Mall Premyuddh - 35 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 35

Featured Books
  • बुजुर्गो का आशिष - 9

    पटारा खुलते ही नसीब खुल गया... जब पटारे मैं रखी गई हर कहानी...

  • इश्क दा मारा - 24

    राजीव के भागने की खबर सुन कर यूवी परेशान हो जाता है और सोचने...

  • द्वारावती - 70

    70लौटकर दोनों समुद्र तट पर आ गए। समुद्र का बर्ताव कुछ भिन्न...

  • Venom Mafiya - 7

    अब आगे दीवाली के बाद की सुबह अंश के लिए नई मुश्किलें लेकर आई...

  • My Devil Hubby Rebirth Love - 50

    अब आगे रुद्र तुम यह क्या कर रही हो क्या तुम पागल हो गई हों छ...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 35

मल्ल प्रेमयुद्ध

गुगल मॅप नुसार गाडी धावत होती. संतुने गाडी अकॅडमीच्या पुढे थांबवली सगळ्यांनी खालूनच नाव वाचलं "फायटर पॉईंट ॲकॅडमी" बिल्डिंग, मैदान खूप मोठं होतं. बाहेरूनच एवढ मोठं दिसत होत. क्रांती आणि रत्नाने एकमेकींकडे बघितले. त्यांच्या मनात भीती होती. दोघींनी बिल्डिंगकडे बघून डोळे विस्फारले आणि आत निघाले. क्रांतीने स्वप्नाचा निरोप घेतला. म्हणाली, काळजी घे... तू नको तू खाली उतरू, तुझा पाय दुखतोय.."


भूषण म्हणाला, " मी थांबतो यांच्याजवळ तुम्ही जा."
वीरने त्याची गळाभेट घेतली. भूषणने. गाडी मधून सामान काढून दिलं सगळ्यांचं आणि भूषण स्वप्नाली गाडीतच बसले. बाकी सगळे उतरून सामान घेऊन अकॅडमीच्या दिशेने गेले.
भूषण ने गाडी एका झाडाखाली लावली. त्याने स्वप्नालीला विचारले, चहाने अन खायला आणू का? स्वप्नाली चालेल म्हणाली. भूषण गाडीमधून उतरला आणि समोर चालत जाऊन स्वप्नालीसाठी आणि त्याच्यासाठी चहा आणि वडापाव घेऊन आला. दोघांनी गप्पा मारत खाल्ले. स्वप्नाने त्याला विचारले, "आपण ह्या आधी भेटलोय पण जास्त काही बोललो नाही. काय करता तुम्ही?"
वीर आणि मी लहानपणापासन मित्र हाय, मी शेती करतो."
"इई... शेती... " त्याच्याकडे बघून स्वप्ना ओरडली.
" हो वाईट काय शेती करण्यात? एवढी शेती हाय आणि मी एकटाच हाय, जर मला शेतीच करायला आवडती तर नोकरी करून असं कीती पगार मिळणार ? फक्त माझ्या शिक्षणापरमान मला लई लई तर पंधरा-वीस हजाराची नोकरी मिळल.. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शेतातन कमवतो. आधुनिक पद्धती वापरतो. हंगामी पीक घेतो पण त्याचबरोबर त्या हंगामी पिकांच्यामधी मी भाज्या लावतो. त्यातून माझं महिन्याचे उत्पन्न बरंच असतं आणि हो मला आवडतं शेती करायला. मी शेतकरी अभिमानाने सांगतो." स्वप्नालीला जरा त्याची तिची चूक कळली. " सॉरी..."
"तुम्ही या आता राहणार असाल तर आण तुमचा पाय बरा असल तर... तुम्हीच आलाच तुम्हाला माझी शेती दाखवतो त्या मातीत घाम सांडलाय माझा आणि त्याच मातीच्या जीवावर आज मी एवढा मोठा झालोय. मी माझी स्वतःची गाडी घेतली, माझ्या हिमतीवर घर बांधल. सगळ हाय माझ्याकड आज आणि मला अजिबात लाज नाय वाटत. आजकालच्या तरुणांनी करावं सगळं कारण बुद्धिमत्ता त्यांच्याकडे जास्त हाय... शेती कशी करायची हे कळलं की लोकांचे हाताखाली काम करायची गरज नाही लागत. आणि जरी आपल्या हाताखाली काम करायला लोक असली तरी त्यांच्याकडून प्रेमाने काम करून कसं घ्यायचं हे कळलं पाहिजे. आपण मालक म्हणून नाय तर त्यांच्यासारखं आपण त्यांच्याबरोबर तसं राहायचं म्हणजी ते आपल्यात मिसळतात. आपल व्हतात आणि स्वतःच रान हायअसं काम करत्यात ."
" शेतीविषयी एवढं कौतुकाने बोलताय मला यायलाच पाहिजे बघायला तुमची शेती आणि मी नक्की येईल. पाया बराच कमी पडलाय दुखायचा त्याच्यामुळे मला चालता येईल."
" काहीच चालायची करायची गरज नाय अहो माझ्या शेतापर्यंत गाडी जाती."
"अरे वा मग तर मी नक्कीच येणार..." भूषण हसला
"अजून एक सांगू का रागवणार तर नाय ना?
" मला माहिती तुम्ही काय विचारणार आहे? तरी पण विचारा मी नाही रागवणार." भूषण विषयाला हात घातला.
"कशाला कारण नसताना वीरच्या माग लागत. तुमी कितीपण प्रयत्न केल ना तरी वीर तुमचा नाय व्हणारे... कारण त्याचं खरं प्रेम क्रांतीवर हाय... वीरला मी चांगला ओळखतो तुमी किती कायपण केल तरी तुमच्याकड वीर त्या नजरेने कधीच बघणार नाय. आण हे तुमाला पण चांगलंच म्हायती हाय. नाही मग कशाला त्यांच्यामधी पडताय. न्हाय आयुष्य तुमचं हाय पण तुम्हाला चांगला मुलगा मिळल की, नका त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू त्याचं सुख तुम्हाला मिळणारच नाय पण त्यातन तुमाला दुःख, त्रास व्हईल."
स्वप्नालीने मान खाली घातली आणि म्हणाली,
"पण मग माझं प्रेम मी त्याच्या वर त्याचं काय? त्याचा विचार नको करायला?"
व्हय व्हय मान्य हाय तुमचं प्रेम हाय पण ते एकतर्फी... बरोबर हाय ना? मग त्या प्रेमाचं काय उपयोग हाय समोरच्याच जर प्रेम असेल आपल्यावर तर प्रेम कराव माणसान... नाय म्हणत नाय पण वढून ताणून नाय तुमी कोणावर जबरदस्ती करू शकत." भूषण तिला म्हणाला." मी जास्त बोलतोय पण राग मानू नका मला जे कळतंय मला जी माहिती हाय, मी त्याला त्याच्या घरच्यांना लहानपणपसन अगदी जवळण वळखतोय त्यावरन तुमाला म्हणतोय, नका वेळ वाया घालवू, त्याचा काय बी फायदा व्हणार नाय." स्वप्नालीने खाली बघुन मान हलवली आणि म्हणाली, " पाणी आणलय?" भूषण ने तिला पाण्याची बाटली दिली.
" माफ करा... काही झालं तरी तुमचा विषय मी असं म्हणायला नको होतं. पण मला वाटलं तुम्ही भेटलाय एकट्या म्हणून बोलावं. स्वप्नांन पाणी पिल. "ह्या सगळ्यांच ऐकायची सवय झाली मला अगदी घरातल्या सुद्धा... त्याच्यामुळे मला नाही वाटलं वाईट." भूषणला कसंस झालं.
" खरंच तुम्हाला जर माझं चुकीचं वाटत असल तर विसरून जा बरं..." स्वप्नाली काहीच बोलली नाही.

अकराच्या आत त्यांना रजिस्टर करायचे होते. तिथे पोहोचल्यावर रिसेप्शनिस्ट इंग्लिशमध्ये विचारले. ऋषि होता म्हणून त्यांची काळजी मिटली होती पण तरीही क्रांतीने मराठीतच उत्तर देणं पसंत केल. क्रांती आणि वीर, रत्नाने त्यांची माहिती मराठीमधून दिली. रिसेप्शनिस्टला सुद्धा चांगलं मराठी बोलता येत होतं. तिने त्यांना व्यवस्थित प्रश्न विचारून त्यांची सगळी माहिती घेतली. रजिस्ट्रेशन झाले. ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म चेक केले आणि त्यांना आत पाठवले. आत मध्ये अकॅडमी बघायला गेल्यानंतर मातीच्या आखाड्यात खेळणारी ही तिघं त्यांना तिथल्या बिल्डिंगचा चकाकीपना बघून आश्चर्य वाटत होते.

"इथ कसं काय बुवा खेळणार? ऐकलं व्हतं, पिक्चर मधी बघितलं व्हतं, पण हे कधीच सवय नव्हती. एकमेकांसोबत बोलत होते. थोडे पुढे गेले तर त्यांना शिपायाने ऑफिसमध्ये बोलावले म्हणून सांगितले. संतू, ऋषि आणि चिनू बाहेरच थांबले. हे तिघे आत मध्ये गेले. तो मराठी माणूस होता त्यांनी त्यांचं हसत स्वागत केलं . तिघेही सवयीप्रमाणे गुरूंच्या पाया पडले. जसं वस्ताद यांच्या पाया पडायची त्यांना सवय होती. कोचने त्यांची ओळख करून दिली.
"नमस्कार मी प्रसाद साठे तुमचा कोच आज पासून नाही आत्तापासूनच... मला सगळी तुमची माहिती मिळाली आहे. तुम्ही कुठे खेळला, काय खेळला, आता तुमची माहिती द्या. मला माहितीये पण तरीही, "नमस्कार मी राजवीर पाटील साताऱ्या जिल्ह्यात कुरुंगुट गावाचा हाय."
"आणि मी क्रांती चौधरी सातारा जिल्ह्यातच रायगाव गावची." "अन मी रत्ना कांबळे सातारा जिल्ह्यातच पिराचीवाडी या छोट्या गावात मधून आली." सगळ्यांची ओळख झाली प्रसाद साठे यांनी त्यांना पहिल्यांदा पाणी दिले, चहा दिला, खाऊ घातलं कसे आला विचारलं.
त्यांना जाम भारी वाटलं हे एवढ्या मोठ्या शहरात इतक्या आपुलकीने चौकशी करणारी सुद्धा लोक असतात. त्यांनी त्यांना संपूर्ण कोर्ट दाखवला. कुठे खेळायचं? कसं खेळायचं? मुलींच्या वस्तीगृहाची बिल्डिंग लांबूनच क्रांती आणि रत्नाला दाखवली कुस्तीचा. मॅट कोर्ट बघून वीर क्रांती आणि रत्ना घाबरले. त्या खेळल्या होत्या मॅटवर पण आता माती सोडून आयुष्यभर कुस्ती मॅटवर खेळायची त्यांना अवघड वाटत होतं. त्यांनी तशी शंका लगेच बोलून दाखवली. पण प्रसाद सरांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "काळजी करू नका मी आहे."

सगळे बघून झाल्यानंतर तिथल्या मुलीमुलांची त्यांची ओळख करून दिली. या मुलांपेक्षा रत्ना, क्रांती, वीर खूप खेळले होते, फरक इतकाच होता की रत्ना क्रांती वीर मातीत खेळत होते. आणि इतर मुलं शिस्तबद्ध या मोठ्या अकॅडमीत मॅटवर खेळत होते. सगळ्यांची ओळख झाल्यावर वीर साठे सरांना सांगून रत्ना आणि क्रांतीला घेऊन वस्तीगृहाच्या गेटपर्यंत सोडायला गेले. सोबत चिनू ऋषी आणि संतोष सुद्धा होता वीरने दोघींना काळजी घ्यायला सांगितली. चिनुच्या डोळे पाण्याने भरले.तिने म्हणून घट्ट क्रांतीला मिठी मारली. क्रांतीने चिनू ला सांगितले,
" आता दादा आणि आईची काळजी तुला घ्यायची तिथे मी नाय दादा रानात असतो त्याची त्याला काम असतात तू घरी असतीस आता तू काळजी घ्यायची मानेनेच हो म्हटले. "तायडे आता मी काय लहान नाय डोळ पुसत, हसत क्रांतीला म्हणाली. रत्नाने संतुकडे बघितल, " बघ रत्‍ना दोघी एकमेकांची काळजी घ्या काय वाटलं तर लगीच दाजींना सांगायचं दाजी लगीच हजर व्हत्याल आणि तू तुझ्या घरच्यांची काळजी करू नको मी सारखा जाईन तिकड... तुमी तुमच्या खेळाकडे लक्ष द्या तिघसुद्धा..."

रत्ना आणि क्रांती वस्तीगृहाच्या आत मध्ये गेल्या गेटवर सगळी माहिती दिली. तिथल्या लेडीने त्यांना त्यांची रूम दाखवली. छोटी. पण दोघी आरामात राहू शकतील एवढी होती.


तिथून सगळे निघाले ऋषीनेने हळूच चिनुचा हात पकडला. चिनू, ऋषी मागे बसले. वीर स्वप्नाली मध्ये बसले. संतु गाडी चालवत होता. भूषण त्याच्या शेजारी बसला आणि वीरच्या रूमकडे गाडी निघाली. अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असून त्यांची गाडी वीरच्या बिल्डिंगच्या खाली येऊन थांबली. बिल्डिंग मोठी होती. वरती गेल्यावर मालक येऊन त्याची वाट बघत थांबले होते. वीर ने त्यांना एडवांस दिला आणि घराची किल्ली घेतली. रूम छोटी चांगली होती. वीरने त्याचे सामान आणलं स्वप्नालीला वरती येत आल होतं कारण तिथे लिफ्ट होती. सगळे निवांत बसले ... वीरचे सामान लावायला सगळ्यांनी मदत केली. एकटाच असल्यामुळे थोडीच लागतील एवढीच भांडी आणली होती. चहा, साखर, दोन पातेली इतकच साहित्य आणलं होत.
" चला आता हॉटेलमध्ये जाऊ आणि खाऊन घेऊ कारण रत्ना आणि क्रांतीला आज दुपारपासूनच हॉस्टेल्स जेवण हाय त्याच्यामुळे आपण जेवू आणि तुम्ही लगेच निघा.

"आवर आवर केली आणि सगळे निघाले स्वप्नाचा पाय अजून दुखत होता.चीनू आणि ऋषीच्या मदतीने ती चालत होती. वीर सारखं तिला विचारत होता की, "आपण जायचं का दवाखान्यात?" पण स्वप्ना नाही म्हणत होती. सगळ्यांनी एका जवळच्या हॉटेलमध्ये जेवण केलं आणि वीर सोडून सगळे निघाले. रिशी, स्वप्ना, चिनू मधल्या सीटवर बसले. संतोष नी गाडी घेतली भूषण त्याच्या शेजारी बसला जवळजवळ पाच वाजले होते निघायला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत