Mall Premyuddh - 41 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 41

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 41

मल्ल प्रेमयुद्ध

आबासाहेब सकाळचा हिशोब करत बसले होते. आज तेजश्रीने सकाळी लवकर त्यांना चहा आणून दिला.
"आर वा सुनबाई... काय म्हणत्यात गुड मारनिंग.." आबा हसले.
"हो आबा गुड मॉर्निंग... आज आपल्याला लग्नासाठी जे लागणार हाय त्याची लिस्ट काढायची लई कमी दिस राहिल्यात न आपल्या हातात..." तेजश्री
"व्हय व्हय... सुनबाई एक काम करा तुम्ही सगळी लिस्ट काढा. काय काय घ्यायचं.." तेवढ्यात सुलोचनाबाई बाहेर आल्या.
"मी सगळ सांगते तेजश्री तुला तस लिव्ह अन संग्राम अन तू लाग तयारीला... आतापासन तयारी केली तरच सगळं नीट व्हईल.." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"पण आत्या बसत्याच काय ठरलं न्हाय मंजि आपण क्रांतीला साड्या घ्यायच्या का ते घेणार? का भाऊजीना कपडे कस मंजि...?" तेजश्री म्हणाली.
"हे बघा सुनबाई त्यांना मी फोन करून सांगतो की पोराला पण आपणच कपडे घिवू अन क्रांतीलापण आपणच साड्या घेऊ आव त्यांची परिस्थिती न्हाय एवढी कशाला त्यांच्यावर भार टाकायचा. काय सुलोचनाबाई बरोबर हाय न...?" आबांनी सुलोचनाबाईंकडे मोर्चा वळवला.
"व्हय पण रीतीनं सगळं व्हायला पाहिजे..." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"तेजश्रीच्या आई वडिलांनी एक बाजु सांभाळली व्हती. आपण एकाला अस अन एकाला तस अस न्हाय करह शकत ना... जस तेजश्रीच्या आई वडिलांनी केलं तस क्रांतीच्या आई वडिलांनि पण करायला पाहिजे असं मला वाटतय... तेजश्रीला वाटल की मला कस...?" सुलोचनाबाई
"आपण त्यांनापण काय मागितलं नव्हतं. त्यांची परिस्थिती चांगली हाय त्यांची पोरगी एकुलती एक म्हणून त्यांनी दिल आपल्याला. देवाच्या दयेन आपल्याकडं लै हाय मग कशाला आपण मागायचं...?" आबा
"व्हय आबा उगाच आपल्यामुळ कोणावर दडपण नको... आत्या मला पण काय अडचण न्हाय आबा म्हणत्यात ते बरोबर हाय..." तेजश्री म्हणाली.
"सुनबाई तुम्ही थोरल्या शोभयताय बर किती तो समजदार पणा... आज सगळं लिहून काढा अन उद्या दोघ पण ज माझ्याकडून पैसे घेऊन... अन व्हय सगळ्यांना घरात कपडे घ्या. आक्का, ऋषि, स्वप्ना, दाजी सगळ्यांना ... अन व्हय सुनबाई तुम्हाला पैठणी घ्या अन सुलोचनाबाईंना सुदीक..." आबा तेजश्रीवर जाम खुश झाले.


तेवढ्यात संग्राम आला.
"काय झालं आबा...?" संग्राम
"आर लग्नाची तयारी आता तुमच्या दोघांवर टाकली... लहान भावच लगीन हाय मोठ्या जोमानं कामाला लागा उद्या पैस घेऊन जा आमच्याकडंन..." आबा असे म्हंटल्यावर संग्रामला समजले की तेजश्रीने हे प्लॅनिंग केले आहे. त्याने तेजश्रीकडे बघितले तिने डोळयांनी शांत केले.
"बर आबा तुम्ही म्हणतां तस... उद्याच जाऊ आम्ही तालुक्याला अन सगळी खरेदी करून येऊ.." संग्राम उत्साहात म्हणाला.
"आर लेकरानो अजिबात एकदम अंगावर घेवुन बसू नका रोज थोडीथोडी खरेदी करा." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"व्हय आई तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हंजी भडन(घाणा) याचं पण साहित्य सांगा मला त्यातल जास्त कबी काळात न्हाय.... थमही सांगा मी लिहिते सगळं मंजि तुमचं काम हलकं व्हाईल...." तेवढ्यात भायर ब्लॅक कलरची मर्सिडीज थांबली.आबा उठून बसले. दहा बारा बारकी पोर त्या मर्सिडीजच्या मग पळत व्हती. एक मध्यमवईन सुटा बुटातला माणूस गाडीमधून उतरला त्याच्या मागे एक काळी बॅग घेऊन अजून एक कडक इस्त्री केलेले शर्ट पॅन्ट मधला माणूस उतरला. लहान मुलाना त्यांनी पत्ता विचारला आणि ते वाड्यात आले.. संग्राम पुढं गेला अन त्यांना विचारलं.
"नमस्कार आपण..." संग्राम
"आबासाहेब पाटील???"विजय
"व्हय आबा हायत की...या आत या..." विजय आत आले. आबासाहेबांच्या पुढं येऊन उभे राहिले.
"नमस्कार आबासाहेब... मी विजयराजे देशमुख मुंबईवरून आलोय."
"व्हय बसा... सुनबाई पाणी आना पावण्यासनी..." तेजश्री आत गेली आणि पाणी आणले. त्यांच्या समोर ठेवले पण त्यांनी पाणी घेतले नाही.
"एवढ्या लांबून आमच्याकड काय काम काढलं देशमुख साहेब...?" विजय सोफ्यावर बसला त्याच्या बाजूला तो माणूस मुक्या जनावरसारखा शांत उभा होता.
"माझी लेक... हे एकमेव कारण आहे आबासाहेब.... स्पष्ट मुद्द्यावर येतो जास्त वेळ घेत नाही.. राजवीर जिथे आता ट्रेनिंगला आहे तिथे आमची मुलगी सुद्धा आहे. अन जेव्हापासून तिने वीरला बघितले तेंव्हापासून तिला तो मुलगा आवडला आहे. आम्हाला तिची इच्छा मोडायची नाही. म्हणूनच आम्ही इथवर आलो. आमच्या मुलीला तो पाहिजे म्हणून थेट लग्नासाठी विचारायला आलोय."
"पण अहो वीरचं लग्न ठरलं हाय... अन ती मुलगी म्हणजे आमची व्हनारी सुनबाई..." आबांना विजयने बोलता बोलता थांबवले.
"क्रांती चौधरी... माहीत आहे गरीब घरची मुलगी.... अहो पैसे दाखवले की होतात शांत... तुम्ही बस.." विजय बोलयचं होता.

"हे बघा विजय साहेब तुम्ही सगळी माहिती काढून आलाय मंजि तुम्ही काय साधी व्यक्ती न्हाय हे आलय लक्षात... तरीही हे शक्य न्हाय... आलाय तस दोन घास खाऊन जा... तुमच्या मुलीला समजावा... की तो कदापि तयार व्हणारे न्हाय..." आबा

"आबा अहो तुम्ही विचार करा आज जिथं तुमचा मुलगा ट्रेनिंग घेतोय ते माझं आहे. माझ्या 2 कंपन्या आहेत त्याच वाढवून मुलाने 5 उभ्या केलेत तुम्ही ही सोन्यासारखी संधी घालवू नका तुमच्या मुलाला आम्ही कुठं पोहचवू याचा विचार सुध्दा करू शकणार नाही तुम्ही." विजय
"तुमचं सगळं मान्य हाय विजय साहेब पण वीरचं क्रांतीवर अतोनात प्रेम हाय अन जरी तुम्ही जबरदस्ति केली अमिष दाखवले तरी हे शक्य न्हाय."

"आबासाहेब चुकताय तुम्ही... आमच्या पोरीला नाकारून... अहो आमची कन्या वेडी झाली त्याच्यासाठी म्हणून इथपर्यंत आलो नाहीतर या खेडेगावात पाय सुद्धा ठेवला नसता."
"व्हय न विजयराव एक काम करतो मी वीरशी बोलतो अन मग तुमास्नी कळवतो."
"आता कस बोललात... विचार करा नाही तर सोन्याची अंड देणारी कोंबडी सोडाल.." सगळे एकून स्तब्ध झाले होते. विजयच्या चेहऱ्यावर पैशांचा माज दिसत होता. त्याच बोलणं अस होत की पैशांवर सगळं विकत घेता येत अगदी मुलं सुद्धा... पण आबा कसले एकतायेत त्यांनी आता सोडलं विजयला पण पुढे त्यांनी ठरवलं होतं म्हणून... वैजत ज्या तोऱ्यात आला तसाच निघून गेला.

"आबा आता हे काय आणखी नवीन????" संग्राम
"पैशांचा माज दुसऱ काय?" आबा
"पण हे सगळं वीरला सांगायला पाहिजे."
"व्हय सांगू की घाई कसली... चला घ्या लिस्ट करायला सामानाची." आबा हसून म्हणाले.



आज ग्राऊंडवर क्रांतीला बघून साठेसर शांत होते. त्यांना समजत नव्हतं की ही कशी आली. खरंतर मार एवढा लागला होता की दुसऱ्यादिवशी उठणं अशक्य होतं कारण आज
आर्या अली नव्हती.

"आज मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. बरोबर आज सहा महिन्यानंतर इंटरनॅशनल कॉम्पिटीशन होणार आहेत त्यामुळे जे काही झालं ते विसरून या कॉम्पिटीशनची तयारी जोमाने करायला हवी.."
सगळे आनंदी झाले.जोरात येस सर म्हणाले.
सगळे प्रॅक्टीसला गेले. क्रांतीच्या दुखण्यामुळे ती हळूहळू एक्साईज करत होती. साठेसर तिच्याजवळ आले.
"क्रांती..."
"सर..." क्रांती व्यायाम करता करता थांबली.
"कालसाठी मला।माफ करा."
"अहो सर तुम्ही का माफी मागताय जीची चूक हाय तीन माफी मागायला पाहिजे."
"ह्या आतल्या गोष्टी आहेत पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो करायचे वडील या बॅटमिनटं कोर्टचे खूप मोठे ट्रस्टी आहेत. ठमुळे मला माझी नोकरी वाचवायला हे करावं लागलं. पण इथून पुढे अस नाही होणार... मी माझ्याशी खोटेपणा नाही करणार. त्यामुळे तुला त्रास झाला. अस काम जर मला करावं लागणार असेल तर हे काम मी सोडेन पण कोणाच्या दबावाखाली असे कृत्य पुन्हा करणार नाही."
"सर ठीक आहे जे झालं ते झालं... माझी स्वप्न अशी भांडण करण्यात मला घालवायची नाहीत कारण मला इंटरनॅशनलला खेळायचं हाय... त्यासाठी मी काय सुद्धा करेन..."
"येस नक्की यापुढे मी सगळ्याच्या ट्रेनिंगची वेळ वाढवणार आहे त्यामजले लवकर फिट हो..." साठेसर म्हणाले.
"सर एवढ्या मारणे काय होत न्हाय मला मी दणकट हाय..."
"हो तर पण मारायची पद्धत चुकीची असल्यामुळे तुला त्रास होतोय हे माहीत आहे म्हणूनच दोन दिवस पूर्ण अराम कर अन नंतर... जोमाने उभी रहा. "
"हो सर..." साठेसर निघून गेले.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत