Indraza - 24 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 24

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 24

भाग - २४
.
.
.
.
.
कदम - साहेब तुमचा फोन सारखा वाजतोय? घरून कॉल यायलेत..




इंद्रजीत - हो का.. अअअ ठीके कदम तुम्ही जा गाडी काढा.... मी आलोच..




कदम - चालतंय सर.या निवांत...




इंद्रजीत - बोल माई...... 📲




ममता - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा....कसा आहेस...... 📲





इंद्रजीत - मस्त माई तू...आणि बाकीचे........ 📲




राजाराम - मला द्या....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इंद्र..... 📲




अभिजित - हॅप्पी बर्थडे भाऊ.... 📲
(एकमेकांच्या हातून फोन खेचून..)



ओवी - हॅप्पी हॅप्पी बडे मामू.... ❤️📲




तारा - हॅप्पी बर्थडे डार्लिंग मिस यु..... 📲




अनुसया - हॅप्पी बर्थडे मित्रा...... 📲




जिवा // मल्हार - हॅप्पी बर्थडे भाऊ....... 📲





इंद्रजीत - अरे हो हो सगळ्यांना खूप थँक्यू....मिस यु टू... आणि मी लवकरच परत येतोय...अर्थात उद्याच येतोय... 📲





तारा - येssssss 😄📲




ममता - थांबा पोरींनो..
बाळा उद्या येतोयस ना नक्की? लवकर ये आणि सावकाश ये हा 📲




इंद्रजीत - बर ऐक आता मी ठेवतो सगळ्यांशी नंतर बोलतो मला ड्युटीवर जायचंय..... 📲





ममता - हो चालेल..... बाळा 📲




इंद्रजीत - अरे कदम गाडी नाही काढलीत?




कदम - हॅप्पी बर्थडे साहेब.. 🥹मला माहीत होत पण म्हंटल तुम्हाला आवडल न आवडल म्हणून नव्हतो बोलो....





इंद्रजीत - आभारी आहे तुमचा कदम....कोल्हापूर मध्ये आल्यापासून खूप सांभाळून घेतलंत मला...नाहीतर आजकाल बेवड्या साहेबाला घरी पोहचवणाऱ्याना राग येतो.....तुम्हाला कधीच नाही आला...असो या मग मुंबई ला पोस्टिंग घेऊन.... 😄





कदम - हो न्नकीच... आणि साहेब असं आभार नका मानू....अहो माझं कर्तव्य केल मी....तुम्ही काय वाईट नाहीत....चांगला माणूस आहात....





इंद्रजीत - बर चला निघुयात..
(कार मध्ये बसून....)




कदम - हो...
साहेब मला सांगा तुमची राशीं कोणती ओ..?





इंद्रजीत - मिथुन.... का ओ कदम?





कदम - आहा! साहेब तुमच्या राशीत लिहिलंय कि तुम्हाला जे हरवलंय ते सापडेल आज.....ज्याची तुम्ही वाट बघताय ते आज भेटणार....पण त्यानंतर थोडे दुःख येतील जरा प्रवास खडतर असलं....मग त्यानंतर सुखच सुख..... 😄





इंद्रजीत - काय पण..




कदम - खरं साहेब माझा आहे विश्वास या सगळ्यावर...





इंद्रजीत - बर चालतंय... 😆




********************




अनिकेत - मॅडम आज ऑफिस ला नाही? तब्बेत ठीक नाही का? काल पण नाही गेलीस?




जिजा - अअअअ ते.. 😔




अनिकेत - काय झालं...?




जिजा - आमचे CEO त्यांचा सोबत भांडण झालं...ते उगाच माझ्यावर नजर ठेवून होते आणि सतत चुकीची गोष्टी फ्लर्ट चालू असायचा मग मी रिजाईन दिली...





अनिकेत - मला का नाही सांगितलंस मग?




जिजा - एवढं काही नाही अनिकेत...आज जाऊन आयडी वैगेरे जमा करून आले कि विषय संपला....त्यांनी संध्याकाळी बोलवलय....




अनिकेत - का संध्याकाळी का? मी पण येईन मग सोबत..एकतर सांगत नाहीस काय झालंय ते...आणि असं करतेस स्वतःच निर्णय घेऊन बसतेस...




जिजा - अहो नका घाबरू होईल सगळं नीट...ठीके.. मी येईन जाऊन....आणि दुसरीकडे जॉब मिळेल...




अनिकेत - ठीके काही लागलं तर कॉल कर..आणि घरी पोचलीस कि कॉल कर...




जिजा - हो नक्की...
.
.
.
.
जिजाला संध्याकाळी निघायला वेळ होतो ती उशिराच ऑफिस मध्ये पोहोचते......ऑफिस मध्ये कुणी नव्हतं...
जिजा सार्थक च्या केबिन जवळ गेली....तिकडे पण कुणी नव्हतं...अचानक सार्थक ने मागून येऊन जिजाला पकडलं....जिजा घाबरली....त्याचा हात सोडवू लागली पण त्याने खूप घट्ट पकड धरली होती...




सार्थक - अहाहा या क्षणाची कधीपासून वाट पाहत होतो मी....मला माहीत होत तू येणारच...तुझ्या सारख्या सालस साध्या मुलीच तर फसतात ना जाळ्यात.....जिजा तुझी ब्युटी बघून तेव्हाच फ्लॅट झालो होतो जेव्हा तू इंटरव्हिव ला आलेलीस...तेव्हापासून थांबलो तू सतत जवळ हवीस म्हणून प्रोमोशन देत आलो.....आता माझ्या थांबवलं जात नाही.....
(तिच्या माने जवळ जाताना....)




जिजा - सार्थक सोड मला...सोड म्हंटल ना...मला फसवून बोलवताना लाज नाही वाटली तुला.... सोड मला....सोडsssss




सार्थक - ओरड हवं तेवढं आता कुणी नाही येणार.....फक्त आपणच....आपणच आहोत....




जिजा - नाहीsssss 😵‍💫सोड मला......





सार्थक आणि जिजा ची झटपट होते.....सार्थक जिजाच्या कानाखाली मारतो......जिजा तिच्या जीवाचा आकांत करते.....सार्थक तिचा ड्रेस फाडतो.....ती त्याच्यापासून दूर पळत जाते....


सार्थक जिजाला पकडतो आणि विंडो च्या काचेवर धरून ठेवतो......जिजा हात पाय त्या काचेवर आपटत असते.....त्यांची झटपट चालूच होती...




सार्थकच्या ऑफिस समोरून कदम आणि इंद्रजीतगाडीतून जात असतात....





कदम - आईला साहेब मला कळंना तो आपला नेहमीचा रस्ता आजच कसा बंद झाला ओ? कसलं काम चालू केलंय कुणास ठाव....आपल्याला काय खबर नाय....






इंद्रजीत - अरे असावं काहीतरी रस्त्याच काम...काम सांगून निघतात का...आणि चालोय ना आपण या रोड ने...जरा वेळ लागेल पण पोहचू...तस पण मी उद्या जातोय कदम...जरा अजून वेळ घालवा माझ्यासोबत मग काय बायकोलाच वेळ द्यायचं.. 😂






कदम - काय तुम्ही साहेब!!😂





इंद्रजीत - Hahahahaaa अहो म्हणजे😆......अअअ 🤨






तेवढ्यात इंद्राचं लक्ष त्याच्या ऑफिस वर जाते....त्याला कुणीतरी हात पाय आपटत आहे काचेवर असं दिसत.......इंद्रजीत ताबडतोब गाडी थांबवतो आणि कदम सोबत त्या अपार्टमेंट मध्ये घुसतो...




सार्थक जिजाला खाली ढकलतो आणि तिच्या अंगावर झेप घेतो......तिचे हात घट्ट पकडून ठेवतो.....जिजा आता सगळ्या आशा सोडून बसते....तेवढ्यात इंद्रजीत दरवाजा तोडून आत येतो....कदम लगेचच सार्थक ला पकडतात...आणि जिजापासून वेगळं करतात....इंद्रा सार्थकला जोरात कानाखाली वाजवतो.....





इंद्रजीत - काय रे 😡बलात्कार करतोयस ते ही एवढं निर्धास्तपने....🤨लाज नाही वाटली त्या मुलीवर हात टाकताना.... 😡
कदम दाखवा याला तुमचा इंगा... 😡




कदम - होय साहेब 😡काय रे ए 😡बलात्कार करतोस काय हा...... 🤨
(त्याच्या पोटात लाथा मारताना )





सार्थक - आ अअअ...




इंद्रजीत - अअअ बाई कोण आहात तुम्ही? हे बघा घाबरू नका तो आता काहीच नाही करणार आम्ही आहोत ना...इकडे या... कोण आहात तुम्ही? ठीक आहात ना? बोला ना?





जिजा - इ अअअ इंद्राssss 🥺🥺
(मागे वळून बघताना....)





इंद्रजीत - हम्म?
जिजाssss......... 😯😧





इंद्रा जिजाला जिवंत समोर बघून आश्चर्यचकित होतो.......त्याच्या तोंडातून शब्द नव्हते फुटत....डोळ्यात लगेच अश्रू जमा झाले.....इतक्या वर्षानी एकमेकांना समोर बघून काय करावं समजतच नव्हतं..... 🥺
पण अश्रूनी सर्वकाही व्यक्त केल....





इंद्रजीत - जिजा तू तू? तू 🥹इकडे इकडे? कस? मी..? तू? अअअ म म्हणजे ह्याने तू तुझ्यावर.......




जिजा - हम्म्म्म 🥺




इंद्रजीत - 😡
कदम सोडा त्याला....तुम्ही जा आणि बाकी टीम ला बोलवा आणि याला घेऊन जाईल सांगा....
काय रे 😡तू तू कोणावर बलात्कार करायचा प्रयत्न केला माहिती तरी आहे का तुला 😡माहिते का 😡
बायको आहे ती माझी 😡जिजा इंद्रजीत भोसले आहे ती 😡 तू तिला हात कसा लावलाsssssssss😡😡😡कसा लावलास? 😡





इंद्रजीत सार्थकच डोकं भिंतीवर जोरजोरात आपटतो......मग त्याचा हात घेऊन काचेच्या टेबलवर जोरात मारतो काच फुटते आणि दोघांच्याही हाताला लागते....
इंद्रा त्याला खूप मारतो.....कदम येऊन इंद्राला थांबवतात....त्याला शांत करतात......पोलीस येऊन सार्थकला घेऊन जातात...



तस इंद्रजीत जाऊन जिजाला लगेचच मिठीत घेतो.....दोघेही एकमेकांच्या मिठीत खूप रडतात.....किती तरी विरह भोगून आज समोरासमोर आल्यावर अश्रूना वाटाच फुटल्या...
बस्स!! जिजाला पण हीच प्रेमाची मिठी हवी होती!





इंद्रजीत - कुठे होतीस तू? इतके वर्ष का नाही आलीस परत? कोणताच कॉन्टॅक्ट नाही? कोल्हापूर मध्ये कशी? त्यादिवसानंतर काय झालं? त्यादिवशी मी बंदूकी ने माधुरीवर हल्ला केला कारण ती तुझ्यावर हल्ला करणार होती......त्यानंतर तिने मरणाआधी एक गोळी झाडली ती माझ्या हाताला लागली......तरी मी नंतर पळत आलो....बघतो तर पुढे खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल ज्यातून साधारण माणूस जाऊच शकत नाही......त्यानंतर सगळे म्हणाले जिजा दरीत पडून मेली म्हणूंन पण मला माहीत होत कि तू जिवंत आहेस......खूप शोधलं मी तुला खूप.....पण त्यानंतर काय झालं......🥺सांग ना सांग चार वर्ष हेच प्रश्न मनात ठेऊन तुझी वाट बघत बसलोय ग बोल बोल🥺




जिजा - काय काय सांगू तुला? किती सांगू 🥺आणि का? जे झालं ते तुझ्यामुळे ना...जर तू कोणाशी शत्रूता मिळवली नसतीस तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती...🥺
त्या रात्री.....बंदूकीचा आवाज झाला तस मी अजून पळत निघाले.....एक आई आपल्या लेकरासाठी काही ही करू शकते....मी माझ्या बाळासाठी घनदाट जंगल पार केल........समोर एक रस्ता आला मी तिकडे बेशुद्ध पडली.....मग अनिकेत सूर्यवंशी म्हणून एक व्यक्ती तिकडे आले त्यांनी मला बघितलं आणि दवाखान्यात भरती केल जवळ जवळ सात दिवस बेशुद्ध होते मी....शुद्ध आली तेव्हा त्यांना सगळी हकीकत सांगितली मी तेव्हापासून त्यांनी मला त्यांच्या घरातल्या सदस्यां प्रमाणे ठेवलं..रोज सगळ्यांची आठवण यायची ताराची सुद्धा 🥺पण काय करू? माझी मजबुरी होती 🥺जीव तोडत चार वर्ष काढली मी....आज नशिबाने भेटवलं नाहीतर तुला समजलंच नसतं....





इंद्रजीत - का का असं जिजा.....अग🥺 सगळे तुझी वाट बघतात ग.... मी तर खूपच 🥺तुझी इच्छा म्हणून ते सगळं काम सोडल 🥺आणि ACP बनलो.....माझं स्वप्न पूर्ण केल सोबत तुझं ही....जिजा मागील वर्षात बरच काही बदललंय ग.....मी खूप स्ट्रगल केलाय.....फक्त तुझ्यासाठी.......ह्याच पश्चाताप मध्ये राहिलोय कि तुझा आधीच ऐकलं असत तर बर झालं असत........ ऐक ना तू आपल्या घरी जर आलीस तर सगळं नॉर्मल होईल,...... चल घरी....आपण आधीसारखं जीवन जगू......अअअअ आणि हो अअअअ आपल बाळ कुठंय? कुठंय? म मुलगा कि मुलगी हा सांग न 🥺कुठंय? कस आहे?





जिजा - मुलगा... 🥺




इंद्रजीत - काय....🥲म मला त्याला भेटायचंय प्लिज घेऊन चल त्याच्याकडे मला...प्लिज.....प्लिज प्लिज पाया पडतो🙏





जिजा - इंद्र मी.... 🥺अरे पण....



**********************





अनिकेत - बोल शिवा...
ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा...




शिवांश - ये ले ये ले पावशा तुला देतो पेशा......




अनिकेत - पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा....




शिवांश - पेशा झाना खोटा पावश आना मोटा..... 😆




अमोल - कसा बोलतो ग माझा गोबरू हा गोबरू 😂




अनिकेत - अरे मम्मी आली शिवांश ची....




जिजा - शिवा.....




अनिकेत - इंद्रजीत.....?





अमोल - जिजाचा नवरा.....?






शिवांश - मम्मा......अलिश तू.... कुठे होती तू.....





जिजा - सॉरी बाळा हे बग कोण आलेत..




शिवांश - पोलिश काका.....




इंद्रजीत - हा म माझा माझा मुलगा...? त्यादिवशी भेटलेला मला..... माझा म मुलगा हा... मी ओळखलं कस नाय 🥺




जिजा - हो...





इंद्रजीत - ये बाळा...ये जवळ....





शिवांश - हाय अंकल..... कशे आहि तुमी





इंद्रजीत - माझं बाळ....🥺माझा मुलगा....आमचा प्रेमाचं प्रतीक......😭❤️
(त्याला घट्ट मिठी मारून....)





अनिकेत - जिजा? हे काय कस?






जिजा - 🥺(जिजा त्यांना सगळी हकीकत सांगते....)






अमोल - जिजा जिजा रडू नकोस बाळ....रडू नकोस...उगी उगी शांत हो..





************************



इंद्रजीत - जिजा....🥺तू पण खूप खडतर प्रवास जगलीस...आणि मी पण......आता नको ना हा दुरावा.....चल ना आपल्या घरी ग वातावरण बदललंय आता...सगळं आधी सारखं नाही राहील.... तुला आपल्या मुलाला मी काहीच होऊ नाही देणार....





जिजा - नाही मी मी कोणत्या तोंडाने येऊ....मला नाही यायचं....तू निघून जा.... आम्हाला आमचं आयुष्य जगू दे!





इंद्रजीत - असं का बोलतेस माझा पण काय हक्क आहे कि नाही शिवा वर...... तुझ्यावर?!🥺विरह नाही सहन होत मला अजून....वेडा झालो होतो मी....अग खुप काही सहन केलंय ग मी... तुला माहिते त्या दिवशी आपल्या.....





जिजा - काही नको सांगुस... बोला ना मी आणि शिवा तुझ्यासोबत राहणार नहीं....आम्हाला मान्य नाही....🥺निघून जा.... तुझ्यामुळे खूप सहन केलंय आता अजून नको....





इंद्रजीत - म्हणजे मी नाही का सहन केल....🥺मला गरज आहे तुझी.....आपल्या शिवाची नाहीतर मी मरेन ग..... वेड लागेल मला.....आता पर्यन्त या आशेवर होतो कि तू भेटशील aj भेटलेस तर तुझ्याशिवाय जगू कस......🙏😭तुझ्या पाया पडतो 😭





जिजा - काहीही नको करुस इंद्र..... 🥺






इंद्रजीत - मग चल आपल्या घरी जिजा....माझी चूक आहे..... मला मान्य आहे.....🥺🙏






जिजा - नाही यायचंय मला.......अजून त्रास नाही सहन करायचंय मला....तुझ्यावर प्रेम करून मग तुझ्याशी लग्न करून.....आणि मग तुझ्या मुलाची आई होऊन चूकच केली मी.....माझंच चुकलंय सगळं.......हे बग मी म्हंटल ना... जा इकडून तू...






इंद्रजीत - काय जा? जा काय जिजा? माझ्यावर प्रेम करून..... शिवा ची आई होऊन चुकी झाली का तुझी......एवढा काय त्रास दिला ग मी आणि माझ्या घरच्यांनी तुला.....दरवेळेला असं का बोलतेस...😡😭मी एवढं नीट सांगतोय तरी तू तेच करतेस पुन्हा....ठीके तुला नाही ना राहायचं माझ्यासोबत... मग मला माझा मुलगा दे.... मी शिवा ला घेऊन जातो...





शिवांश - तुम्ही दोघं का भांडतात..





जिजा - काही नाही शिवा तू आत जा..... अनिकेत कडे जा....





शिवांश - मम्मा....मम्म....हे पोलिश अंकल माझे पप्पा आहेत का.... माझे पप्पा....






जिजा - तू जा इकडून....तू अजून लहान आहेस...या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत तुला.....





इंद्रजीत - नाही शिवा माझ्यासोबत जाणार....तू नेहमी माझं मन दुखावतेस आणि चांगल्या इंद्राला वाईट बनायला लावतेस....😡🥺
चल शिवाsssss
(शिवाला उचलून घेऊन.....)






शिवांश - अअअअअअ मम्मा....मम्माsss 🥺अंकल आपण कुते चानो...... शोला मला शोला..... मम्माsssssss😭





जिजा - इंद्र सोड त्याला....माझ्या मुलाला सोड.....





इंद्रजीत - जिजा लांब. हो.....
(तिला बाजूला करून....)






जिजा - शिवा.... शिवा.....





अनिकेत - जिजा... काय झालं..? शिवा... शिवा.






जिजा - अनिकेत इंद्र शिवाला घेऊन जातोय.... जा थांबावं त्यांना..... 😭





अनिकेत - शिवा.... शिवा sssssssss
हे देवा!!.





जिजा - कुठेय शिवा? शिवा शिवा.....






अनिकेत - जिजा ते लोक गेले निघूनं....🥺





जिजा - काय.....🥺शिवाsssss......😭






क्रमश :)