Murder Weapon - 12 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 12

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 12



मर्डर वेपन

प्रकरण १२
“ मी आता अंगिरस खासनीस याला साक्षीसाठी बोलावतो.” प्रियमेध चंद्रचूड ने जाहीर केलं.
“ गेली चार वर्षं तू रायबागी एन्टरप्रायझेस मधे मॅनेजर आहेस? ” –चंद्रचूड
“ हो.”
“ युअर ऑनर,हा आमच्या विरोधातला साक्षीदार आहे,म्हणजे आरोपीशी मैत्रीपूर्ण संबंध असलेला आहे.त्यामुळे याला थोडे आक्रमक आणि सूचक प्रश्न विचारावे लागतील.” चंद्रचूड न्यायाधीशांना म्हणाला.
“ अत्ता तर तुम्ही त्याला एकच प्रश्न विचारलाय,त्यातून तो विरोध करणारा साक्षीदार आहे असं वाटत नाही.तुम्ही तुमच्या नेहेमीच्या पद्धतीने साक्ष घ्या.मला तसं काही वाटलं तर मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायला परवानगी देईन.”
“ ठीक आहे युअर ऑनर.” चंद्रचूड म्हणाला आणि नंतर खासनीस ला उद्देशून त्याने विचारलं, “ या महिन्यात मंगळवारी,५ तारखेला आरोपीला तू भेटलास का? कुठे आणि कधी?”
“ एका रेस्टॉरंट मधे, सकाळीच लौकर. नाश्ता केला एकत्र.” खासनीस म्हणाला.
“ आणि बोललास पण तिच्याशी?”
“ अर्थातच साहेब.काही न बोलता फक्त चहा पाणी करायला आम्ही बसलो नव्हतो.”
“ नीट उत्तरं दे ” –चंद्रचूड
“ मी उत्तर दिलंय तुमच्या प्रश्नाचं.”
“ त्या नंतर तू पटवर्धन यांच्या ऑफिसच्या इमारतीत गेलास?”
“ हो.”
“ आत शिरतांना तू वॉचमन कडे असलेल्या रजिस्टर वर तुझं नाव लिहून सही केलीस?”—चंद्रचूड
“ माझं नाव नाही लिहिलं, दुसरं खोटं नाव लिहिलं. ” – खासनीस
“ नंतर पाणिनी पटवर्धन यांचं ऑफिस ज्या मजल्यावर आहे तिथे गेलास? ऑफिसात प्रवेश केलास?”
“ हो.”
“ तुला आत कोणी घेतलं?”
“ तिथल्या सफाई कामगार बाईने.”
“ तिला काय सांगितलंस तू?” –चंद्रचूड
“ मला आठवत नाही.”
“ तिथून तू काहीतरी उचलून नेलंस?”
“ माझ्यावर दोषारोप केल्यासारखे होईल या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर,या कारणास्तव मी उत्तर देणार नाही.”— खासनीस
चंद्रचूड ने न्या.फडणीसकडे पाहिलं.
“ बरोबर आहे, हा साक्षीदार तुमच्या विरोधातला आहे.तुम्ही सूचक आणि आक्रमक प्रश्न विचारू शकता.” न्यायाधीश म्हणाले.
“ तू तिथून रिव्हॉल्व्हर घेऊन गेलास?”—चंद्रचूड
“ उत्तर द्यायला विरोध आहे माझा.”— खासनीस
“ त्या नंतर पटवर्धन च्या ऑफिसात,पाणिनीपटवर्धन समोरच तू तुझ्या सेक्रेटरीला,निवेदिता नंदर्गीकर ला फोन केलास?”
“ हो.”
“ काय सांगितलंस तिला?” –चंद्रचूड
“ माझ्या टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवलेली किल्ली घेऊन तिजोरी उघड त्यात एका पिशवीत सील केलेलं पाकीट दिसेल,ते घेऊन पटवर्धन यांच्या ऑफिसात ये म्हणून ”
“ मग त्यानुसार तिने केलं?” –चंद्रचूड
“ मला माहित नाही.”
“ म्हणजे? तुला माहित्ये ना की ते पाकीट घेऊन पटवर्धन यांच्या ऑफिसात आली ?”
“ ती ‘एक’ पाकीट घेऊन आली एवढ मी सांगू शकतो.”
“ म्हणजे तुला म्हणायचंय की तू पिशवीत ठेवलेलं पाकीट आणि त्यात ठेवलेली वस्तू ती घेऊन आली की नाही हे तू सांगू नाही शकत?”
“ नाही.”
“ तिने आणलेल्या पाकिटातील वस्तू म्हणजे रिव्हॉल्व्हर होतं?”
“ मी तिजोरीत ठेवलेल्या पिशवीतील पाकिटात रिव्हॉल्व्हर होतं.” खासनीस म्हणाला.
“ जे तू पटवर्धन यांच्या ऑफिसातून नेलंस?”—चंद्रचूड
“ मी उत्तर नाही देणार याचं ”
“ पण तुला हे मान्य आहे की तू तुझ्या तिजोरीत ठेवलेल्या पिशवीत जे पाकीट होतं त्यात रिव्हॉल्व्हर होतं?”
“ हो.मान्य आहे.” –अंगिरस खासनीस म्हणाला.
“ आणि तेच पाकीट तुझ्या सेक्रेटरीने पिशवीतून काढलं?”
“ माझा आक्षेप आहे.हा साक्षीदाराचा अंदाज आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मान्य आहे.” न्यायाधीश म्हणाले.
“ पण तू तुझ्या सेक्रेटरीला तिजोरीतल्या पिशवीतून ते पाकीट काढायला सांगितलंस? आणि पटवर्धन च्या ऑफिसात आणायला सांगितलंस?”—चंद्रचूड
“ हो.”
“ त्यानुसार तिने ते आणलं सुद्धा?”
“ माहित नाही.” -- खासनीस.
“ अरे तुझ्याच ताब्यात दिलं न तिने ते आणल्यावर?”
“ तिने माझ्या कडे एक पाकीट दिलं हे खरं आहे,त्या पाकिटावर मी वर्णन लिहून ठेवलं होतं,की त्यात काय आहे आणि ती वस्तू कुठून मिळाली आहे, पण ते पाकीट टोकदार ब्लेड ने कापण्यात आलं होतं त्यामुळे मला हे कळायला काही मार्ग नाहीये की कापलेल्या पाकिटातून आतली वस्तू काढून बदलली गेली असावी की नाही.” खासनीस म्हणाला.
“ तू त्यात स्मिथ कंपनीचं ३८ कॅलिबर च रिव्हॉल्व्हर ठेवल होतस,हे बरोबर आहे?”
“ होय.”
“ जे तुला पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात मिळालं?”—चंद्रचूड
“ उत्तरं द्यायला नकार देतो मी.”
“ असू दे. आपण पुन्हा तुझ्या आणि आरोपीच्या भेटीकडे वळू. मला सांग त्या भेटी नंतर तू पटवर्धन यांच्या ऑफिसात गेलास ते तुला आरोपीने काहीतरी खास सांगितलं म्हणून की नाही?”—चंद्रचूड
खासनीस जरा बिचकला.उत्तर टाळायला लागला.
“ बोल ! थांबलास का? मी म्हणतो तशीच वस्तुस्थिती आहे की नाही?”—चंद्रचूड
“ या ही प्रश्नाला उत्तर ”देणे नाकारतो मी.” खासनीस म्हणाला.
“ युअर ऑनर, तुमच्या लक्षात आलंच असेल, उत्तर न देण्याच्या, घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून महत्वाची माहिती हा आपल्यापासून दडवतो आहे.त्याच्यावर पटवर्धन यांच्या ऑफिसात चोरी केल्याचा आरोप येऊ शकतो म्हणून तो काही प्रश्नांचे उत्तर टाळतोय हे समजू शकतो मी पण त्याला आरोपीने काय सांगितलं म्हणून तो पटवर्धन यांच्या ऑफिसात आला हे सांगणे टाळण्याचे कारण नव्हतं. ”
“ यावर माझं मत ऐकून घेतलं जाईल का?” पाणिनीने विचारलं.
“ जरूर. बोला , काय म्हणायचंय?” न्यायाधीश म्हणाले.
“ रती आणि खासनीस च्या चर्चेमधून असं निष्पन्न झालं असेल की त्याने माझ्या ऑफिसात जाऊन रिव्हॉल्व्हर पळवून आणावं आणि त्या नुसार त्याने कृत्य केलं असेल तर त्याच्यावर चोरी अधिक गुन्ह्याचा कट करणे असे दोन्ही गुन्हे नोंदवले जाऊ शकतात.म्हणून त्याने तिच्याशी काय चर्चा झाली हे सांगायला नकार दिला असावा.” पाणिनी म्हणाला.
“ मुद्दा बरोबर आहे पटवर्धन तुमचा.” न्यायाधीश म्हणाले.
“ ठीक आहे मला सांग, जे रिव्हॉल्व्हर तू तुझ्या तिजोरीत ठेवलंस ते या महिन्याच्या पाच तारखेपूर्वी तू पाहिलं होतंस का?” –चंद्रचूड
“ माहित नाही.”
“ का?”
“ म्हणजे मी जे रिव्हॉल्व्हर पाहिलं होतं, ते हेच होतं का ते नाही सांगता येणार.”
“ म्हणजे हुबेहूब तसंच तू दुसरीकडे पाहिलं होतंस? ”
“ हो.”
“ कुठे?”
“ अनेक ठिकाणी साहेब. रिव्हॉल्व्हर ची उत्पादक कंपनी आपली उत्पादने त्यांच्या शो रूम मधे लावते, इतरही अनेक ठिकाणे असतात.”
“ या अनेक ठिकाणात एक ठिकाण म्हणजे एका बाईची पर्स?” –चंद्रचूड
“ हो.” जराशा नाराजीने खासनीस म्हणाला.
“ कोण आहे ही बाई?”
“ मिसेस रायबागी.”
“ आहाहा ! म्हणजे एवढ्या सगळ्या प्रश्नोत्तरातून तू शेवटी कबूल करतो आहेस की हे रिव्हॉल्व्हर तू आरोपी रतीच्या हँड बॅग मधे पाहिलंस म्हणून?”—चंद्रचूड
“ तेच रिव्हॉल्व्हर त्याने तिच्या बॅगेत पाहिलं असं साक्षीदार म्हणालेला नाही.” पाणिनीने नजरेला आणून दिलं.
“ ते, तेच रिव्हॉल्व्हर असू शकतं.त्याला माहिती आहे हे.” –चंद्रचूड
“ आणि ते दुसरे ही रिव्हॉल्व्हर असू शकतं, तुम्हाला माहित्ये हे.” पाणिनी म्हणाला.
“ खासनीस, हे रिव्हॉल्व्हर त्या बॅगेत कसं आलं या बद्दल तुला काही सांगितलं गेलं?”
“ होय.”
“ नेमकं काय?” पाणिनीने विचारलं
“ मिसेस रायबागी म्हणाली की तिच्या नवऱ्याने तिच्या संरक्षणासाठी ते तिला देऊन ठेवलं होतं आणि कायमच आपल्या बॅगेत ठेवायला सांगितलं होतं. एक काळजी म्हणून,विशेषतः ती रात्री कधी बाहेर गेली तर.”
“ दॅटस् ऑल ” प्रियमेध चंद्रचूड म्हणाला.
“ मला फक्त एक दोन प्रश्न विचारायचेत” पाणिनी म्हणाला. “ तू म्हणालास की अशी एक रिव्हॉल्व्हर तू मिसेस रायबागी च्या बॅग मधे पाहिलीस?”
“हो. ”
“ आणि ती म्हणाली की तिच्या नवऱ्याने तिला ते दिलं होतं? विशेषतः ती रात्री कधी बाहेर गेली तर जवळ असावं म्हणून.?” पाणिनीने विचारलं
“ हो.”
“ ते कायम ते स्वत:बरोबर ठेवायची की कधीतरी या बाबत तिनं तुला काही सांगितलं?” पाणिनीने विचारलं
“ नेमक्या शब्दात नाही पण ती ज्या प्रकारे बोलली त्यावरून माझा कयास आहे की कायम ठेवत असावी ते आपल्या बरोबर.”
न्यायाधीश फडणीस यांनी सरकारी वकील प्रियमेध चंद्रचूड कडे पाहिलं. “ तुम्हाला हरकत घ्यायची असेल यावर तर घेऊ शकता. हा साक्षीदाराचा अंदाज आहे म्हणून.”
“ मी पूर्ण स्वातंत्र्य देऊ इच्छितो पटवर्धन वकिलांना.” -- प्रियमेध चंद्रचूड
“ तुझं तिच्याशी जे बोलण झालं त्यावरून तुला खात्री वाटत्ये की तिला बंदूक देण्यात आली होती आणि ती तिच्या मालकीची होती?” पाणिनी ने विचारलं
“ हो ”
“ ते रिव्हॉल्व्हर तिच्याकडे होतं? आणि ते कसं वापरायचं याचं ज्ञान तिला होतं?” पाणिनीने विचारलं
“ होय सर.”—खासनीस.
पाणिनी ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला अनुकूल अशी येत आहेत या जाणीवेने चंद्रचूड खुश झाला .त्याने मान वर करून कोर्टात जमलेल्या लोकांवर नजर टाकली.
“ आणि हे सगळ बोलणं तू मिसेस रायबागी शी केलसं, त्यावरूनच तू सांगतो आहेस? ” पाणिनी ने भांबावून जात विचारलं. आणि चंद्रचूड अजूनच खुश झाला.
“ मला सांग अंगिरस खासनीस, मी जेव्हा मगाच पासून तुला विचारतोय की तुझं मिसेस रायबागी शी बोलण झालं का,तेव्हा तुला रती रायबागी असंच म्हणायचं आहे ना?” पाणिनी ने विचारलं.आता त्याच्या डोळ्यात एक चमक आली होती.
“ नाही सर, मिसेस रायबागी म्हणजे मला मैथिली म्हणायचं होतं.साहेबांची आधीची पत्नी.” अंगिरस खासनीस ने बॉम्ब टाकला.
चंद्रचूड चा चेहेरा एकदम पडला.तो पटकन उठून उभा राहिला.
“ थांबा, थांबा.” तो ओरडला. “ पाणिनी पटवर्धन आणि खासनीस यांनी मिळून ठरवलेला हा प्लान आहे,युअर ऑनर.मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यासाठी.जेव्हा तो मिसेस रायबागी असा उल्लेख करेल तेव्हा मी रती रायबागी असं समजावं मात्र प्रत्यक्षात तो मैथिली बद्दल सांगत असेल.मी कोर्टाला विनंती करतो की साक्षीचा हा संपूर्ण भाग वगळण्यात यावा, या आधारावर की ही सर्व साक्ष म्हणजे साक्षीदाराचा अंदाज आहे.”
“ चंद्रचूड,तुम्हाला हरकत घेण्याची पूर्ण संधी होती.तुम्ही घेतली नाहीत ती. हा साक्षीदार नाव न घेता फक्त मिसेस रायबागी असा उल्लेख करत होता पण त्याला मैथिली असंच म्हणायचं होतं हे कोर्टाच्या लक्षात आलं होतं. तुम्ही नीट ध्यान दिले असते तर तुम्हालाही लक्षात आलं असतं.” न्यायाधीश फडणीस म्हणाले.
“ पण हा ट्रॅप आहे.” चंद्रचूड पुटपुटला.
“ बचावाच्या वकिलांना ट्रॅप लावायला मज्जाव करणारा कायदा मला तरी माहित नाही. तुमचा आक्षेप मी अमान्य करतोय चंद्रचूड. पटवर्धन, तुमचे पुढचे प्रश्न विचारा.”
“ माझे प्रश्न संपलेत.” पाणिनी म्हणाला.
खासनिस पिंजऱ्यातून बाहेर पडायला निघाला.
“ थांबा, मला दोन तीन प्रश्न विचारायचेत जरा.” चंद्रचूड म्हणाला.
खसनिस पुन्हा थांबला.
“ मला सांगा,तुम्ही तुमची ही साक्ष पाणिनी पटवर्धन यांच्या बरोबर चर्चा करून दिली?”
“ हो.”
“ तुम्हाला अॅडव्होकेट पटवर्धन यांनी सांगितलं होतं की नाही, की तुम्हाला साक्षीत असं विचारलं जाईल की, पुराव्यात दखल करून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर सारखेच दुसरे रिव्हॉल्व्हर तुम्ही पाहिलं होतं का? ” चंद्रचूड ने विचारलं.
“ हो.”
“ आणि तुम्ही पटवर्धन ना सांगितलंत की मैथिलीकडे तसेच रिव्हॉल्व्हर पाहिलं होतं म्हणून.?”
“ हो.”
“ आणि यावर पाणिनी पटवर्धन यांनी तुम्हाला असं सांगितलं का, की असं सांगायची वेळ आली तर रती किंवा मैथिली असं नाव न घेता फक्त मिसेस रायबागी असा उल्लेख कर म्हणून?”
“ स्पष्ट शब्दात नाही पण अप्रत्यक्ष पणे.” अंगिरस म्हणाला.
चंद्रचूड ने विजयी मुद्रेने न्यायाधीशांकडे पहिले.
“ आता एकच प्रश्न, हुबेहूब तसेच रिव्हॉल्व्हर तू रती रायबागी कडे पाहिलंस? फक्त हो किंवा नाही असं उत्तरं दे.”
“ होय.”
“ तिच्या बॅग मधे होतं ते?”—चंद्रचूड
“ होय.” अंगिरस खासनीस म्हणाला.
“ दॅटस् ऑल युअर ऑनर.” चंद्रचूड म्हणाला. “ तुम्ही जाऊ शकता.”
“ एक मिनिट, खासनीस, मला एक दोन प्रश्न विचारायचेत.” पाणिनी म्हणाला. “ तू एकापेक्षा जास्त प्रसंगी तिच्या पर्स मधे रिव्हॉल्व्हर ठेवलेलं पाहिलंस?”
“ हो. नेमका दिवस नाही आठवत पण दोन वेळा पाहिलंय. ”-खासनीस म्हणाला.
“ म्हणजे तिच्या ताब्यात दोन रिव्हॉल्व्हर होत्या, एक मयत रायबागी ने खरीदलेलं, जे खुनी हत्यार नव्हतं, आणि दुसरं,खुनी हत्यार असलेलं. ” पाणिनी म्हणाला.
“ माझा आक्षेप आहे या प्रश्नाला.साक्षीदाराचा अंदाज आहे हा. त्याला हे कळायला काय मार्ग होता की दोन वेगळी रिव्हॉल्व्हर होती? जो पर्यंत त्याने दोन्ही रिव्हॉल्व्हर वरचे नंबर पहिले नाहीत?”
“ मला जे म्हणायचं होतं ते सरकारी वकिलांनी बरोब्बर सांगितलं बघा अत्ता.” पाणिनी म्हणाला. “ साक्षीदाराने रिव्हॉल्व्हर पाहिलं.त्याला माहित नव्हत की ते खुनी हत्यार होतं ,जे खुनी व्यक्तीने साक्षीदाराच्या पाकिटातल्या रिव्हॉल्व्हर चे जागी बदलून ठेवलं होतं की ते मयत रायबागी ने आरोपीच्या संरक्षणार्थ तिला दिल होतं,आणि ज्याची चोरी झाली होती.” पाणिनी म्हणाला. आणि आपली उलट तपासणी संपल्याच जाहीर केलं.
“ याला काय अर्थ आहे? अशी अर्धवट कशी काय संपवली उलट तपासणी? साक्षीदाराने उत्तर कुठे दिलंय?” चंद्रचूड म्हणाला.
“ साक्षीदार उत्तर नाही देऊ शकणार. कारण तुम्हीच हरकत घेतली आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मी मागे घेतो माझा आक्षेप.” चंद्रचूड म्हणाला.
“ उत्तर द्या मिस्टर खासनीस.” पाणिनी म्हणाला.
“ मला सांगता येणार नाही, ते खुनी हत्यार होतं की नाही.स्मिथ कंपनीची अडतीस कॅलिबर ची सगळी रिव्हॉल्व्हर सारखीच असतात.कंपनी हजारो नग उत्पादन करते.” साक्षीदार म्हणाला.
“ पटवर्धन यांनी बरोबर सुचवलंय त्यांना काय उत्तर हवं होतं,त्यामुळे साक्षीदाराने तसंच उत्तर दिलं.आता त्यांना काही विचारण्यात अर्थ राहिला नाही.” चंद्रचूड म्हणाला.
“ कोर्ट आता दुपारची जेवायची सुट्टी घेईल.” फडणीस म्हणाले आणि आपल्या खुर्चीतून उठले.
कोर्ट रिकामे झाल्यावर पाणिनीने खासनीस चा हात आपल्या हातात घेतला, तू कशाला घाबरला होतास,अंगिरस?”
“ नाही बुवा ! मी कशाला घाबरू?”
“ मी अत्ता पर्यंत बरेच साक्षीदार तपासलेत, त्यांच्या तोंडावरून मी सांगू शकतो, की घाबरलेत का आणि काही लपवत आहेत का. जेव्हा सरकारी वकील म्हणाले की माझे प्रश्न संपले,तेव्हा तुझ्या चेहेऱ्यावर एकदम सुटकेचा भाव जाणवला मला.”
“ नाही पटवर्धन, मी नव्हतो घाबरलो.”
“ ठीक आहे, तसं समजू आपण.लवकरच सत्य बाहेर येईल.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १२ समाप्त)