Mall Premyuddh - 39 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 39

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 39

मल्ल प्रेमयुद्ध

आबासाहेब शांतपणे बसले होते. त्यांच्या डोक्यावरच ओझं कमी झाल्यासारख वाटत होतं. सुलोचनाबाई आल्या.
"काय झालं ? शांत बसलात महान ईचारल.." आबासाहेब तरी शांत होते.
"काय व बोला नव्ह... दादा न्हाय ऐकलं का? उलटसुलट बोललं का?" सुलोचनाबाई
"न्हाय वो आपण लई वाईट वागलो त्यांच्याबर त्यांच्या मनातसुद्धा न्हाय अस... लोकांचं मन लै मोठं हाय...व्हय म्हणाले लग्नाला.. आता कोणतं बी विघन नक्को लवकर लवकर तयारीला लागा." तेवढयात संग्राम आले.

"आबा उसाचं दहा ट्रक गेलं साखरकारखान्याला मी चेक घिऊन येतो..." संग्राम लगबगीनं जायला निघाला.
" थांबा संग्राम ते काय बँकेचे ऑनलाईन झाले ना ते करून दिली ना मला बँकेचे पैसे माझ्या खात्यावर ऑनलाईन जमा व्हत्यात त्यामुळ आता काही कारखान्यात जायची गरज नाय. संग्राम जागच्या जागी थबकला.
" म्हणजी हे कधी केलं मला नाय ते काय बोलला."
" मला तरी कुठ माहितीये...त्याने बँकेत जाऊन करून आल्यावर मग सांगितलं मला हे सगळ आता ऑनलाईन व्हनार हाय, म्हणून पण बर आहे ना आता तुम्हाला महिन्याच्या महिन्याला जायला नको सगळं बँकेवर व्यवहार राहत्याल..." संग्राम चे डोकं गरम झाल.
संग्राम म्हणाला, "आबा मला तुमच्याशी बोलायचय, आजपासन बाकी कुठ लक्ष देण्यापेक्षा आता मी जरा शेताकड लक्ष द्यायचं म्हणतो, जरा वेगळ वेगळ प्रकार वापरून अन आधुनिक शेती करावी भूषणच्या मदतीने जरा तिकड लक्ष देतो. भूषणची शेती बघा कशी फुलासारखी दिसती,टवटवीत अगदी...

"संग्रामराव शेतापेक्षा आधी आम्हाला नातवाचे तोंड बघायचय शेती काय कामगार पण करत्यात... लक्ष ठेवायला आम्ही जातोच की, सगळं काय करणार तुमी आण भूषणच्या शेतीचा काय सांगताय, त्याच्या शेताचा एवढा तुकडा आण आपली शेती बघा किती हाय, जमणार हाय का तुमास्नी? ते सोनोग्राफीचे काय झालं? ते रिपोर्ट येणार होतं ना ? वीरच्या गडबडीत हे ईचारायच राहूनच गेलं.. रिपोर्ट आणायला गेलोच नाय आबा, आणि बाळ काय होईलचकी ? काय 24 तास मी तिच्यासोबत थांबू का? कामाचा इचार पण केला पाहिजेत आण शेती नसल तुम्हाला माझ्या ताब्यात द्यायची तर मी दुसरा कायतरी व्यवसाय बघतो. मला आता बसवत नाय आणि आता वीरच्या कुस्तीत तो स्वतःच स्वतः बघतोय, त्याच्यामुळे मी काय करायचं याचा इचार आता मला करावा लागल.
"अर कशाला काय केलं पाहिजेट काय शेतीतल पुष्कळ मिळत आपल्याला, कशाला दुसरा व्यवसाय केला पाहिजत???" आबा शांतपणे म्हणाले.
" पण आबा उद्या मुलं झालं तर असं नको म्हणायला की आमच्या बापाने आमच्यासाठी कायच केलं नाय, त्यापेक्षा मी काहीतरी व्यवसाय करतो, नायतर शेती माझ्या पद्धतीने मला करून द्या. आबा ताडकन जागेवरन उठले आण म्हणाले. पहिला दवाखान्यात जाऊन रिपोर्ट घेऊन या मग बाकीचं बघू, काय करायचं काय नाय ते."
तेवढ्यात तेजश्री तिथे आली. "आबा आमच्या दोघांचे रिपोर्ट नॉर्मल हायत, पण जवा नशिबात असल तवाच बाळ व्हईल आम्हाला जर त्यांची इच्छा हाय काय तरी करायची तर करू द्या ना, स्वतःच्या मर्जीन कायतरी करतायेत तर करू शकत्यात ना...
" सुनबाई एकीला परमिशन दिली कुस्ती खेळ म्हणून म्हणून दुसरे ने लगेच आमच्यासमोर तोंड वर करून बोलायची हिंमत दाखवली." संग्राम बोलतोय ना आमच्याबर मग तुमी कशाला बोलायला पाहिजे." संग्राम पुढे आला.
" मी बोलत नाय तुम्हाला मी सांगतोय की मला आता कायतरी करायचं हाय, अन तेजश्रीला अत्ता समजलय तिला कायच म्हाइत नव्हतं. तिला नका बोलु आबा..."

आर वा बायकोला पाठीशी घालायला जमाय लागलं की तुमास्नी... आधी घरात मूल जन्माला घाला ते महत्त्वाचं नंतर बघू आपण काय करायचं ते, तुम्हाला पैशाची कमी पडते का?" आबा रागात बोलले.
"पैशाची कमी नाय आबा पण आता माझं मला करायचय मला माझ्या पायावर उभ राहायचं हाय, बरीच वर्ष तुमच् ऐकलं तुमच्याकडून मागून पैसे घेतल, तुम्ही म्हणाल त्या मुलीबर लग्न केलं. सगळं तुमच एकलं पण आता मला माझं स्वतःचं असं करायच... कोणी मला वीरचा भाऊ म्हणून न ओळखता मला संग्राम म्हणून ओळखलं पाहिजे.
बर ह्याच्यासाठी व्हय कायतरी व्हायचंय... ठीक हाय, नाही पण दुसऱ्या व्यवसायासाठी पैसा लागत्याल त्याच काय... ?" आबा अस म्हणल्यावर संग्रामचा चेहरा पडला.
"मी नक्कीच मदत करील तुम्हाला. काय करायचय तुमास्नी इचार केलाय का?
" आबा थोडा इचार करायला वेळ द्या मग सांगतो मी तुम्हाला..."
" इचार करायला अजून वर्ष लागल, तुमचं काम न्हाय एखादी उचल खायची ते फकस्त वीर करू शकत्याल." संग्रामच्या डोळ्यात पाणी जमा झाल. आबा का अस वागत्यात माझ्याशी येगळ अन वीरशी चांगलं."आबा त्याच्या डोळ्यात बाप म्हणून खुपत होता. यात वीरची चूक नव्हती. संग्रामला कळत होतं. पण आज भाऊ म्हणून दुःख वाटत होतं की ज्याच्यासाठी मी वर्ष घालवली त्याच्यामुळे आज मला सहन करावा लागतय, बोलणं ऐकून घ्यावे लागतय. त्याला उभं करण्यात माझा हात नव्हता का?"
संग्रामच्या डोळ्यातलं पाणी तेजश्री ने बघितलं संग्राम लगोलग वरती निघून गेला. तेजश्री सुद्धा त्याच्या मागे गेली कमरेवर हात ठेवून तो विचार करत होता विचार करताना त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर कधी आलं हे त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. तेजश्री आली आणि तिच्या पाठीवर हात ठेवला, " संग्राम रडू नका माझा इश्वास हाय तुमच्यावर."संग्रामने पटकन डोळे पुसले. " नाय रडत."
"नाय संग्राम मी तुमची बायको हाय, गेले कित्येक दिवस मी तुम्हाला ओळखते तुमच्या झालेला बदल मला दिसतोय. तुम्ही आज् हिंमत करताय स्वतःच्या पायावर उभी राहायची ते करून दाखवल्या शिवाय लोक बोलायचं थांबणार नाय मग ते आबासाहेब का असेनात रडण हा उपाय नाही संग्राम तुम्हाला उभ राहाव लागल.तेजश्रीच्या अलगत मिठीत तो शिरला. हमसून रडायला लागला अगदी लहान लेकाराप्रमान... तिनसुद्धा त्याला रडून दिल त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला शांत केलं. त्याला हलकं वाटत होतं. हळुवारपणे तिच्या मिठीतुन I आला आणि म्हणाला.
"कितीतरी दिवसाच रडू साठलेले आज भायर आलं. तुमच्या मिठीत मला शांत वाटलं. मला वीरविषयी राग नाय पण आबांचा मला आता राग यायला लागलाय व्हय हाय तिला हुशार मी न्हाय म्हणत नाय पण मी फकस्त तस म्हणत्यात त्या प्रमाण मान हलवायची व्हय आयुष्यभर... आधी एकट्याला बोलत व्हते आता माझ्या बायकोच्या समोर माझा अपमान होतोय हे मला न्हाय सहन व्हत. मी वीरशी बोलणार हाय तो भाऊ म्हणून नक्की चांगला मार्ग दाखवलं मला... त्याच्यासाठी केलाय मी त्याला माहित हाय अन माझ्यावर त्याच लै प्रेम हाय. अन तेजु मला माफ कर.आयुष्यात तुला लै त्रास दिला. आता काय झालं तरी आम्ही तुमची साथ नाय सोडणार... अस न्हाय की आज तुम्ही आमच्या बाजूनं उभा राहीला म्हणून म्हणतोय.खरच मी तुमच्या प्रेमात पडायला लागलोय... तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला हेच लै हाय माझ्यासाठी" तेजश्रीला लाजल्यासारखं झालं. तिने तिची नजर खाली झुकवली. संग्रामने दरवाजा लावून घेतला आणि तेजश्रीला उचलून घेतले. तेजश्रीला त्याचा स्पर्श वेगळा वाटत होता. त्या स्पर्शाची ओढ वेगळी होती. त्यात आपुलकी, प्रेम, जवळीक, मनाची गुंतागुंत होती. संग्रामचा श्वास फुलत होता. आणि तेजश्रीचा चेहरा फुलत होता. ज्या अधिकाराने नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावं अस तिला वाटत होतं ते तिला आज मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता.
ही वेळ यासाठी योग्य नव्हती हे तेजश्रीला समजत होते पण संग्राम आज तिच्यासाठी महत्त्वाचा होता. तिनेही त्याच्या मिठीत तिला झोकून दिलं आणि.....


साठेसर आज जर सकाळपासून वेगळे वागत होते. स्ट्रिक वाटत होते. सतत क्रांतीला ती कशी चुकती ते दाखवतहोते.
"क्रांती गावाकडच्या गोष्टी तिकडेच विसरा... आता मी जे सांगेन त्याच पद्धतीने शिकलं पाहिजे. आठ दिवसात बऱ्याच गोष्टींची कल्पना दिली तुम्हाला अन रत्नाला आता नाही सांगणार ... मी जे म्हणेन तेच व्हायला पाहिजे." साठेसर सूचना देऊन गेले.
"आज फिरलंय का ग सरांचं.?" रत्ना
"न्हाय ग मला पण वाटत होतं हे नवीन टेकनिक चे जे व्यायाम हायत ते मला जड जातायत करायला. सरांनी आठ दिवस लै समजून सांगितलं ग आपल्याला पण खार सबग जमतं का आपल्याला???" क्रांती
"न्हाय ना पण वीर बघ कस पटापट शिकले सगळ, साठेसर एकदम खुश हायत न्हाय...?" रत्ना
"आग ते तालुक्याला जायचे जिममधी म्हणून त्यांना जमतंय आपण कधी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बघितलेच न्हाय तर आपल्याला जमायला जर उशीर तर लागणार ना." क्रांती म्हणाली तेवढ्यात साठेसर परत आले आणि
" आज तुमची अन आर्यांची फाईट होईल तासाभरात तयारी करा..."
"पण...?" क्रांतीचे पुढं काही ऐकायला साठेसर थांबळेसुद्धा न्हाईत.
"हे काय आता..." रत्ना
"काही नाही.. मी तयार हाय..." क्रांती

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.