रक्तकेतू भाग २
माझं रुटीन चालू होतं काही कारणास्तव मला चेन्नईला जाणार गरज गरज आहेच गरजे होत.जवळ जवळ एक आठवडा मला चेन्नईमध्ये राहावं लागणार होतं. sap support मध्ये ट्रॅव्हलिंग,मुक्काम, ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम,कंटीन्यूअस फोन हे चालूच रहात. दीपा येऊन गेली त्याला ही आता दहा एक दिवस होऊन गेले होते. कामाच्या गडबडीत मी तो प्रसंग विसरलो पण होतो.
माझ्या साधनाचा एक भाग म्हणजे कमीत कमी अश्या गोष्टीवर विचर करणे. कारण नैमित्तिक साधनेमध्ये अशा गोष्टींना बाजूला ठेवणे याला पर्याय नसतो. त्यामुळे अशा गोष्टींवर कमीत कमी विचार गॉसिप गप्पा इत्यादी मी कटाक्षाने टाळत असे. चेन्नईला असताना आणि एक दिवशी मला दीपा चा फोन आला "हॅलो..हॅलो", "कोण अविनाश ना, हेलो, म..म.. मी दीपा बोलते आहे."
"तुम्ही आत्ता घरी आहात का मला तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे".
"मॅडम मी सध्या चेन्नई मध्ये आहे अजून आठवडा तरी मला इथे रहाण भाग आहे".
"आल्यानंतर बोलू किंवा मग फोनवर काय असेल ते बोलल तरी चालेल, पण आता मी कंपनीत आहे तुम्हाला फोन रात्री करावा लागेल, त्या वेळेस थोडे सविस्तर बोलता येईल".
दीपा चा आवाज अतिशय घाबराघुबरा होता "मी ठेवते फोन हे यायची वेळ झाली".
"मात्र तुम्ही मात्र मला फोन नका करू".
"मॅडम", मी दीपाला म्हणाले "मी तुम्हाला तुम्हालाच काय पण कोणालाही फोन करत नाही".
"फोन तुम्हालाच करावा लागेल कारण कधीकधी उगीच गैरसमज तयार होतात याची मला पूर्ण कल्पना आहे". "त्यामुळे तुम्ही त्याविषयी काही खंत बाळगू नका, जमेल तेव्हा फोन करा"
"फक्त फोन रात्री तरी करा किंवा मग अगदी सकाळी सातच्या आत!!!"
"किंवा व्हाट्सअप वर जमलं तर थोडक्यात लिहून तुम्हाला पाठवता येईल, "पाठवून झाल्यावर तुमच्या हँडसेट मधून मेसेज डिलीट करून टाका !!!".
"म्हणजे कुठलंही कन्फ्युजन गोंधळ होणार नाही...!", एवढं बोलून मी फोन कट केला.
काय झालं होतं कुणास ठाऊक परत कामाच्या व्यापात मी हे सगळं विसरलो रात्री guest-house वरती आलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. जेवण केलं टीव्ही चालू केला आणि लॅपटॉप वर मेल चेक करत बसलो. नेहमीच रूटीन, सगळे दिवस IT Industries मध्ये सारखेच. त्यात विशेष असं काही नव्हत.थोड्यावेळाने मला एका वेगळ्याच नंबर वरून फोन आला होता std.कोड वरून पुण्याचं होता दीपा न बहुतेक land line वरून कॉलिंग करून फोन केला असावा. मी फोन घेतला "हॅलो अविनाश, मी बोलते आहे.
"हो आलं लक्षात, बोला"
त्यादिवशी मी तुमच्या घरून निघाले वारजेला घरी आले माझे मिस्टर एक-दोन दिवसात येण्यातच होते. योगायोगाने जिन्यामध्ये माझी गाठ राघवन यांच्याशी पडली त्यांचे ते शेवाळलेले हिरवी वासनेने बरबटलेली नजर, "बाहेर गेला होतात...?, झालं का काम" राघवन नी विचारल. त्यांच्या डोळ्यात उतरलेली वासनेची जळमटं मला स्पष्ट कळत होती.
"दीपा तुझी इच्छा असेल तर तुझ्या मिस्टरांची कायमची बदली आपण करू शकतो"
"माझ्या बर्याच ओळखी आहेत". राघवन बोलत होते.
"म्हणजे पुण्याला. . .?..?..?!" मी आपलं विचारल.
राघवन च्या डोळ्यात खुनशी भाव होते ते म्हणाले "तू मला मदत केलीस तर त्यांची बदली मी कायमची तुला पुण्याला करून देऊ शकतो".
"विरोध केलास तर आलं ना लक्षात मी काय म्हणतोय ते त्यांची बदली कायमची मुंबईला होऊ शकते". "याठिकाणी दोन पर्याय आहेत "तु इथेच रहा रमेशरावांना ३-४ महिने मुंबईत नोकरी करावे लागेल, तू मला भाड दिलं नाहीस तरी चालेल".
"तीन चार महिन्याने त्यांची बदली मी कायमची पुण्याला करून देईन मात्र ही जागा तुम्हाला रिकामी करावी लागेल"
"बघ तुला योग्य वाटेल तसे ठरव", म ला त्या माणसाच्या निर्लज्जपणाची कमाल वाटली थोडक्यात त्यांनी माझा भाव ठरवला होता, दीपाच्या आवाजातून व्यथा संताप उद्वेग उद्रेक चांगलाच जाणवत होता.
"मी म्हणालो मॅडम तुम्ही असं करा. . . , परत एकदा तो संधी साधून तुमच्यापुढे हे प्रपोजल माँडेल तेव्हा विचार करून सांगते मला जरा वेळ हवा आहे असं सांगा मात्र तावीज विषयी विसरू नका".
दीपाने फोन कट केला होता दोन दिवसांनी परत एकदा तिचा फोन आला होता तुम्ही म्हणाल्या प्रमाणे राघवन याने परत एकदा त्याचं त्याचं प्रपोजल माझ्यासमोर मांडलं होतं. त्यामुळे मी जरा निश्चिंत होते. विचार करण्यासाठी वेळ मागून घेतलेला होता, त्या मुळे काही त्रास आता तरी होणार नाही अस वाटल होत. काल रात्री परत तोच प्रकार झाला मी राघावन च्या खोलीत होते. मागच्या वेळेस जमिनीवर होते, यावेळेस त्यांच्या मांडीवरती बसलेली होते मला धक्काच बसला पुढची सगळी तुम्हाला कल्पना आहेच.
"मॅडम मी म्हणालो की तुम्ही जे सांगत आहात अस होण शक्य नाही..महाराजांचे वचन असत्य होणार नाही तुम्ही तो तावीज ळ्यात घातलेला नसावा..!,असं मला वाटतं"
दीपा म्हणाली हो मी तो तावीज तसाच पर्समध्ये ठेवून दिलेला होता. मला वाटलं एवीतेवी वेळ मागून घेतलेला आहे त्यामुळे हा राक्षस त्रास देणार नाही त्यादिवशी मला जाग आली तेव्हा सकाळचे सहा वाजले होते त्या राक्षसान अक्षरशः उसाच्या कांडी सारख शोषून घेतलं होत, माझ्या तोंडाला दारू चा वास पण येत होता मी कसेतरी आवरलं कारण हे येण्यातच होते. शेजारची शिल्पा येऊन गेली.
ती म्हणाली "दिपा तू मटण खातेस"
"नाही ग, का?, मी विचारल
"नाही, सगळ्या घरात मटणाचा खमंग वास येतोय"
घरातले सगळे पंखे मी फुल करून टाकले. रूम फ्रेशनर मी सगळ्या रूममध्ये मारलं, माझे मिस्टर संध्याकाळ पर्यंत परत आले होते मी खूप घाबरलेली होती. पण त्यांच्या काहीच लक्षात आलं नाही नेहमीप्रमाणे रात्री त्यांनी मला जवळ घेतलं. कसं बसं रडू आवरत त्यांच्या कुशीत मी झोपून घेतलं. खूप दिवसांनी मला गाढ झोप लागली होती मिस्टर असेपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. आता येत्या आठवड्यात त्यांना हैदराबादला जावे लागणार होत. कंपनी खरं तर महाराष्ट्रातील लोकांना ऑफिस महाराष्ट्र मध्ये असेल तर महाराष्ट्रात च ऑन ड्युटी पाठवतात इथे मात्र जरा विपरीतच घडले यांना हैदराबादला जावे लागणार होतं. ऑफिसात त्यावर चर्चा होऊन आश्चर्य व्यक्त केला जात होत. हा निश्चित राघवन चा उद्योग असणार अशी मला खात्री होती. एवढे बोलून आता मी काय करू हेच मला कळत नाही", असं दीपा म्हणाली. मी तिला म्हटलं एकदा का तावीज वापरून पहा. अन्यथा परत मला या विषयावरती बोलायचे नाही. नसते काही लोकांच्या नशिबा मध्ये स्वामी महाराजांची कृपा !!! त्याला तुम्ही तरी काय करणार एवढे बोलून मी फोन कट करून टाकला". स्वामींची मनोमन माफी मागितली मलाच अपराध्या सारखं वाटत होतं मी अबू ना फोन लावला त्यावर ते म्हणाले "हे बघ अरे अशी माणसे भेटत असतात, आपण त्यांचा राग करु नये. त्याने ऐकलं तर सोडून द्यायचं त्याच्यावर विचार करण्याची गरज नाही..!"
"तेव्हा तुला अपराध्यासारखा वाटायचं काहीच कारण नाही तू तुझं काम केलं"
"त्या मुलीने आता जर तिचं काम केलं नाही तर त्यात तुझा काही संबंध येतच नाही"
"अविनाश नेहमी लक्षात ठेवा ignorance is best medicin". एवढे बोलून फोन ठेवून दिला. चेन्नईतल्या कामामुळे मला अजून थांबावं लागणार होतं व्हाट्सअप बघताना त्यात दीपाचा मेसेज होता -- तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे हैदराबाद ला गेल्यावर तो तावीज गळ्यामध्ये कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे गळ्यात घातला. रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीतच होते राघवन च्या खोलीतील्या मंद परिचित सुगंधाची लहर माझ्या घरात खोलीपर्यंत येऊन पोहोचलेली होती गळ्यात तावीज असल्यामुळे यावेळेस मात्र त्या सुगंधाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. बराच वेळ तो सुगंध दरवळत राहिला माझ्या शरीराला स्पर्श करत रहिला अंगावर रोमांच येत होते, शरीर उत्तेजित झाल होत. पण मग एकदम हवेचा झोत येऊन निघून जावा तसा तो सुंगंध नाहीस झाला...!.डोळे मिटले गाढ झोप लागलेली होती गाढ झोप लागलेली होती सकाळी उठले नेहमीप्रमाणे फ्लॅट मधल्या लोकांची एक दोन शब्द बोलत रागवून राघवन माझ्या दरवाज्यापाशी आले "तुला कळलेल दिसतय तर...! पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला माझ्या हातून जाऊ देणार नाही...!!!. आणि ज्याने कोणी तुलाही मदत केली असेल तो फार काळ जगेल असं मला वाटत नाही असे मला वाटत नाही...!". शिल्पा इथे आली राघवन नी संभाषण बदलून टाकलं होतं.
"काय दीपाताई कशा आहात... काही लागलं तर नक्की सांगा..शिल्पा अगदी हक्कान मागून घेते...!.
एवढे बोलून ते गेले. अविनाश मला क्षमा करा माझी चूक झाली आता यापुढे स्वामींना सोडून मी कुठेही जाणार नाही तुम्ही कधी भेटाल असं मला झाला आहे मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे स्वामींची माफी मागायची आहे. शक्य असेल तर मला क्षमा करा. तुझीच दीपा
अचानक दीपाच्या व्हाट्सअप वर पोस्ट यायला सुरुवात झालेली होती. खूप आठवण येते करमत नाही इ० हा दीपाचा निश्चित उद्योग नव्हता या मागे करता करविता राघवन होता. १० flats १० कुटुंब व १० स्त्रियांशी स्वैर वर्तन. . . . प्राचीन ग्रंथातील काही दुर असणारया व्यक्ती ना वश करून त्यांचा स्वत: चे स्वार्थ साठी उपयोग करून घेणारा राघवन . . .
(क्रमशः)