Mall Premyuddh - 33 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 33

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 33

मल्ल प्रेमयुद्ध


हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसून क्रांती तयार झाली. पण तिच्या मनात भीती होती. नक्की येत्यात घरी पण कशासाठी?
स्वप्ना काय म्हणलं? तिला उगच तरास सगळ्यामुळ... कधी सगळं नीट व्हणारे...
चिनू आईला मदत करत होती. ऋषीचे सगळे लक्ष चिनुकडे होत. आत्या मामा दादासोबत बोलत बसले होते. स्वप्न क्रांतीबरोबर बोलायची संधीची वाट बघत होती.

"दादा अस व्हायला नको होतं. आम्ही समजावलं दाजींना." मामा म्हणाले.
"शेवटी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असत्यात तिथं आपलं काय चालत व्हय... पण ह्या पोरांच्या मनात हाय म्हंटल्यावर म्या त्यांच्या माग खंबीरपण उभं राहणार हाय...आबा बापमाणुस हाय... त्यांना त्यांच्या लेकच्या मनातलं समजल, व्हय येळ लागल पण समजल... तोपर्यंत म्या हाय..." दादा म्हणाले.
"व्हय की अन आम्हीपण हाय की तुमच्याबर... काय पण गरज लागु दे, ह्या लेकरावर आमची माया हाय " आत्या वीरकडे बघत म्हणाली.
"पण आत्या जे झालं ते व्हायला नका व्हत. तुमच्या ह्या सोन्यासारख्या लेकीला किती तरास..." आशा सगळ्यांना शेवया देत म्हणाली.
"स्वप्नाली आमच्या शब्दभायर न्हाय, तीला अपेक्षा व्हती पण ती कोणाचं मन मोडणार न्हाय..." आत्या म्हणाल्या तेव्हाच क्रांती बाहेर आली आणि आत्या मामांना नमस्कार केला.ऋषीची चौकशी केली. आणि त्यांच्या बाजूला बसली. वीर अगदी प्रसमाणे क्रांतीला बघत व्हता. तिला वीर एकटक बघतोय म्हणून लाजल्यासारखं व्हत व्हत पण आवडत व्हत. तर स्वप्नाला इतका राग येत होता. की तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. आणि ती जागेवरून खाडकन उठली.

"काय ग बाय झालं का खाऊन?" आशाने विचारले.
"न्हाय डो... पायाला मुंग्या आल्या म्हणून उभी राहिले." स्वप्ना पटकन म्हणाली.
"व्हय का? क्रांती जा मागच्या परड्यात फिरवून आण जरा ह्यासनी...ऋषि तुमीपण जा..." दादा म्हणाले. ऋषी खुश झाला. क्रांतीसुद्धा उठली. चिनू त्यांच्या माग गेली. स्वप्नाली आणि क्रांती थोडे अंतर पुढे चालत होत्या. ऋषी आणि चिनू मागे...
"कशी आहेस???"
"मी लई भारी... आणि तू... तुम्ही?" चिनूने दाताखाली जीभ चावली.
"तूच म्हण...मी मस्त..." ऋषी गालात हसला. खूप छान दिसत होता ऋषी. उंच , कुरुळे केस, हाताच्या मनगटापर्यंत चेक्सच्या शर्टच्या बाह्य फोल्ड केलेल्या. ब्लू जीन्स, खिशाला गॉगल...हातात सोन्याचे कडे
"छान दिसतेस..." ऋषी चिनुच्या जवळ जाऊन म्हणाला.


"थँक यु..." चिनू लाजली. जवळच गुलाबाच्या झाडाला बरीच लालबुंद गुलाबाची फुल आली होती.

"वा काय बहरालाय गुलाब..."

"नेहमीच असत्यात..." चिनुने त्या गुलाबांवरून हलकाच हात फिरवला.

ऋषीने एकदा गुलाबाकडे बघितले आणि एकदा चिनुकडे...

"चिनू ..." चिनुने पटकन ऋषींकडे बघितले.

"बोला..."

"अगदी टपोर गुलाबासारखी दिसतेस..." ऋषी तिच्या एकटक चेहऱ्याकडे बघत बोलला. चिनुला काय बोलावे समजेना. ती त्याच्या अश्या बघण्याने लाजून चुर झाली. नजर इकडे तिकडे फिरवू लागली.

"मला सांगा कधी परीक्षा तुमची..." ऋषी भानावर आला.

" नेक्स्ट मंथ.. बघू आता मग सुट्टीत इकडेच यायचा प्लॅन आहे." ऋषी हसत म्हणाला.

"खरंच..." चिनुचा आनंद गगनात मावत नव्हता.

"हो खरंच पण तुला का इतका आनंद झाला?" चिनुकडे उत्तर नव्हते ती काहीही न बोलता आत पळाली.

"तुझ्या न बोलण्याने मला काहीच समजत नाही असं नाही... चिनू मी येणार तुझ्यासाठी..." ऋषी गुलाबनकडे बोलत म्हणाला.


"हि आमची चंद्रा गाई..." क्रांती गोठ्यातल्या गाईची ओळख करून देत होती आणि स्वप्नाने नाकाला रुमाल लावला होता.

"तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना या जनावरांशी ओळख करून देतात का? नाही हि पद्धत मी पहिल्यांदाच बघितली." स्वप्ना नाकावरचा रुमाल आणखी घट्ट करत बोलली.

"तुम्हाला नाय आवडत का मुकी जनावर..." क्रांती तिला गोठ्याच्या बाहेर आणत म्हणाली.

"नाय आवडत नाही आवडत असं नाही पण आम्हाला पहिल्यापासून सवय नाही यागोष्टींची..." स्वप्ना

बाहेर येऊन दोघी झाडाच्या सावलीत बसल्या.

"सॉरी स्वप्नाली..." क्रांती

"सॉरी का?" स्वप्ना

"माझ्यामुळं?"

"घरात अजुनपण तुमच्या लग्नाला मान्यता नाही. वीर कितीही नाचत असला तरी."

"व्हय मला म्हायती हाय अन मी घरच्यांच्या विरोधात लग्न करणार सुद्धा नाय."

"आणि हे बघ मी इकडून तिकडं नाचणारी बाहुली नाही. हे म्हणतील ये लग्न कर तो म्हणेल नाही, म्हणून मी निघून जायचं माझ्या आयुष्याला काही अर्थ आहे कि नाही.मला माझे निर्णय घेता येतात. आणि लक्षात ठेव वीर आणि माझंच लग्न होणार आणि हे मी घडवणार... तुमचं कितीसुद्धा प्रेम असल तरी. हेच सांगायला मी इथं इच्छा नसताना तुझ्या दारात आले.



"ठीक हाय तुला पाहिजे ते तू कर मी न्हाय अडवणार... चल खाऊन घे."

"तुला काहीच वाटत नाही का?"

"कशाला काय वाटायला पाही उलट माझ्यामुळ तुला झालेला त्रास मी त्रासदायक वाटला.लग्न मोडल म्हणून तुला बोलवून घेतलं, आबांनी वीरला विचारायला पाहिजे व्हतं. तुला त्रास झाला नी तू मला बोललीस, न्हाय याच मुळीच वाईट वाटलं न्हाय मला कारण तुझी होणारी चिडचिड बरोबर हाय, मी न्हाय चिडले." क्रांती म्हणाली यावर स्वप्नालीला की बोलावे हे समजत नव्हते.

आशाने चांगल्या पद्धतीने सगळ्यांचा पाहुणचार केला. आत्यांची ओटी भरली. ऋषी आणि चिनूची आखमीचोली सुरू होती. निघायच्या क्षणी मात्र चिनुच्या डोळ्यातलं पाणी ऋषीने नेमकं हेरलं सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं. वीरने नजरेने क्रांतीला बाय केले. हे स्वप्नालीने बघितले. तिच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली.


सगळे घरी पोहचले. आबा सगळ्यांवर नाराज आहेत हे कळायला उशीर लागला नाही.

"आबा आम्ही उद्या निघातो." आत्या म्हणाली.
"आलाय तस रहा अजून काय दिस..." आबा म्हणाले.
"नको... आबा तुमची चिडचिड दिसती आमाला.. आम्ही क्रांतीला भेटायला गेलेलो आवडला न्हाय न तुमाला." आत्या
"हा तुमचा प्रश्न व्हता आक्का ... आम्हाला न आवडणारा प्रश्न कसला." आबा
"ठीक हाय तुमच्या साठी राहतो आणखी चार दिस तुमचा शब्द मोडणार न्हाय पण आमाला एक वचन पाहिजे." आत्या
"म्हाइत हाय अमास्नी तुम्ही काय वाचन मागणार हाय..." आबा
"व्हय ना...मग द्या." आत्या
"एकदा स्वप्नालीचा इचार करा." आबा
"माझ्या लेकीला उत्तम नवरा मिळल, पण वीरशी लग्न केलं तर प्रेम न्हाय मिळणार... तिला कळायला येळ लागलं पण समजलं तिला..." आत्या
"ठीक हाय दिल वचन..." आबा म्हणाले आत्या खुश झाल्या.
वरून ऐकणार तेजश्री मात्र हादरून गेली. आता स्वप्नापण माघार घेणार म्हणून ती धावत स्वप्नालीकड गेली अन तिला सगळं सांगितलं.
"ताई मी उद्या जाणार वीरला सोडायला बघू कशी त्याच्यापासून लांब राहत नाय..." स्वप्ना म्हणाली.


वीर बॅग बघा होता. तेवढ्यात क्रांतीचा फोन आला. ऋषीने पटकन उचलला. वीरने त्याच्याकडे रागाने बघितलं.
"भरली बॅग..." क्रांती
"दादा भरतोय... मी का भरू?" ऋषी हसत म्हणाला.
"अरे ऋषी तुम्ही व्हय.." क्रांती म्हणाली.
"हो दादा बॅग भरत होता म्हणून मी घेतला फोन राग नाही न आला." ऋषी मस्करी करत म्हणाला.
"राग कसला त्यात... तुम्ही बोला की आणखी कोणाशी बोलायचं...? म्हणजे वाटलं असलं ना की नक्की माझा फोन हाय की आणखी कोणाचा?" क्रांती सुद्धा त्याची खेचत म्हणाली.

"वहिनी अस काही न्हवत हा माझ्या मनात मी तुमची मज्जा करावी म्हणून बोललो तर तुम्ही माझीच खेचता." ऋषी गडबडला. वीरसुद्धा त्याच्याकडे बघून हसत होता.
"घ्या पण बोलाच आता. आम्ही बघत होतो दोघांची तळमळ, तुमास्नी वाटलं ना की आमचं लक्ष न्हाय म्हणून..." क्रांतीने फोन चिनुकडे दिला.
"अहो वहिनी..." ऋषी म्हणाला तसा पलीकडून आवाज आला.
"उद्या जाणार तुम्ही???" चिनू
"हो का???" ऋषी रूमच्या बाहेर पडला.
"नाय मला वाटलं तुम्ही थांबाल..." चिनू
"कशाला?" ऋषी
"असच..." चिनू
"तुझी इच्छा असेल तर थांबतो." ऋषी।
"खरंच..." चिनू
"हो...एकदा म्हण की माझ्यासाठी थांबा मग थांबतो." ऋषी
"थांबा न मग." चिनू
"कशासाठी?"
"माझ्यासाठी..." चिनू लाजून म्हणाली.
"हा थांबतो. पण उद्या येणार असशील तर.." ऋषी
"कुठं?" चिनू
"ताईला सोडायला तू ये मी दादाला सोडायला येतो." ऋषि.
"मी सांगते." चिनू
"सांगते नाही... तुला यालाच लागेलं." ऋषि
"हम्मम मग तुम्ही असल्यावर येणारच ना..." चिनू म्हणाली.
"गाढवा मला फोन आला अन भायर येऊन गप्पा मारत बसला का माझ्या मेव्हनी बर... वीर बाहेर येऊन म्हणाला.
चिनूने पटकन फोन क्रांतीला दिला.

"हॅलो... चिनू..." वीर
"आव ती पळाली..." क्रांती हसायला लागली.
"उद्या तिला बरोबर घेऊ नका..." वीर ऋषिकडे बघून मुद्दाम म्हणाला.
"दादा..." ऋषि निघून गेला.
"क्रांती संतुला सांगा उद्या गाडी घेवू नकोस माही गाडी हाय एकच गाडी घेऊ ऋषि पण हाय सोबतीला ..."
"हो चालल..." क्रांती।
"रत्ना आल्या." वीरने काळजीने विचारले.
"हो आताच संतू घेऊन आला."
"बर झोपा आता सकाळी लवकर निघायचं हाय." वीर म्हणाला अन फोन ठेवला. स्वप्न मात्र त्यांचं बोलणं चोरून ऐकत व्हती. वीरने तिला पाहिलं पण न पहिल्यासारख त्याने केले अन आत निघून गेला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.