Time must be observed in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | वेळ पाळायलाच हवी

Featured Books
  • My Devil Hubby Rebirth Love - 7

    अब आगे यह कह के रूद्र अपने केबिन में चला गया और रुही अपनी चे...

  • फादर्स डे - 76

    लेखक: प्रफुल शाह खण्ड 76 रविवार 17/05/2015 सूर्यकान्त ने अब...

  • Love Contract - 10

    " रिवान मितल " भाई मुझे प्यास लगी है यार , विराज रुक मैं अभी...

  • ऑफ्टर लव - 25

    शूटिंग शुरु होती है,अभय साइड में बैठ कर सब देख रहा होता है,...

  • Shyambabu And SeX - 26

    26 थकावट      श्याम अभी ड्रिंक पीने  ही वाला था कि उसे कुसम...

Categories
Share

वेळ पाळायलाच हवी

वेळ पाळायलाच हवी?

वेळ ही प्रत्येकांनी पाळायलाच हवी. जो वेळ पाहत नसेल, त्याला वर्ग ही नक्कीच कधी ना कधी धोके अवश्य देत असते. मग ती त्या माणसातील चांगल्या वाईट गुणांचा विचारही करीत नाही.
आपण भारतात राहतो. या देशाला नवरत्न खाणच म्हटलं आहे. याचं कारण आहे या देशातील लोकांत असलेला चपळपणा व या देशातील लोकांमध्ये असलेलं बुद्धीचातुर्य. तसं पाहता भारतीय लोकं वेळ काटेकोरपणे पाळतात असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच आहे. काही लोकं असेच इमानदार आहेत की जे वेळेला अतिशय महत्व देतात. परंतु आजचा काळ पाहता बरेचसे असे भारतीय आढळून येत आहेत की जे अजिबात वेळ पाहत नाहीत. त्यातच त्यांना वेळ होतो व हीच वेळ त्यांच्यावर स्वार होवून त्यांचा अपघात घडवून आणते. आज भारतात एखादं वर्तमानपत्र उघडलं की हमखास बातमी दिसते. अमूक अमूक ठिकाणी अपघात झाला. कसा झाला? त्याचं कारण असतं त्यांनी न पाळलेली वेळ. आपणही तशी वेळ पाळत नाही. कुठं जायचंच असल्यास हमखास उशिरा निघतो. मग वेळ झाला म्हणून लगबगीनं निघतो. त्यावेळेस आपल्याजवळ गाडी असेल तर आपली गाडी एवढी वेगात असते की समोरुन एखादं वाहन आलंच तर आपल्या गाडीचे अचानक ब्रेक लागत नाहीत. मग आपला अपघात होतो. त्यावेळेस आपण तो दोष आपल्या स्वतःला देत नाही. दुसऱ्यांना देतो. विचार करीत नाही की जर मी थोडा लवकर निघालो असतो, तर माझा अपघातच झाला नसता.
महत्वपुर्ण गोष्ट सांगायची झाल्यास आपण वेळ पाळलीच पाहिजे. मग तो कार्यक्रम किरकोळच का असेना, परंतु यातूनच आपल्याला वेळ पाळायची सवय पडते. आपण जर वेळ पाळत असेल तर ते पाहून तीच सवय आपल्या पाल्यांनाही लागते. म्हणूनच आपण वेळ पाळायला हवी. ती केवळ वेळच पाळू नये तर तिचं काटेकोर पालनही करायला हवं. वेळ पाळण्यासाठी दिरंगाई करु नये.
वेळ ही पाळायलाच हवी. जो वेळ पाहत नसेल तर तीच वेळ त्याला केव्हा धोके देईल व त्याच्या समोर केव्हा संकट उत्पन्न करेल ते सांगता येत नाही. म्हणतात ना की जो वेळ पाहत नाही. त्याचा कार्यभागच बुडतो. वेळेसमोर माणसाचं काहीच चालत नाही. ती नैसर्गिक बनावटीची असते. माणसं चुका करतात. कारण त्याला वेळेची किंमत कळत नाही म्हणून. ती किंमत मुळात लक्षात घेतली पाहिजे. वेळ बहुमुल्य असतो. जो वेळेची कदर करतो. ती वेळंही त्यांनाच मदत करते. जो वेळेची कदर करीत नाही. काळही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करीत नाही. कधी कधी एखाद्या वेळेस फावतं. कारण या ठिकाणी त्या मित्रमंडळींचं दैव बलवत्तर असतं. नाहीतर त्यांना ती वेळ रस्ताच दाखवत असते.
वेळ....... वेळ एवढी महत्वाची असते की वेळेसाठी प्रसंगी जेवनखावण सोडावंच लागतं. कधी वेळ झालाच तर प्रवासात वेळेवर ऑटो मिळत नाही. वेळेवर बस मिळत नाही. कधी रेल्वे निघून जाते. कधी बाहेरगावची गाडी पकडायची असल्यास आपल्याच गाडीत प्रॉब्लेम येतो कधी पंचरच होते आपली गाडी. अन् वेळ पाहून थोडे लवकर निघालो तर तिच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. ही वास्तविकताच आहे. कधी कधी ऑटो पकडण्यातही प्रॉब्लेम येत असतो. म्हणूनच वेळेला महत्त्व देवून वेळ पाळायलाच हवी. जर ऑटोत किंवा बसमध्ये दहा मिनीट जर प्रॉब्लेम आले, तर चित्र काही वेगळेच असते हे नाकारता येत नाही. कदाचीत आपल्याला कार्यक्रमात जायलाही उशीर होवू शकतो आणि वेळ जर पाळली नाही तर एखाद्या नोकरीसाठी असलेला पेपर देता येत नाही वा इंटरव्ह्यूही देता येत नाही व आपण जीवनभरासाठी कामधंद्यालाही मुकू शकतो.
विशेष सांगायचं झाल्यास वेळ जर पाळली नाही तर क्षणात मृत्यू येवू शकतो आणि क्षणातच जीवनही लाभू शकते. हेही तेवढंच खरं आहे. म्हणून काही का होईना, वेळ ही पाळायलाच हवी. तिला टाळून वा तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर आपण तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस तिही आपल्याकडे दुर्लक्ष करते आणि मग जे व्हायचं ते होते. ते पाहायलाही आपण ये धारेवर नसतो. मग बाकीची मंडळी पश्चाताप करीत असतात की त्यानं जर वेळ पाळली असती तर बरे झाले असते.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०