दीपा माझ्यासमोर बसली होती ओक्साबोक्शी रडणे अजून थांबलं नव्हतं.
आज सकाळी जाग आली तेव्हा नऊ-साडेनऊ वाजलेले होते. कंपनी च काम,धावपळ,दगदग यामुळे मी खूपच
थकलेलो होतो. कदाचित दरवाजा कोणी वाजवला नसता तर मी अजून झोपलेलोच असतो. उठण जीवावर आल
होतो, मी दार उघडलं दरवाज्यात साधारणतः एक 27 वर्षाची अप्रतिम सुंदर विवाहित तरुण उभी होती.
खूप घाबरलेली, कावरेबावरे होऊन कशाचा तरी सारखा कानोसा घेणारी, अस्वस्थ, भय अशी तिची अवस्था
होती.
"अविनाश तुम्हीच का?" , तीन विचारल.
मी "हो", म्हणालो दरवाजातून बाजूला होत मी त्यांना
"याना, आत या म्हणालो.
"घरी कोणी नाही आहे का!?", तिने विचारले.
"आहे की मी,माझी मिसेस, आई आणि आमचे स्वामी महाराज तर आमच्याच घरीच मुक्कामी असतात", मी
म्हणालो.
"नाही हो !, म्हणजे तसं नव्हे म्हणायचे" , "मला सध्या फार भीती वाटते हो म्हणून मी विचारलं", "राग नका
धरु प्लीज. . . ", तिच्या डोळ्यांमध्ये अर्जव होतं.
मी त्यांना दोन मिनिट बसायला सांगितलं आणि हिला "तू जरा ह्याच्याशी गप्पा मार, तो पर्यंत मी आवरतो",
म्हणून सांगितलं पटकन आवरुन स्वामींना नमस्कार करून मी सोफ्यावर येऊन बसलो.
"बोला मॅडम काय झालं?, तुम्ही इतक्या घाबरलेल्या का दिसतं दिसत आहात?, इथे तुम्ही अगदी सुरक्षित
आहात अजिबात काळजी नको", माझ्या ह्या धीर देण्याने तर तिला अजूनच भरून आल.तीन सांगायला
सुरुवात केली.
"माझं नाव दीपा दीपक कुलकर्णी मी वारजे ला राहते. नुकतीच यांची बदली कोल्हापूर हून पुण्याला झालेली
आहे. येऊन आम्हाला महिनाच होतो आहे जेम तेम, घराच्या शोधात आम्ही होतोच आता वारजे माळवाडी येथे
राहतो." इतकं बोलून परत तिने रडायला सुरुवात केली. "मॅडम रडू नका, कारण काय झालं हे सांगितले शिवाय
आपल्याला काहीच करता येणार नाही, संकटांशी सामना करायचा असतो, उगीच रडून काय उपयोग?".
"तुम्ही छानशी कॉफी पिता का, त्याने तुम्हाला बरं वाटेल, मग हवंतर आपण बोलू", दीपाने डोळे पुसत मान
हलवली मान हलवली. हिने तिच्या पाठीवरून, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत "बसा ह!, मी तुमच्या करता
छानशी मस्त कॉफी करून आणते, मग बोला हवतेवढ", म्हणत आत निघून गेली.
कॉफी पिऊन आता संपली होती, सावरलेल्या दीपाने बोलायला सुरुवात केली "कोल्हापूर हून आम्ही पुण्याला
आलो, पुण महाग शहर आहे,त्यामुळे जिथे भाडे कमी असेल अश्या जागेच्या आम्ही शोधात होतो. वारज्याला
आम्हाला अशी जागा मिळाली. भाडं कमी असल्यामुळे आम्ही खुश होतो. पण थोडसं आंधी माहिती झाल असतं
तर आम्ही रस्त्यावर राहणार देखील पसंत केलं असतं. बिल्डिंग नाव रक्तकेतू आहे अगदीच वेगळं नाव दहा
flats तिथे आहेत.त्यापैकी एक आमचा. मालकांच नाव राघवन आहे बहुतेक दक्षिण भारतीय असावेत. काळ्या
रंगाचे वय साठीच्या जवळ असलेले, वाढवलेले केस पोनीटेल सारखे मागे बांधलेले, आणि विसंगत, जर्द हिरवे
शेवाळलेले डोळे. राघवन साधारणतः ज्या जोडप्यांच्या नवर्यांना फिरतीची नोकरी आहे अशांनाच जागा भाड्याने
देतात, असे बिल्डींग मधले व आजू बाजू चे सांगतात. त्या बिल्डिंगमध्ये ते शेवटच्या मजल्यावर राहतात.
बिल्डिंगला एक वॉचमन आहे, बिल्डिंग मधून बाहेर जाताना येताना एन्ट्री करावी लागते हा नियम फक्त
पुरुषांनाच लागू आहे. फीरतीवर असलेली माणसं जर त्यांच्या scheduled outdoor dutyच्या आधी
येणार असतील तर त्यांनी वॉचमनकडे तशी नोंद करणे गरजेचे. भाडं मात्र सात हजार रुपये आहे. वारजे
माळवाडी या परिसरात आणि चांगल्या लोकॅलिटी इतकं कमी भांड असलेली ही रक्तकेतू बिल्डिंग तिच्या नवा
मुळे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही रहायला आलो राघवन दिवसात ना तीनदा बाहेर पडून सगळ्या फ्लॅट
मध्ये जाऊन जातीने सर्व कसे आहेत इ० चवकशी करतात. तिथे राहायला आल्यावर एक दहा पंधरा दिवसांनी
यांना कंपनीच्या कामाकरता मुंबईला जावं लागणार होतं त्याप्रमाणे त्यांनी ते गेले भाडेकरूंच्या नियमावलीनुसार
गेटवर एन्ट्री परत येण्याची तारीख इ० नोंदी फोन नंबर इ० नोंद इत्यादी करून माझे मिस्टर मुंबई निघाले मी
त्यांना सोडून परत आले. माझं आपलं घरातलं रुटीन आवरासावर इ० चालू झाल. नेहमीसारखं राघवन येऊन
सगळी चौकशी करून गेले "काही हवं तर मला फोन कर", म्हणून गेले बिल्डिंग मधील सगळ्या बायकांना
राघवन एकेरी नावाने हाक मारत पण कोणाला त्यात गैर वाटत नसे. यांना परत यायला साधारण पंधरा दिवस
तरी लागणार होते अर्थात मी निश्चिंत होते कारण बिल्डिंग चांगल्या लोक वस्तीत होती. वॉचमन होता इत्यादी.
एक दिवशी रात्री सगळं करून आवरून मी टीव्ही बघता बघता कधी झोप लागली हेच कळलं नाही. एकदम
जाग आली तेव्हा मी वेगळ्या ठिकाणे होते इकडे तिकडे बघितले सुंदर सजवलेली खोली,समोर राघवन बसलेले
होते ते स्थिर नजरेने एकटक माझ्याकडे बघत होते संपूर्ण खोलीत मंद प्रकाश व एक प्रकारचा सुगंध दरवळत
होता आतून तर मी अतिशय घाबरलेली होते, धडपडत मी उठून उभी राहिले,
"म . . . मी ... मी इथे कशी आले ?", असं म्हणत."घाबरू नको तू इथे सुरक्षित आहेस!!!", एवढं राघवन
मला बोललेलं आठवते, जाग आली तेव्हा मी माझ्याच फ्लॅटमध्ये होते. टीव्ही तसाच चालू होता. लाईट तसेच
on होते. अंग मात्र ठणकत होत, कंबर दुखत होती, थकवा आला होता. मी एकदम उठून बसले बहुतेक मला
विचित्र स्वप्न पडलेले असावं असं वाटत होतं पण ते स्वप्न नव्हतं वास्तव होतं मी आरशासमोर उभी राहिले
तेव्हा मला धक्का बसला, माझे विस्कटलेले केस अर्धवट बटण लावेल व चुरगळलेला ब्लाउज निघालेला
अस्ताव्यस्त झालेली साडी परकर आणि आणि अंतर्वस्त्र.. .. !...!..!", दीपाला पुढे बोलवत नव्हतं तिने
ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली.
"मॅडम आहे तुम्ही शांत व्हा, माझ्या आलं लक्षात तुम्हाला काय सांगायचंय ते, मला फक्त हे सांगा की
त्यानंतर परत असाच प्रसंग तुमच्यावर आला का?", मी विचारल
दीपाने पुढे बोलण्यास सुरुवात केली मला या सगळ्या प्रकाराचा मोठा धक्का बसला होता कोणाला सांगण्याची
सोय नव्हती, बरं तर बरं हे इथे नव्हते. पण रात्री झोपायचे मला भीती वाटायला लागली सकाळी नेहमीप्रमाणे
राघवन येऊन चौकशी करून गेले आणि एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली की रात्री त्यांना मी ज्या ड्रेस
मध्ये बघितलेले होते तोच ड्रेस त्यांच्या अंगावर होता "दीपा बरं चाललंय ना?", मी शक्यतो चेहरा निर्विकार
ठेवून मान हलवली ते निघून गेले. विशेष म्हणजे दरवाजातून आज सुंदर आत सुद्धा आले नाहीत इतर कुठल्या
विषयावरती गप्पा नाहीत. मी अस्वस्थ होते यांना सांगण्याची सोयच नव्हती शेजारीपाजार्यांची नुकतीच ओळख
झालेली होत चालली होती.माझ्या शेजारी शिल्पा गोखले यांचा हिचा flat, काहीतरी कामाचे निमित्त करून
मी शिल्पाकडे गेले इकडच्या-तिकडच्या गप्पांमध्ये मी तिला राघवन यांचे विषयी विचारले तेव्हा ती एकदम
गप्प झाले मी म्हणाले "शिल्पा तू कोणाला सांगणार नसशील तर मला तुला एक विचित्र गोष्ट सांगायची आहे
, काल रात्री मला असं विचित्र स्वप्न पडलं होतं त्यामुळे मी जरा घाबरूनच गेले". "शिल्पा, तुला कधी असे
विचित्र स्वप्न पडला का ग ?", असं मी तिला खोदून खोदून विचारल्यावर ती म्हणाली की हो महिन्यात
एक - दोन वेळस तिला अशी स्वप्न पडली मग पुढे दिवस गेले आता हे दिवस आहेत त्य मुळे बरेच दिवसात
नाही". शिल्पाच्या मिस्टरांचा पगार फारच कमी होता वारजे वारजे फोन त्यांची फॅक्टरी अतिशय जवळ होती ते
दुसऱ्या घराच्या शोधात होते अर्थात शिल्पाने तिच्या मिस्टरांना काहीही सांगितलं नव्हतं याचा अर्थ. . . .
"त्या बिल्डिंगमध्ये एकूण दहा फ्लॅट होते व प्रत्यके फ्लॅट मधील एक स्त्री. . . .", एवढे बोलून दीपा गप्प
बसली.
"कसंही करून मला मदत करा आमची ही आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे", दीपा म्हणाली.
"मॅडम", मी दीपाला म्हणालो "तुम्ही काही काळजी करू नका" असं म्हणून मी त्यांना स्वामी महाराजांच्या
समोर एका तबकात ठेवलेल्या तांब्याच्या यांत्रा पैकी एक यंत्र तावीजात मंत्र म्हणता गळ्यात घालावयास दिले.
दीपा म्हणाली "माझा व माझ्या मिस्टरांचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही, दुसरा काही उपाय सांगा ना!".
"त्यांना हे आवडणार नाही".
मी दीपाला स्पष्ट सांगून टाकल "आता चॉइस तुमचा आहे एक तर जेव्हा जेव्हा तुमचे मिस्टर बाहेरगावी जात
असतील ऑन ड्युटी त्यावेळेस हाता तावीज धारण करत जा इतर वेळेस तो नीट ठेवा, त्यांना दिसणार नाही
अशा ठिकाणी!, स्वामी कृपेने परत ही वेळ तुमच्यावर येणार नाही हे निश्चित ! नाहीतर हे असच चालू राहील
ते सहन करा, दुसरी जागा मिळे पर्यंत". माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे दीपा जरा घडली होती गडबडली होती.
"नाही माझं तसं म्हणण्याचा उद्देश नव्हता माझी अडचण मी तुम्हाला सांगितली" दीपा म्हणाली.
"ते मी समजू शकतो, तावीज तुम्हाला मी दिलेला आहे आता काय करायच हे तुम्ही ठरवायचं, त्याच्या आत
तुम्हाला उत्तम जागा दुसरीकडे मिळाली तर फारच छान. रक्तकेतू बिल्डींग सोडून जाणे उत्तम उपाय आहे.
पण तोपर्यंत हाता तावीज तुमचं रक्षण करेल हे माझं स्वामी समर्थ महाराजांचे वतीने दिलेलं सत्यवचन!"
दीपाने तावीज हातात घेतला स्वामींच्या फोटोला नमस्कार केला व ती निघून गेली. जाताना "ज्या वेळेस
मिस्टर परत ऑन ड्युटी जातील त्यावेळेस मला फक्त फोन वरून किंवा व्हाट्सअप वरून मेसेज करा आणि
मिस्टर ऑन ड्युटी असेपर्यंत तावीज काढू नका हे सांगायला मी विसरलो नाही!"
(क्रमश:)