vulgarity of beauty in Marathi Women Focused by Gajendra Kudmate books and stories PDF | सुन्दरता की अश्लीलता

Featured Books
Categories
Share

सुन्दरता की अश्लीलता

नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा तुमचापुढे आलेलो आहे आणखी एक विषय घेऊन, तो विषय आहे सुंदरता. सुंदरते बद्दल मी काहीच जास्ती बोलणार नाही फक्त आणि फक्त मुख्य मुद्द्यावर बोलणार. परंतु माझा मुद्द्याला पटवून देण्यासाठी मला काही प्रमाणात सुंदरते बद्दल बोलावेच लागेल. तर चला मी आपला मुद्दा तुमचापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

तर मित्रांनो, सुंदरता आपल्या सर्वाना माहित आहे. या सृष्टीबरोबर सृष्टीवरील जेवढी ही सजीव आणि निर्जीव प्रजाती म्हणा कि वस्तू म्हणा या सर्वच सुंदर आहेत, फक्त आणि फक्त तिचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि अर्थातच आपली नजर तशी सुंदर आणि निर्मळ असायला पाहिजे. सुंदरता ही पुष्कळशा म्हणजे सगळ्याच वस्तू, भावना, आचार, विचार, मन, आत्मा, शरीर वगैरे वगैरे या सगळ्यात असते आणि १०० % आहेच. तर मी या सगळ्यांबद्दल बोलायला गेलो तर हा लेख नव्हे तर कादंबरी होऊन जाईल. तर मी बोलणार आहे शरीर या बद्दल. वरील म्हण्याप्रमाणे या सृष्टीत प्रत्येक सजीव प्राण्याचा प्रजातीला ईश्वराने शरीर प्रदान केलेले आहे. त्यात मुख्यतः आणि फक्त मी मानवी शरीराबद्दल बोलणार आहे.

तर मित्रांनो, मनुष्य म्हटला कि तो ईश्वराचा उत्तम अशा सुंदर कलाकृतीचा नमुना आहे. त्याला बनविण्यासाठी ईश्वराला जेवढ्या सुंदर गोष्टी करावयाचा असतील त्या सगळ्या त्याने या शरीरात केल्या, त्यात्तील एक आहे सुंदरता. मानवी शरीरात एक एक अवयव हे सुंदर रित्या बनविलेले आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरच सुंदर बनलेले आहे. तर या मनुष्य प्रजातीत दोन प्रजाती आहेत, एक नर आणि दुसरी नारी म्हणजेच एक पुरुष आणि एक स्त्री. या दोघात ईश्वराने स्त्रीला अधिक सुंदर बनविले आहे. असे नाही कि पुरुष सुंदर नसतो, पुरुषही सुंदर असतो परंतु स्त्रीचा तुलनेत कमी असतो. ईश्वराने स्त्रीला बनवितांना तिचा शरीरातील एक एक अंग हा आकर्षक आणि मादक असा बनवलेले आहेत. आपण सर्व जाणतो मनुष्य जेंव्हा जन्म घेतो तेंव्हा तो संपूर्णतः नग्न असतो. त्यावेळेस जे सुंदर शरीर बाहेर येते ते फारच सुंदर असते, असे नाही कि नंतर ते कुरूप होते, ते संपूर्ण आयुष्यभर सुंदरच रहाते. फक्त आणि फक्त त्याचाकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आणि नजर ज्याचे शरीर आहे त्याचा आणि त्या शरीराकडे बघणार्याचा हा निर्मळ आणि सुंदर असायला हवा.

तर मित्रहो, मी बोलत होतो मानवी शरीराबद्दल तर पुरुष आणि स्त्री दोघांनाही चेहरा ईश्वराने दिलेला आहे, जो सगळ्यांना दिसतो. त्यावरून त्या स्त्री आणि पुरुषाची ओळख पटते. यात मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो शालीनता आणि लाज लज्जा याची. ही पुरुषाची मानसिकता आहे कि त्यावर लावलेला ठप्पा आहे मला हे माहित नाही परंतु सगळे म्हणतात पुरुष हा निर्लज्ज असतो. हे कथन काही पटीने खरे सुद्धा आहे. ईश्वराने स्त्री आणि पुरुष या दोघांना ही अवयव दिलेले आहेत ते आहेत, शालीनतेचे. स्त्रीमध्ये दोन अवयव आहेत ते म्हणजे तिचे स्तन आणि योनी आणि पुरुषात मात्र लिंग हा शालीनतेचा अवयव आहे. वर म्हटल्याप्रमाणे पुरुष कितीही निर्लज्ज असला तरी त्याचा लिंग हा सर्वथा झाकलेला असतो. पुरुष जेंव्हा जन्माला येतो आणि त्या पुरुषाचा बालपणाचा काळात कुणीही त्याचा लिंग बघू शकतो. परंतु तो मोठा झाल्यावर कुणीही सहसा बघू शकत नाही फक्त आणि फक्त त्याचा जीवनसंगिनी शिवाय. तिलाच त्या पुरुषाला नग्न बघण्याची परवानगी असते. त्याचप्रमाणे स्त्रीसुद्धा लहान असतांना तिचे जननांग सगळ्यांना दिसते परंतु ती तरुण झाल्यावर तिचे स्तन आणि जननांग कुणालाच दिसत नाही. कारण कि तो तिचा शालीनतेचे अवयव आहेत, सार्वजनिक नाहीत जे कुणालाही दिसतील, ते फक्त आणि फक्त लग्नानंतर तिचा पतीला दिसते किंवा तो बघू शकतो.

आपण सर्वच जाणतो कि आपली भारतीय संस्कृती आहे पाश्चात्य नाही. आपल्या भारत देशात लाज, लज्जा आणि शालीनतेला सगळ्यात पहिले प्रधान्यता दिली जाते. आपला भारत देश हा सगळ्याच प्रकारचा लोकांनी परिपूर्ण आहे. आपल्या देशात सगळ्यात गरीब लोकांपासून तर सगळ्यात श्रीमंत म्हणजे अरबोपती लोकं आहेत. त्यात जे सगळ्यात गरीब म्हणजे जंगलात राहणारे लोकं त्यांना आदिवासी म्हणतात. तर हे आदिवासी म्हणजे एक प्रकारचे आपले पूर्वजच म्हटले जातील. त्या बिचाऱ्यांकडे राहायला घर नाही, खाण्यास काहीही खातात, तर घालण्यासाठी कापड तरी कुठून येणार. त्या घनदाट जंगलात ते सर्वथा निर्वस्त्र म्हणजे नग्न असतात. त्यांचात लहान बाळापासून ते तरुण, तरुणी आणि तरुणांपासून तर वृद्ध ते सगळेच नग्न असतात. परंतु त्यांचात शालीनता असते. आज आपण जेथे वास्तवाला आहोत तेथे आपल्या घरात किंवा आसपास लहान म्हणा कि तरुण मुला मुलींसमोर आईवडील नग्न राहू शकत नाही. भले ही मुले आणि मुली ते ही फक्त लहान असतांना आईवडिलांसमोर नग्न राहू शकतात. परंतु त्या आदिवासी लोकांत लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळेच नग्न राहतात. एकाच परिवारातील मुलगी बापाचा समोर तर मुलगा आईसमोर नग्न रहातो. याउलट आई आपल्या तरुण मुलांसमोर तर बाप आपल्या तरुण मुलींसमोर नग्न रहातो. त्यांचात शालीनता ही कुटून कुटून भरलेली असते. निर्वस्त्र रहाणे हा त्यांचा जीवनातील एक भाग असतो. वर मी म्हटल्याप्रमाणे पुरुष हा सर्वथा आपला लिंग इतरांपासून आणि आपल्या परिवारातील सदस्यांपासून लपवून ठेवतो. तर स्त्री ही तिचे जणनांग हे सगळ्यांपासून लपविते पाला पाचोडा लावून. परंतु तिचे स्तन हे सर्वथा उघडेच असतात. ती त्यांना कुणाच पासुन लपवण्याचा प्रयत्न करत नाही.

अशा नग्न आदिवासी तरुण मुलीला किंवा स्त्रीला बघतांना जर तुमचा दृष्टीकोनात सुंदरता आणि निर्मळपणा पाण्याप्रमाणे असेल तर ती स्त्री किंवा ती तरुण मुलगी तुम्हाला सर्वथा सुंदरच दिसेल आणि जर तुमचा मनात आणि नजरेत पाप आणि मळ असेल तर तुम्हाला त्या स्त्री आणि मुलीचा नग्न शरीरात वासनाच वासना दिसेल. तुम्हाला त्या वेळेस फक्त आणि फक्त त्यांचे ते टवटवीत नग्न शरीर दिसेल आणि तुम्ही वासनेचा आहारी ज्याल. परंतु त्यात सुंदरता ही ठासून ठासून भरलेली आहे हे तुम्हाला कधीच दिसणार नाही. तुम्हाला ती उपभोगण्याची वस्तू मात्र वाटेल आणि तुम्ही तिचा उपभोग करण्याचा प्रयत्न कराल.

ही तर झाली त्या आदिवासी लोकांची गोष्ट परंतु आपल्या अवतीभवती वावरतानाही पुष्कळ असे लोकं आहेत ते काही आदिवास्यांप्रमाणेच परंतु गरीब आहेत. त्यांचाकडे कपडे असतात शरीर झाकण्यासाठी परंतु ते ही अत्य अल्प अशा अवस्थेत. त्यांचा स्त्रिया साडी तर घालतात परंतु ब्लाउज नाही घालत. तेथे ही तीच कहाणी असते. ती अर्धवस्त्र स्त्री किंवा मुलगी किती सुंदर दिसते हे फक्त आणि फक्त निर्मळ नजरेने बघितल्यास कळते. वासनेने हापापलेल्या नजरेने तर लोकांना सर्वथा ती स्त्री किंवा ती मुलगी ही नग्नच दिसते. तिने ती अर्धवट साडी घातलेली आहे ती ही त्यांना दिसत नाही, त्यांना दिसतात ते साडी खाली दडलेले तिचे न दिसणारे स्तन. याप्रमाणे रहाणे हा त्यांचा मजबुरीचा भाग असतो, त्यामुळे त्यांना तसे रहावे लागते. माझा नजरेत ही तर मनमोहक अशी सुंदरता आहे. कारण कि ती स्त्री अर्ध नग्न अवस्थेत आहे म्हणून काय तीला सुंदर म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. तिचा त्या निखळ सुंदरतेला खरी सुंदरता म्हटली जाईल अश्लीलता नव्हे.

ही तर झाली गरिबांची गोष्ट तसेच आपल्या देशात करोडपती आणि अरबपती लोकं पण आहेत. जे कुणालाही काहीही ऐका क्षणात खरेदी करू शकतात. तर त्यांचा घरातील स्त्री आणि तरुण मुलींचे काय? एक गरीब घरातील मुलगी किंवा स्त्री आपले शरीर लपवण्यासाठी ठिगळ लावून आपले शरीर लपवण्याचा प्रयत्न करते. तेच ती श्रीमंताची स्त्री किंवा मुलगी फॅशनचा नावावर अर्धवट बनलेले किंवा फाटके कपडे घालते, ब्रा आणि चड्डीवर सार्वजनिक स्थळी जाते. काय म्हणाल याला सुंदरता कि अश्लीलता. मी तर सर्वथा अश्लीलता म्हणेल तुमचं मला माहित नाही. आपल्या भारतीय परिधान आहे साडी आणि ब्लाउज या पहराव्यात कुठलीही भारतीय म्हणा कि बाहेर देशातील गोरी स्त्री ती कुठल्याही देशातील असोत ती फारच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्या अर्धनग्न साडीमधील किंवा ठिगळ लावलेल्या तरुणीला का बर सुंदर म्हणणार नाही. आपल्याकडे आणि आपल्या बापाकडे अतोनात पैसा असून सुद्धा लोकांना शरीर दिसेल असे कपडे घालणाऱ्या स्त्रियांना मुलींना बघून काय नजरेला सुंदरता वाटेल. अशा मुलींना किंवा स्त्रियांना बघून कुणाचाही दृष्टीकोनात आणि नजरेत निर्मळपणा उरणारच नाही. त्यांचाकडे बघून सगळ्यांचाच तोंडातून वासनारूपी लार टपकते. त्या सगळ्या बघणार्यांना वासनाचे खेळणे वाटतात. मी असे नाही म्हणत कि त्या श्रीमंतांचा स्त्री आणि मुलींचे शरीर सुंदर नाहीत, आहेत परंतु ते दर्शवण्याचा त्यांचा हेतू हा सर्वथा वाईट असतो. माझा मते तुम्ही पण काहीच नसणाऱ्या त्या आदिवासी स्त्री आणि तरुण मुलींसारख्या नग्न रहा तर तुमची सुंदरता अधिकच सुंदर वाटेल. परंतु तुमचाकडे सगळ काही, अमाप पैसा असून ही स्वतःचा शरीराचे पदर्शन सार्वजनिक स्थळावर करता, तर ही सरळ सरळ अश्लीलता आहे.
आपल्याला जशी सवय आहे कि आपल्या अवती भवती जेवढे ही स्त्री आणि पुरुष वावरतात त्यांना आपण संपूर्ण वस्त्रात बघतो, तर आपल्याला सगळ सहजच वाटत परंतु एखादे असे निर्लज्ज श्रीमंताचे लेकरू वागत असेल तर पटकन लक्षात येत. त्याचप्रमाणे पाश्चात्य देशात कमी कपडे घालणे ही त्यांची संस्कृती आहे, तशी त्यांना सवय असते. परंतु त्यात एखादा व्यक्ती जर संपूर्ण कपड्यात असेल तर त्यांचा नजरेत पण लक्षात येत. आपल्या भारतीय संस्कृतीची महिमा ही भारताचा बाहेर जवळ जवळ सगळ्याच लहान आणि मोठे देश आहेत तेथे त्या देशांत पोहचली आहे. बाहेर देशांतील त्या अर्धनग्न राहणाऱ्या स्त्रिया ही आपल्या भारत देशातील मुख्य परिधान साडी घालण्यास आतुर असतात, आणि आपण त्यांचा देशातील संस्कृतीचा नावाखाली आपल्याच घरी म्हणजे आपल्याच देशात फॅशन म्हणून उघडे नागडे फिरतो. बाहेर देशातील स्त्रियांना सुद्धा शालीनतेचे महत्व कळून चुकले आहे म्हणून त्या या भारतीय परिधान साडीतील शरीराचा सुंदरतेकडे आकर्षित झाल्या आहेत आणि आम्ही आम्हाला सहजच लाभलेल्या या सुंदरते पासुन दूर चाललेलो आहोत.

चित्रकला आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, याचाच एक प्रकार आहे “DIVINE ART”. या प्रकारात एक सजीव मॉडेल तो स्त्री असोत किंवा पुरुष असोत संपूर्ण नग्न अवस्थेत वेगवेगळ्या मुद्रेत समोर बसलेल्या बाकी स्त्री पुरुषांपुढे उभे किंवा बसलेला असतो. त्यावेळेस त्या नग्न मॉडेलला बघून बाकी सगळ्यांना त्यात फक्त आणि फक्त सुंदरता दिसते. कारण कि तो किंवा ती मॉडेल आणि बाकी समोर बसलेले हे सर्व त्यावेळेस त्यांचा कलेला समर्पित झालेले असतात. तुम्हाला माहित आहे कि नाही, तरीही सांगतो कि या क्षेत्रात काही भारतीय गरीब स्त्रिया सुद्धा उतरल्या आहेत ती त्यांची मजबुरी म्हणा कि गरज. ज्या गरीब घरचा स्त्रिया ज्यांना पोट भरण्यास जीवापाड मेहनत करावी लागत होती. अशा काही स्त्रिया या कामापासून किंवा व्यवसायापासून पैसे कमावत आहेत. या स्त्रिया अशाच मॉडेल म्हणून पर स्त्री किंवा पर पुरुषांसमोर नग्न होऊन एका मूर्तीचे कार्य करतात. समोर बसलेला चित्रकार तो स्त्री असोत कि पुरुष असोत त्या स्त्रीचा प्रत्येक अंगाचा उभार आणि तिचा त्या जागेतील खोली अचूक आणि सुबकतेने त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर रेखाटतात. त्यामुळे ते सुंदर चित्र तयार होते जे आपल्याला बघायला मिळतात. त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्या पोटाची खड्गी भरण्यासाठी त्या स्त्रीला पर स्त्री आणि पर पुरुषांसमोर नग्न व्हावे लागते. त्या तिचा सुंदर प्रयत्नातून निखळ सुंदरताच निर्माण होते अश्लीलता नव्हे.

मी शेवटचे म्हणतो कि पैशांसाठी, पैशाअभावी मजबुरीने शरीर प्रदर्शन करण्यास सुंदरताच म्हटल्या जाईल आणखी काहीच नाही आणि सगळेकाही असूनही जर शरीराचे अर्धनग्न प्रदर्शन सार्वजनिक रित्या करणार्यास मी सर्वथा अश्लीलताच म्हणणार आहे. या लेखाचा सुरुवातीपासून तर शेवटी पर्यंत मी मी माझे जे विचार व्यक्त केले त्यात माझ्या आया, बहिणी, मैत्रिणी यांचा शरीराबद्दल मी बोललो. काही लोकांना ते सर्वथा अश्लील वाटेल, परंतु ते सर्व बोलणे फारच आवश्यक होते आणि माझा मुद्दा आपणास समजवण्यास अति आवश्यक होते. तरीही मी काही मर्यादेचा बाहेर बोललो असे नसेल तर तुम्ही मला त्याबद्दल तुमचे चांगले अथवा वाईट कमेंट्स जरूर कळवा. मी पुन्हा माझा आई, बहीण, मैत्रिणींची माफी मागतो कि मी फारच अश्लील असे शब्द उच्चारले. तर आपला निरोप घेतो पुन्हा नव्याने आणि नवीन स्फूर्तीने तुमचा पुढे ऐक नवीन विषयाबरोबर भेटण्यासाठी, तर खुश रहा आनंदित रहा.

धन्यवाद

स्वलिखीत

गजेंद्र गोविंदराव कूडमाते