lust in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | वासना

Featured Books
Categories
Share

वासना

वासना (कादंबरी)

मनोगत
साहित्य विश्वातील माझी 'वासना' नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना आनंद होत आहे. या कादंबरीत मी साहित्यविश्वाला बोध देवू पाहात आहे. तो बोध म्हणजे जगात तंत्र, मंत्र, साधना व अंधश्रद्धा नाहीत. म्हणून त्यावर कोणीही विश्वास करु नये. तसेच त्याचा यु ट्यूब माध्यमातून प्रचार प्रसार करु नये.
या कादंबरीत एक युक्ती नावाची मुलगी. जी सुरेश नावाच्या व्यक्तीवर प्रेम करते. परंतू त्याचेकडून धोका मिळताच ती त्यासाठी तंत्र मंत्र शिकते. त्या तंत्र मंत्रांचा वापर करुन ती आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. परंतू ती खरंच तंत्रामंत्रात यशस्वी होते का? ती तंत्रा मंत्रानं काय करते?खरंच तंत्र मंत्र आजच्या जीवनात खरं असते का की ते थोतांड आहे? सुरेशचं शेवटी काय होते? युक्तीचं काय होते? इत्यादी प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी माझी ही पुस्तक वाचा.
माझी ही पुस्तक भूत या विषयावर आधारीत असून हिंमतवान व अठरा वर्षे वयाच्याच व्यक्तीनं वाचावी व वाचल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून एक फोन अवश्य करावा.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

वासना (कादंबरी)
अंकुश शिंगाडे



नुकताच शिशीर सुरु झाला होता. वृक्षांची पानगळ सुरु झाली होती. त्यातच ते गरम वारे मनाचा वेध घेत होते. ते तरुणपण तिचं आयुष्य फुलवत होतं. तिचं बालपण नुकतंच संपलं होतं व तिनं तरुणपणात पाऊल ठेवलं होतं. तिला काय माहित होतं की हेच तरुणपण आपल्याला पुढील जीवनात शापदायी ठरेल. कारण तिला पाहिजे तो अनुभव नव्हता त्यावेळी. ती त्याला वसंतच समजत होती. परंतू जसा वृक्षांच्याही जीवनात शिशीर येतो. तसा आपल्याही जीवनात तो येतोच. याची तिला कल्पना नव्हती.
युक्ती तिचं नाव. लहानपणापासूनच ती आपल्या आईवडीलांची लाडाची मुलगी. लहानपणापासूनच आईनं आणि वडीलानं तिचं लाड पुरवले होते. त्यातच ती आपल्या आईवडीलाच्या लाडानं आज तरुणपणात आली.
युक्तीचं लहानपण जावून ती तरुण झाली खरी. परंतू मायबापाचं तिकडं काही लक्षच पडलं नाही. त्यांना ती अजुनही लहानच वाटत होती. त्यांना ती तरुण झाली आहे असं कधीच वाटलं नाही.
युक्ती तरुण झाली आहे याची जाणीव तिच्या मायबापांना झाली नसली तरी तिच्या तारुण्याची जाणीव आजुबाजूच्या चाणाक्ष तरुणांना झाली. त्यांनी तिच्यामागं घिरट्या मारणं सुरु केलं. त्यातच मायबापांना एवढीशीही कल्पना न देता युक्ती अशा भिरभिरत्या भोव-यासोबत फिरायला लागली. त्यातच ती दारुपाणीही प्यायला लागली. तशीच नशाही. त्यातच आता ती नशेच्या एवढी आहारी गेली की आता तिला ती नशा केल्याशिवाय राहावणे कठीण होत गेले.
युक्तीला जशी दारु आणि नशायुक्त अंमली पदार्थाची सवय जडली. तशीच सवय तिला वासनेचीही लागली. ती तरुण मुलांसोबत फिरता फिरता त्या दारुच्या नशेत आपण काय करतो हेही तिला कळेनासं झालं. त्यातच ती वासनेच्याही आहारी गेली. वासनाच ती.........एकप्रकारे दारुचा छंद बरा. परंतू वासनेचा नाही.
मुलं लहानाची मोठी होतात. त्याचबरोबर त्यांच्या भावना बदलतात. त्यातच काही मायबापाची ती मुलं लाडाची असल्यामुळं ती त्याकडं लक्षच देत नाही.
अलिकडं जग एवढं व्यस्त झालं आहे की त्या जगाला कुणाकडं लक्षच द्यायला वेळ मिळत नाही.मोबाईल क्रांती झाल्यानं ती मुलं सतत मोबाईलमध्ये गुरफटलेली असतात की त्यांना मोबाईलमुळं त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं यांचा थांगपत्ताही लागत नाही.
मोबाईलक्रांती झाली आहे. जग अगदी जवळ आलं आहे. असं असलं तरी या मोबाईलनं अख्खी तरुण पिढीही बिघडवली आहे. आज याच मोबाईलच्या नादात पडून तरुण पिढी एकमेकांवर प्रेम करायला लागलेली असून ती तरुण मंडळी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम व मेसेंजरच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असतात. त्यांना मोबाईल माध्यमातून झालेलं प्रेम हे वैश्वीक प्रेम वाटतं. त्यातच ते त्या मोबाईल माध्यमातून असे वाहवत जातात की काही वेळ त्यांना मायबाप काय सांगतात तेही कळत नाही. तसेच काही काही तरुण तरुणी असे असतात की ते मोबाइलवर एकमेकांशी जे बोलतात, ते मायबापांनाही कळत नाही.
जीवनात वासनेला थारा नसावा असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. अलिकडे याच मोबाइल माध्यमातून तरुण मुलं एवढी बिघडली आहेत की त्यांना वासनेचा अर्थच सांगावा लागत नाही. अगदी लहान वयापासूनच्या मुलांना वासनेचा अर्थ आज माहित आहे. आज पुर्वीचा काळ गेला आहे आणि नवीन काळ आला आहे. जो पाश्चात्य विचारसरणीचा आहे. ज्या काळाला दोष देता येत नाही. कारण मोबाइल क्रांती.
पुर्वी असं नव्हतं. अगदी दहावीच्या वर्गात पोहोचतपर्यंत विद्यार्थ्यांना वासना म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय असतं. ते कळत नव्हतं. परंतू आज कळतं तेही अगदी तिसरीच्या वर्गात असलेल्या मुलांना. त्याचं कारण म्हणजे मोबाइल. मोबाइलवर असे काही गेम आले आहेत की जे गेम एका क्लीकवर उघडतात. मग त्यात वासनेच्या गोष्टी का असेना.मुलं मोबाइलवर व्हिडीओ पाहून हे सर्व शिकत असतात, मग त्यांचं अल्प वय असलं तरी.
अलिकडं सरकारनं विवाहाचं वय वाढवलं आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसंख्या वाढीचा प्रश्न. अलिकडे लोकसंख्या अगदी झपाट्यानं वाढत चाललेली आहे. त्या लोकसंख्येला रोखता येणे शक्य नाही. त्यासाठीच सरकारचं हे पाऊल. परंतू मोबाईलच्या क्रांतीनं अगदी वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच हुशार झालेली ही पिढी खरंच एकवीस वर्षापर्यंत थांबू शकते का? याचं कारण नाही असंच आहे. कारण आजचे विद्यार्थी वासनाप्रदान झालेली आहेत.
महत्वपूर्ण गोष्ट ही की विद्यार्थ्यांनी मोबाइल केवळ कामापुरताच वापरावा. त्याचा वापर चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी करावा. वासनेच्या गोष्टी शिकण्यासाठी नाही. मोबाइलला जीवनात थारा नसावा. वासनेला तर नक्कीच नको. कारण मोबाइलनं एक पिढी बरबाद होते. कारण आजच्या काळात मायबाप एकीकडे आपल्या मित्रांसोबत व्हाट्सअपवर बोलत असतात. अगदी त्याच वेळी मुलंही आपल्या आपल्या मित्रांसोबत अगदी तन्मयतेनं बोलत असतात. आपल्या मित्रांसोबत बोलण्याच्या तालात मायबाप हे विसरतात की मुलं काय करीत आहेत. ते तर मुलांचे मोबाईल देखील तपासून पाहात नाहीत. जे वय (१२ ते२१) मुलांना ख-या अर्थानं जोपासण्याचे असते. त्यांच्या जीवनात नवा बहार आणण्याचे असते. त्यांना घडविण्याचे असते. त्याच बयात मायबाप मुलांकडे लक्ष न देता मोबाईलच्या नादात अडकतात. मग मुलं बिघडणार नाही तर काय? मोबाईलनं एक पिढी गारद होते. परंतू मोबाईलच्या नादात पडून निर्माण झालेल्या वासनेनं अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या गारद होतात हे निर्वीवाद सत्य आहे.
मित्रांनो, आतातरी सुधरा. वासनेला आणि मोबाइलला जीवनात थारा देवू नका. त्याच्या वशमध्ये वा आहारी जावू नका. त्याला आपल्या वशमध्ये ठेवा. तेव्हाच तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकाल. अन्यथा नाही हे थोडंतरी लक्षात असू द्या.
युक्ती दारुच्या नशेसोबतच वासनेच्याही आहारी गेली होती. तिला आपण काय करतो ते कळत नव्हतं. त्याला जबाबदार तिचे आईवडीलच होते.
युक्ती दारुसोबतच कुणाशी शरीरसंबंध ठेवून आपल्या वासनेची इच्छा भागवत होती. परंतू असे तिचे लपूनछपून असलेले शरीरसंबंध काही दिवसानं तिच्या आईबाबाला माहित झाले. त्यातच तिच्या बाबानं त्या संबंधाला अग्रस्थान दिलं नाही. परंतू तिच्या आईनं त्या गोष्टीचा धसका घेतला व ती तिच्या मागं बडबडायला लागली. परंतू युक्ती काही आईचंही ऐकत नव्हती. त्यातच तिला शरीरसंबंधात सुख वाटलं व त्याच अल्लडपणाच्या नादात आपलं जीवन बरबाद करु लागली.
तिची आई शांत स्वभावाची होती. बाबाही तिचे शांत स्वभावाचेच होते. त्यांनी जीवनभर कोणत्याच अशाप्रकारच्या वासनेच्या वासनामय गोष्टी केल्या नव्हत्या. त्यांनी मोबाइल नक्की पाहिला होता. ती त्यांची गरज होती. कारण मोबाइल द्वारे ते केवळ आपल्या कंटाळवाण्या आयुष्याचं मनोरंजन करीत. परंतू युक्तीनं त्याला वासनामय स्वरुप दिलं.
आईला वाटत होतं की युक्ती अल्लड आहे. तिनं सुधरावं. कारण दारुची नशा एकप्रकारची परवडली. परंतू वासनेची नशा परवडत नाही. ती युक्तीला त्याच गोष्टी सांगत होती. परंतू युक्ती सुधारेल तेव्हा ना. ती सुधारायचे नावच घेत नव्हती.
युक्तीचं लहानपणाचं जीवन अल्लड होतं. ती लहानपणापासूनच वात्रट असून तिला मुलींशी मैत्री करणं आवडत नव्हती. त्यातच ती लहानपणापासूनच मुलांशी मैत्री करायची. कोणतेही खेळ खेळायचे झाल्यास ती ते खेळ मुलांशीच खेळायची, मुलींशी नाही. परंतू तो बाल्यावस्थेचा काळ होता. तोच काळ तिच्या पुढील जीवनाचे भाकीत ठरविण्याचा काळ होता. जसे मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, हे त्याच वेळी दिसत होतं. परंतू तिच्या मायबापानं त्याकडं विशेष लक्ष दिलं नाही. तिच्यावर त्याही काळात प्रेमच दाखवलं.
लहानपणी मुलं मुली एकत्र खेळत. विशेषतः विवाहाचेही खेळ खेळत. त्यातच त्या विवाह खेळात युक्ती स्वतः पती बनत असे. तसेच दुसरे खेळ होते कंचे, विटीदांडू. हे खेळ लहानपणी विशेषतः मुलं खेळत. परंतू युक्ती अत्यंत सफाईनं ते खेळ खेळायची. ती स्वतः ते खेळ खेळतांना आपण मुलगी आहो हे विसरुनच जायची.
घरी काम करणं तिला जमतच नव्हतं. ती घरी राहिली तरी एका कामाला हात लावत नसे. तशी आईही तिला त्रास देत नसे. ती सर्वात लहान असल्यानं तिला सुखच देत असे. यातूनच तिला मोबाइलचा छंद लागला.
मोबाइल त्यावेळीही वाईटच वस्तू होती. लहान मुलांना विशेषतः मोबाइल द्यायला हवा नव्हता. परंतू युक्ती मायबापाचा जेव्हा मोबाइल पाहात असे. तेव्हा त्या मोबाइल पाहण्याला वा त्याचेवर खेळ खेळतांना युक्ती दिसल्यास मायबापच विरोध करीत नसत. कधीकधी युक्ती मायबापाला माहित न करता मोबाइल हाताळत असे. त्यातील व्हाट्सअपवरील मायबापाचं संभाषण पाहात असे. त्यातच त्या संभाषणात अश्लीलता देखील असे. ती अश्लीलता ती आवडीनं वाचत असे.
युक्ती जसजशी मोठी होवू लागली. तसतशी तिला अश्लीलताही समजू यायला लागली. याच अश्लीलतेच्या नादात तिही मुलांशी त्याच मोबाईलवर बोलू लागली. तिनं काही मित्र पकडले व त्यांचेसोबत मायबापाला आडून तासन् तास बोलू लागली. ते मायबापाला माहित पडलं नाही. हळूहळू हा छंद वाढत गेला.
हळूहळू युक्तीचं मुलांशी असं अश्लील बोलणं. त्यातच काम नसतांना त्या मोबाइलवर बोललेलं असं अश्लील बोलणं. ते अश्लील बोललेलं डीलीट मारणं. डायल केलेला फोन क्रमांक डीलीट मारणं. त्या नंबरला तिच्या हातात मोबाइल येईपर्यंत ब्लाक ठेवणं ह्या गोष्टी ती अग्रक्रमानं शिकली होती. त्यामुळं की काय, तिचं बोलणं मायबापालाही समजलं नाही वा ते समजू शकले नाहीत.
युक्ती जसजशी मोठी होत आली. तसे तिचे मित्रही वाढू लागले. त्यातच शरीर आकर्षण देखील वाढायला लागलं. आता तर ती मुलींशी न बोलता चक्क मुलांशीच बोलू लागली. तशी हळूहळू ती आठवीला गेली.
युक्ती आठवीत जाताच तिला बायफ्रेंड गर्लफ्रेंडच्या गोष्टी कळायला लागल्या. त्यातच आता तिचा मोबाईलचा शौकही वाढला. त्यातच आता मित्रांशी तासन् तास बोलणं जमत नव्हतं. कारण तो मायबापाचा मोबाइल होता. शेवटी तिला मोबाइल हवाहवासा वाटायला लागला. तोही हक्काचा मोबाइल. म्हणून की काय, ती थोडी चिंताग्रस्त वाटायला लागली.
युक्ती तरुण झाली. ती शाळेत जात होती. ती आठवीत होती. त्यातच तिचे शाळेत लवकरच बायफ्रेंड तयार झाले होते. जे बायफ्रेंड तिची इच्छा पूर्ण करीत असत. तिनं कोणाला नाश्ता चारा जरी म्हटलं, तरी बायफ्रेंड तिला नाश्ता चारायला मागंपुढं पाहात नसत. त्यातच एक दिवस तिनं एका बायफ्रेंडला म्हटलं की त्यानं तिला मोबाइल घेवून द्यावा.
युक्ती त्याची गर्लफ्रेंड होती. ती त्याला हवीहवीशी वाटत असे. त्यालाही तिच्यासोबत फिरावसं वाटायचं. तोही गर्भश्रीमंत बापाचा मुलगा होता. त्याला पैशाची काही कमी नव्हती. त्यातच त्याला वाटलं की आपल्यापुढे अशी कोणीच तशी इच्छा प्रकट केली नाही, जी युक्तीनं केली. आपण तिला मोबाइल घेवून द्यावा.
त्याचं नाव सुरेश होतं. सुरेशही आठव्याच वर्गाचा विद्यार्थी होता. त्याच्याजवळही एक त्याचा स्वतःचा मोबाइल होता. जो मोबाइल तो स्वतःच अभ्यास करण्यासाठी वापरत होता. त्याच्या मायबापानं त्याला अभ्यासात अडचण येवू नये म्हणून त्याला स्वतंत्र्य मोबाइल घेवून दिला होता. तसं पाहता सुरेशचं घर म्हणजे एक सुखद परीवार होता. त्यांना पैशाची काही कमी नव्हती. त्याचे बाबा कोण्यातरी सरकारी नोकरीवर होते. त्यांना हक्काचं वेतन होतं. वेतनही भरपूर होतं. त्यातच त्यांना काळ्या मार्गानं भरपूर पैसा कमवायला मोकळीक होती. ते भ्रष्टाचारी मार्गानं लोकांना लुटून भरपूर पैसा कमवीत असत. त्यातच असा पैसा कमवीत असतांना त्यांचं परीवाराकडं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी आईही नोकरीवर असल्यानं आईनंही त्याकडं लक्ष दिलं नाही. सुरेश घरी काय करतो आणि काय नाही हेही सुरेशच्या मायबापाला समजत नव्हतं.
युक्तीनं त्याला तसं म्हणताच त्यानं त्याच्या जवळचा मोबाइल तिला दिला व म्हटलं,
"हा मोबाइल तुझ्याजवळ ठेव. मी जेव्हापर्यंत दुसरा मोबाइल घेत नाही, तेव्हापर्यंत याला बंद करुन ठेव. मी आईला मोबाइल हरवल्याचं सांगतो व दुसरा मोबाइल घेवून मागतो. तो येताच मी तुला सांगेन व आपण फावल्या वेळी एकमेकांशी बोलत बसू. तसं पाहता तू मला फार फार आवडतेस."
त्याचं बोलणं संपताच तिही म्हणाली,
"मलाही सुरेश तू फार फार आवडतोस बरं का."
तिनं त्याला आवडतोस म्हणताच तो सुखावला. त्यातच तिनं त्याचा मोबाइल घेतला व बंद करुन आपल्या दप्तरात टाकला. तसे दोघंही घरी जायला निघालो. जातांना हाय हल्लो नेहमीप्रमाणं सुरु होतं.


****************************************


सुरेश घरी आला होता. त्याचा चेहरा रडवेल्या भावाचा होता. रात्र होत आली होती. तसे त्याचे मायबाप घरी आले होते.
सुरेश नेहमीसारखा आज बोलत नाही. उदास बसलेला आहे हे पाहून त्याच्या आईनं चिंतेचं कारण विचारलं. तसा सुरेश म्हणाला,
"आई, माझा आज मोबाइल हारवला आहे. कुठे पडला ते माहित नाही."
सुरेशनं असं म्हणताच मायबापानं फोन लावून पाहिला. परंतू तो बंद असल्याचे दाखवत होता. त्यातच सुरेश म्हणाला,
"आई, मला दुसरा मोबाइल हवाय. माझा शाळेतील अभ्यास येतोय. मी कसा करणार." तसं त्यानं चेह-यावर रडण्याचे भाव आणले. तशी आई म्हणाली,
"बाळ रडू नकोस. मी सकाळीच तुला दुसरा मोबाइल घेवून देते."
आईनं तसं बोलताच व आश्वासन देताच सुरेशला बरं वाटलं. तो आपल्या आईला फसवत होता. चूक त्यानंच केली होती. प्रेमासाठी त्यानं मोबाइल युक्तीला देवून टाकला होता.
सुरेश मायबापाचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं त्याचं घरी लाड करणे सुरु होते. तसेच त्याच्या इच्छा देखील पुरवल्या जात असत. त्यातच आज सकाळ झाली होती.
सकाळ होताच आईनं आपल्या नोकरीवर जाण्याची लवकरच तयारी केली व ती जेवनखावण करुन नोकरीवर निघाली. त्यातच तिनं सुरेशला आपल्या गाडीवर बसवलं व त्याला मोबाइलच्या दुकानात नेलं व त्याला चांगल्या श्रेणीचा महागडा मोबाइल घेवून दिला. तसं त्याला शाळेत सोडून देवून ती आपल्या नोकरीवर निघून गेली.
ती शाळा........शाळा विद्यार्थ्यांना वळण लावायचे कार्य करते.
शाळा विद्यार्थ्यांना वळण लावायचे काम करते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण शाळेत अशी मुलं येतात की ज्यांना नीट बोलताही येत नाही. त्यांना नीट संस्कार म्हणजे काय हेही समजत नाही. अशी मुलं. ज्याला स्वतःचं शेंबूडही नीट पुसता येत नाही. शिक्षक त्यांना अगदी बोट धरुन शिकवतात. चालणं, वागणं शिकवतात. ती मुलं हळूहळू मुलांच्या सोबत वावरत वावरत शिक्षकांच्या सानिध्यात लहानाची मोठी होत असतात.
शाळा वळण लावते. त्यांचे जीवन अगदी कुंभाराच्या मातीच्या घड्यागत सजवते. परंतू जी मुलं आधीच अशा घरातील असतील की ज्या घरात पुरेसे संस्कारच नसतील, तर त्या मुलांना वळण लावू शकत नाही.
अलिकडं संस्काराच्या नावाखाली बारागाडे बोंब आहे. संस्कार काही बाजारात विकत मिळत नाहीत. ते संस्कार शाळेत आणि मायबापाच्या घरीच मिळत असतात तेही निःशुल्क. परंतू ते घेण्याची पात्रता विद्यार्थ्यांची असायला हवी. त्यासाठी त्याचे मायबापही त्या दर्जाचे असायला हवे. शाळेत संस्कार मिळत असते. परंतू त्याला काही अडचणी येतात. त्या अडचणी पुढीलप्रमाणे.
१) संस्कार शाळा देत असते. परंतू त्याला काही अडचणी येतात. पहिली अडचण म्हणजे न्यायालय. न्यायालय न्यायालयात न्यायनिवाडा करतांना एखाद्या प्रकरणात बारकाईनं विचार करीत नाही. ज्या देशातील निकाल हा न्यायालय देत असते. त्या न्यायनिवाड्याचा त्या देशातील नागरीकांवर कोणता परीणाम होईल याचा विचारच न्यायालय करीत नाही. ते फक्त पाश्चात्य विचारसरणीचाच जास्त विचार करीत असतात. काही दिवसीपुर्वी न्यायालयानं आपला देश महान असतांना व या देशात विवाह हा संस्काराचा एक महत्वपूर्ण पैलू असतांना लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निवाडा दिला. ह्या निवाड्यानुसार याही देशात लिव्ह इन रिलेशनशिपचे वारे वाहात असतांना व विवाह नावाचा महत्वपूर्ण संस्कार हद्द्पार होत असतांना कायद्याची गरज लक्षात घेवून व कायद्याचाही विकास व्हावा या उपक्रमातंर्गत पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं एक महत्वपूर्ण टिप्पणी केली. ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या जोडप्यांना संरक्षण द्यावं.
लिव्ह इन रिलेशनशिप........स्वतःच्या मनमर्जीनं तरुण तरुणींनी स्विकारलेला मार्ग. त्यांना मुलं हवी असतातच असे नाही. त्यांची फक्त एकच इच्छा असते, ती म्हणजे आपली कामेच्छा पूर्ण होणे. त्यासाठी ते हा मार्ग पत्करतात. त्यातच हे लिव्ह इन रिलेशनशिप त्यांच्या परीवाराला मंजूर नसतं. ते त्यांच्यावर आत्मघाती हमले करु शकतात. तसाच समाजही आत्मघाती हमले करु शकते. पालक यासाठी आत्मघाती हमले करतात. ती म्हणजे त्यांची अब्रू जाणे. ज्या घरची मुलगी अशी लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहते. त्यांच्या परीवाराला समाज दोष देत असतो नव्हे तर वाळीत टाकत असतो. त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही. म्हणून आत्मघाती हमले. तसा समाज आत्मघाती हमले करतो. कारण देशाची अब्रू. आमचा देश महान आहे. ह्या देशाची शान जावू नये. हा देश पाश्चात्य विचारांचा नक्की बनावा. परंतू ते पाश्चात्य विचार लिव्ह इन रिलेशनशिपनं वागून प्रस्थापित करु नये. पाश्चात्य विचार हे सांस्कृतीक बदलासाठी असावेत. संस्कृती बदलासाठी नाही.
या देशात मुघल आले. त्यानुसार इथे बुरखा पद्धती आली. ते ठीक आहे. कारण पूर्ण शरीर झाकून असतं. कोणाच्या अश्लील भावना वाढीस लागत नाहीत. परंतू इंग्रज आल्यानंतर अर्धनग्न संस्कृती आणणे आणि या देशात बलत्काराचे प्रणाम वाढविणे हे काही योग्य नाही.
अर्धनग्न संस्कृती.......ती ब्रिटनसारख्या भागात ठीक आहे. कारण ब्रिटनचा भाग दमट हवामानाचा असून त्या ठिकाणी अंगावर कपडे सहनच होत नाहीत. म्हणून तिथं अर्धनग्न कपडे वापरणे ठीक आहे. त्यातच त्या ठिकाणी भारतासारखी महान संस्कृती नाही. म्हणून तिथं लिव्ह इन रिलेशनशिप ठीक आहे. परंतू भारतात लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. कारण येथील संस्कृती महान आहे. त्यातच या संस्कृतीत अश्लीलतेला अजिबात स्थान नसल्यानं विवाहापुर्वीची लिव्ह इन रिलेशनशिपची अश्लीलता इथे खपत नाही. म्हणूनच समाज आत्मघाती हमले करतो. परंतू आता त्याला कायद्यानं संरक्षण दिलं आहे. ते म्हणजे लिव्ह इन रिलेशन पद्धतीनं राहात असलेल्या जोडप्यांनी जर पोलिस संरक्षण मागीतलं तर ते वेळोवेळी द्यावं लागेल. याचाच अर्थ असा की आता भोळ्याभाबड्या मुलींना श्रीमंत घरची मुलं फसवतील. त्यांना लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत एकत्र राहण्याला बाध्य करतील. त्या दरम्यान त्यांच्यावर आपली कामेच्छा दाखल करतील नव्हे तर भागवून घेतील. पुढे त्यांची कामेच्छा पूर्ण होताच त्यांच्यात दरार निर्माण होईल व त्याचाच परीणाम हा की त्यांच्यात विलगीकरण होईल अर्थात ते एकमेकांपासून दूर होतील.
पंजाब आणि हरयाणाचा न्यायमूर्ती अनुप चितकाराचा तो हायकोर्टाचा बेंच. त्या बेंचवर असलेला लिव्ह इन रिलेशनशिपचा खटला. दि. ०१ मार्चला दै नवराष्ट्र या वर्तमानपत्रात आलेली याबाबतची बातमी नागरीकांचे होश उडवून गेली. पाश्चात्य विचार सरणी नक्कीच बदलायला हवी. स्रीयांना स्वातंत्र्य नक्कीच मिळायला हवं. बुरखा जायला हवा. हे बरोबर आहे. ट्रिपल तलाकही नको. कारण त्यामुळं स्री स्वातंत्र्यावर गदा येते. परंतू लिव्ह इन रिलेशनशिप हे काही योग्य वाटत नसतांना व त्यावर वाद सुरुच असतांना आता नव्यानं त्याच कायद्याअंतर्गत त्याच रिलेशनशिप अंतर्गत राहणा-या लोकांना संरक्षण देणं. त्याला कायद्याचं पाठबळ मिळणं नागरीकांना योग्य न वाटणारं पाऊल आहे. परंतू न्यायालयच ते........त्यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांनी योग्य विचार करुनच न्यायदान केलं असेल. त्यांच्या मतानुसार जीवीत स्वातंत्र्यावर गदा येत असेल. कारण संविधान कलम व राज्याच्या तसेच संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार जीवासाठी संरक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.
बदल होणे काळाची गरज आहे. तो व्हायला पाहिजेच. परंतू असा बदल की विवाहापुर्वी एकत्र राहणे. कामेच्छा पूर्ण करणे. त्यातच पुत्रही राहणे. ही कामेच्छा पूर्ण होतात विलगीकरण. पुत्र एखाद्या अनाथालयात नाहीतर कच-याच्या ढिगा-यावर. पुत्रप्राप्ती करणे आणि पुत्र पैदा करणे ठीक आहे. परंतू पुत्र पैदा होताच त्याची विल्हेवाट कच-याच्या ढिगा-यावर होणे यात त्या बिचा-या नवजात बालकाचा कोणता दोष की त्याला शिक्षा मिळावी किंवा कामेच्छा पूर्ण होताच त्या स्रीला सोडणं यात त्या स्रीचा तरी कोणता दोष?
महत्वपूर्ण गोष्ट ही की लिव्ह इन रिलेशनशिपच्या याच प्रकारच्या विचारसरणीमुळं हा कायदा अजुनही कचाट्यातच सापडला आहे. त्याचं संरक्षण दूरच. असं असतांना पंजाबचं हायकोर्ट केवळ बदलाचा विचार करुन प्रेमीयुगलांना संरक्षण देतं नव्हे तर बाजू मांडतं की कायद्याचाही विकास व्हावा.
२) आपला देश हा महान देश आहे. आपल्या देशाची संस्कृती महान आहे. आदर्श अशी असलेली संस्कृती. या देशात मायबापाला देव संबोधलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेले संस्कार. हे संस्कार मायबाप देत असतात. परंतू ज्या घरचे मायबाप असे असतात की जे आपल्या मुलांच्या बोलण्याची शहानिशा न करता केवळ त्यांचे लाड पुरवून त्यांना हव्या त्या वस्तू मिळवून देतात. त्यांना हवं तसं वागू देतात. त्यांच्या हव्या त्या वागण्यावर आक्षेप घेत नाहीत. शिक्षक काही कुरकूर करीत असतील तर त्यांना धमक्या देतात. त्या घरच्या मुलांना शाळा कसं काय वळण लावू शकेल. तसेच कसे काय संस्कार टाकू शकेल. ही विचार करणारी बाब आहे.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की शाळा विद्यार्थ्यांना वळण लावायचे काम जरी करीत असेल. परंतू त्यासाठी शाळेला पोषक वातावरण हवे. त्यांच्यावर पाल्यांना रागविण्याबद्दल दबाव नसावा. त्यातच शाळेला न्यायालयाची पाहिजे त्या प्रमाणात भीती नसावी. तेव्हाच शाळेत संस्कार फुलवता येईल यात शंका नाही. तसेच विद्यार्थी वर्गालाही वळण लावता येईल यात शंका नाही. पण........कायद्याचा धाक असल्यास वा मायबापाची धमकी असल्यास ती शाळाही मागेपुढे पाहिल. यातूनच पुढे विद्यार्थ्यात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची इच्छा निर्माण होईल. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहतील. पुढे त्यांची कामेच्छा पूर्ण झाल्यावर एकमेकांना दोष देत सोडतील. त्यांना त्यांचे मायबाप जवळ घेणार नाहीत. ते एकमेकांना सोडतील. त्यातच त्यांच्या आत्महत्या होतील यात शंका नाही.
ते जेव्हापर्यंत एकत्रीत राहतील. तेव्हापर्यंत कायद्याच्या कलम २१ अंतर्गत संरक्षणही मागतील. त्यावेळी ते नादान असतील. त्याचा परीणाम वाईटच निघेल. परंतू तसा कायदाच असल्यामुळं त्यांना शाळाही काही बोलू शकणार नाही. पालकही काही बोलू शकणार नाही. तसा समाजही. कारण त्यांना कायद्याचं संरक्षण असेल. संस्कार त्यांच्यापासून केव्हाच दूर पळालेला असेल. यात शंका नाही.
सुरेशला त्याच्या आईनं शाळेत सोडलं. आज तसा तो लवकरच शाळेत गेला. तसा तो युक्तीची वाट पाहात बसला. त्यातच थोड्या वेळानं युक्ती आली. तिनं त्याला हाय करत हात दाखवला. तसा तो तिच्याजवळ गेला. तसं त्यानं तिला मोबाइल दाखवत म्हटलं,
"युक्ती माहित आहे. हा माझा नवीन मोबाइल. अजून सुरु व्हायचा आहे. दोन तीन दिवसानं सुरु होईल. तू मोबाइल आणला काय?"
त्यानं प्रश्न विचारताच ती म्हणाली,
"होय आणलाय. अजूनपर्यंत सुरु केला नाही."
"हं, करुही नको सुरु. अन् हं, उद्याला तू आधारकार्ड घेवून ये. तूला दुसरा नंबर घेवून द्यायचा आहे. कारण हा माझा नंबर आहे. या नंबरवर फोन यायला नको. म्हणून दूसरा नंबर. पैसे मीच देणार दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी. ठीक आहे तर. मग घेवून येशील बरं आधार नंबर."
तो बोलला. तशी वर्ग भरायची वेळ झाली. तसे ते वर्गात गेले.


****************************************


आज त्याचं वर्गात मन लागत नव्हतं. वर्गात शिक्षक शिकवीत होते. परंतू त्याचं लक्ष तिच्याकडं होतं. त्यातच तिही अधूनमधून त्याचेकडं पाहातच होती.
दोन तीन दिवस असेच निघून गेले. त्यातच आज त्याचा मोबाइल फोन सुरु झाला होता. त्यातच आज त्यानं तिलाही मोबाइल नंबर सुरु करणार असल्याचं सांगीतलं. तसा त्यानं तिचा आधारकार्ड सोबत घेवून तो दुकानात गेला. त्यानं दुसरी सीम घेतली व तिचा मोबाइल सुरु झाला. त्यानं त्याची त्या मोबाइल मध्ये असलेली जुनी सीम तोडून फेकून दिली.
ते दररोज शाळेत येत होते. परंतू आता त्यांचं अभ्यासात मन लागत नव्हतं. शाळेत असतांना तो मोबाइल चैटींग खेळत असे. तसा तो आता तिला पाहायला दररोज शाळेत येत असे.
सुरेशचं घर.........त्या घरात दुपारी कोणीच राहात नसे. एक नोकर होता. तोच संपूर्ण घराची दिवसभर देखभाल करीत असे. त्यातच त्याचे मायबाप दुपारी नोकरीवर निघून जात.
असाच तो एक दिवस. आज तो तिला शाळेच्या मैदानावर भेटला. मधली सुटी झाली होती. तसा तो तिला म्हणाला,
"आपण उद्या माझ्या घरी जावं का?"
"कशासाठी?"
"असंच जावूया. माझं घर पाहायला."
त्यानं तसं म्हणताच ती विचार करु लागली. तसा तो म्हणाला,
"काय ठरवलं? सांग ना लवकर."
"सांगू."
"होय सांग."
"होय, जावूया." ती म्हणाली. तसे तिनं डोळे झाकले व ती निघून गेली.
दुसरा दिवस असाच उजळला. तशी ती त्याला भेटली. तसा तो म्हणाला,
"जावूया का?"
तशी ती म्हणाली,
"ठीक आहे. जावूया. I am ready. मी तयार आहे."
तिचा होकार. तशी ती त्याचेसोबत जायला निघाली. तोही आपल्या घरी तिला नेण्यास तयार झाला.
थोड्या वेळात त्याचं घर आलं होतं. तसा आतून दरवाजा बंद होता. तशी त्यानं दरवाजाची बेल वाजवली. नोकरानं दरवाजा उघडला. त्याचबरोबर त्यानं पाहिलं की पुढे तो मालकाचा मुलगा सुरेश उभा असून त्याच्यासोबत एक मुलगीही आहे. ते दृश्य पाहात तो आश्चर्यचकीत झाला.
नोकरानं दरवाजा उघडताच तो तिला घेवून आतमध्ये गेला. तसा नोकर म्हणाला,
"बाळ, ही कोण?"
"ही माझी मैत्रीण. हिचं नाव युक्ती आहे. ही फारच चांगली आहे. परंतू काका, आपण बाबा आईला सांगू नका. वाटल्यास माझ्याकडून काही लागलं तर घ्या."
नोकरानं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"पण बाळ, हे ठीक नाही ना. जर तुझ्या आईबाबांना हे माहित झालं तर ते काय म्हणतील?"
"काही म्हणणार नाही. मी माझ्या मायबापाला चांगल्यानं ओळखतो. फक्त आपलं तोंड बंद करा म्हणजे झालं."
ते सुरेशचं वात्रट बोलणं. नोकर काय समजायचं ते समजला. तसा तो म्हणाला,
"पण बाळ........."
त्याचं बोलणं अर्ध्यातच कापत तो म्हणाला,
"ठीक आहे. मी सांगतो बाबांना तसं. सांगतो की हा व्यक्ती चोरुन चोरुन घरातील वस्तू विकतो. माझ्यापुढंच विकली वस्तू. परंतू मी सांगेन म्हटलं म्हणून हा आरोप करतोय. मग बाबा तुम्हाला काढून टाकतील नोकरीवरुन.तुमचा संसार उघड्यावर येईल."
मुलगा लहानच. त्यातच त्याचं मोठ्या माणसांसारखं बोलणं पाहून नोकर आश्चर्यचकीत झाला. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. तसा तो म्हणाला,
"ठीक आहे बाळ. तु हवं, तसा तू वाग. मला नोकरी प्रिय आहे. माझा परीवार माझ्यावर अवलंबून आहे. मी ब्र देखील काढणार नाही."
नोकराचं तोंड कायमस्वरुपी बंद केलं होतं सुरेशनं. आता तर त्याचेसाठी रानच मोकळं झालं होतं. त्यातच आता तो वारंवार तिला घरी आणू लागला. काही प्रेमाच्या गोष्टी बिनधास्त करु लागला. तिही त्याला प्रतिसाद देवू लागली.


****************************************


ते दहावीचं वर्ष होतं. तो अभ्यास करीत होता. त्याचे वडील ऑफिसर होते. त्यांना मुलांच्या करीअरकडं लक्ष देणं गरजेचं होतं. दोन वर्ष असेच निघून गेले होते. परंतू हे दहावीचं वर्ष. त्याचे आईबाबा दररोज त्याच्या अभ्यासाकडं लक्ष देत होते. आता त्याला ती आवडत नव्हती. तो तिच्यापासून बोर झाला होता. तिला मात्र तो आवडत होता.
तो आपल्याकडं पाहात नाही. आपल्याला टाळतो असं समजून ती विचार करीत होती. त्यातच कोणीतरी तिला एक युक्ती सुचवली. कोणीतरी म्हणालं,
''युक्ती, तू एक नाटक कर."
"कोणतं?"
"तू एखादा मित्र बनव. फक्त मित्र. त्याचेसोबत फिरत जा. म्हणजे तो जळेल व तो तुझ्याकडे येईल."
भोळीभाबडी युक्ती. कोणीतरी तिला उपाय सुचवताच तिनं आणखी एक मित्र पकडला. ती त्याचेसोबत सुरेशसमोरच फिरु लागली. त्यातच ते फिरणं सुरेशही पाहू लागला. तसा तो श्रीमंत बापाचा मुलगा.त्याला तिच्याकडं पाहण्याची वा बोलण्याची जरादेखील लालसा नव्हती. परंतू युक्तीचं त्याचेवर निरतिशय प्रेम होतं. त्याच प्रेमाला मिळविण्यासाठी ती वारंवार प्रयत्न करीत होती. वेगवेगळे उपायही करीत होती. त्याला आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी........परंतू तिचे सगळे प्रयोग विफल होत होते.
युक्तीचं ते सुरेशवर असलेलं निरतिशय प्रेम. त्यातच सुरेशनं तिचा उपभोग घेवून तिला सोडून दिलं होतं. तिनं त्याचं प्रेम मिळविण्यासाठी एक मित्रही पकडला. ती त्याचेसोबत फिरुही लागली. परंतू त्याची वासनेची इच्छा तृप्त झाल्यानं त्यानं तिला सोडून दिलं होतं. तसा त्याचा तिला फार राग येत होता. त्यामुळं की काय, ती मनातल्या मनात त्याचा द्वेष करीत होती. तिला त्याचेसोबत रंगविलेले जुने दिवस आठवत होते. त्याचबरोबर ती अति घायाळ होत होती.
ते......तिचं असलेलं सुरेशवरचं निरतिशय प्रेम मिळविण्यासाठी कोणीतरी तिला पुन्हा उपाय दिला. तो उपाय म्हणजे तंत्रसाधना. त्या तंत्राच्या साहाय्यानं तू त्याला वशमध्ये करु शकते वा बरबाद करु शकते. असं तिला कोणीतरी सांगीतलं होतं. तिला ते ऐकताच वाटत होतं की आपण त्याला आधी वशमध्ये करु व नंतर त्याला बरबाद करु.


****************************************


तंत्रसाधना.......ती तंत्रसाधना तिला शिकायची होती. परंतू कोण शिकविणार? तिच्यासमोर प्रश्न उभा होता. शिवाय ती बेकारच गोष्ट. कोणाला माहित झाल्यास नावबोटं ठेवतील. काय करावं ते सुचत नव्हतं. शेवटी तिनं त्यावर उपाय काढला. आपण हे दहावीचं वर्ष कसंतरी काढावं. जेणेकरुन पुढील वर्षी महाविद्यालयाच्या नावानं महाविद्यालयात जातो असं सांगता येईल व तंत्रसाधना शिकता येईल. दरम्यान सुटीच्या काळात तंत्रसाधनेवरील पुस्तकं वाचन करता येतील. अशीच ती दहावीची परीक्षा येवून ठेपली.
दहावीची परीक्षा.......त्या परीक्षेचे पेपर तिनं दिले होते. त्यातच हा तप्त उन्हाळा तिनं आपल्या आईसमोर हट्ट धरला की तिला आजोळी राहायचं आहे. ते आजोळ. ज्या आजोळी कोणीतरी तंत्रसाधना करणारा तिच्या मामाच्या शेजारीच राहणारा गृहस्थ आहे. तो तंत्रसाधना करतो.
युक्तीचा तो हट्ट. आईला म्हटल्यानुसार आईनं या उन्हाळ्यात तिला आजोळी राहण्याची परवानगी दिली. जे तिच्या मामाचं गाव होतं.
ते रामपूर नावाचं गाव. गाव लहानसं होतं. परंतू त्या गावात तंत्रमंत्र पारंगत असलेली काही घरं होती. एक घर तर असं होतं की जे तिच्या मामाच्याच घराजवळ होतं.
युक्तीला ती तंत्रविद्या शिकायची होती. परंतू तिनं ते सांगीतलं नाही. तिनं फक्त आजोळची आठवण येत आहे हेच सांगीतलं. त्यातच ती जिद्द करुन मामाच्या गावी म्हणजेच आजोळी गेली.
युक्ती जेव्हा लहान होती. तेव्हा ती कधीकधी मामाच्या गावी येत असे. ते मामाचं गाव, ज्या गावात तंत्रमंत्र चालत असे. ती जेव्हा मामाच्या गावी येत असे. तेव्हा ती बाजूच्या घरीही जात असे. त्याच शेजारच्या व्यक्तीच्या घरी तंत्रमंत्राचे कार्यक्रम चालत असत. त्यामुळं तिनं आजोळी जाण्याचा निश्चय केला होता.
आजोळी जाताच ती अगदी गोडीगुलाबीनं राहू लागली. त्यातच ती तंत्रविद्या शिकण्याची संधी शोधू लागली. काही दिवस असेच गेले. एक दिवस ती स्वतः बाजूच्या घरी गेली. तिनं पाहिलं की त्या शेजारच्या घरी एक कमरा आहे. ज्या कम-यात माणसाची कवटी वर आड्याला टांगलेली आहे. तसेच एका खांबावर काही हाडं बांधलेली आहेत. एक देवघर आहे. ज्या देवघरात काही झाडण्या आहेत. ज्या झाडण्यांना मोराचे पंख लावलेले आहेत. तसेच त्या शेजारच्या घरचा तो कमरा. त्या शेजारच्या घरी त्या कम-यात एक व्यक्ती बसलेला असून तोही तरुण आहे.
युक्ती त्या कम-यात अगदी बिनधास्त गेली.
"ये युक्ती ये. परंतू इथे तू कशाला आली?" एक तरुण. जो तिथं बसलेला होता. तो म्हणाला.
तो कमरा. लोकं त्या घरातच जात नसत. लोकांना असं वाटत असे की त्या कम-यात गेल्यास त्या कम-यातून कोणीच बाहेर येत नाही. त्या कम-यात एक भूत असून तो भूत तिथे जाणा-या व्यक्तीला मारुन टाकतो.आई बाईनं तर तिथं अजिबात जावूच नये.
असा तो कमरा. त्या कम-यात कोणी जात नसत. त्यातच विशेषतः स्रिया जात नव्हत्या. परंतू युक्ती अगदी बिनधास्तपणे त्या कम-यात गेली.
"मी युक्ती. मला तंत्रविद्या शिकायचीय."
"तंत्रविद्या! ही अशी तशी शिकता येत नाही. त्यासाठी दोन अटी आहेत."
"कोणत्या अटी आहेत?"
"पहिली अट म्हणजे बळी द्यावा लागणार. त्यासाठी बळी द्यावा लागतो. बोल देणार!"
युक्ती विचारात पडली. बळी द्यायचा. कोणाचा बळी. कोंबड्या बक-याचा बळी असेल. तशी ती म्हणाली,
"होय देणार. केव्हा हवाय बळी?"
"कोणाचा देणार?"
"कोंबड्याचा. त्यात काय एवढं?"
"नाही. तंत्रविद्या शिकण्यासाठी माणसांचाच बळी लागतो. हं, लहान मुल असलं तरी चालेल. बोल देणार!"
ती ते ऐकताच आश्चर्यात पडली. तशी ती म्हणाली,
"आणि दुसरी अट?"
"दुसरी अट म्हणजे पूर्ण नग्न होवून शिकावी लागेल ही तंत्रविद्या."
"नग्न होवून आणि तेही तुमच्यासमोर."
"होय. माझ्याचसमोर. मीच शिकविणार तुला तंत्रविद्या. बोल मंजूर आहे का तुला? नसेल मंजूर तर लवकर जा बाहेर."
"असं रागावू नका. मी विचार करीत आहे. निर्णय घेतांना थोडा वेळच लागणार की नाही."
"बरं सांग लवकर तुझा निर्णय."
ती विचार करु लागली. तशी तिला तंत्रविद्या शिकायचीच होती. त्यामुळं की काय तिनं लवकरच उत्तर दिलं.
"मला दोन्ही अटी मान्य आहेत. आता शिकविणार ना विद्या?"
"होय शिकविणार. परंतू तू त्या अटी पूर्ण केल्यावर. जा आता तू. लोकांच्या येण्याची वेळ झाली आहे आणि हं, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. नाहीतर मी इथूनच एक फूक मारणार व तुला मारुन टाकणार. मग तूला तंत्रविद्याही शिकता येणार नाही."
"एक प्रश्न विचारु का तुम्हास?"
"हो विचार."
"किती दिवसात शिकता येईल ही विद्या?"
शिकण्याची अतूट इच्छाशक्ती जर असेल तर फक्त सहा दिवसात ती विद्या शिकता येते. नाहीतर त्याला सहा महिनेही लागू शकतात."
"ठीक आहे तर मी येते लवकर."
युक्ती लवकरच बाहेर निघाली. ती त्या कम-यातून बाहेर निघताच तिला त्या दोन्ही अटी आठवत होत्या. त्या दोन्ही अटी तिला परेशान करीत होत्या.
युक्ती मामाच्या घरी राहात होती. त्यातच तिच्या ती तंत्रविद्या शिकण्याची लालसा होती. तिला वाटत होतं की आपण सुरेशला वश करुन बरबाद करुन सोडावं. परंतू त्यात दोन अटी होत्या. त्या दोन्ही अटी विचित्र अशा होत्या आणि कठीणही तेवढ्याच होत्या. पहिली अट म्हणजे नरबळी. तो कोणाचाही लहान मुलगा उचलून केव्हाही आणता येईल. परंतू दुसरी अट. तिही विचित्र. त्या तरुणासमोर नग्न होवून शिकणं आणि त्यानं माझी अब्रू लुटली तर.......
युक्तीचा तो विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यातच तिनं विचार केला की तंत्रविद्येसाठी आपली अब्रू लुटली गेली तरी चालेल. आपण ती विद्या शिकायचीच. आपलं शरीर त्याला दिल्यास काय वाईट आहे. बदल्यात आपल्याला ती विद्या शिकायला मिळेल. विद्या शिकण्याचं शुल्कही वाचेल आणि शेवटी आपली अब्रू तरी राहिली का? ती अब्रू तर त्या सुरेशनं वारंवार लुटून नेली. किती प्रेम केलं होतं मी त्याचेवर. त्यानं मला धोका दिलाय. आता माझी या माणसानं अब्रू लुटली तरी चालेल. ज्या अब्रूत काही शिल्लकच राहिलं नाही. तिला जपून काय उपयोग.
तिचा तो विचार. तो वाईट विचार होता. परंतू तिला तो विचार म्हणजे एक चांगला विचार वाटत होता. ती आता संधी शोधत होती. नरबळी देण्यासाठी कुणाच्या लेकराची वाट पाहात होती. तसा तो एक दिवस चालून आला.
युक्ती रोजच नरबळी देण्यासाठी लेकरु शोधत असे. एकदाचा तो दिवस. तोच नामी दिवस ठरला तिच्यासाठी. त्याच गावातील एक मुलगा एकटाच खेळत असतांना तिला दिसला. तप्त उन्हाळा असल्यानं सर्वजण कुलर लावून घरात झोपले होते. त्यांची मुलंही त्यांच्यासोबत घरातच पहूडली होती. एक मुलगा मात्र एकटाच रडत बसला होता बाहेर. त्याला आईनं शिक्षा म्हणून बाहेर उभे ठेवले होते. कदाचित त्यानं खावूसाठी आईजवळ हट्ट धरला होता. तशी त्याची आई त्याची चिंता न करता घरातच झोपी गेली होती.
युक्तीला तीच नामी संधी वाटली. ती हळूच त्याचेजवळ गेली. त्याच्या हातात खावू ठेवला. तसा तो बाळ चूप झाला. तशी ती इकडं तिकडं पाहू लागली. आजुबाजूला कोणीच नाही याचा वेध घेवून तिनं त्याला कडेवर उचललं व म्हटलं की ती त्याला आणखी खावू घेवून देते.
खावूच्या लालसेनं बाळ चूप झाला होता. इवलासा तो जीव त्यानं रडणंही बंद केलं होतं. त्यातच त्या बाळाला घेवून ती सरळ त्या तांत्रीकाच्या घरात शिरली. जिथे तो तांत्रीक बसला होता. त्यानं युक्तीला पाहिलं. म्हणाला,
"आणलं बाळ?"
"होय आणलं."
ती अंधारी कोठडी. बाळ टाहो फोडत होता. तसं तिनं पटकन त्याच्या तोंडात कापड भरलं. तरीही ते बाळ तिला त्रास देत असलेला पाहून तिनं त्याच्या टाळक्यात एका दगडाचा वार केला.
मुलाच्या टाळक्यात दगडाचा वार होताच मुलगा बेशुद्ध पडला.
बाळ तिच्या हातात होतं. तिनं तांत्रीकाच्या समोरच त्याला बेशुद्ध केलं. तांत्रीक ते दृश्य पाहात होता. तो काय समजायचं ते समजला. त्याला वाटलं की हिच्या मनात तंत्रविद्या शिकण्याची इच्छा आहे. आपण ही तंत्रविद्या शिकवू. पण बदल्यात हिला शरीरसुखही मागू.
ते निरागस बाळ. त्या तांत्रीकानं त्या बाळाला आपल्या देवघरात लोटवलं. तसा तो त्या बाळाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करु लागला. त्याच्या डोळ्यावर तो पाणी मारु लागला. थोड्याच वेळात ते बाळ शुद्धीवर आलं. तसं पाहता त्या तांत्रीकानं त्याचे हातपाय बांधून ठेवायला सांगीतले होते. त्या बाळानं शुद्धीवर येताच कुठे जावू नये हा विचार होता त्याच्या मनात.
बाळ शुद्धीवर येताच व रडू लागताच तांत्रीक म्हणाला,
"युक्ती चल ये लवकर. मी पकडतो याचं मुंडकं. तू सुरा फिरव. आपल्याला याचा बळी द्यायचा आहे. बळी दिल्याशिवाय आपला शैतान जागणार नाही व तुला तंत्रविद्या काही शिकता येणार नाही."
युक्ती काय समजायचं ते समजली. तिही तरुणच होती. तशी ती म्हणाली,
"ठीक आहे. पण माझी सुरा फिरवायची हिंमत होणार नाही."
"तुला सुरा फिरवावाच लागेल. तंत्रविद्या तुलाच शिकायची ना."
"होय."
"मग फिरव सुरा. मी पकडतो याला. अगदी बिनधास्त फिरव. घाबरु नकोस. तंत्रविद्या शिकल्यावर असे प्रत्येक वर्षी केवळ मंत्रानं जीवं घ्यावे लागतात. मग कशी घेशील जीव?"
"ठीक आहे तर. मी प्रयत्न करते."
युक्तीनं सुरा हातात घेतला. तसं ते निरागस बाळ आणखी रडत होतं. परंतू त्याच्या तोंडात कापड अगदी घट्ट कोंबलेलं होतं. तो आवाज कसा काढणार.
युक्तीनं हातात धरलेला सुरा. सुरा धारदार आणि तिक्ष्ण होता. तसे त्या तांत्रीकानं त्या मुलाचे हात पाय अगदी घट्ट धरले. मान वर केली. तसं त्याच्या छातीवर एक पाय ठेवला व युक्तीला म्हणू लागला.
"हं, युक्ती आता चालव सुरा. तुला तंत्रविद्या शिकायची आहे."
युक्ती पार घाबरली होती. परंतू तिच्यासमोर नाईलाज होता. हिंमत होत नव्हती त्याला कापायची. परंतू कोणताच त्यावर उपाय नव्हता. शेवटी नाईलाजानं तो धारदार सुरा तिनं त्याच्या मानेवर ठेवला. मनात विचार आणला की आपण जणू सुरेशलाच कापत आहो. तशी ती सुरा फिरवू लागली अगदी त्वेषानं. तशा त्या मानेतून रक्ताच्या चिरकांड्या तिच्या चेह-यावर उडू लागल्या. थोड्याच वेळात तिचा चेहरा लालबुंद झाला होता.
बाळाच्या मानेवर सुरा चालताच बाळ काही वेळ तडपलं. काही वेळातच ते शांत झालं. तसा थोड्या वेळात तो तांत्रीक म्हणाला,
"युक्ती जा. तुझे कपडे जाळून टाक. चेहरा धुवून टाक आणि तू आणलेले नवीन कपडे घाल. मी सांगीतलं होतं ना की एक नवीन ड्रेस आणशील. तो याचसाठी. अगं जीव घेतांना ज्या रक्ताच्या चिरकांड्या उडतात ना. ते कपडे पुरावे सापडू नये म्हणून जाळून टाकावे लागतात."
"हो, खरं आहे. पण तुम्ही माझ्या हातून हे अगदी तरुणपणातच पाप करवून घेतलं. देव मला कधीच माफ करणार नाही."
"अगं, ही तंत्रविद्या आहे. इथं देवाचं नाव काढू नकोस. तंत्रविद्या शिकायची आहे ना तुला. मग सगळं सहन कर. तंत्रविद्या शिकणं काही सोपं काम नाही."
"बरं. पण आता त्या बाळाची आई त्याला शोधणार. ती पोलिसात जाणार. आपली तक्रार देणार. मग आपण सापडणार नाही का?"
"नाही सापडणार."
"का नाही सापडणार."
"त्यासाठी बाळ इथं असणारच नाही."
"म्हणजे?"
"तो आपल्या पोटात असणार."
"अर्थात?"
"आपण या बाळाला खाणार."
"खाणार म्हणजे? तुम्ही नरभक्षी का?"
"हो, मी आणि आता तूही."
"मी.........छे! मी नाही खाणार."
"तू नाही खाणार तर मग तंत्रविद्या कशी शिकता येईल! तुला खावंच लागेल."
ती विचार करीत होती. किती विचित्र माणूस आहे हा. पहिलं सांगीतलं बाळाला आण. नंतर त्या बाळाचा माझ्याच हातानं जीव घ्यायला लावला अन् आता म्हणतो की त्याचं मांसही खावं लागणार. तंत्रविद्येचा वास्ता देतोय. खरंच याला तंत्रविद्या येते की काय? परंतू जावू द्यावे. आता ते काढून काही उपयोग नाही. तंत्रविद्या शिकायचीच असेल तर मला नाईलाजानं हे सर्व करावंच लागेल.
थोड्या वेळाचा अवकाश. तिनं हातपाय धुतले. त्यातच तिनं नवीन ड्रेसही परीधान केला. त्यातच तो त्या मुलाचं मांस कापू लागला. त्या मांसाचे छोटे छोटे तुकडे ताटात ठेवू लागला. तसा तो म्हणाला,
"खा युक्ती, तुला जेवढं लागते तेवढं मांस खा." असे म्हणतच तो ते मांस खावू लागला.
"कच्च मांस! मी कच्च मांस खावू!"
"होय. तंत्रविद्येत कच्चच मांस खावं लागते. तुला नक्कीच शिकायची ना तंत्रविद्या?"
"होय." ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
"मग मी जे जे म्हणतो ते ते कर."
ते मांसाचे गोळे. ती त्या तांत्रीकाच्या बोलण्यानुसार पोटात कोंबू लागली. ते मांसाचे तुकडे तिला खावेसेही वाटत नव्हते. तरीही ती ते तुकडे नाईलाजानं तंत्रविद्येसाठी पोटात कोंबत होती. थोडाच वेळ........ते तुकडे खावून पोट भरताच त्यानं ढेकर दिली. तसा तो म्हणाला,
"आता कपडे काढ. पूर्ण कपडे काढायचे बरं का? अंगावर एक छदामही नको. खालंचंही वस्र नको."
"तुमच्यासमोर!"
"होय. ही अट सांगीतली होती तुला मी."
ती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"नाही काढले तर."
"आताही जावू शकतेस."
ती पुन्हा विचार करु लागली.,आपण तंत्रविद्येसाठी एवढं सगळं केलं. बाळाचा जीव घेतला. त्याचं कच्च मांसही खाल्लं. आता नग्न झालं तर काय हरकत आहे. तशी ती अट होतीच. तिनं घट्ट डोळे बंद केले. तशी ती म्हणाली,
"उतरवा तुम्हीच कपडे."
"नाही. तूच उतरव तूझे कपडे."
त्या मांत्रीकाचा तो आदेश. तिनं घट्ट डोळे मिटले व ती एकेक कपडे काढू लागली. आता पुरती ती पूर्णतः नग्न झाली होती. तो मात्र उघड्या डोळ्यानं ते सर्व पाहात होता.
ती पूर्णतः नग्न होताच त्याच्या मनातील वासना जागृत झाली. तसा तो म्हणाला,
"ये युक्ती आता डोळे उघड. पाहा पूर्ण शरीराला."
"मला नाही बघायचंय."
"मग पूजा कशी करशील."
"मला नाही करायचीय पूजा."
"मग एवढा खटाटोप का केलाय."
"अं, जावू द्या."
तिचं बोलणं संपलं होतं. तसा त्यानं तिचा हात पकडला. तिला आपल्याजवळ बसवलं. प्रेमानं कुरवाळलं. त्याचबरोबर तिच्या अंगातून अग्नीज्वाळा निघाल्या. त्यातच तिच्या शरीरावर यथेच्छ ताव मारुन तो तांत्रीक शांत झाला.
तांत्रीक शांत होताच त्यानं त्याच अवस्थेत तिला पुजेवर बसवलं व तो काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. तसे मंत्र तिलाही बोलायला लावत होता. तिही आज उदासल्या अवस्थेत ते मंत्र त्याचे मागोमाग पुटपुटू लागली. तसेच पुजाही करु लागली.
आता रोजच दुपार व्हायची. रोजच मामा मामी कामावर शेतात जायचे. मामामामी शेतात गेले की ती त्या तांत्रीकाच्या घरी जायची. काही वेळ रंगरलिया खेळायची व नंतर मंत्र तंत्र पठन करायची. तशी तिची ती दिनचर्या बनली होती. तोही तिच्या तारुण्यावर फारच खुश होता.


***************************************


तो बाळ अचानक गायब होताच ती चर्चा सा-या पंचक्रोशीत पसरली. कोणी म्हणत होतं की या गावात ही घटना पहिली नसून अशा घटना यापुर्वीही अनेकदा घडल्या आहेत. कोणी भूत या गावात आहे की जो लहान लहान मुलांना गायब करीत असतो. परंतू हे भुतानं मुलाला गायब करणं त्या बाळाच्या मायबापाला पटण्यासारखं नव्हतं. त्यांनी पहिल्यांदाच ती मुल गायब होण्याची तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनला टाकली होती.
युक्ती काही दिवस गावातच राहिली. ती त्या सखारामसोबत दररोज रंगरलिया मनवीत असे नव्हे तर ती तिची दिनचर्याच बनली होती. रंगरलिया मनवून झाल्यानंतर ती त्याच नग्न अवस्थेत त्याचेसोबत पुजेला बसत असे.
आज युक्तीच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. त्यातच सखारामनं तिला तांत्रीक विद्येचे पुरेपूर ज्ञान दिले होते. बदल्यात कोणतेही शुल्क घेतले नव्हते. कारण त्याला तिच्या शरीराचा उपयोग घ्यायला मिळाला होता. ते शरीरसुख त्याला पैशापेक्षाही मोठं वाटलं होतं.
"माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत. मी लवकरच जाणार आहे." युक्ती त्याला म्हणाली. तसा तो म्हणाला,
"मग केव्हा येणार?"
"येईल मधामधात. कारण तुम्ही मला ते शरीरसुख दिलं. त्याचबरोबर तंत्रविद्याही. मी हे सगळं कसं विसरेल."
"हं, एक सांगतो. जाण्यापुर्वी तू गुरुपुजन करुन घेशील."
"म्हणजे?"
"अगं, ह्या मी दिलेल्या विद्येचा तुला वापर करता यावा म्हणून ही गुरुपुजा. नाहीतर हे मंत्र तंत्र तुझ्या काही कामात पडणार नाहीत. तसेच ह्या मंत्रांचा वापर केल्याबरोबर एक एक मंत्र नष्ट होईल नव्हे तर त्याची शक्ती कमी होईल."
"ती कशी करतात?"
"एक कापड आणशील आणि पुजेचं साहित्य व एक सडका अंडा."
"ठीक आहे." तिनं होकार दिला.
एक दिवस तिनं एक दुपटा विकत घेतला. त्यात पुजेचं साहित्यही. तसंच एक सडकं अंडही मिळवलं. ते त्याला दिलं. त्यानं तो दुपटा त्या शैतानासमोर पसरवला. त्यावर तांदळाची रास ठेवली. त्या राशीवर हळद कुंकू व पुजेचं साहित्य ठेवलं. बाजूला एक पाण्यानं भरलेला तांब्या ठेवला व मंत्र पुटपुटला. त्यानंतर त्यानं तिला सर्व मंत्र बिनपाठ बोलून दाखवायला लावले. तद्वतच तिनं ते मंत्र बोलून दाखवले. त्यानंतर ते तांदूळ तिच्या ओटीत ओंजळीनं ओतले व तिला तिच्या हातात पाणी देवून ते प्राशन करायला लावले व जोरात म्हणाला,
"हे शैताना, हिची विद्या फलदायी होवू दे. हिला हिच्या कामात यश मिळू दे. ज्यासाठी ही विद्या शिकली असेल. तसेच हिच्या कामात बाधा उत्पन्न होवू देवू नकोस."
तो दगडरुपातील शैतान काहीच बोलला नाही. परंतू तो तिला म्हणाला,
"जा, तुला शैतानानं कौल दिला. तुझी विद्या फलदायी होईल. मात्र एक लक्षात ठेव. ज्यामध्ये दुस-याची चूक नसेल, जो निरपराध असेल, त्यावर तुझी विद्या कधीच चालणार नाही. तू कितीही प्रयत्न केला तरीही. तसंच एक लक्षात ठेव. जर तू या विद्येचा गैरफायदा घेवून सुख मिळविण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे गंभीर परीणाम तुला पाहायला मिळतील व ते गंभीर परीणाम तुला भोगावेच लागतील."
ते ऐकताच तिनं मानेनंच होकार दिला. तसं ते बोलणं पूर्ण होताच तिनं त्याचा निरोप घेतला व ती दुस-या दिवशी गावाला रवाना झाली.

****************************************

बाळ अदृश्य होण्याच्या कितीतरी घटना गावात घडल्या याची साक्ष गावक-यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलिस तपास करीत होते. परंतू अद्यापही त्यांना त्या प्रकरणाचा छडा लागत नव्हता वा गावातच कोणी नरभक्षी आहे याची पुसटशीही कल्पना पोलिसांना वा गावाला नव्हती. कारण मुलं पळवून नेतांना कुणीही पाहिलं नव्हतं.
त्या तांत्रीकाचं नाव सखाराम होतं. ती पोलिसस्टेशनची केस......... पोलिस गावात फिरत होते. ते प्रत्यक्ष पुराव्यासह कुणाच्याही घरात शिरु शकत नसत. त्यामुळं की काय सखारामचं चांगलं भागत होतं. परंतू आता पोलिस गावात फिरतांना दिसताच सखारामच्याही मनात भीती निर्माण झाली व त्यानं आपला अड्डा बदलविण्याचा विचार केला. तो विचार करु लागला की आपलं हे साहित्य न्यायचं कुठं? क्षणातच त्याला उपाय सापडला. आपलं हे साहित्य दूर स्मशानात न्यायचं. ज्या स्मशानात कोणीही जास्तवेळ भटकू शकणार नाही व आपलं कामंही सुकर होईल.
विचारांचा अवकाश........त्यानं ते साहित्य स्मशानात तर ठेवायचं ठरवलं. परंतू त्या स्मशानात एखादा गावात मरण पावल्यास तो स्मशानात येईल व आपलं बिंग फुटेल. शेवटी विचार करुन स्मशानालगत असलेल्या जंगलात ते बस्तान बसविण्याचं ठरवलं.
गावचं स्मशान हे जंगलातच होतं. गावची माणसं त्या जंगलातीलच लाकडं तोडून चिता जाळायची व्यवस्था करीत असत.
ते जंगल वन्यप्राण्यांनी आणि हिंस्र पशूंनी भरलेलं असे. त्या जंगलात जातांना एकदोन लोकं जात नसत तर त्यांना समुहानं जावं लागायचं. कारण अशा कितीतरी घटना झाल्या होत्या की गावातील कितीतरी माणसांवर हिंस्र पशूंनी हमले केले होते. त्यातच त्यांचा बळीही गेला होता. असं ते जंगल भयंकर वाटत होतं.
सखारामनं विचार केला. तसा तो त्याच स्मशानाच्या लगत असलेल्या जंगलात कुणाला ठाऊक न करता जमीन खोदू लागला. ती जमीन खोदल्यानंतर त्याच जमीनीत त्यानं आपला अड्डा बनवला व त्या अड्ड्यातच त्यानं आपलं साहित्य हलवलं. तो अड्डा एवढा लांबरुंद होता की त्या ठिकाणी दोन माणसं व्यवस्थीत बसू शकतील. वरुन त्यानं झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा टाकला होता. आता सखारामला कोणतीच भीती नव्हती. तो मनसोक्तपणे आणि मनमर्जीपणानं तिथं राहू लागला होता. त्यानं युक्तीसारख्या कित्येक मुलींना फसवले होते. त्यांच्यावर वशीकरण विद्या चालवून कित्येक मुलींच्या इज्जती लुटल्या होत्या नव्हे तर ती बाळ अदृश्य होण्याची घटना झाली असली आणि पोलिस त्याच्या मागावर असले तरी आजही बाळ गायब होत होते. सखाराम त्या पोरांच्या मांसावर त्याच अड्यात यथेच्छ ताव मारत होता. जणू त्याला माणसांचं कच्च मांस खाण्यात आनंद मिळत होता नव्हे तर ती त्याची सवय झाली होती. ते मांस त्याला रुचकर लागत होते की काय? त्या बाळ गायब होण्याच्या कितीतरी घटना गावातच नाही तर आजुबाजूलाही घडत. त्यामुळं तो संपूर्ण परीसरच दहशतीत आला होता. पोलिस मागावर होते. मात्र पुरावे सापडत नसल्यानं अजुनही सखाराम पोलिसांच्या जाळ्यात अडकला नव्हता.
त्या मुलं गायब होण्याला काही दिवसानं शैतानाचं काम आहे हे वळण देण्यात आलं. जे बाळ रडतं, त्या बाळाला शैतान गायब करतं अशी अफवा पसरविण्यात आली. ते स्मशान........आज त्या स्मशानाची भीती कोणालाही वाटत होती. रात्र झालीच की त्या स्मशानाच्या दिशेनं कोणी जात नसत. आता तर कोणीही आपल्या मुलांना रडू देत नसत. कारण शैतान गायब करतो याची भीती त्यांना होती. त्यांना माहित नव्हते की तो सखारामच शैतान असून तोच मुलांना गायब करीत असतो.

****************************************

"घे भाव घे." युक्ती आपल्यासमोरच्या एका मुर्तीला म्हणत होती. तिला पडताळून पाहायचं होतं की सखारामनं तिला जी विद्या शिकवली. ती विद्या खरी आहे की नाही. यासाठी ती आज प्रयोग करीत होती. तिनं त्यासाठी साक्षात कोंबडं त्या दगडाच्या मुर्तीसमोर उभा केला होता. सखारामनं सांगीतलं होतं की जर मुर्तीतील शैतान सिद्ध करायचा असेल तर त्या मुर्तीवर रक्त शिंपडायचं. मग ते माणसाचं का असेना. समजा माणूस मिळाला नाही तर एखाद्या पक्ष्याचं रक्त असलं तरी चालेल.
ती मध्यरात्रीची वेळ. त्या घरात तिचा बाप नव्हताच मुळी. तो कोणत्यातरी कामासाठी बाहेरगावी गेला होता. त्यातच युक्तीसमोर नामी संधी चालून आली. घरी आई झोपल्यावर आपण ही विद्या पडताळून पाहायचा निर्धार तिनं केला. त्यातच हा प्रयोग तिनं आपल्या शेजारील कुत्र्यावर करायचे ठरवले. तो कुत्रा एक दोनदा तिला चावला होता. त्यातच ती जेव्हा जेव्हा घरी यायची. तेव्हा तेव्हा ते कुत्रं तिच्यावर भुंकायचं. त्यामुळं तिला तो त्रास वाटायचाच. त्या कुत्र्याचं नाव भुरु होतं.
सखारामनं सांगीतलं होतं की जर एखादा व्यक्ती तुला विनाकारण त्रास देत असेल तर त्याचेवर ही विद्या चालेल. परंतू निरपराध व्यक्तीवर तू जर असा प्रयोग केला तर तुझी विद्या हळूहळू नष्ट होईल यात शंका नाही.
माणूस मिळवून कापणं ही युक्तीसमोर मोठी अडचण होती. त्यामुळं तिनं एक कोंबडाच मिळवला होता कापायला आणि ती घरातच भाव घे म्हणत होती.
तिनं घरातच एक पाषाण उभा केला व त्या दगडाला शेंदूर फासून त्याला शेंदरी बनवला होता. त्यातच त्याला देव संबोधून त्या अर्ध्या रात्री पूर्णतः नग्न होवून ती त्या पाषाणाची पुजा करु लागली. त्यातच 'घे भाव घे' म्हणू लागली.
'घे भाव घे' चे शब्द. युक्ती घरातच ती विद्या साकार करीत असल्यानं ती आपल्या मायबापाला दिसणारच. घरात तिचा बाप तसाही नव्हता. एक आई होती. तशी ती मध्यरात्र. आई झोपली आहे असा विचार करुन ती ती विद्या साकार करण्यासाठी बसली होती. त्यातच तिच्या आईनं ते शब्द ऐकले व ती उठून कोण असं बडबडतय असा विचार करुन ती पुजा करीत असलेल्या जागी गेली. त्यातच तिनं पाहिलं की तिची मुलगी नग्न होवून एका पाषाणाची पुजा करीत होती. त्या पाषाणासमोर एक कोंबडा होता. जो कोंबडा गप्प राहून त्या अर्ध्या रात्रीही दाणे खात होता. ती पाहातच होती. तशी एक धारदार सुरी युक्तीजवळ दिसली.
काही वेळ आपली मुलगी काय करते असा विचार करुन तिची आई ते दृश्य पाहात राहिली. तशी काही वेळातच युक्तीसमोरील तो कोंबडा फडफडायला लागला. कारण त्याच्या अंगावर युक्तीनं टाकलेल्या पाण्यानं त्याला थंडी वाटत होती.
तसा तिनं ती धारदार सुरी आपल्या हातात घेतली. एका हातानं तिनं कोंबड्याची मान घट्ट धरली. तसेच एक पाय तिनं कोंबड्याच्या धडावर ठेवला. तशी तिनं ती धारदार सुरी त्या कोंबड्याच्या मानेवरुन फिरवली. त्यातच त्या कोंबड्याच्या मानेतून भळाभळा रक्त निघायला लागलं. ते रक्त तिनं त्या पाषाणी मुर्तीवर शिंपडत ती पुन्हा म्हणाली,
"हे शैताना, तू आपला चमत्कार दाखव. उद्या तो कुत्रा खल्लास व्हायला हवा."
युक्ती बोलत होती. त्याचबरोबर ते कृत्य करीत होती. ते पाहून तिच्या आईच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. त्यातच ती ओरडली.
"पोट्टे, हे तू का करीत आहेस."
"आई, तू !"
युक्ती म्हणाली. तशी आई जवळ आली. तिनं ते सगळं फेकून दिलं. त्यातच युक्तीला आईचा भयंकर राग आला व रागाच्या भरात तिनं आपल्या आईला ढकललं. तशी तिची आई पडली. तिच्या डोक्याला भयंकर मार लागला व ती क्षणातच गतप्राण झाली.
युक्तीची आई मरण पावली खरी. परंतू तिला त्याबद्दल काहीच पश्चाताप वाटत नव्हता. त्यामुळं तिला तिचंच बरोबर असल्यासारखं वाटलं.
युक्ती पुजास्थानातून उठली. तिनं आई जिथं मरण पावली, तिथंच ठेवलं. कापलेला कोंबडा कच्चाच खाल्ला. तसं कच्च मांस खाण्याची सवय तिला सखारामनच लावली होती. त्यानंतर तो पाषाणरुपी तिचा शैतान आणि ते सगळं पुजेचं साहित्य एका पेटीत भरुन ती पेटी लपवून ठेवली.
ती स्वतःच्या आईचीच हत्यारीन झाली होती. तिला तिच्या हातून आईची हत्या झाल्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. ती स्वतः दोषी होती. परंतू स्वतः तिनं दोषत्व स्विकारले नाही.
सकाळ झाली होती. ती बाहेर निघाली. तिनं पाहिलं की ज्या कुत्र्यावर तिनं प्रयोग केला होता. तो कुत्राही मरुन पडला होता. ही घटना म्हणजे तिनं झाडाच्या आंब्याला दगड मारला होता आणि आंबा पडला होता किंवा कावळा फांदीवर बसला आणि फांदी मोडली होती. तिला वाटलं की आपण शिकलेली विद्या ही खरी आहे. एकाच दगडात दोन पक्षी मरण पावले आहेत. काही वेळ असाच जावू दिला व थोड्या वेळानं तिनं आपल्या वडीलाला फोन केला. तिनं त्यांना सांगीतलं की आई फरशीवर पाय घसरुन पडली. तसे वडील ताबडतोब घरी आले. त्यांनी मयतीचा कार्यक्रम उरकवला. परंतू त्यांना क्षणभरही तशी कल्पना आली नाही की युक्तीनं त्याच्या पत्नीला ठार केलं असेल.
त्याच्या पत्नीचा अंत्यविधी कार्यक्रम उरकला होता. तशी त्याला चिंता पडली होती की युक्तीचं कसं होईल. ती तर तरुण आहे. कारण त्याला नोकरी निमित्यानं सतत बाहेरगावी राहावं लागायचं. तसं त्यांनी युक्तीलाही बोलून दाखवलं होतं. परंतू युक्ती म्हणाली की त्यांनी तशी चिंता करु नये. तरीही त्यांनी तिच्या सुरक्षेसाठी जबरदस्तीनं एका अर्ध्या वयाच्या माणसाला चौकीदार म्हणून घरी ठेवले होते. त्यांना काहीच कल्पना नव्हती की युक्ती काय करु शकते किंवा युक्ती तांत्रीक विद्या शिकली आहे.
असेच दिवसंं जात होते. एक दिवस असाच प्रसंग आला की वडीलांना अकस्मात बाहेरगावी जावे लागले. तेव्हा सुरक्षा म्हणून त्यांनी आपल्या चौकीदाराला सांगून ठेवलं की त्यांनी युक्तीवर लक्ष द्यावे.
वडीलानं असं सांगीतलं व ते बाहेरगावी बिनधास्तपणे निघून गेले.
रात्र झाली होती. तसं युक्तीला वाटलं की आपण वशीकरण मंत्र सिद्ध करुन पाहावे.
रात्रीचे बारा वाजले होते. तशी तिनं ती पेटी उघडली. त्यातील तो पाषाणरुपी शैतानी दगड बाहेर काढला. त्याला तांदळाच्या अक्षदा टाकून व त्यावर कापूर लावून त्यात स्थापित केला. तशी ती डोळे मिटून वशीकरण मंत्र म्हणू लागली. थोड्याच वेळात तिनं डोळे उघडले, तर पाहते की काय, तिच्या पुढ्यात तो माणूस उभा होता. जो तिच्या घरी तिच्या बापानं चौकीदार म्हणून तिच्या संरक्षणार्थ ठेवला होता. ज्याच्या नावानं तिनं वशीकरण मंत्र बोलले होते. तिचा वशीकरण मंत्र सिद्ध झाला होता. तशी ती उठली.
ती उठली. तशी ती बोलायला लागली त्या परपुरुषाशी. त्याच्या हातून रात्र साजरी करण्यासाठी ती त्याच्याशी बोलचाल करु लागली.
तो पुरुषही अर्ध्या वयीचा असतांनाही तिच्या हो ला हो मिळवू लागला. त्यातच तिच्या हो ला हो मिळवून तो तिच्यासोबत रंगरलिया मनवू लागला. रात्र साजरी करु लागला.
तिचा बाप नेहमी असाच बाहेरगावी जात असे. दोनचार दिवस राहात असे. तशी ती दोनचार दिवस त्या अरध वयीच्या माणसासोबत रंगरलिया मनवीत असे. हे रंगरलियाचे सत्र तिच्या बापाला अजूनपर्यंत माहित नव्हते. तोही व्यक्ती तिच्या बोलण्यावर भाळून तिच्या मनामनानं चालत होता.
ज्यावेळी तिचे बाबा त्या शहरात असत. त्यावेळीही ते त्या चौकीदाराला बंद करीत नसत. तो रात्रीला चौकीदारी करण्याकरीता यायचाच. परंतू बाबा शहरात असतांना ते दिवसभर जेव्हा कामाला जात. तेव्हा ती त्याच चौकीदार माणसाला दिवसा बोलावून आपली वासनेची हौस पुर्ण करीत असे.
एकदा असेच तिचे बाबा अगदी दुपारी अचानक त्यांच्या डोक्यात दुखायला लागल्यानं ते घरी परत आले. त्यांनी दरवाजा ठोकला. परंतू दरवाजा लवकर न उघडल्यानं संशय येवून त्यांनी खिडकीतून आत झाकून पाहिलं. त्यावेळी त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी युक्ती एका पुरुषाला घरात घालून आहे. ती अशा अवस्थेत आहे की तिला दरवाजा उघडायचं भानच नाही. तो पुरुष म्हणजे त्यानं ठेवलेला चौकीदारच. जो त्याचा खास मित्र होता. त्याला पाहताच आपली मुलगी अगदी अल्प वयात बिघडल्याचा संशय त्याला आला. तसं त्यानं पुन्हा दरवाजा जोरात ठोकला. त्यातच होशात येवून युक्तीनं व त्या चौकीदारानं आपआपले कपडे सवारले व तो चौकीदार वेगळ्या कम-यात गेला. तसा काही वेळानं तिनं दरवाजा उघडला.
दरवाजा उघडताच तिचे बाबा तिला काहीच बोलले नाही. जणू काही घडलेच नाही व आपण काही पाहिलेच नाही असा दिखावा करुन. परंतू तो चौकीदार जेव्हा बाहेर आला. तेव्हा बाबांनी विचारलं की तो दिवसा कसा आला. तेव्हा तिनच त्याची बाजू सवारत म्हटलं,
"मला घरी आईची भीती वाटत असल्यानं मी त्याला बोलावून घेतले. तशी तिच्या बाबांनाही शंका आली की पाणी कशात तरी मुरत आहे. कदाचित हिनंच आपल्या पत्नीचा जीव घेतला असावा.


****************************************

युक्ती त्याची लाडाची मुलगी होती. तिच्यासाठी तिच्या बाबानं खुप सारं केलं होतं. परंतू तिनं त्याच्या अपेक्षावर पाणी फेरलं होतं. त्यातच आता तिच्या बाबाला वाटलं. आपण एक दिवस हिला रंगेहाथ पकडावं.
तिच्या बाबांचं नाव जयप्रकाश होतं. एक दिवस जयप्रकाशनं कामावर जाण्याचा बहाणा केला. त्यानं आपल्या इमारतीची मागील खिडकी उघडी ठेवली. आज दरवाजा ठोकायचाच नाही. आपण सरळ आत यायचं व युक्तीला रंगेहाथ पकडायचं. त्यानं तसं ठरवताच तो बाहेर पडला व लागलीच तिला तसूभरही माहित पडू न देता मागच्या दरवाजातून आतमध्ये येवून लपून बसला. खिडकीचा उपयोग केला नाही. तसं काही वेळात युक्तीनं मागचा दरवाजा लावून घेतला व तिनं त्या चौरीदाराला फोन केला. थोड्याच वेळात तो चौकीदार आला. त्यानं दरवाजा ठोकला व युक्तीनं दरवाजा उघडताच तो आतमध्ये आला. त्यानंतर तिनं दरवाजा आतमधून लावून घेतला.
काही वेळातच त्याच्या व तिच्या रंगरलिया सुरु झाल्या. परंतू तिच्या त्या रंगरलिया जयप्रकाशनं सहन करुन तो कार्यक्रम रंगू दिला. कारण त्याला तिला रंगेहाथ पकडायचं होते. जणू त्याला त्याची स्वतःची मुलगी सुधारायला हवी असं वाटत होतं.
काही वेळ असाच गेला. आता तिच्या बापानं ते दृश्य सहन होत नव्हतं. ते दृश्य तो लपून छपून पाहात होता. तसा तो ते दृश्य सहन न झाल्यानं बाहेर आला. तसा तो युक्तीसमोरही.
युक्तीनं त्याला पाहिलं. तशी ती भांबावून गेली. कशीबशी उठली व ती आत गेली. तिनं भराभर कपडे घातले. त्याचबरोबर त्या चौकीदारानंही. तसा जयप्रकाशनं युक्तीला आवाज दिला. तशी युक्ती काही वेळात बाहेर आली. तिची मान खाली होती. त्याचबरोबर त्या चौकीदाराचीही.
जयप्रकाशनं तिला चांगलं फटकारलं. त्याचबरोबर त्यालाही. त्यातच जयप्रकाशनं त्याला नोकरीवरुन काढून टाकलं.
मुलगी युक्तीची ती रंगरलिया...... तसं ते प्रक्षोभक दृश्य......... जयप्रकाशला स्वस्थ बसू देत नव्हतं. आता तर युक्ती मोकळीच झाली होती. तिनं आता ठरवलं. आपल्या बापालाच आपल्या वशमध्ये करायचं. म्हणजे ते तिच्या इशा-यावर चालू शकतील व आपल्याला हवी असलेली आपली वासनेची इच्छा मनात वाटेल तेव्हा पूर्ण करता येईल.
तिच्या मनातील तो कुविचार. तिही तो कुविचार फलदायी स्वरुपात आणण्यासाठी रोजच दुपारी तिचे बाबा कामावर गेल्यावर प्रयत्नशील होती. ती रोजच त्या पाषाणाला त्या पेटीतून बाहेर काढत असे व रोजच त्याला जागृत करुन वशीकरण मंत्र म्हणत असे व आपल्या बाबाच्या वशीकरणासाठी प्रयत्न करीत असे.
जयप्रकाशला रोजच विचार आयचा. ते दृश्य आठवायचं. त्यातच तो एकटा असल्यानं ते विचार त्याला घायाळ करीत. त्यातूनच त्याच्या मनावर परीणाम होत गेला व तो लवकरच वेड्यासारखा करु लागला. तो आता तिला काहीही म्हणत नसे.
तो वेडा झाल्याचं कळताच त्याच्या कार्यालयानं त्याला कंपनीतून काढून टाकलं. मात्र त्याच्यावर एक कृपा केली. ती म्हणजे त्याचा उदरनिर्वाह चालावा, म्हणून त्याला उदरनिर्वाह खर्च लागू केला.
माझा बापही माझ्या वशमध्ये झाला आहे असं तिला वाटत होतं. परंतू तसं कारण नव्हतं. तो वेडा होण्याचं कारण होतं त्याचं मानसिक संतूलन. ते संतूलन हळूहळू ढासळलं होतं. त्यामुळं तो वेडा बनला होता.
ते बारावीचं वर्ष होतं. अगदी अभ्यासाचं ते वर्ष असून युक्ती अभ्यास करीत नव्हती. ती तंत्र मंत्र यामध्ये लागली होती. त्यातच ती अगदी कमी वयातच वासनेच्या आहारी गेली होती. ती वासनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत होती. त्यासाठीच ती तंत्र मंत्र साधना करीत होती.
आज युक्तीजवळ पैसा कमी पडत होता. जो काही बापाच्या पेंशनचा पैसा यायचा. त्या पैशानं युक्ती आपल्या बापाचा व आपला उदरनिर्वाह करायची. त्यातच तेवढ्या तुटपूंज्या पैशानं तिचं भागायचं नाही. परंतू तिला त्याबद्दल काहीच वाटायचं नाही की आपल्या अशा वागण्यानं असं घडलं असावं. तिला त्या गोष्टीबद्दल कोणतंच दुःख नव्हतं. उलट ती यासाठी आनंदीत होती की तिचा बाप आता काहीच बोलत नाही. तो वेडा झाल्यानं पूर्णतः तिच्या मुठीमध्ये आला आहे.
ते बारावीचं वर्ष. आता बारावीला दोन महिने राहिले होते. तसं तिला वाटलं की आपण बारावी पास करावी. तो तिचा विचार रास्त होता. तिला त्या बारावीचा विचार येताच ती आता अभ्यासाला लागली व पुढं बारावीही ती कशीबशी पास झाली.
आता तिला वाटलं की ज्या सुरेशनं तिला धोका दिला. त्याला वशमध्ये करावं. त्याला वशमध्ये करुन त्याच्या गती कराव्यात. त्यासाठी ती आपल्या बापासमोरच वशीकरणाचे मंत्र म्हणू लागली. रोजच त्या पेटीतून काढून रोजच त्या पाषाणरुपी दगडाची पुजा करु लागली. रोजच त्या सुरेशला वशमध्ये आणण्यासाठी बोलू लागली. परंतू सुरेश काही वशमध्ये येत नव्हता. शेवटी ती हताश झाली. त्यातच शेवटी तिनं सुरेशला मंत्रानं मारायचं ठरवलं. त्यासाठी पुन्हा तिनं सखारामनं केलेला उपाय करायचं धाडस केलं.
दूर कुठूनतरी त्या शहरातून तिनं पुन्हा एक लहान बाळ शोधला व ते लहान बाळ तिनं त्या पाषाणरुपी शैतानाला जागविण्यासाठी बळी म्हणून दिला. त्यानंतर ते कच्च मांसही तिनं खावून टाकलं. परंतू तिच्या त्या उपायानं काहीच फरक पडला नाही. शेवटी तिनं सखारामची त्यासाठी भेट घेण्याचं ठरवलं.
ती कोणतातरी एक बहाणा करुन पुन्हा सखारामच्या भेटीसाठी आजोळी आली. तिनं सखारामची भेट घेतली. सखारामनं सांगीतलं की त्याचे कर्म चांगले असतील, म्हणून तो मरत नाही आहे. तेव्हा तुला त्या पाषाणासमोर एकशे एक मुलांचा वा माणसांचा बळी चढवावा लागेल. तेव्हाच तो व्यक्ती मृत्यू पावेल.
ते थोतांड बोलणं.......त्यातच त्या थोतांडपणाच्या जाळ्यात फसत जाणारी युक्ती आज लहानपणापासूनच बिघडत चालली होती. विश्वात वशीकरण मंत्र नव्हते ना जादूटोणा ना तंत्र मंत्र होते. तरीही युक्ती त्यावर विश्वास ठेवून तंत्र मंत्राच्या आहारी जावून आपली, कावळा फांदीवर बसल्यावर फांदी जशी मोडते वा एखाद्यानं पाऊस येईल असं म्हटल्यास व पाऊस येतो, तशी अवस्था केली होती. तिला मिळालेला व तिची वासनेची इच्छा तृप्त करणारा चौकीदार तिच्या वशीकरण मंत्रानं तिच्या वशमध्ये आलाच नसेल, कदाचित त्याचीच वासनेची इच्छा झाली असेल घरी कोणीच नसल्यानं. परंतू ती त्यालाही वशीकरण समजत आली. याबाबत युक्तीला कोणीच मार्गदर्शन केलं नाही. त्यामुळं ती दिवसेंदिवस बिघडतच गेली.
आज तिचे बाबाही मरण पावले होते. तिनं विवाहही केला नव्हता. परंतू वशीकरण विद्या वापरुन तिनं कित्येक मुलांना फसवले होते. तिनं त्या मुलांकडून आपली वासना पूर्ण केली होती नव्हे तर करवून घेतली होती. ती वशीकरणामध्ये यशस्वी ठरली होती. परंतू कोणाला मारण्यात ती अजुनही यशस्वी झाली नव्हती. तिला सुरेशला मारायचे होते. कारण त्यानं तिला धोका दिला आहे असं तिला वाटत होतं. त्यामुळं की काय, ती त्याला बरबाद करीत चाललेली होती.
सखारामनं सांगीतलेल्या उपायानुसार युक्ती लहान मुलं शोधत असे. संधी मिळताच त्या मुलांना गायब करीत असे. त्यातच त्या निष्पाप जीवाचा बळी त्या शैतानरुपी पाषाणाला चढवीत असे. ज्या पाषाणाला कोणताच जीव नव्हता. तिथं फक्त नी फक्त एक दगडच होता. ती उच्च शिकली होती. परंतू तिचं उच्च शिक्षण काही कामाचं नव्हतं. कारण तिच्या मनात आणि तिच्या मानण्यात अजुनही अंधश्रद्धाच कुटकुट भरलेली होती. ती अंधश्रद्धा काही केल्या तिच्या मनातून जात नव्हती. याच अंधश्रद्धेनं तिचे माय आणि बापही हिरावून नेले होते. तरीही तिचे डोळे उघडले नव्हते. आजही ती त्याच सुरेशला ठार मारण्यासाठी प्रयत्न करीत होती.
ती लहान मुलं गायब होण्याचं सत्र अजुनही सुरु होतं. लोकं धास्तावले होते. अजुनपर्यंत पुरावे सापडले नव्हते. काय करावं पोलिसांना ते समजत नव्हतं. मात्र ते अजुनही त्या अपहरणकर्त्याच्या मागावर होते. जो अपहरण कर्ता मुलं गायब करीत होता.
वस्तू किंवा गोष्ट........कोणतीही गोष्ट ही वाईट असतेच असे नाही. त्या गोष्टी वाईट नसतात. तसेच कोणतीही गोष्ट ही चांगली असतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट चांगलीच असते. मात्र आपला त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण वाईट असेल, तर ती गोष्ट आपल्याला वाईटच दिसत असते आणि आपला त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोण जर चांगला असेल, तर आपल्याला त्या गोष्टी चांगल्या दिसत असतात.
जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चांगल्याही आहेत आणि वाईटही. परंतू आपला दृष्टिकोणच त्या गोष्टींना कमी अधिक प्रमाणात चांगलं वाईट ठरवत असे. दिवसानंतर रात्र होणे आणि रात्रीनंतर दिवस होणे या नैसर्गीक गोष्टीच आपल्याला जगात कसं वागावं आणि कसं नाही ते सांगत असतात आणि ती एकच गोष्ट असते की त्या गोष्टीला एक व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय वाईटचा दर्जा देतो तर दुसरा व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय चांगल्याचा दर्जा देतो. उदा. लेखक म्हणून लेख लिहिणारी काही मंडळी. ते लेख लिहितात त्यावेळी त्यांच्या मनात चांगली किंवा वाईट भावना नसते. ते जगाचा विचार करीत त्या जगातील वैश्वीक समस्या सुटाव्या म्हणून लेख लिहित असतांना काही लोकं जे वाईट विचारांचे किंवा त्या लेखाच्या विरोधातील असतात. ते विरोधातील प्रतिक्रिया देतात आणि जे विरोधातील विचारांचे नसतात ते चांगल्या प्रतिक्रिया देतात. व्यतिरीक्त प्रोत्साहनही देत असतात.
समजा एखादं नाणं जर घेतलं तर त्या नाण्याला दोन बाजू आहेत. तशाच बाजू आपल्या आयुष्यालाही आहेत. आयुष्य हे फार सुंदर आहे. परंतू ते जगत असतांना आपल्याला काही कमी अधिक प्रमाणात चांगले वाईट अनुभव येतात. याच चांगल्या वाईट अनुभवाच्या आधारावर आपण आपले जीवन ठरवीत असतो. मार्ग निवडीत असतो. त्याच अनुभवाच्या आधारावर कोणी आयुष्य जगत असतांना चांगला मार्ग पत्करतात. कोणी वाईट मार्ग पत्करतात. जे चांगला मार्ग पत्करतात. त्यांचं कधीच अहित होत नाही. परंतू जे वाईट मार्ग पत्करतात. त्यांचं नेहमीच अहित होत असतं. जेव्हा अहित होतं, तेव्हा काही नशीबाला दोष देवून नवीन मार्ग पत्करतात. काही नशीबाला दोष देवून चूप बसतात. काही नशीब मानत नाहीत. तरीही जगतात. काही नशीबात असं का घडतं म्हणून आत्महत्या करतात. काही डिप्रेशनमध्ये जातात, तर काही वेडेही बनतात. एकच गोष्ट......ती गोष्ट आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकते. कधी आपल्याला वेडे बनवते. कधी चांगलंही बनवते तर कधी गुंड बदमाश. हे सर्व घडतं आपल्या त्या गोष्टीच्या आहारी गेल्यामुळं. आपल्याला ती गोष्ट आवडते. हवीहवीशी वाटते. परंतू ती गोष्ट न मिळाल्यास सा-याच समस्या. कोणी डिप्रेशनमध्ये तर कोणी वेडे होतात. कोणी आत्महत्या करतात. कोणी आत्मघाती हमले, तर कोणी नैराश्येचं जीवन जगत असतात. ज्याला ती गोष्ट मिळते. तो मात्र सुखी होतो. त्याला आनंद प्राप्त होत असते.
महत्वाची गोष्ट ही की माणसानं कोणत्याही गोष्टीबाबत आसक्ती बाळगू नये. ती वस्तू मिळेल वा कधी मिळणारही नाही. म्हणून माणसानं निराश होवू नये. कधी कधी ती वस्तू उशीरा मिळते. म्हणून ती मिळाल्यावर आनंदीत होवू नये वा हुरळून जावू नये. उदा. काही काही लेखकांच्या जवळ एवढं असतं. परंतू त्यांना कोणीही पुरस्कार देत नाही. कुणाची एकच साहित्यकृती असते, तरी तिला भरपूर पुरस्कार मिळतात. याचाच अर्थ असा की जास्त पुस्तकं लिहिल्यानंतरही पुरस्कार न मिळाल्यास साहित्य लिहू नये असा होत नाही.
खरे संत ते असतात की जे जगाचं कल्याण करीत असतांना समाजातील दांभीक लोकांच्या विरोधाभाषाचा विचार करीत नाहीत. ते चांगली कामं नेहमीच करीत असतात. म्हणूनच त्यांना परमोच्च स्थान मिळतं. संत एकनाथ नदीतून आंघोळ करुन येत असतांना त्यांच्या अंगावर एक व्यक्ती वारंवार थुंकतो. याचा अर्थ त्यांनी नंतर अांघोळच केली नाही असा होत नाही. त्यांनी नदीत एकशे एकवेळा अांघोळ केली. शेवटी थकून त्या व्यक्तीनं थुंकणं बंद केलं. अशीच एका साधूची गोष्ट आहे. हा साधू विहिरीवर पाणी भरीत असतांना त्याला एक विंचू पाण्यात पडलेला दिसला. त्यानं त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बराच प्रयत्न केला. परंतू ते जमले नसल्यानं तो साधू स्वतः विहिरीत उतरला. तेव्हा त्याला वाचवीत असतांना तो विंच त्या साधूला बरेच वेळा चावला. शेवटी तो एवढे वेळा चावूनही साधूनं आपला प्रयत्न सोडला नाही. शेवटी त्याला वाचवलेच.
आपले आयुष्य म्हणजे असाच विंचूसारखा प्रकार आहे. आपण चांगलेही वागलो तरी लोकं आपणाला विंचूसारखे दंश करणारच. तेव्हा आपण आपल्या आयुष्यात असं हताश होवू नये. ज्याप्रमाणे साधूनं त्या विंचवाच्या दंशावर मात करुन त्या विंचूला वाचवले. तसेच आपण आपल्या आयुष्याला केले पाहिजे. आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टीवर मात करुन त्याचा त्याग करुन या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवावं.
विशेष सांगायचं म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू ही चांगली बाजू व दुसरी बाजू ही वाईट बाजू. तसेच मार्गाचेही दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे चांगला मार्ग व दुसरा म्हणजे वाईट मार्ग. आपण फक्त त्या मार्गाचा वापर कसा करावा आणि कोणता मार्ग वापरावा ते आपल्या मनात ठरवावे. कारण वाईट मार्गाचं फलीत वाईटच निघते व चांगल्या मार्गाचं फलीत चांगलं. चांगलं कर्म जर आपल्या हातून घडले तर त्या कर्माचं यश पुढील काळात नक्कीच चांगलं येतं. वाईटांचं वाईटच. मग वाईट कर्म करुन वाईट फलीत मिळविण्यापेक्षा आपण चांगलं कर्म करुन चांगलं फलीत मिळविण्याचा प्रयत्न का करु नये. काही गोष्टी ह्या नैसर्गीक असल्या तरी त्या वाईट जर असतील तर त्या सोडून द्याव्यात आणि चांगल्या जर असल्या तर त्या जोपासाव्यात. यालाच जीवन म्हणतात. चांगलं, सुंदर, यशस्वी जीवन जगण्यासाठी हेच विशेष करुन महत्वाचं असतं. बाकीच्या सर्व भाकडकथा असतात. जीवनात अशा ब-याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला शिकवीत असतात. ज्याचा आपल्याला हव्या त्या प्रकारे वापर करता येतो. मात्र त्याचा वापर कसा करावा हे आधी आपल्या मनात ठरवावे. मगच त्याचा वापर करावा. तसेच वाईटाचं फलीत वाईटच निघेल हेही ठामपणे लक्षात घ्यावे. जेणेकरुन आपलंच जीवन सुखी समृद्ध बनवता येईल आणि आयुष्यही सुंदर करता येईल यात शंका नाही.
युक्ती जवळ आज कोणीही नव्हतं. ती एकाकी होती. तरीही तिला जास्त जोर होता. कारण तिला ज्ञात असलेली तांत्रीक विद्या. त्या विद्येवर भरवसा होता तिचा. त्या विद्येवर भरवसा जरी असला तरी आज त्या विद्येनं काही सुरेशचा जीव घेतला नव्हता. तो अजुनही जीवंत होता. तो जीवंत असलेला पाहून युक्ती अजूनही जास्त चिडत असे.
आज सखारामच्या म्हणण्यानुसार युक्तीनं एकशे एक लहान निरागस बाळाचा जीव घेतला होता. जे निरागस बाळ. त्या बाळांना जगणं नीट समजलंही नव्हतं. तरीही ते निष्पाप जीवाचे बळी ठरले होते. त्या एकशेएक बळी दिल्यानं सुरेशला मरण न आल्यानं ती पुन्हा सखारामला भेटली. तेव्हा सखारामनं पुन्हा तिला सल्ला दिला की त्या पाषाणाची पुजा तिनं स्मशानातील राखडीनं करावी. त्या मुर्तीला स्मशानातील राखड लावावी. त्यामुळं कदाचित तो मरुन जाईल.
युक्तीच्या मनावर भूत आरुढ झालं होतं. तिला सुरेशला काही का असेना, ठार मारायचंच होतं. त्याला ती प्रत्यक्ष ठार मारु शकत नव्हती. परंतू त्याला ठार मारण्यासाठी ती खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न नक्कीच करीत होती.
ते शहरातील ठिकाण........युक्तीसमोर प्रश्न उभा होता की शहरी भागात स्मशानातील राखड कशी मिळेल. त्यासाठी ती विचार करु लागली. क्षणातच तिला आठवलं की ही राखड जंगली गावात मिळू शकते. त्यासाठी खेडेगावात जावं लागेल.
विचारांचं अवकाश. ती आजपासूनच स्मशानातील राख मिळविण्यासाठी वणवण भटकत होती ती जंगलातील वाट. त्या जंगलात वणवण फिरत ती स्मशानातील राख शोधत होती. स्मशानातील ती राख तिला मिळायची. त्यातच ती, ती स्मशानातील राख घेवून यायची आणि त्या पाषाणाच्या शैतानी मुर्तीला लावायची. परंतू तरीही काही फरक पडायचा नाही.
आज ती कालरात्र होती. त्या कालरात्री कुत्र्यांचा अावाज येत होता. पण मनावर भूत आरुढ असलेली युक्ती तिला त्या आवाजाची किंचीतही भीती वाटत नव्हती.
युक्ती स्मशानी वाट चालली होती. ती स्मशानी वाट.......आजुबाजूला वाघाच्या डरकाळीही ऐकायला यायला लागल्या होत्या. त्यातच भुतांच्या किंकाळ्याही. अशातच ते स्मशान आलं.
ते स्मशान आलं. त्या स्मशानात एक मुदडा जळत असलेला दिसला. तशी ती त्या मुदड्याजवळ बसली. हातात असलेलं पाणी तिनं त्या मुदड्यावर शिंपडलं. तसा त्या मुदड्याच्या राखेतून चर्र असा आवाज आला. त्यातच तो आवाज काळोखाच्या गर्भात आसमंत चिरुन निघाला. तसा तिचा भाष होवून त्या स्मशानातील बाभळीच्या झाडावर बसलेला घुबड उडून पळून गेला.
युक्ती त्या स्मशानात असलेल्या मुदड्याजवळ बसली. त्याला मनोमन हात जोडले व म्हणाली,
"तुला चालायचं आहे. मला एक काम आहे तुझं. वाटल्यास तुला काय पाहिजे ते सांग. मी माझ्या कामासाठी तुला सर्व द्यायला तयार आहे. हे शरीरही. बोल कबूल आहे तुला. काय कोंबडं खाणार की बकरं? बोल."
तो स्मशानातील मुदडा काहीच बोलत नव्हता. तो चूप होता. तशी तिनं आपली सुरक्षा म्हणून आपल्या पिशवीतील एक काडी काढली. त्या काडीवर काहीतरी मंत्र पुटपुटली आणि त्या काडीनं तिनं स्वतःभोवती एक गोल फाडला. त्यातच दुसरा गोल तिनं त्या जळत्या मुदड्याभोवती काढून ती पुन्हा म्हणाली,
"आता पाहतो कसा नाही म्हणतोस ते आणि हेही पाहतो की तू कसा पळून जातोस. माझी शपथ आहे तुला. माझं काम झाल्याशिवाय तू पळण्याचा बहाणा करु नकोस. तुला मुक्तीच मिळू देणार नाही मी. समजावून सांगीतलं आता. यानंतर समजावून सांगणार नाही."
एवढं बोलूनही तो स्मशानी मुदडा काही बोलायला तयार नव्हता. त्यातच तिनं पुन्हा आपल्या पिशवीतून काही मुरमुरे काढले. ते मुरमुरे त्या आगीत टाकले. ते आगीत टाकलेले मुरमुरे क्षणातच जळून खाक झाले. तशी ती म्हणाली,
"बोल अजून हवंय का तुला खावू. सांग माझ्या बाळा. अजून काय कमी आहे तुला लवकर सांग. कौल दे."
परंतू तो मुदडा काही हालत नव्हता वा कोणताच कौल देत नव्हता. तसा तिला त्याचा राग फार येत होता. तशी ती म्हणाली,
"हे बाळा, आता मला राग आणू नकोस. तुला माहित आहे. मी किती जीवं संपवले आणि आता भूतंही संपवीन. तुला जावूच देणार नाही वर. मुखिया नाहीच नाही. ब-या बोलानं ऐक. कौल दे."
इतकं बोलूनही मुदडा काहीच हालचाल करीत नव्हता. ते पाहून ती म्हणाली,
"हं, आता समजलं तुला काय हवं ते. तुला पाणी हवंय का? ठीक आहे, देतो. पाणीही देतो. मग तर कौल देशील ना."
असं म्हणून तिनं आपल्या जवळ असलेलं ग्लासभर पाणी काढलं. ते त्या जळत्या प्रेतावर टाकलं. तोच त्या जळत्या प्रेतातून काळ्या रंगाचा धूर आकाशात उडाला व एक अंधूक आकृती त्या धुळीतून दिसायला लागली. तेच त्या प्रेताचं भूत होतं.
युक्तीनं कधीच आपल्या जीवनात भूत पाहिला नव्हता. तशी आता भुताला पाहून ती मनात थोडी घाबरलीच. परंतू ती भीती चेह-यावर न दिसू देता ती त्या भुताला म्हणाली,
"बोल, तू माझं काम सुकर करु शकशील का?"
ते भूत फक्त मान हलवत होतं. त्यातून कळत होतं की ते भूत होकार देत आहे. तशी ती म्हणाली,
"हे बाळा, सुरेश नावाचा एक व्यक्ती जो माझा बायफ्रेंड होता. त्याला खल्लास करायचं आहे. बदल्यात तुला जे पाहिजे ते देईल. बोल काय पाहिजे?"
तिचे ते बोल. काही वेळ त्या स्मशानात भयंकर शांतता. तसं त्या भुतातून एक आवाज उमटला.
"तुझी जवानी."
जवानी शब्द ऐकून ती आश्चर्यचकीत झाली. भुतांनाही जवानी लागते याचं आश्चर्य वाटलं तिला. ती काहीच बोलली नाही. ते पाहून ते भूत म्हणालं,
"बोल देशील तुझी जवानी?"
हे भूत का जवानी मागणार असा विचार करुन ती म्हणाली,
"होय देणार. का नाही देणार. माझं काम होतांना मी नक्की देणार जवानी तुला. तू फक्त माझं काम कर म्हणजे झालं."
"नाही. पहिलं तुझी जवानी हवी. मगच काम, मंजूर. का पता की तू काम झाल्यावर मला तुझी जवानी देशील."
युक्ती विचार करीत होती. तिच्या मनावर बदल्याचं भूत स्वार होतं. तिला कोणत्याही परीस्थीतीत सुरेशला संपवायचं होतं. त्यासाठीच ती एवढा आटापीटा करीत होती. जीवाचे हाल करीत होती. तिला वाटत होतं की आता आपल्याला या भुताच्याही वासनेची शिकार व्हावी लागणार. परंतू तिला माहित होते की जर या भूताला आपलं शरीर सोपवलं नाही तर हे भूत आपले कामच करणार नाही. तिनं त्या भुताला ब-याच विनवण्या करुन पाहिल्या. परंतू ते भूत काही ऐकत नव्हतं. ते पाहून तिनं त्या भूताला होकार दिला व त्या भयाण रात्री त्या भयाण स्मशानात ती नग्न होवून त्या भुताच्या वासनेची शिकार होवू लागली. तिला ते शिकार होतांना काहीच वाटलं नाही.
भुतानं आपली हौस फिटवली होती. तसा तो भूत तृप्त होताच त्यानं युक्तीला आपल्या बाहूपाशातून सोडलं. तशी शेवटी युक्ती म्हणाली,
"बोल, आता तुनं आपलं काम केलं. आता माझं काम. बोल, तयार आहेस ना."
"होय. आता मी तयार आहे."
"केव्हापर्यंत करशील माझं काम."
"येत्या अमावस्येपर्यंत."
भुतानं आश्वासन दिलं. तशी तिनं ती राखड घेतली. तिच्यावर पाणी टाकलं. दोनचार त्या मुदड्याची हाडंही घेतली. ती पिशवीत भरली. तशी ती माघारी फिरली व झपाझप पावले टाकत त्या स्मशानातील अंधार चिरत पायी पायी घरी आली. तशी ती सुरेशच्या मृत्यूची वाट पाहू लागली.
सुरेशचा मृत्यू वा सुरेशला मरण येणं ही काही खेळ वा गंमत नव्हती. त्याचं आयुष्य पूर्ण झालंच नव्हतं. मग तो मरणार कसा? त्यासाठी तिनं एकशे एक बाळाचीही हत्या केली होती. तिनं त्या पाषाणाला मुदड्याचं भस्मही लावलं होतं आणि आता त्या भूतासोबत समागमही केला होता. परंतू काहीच घडलं नव्हतं. घडणारही नव्हतं.
आज अमावस्या होती. तशी युक्ती सकाळीच उठली. तिनं त्या पाषाणी शैतानाला नमस्कार केला. त्यातच त्या स्मशानी भुताच्या राखेलाही. आज सुरेश कोणत्याही परीस्थीतीत मरेल असं तिला वाटत होतं. परंतू घडलं वेगळंच. सुरेश काही मृत्यू पावला नाही वा त्याला साधी जखमही झाली नाही. ते पाहून पुन्हा तिच्या मनाचा जळफळाट झाला.
ती वशीकरण विद्या. तिनं सुरेशवर चालवून पाहिली. परंतू त्याचाही काही परीणाम होत नसलेला पाहून शेवटी तिनं त्याच्या मृत्यूचा मार्ग निवडला. परंतू त्यानही त्याला काहीच फरक पडला नाही. ती त्या सुरेशच्या मृत्यूनं तळपत होती. परंतू सुरेश काही मरत नव्हता. जसजसा तो जीवंत दिसायचा. तसतशी ती जास्त विव्हळायची. परंतू तिला कोणताच मार्ग सापडत नव्हता. त्यामुळं ती दिवसेंदिवस हताश आणि कमजोर बनत चालली होती.
सुरेशच्या मृत्यूचा विचार करता करता तिचं आयुष्य निघून जात होतं. तिला आजही वाटत होतं की सुरेश आपणाला मिळावा. आपल्यासोबत पुर्वीसारखंच समागम करावं. आपली वासना मिटवावी. तशी ती कधीकधी तशा स्वरुपाचं स्वप्नही पाहायची. परंतू तिचं ते स्वप्न व तिची ती शुल्लकची इच्छा देखील पूर्ण होत नसल्यानं ती दिवसेंदिवस हताश व निराश होत चालली होती.
हताशीनं आणि नैराश्यानं भरलेलं तिचं जीवन......... भूत पिशाच्च्याच्या सानिध्यात असलेलं तिचं जीवन, तंत्र मंत्रावर विश्वास करणारी युक्ती........तिचं उभं आयुष्य त्या सोचविचार करण्यानं बेताल होत चाललं होतं. त्यातच ती सुकत चालली होती.
वासना........वासना तिच्या मनात कुटकुट भरली होती. ती वासना तिला ब-या बोलानं जगू देत नव्हती. त्यातच ती वासना पूर्ण करण्यासाठी सावज शोधत होती. असे कितीतरी सावज तिनं शोधले होते की ज्या सावजानं तिच्या मनातील वासनेच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. ती कुठूनकुठून येणारी माणसं.......कुणाशीही समागम करुन येणारी माणसं........त्यांना तिच्या जीवनाशी काही एक करायचं नव्हतं. त्यांनाही आपली वासना पूर्ण करायची होती. ती त्यांची वासना पूर्ण होत होती आणि ती पूर्ण झाल्यावर ते डोक्यातील जुवा जशा काढून फेकतात, तसे तिला तेे आपल्या जीवनातून काढून फेकत होते. तसं पाहता तिलाही नवनवीन वासनेसाठी सावज पकडायला मजा येत असे. परंतू त्या अति समागमाचे व अति वासनेचे परीणाम किती गंभीर निघतील याचा विचार तिला नव्हता. ती त्याबाबत कोणताही विचार करीत नव्हती.
आज ती थकली होती. आयुष्यभर तिनं केवळ सुरेशचाच विचार केला होता. त्याला मिळविण्यासाठी ती संमोहन विद्या शिकली होती आणि ती शिकतांनाही वासनेची शिकार झाली.
तिला सुरेश आवडायचा. कारण ते तिचं पहिलं प्रेम होतं. ते पहिलं प्रेम, जे प्रेम तिला जीवनभर विसरता आलं नाही. ते प्रेम मिळविण्यासाठी युक्ती जीवनभर धजली. तिनं तांत्रीकाचाही आधार घेतला. ती स्मशानातही गेली आणि त्या स्मशानातही तिनं भुतासोबत समागम केला नव्हे तर तिनं एकशे एक, त्या नवजात बालकांचे बळीही घेतले. तरीही तिला तिचं पहिलं प्रेम प्राप्त झालं नाही. हे सगळंं तिच्या जीवनात घडलं.
हे सगळं घडलं नसतं तिच्या जीवनात. जर ते पहिलं प्रेम तिला प्राप्त झालं असतं. परंतू ते प्राप्त न झाल्यानं तिचा भ्रमनिराश झाला व ती सतत आयुष्यभर तडपत राहिली.
वासनाच ती........त्या वासनेनं कुणाला सोडलेलं नाही. युक्तीही वासनेची शिकार झाली. प्रत्येकांनी तिला मदत करतांना पैशाच्या बदल्यात तिला वासनेचीच शिकार बनवलं
आज बळी एवढे घेतले तरी अजून ती उजेडात आली नव्हती. पोलिस शोध घेत होते, त्या बळींचा. जे बळी घेतलेली युक्ती आज बळी घेवूनही अजूनपर्यंत सापडली नव्हती. परंतू ते पाप घडले होते. त्या नवजात मुलांचा बळी घेणे वा त्या नवजात बालकांचे अपहरण करणे ही वस्तूस्थिती ना लोकांना माहित होती ना कोणाला. ती वस्तुस्थिती पोलिसांनाही माहित नव्हती. ते पाप लपले होते. परंतू नियती ते सगळं पाहात होती.
आज तिचं वय वाढत चाललं होतं. तिचं वय वाढत असलं तरी सुरेशही मृत्यू पावला नव्हता. परंतू सुरेशचा मृत्यू व्हावा म्हणून तिनं दिवसरात्र प्रयत्न केले होते. वेगवेगळे प्रयत्न केले होते. त्यातच सुरेशचा मृत्यू झालाच नव्हता. परंतू युक्ती मात्र दुःखी कष्टी झाली होती. सतत वासनेत मन टाकल्यानं व वासनेची शिकार झाल्यानं आज तिचे हातपाय दुखत होते. त्यातच कोण्यातरी व्यक्तीपासून तिला एच आय व्ही झाला होता. ती तळपत होती त्या एच आय व्हीच्या असाध्य रोगानं. त्यातच सतत आजारी राहात होती ती. दिवसेंदिवस तिचं वजनही कमी होत चाललं होतं.
आज तंत्र मंत्र शक्तीनं काहीच होत नाही हे तिला कळलं होतं. जगात तंत्र मंत्र शक्ती नाही. ते थोतांड आहे हेही तिला कळलं होतं. जेव्हा त्याचा सुरेशवर परीणाम दिसला नाही. आपल्याला सखारामनं मुर्ख बनवलं हेही तिच्या लक्षात आलं होतं. परंतू आज वेळ झाला होता तिला ते सगळं समजायला.
पोलिसांची तपासणीचक्रे फिरली व तपासता तपासता सुगावा लागला की ते एकशे एक बाळ गायब करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती युक्तीच आहे. पोलिसांना तसा सुगावा लागताच ते युक्तीच्या घरी आले. त्यांनी युक्तीला ताब्यात घेतलं. त्या तंत्रामंत्राच्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या व विचारलं की यामागे कोणाचा हात आहे.
युक्तीनं चक्क सखारामचंच नाव सांगीतलं. ज्या सखारामनं तंत्र मंत्रांचं सोंग आणून युक्तीला फसवलं होतं नव्हे तर तिलाच निरागस बाळ आणून त्याला कापायला मजबूर केलं होतं.
पोलिसांनी तपासचक्रे सखारामच्या घराकडे वळवली. सखारामच्या घरी काहीच सापडलं नाही. त्यातच युक्ती खोटे बोलत आहे असे पोलिसांना वाटायला लागले. तशी युक्ती म्हणाली,
"साहेब, हाच तो बदमाश असून याला चक्क मी माझ्या उघड्या डोळ्यानं बाळाचे कच्चे मांस खातांना पाहिले. आपण याची सी बी आय चौकशी करावी. म्हणजे आपल्याला सर्व या माणसांचा पराक्रम माहित होईल. मी स्विकार करते की मी गुन्हेगार आहे. मी स्वतः कबूल करते की मी स्वतः एकशे एकच नाही तर एकशे चार हत्येची भागीदार आहे. या एकशे चार हत्येमध्ये माझे वडील व माझी आईदेखील आहे. माझी आईही याच माझ्या तंत्रमंत्राच्या धक्क्यानं मरण पावली आणि माझे बाबाही याच माझ्या तंत्रा मंत्राच्या धक्क्यानं वेडे झाले. पुढे अकाली मरण पावले. परंतू आता समजले की जगात तंत्र मंत्र काही नाही. या माणसाला माणसांचं मांस खायचं होतं. म्हणूनच ह्या माणसानं माझ्याकरवी त्या बाळाला आणायला लावलं व मी त्या बाळाला आणल्यावर मला वशेत घेवून माझी इच्छा नसतांना त्याला ठार करायला लावलं. त्यामुळं ह्या सर्व हत्येचा भागीदार हाच आहे. मी नाही."
तिचं ते बयाण. आज तिनं जे बयाण दिलं होतं. त्यावरुन ती दोषी वाटत नव्हती. दोषी सखाराम वाटत होता. परंतू ती दोषीच होती. त्याचं कारण म्हणजे कोणी जर विहिरीत उडी मार म्हटल्यास विहिरीत उडी मारेल का? हा प्रश्न होता. सखारामनं तिला बाळ कापायला लावलं. परंतू तिनं कापलं कशाला?
तिच्या बयाणावरुन पोलिसांनी सखारामला ताब्यात घेतलं खरं. परंतू तो दोषी वाटत नव्हता. तशी युक्तीनं म्हटलं की त्याची सी बी आय चौकशी करावी.
युक्तीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी सी बी आय चौकशी सुरु केली. त्या सी बी आय चौकशीत एका श्वानालाही कामी लावले.
श्वानाला सखारामच्या घरी सोडण्यात आले. तो श्वान सखारामच्या घरुन निघाला. तसा तो धावत धावत त्या स्मशानाच्या मागच्या भागात गेला. त्याच्या मागं पोलिसही गेले. जिथं त्यानं एक अड्डा बनवला होता. श्वान तिथं जावून थांबला आणि भूंकू लागला. तोच पोलिसांनी आजुबाजूच्या जागेचं निरीक्षण केलं.
पोलिसांनी आजुबाजूच्या जागेचं निरीक्षण करताच त्यांना तो खड्डा सापडला. जो खड्डा सखारामनं केला होता. तसेच दुरवर त्या जंगलाचं निरीक्षण केलं असता पोलिसांना माणसाचे काही अवशेष सापडले. कदाचित सखारामनंच काही माणसांना मारुन युक्तीच्या म्हणण्यानुसार त्यांचे मांस खाल्ले असावे असे समजण्यास पोलिसांना वेळ लागला नाही.
पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्या आधारावर त्यांनी ती केस न्यायालयात नेली. वकील केस लढवू लागले.
ती न्यायालयाची केस......... युक्तीला नियमीतपणे कोर्टाच्या तारखेवर जावं लागत असे. त्यातच सखारामही प्रत्येक पेशीवर हजर राहात असे. सखारामचं ठीक होतं. कारण तो हट्टाकट्टा होता. परंतू युक्ती? युक्ती खचलेली होती. तिला असलेला एच आय व्ही वाढत चालला होता. त्याचं रुपांतरण आता एड्समध्ये झाले होते.
तो एड्स आता सक्रीय होत चालला होता. त्यातच तिचं रक्त सुकत चाललं होतं. तिची प्रतिकारशक्तीही कमजोर होत चालली होती. तसेच तिची एकुणच कांती बिघडत चालली होती. त्यातच कोर्टाचे चक्कर........हे सर्व तिच्या वासनेनं आणि तंत्र मंत्रानं घडलं होतं. जे तंत्र मंत्र जगात नव्हतं.
आज न्यायालयानं निकाल दिला होता. दोघांनाही जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. परंतू युक्तीला एड्स असल्यानं काही दिवसासाठी तिला सोडून दिलं होतं.
आज युक्ती बेडवर आजारी पडली होती. तिला रुग्णालयात न्यायला कोणीही नव्हतं. ती तळपत होती वेदनेनं. नियतीनं तिला ते बाळ मारल्याबाबत कठोर शिक्षा दिली होती. ना त्या दोघांना तंत्रानं वाचवलं होतं. ना त्या दोघांना मंत्रानं वाचवलं होतं. भारतीय संविधानानुसार सखारामला न्यायालयानं शिक्षा दिली होती तर युक्तीला नियतीनं शिक्षा दिली होती.
ती तळपत होती वेदनेनं. त्यातच ती लोकांना ओरडू ओरडू सांगत होती की जगात तंत्र मंत्र, जादूटोणा कदापिही नाही. अंधश्रद्धाही नाही. तेव्हा कोणीही अंधश्रद्धेच्या आहारी जावू नका. तसेच अंधश्रद्धेचं रान माजवू नका.
लवकरच युक्ती अकालीपणे एड्सनं काळाच्या पदड्याआड गेली. ज्या सुरेशच्या मृत्यूची ती वाट पाहात होती. तसेच त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी जीनं तंत्र मंत्र व वशीकरण विद्येचा सहारा घेतला होता नव्हे तर जो सुरेश मरावा म्हणून जिनं त्या पाषाणाच्या दगडावर एकशे एक बळी दिले होते. स्मशानाची राखही आणली होती. तसेच त्याला ठार करण्यासाठी ती प्रत्येक पुरुषाशी झोपली होती. तो सुरेश आजही जगत होता.
युक्ती तर मरण पावली होती. परंतू ही गोष्ट जेव्हा सुरेशला माहित झाली, तेव्हा त्याला आश्चर्यचकीतच वाटले. वाटले की जर मी तिला पसंत होतो तर तिनं मला सांगायची गरज होती. तिनं दुस-यासोबत फिरायला हवं नव्हतं.
आज सुरेशला पश्चाताप होत होता. युक्ती तर मरुन गेली होती. पण तिच्या आठवणी तिच्या मृत्यूनंतर त्याला घायाळ करीत होत्या. जी त्याच्यावर कोपली होती नव्हे तर जी त्याला ठार करण्यासाठी तंत्र मंत्र शिकली. ती युक्ती आज वाचली असती तर बरे झाले असते. आपल्याला माहित होताच आपण तिच्याशी विवाह करुन जीवन थाटले असते असं त्याला वाटत होतं.
आज सुरेशला एकाकी वाटत होतं. त्याला तिच्या जाण्यानं कोणीतरी घरातील एक सदस्यच गेला आहे असं वाटत होतं.
**********************************************

तिच्या मनातील वासनेचं भूत तिच्या जाण्यानं मरण पावलं होतं. तिला पदोपदी लोकांनी छळलं. त्याला जबाबदारही तिच होती. परंतू ती स्वतःचे दोष दुस-यांवर लादत लादत वासनेची शिकार झाली होती.
आज वासना, अंधश्रद्धा, तंत्र मंत्र चित झाले होते. तसेच ते थोतांड ठरले होते. त्या सर्व गोष्टीनं ना सखाराम वाचला ना युक्ती. परंतू तरीही तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धा अजुनही समाजात रुढ होत्या. त्याला जबाबदार आपणच होतो. आपणच त्या तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेवर आजच्या विज्ञानयुगात विश्वास ठेवून त्यांना पसविण्यासाठी मदत करीत असतो.
स्री अस्तित्व. स्रीयांना अनादीकालापासून गुलामच समजले जाते. आजही गुलाम समजतात लोकं तिला. कारण काही स्रियांचा स्वभाव.
स्री ही हुशार आहे. बलशाली आहे. ती पुरुषांना मदत करते. त्याचबरोबर तिनं जर मनात आणलं तर ती काली आणि दुर्गेचेही रुप घेवू शकते. परंतू ती भावनाशील आणि दयाळू असल्यामुळे पुरुषांना दुय्यम स्थान न देता स्वतः दुय्यम स्थान घेते नव्हे तर पुरुषांच्या गुलामगीरीत वागते. समजदार असलेली स्री. ती स्वतःचं दुय्यम स्थान घेवून वागायला लागते, तेव्हा तिला लोकं ती दुर्बल नसूनही तिला दुर्बल समजून तिच्यावर अत्याचार करीत असतात. त्या अत्याचारात तिची छेडखाणी करणे, बलत्कार करणे, तिचे विचार दडपणे, तिला धाकात ठेवणे. जशी ती विवाह करुन घरात आली नाही, तर एक दासी म्हणून तिला विकत आणलं आणि जेव्हा हीच महिला रणचंडीकेचं अवतार धारण करते, तेव्हा मात्र ती इतरांना रणचंडीका वाटत नाही. ते तिला शूरही समजत नाहीत. तर तिला दुषणे देतात. म्हणतात की ती वेश्या आहे. (वेश्या....... याठिकाणी अर्थ शैतानी वृत्तीची, निर्भीड वृत्तीची. परंतू ती निर्भीड वृत्ती लोकांना मान्य नसल्यानं तिला शिव्या देत असतांना वेश्या संबोधलं जातं) ती अमूक आहे, तमूक आहे.
मुळात स्री जातीची ही कारणमिमांसा. कधी हेळसांड तर कधी तिची स्तूती. स्तूतीपेक्षा हेळसांडच जास्त असते स्रीजातीची.
स्री ही आधीपासूनच बलवान. ती पुर्वीही पुत्रप्राप्त करायची. तसेच त्यांचं पालनपोषण तर करायची. व्यतिरीक्त घरीही पुरुषांपेक्षा जास्त काम करायची. आजही असं चित्र दिसतं की स्री ही मुलांना जन्म तर देते. त्याचे पालनपोषणही करते व आपल्या पतीचंही पालनपोषण करते. अर्थात आजकालचे पती हे कामच करीत नाहीत असे म्हटल्यास आतिशयोत्ती होणार नाही.
पतीची व्याख्या करायची झाल्यास पती हा सुखसमृद्धी देणारा असावा. त्याने पत्नीला दुःखी कष्टी करु नये. तसेच पत्नीची सेवा करावी. पत्नीच्या इच्छा पूर्ण करणारा असावा. पत्नीच्या भावभावना समजणारा असावा. पत्नीशी मैत्रीपुर्ण व्यवहार करणारा असावा. तिच्या विचारांचा आदर करणारा असावा. तिचा मानसन्मान करणारा असावा. परंतू पती तसा राहात नाही. तो कधीच पत्नी म्हणून स्रीजातीला समजून घेत नाही. आपण जसे तिच्याशी विवाह करुन उपकारच केले असे दर्शवतो. तशाच आविर्भावात तो वागतो.
पतीबाबत सांगायचं झाल्यास काही पती निश्चीतच कामाला जातात. ते दिवसभर काम केल्यानंतर घरी थकून भागून जेव्हा येतात. तेव्हा त्यांच्या हातात पाण्यानं भरलेला ग्लास तसेच हाताहातात ताटंही त्याच्या पत्नीला द्यावा लागतो. सकाळी झोपेतून उठल्यावर मंजनपासून तसेच अांघोळीच्या पाण्यापासून तर जेवनाच्या ताटापर्यंत व पुढे डब्यापर्यंतही पत्नीला राबावं लागतं. त्यातही त्याच्या दारु पिण्याचा त्रास सहन करावा लागतो. काही काही पती तर पत्नी असूनही दुसरी पत्नी ठेवतात.
पत्नी घरी जरी राहात असली, तरी ती पुरुष असणा-या आपल्या पतीसाठी राब राब राबते. तरीही पती म्हणतो, 'घरी कोणतं काम असतं. कोणतंच नाही.' सगळं आयतं. परंतू पत्नीची गोष्ट घेतल्यास पत्नी जर कामाला जात असेल, तर तिला सायंकाळी घरी येताच कोणीच पाणी देत नाही. कोणीच साधा चहा करुन देत नाही. कोणीच तिची ती थकलेली अवस्था पाहूनही तिला सहारा देत नाही. तिला कामावरुनही आल्यावर घरी चुलीत अन्न शिजविण्यासाठी शिरावंच लागतं ही शोकांतिका आहे नव्हे तर वस्तुस्थीती.
आज बरीचशी अशी माणसं आहेत की जी पती बनण्याच्या लायकीची नाहीत. ते विवाह तर करतात. फक्त शारिरीक संबंध पूर्ण करुन घेण्यासाठी. परंतू शारिरीक संबंधापुर्वीही दुस-या ब-याच गोष्टी असतात. ज्या स्री पूर्ण करते. परंतू पुरुष ते सर्व विसरुन स्रीला उपभोग्य वस्तू मानते.
आज देशातील संस्कृती लोप पावत चललेली असतांना व पाश्चात्य वारे देशात वाहात असतांना काही लोकं पाश्चात्यांचं अनुकरण करतात. करायला हवे. त्यानुसार काही काही महिलाही पुरुषांना केरकचराच समजतात. त्या पुरातन आपल्या भारतीय संस्कृतीला दोष देतात. ते बरोबर आहे. कारण या पुरातन संस्कृतीनं स्रीयांना उपभोग्य वस्तूच मानले आहे. तिची संपती ही पुरुषाची असल्याचं सांगीतलं आहे. हे मनुस्मृतीत लिहिलेलं विधान. पुरुषांनी पुरातन संस्कृतीचं अंधानुकरण करुन खुपच अतिरेक केला. त्यासाठीच लोकांनी पाश्चात्य संस्कृती स्विकारली. त्यातूनच पुरातन संस्कृतीतील पूर्ण गोष्टी पूर्ण स्वरुपात समाप्त केल्या गेल्या. परंतू पुरातन संस्कृतीबाबत सांगायचं झाल्यास जे नियम स्री जातीला गुलाम बनविणारे होते, ते समाप्त करायला हवे होते. काही प्रथाही. जसे. पती मरणानंतर पत्नीचे सती जाणे, पांढरी साडी वापरणे, केसकर्तन करणे, सिंदूर मिटविणे, बांगड्या फोडणे. इत्यादी प्रथा नक्कीच बंद करायला हव्या होत्या. मानमरातब नाही. कारण या घातक प्रथा होत्या स्रीजातीला दासत्वाचं जीवन जाणूनबुजून जगायला लावण्यासाठी. परंतू जगानं पाश्चात्य दृष्टिकोण स्विकारतांना पांढरी साडी घालणे, सिंदूर मिटविणे, बांगड्या फोडणे ह्या प्रथा आजही सुरु ठेवल्या. तसेच पूर्वी ज्या स्रीया जेष्ठ वडीलधारी माणसांचा आदर करायचे. तो आदरही पाश्चात्य संस्कृतीच्या हव्यासानं बंद केला. आज स्नुषा म्हणून घरात येणारी मुलगी आपली पुरातन संस्कृती, ज्या संस्कृतीत मानमरातब आहे. ती सोडून पाश्चात्यांचं अनुकरण करुन सासूला अती त्रास देते. हे योग्य नाही. पुर्वी सासू त्रास देत होती. आज स्नुषा त्रास देते.
आठ मार्च, जागतिक महिला दिवस. याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे महिलांनी अवश्य पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं. करायलाच पाहिजे. जुन्या प्रथा वाईट आहेत. त्या सोडायलाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी जुन्या प्रथांसोबत मानमरातब सोडावा. वडीलधारी मंडळींना केरकचरा समजून त्यांचे वाभाडे काढावे. पतीचीही इज्जत त्या सडक्या पाश्चात्य संस्कृतीच्या वा-यानं रस्त्यावर काढावी. तसेच याच पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून कोणत्याही स्रीनं प्रत्येक रात्री कसीनोमध्ये जुवा खेळून पती बदलवू नये. ती आपली संस्कृती नाही. तसेच कोणत्याही स्रीनं जुन्या संस्कृतीनुसार पतीला परमेश्वर मानून डोक्यावर बसवू नये. तेही बरोबर नाही. तसेच पतीनंही स्रीला गुलाम समजू नये. तिला योग्य वागणूक द्यावी. हेच आज महिला दिनी सांगणं आहे.
युक्ती अशीच स्री. परंतू तिचा सामना पाश्चात्य संस्कृतीशी झाला नाही. त्यामुळं की काय, अगदी अल्प वयातच ती तंत्रा मंत्राच्या सानिध्यात आली. तिच्या वागण्यानुसार स्री अस्तित्व दुर्बल ठरलं होतं. ती सबल असुनही दुर्बलसारखी वागली. तसेच त्या दुर्बलपणातून ती सखारामचीच नाही तर सर्व परपुरुषाची शिकार झाली. ज्यातून तिला एड्ससारखा आजार झाला होता.
युक्ती याच अंधश्रद्धेची बळी ठरली होती. तिनं सुरुवातीलाच यु ट्यूब पाहिलं असेल किंवा दूरदर्शन सुद्धा पाहात असेल. कदाचित त्यातूनच बोध घेवून तिनं तंत्र मंत्राचा आधार घेतला. तिला वाटलं की तंत्रा मंत्रानं आपल्याला हवं असलेलं प्रेम मिळवता येईल. सुरेशलाही वश करता येईल. परंतू तसं न झाल्यानं ती तंत्र मंत्रांच्या साहाय्यानं त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतू तिची ती गोष्टही फोल ठरली. त्यातूनच तिला अपयश आलं. ती अयशस्वी ठरली. त्याचा परीणाम वाईट झाला व ती अपयशी ठरली व्यतिरीक्त तिला एड्ससारखा असाध्य रोग झाला. ज्यातून ती वाचू शकली नाही.
तंत्र मंत्र साधना याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपणच त्या तंत्रामंत्रासारख्या गोष्टींना खतपाणी घालत असतो. उदा. एखाद्या मुलीची मासीक पाळी येत नसेल किंवा त्यात बदल झाला असेल, तर त्याला तंत्र मंत्राचा हवाला देत त्यात तांत्रीक मंडळी अशी औषधी त्या स्रीला खायला देतात की ज्यातून तिची मासीक पाळी सुरु होते. त्यातून ते सर्व काम तंत्र मंत्रानं झालं असं दाखवलं जातं. एखाद्या स्रीला पुत्र होत नसल्यास तिला अशी औषधी खावू घातली जाते. ज्यातून तिला अपत्यप्राप्ती होते. नाव मात्र तंत्र मंत्रांचं केलं जाते. एखाद्या वेळी साधी मांजर आडवी गेल्यास वा कुत्रा आडवा गेल्यास.......त्यानंतर एखाद्याचं काम बिघडल्यास त्यामध्ये ती मांजर वा कुत्रं आडवं गेल्यानं ते कामं बिघडलं असं दर्शवलं जातं. त्यातूनच अंधश्रद्धा, तंत्र मंत्र याची निर्मीती होते.
तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेचा संबंध प्राण्यांशीही लावला जातो. जसे घुबडाचे ओरडणे, कावळा ओरडणे, साप दिसणे, साप सप्नात दिसणे, मुंगूस दिसणे, मुंगूस स्वप्नात दिसणे. त्यातच काही काही स्वप्नांचा अर्थही काढला जातो. तो अर्थ म्हणजे स्वप्नात मृत्यू दिसणे, स्वप्नात लग्न दिसणे, स्वप्नात पूर दिसणे इत्यादी.
आज जग पाश्चात्य संस्कृतीकडे सरकत असतांना लोकं अजुनही यु ट्यूबच्या माध्यमातून तंत्र मंत्र अंधश्रद्धा पसरवीत असतात. ज्या गोष्टी संसारात नाहीत. गुप्तधन मिळतं म्हणून ते काढण्यासाठी नराचाच बळी लागतो ही गोष्ट विचारात घेवून कित्येक लोकांनी ते गुुप्त धन मिळविण्यासाठी कित्येक नवजात बालकांचे अपहरण केले व त्यांचा बळी दिला. परंतू अजुनही अशी बरीच प्रकरणे आहेत की ज्यात त्या नरबळींचा सुगावा लागलेला नाही. फक्त एखादं प्रकरणंच तेवढं उजेडात येतं.
विशेष सांगायचं म्हणजे आज पाश्चात्य संस्कृतीतून सुधारलेली जनसंख्या पुढे या संस्कृतीनं चंद्र, सुर्य देव नाहीत हेही सिद्ध केलेलं असतांना असल्या अंधश्रद्धा व तंत्र मंत्रांना खतपाणी का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ही यु ट्यूब चैनलं तसेच या दूरदर्शन वरील वाहिण्या अशा अंधश्रद्धेचं का प्रसारण करतात तेही कळत नाही. एक तर चंद्र, सुर्याला देव मानावे ती वस्तूरुपं नाहीत तर मानवरुपं आहेत हे मानावे. मग ती अंधश्रद्धा असो की नसो. मग कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी नरबळी दिला तरी चालेल. अन् ते नरबळी देवूनही फायदा नाही झाला तरी चालेल.
आज अशी बरीचशी प्रकरणं आहेत की अंधश्रद्धा त्यात मानली जातेच. लोकं लपूनचोरुन कोंबड्याच्या झुंजी लढवतात. त्यात कोंबडा जिंकायला हवा म्हणून तंत्रा मंत्राचा आधार घेतला जातो. खरंच तंत्रा मंत्रानं कोंबडा जिंकू शकतो काय? याचं उत्तर नाही असलं तरी लोकं ऐकायला तयार होतात का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे.
तंत्र मंत्र अंधश्रद्धेला आपला समाजच जबाबदार असून त्याच तंत्रामंत्राच्या आधारे आज जग परीवर्तनाकडे वळलेला असतांनाही आपला देश अजुनही तंत्र मंत्र यात गुरफटलेला आहे.
विशेष सांगायचं म्हणजे मुळात तंत्र, मंत्र आणि अंधविश्वास नाहीच. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ठेवायला सांगूही नये. तसेच कोणत्याही स्वरुपाची नैसर्गीक व अनैसर्गीक अंधश्रद्धा पसरवू नये. हे तेवढंच खरं आहे.
आज अंधश्रद्धेची गरज नाही. अंधश्रद्धेवर कुणीही विश्वास करु नये. अंधश्रद्धा या मुळात माणसांचं मन बेचैन करीत असतात नव्हे तर माणसाचं मन बेचैन झाल्यास वा विचलीत झाल्यास ते जाग्यावर राहात नाही. त्यातून सतत विचार करीत राहिल्यास कोणाला नैराश्य येतं. कोणी आजारी पडतात. ज्यातून कोणीही बाहेर पडू शकत नाही. हा अंधश्रद्धेचा रोग कोणाला झाल्यास त्याची परीयंती एकतर आत्महत्येत होते वा ती व्यक्ती वेडी बनते वा तिचा कुठे ऐन वळणावर अपघात होतो. अंधश्रद्धा तेवढ्यात जोपासाव्यात. ज्या आपण पचवू शकतो. ज्यातून कवडीचाही फायदा नसेल, अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. अशा अंधविश्वास पसरविणा-यांवरही विश्वास ठेवू नये. ह्या अंधश्रद्धा, हे तंत्र मंत्र व साधना भारडकथा आहेत. यातून कोणाचंच भलं झालेलं नाही.
सुरेश आज एकाकी जीवन जगत होता. त्यानंही विवाह केला नव्हता. तोही तिच्यावर प्रेम करीतच होता. परंतू तिचं ते परपुरुषासोबत फिरणं, तिचे ते तंत्र मंत्र, तिची ती साधना, त्याला आवडत नसल्यानं त्यानं तिचा पिच्चा सोडला होता व जीवनात कधीच विवाह न करण्याचा निश्चय करुन तो राहात होता कोणाच्याही नादात न पडता. तिच्या त्या सर्व कृत्याबाबत त्याला पदोपदी दुःख व्हायचं. परंतू तो तिला रागावू शकत नव्हता वा तिला समजदारीच्या गोष्टीही सांगू शकत नव्हता. काळ असाच पुढे पुढे सरकत चालला होता.
बदलत्या व सरकत्या काळानं असं वळण घेतलं की आज तिच्या त्या कर्तृत्वानं तिला कर्तृत्वाचे भोग भोगावे लागले होते. तसंच मरण आलं होतं. त्यातच आज ती समाप्त झाली होती. सुरेशच्या जीवनातून व जगातून. परंतू तिच्या त्या तरुणपणाच्या आठवणी आणि तिला ते फिरवणं तसेच तिला मोबाइल घेवून देणं आणि ते लपूनछपून झालेलं समागम आजही सुरेशला आठवत होतं नव्हे तर छळत होतं. कधी कधी तो बागेत फिरायला जायचा आणि जेव्हा परत फिरायचा. तसा त्याला युक्तीचा आवाज आल्याचा भाष व्हायचा व तो जेव्हा मागे वळून पाहायचा, तेव्हा कोणीच दिसायचं नाही. तेव्हा तो हताश, निराश व्हायचा व चालायला लागायचा. एकटाच....... दिनवाणे...... अनवाणीपणे....... मनात विचार करीत. ते विचार त्याला अस्वस्थ करायचे. कारण मनात विचारांचं काहूर माजायचं. ते विचार कोणाजवळ व्यक्त करावेसे वाटायचे. परंतू कोणीच मिळायचं नाही. कोणीच असायचं नाही. तिही दिसायची नाही. फक्त तीचा भाष व्हायचा. वाटायचं की ती त्याच्या जवळच उभी आहे. ती दिसायची त्याला स्वप्नात. कारण तिला तिच्या पापकर्मानं अजुनही मोक्ष मिळालेला नव्हता. ती त्याची अंधश्रद्धा होती की काय होतं, ते त्यालाही कळत नव्हतं.

******************************************************************************समाप्त ***********