Heir to the throne in Marathi Adventure Stories by Ankush Shingade books and stories PDF | गादीचा वारस

Featured Books
  • उजाले की ओर –संस्मरण

    मनुष्य का स्वभाव है कि वह सोचता बहुत है। सोचना गलत नहीं है ल...

  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

Categories
Share

गादीचा वारस

गादीचा वारस

श्रावण मास म्हटला की मनाला फारच रंग येतो.पाऊस पडतो.तद् वतच सोनेरी किरणंही पडतात.कधीतरी इंद्रधनूही आकाशात दिसतो.त्याचबरोबर मनात एक तरलता निर्माण होते.अशीच तरलता गोरखपूर नगरीत होती.
कपिलवस्तू नावाचं ते गाव होतं.या नगरीतील राजा अंबरनाथ फारच क्रोधी होता.कोणालाही कोणतीही केव्हाही कशीही शिक्षा देण्यात त्याला धन्यता वाटत असे. आनंदही होई.
याच गावात किसन नावाचा माणूस राहात होता.तो अत्यंत दयाळू व कृपाळू होता.कधीकधी त्यांना क्रोधही येत असे.पण क्रोधावर मात करुन किसन जगत होता..त्याला एक मुलगाही होता.त्याचं नाव कुशाण होत.कुशाणही स्वभावाने प्रेमळ होता.हाच प्रेमळ स्वभाव राजाला खलत असे व राजा या किसनची वाट लावण्याचा विचार पदोपदी करीत असे.
साविन्द राजाचा मुलगा.युवराज साविन्दाला वडीलाच्या स्वभावाची चिंता होती.कारण वडीलांच्या स्वभावाची त्याला जाणीव होती.त्याचे जीवनच सध्यातरी वडीलांवर अवलंबून होते.
अंबरनाथचा स्वभाव दयाळू नव्हता.तो लहरी असल्याने तो कधीकधी प्रजेवर जुलूम करीत असे.अत्याचारही करीत असे.अशातच त्याने किसन नावाच्या एका म्हाता-या माणसाला त्रास दिला.
त्याच प्रवृत्तीच्या बाजूला एक परीराज्य होतं.तिथे रुपक नावाचा परीराजा राज्य करीत होता.त्याचं कल्याणकारी राज्य जगात वाखाणण्यासारखं होतं.
ऐन सोमवारचा दिवस होता.राजाने किसनला सभेत बोलावले होते.तसा तो तर सामान्य नागरीक.त्याला राजाचे डावपेच माहीत नव्हते.त्यामुळं किसन सढळ मतानं राजदरबारात हाजीर झाला.
सभा भरलेली होती.सर्व मंत्रीगण आपआपल्या जागेवर स्थानापन्न झाले होते.त्यातच किसनला पाहताच राजा गरजला,
''किसनराव आपण फार मोठा अपराध केलेला आहे.त्यावर मी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावीत आहे."
किसनला आपल्या कर्तृत्वावर आश्चर्य वाटलं.काय करावं सुचत नव्हतं.कारण त्यानं काहीही केलेलं नव्हतं.राजानं किसनने कोणता अपराध केला ते न सांगता थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.
"क्षमा करा मायराज,मी कायबी गुन्हा केलेला नाय.मी जर मरण पावलो तं मा कुशाणले कोण पोषन "
राजा पुन्हा संतापत म्हणाला,"झालं तुहा संबंध संपला पृथ्वीवरचा.तू आता मरायला तयार हो."
राजाचीच मर्जी ती.राजाज्ञा जणू.कोण अडवणार.किसन आज मृत्यूदंडाची शिकार झाला होता.अशाच राजाच्या लहरीपणाच्या निर्णयाचे शिकार राज्यातील बरीचशी माणसे झाली होती.
साविन्द आज युवराज झाला होता.तोही वडीलांना कधीकधी समजवायचा.पण राजा मुलाचेहा ऐकत नसे.राणीने तर सल्ला दिलेला राजाला आवडतच नसे.तशी ती अशिक्षीत होती.पण रुपवान असल्यानं राजानं तिच्याशी विवाह केला होता.
किसन मृत झाला होता.त्याचा मुलगा कुशाण दहा वर्षाचा होता.त्याला काहीही समजत नव्हते.किसनचा तो आठवा पुत्र.त्याला त्या वयात बापाचा मृत्यू कसा झाला हे कळत नव्हतं.तरीही प्रेताजवळ बसून तो रडत होता.सर्वांना प्रेताचा जाब विचारत होता.सर्वजण त्याला चुपकारत होते.
शेखर कुशाणचा मोठा भाऊ.तोही समजावत होता.पण परीस्थीतीसापेक्ष तो काही चूप बसायला तयार नव्हता.जणू किसनच्या मरणाचं दुःख त्यालाच जास्त झालं होतं.
प्रेतविधी पार पडला.तसा एक दिवस वातागून तो लहानसा बालक घराच्या बाहेर पडला.चालत चालत तो निर्जन स्थळी गेला.तेथील दृश्य रमणीय होतं.त्या बागेचं नाव तपोवन होते.
या तपोवनात माणसाचा वास नव्हता.सर्वत्र प-यांचा संचार होता.त्या वनात पोहोचताच त्या वनाचा प्रमुख रुपक नावाचा देवदूत बोलला,
"कोण आहे रे तू.तूझा परीचय काय?"
कुशाण लहान बालक असल्यानं त्याला काही समजलं नाही.तसा तो परत म्हणाला,"बेटा,तू कोण आहेस?"
त्यावरही कुशाणला काही समजलं नसल्यानं त्यानं त्या सुरुकाला सांगितले की या मुलाला घेवून जा व छडा लावा.
सुरुका या तपोवनातीलच एक परी होती.ती लहान मुलांवर जास्त प्रेम करीत होती.अत्यंत प्रेमळ व दुस-याचे हित जोपासणारी होती.रुपकच्या तोंडून निघालेले बोल तिने ऐकले.तशी ती घाबरली.पण रुपकच्या बोलण्याला तिनं प्रतिक्रिया न देता ती कुशाणला सोबत घेवून गेली.
काही दिवस असेच निघून गेले होते.तशी तीनं कुशाणला वनात गोडी लावली होती.तसेच हळूहळू त्याच्याबद्दल जाणून घेवू लागली.तसे तिला त्याबद्दल समजले.कुशाणला एकच भाऊ असून हा मुलगा अनाथ आहे.त्याच्या वडीलांना कारण न विचारता राज्याने ठार केल्याने तो अनाथ झाला आहे.
ते तपोवन तिथे कधी अंधार पडत नव्हता ना कधी काजव्यांचे लोंढे दिसायचे.रातराणीही कधी दिसायची नाही.वरचा चंद्र दिसायचा नाही.घुबडाचे घुत्कारही कधी ऐकू यायचे नाही.ना वटवाघळांचा उपद्रव तपोवनात व्हायचा.
सुरुकाने कुशाणला प्रेम दिले होते.तसं एक दिवस तिनं त्याला विचारलं,"कुशाण बाळ,सांग तू इथे कसा आलाय?"
कुशाण सांगू लागला."ताई,आमच्या राज्यात एक राजा आहे.मोठा अन्यायी राजा आहे.त्याचे नाव महाराजा अंबरसिंग आहे.एकदा या राजाने माझ्या वडीलांना दरबारात बोलावले आणि गुन्हा नसतांना मृत्यूदंड दिला.ह्याचं मला अतीव दुःख झाल्यानं मी घरुन निघून आलोय.कारण माझ्या जगण्याच्या आशा संपल्या होत्या.पण आज मला वाटते की मी त्या राजाला धडा शिकवलाच पाहिजे.कारण त्याने माझ्या वडीलांचा जगण्याचा हक्क हिरावून घेवून मला अनाथ केले आहे.
"बाळ,हा विचार तुर्तास सोडून दे.राजा तुझ्यासारख्या लहान बालकाचा विचार ऐकून घेणार नाही.त्यासाठी तुला मोठं होणं गरजेचं आहे.त्या राजाच्या बरोबरीचा माणूस बनणं आवश्यक आहे."
"पण ताई,मी मोठा झाल्यावर माझी इच्छा हरवून गेली तर......त्यासाठी आजच काय ते सांग मी काय करावं?"
"बाळ तुझी गोष्ट बरोबर आहे.या अन्यायी राजाला धडा शिकवला नाही तर हा राजा निष्पाप लोकांना मारतच राहील.म्हणून तुझं म्हणणं बरोबर आहे.म्हणून मी जसं सांगतो तसं करणार काय?"
कुशाणचा भाऊ कुशाणला शोधत होता.तो स्मशानातही शोधत होता.स्मशानाकडे तो जेव्हा गेला,तिथे एक दगड ठेवला होता.बाजूला दोन तीन फुलांचे हार होते.त्या हाराकडे पाहताच त्याला त्याचा भविष्यकाळ आठवू लागला.ती बाबांची देहप्रदान मुर्ती दिसत होती.साठी ओलांडलेली ते बाबा.पण त्या वयातही त्याच्या चेह-यावर प्रचंड तेज झळकत होते.परंतू पुन्हा ते दृश्य सौंदर्य नष्ट झालं होतं.
ती काळोखी रात्र जास्त काळोखी झाली होती.अंधा-या रात्री ज्याप्रमाणे विंचू किंवा एखाद्या ठिकाणी सापाची पिलावळ दिसावी,तशी पिलावळ त्या स्मशानात शेखरला दिसत होती.एकीकडे वाटत होतं की त्याने मागील जन्मी पाप केले असावे.म्हणून हे भोग आले असावे.तर दुसरीकडे वाटत होतं की आपण काही पुण्य केले असावे,जेणेकरून आपल्याला सत्य बोलणारा बाप मिळाला,ज्यांची राज्याने सत्वत्वीच्या द्वेषाने हत्या केलेली आहे.
कसाबसा त्याच्या डोळ्यासमोरुन त्या काळोख्या रात्रीचा एक एक क्षण पुढे सरकत होता व तो प्रत्येक क्षणाला चिंतीत होत होता.अशातच पहाट झाली.
दररोज ती पहाट सोन्याची उजळत असे.पण आज सगळीकडे तांबडे फुटले होते.तरीही त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटायला लागले.कारण त्याचा जीवच मुळी कासावीस वाटत होता.या स्मशानी वातावरणात उजळलेली पहाट.चिमण्या चिवचिव करायला लागल्या होत्या.पाखराची किलबिल सुरु झाली होती.
रात्रभर त्या स्मशानात कुशाणला शोधायला आलेला शेखर त्याला भीतीही वाटली नाही.त्याच्या बाबांच्या राखेजवळ बसतांना त्याचा जीवही घाबरला नाही.तशी सकाळ झाली.तसा शेखर भानावर आला.आपण रात्रभर स्मशानात होतो याचं त्याला आश्चर्य वाटलं.तसा तो उठला व घराची वाट चालू लागला.क्षणातच घर आलं.पण चालता चालता त्याच्याही मनात बदला खदखदत होता.आपल्याच मनात राजाला शिव्याशाप देत तो रस्ता चालत होता.
स्मशानातील रात्रीच्या आठवणी पुन्हा मनात घर करुन होत्या.ते दोन तीन फुलांचे हार ते प्रेत सारं त्याला आठवत होतं.कुशाण तर तिथं मिळाला नाही.पण त्याच्या मनात कुशाणबद्दल प्रश्न चिन्ह उभं ठाकलं.कुशाण कुठे गेला असेल?याचं भय त्याला किंचीत सतावू लागलं होतं.बरेच दिवस निघून गेले होते.
कुशाण मात्र परीराज्यात सुखात होता.तसा तो सुरुकाजवळ राजाला धडा शिकविण्याचं बोललाच होता.तसं त्याला राज्याला धडा शिकविण्यासाठी परत यायचं होतं.त्यासाठी तो सुरुकाला म्हणाला,
"परीताई,मला आता परत जायचं आहे.कपिलवस्तूत."
"ठीक आहे बाळ."परीताई सुरुका म्हणाली.तशी ती आकाशमार्गे कुशाणला घेवून निघाली कपिलवस्तूकडे.तिने एका सुंदर स्रीचे रुप धारण केले व शोधत शोधत ती शेखरजवळ आली.तसं शेखरनं कुशाणला पाहिलं.तसं त्यानं ओळखलं.कुशाणला जवळ घेत शेखर म्हणाला,
"आपण कोण आहात?"
"मी.......मी सुरुका."
"कुठे राहता?"
"मी परीराज्यात."
"तुम्हीच शेखर आहात ना."
"होय आणि हा माझा भाऊ आहे."
"होय माहीत आहे मला."
तसा शेखर चूप बसला.तशी शेखरला परीताई म्हणाली,
"शेखर,मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या बा च्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे..त्यासाठी मी कुशाणला सर्वतोपरी तयार केले आहे."असे म्हणत ती अंतर्धान पावली.कुशाण मात्र भावाबरोबर राहू लागला बदल्याची भावना मनात ठेवून.
राजा अंबरनाथ हा जुने दिवस विसरला होता.तो कुठूनतरी त्या राज्यात आला होता.त्याला मायबाप नव्हतेच.नाही पिताही.असा तो अनाथ होता.म्हणून लोकांनाही परीवार नसावा असं त्याला वाटायचं.लोकांचा हसता खेलता परीवार, त्याला त्याचा राग येत असे.राजालाही मुलगा नसल्याने राजाने त्यालाच वाढवले.लहानाचे मोठे केले.मोठे झाल्यावर दवंडी दिली की हाच मुलगा माझ्या वंशाचा चालक ठरेल.
राजाचा मानसपुत्र.लहानपणापासून तो उथळ स्वभावाचा.पण राज्याचा मुलगा आहे म्हणून लोकं त्याला काही म्हणत नव्हते.आपला मुलगा काय करतोय याची राजाला काही कल्पना नव्हती.पुढे वयात आल्यावर त्याचा विवाह सुद्धा झाला.
एक दिवस अंबरनाथ आपल्या लालबागेत बसला असताना त्याला एक चिठ्ठी मिळाली.त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं."हे माझ्या प्रियश्वरा,मी तुमचीच वाट पाहातो आहे.तुमच्यावर मला माझा जीव ओवाळून टाकावासा वाटतो.पण काय करु,तुम्ही राजाची पोरं अन् आम्ही.......आम्ही,जावू द्या ते.तुम्ही माझा पत्नी म्हणून स्विकार कराल का ते सांगा.तुम्ही जर माझा पत्नी म्हणून स्विकार करत असाल,तर मी तुम्हाला भेटायला तयार आहे."
युवराज अंबरनाथला वाटलं की ही चिठ्ठी सोडणारी मुलगी कोण असेल.त्या चिठ्ठीवर बरंच काही लिहिलेलं होतं तसा आवंढा गिळला व पुन्हा तो चिठ्ठीकडे मान वळवून चिठ्ठी वाचायला लागला.
"हे प्रियश्वरा,तू या हिरवळीच्या रुक्ष जागेत काय करतोस?या हिरवळीत तुझा दम तुटेल.जरा तू पूर्वेला पाच मैल जा.तिथे तू डोळे मिटून माझे ध्यान कर.मी सापडेल तुला."
युवराज लालबागेतून घरी गेला.म्हणाला,"पिताजी,या लालबागेत माझा दम घुटतोय.जरा मी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय.करीता मी शिकारीनिमित्य उद्या जंगलात जाणार आहे.आपण तेवढी परवानगी द्यावी."
राजाने आपल्या मुलाला जंगलात जावून शिकार करण्याची परवानगी दिली होती.राणीने सांगितल्याप्रमाणे राजाने अंबरनाथाला जंगलात शिकार करण्यासाठी जावू दिले.राजा आपल्या राणीचं ऐकत असे.त्यामुळे तिनं सांगितलेली कृती राजानं केली.
अंबर जंगलात फार दूर गेला नाही,तोच त्याला तहान लागली.तो एका विहिरीजवळ थांबला.तिथे पाणी प्यायलावर त्याने थोडा विश्राम केला.तसेच आपल्या चिठ्ठीतील नायीकेचे स्मरण केले.त्याने जसे नायीकेचे स्मरण केले.तोच नायीका त्याच्यासमोर हजर झाली.
त्या नायीकेचे नाव सपनावती होते.ती नायीका एका झोपडीत राहात होती.ती स्वभावाने चांगली होती.तसेच पाहायलाही सुरेख होती.अंबरनाथने जसे डोळे उघडले.त्याने आपल्या पुढ्यात सपनावतीला पाहताच तो तिच्यावर मोहीत झाला.
अशातच कुठूनतरी आवाज आला.'सपना$$ सपना$$'
तसा तिनं आवाज ओळखला व ती त्या युवराजाला म्हणाली,"महाराज,आपण कोण आहात?इथे कशाला आलात?"
अंबरनाथने आपली सगळी हकीकत सांगितली व तो म्हणाला,
"तुम्ही कोण?"
"मी सपना.सपनावती म्हणतात मला.मी आजीसोबत एका लहानशा झोपडीत राहाते.चला माझ्या झोपडीत.आपण तिथे बोलू."
युवराजाला आश्चर्य वाटलं.मी अनोळखी अन् ही मुलगी माझ्यासारख्या अनोळखी माणसाला आपल्या झोपडीत नेवू इच्छीते.पण आपण बोलल्यास तिला राग येईल याचा विचार करुन युवराजाने होकार दिला व तो सपनावतीसोबत तिच्या झोपडीत गेला.
ती झोपडी होती.पण युवराजाला ती झोपडी त्या महालापरस मोठी उल्हासीत वाटत होती.कारण तिथे ती सपना होती.जिच्यावर तो मोहीत झाला होता.झोपडीत गेल्यावर ब-याच गोष्टी झाल्या.तसे अवकाश साधून पहिल्या भेटीतच त्याने तिला विचारले.
"अगं,तू माझ्याशी लग्न करशील?"
तिने होकार दिला.तसे राजाने पहिल्याच भेटीत गंधर्वविवाह करुन तिला आपल्या राजधानीत आणले.
त्याचे वडील खुप निराश झाले होते.त्यांना पुत्राने त्यांना विवाहाचे न विचारल्याने दुःख झाले होते.पण आता उपाय नव्हता.नाईलाजानं त्या गोष्टीचा स्विकार करावाच लागला.
सपना आपल्या सासुसास-याच्या पाया पडली.त्याचबरोबर ती नववधू त्यांना स्विकारही झाली.
सपनाची आजी झोपडी सोडायला तयार नव्हती.तिला त्या राजवाड्यापेक्षा झोपडीच जास्त आवडत होती.एरवी ती लहानाची म्हातारी या झोपडीतच झाली होती.
काही दिवस गेले.तसे सपनावती गरोदर राहिली.तिला पुत्र झाला.त्याचं नाव ठेवलं साविन्द.त्याचं लहानपणी घरात खुप लाड होत असे.काही दिवसानंतर राजा आपल्या वयोमानानुसार कार्य करेनासा झाला व त्याने आपली राजगादी अंबरनाथला सोपवली व राणीसमवेत तो जंगलात राहायला निघून गेला.
राजा अंबरनाथ.........लहानपणापासूनच वात्रट स्वभावाचा.त्यामुळं राजा बनल्यावरही त्याचा स्वभाव बदलला नाही.त्या वात्रट स्वभावात अजून भर पडली.तो स्वभाव बदलला नाही.
सुरुका व रुपकचे प्रेम होते.सुरुकाला रुपकने मागणी घातल्यानंतर सुरुकाने होकार देताच त्यांचं परीराज्यात लग्न झालं.ती तशी परीराज्याची राणी बनली होती.कारण रुपक हा आधीपासूनच परीराज्य सांभाळत होता.
सुरुकाला वाटायचं की कुशाणला न्याय मिळायला पाहिजे.तसे प्रयत्न तिने सुरु केले होते.कुशाणला माहीत न करता तिने स्वतःच त्या नगरातील काही लोकांची भेट घेतलेली होती.जे जे अंबरनाथच्या अत्याचाराचे बळी झाले होते.त्यांना एकत्र करणेही सुरु केले होते.मात्र वारा येते आणि पान पडते याप्रमाणे या सुरुकाबद्दल अंबरनाथला माहीत झाले व तो आपल्या प्रधानाला म्हणाला,"प्रधानजी,ही सुरुका कोण आहे?तिला पकडून आमच्यासमोर जीवंत वा मृत हाजीर करा."
राजा अंबरनाथचा आदेश तो.सैनिकांनी प्रधानाने सांगितल्यावर सुरुकाला पकडले.तिला राज्यासमोर हाजीर केले.तसं अंबरनाथनं विचारलं,
"कोण तुम्ही आणि आमच्या राज्यातील लोकांना का भडकवताय?"
"मी सुरुका.परीराज्यातील महाराणी.आपल्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी मी लढतेय.आपण आपले अन्याय करणे सोडून द्या.आपले कित्येक शरणार्थी आमच्या राज्यात येवून आम्हाला विनंती करतात.आमच्याच राज्यात आश्रय मागतात.आम्ही कोणाकोणाला आश्रय द्यायचा.सांगा तुम्हीच सांगा.परीराज्य हे मानववस्तीसाठी नाही."
"कोणी कोणी आश्रय मागीतला.मला नावासह सांगा.मी एकाएकाचे मुंडके उडवतो."
"पण मला सांगा आपण असा लोकांवर अन्याय का करता?"
"आपल्याला जास्त प्रश्न विचारायची गरज नाही.हे तुमचं परीराज्य नाही.हे आमचं राज्य आहे.तुम्ही आमचे बंदी आहात." राजा म्हणाला.तसा त्यानं सैनिकांना आदेश दिला की बाजूच्या परीराज्यात खबर पाठवावी की त्यांची महाराणी अंबरनाथाच्या ताब्यात आहे.
परी सुरुकाला कैदेत टाकण्यात आलं.त्याचबरोबर दुतांकरवी निरोप पाठविण्यात आला.तसं रुपकाला माहीत होताच तो भयंकर चिडला व परी सुरुकाला सोडविण्यासाठी योजना आखू लागला.
परीराज्याचा प्रमुख असलेल्या रुपकाने योजना आखली.योजनेतंर्गत रुपकाने आपल्या राणीला सोडविण्यासाठी कपिलवस्तूवर आक्रमण केले.त्या आक्रमणाने कपिलवस्तू हादरलं.राजा अंबरनाथला कैद करण्यात आलं.परीराणी सुरुकाला सोडविण्यात आलं.त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.त्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना त्याला आता भूतकाळ आठवत होता.आता उरला प्रश्न गादीचा वारस.कपिलवस्तू नगरी खालसा झाली होती.त्यामुळे तिथे राजा बसविणे आवश्यक होते.
कुकूच...कू कुकूच...कू कोंबड्याने साद दिली होती.कोकीळेचाही कुहू कुहू आवाज येत होता.चिमण्याही चिवचिव ओरडत होत्या.तरीही रात्रीचे दोन प्रहर शिल्लक होते.तशी सुरुकाला झोप येत नव्हती.नियमाप्रमाणे लोकं साविन्दाला राजगादीचा वारस करु पाहात होते.तसं सुरुकानं गाढ झोपेत असलेल्या रुपकला उठवलं,म्हणाली,
"महाराज,आपण अंबरनाथचा मुलगा साविन्दला गादीवर बसवायचं.त्याला राज्याचा अनुभवही आहे."
झोपेतून उद्विग्नतेने उठलेला रुपक.त्याने सुरुकाच्या मताचं अनुमोदन केलं.तसं साविन्दाला राजा बनविण्याचं तय झालं.
दुसरा दिवस उजळला.राजा रुपकानं साविन्दला परीराज्यात बोलावलं.त्याला राजा बनण्याविषयीची इच्छा विचारली.तेव्हा साविन्द म्हणाला,
"हे बघा.आपण कोणालाही राजा बनवा.मला राजा बनवू नका.याचं कारणही तसंच.मी अंबरनाथचा मुलगा.जर पुढे चालून माझा स्वभाव बदलून वंशावर गेला तर......खरंच मी प्रजेला न्याय देवू शकणार नाही.माझ्या राज्यात अंदाधूंद निर्माण होईल.माझ्या हातून विनाकारण पाप होतील.तसेच लोकांनाही याबद्दल विचारावे.त्यासाठी सभा भरवून सभेत निर्णय घेण्यात यावा."
साविन्दाची कल्पना रुपकाला पटली.त्याने राज्यात दवंडी पिटवली की राजकुमार साविन्दाला राजा बनवायचे आहे.सर्वांनी प्रतिक्रिया द्याव्यात.त्यासाठी सभा भरविण्यात येईल.
ठरल्याप्रमाणे सभा भरविण्यात आली.लोकांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या.लोकांनी प्रतिसाद दिला.सर्व लोकांनी आनंद व्यक्त केला.पण त्यातून एक प्रतिक्रिया आली.जर राजकुमार साविन्द वंशावर गेला तर......आणि त्याने हुकूमशहा बनून लोकांवर अन्याय अत्याचार केला तर.......वंशपरंपरा तुटायला हवी."
होते नव्हते तेच झाले.जी शंका राजकूमार साविन्दने व्यक्त केली होती.ती शंका खरी निघाली.एक प्रतिक्रिया का होईना.ती शंभर प्रतिक्रियेच्या बरोबर होती.रुपक सुरुकासह राजकुमार साविन्दही विचारात पडला.कारण राजकूमार हा आपल्या पित्याच्या स्वभावाचा नव्हता.तो वेगळ्याच स्वभावाचा होता.तसा साविन्द म्हणाला,
"हे बघा,मला राजा बनण्यात सारस्य नाही.आपणच आपला प्रतिनिधी निवडा.आपल्याला ज्याला राजा बनवायचे आहे.त्याला राजा बनवा.मीही त्याचे स्वागतच करील.त्यासाठी आपण स्वतः पुढे यावे."
राजा बनणे हे काही साधे सोपे काम नव्हते.लोकं फक्त सल्ले देवू शकतात.कार्य करु शकत नाहीत.बराच वेळ झाला होता.कोणी पुढे येत नाही.ते पाहून तसा कुशाण पुढे आला व म्हणाला,
"कोणी जर राजा बनत नसेल तर मला राजा बनवलेले हरकत नाही.मी आश्वासन देतो की मी शक्य ते निर्णय प्रजेच्या हिताचे घेवून या राज्याचे सुराज्य करण्याचा प्रयत्न करीन."
क्षणाचाही विचार न करता राजकुमार साविन्द म्हणाला,
"ठीक आहे.कुशाण म्हणतो ते बरोबर आहे.मी सहमत आहे या गोष्टीवर.आपणही सहमत असावे.म्हणा महाराज कुशाणजीकी जय."
आता राजकूमारच या गोष्टीला तयार आहे असा विचार करुन लोकांनीही कुशाणला पाठींबा दिला.त्यावेळी सुरुका व रुपकही हजर होते.
कुशाणला राजा बनवण्याचे ठरविण्यात आले.राज्याभिषेक समारंभ ठरविण्यात आला,त्यानुसार राज्याभिषेक समारंभाच्या दिवशी साविन्दही हजर होता.मंगलस्नान करण्यात आले.सर्वविधीही करण्यात आला.त्यानुसार संपुर्ण विधी पार पडताच साविन्दाने स्वतः कुशाणच्या डोक्यात राजमुकूट घातला.त्याचबरोबर राजतिलकही........लोकांनी जयजयकार केला.कुशाण महाराज की जय,कुशाण महाराज की जय.
कुशाण कपिलवस्तूचा राजा बनला.त्याने कल्याणकारी राज्य केले.प्रजेच्या हिताचे बरेच निर्णय घेतले.कुशाणला पद देणारा पदाचा मालक साविन्द आज कुशाणची चाकरी करु लागला.पण त्याला किंचीतही वाईट वाटत नव्हते.शिवाय कुशाणनेही साविन्दाला नोकर समजले नाही.त्याला सन्मानानेच वागवले.त्याच्या इच्छा आकांक्षेचे स्वागतच केले.त्याला दुजाभाव दिला नाही.जेव्हा जेव्हा एखादी अडचण निर्माण होई,तेव्हा तेव्हा साविन्दाला कुशाण सल्ला विचारत असे.साविन्दही आडेमोड न घेता कुशाणला राज्यकारभारात मदत करीत असे.तसेच वेळप्रसंगी सुरुका व रुपकचाही सल्ला घेत असे.कारण हे सर्व रुपक व सुरुकाच्याच प्रयत्नातून साकार झालं होतं.

अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०
©®©