणीच म्हणजे निलेश दिसला नाही. तिला वाटले कि ती त्याचा आधीच आलेली आहे. तर तिने विचार केला कि निलेशची वाट बघावी तो येईल इतक्यातच. सावलीला एकटी बघून तो बाहेर निघाला आणि म्हणाला, “ वेलकम मिस्स सावली, फारच प्रामाणिक आहेस तू तर. जो शब्द दिला त्याच प्रमाणे बिलकुल एकटीच आलेली आहेस. तुला कसलीही भीती नाही वाटली काय येथे येतांना. मी तिकडे एकटी चालली आहे आणि तिकडे माझे काही बरे वाईट होऊ शकते वगैरे वगैरे.” तेव्हा सावली म्हणाली, “ दृष्टपणा, दगा, फसवेगिरी माझ्या रक्तात नाही आहे. मी आजवर सगळ्यांशी प्रामाणिक आणि इमानदारीने वागले आणि पुढेही वागणार आहे. तर माझ्या बद्दल तू काही काळजी करू नकोस त्यासाठी माझा परिवार आणि मी स्वतः त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. तू फक्त तुझा विचार कर तू फक्त आणि फक्त पैशांचा जोरावर उडी मारू शकतो त्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीस.”
शेष पुढील भागात.............