" ऐ पब्लिक ...चला आता तुम्ही पण फुटा...संपला फुकटचा शो..." तो जाताच आता नगमा पुढे येते आणि दारातल्या त्या गर्दीला पाहून चिडून बोलते...तसं सर्वजण पटकन पांगतात आणि ती ही धाडकन दरवाजा लावून घेते...
" हाच आवाज आधीच त्या अरविंद शी बोलताना चढवला असता तर मला मध्ये पडायची गरज पडली नसती नगमा..." आंटी सोफ्यावर बसत बोलतात..तसा तिचा चेहरा पडतो..." इट्स ओके नगमा..चलता है...जिंदगी है ये...फक्त पुढच्या वेळेस लक्षात ठेव आणि परत चूक अशीच घडून देऊ नकोस..." त्या तिचा पडलेला चेहरा पाहताच स्वतः च्याच वाक्यावर नाराज होत तिला चेअर अप करतात...तशी ती हसुन हो मध्ये मान हलवते...
" हे सर्व काय होतं पद्मा आणि ही बया कुठे भेटली तुला..." अम्मी आपल्या मैत्रिणीला,पद्मा ला विचारतात..पण शेवटचं वाक्य बोलताना एक भुवई उंचावून तिच्याकडे ही पाहिले होते...
" अगं तीच.." पद्मा काही बोलणार तोच नगमा ने काही नका सांगु म्हणून खुणावले...तसं परत अम्मी भुवई उंचावत च तिला पाहत होती..कारण तिच्या खानाखुणा ती समोरच उभी असल्याने ह्यांनाही कळतच होत्या की..." अगं म्हणजे ती मला हिथेच भेटली होती खाली...मी तुलाच एंगेजमेंट ची पत्रिका द्यायला आली होते..." त्या सावरत बोलतात....
" हो का...?? तू नक्की खरं बोलते ना..." अम्मी ची नजर अजून ही तिच्यावरच असते...
" अगं हो गं...तू पण ना..." म्हणत पद्मा आपल्या पर्समधून एंगेजमेंटची पत्रिका त्यांच्या हातात देत बोलतात..तसं त्यांना ही विश्वास बसतो...
" हुश्श सुटले बाबा एकदाची..नाहीतर आज अम्मी ने प्रश्नांनी भंडावून सोडल असतं...आता जे घडलं ते कसं सांगू तिला ..." म्हणत नगमा ही आपल्या रूममध्ये निघून येते आणि बेडवर झोकून जाते...तसं तिला आज दुपारी घडलेला प्रसंग आठवतो...
" मे आय कम इन सर..." दुपार पर्यंत तिने घर शोधलं होतं पण तिला हवं तसं घर भेटतच नव्हतं...कंपनीत तिने न जाण्याचा फायनल निर्णय घेतल्याने जॉबची ही गरज तिला होतीच पण सध्या तिला छप्पर ची आवश्यकता असल्याने ती सकाळी केलेल्या नाष्ट्यावरच संपुर्ण शहर फिरत होती...पण तरी ही तिला मनोजोगत घर मिळालं नव्हतं...
शेवटी तिच्या कंपनी पासुन जवळ च असलेल्या एका हाय सोसायटीत ती गेली होती...हिथले रेंट ही हाय असणार हे तिला तसं बाहेरूनच समजलं होतं तसं पण आता इतके नकार ऐकले आहेत तर अजून एक ऐकायला काय हरकत आहे..शिवाय जर काही चांगलच आपल्याबरोबर घडणार असेल तर...हिथले रेंट कमी भावात मिळाले तर असा काहीही विचार करून ती त्या पॉश बिल्डिंगच्या अपार्टमेंट मध्ये आली होती..तसं हिथे न येण्याच अजून एक कारण कंपनी जवळ म्हणजे अर्जून ही ह्याच एरियात असल्याने तिला जायचे नव्हते पण नाईलाजाने ती आली होती..
" येस कम इन..." आतून एक कठोर आवाज आला तशी ती दबकतच आत आली...समोरची व्यक्ती आपल्या समोरच्या फाईल मध्ये काहीतरी वाचत असल्याने चेहरा काही तिला नीट दिसला नव्हता..
" गुड मॉर्निंग सर...ते मला कळालं कि..." ती आत येताच ईकडे तिकडे पाहत च हळूच बोलली...त्याने अजूनही मान वर केली नव्हती.." हिथे एक वन बीच के फ्लॅट आहे असं..." ती तुटक च बोलली...
" हो आहे...पण आम्हांला तो विकायचा आहे...रेंट ने नाही द्यायचा..." समोरची व्यक्ती फाईल मधून डोके काढत बोलते आणि त्याच लक्ष जाताच, त्याच्या चेहर्यावर एक कुत्सित हसु येते," शेवटी तुला माझीच गरज पडली का...??" ती व्यक्ती आपलं हसु कंट्रोल करत म्हणते..
" तुझ्या सारख्या ची मदत मी हाच जन्म काय तर सात जन्म ही घेणार नाही...मग किती ही माझी कंडिशन वाईट असू दे..." त्याला पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात आणि तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे जात तसं सर्व प्रकार तिच्या लक्षात येतो...पण तरीही तिचा बाणेपणा तसाच अंगी ठायी ठेवून ती त्याच्याशी कडक शब्दांत बोलते..
" या आर पी ला तू अजून ही ओळखलं नाही म्हणायचं ..." तो उठून तिच्या जवळ येत बोलतो तशी ती आधी घाबरून मागे सरकते पण त्याच्या चेहर्यावर विजयाची स्माईल पाहून ती परत स्वतः ला सावरते...
" तुझ्यासारख्या भ्याडला ओळखायची काय गरज आहे...बस एक नजर च माझी तुझ्यासारख्याला काफी आहे..." म्हणत ती बाहेर निघणार तोच तिचा हात तो मागून पकडतो..
" हात सोड आर पी...मी तुझ्या वाटेला आले नाही....आणि आज ही मला जर माहित असतं ही सोसायटी तुझी आहे तर आले नसते.." ती तशीच पुढे बघत त्याला बोलते...आणि आपला हात झिडकारत असते पण त्याने तिचा दंड ईतका घट्ट पकडला होता कि तिला मुव्ह पण करता येत नव्हतं...
" हो ना..चू चू चू...पण आता तू आलीस ना माझ्या पाशी..." तो कुत्सित हसत म्हणतो..
" इट्स माय बॅड लक..." तिच्या डोळ्यांतून अश्रू येत असतात कारण दंड तिचा चांगलाच पिळला होता त्याने..." मी गेले आहे ना अर्जून च्या आयुष्यातून...जे तुला हवं होतं..अगदी तसंच घडलं आहे ना...मग आता काय हवंय मला..." ती काकुळतीला येऊन बोलते..
" मला ना...तू ..तू हवीस डार्लिंग...." तो तिला आपल्या कडे ओढत बोलतो...तशी ती त्याच्या छातीवर येऊन आदळते...तशी ती अस्वस्थ होते...त्याच अस्तित्व ही तिला आता या क्षणाला नको होतं.... ढकलून पळून जावस वाटत होतं पण त्याने हातचं ईतका घट्ट पकडला होता कि तिला थोडसुद्वा हलता येत नव्हतं...
" आर पी हे सर्व काय चाललंय ..." तोच एका बाईचा आवाज येतो...तो बेसावध होताच ती पटकन त्या बाईकडे पळत जाते...
" पद्मा आंटी ...मला वाचव..." ती पळतच तिच्या मागे लपत बोलते..
" मॉम ..तू हिथे काय करतेय...?? आणि किती वेळा सांगितलं आहे तू माझ्या ऑफिस मध्ये येऊन किंवा माझ्या लाईफ मध्ये येऊन ईंटरफेअर करत जाऊ नकोस म्हणून..." तो आपल्या मॉमला पाहताच तितक्याच रागात बोलतो...हो पद्मा आंटी त्याच ज्या तिच्या अम्मी च्या चांगल्या फ्रेंड होत्या आणि आर पी हा त्यांचाच मुलगा होता...ज्याची पंधरा दिवसांनी एका दुसर्या मुलीशी एंगेजमेंट होती..
" हे बघ तुला मी आधीच सांगितलं आहे...तू नगमाला विसरून जा...." त्या प्रेमाने त्याला पाहत बोलतात, " तिचं अलरेडी लग्न झालं आहे...तुला चांगल माहित आहे..." त्या त्याला समजावत बोलतात...
" मॉम ..तिचा आता त्याच्याशी डिवॉर्स ही झाला आहे... " तो आपल्याच मॉमला आणि तिच्याच समोर तिच्या भुतकाळाची आठवण करून देतो..." त्यामुळे ते लग्न लग्न करू नको...आणि प्लीज तू या मॅटर मध्ये पडू नकोस..." तो तिला हात जोडून परत नगमाचा हात पकडतो...
" स्टॉप इट आर पी..." मॉम त्याच्या कानाखाली वाजवते आणि त्याच्या हातातुन तिचा हात सोडवते, " कान उघडे ठेवून ऐक...तुझा साखरपुडा आणि लग्न मी सांगितलेल्या मुलीशीच होणार ...आणि नगमा ही मला मुलीप्रमाणे आहे त्यामुळे जितकं शक्य असेल तितकं तू लांब रहायचं हिच्यापासुन ...अन्यथा मी विसरून जाईल कि तू माझा मुलगा आहेस..." त्या त्याला बजावून सांगतात आणि तिला घेऊन बाहेर पडतात...झालेला प्रकारामुळे नगमा जरा भेदरलेली होती...
" कुल डाऊन नगमा..." त्या तिला आपल्या फ्लॅटवर घेऊन येतात...तिला किचनमधून पाणी आणून तिच्या पाठीवरून हात फिरवत पाणी प्यायला लावतात...ती ही घशाला कोरड पडल्याने तो काचेचा ग्लास एका दमात खाली करते...
" अगं जरा सावकाश..." पण त्यामुळे तिला थोडा ठसका लागतोच...तसं त्या परत तिच्या पाठीवरून हात फिरवत प्रेमाने बोलतात...
" अजून हवंय का...??" तिला तशा अवस्थेत पाहून त्या विचारतात...ती मानेनेच नको बोलते..
" बरं तू बस...मी आलेच..." म्हणत त्या किचन मध्ये ग्लास ठेवायला जातात आणि सोबत तिच्यासाठी खायला ही आणतात...
" खा हे बाळा...भूक लागली असेल..." त्या तिच्या हातात फ्रुटस ची प्लेट देत बोलतात..
" आंटी नकोय मला काही..पण प्लीज तुम्ही हे अम्मीला काही सांगू नका..." ती केवलतेने बोलते..
" बरं नाही सांगत ...पण तू ईकडे काय करत होतीस..??" त्या तिच्याजवळ बसत प्रेमाने विचारतात...तशी ती सर्व सांगते... अरविंद सकाळी आलेला वैगेरे...
" ओह..एवढ सर्व झालं पण मला एकदा ही तुझ्या अम्मी ने कॉल करून आज सांगितले नाही...काल रात्री ही माझ्याकडे होती तरी त्या अरविंद बद्दृल बोलली नाही..." त्या अफसोस व्यक्त करत म्हणतात..
" अम्मी काल हिथे होती...??" तिला आश्चर्य आणि आनंद ही झाला ते ऐकून कि काल अम्मी सेफ होती...त्यांनी ही होकारात मान हलवली..
" आय ॲम सॉरी आंटी... म्हणजे मला नव्हतं माहित ही सोसायटी तुमची आहे ते..." ती दिलगिरी व्यक्त करत म्हणते...
" हो मला माहित आहे, तुला हे आधीच माहित असतं तर तू आली नसतीस.." त्या गोड हसत बोलल्या, " ॲक्चुअली ही सोसायटी आमची नसुन आमच्या ओळखींपैकांची आहे ..हे घर आम्ही त्यामुळे फक्त पंधरा दिवसांसाठी घेतलं आहे.....आता बाहेरचे ही पाहुणे येणार ना म्हणून..." त्या हसत बोलल्या..
" ओह..." ती यावर काय बोलाव समजत नसल्याने शांत बसते..
" बरं बेटा..मग आता पुढे काय ठरवलं आहेस...??" त्या परत एकदा तिला फ्रुटस ची ऑफर करत विचारतात...
" बघू कुठे भेटतोय का फ्लॅट...." ती यावर उदास होत बोलते..
" मी एक सगेस्ट करू का..? " थोड्यावेळाने त्या परत काहीतरी मनाशी ठरवत तिला विचारतात, " म्हणजे बघ हं फक्त माझं सगेशन आहे...बाकी तुझा फैसला आहे..."
" हा बोला ना आंटी..." ती ही हसुन बोलते..
" मग ऐक ..मला असं वाटतय हे घर तू घ्यावं...आणि आर पी च्या संगित व मेंहदीची ऑर्गनायझेशन ची ऑफर ही स्विकारावी...म्हणजे बघ.. तुला जे योग्य वाटते ते कर.." त्या बोलतात तशी ती विचार करायला लागते आणि होकार देते...त्यांना खुप आनंद होतो...कारण खुप मोठं टेंशन त्यांचं गेलं होतं...शिवाय त्या तिला हे घर आणि घरातील पाहुण्यांना पंधरा दिवस मॅनेज करेल या हिशोबाने त्या तिला बोलतात..ती ही हो बोलली होती त्यामुळे त्यांचे बरेच प्रश्न सुटले होते...आणि आता ही तिला सांगुनच ॲंडवास्ड पे केलं होतं...
पात्रांची ओळख
अर्जून पंडित ( कथेचा नायक...)
नील आणि सुरभी पंडित ( नायकाचे आई वडिल,दिल्लीचे मोठे बिझनेसमन )
कोमल पंडित ( नायकाची बहिण )
रोहित व प्रिती पंडित ( नायकाचे कझन व वहिनी कम अर्जून ची मानलेली बहिण)
सुनील आणि लाचो ( नायकाचे काका काकू...रोहितचे मॉम डॅड...)
नगमा शेख ( नायिका )
शबनम शेख ( नायिकाची अम्मा...)
सध्या तरी एवढेच पात्र ..नंतर जसजसे येतील तश तशी ओळख होईलच ..
क्रमशः