भाग – ७
कोमलचा चिंतेने सावली पडत धडपडत कोमलचा बेडकडे जाऊ लागली. तिचा डोक्यात आता त्या दिवशी घडलेला प्रकार आणि ती परिस्थिती एका चित्रपटाचा रीलप्रमाणे भर भर धावू लागली होती. ती स्वतःला आता त्या क्षणी घटना स्थळी बघू लागली होती. कोमल तिचा डोळ्यांना समोर रक्ताचा थारोळ्यात पडलेली तिला दिसत होती. तिला तसे बघून सावली आता आणखीनच चिंताग्रस्त होऊन कोमलचे नाव घेत पुढे जात होती. शेवटी ती कोमलचा बेडजवळ जाऊन पोहोचली. तर काय बघते तिची आई तेथेच बसून होती गुपचूप आणि निस्तेज, निष्प्राण. सावली तेथे आईजवळ गेली आणि म्हणाली, “ आई कोमल कशी आहे?” अचानक सावलीचा आवाज ऐकून तिचा आईचा निष्प्राण शरीरात जसे प्राण आले तशी तिने डोक वर करून बघितले तर सावली स्वतःचा पायावर उभी दिसली. आईला तिचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तर तिने जागेवरून उठून प्रथम सावलीचा चेहऱ्याला स्पर्श केला आणि मग तिचा सर्वांगाला स्पर्श करून म्हणाली, “ सावली बेटा तू खरच आली आहेस.” आणि ती रडू लागली. तेव्हा सावली सुद्धा रडत म्हणाली, “ हो आई मी खरच आली आहे, आई काय हे अनर्थ घडून गेल आहे ग माझ्या कोमल सोबत.” मग सावलीने आश्चर्यचकित होऊन आईला विचारले, “ आई तू असे का बर विचारत आहेस.” तर मग आई बोलली, “ बेटा माझ्या सारख्या आईचा नजरेपुढे एक मुलगी रक्ताचा थारोळ्यात पडलेली होती आणि दुसरी त्या अनपेक्षित धक्क्याने मूर्च्छित होऊन पडलेली होती. मी एकटी बाई कुठे जाऊ आणि कुणाकडे जाऊ अशी परिस्थिती माझी झाली होती. तू माझा एकमेव आधार होतीस तर तू सुद्धा..... मला तर वाटू लागले होते कि मी तुम्हा दोघींना हि गमावून बसेल.”
मग सावलीने स्वतःला सावरले आणि पुन्हा आईला विचारले, “ आई काय घडले आणि कसे घडले ते तुला सांगितले असेल कुणीतरी.” तेव्हा आई बोलली, “ नाही ग कुणीच काही खुलून सांगत नाही आहेत.” तेव्हा सावली बोलली, “ ठीक आहे आई काय झाले आणि कसे झाले ते मी स्वतःच माहित करून घेईल.” असे म्हणून तिने तिचा फोन काढण्यास खिशात हात घातला तर तिचा फोन तेथे नव्हता. तिने आईला फोनबद्दल विचारले तर आईने तिला तिचा फोन दिला. मग सावलीने तिचा फोन सुरु केला तर तो फोन वाजू लागला होता. सावलीचा फोनवर कुणीतरी फोन केलेला होता. सावलीने तो फोन उचलला आणि म्हणाली,” हेलो कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला?” तेव्हा पुढून आवाज आला, “ कशी तब्येत आहे मिस्स सावली. पुन्हा माझा कडून चूक झाली आणि बिचारी ती अकारणच माझ्या हत्ते चढली. आज तर तू वाचलीस पुन्हा नाही वाचणार.” असे म्हणू तो व्यक्ती जोराने हसू लागला होता. इकडे सावली अनभिग्यपणे म्हणाली, “ को कोण बोलता आणि काय बोलता.” ती बोलत असतांना तो फोन समोरून कटला आणि सावली हेलो हेलो करत राहिली. मग सावलीला काही सुचत नव्हते तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर सावंत साहेब तेथे आलेत आणि त्यांनी म्हटले, “Nice to see you again सावली.” तेव्हा सावली फक्त त्यांचाकडे अनोळख्या सारखी बघू लागली होती. तिला तसे बघतांना सावंत साहेबांना काही विचित्र वाटले तेव्हा ते थेट डॉक्टरकडे गेले आणि त्याबद्दल विचारले. तर डॉक्टरांनी काही मेंटल इश्यू असण्याचे कारण सांगितले. सावंत साहेबांचा सोबत इन्स्पेक्टर कदम सुद्धा आलेले होते. तर साहेबांनी सावलीची आणि तिचा आईची भेट इन्स्पेक्टर कदम सोबत करून दिली आणि त्यांना सांगितले कि तुम्ही यांचा बरोबर २४ तास रहायचे आणि प्रत्येक क्षणाची माहिती मला द्यायची. असे म्हणून साहेब तेथून निघून गेले आणि सावली त्यांचाकडे एकटक बघत राहिली.
मग सावलीने आईला विचारले ,“ आई कोण आहेत ग ते साहेब, काय ते मला ओळखतात काय.” तेव्हा आईने सावलीला म्हटले, “ अग ते सावंत साहेब आहेत पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी. अग त्या दिवशी तुला त्यांनीच तर घरी सोडले होते ना. तू कशी काय वीसरून राहिली आहेस. तुला काय झाले आहे आणि तू.... तुझी तब्येत तर ठीक आहे ना.” आता मात्र सावलीला स्मरण होऊ लागले कि काहीतरी वेगळे घडतय तिचा आयुष्यात. ती डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना विचारले, “ डॉक्टर मला काय झाले आहे. मी का बर अशी सगळ काही विसरू लागली आहे.” असे म्हणत असतांना सावली अधिक चीढून आणि संतापात बोलत होती. डॉक्टर तिचा कडे शांतपणे बघत होते. त्यांना जाणवले होते कि तिचा वागण्यात आणि बोलण्यात काही तरी वेगळे होते आहे. म्हणून त्यांनी सावलीला म्हटले, “ चला मला आधी तुमची मानसिक स्थिती जाणून घ्यावी लागेल. त्यानंतर मी काय आहे आणि काय नाही हे नक्की सांगू शकेल.” काही वेळाने डॉक्टरांनी सावलीचा मानसिक स्थितीचा तपासणीसाठी तिला काही प्रश्न केले. तेव्हा सावली असामान्य पद्धतीने त्यांचे उत्तर देत होती. ती राहून राहून रागात येत होती आणि त्यावेळेस तिचा स्वतःवर ताबा राहत नव्हता. परंतु काही काळाने ती पूर्ववत सामान्य होत होती. डॉक्टरांनी सबंध परिस्थितीतून हा तर्क काढला कि अल्पशा वेळेत एक भला मोठा मानसिक आघात झाल्यामुळे सावलीचा मेंदूवर काही तरी प्रभाव झाला आहे. याकरिता सावलीचा मानसिक स्थितीचे उपचार सुरु करावे लागतील. याबाबत माहिती सावलीचा आईला त्यांनी दिली.
शेष पुढील भागात................