भारत महाशक्ती आहे?
चांद्रयान मिशन.........भारतानं अखेर चांद्रयान मिशनमध्ये सफलता मिळवलीच व यशस्वीपणानं आपलं चांद्रयान चंद्रावर उतरवलंच. दिड २३/०८/२०२३ ला भारताचे चांद्रयान तीन या यानानं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणानं पाऊल ठेवून जगाच्या इतिहासात आपलं नाव कोरलेलं आहे.
चंद्रावर जाण्याचे प्रयत्न यापुर्वी आमेरीका व रशियानं केलेले आहेत. यापुर्वी अमेरिकेनं चंद्रावर नील आम्रस्टॉंग व आल्ड्रीनला पाठवून चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
चंद्रावर रशियानं लुना २ हे यान १३ सप्टेंबर १९५९ ला पाठवून चंद्रावर जाण्याला सुरुवात केली. म्हणतात की हे यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं होतं. त्यानंतर अमेरिकेनं आपले अपोलो यान अंतराळात सोडले. यात अपोलो ११ या यानाला यश प्राप्त झालं व अमेरिकेनं १६ जुलै १९६९ मध्ये आपली तीन माणसं चंद्रावर पाठवली. ज्यात नील आर्मस्ट्राँग, कर्नल मायकल कॉलीन्स व लुना मॉड्यूलचे पायलट बझ ऑल्ड्रींग हे होते. यात चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापुर्वीच लुना मॉड्यूलचा संपर्क तुटला व कॉलीन्स हे चंद्राच्या कक्षेतच भ्रमंती करीत राहिले. पुढं त्यांना यांनाला जोडून ते यान प्रशांत महासागरात यशस्वीरित्या उतरवलं गेलं. त्यानंतर अपोलो १२ हे अंतराळयान १४ नोव्हेंबर १९६९ ला पाठवलं गेलं. ज्या यानावर वीज कोसळली. परंतु त्याचा जास्त परिणाम त्या यानावर झाला नाही व ते अभियान यशस्वी ठरलं. ज्यात कॉन रोड व ॲलन बीन्स यांचा समावेश होता व ते चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले होते. त्यानंतर अपोलो १३ ह्या यानात स्फोट झाल्यानं ते रद्द करुन अपोलो १४ हे मिशन राबविण्यात आलं. हे यान १४ जानेवारी १९७१ ला चंद्रावर गेलं. या यानात ॲलन शेफर्ड व एड् जार मिळेल होते. त्यानंतर अपोलो १५ मिशन राबविण्यात आलं. ती तारीख होती १५ जुलै १९७१. ज्यात डेव्हीड स्कॉट व जेम्स अर्विन होते. या मिशनमध्ये जेम्स अर्विन मरण पावले. त्यानंतर अपोलो १६ हे यान दि. १६ एप्रिल १९७२ ला चंद्रावर झेपावलं. ज्यात जॉन यंग व चार्ल्स ड्यूक हे होते. त्यानंतर अपोलो १७ हे यान चंद्रावर पाठवण्यात आलं. यात युजीन सर्नन व हॅरीसन श्मिट होते.
सन १९७२ पर्यंत नासानं आपल्या अपोलो मिशनद्वारे तब्बल बारा लोकांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलं. ज्यामधून ते चंद्रावर चालले. ज्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला व ज्यांनी चंद्रावरील खडक व माती आणली. ज्यात एक व्यक्ती मरण पावला. परंतु नासानं १९७२ नंतर या मिशनद्वारे यशस्वीरित्या चंद्रावर पाऊल ठेवूनही व चंद्राचा अभ्यास करुनही त्या मोहिमेला तिलांजली का दिली असावी? असा प्रश्न सर्वांना पडतो. त्याचं कारण म्हणजे अशा मोहिमांना येणारा खर्च. हा खर्च करोडो आणि अब्जोच्या घरात असतो. तसं पाहिल्यास साध्य काय होतं? तर त्याचं उत्तर काहीच नाही असंच सांगता येईल. एकट्या अपोलो मोहिमेत अमेरिकेला १९७२ पर्यंत तब्बल २० अब्ज डॉलर एवढा खर्च आला होता व तो खर्च अमेरिकन जनतेला परवडण्यासारखा नव्हता. त्यानंतर काही देशानं नक्कीच प्रयत्न करण्याचे प्रयत्न केले. परंतु तो खर्च परवडणारा नसल्यानं त्यांनी ते प्रयत्न सोडून दिले परंतु भारतानं ते प्रयत्न करण्याचं ध्येय आखलं व यातूनच चांद्रयानची निर्मीती झाली.
चांद्रयान एक दोन यशस्वी झाले नाही. चांद्रयान दोन तर चंद्राच्या कक्षेत जावून गडबडलं. परंतु भारताची निष्ठा आणि ध्येय संपलं नव्हतं. त्याच्यातच सुधारणा करुन भारतानं चांद्रयान तीन पाठवलं. जे यान दि. २३ ऑगस्टला चंद्रावर यशस्वीरित्या आणि तेही चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरलं. त्यातच भारत चंद्रावर यान उतरविणारा चवथा व चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यान उतरविणारा जगातील पहिला देश ठरला आहे. कारण चंद्राचा दक्षिण ध्रृव हा विवर अर्थात दगड व पर्वतशृंखलांनी भरलेला आहे. तेथे सपाट पृष्ठभाग नाही. सपाट भागावर कोणतीही गाडी उभी करता येते परंतु डोंगराळ भागात ती उभी करणं कठीण. ते कार्य भारतानं करुन दाखवलं. कठीणात कठीण कार्य. म्हणूनच भारत हा दक्षिण ध्रृवावर यान उतरविणारा पहिला देश ठरला आहे. हाच देश राष्ट्रीय आंतराळ दिन म्हणून घोषीत झालेला आहे.
भारत हा विद्वानांचा देश आहे. या देशात विद्वानांची काही कमी नाही. तसेच विद्वान कोणत्या गोष्टी करण्यासाठी कमी पडत नाहीत. असे असतांनाच त्यांनी चांद्रयान यशस्वी करुन दाखवलं. चक्क चंद्रावर यान उतरवलं. तेही त्या ठिकाणी की जिथं कोणत्याच देशांनी आपलं यान उतरविण्याची हिंमत केली नाही.
आता चांद्रयान मिशन पुर्ण झालं आहे. आता भारत चक्क सुर्यालाच गवसणी घालू पाहात आहे. सुर्याला गवसणी घालण्यासाठी भारतानं चक्क आदित्य एल १ हे यान तयार केलं असून कदाचीत ते यान दि. २ सप्टेंबरला उडाण भरणार आहे. ते पृथ्वीपासून पंधरा लाख किमी अंतरावर जावून सुर्याचा अभ्यास करणार आहे. याआधी अमेरिकेतील नासा या अंतराळ अभ्यास संस्थेने सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आपलं यान पाठवलं आहे आणि आता भारत त्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं यान पाठवणार आहे. या प्रकल्पाला अंदाजे ३७८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. यावरुन वाटते की भारत आज महाशक्ती बनायला चाललाय. त्याचं कारण म्हणजे या देशात असलेले विद्वान. जे विद्वान काल होते. आज आहेत आणि उद्याही राहणार. हे चांद्रयान वा आदित्य एल भारत विद्वानांची खाण आहे याचं प्रमाणक आहे.
भारत विद्वांनांची खाण आहे. परंतु याबाबत महत्वाचं सांगायचं म्हणजे आपण अभिमान बाळगावा की आपण अशा देशात राहतो. ज्या देशात विद्वानांची खाण आहे. तसा आपल्याला अभिमान आहेच. परंतु अलिकडे हा आपला अभिमान टिकेल की नाही ही शंका वाटते. कारण आपल्या देशात शिकणारे लोकं उच्चशिक्षीत झाले की ते आपल्या देशात राहात नाहीत. ते परदेशात धाव घेतात. म्हणतात की या देशात त्यांच्या बुद्धीला वाव नाही. तसा वाव विदेशात आहे. विदेशात बुद्धीला चालना तर मिळतेच. व्यतिरिक्त जास्त प्रमाणात पैसाही मिळतो. त्यांचं तसं पाहता एका अर्थानं बरोबरच आहे. म्हणूनच भारताला विनंती आहे की त्यांनी आपल्याच देशात विद्वानांचा सन्मान राखावा. त्यांना कार्यकुशलतेच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरुन ते विदेशात जाणार नाहीत. तसंच विद्वांनांनीही हे लक्षात घ्यावं की ज्या देशात त्यांनी जन्म घेतला. वाढवलं. शिक्षण दिलं. त्या देशाला त्यांनी विसरुन विदेशात तुटपुंज्या पैशासाठी जावू नये. एकंदरीत सांगायचं झाल्यास ती अतिशय शरमेची बाब आहे. आपला देश चांगला आहे. महाशक्ती बनणार आहे आणि त्याला आपल्याला महाशक्ती बनण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. ते आपले आद्य कर्तव्यही आहे. म्हणूनच भारतात राहावं. विदेशात नाही. भारताला आपलं समजावं, विदेशाला नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०