Anita would have been one in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | एक होती अनिता

Featured Books
Categories
Share

एक होती अनिता

मनोगत

एक होती अनिता हे पुस्तक वाचकासमोर ठेवतांना मला अत्यंत आनंद होत आहे. अनिता ही एक पुस्तक नाही तर ते माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण प्रसंगावर आधारित एक वास्तविकता दर्शविणारी कादंबरी आहे.
या कादंबरीतील नायीका अनिता एक मोबाइल वर प्रेम करणारी तरुणी. तिचं मोबाइल वर एवढं प्रेम होतं की त्या मोबाइलच्या नादात आपला संसार उध्वस्त होत आहे याची तिला जाणीवच नव्हती. त्यातच या मोबाइलच्या नादात लागूनक ती फेसबुकवरील अनेक तरुणांच्या जाळ्यात फसतच जाते. शेवटी ते तिचा उपभोग घेण्यासाठी तिच्याशी विवाहाचं नाटक करतात. त्यातूनच एका तरुणाकडून तिला मुलगीही होते. तरीही ती. सुधारत नाही. शेवटी या मोबाइलच्या नादात तिचं काय होते. ते जाणून घेण्यासाठी माझी एक होती अनिता नावाची पुस्तक आपण नक्की वाचावी व पुस्तक कशी वाटली यासाठी एकतरी प्रतिक्रिया अवश्य द्यावी.
माणसाला मोबाइल प्रेम नक्की असावे. परंतू मोबाइलच्या नादात पडून कोणीही आपला संसार उध्वस्त करु नये. आपला पती आणि आपल्या मुलांवर प्रेम करावे. ती मुलंच आपली धनसंपत्ती असते. फेसबुकचे मित्र ही आपली धनसंपत्ती नसतेच. ते मित्र हे स्वार्थी असतात. फसविणारे असतात. परंतू हे आजच्या मुलामुलींना कोण सांगणार. शेवटी याचा परीणाम हा वाईटचक निघतो.
मोबाइलच्या नादात पडून प्रेम केल्यास जे दुष्परिणाम निघतात. त्यावर आधारीत अनिता कादंबरी मोबाइलवर प्रेम करणा-या प्रेमवीरांना त्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी एक अंजनच आहे. यातून वाचकांना एक विनंती की आपण ही पुस्तक वाचा व यापासून काही बोध अवश्य घ्या. तुम्हीही सुधरा व इतरांनाही सुुधरवा. ही पुस्तक वाचून एकतरी व्यक्ती सुधरला ना तर माझी ही पुस्तक लिहिण्याचं मला समाधान वााटेल व ही पुस्तक लिहिण्याचं सार्थक झाल्यासारखं होईल असं मला वाटते. शेवटी एकच लिहितो कीआपण ही पुस्तक वाचा व मनमुराद आनंद घ्या एवढंच सांगेल.
आपला अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

एक होती अनिता (कादंबरी)

माणूस जन्माला येतो. त्याचबरोबर तो आपले जीवन जगण्यासाठी जीवन घडवीत असतो. त्यातच तो कधीकधी आवश्यकता पडल्यास इतरांची मदत घेत असतो. कधीकधी इतरांना मदत करीत असतो. परंतू ही मदत करणे जेव्हा अंगावर बेतते. तेव्हा मात्र विचार येतो की आपण अशी मदत करायला नको होती.
मदतीचा गुणधर्म........ अतिशय चांगला धर्म आहे. परंतू ती मदत कोणाला करावी हेही त्या मदतीतून दिसायला हवं. कधीकधी या मदतीचा गैरफायदा घेतला जातो. एक प्रसंग सांगतो. एक व्यक्ती खानावळीत काम करायचा. त्यातच त्या खानावळीतून तो रात्री अकरालला सुटून आपल्या घरी दूर अंतरावरुन यायचा. परंतू तो कोणाला लिफ्ट द्यायचा नाही. एकदा असाच तो रात्री खानावळीतून सुटल्यावर घरी परत यायला निघाला. तेव्हा वाटेत त्याला एका व्यक्तीनं लिफ्ट मागीतली. त्यातच त्यानं मदत म्हणून त्या व्यक्तीला लिफ्ट दिली. त्या व्यक्तीला लिफ्ट मिळताच तो बोलत चालत त्या व्यक्तीसोबत आला. त्यावेळी त्यानं त्या लिफ्ट देणा-या व्यक्तीकडून त्याची वैयक्तीक बरीच माहिती विचारली. त्यानंही भोळेभाबडेपणानं ती माहिती सांगीतली.
तो व्यक्ती एक पोलिस शिपाही होता. त्यानं आपल्या पोलिस स्टेशन क्षेत्रात पोहोचल्यावर त्या व्यक्तीची गाडी चालान केली. कारण त्याने त्या गाडीवर बसल्यावर त्याच्या गाडीबाबतची पुरेपूर माहिती विचारुन टाकली होती.
असाच दुसरा प्रसंग सांगतो. दोन व्यक्ती हाप मर्डर करुन आले. त्यांनी एका व्यक्तीला लिफ्ट मागीतली. अंधारी ती रात्र. माहिती पडलंच नाही की ते खुन करुन आलेत. त्यानं मदत म्हणून लिफ्ट दिली.. परंतू सगळं विपरीत घडलं. त्या रक्ताचे डाग त्याच्या सीटवर पडले आणि ते रात्री धुतले गेले नसल्यानं सकाळीच पोलिस त्याच्या घरी आले व त्याला घेवून गेले. या दोन्ही प्रकरणात मदत ही अंगावर बेतली.
आज आपण मदत करतो. कोणाला करतो. आंधळ्या, लंगड्या, अपंगाना. खरे अपंग ठीक आहेत. परंतू ज्यांना जाणूनबुजून अपंग बनवलं जातं, त्यांचं काय? आज अशा ब-याच टोळ्या सक्रीय आहेत की जे लहान मुलांचं अपहरण करतात आणि त्यांना अपंग बनवतात. त्यांचे जाणूनबुजून हात पाय कापतात व जबरन भीक्षा मागायला लावतात. तो आलेला भीक्षेचा पैसा त्यांना देत नाही. त्यांना फक्त दोनवेळचं जेवण देतात. तेही अर्धपोटी. परंतू आपल्याला ती वास्तविकता माहित नसल्यानं आपल्याला त्याचा विचारच येत नाही. हे असं का घडतं? याचा कधी आपण विचार केला आहे काय? ही अपहरण झालेली मुलं कोणती? याचा तरी विचार करतो काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आपल्याला समोर ती उघडी नागडी मुलं दिसली की दया दाखवून आपण त्यांना रुपया दोन रुपये देतो. खोलात शिरत नाही. कारण खोलात शिरलोच तर फार दुःख होतं. दुःख झालं तरी ते आपण झेलू शकत नाही. त्यामुळं आपण त्यामध्ये राहू शकत नाही.
एक अजून प्रसंग सांगतो. एका गृहस्थाने आपल्या मेव्हणीला फार मदत केली. तिला एक मुलगीही होती. ती लहान होती. अचानक तिचा पती मरण पावला. त्यानंतर तिला राहावत नव्हतं. शेवटी तिनं लिव्ह इन रिलेशन अंतर्गत काही व्यक्ती पतीसारखे ठेवले. ते व्यक्ती तिच्या मुलीला पसंत नव्हते. म्हणून की काय, ती मुलगी विरोध करीत होती. तसा त्या मुलीचा मोठा बापही. त्यातच ती मुलगी त्या व्यक्तींना काहीबाही बोलायची. तसा तिचा मोठा बापही. त्यालाही वाटायचं की तिनं तसा नाद सोडावा व आपल्या मुलीकडं पाहावं. परंतू ती काही ऐकेना. तसे तिचे काही पती सोडूनही जायचे. परंतू तिला काही फरक पडायचा नाही.
मुलीची इच्छा पाहून त्या मुलीचा मोठा बाप तिच्या आईला बोलायचा.. तसा तो मदतही करायचा. परंतू ते पती सोडून जाताच ती बावचळायची व म्हणायची की तिचा मोठा बापच तिची जिंदगी बरबाद करतोय. म्हणूनच तिचे पती सोडून जातात. शेवटी ही मदतीची मानसिकता. ती त्याला बदनाम करुन गेली. तिनं आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी आज त्या मुलीलाही सोडलं होतं. ती मुलगी आज मोठ्या वडीलाकडे होती नव्हे तर आनंदानंं जगत होती आणि तिची आई आज सैरावैरा प्रेम मिळविण्यासाठी फिरत होती.
ती मुलगी आज मोठी झाली होती. तिचा विवाहही झाला होता आणि तिची आई एच आय व्ही ग्रस्त झाली होती. तशी एकाकी जीवन जगत होती. आज ती तडफडत होती आपल्या मुलीला भेटण्यासाठी. परंतू तिची मुलगी तिला भेटायचं टाळत होती. तिनं जे कर्म केले होते. त्याची शिक्षा तिला नियतीनं दिली होती. आज तिला मदत करणारे असे कोणीच नव्हते. त्यातच ती पश्चाताप करु करु जगत होती. आज मात्र तिला सारंच आठवत होतं.
मदतीची आज मानसिकता उरलेली नाही. ज्याला आपण मदत करतो. तो व्यक्ती आपलं काही नाव घेत नाही. उलट ज्याला आपण मदत करतो. त्याचा आपल्याला भयंकर त्रास होतो. परंतू नियती ते सगळं पाहात असते. ती नियती काळ सरकताच अशी रौद्र रुप धारण करते. मग त्या नियतीच्या रौद्र रुपातून कोणीही सुटू शकत नाही.
मदत नक्कीच करावी. परंतू ती मदत सर्वांना करु नये. जो त्याचं बलिष्ठान ठेवेल असं तुम्हाला वाटत असेल. त्यालाच मदत करावी. तसं पाहता ते ओळखता येणे कठीण आहे.
मदत ही अनोळखी माणसांना करु नये. ती नक्कीच जीवावर बेतते. जिथे सख्खेच नात्यातले आपण मदत करुनही धोका देतात. तिथे काही लोकं तर पराये व्यक्ती आहेत. आज एक गृहस्थ मी असाही पाहिला की ज्याला कोरोना झाला. परंतू तो मरण पावला नाही. त्याच्या समोर कित्येक माणसं मरण पावली. कोणाला जीवंंतच बेशुद्धावस्थेत गुंडाळलं. कधी आपलाही नंबर लागेल असं त्याला वाटत होतं. परंतू तो वाचला. त्याचं कारण होतं, त्यानं केलेली मदत. त्या ठिकाणी एक डॉक्टर मुलगी होती. जिला शिकायला त्यानं मदत केली होती. म्हणूनच ती डॉक्टर झाली होती.
महत्वपूर्ण गोष्ट ही की माझे जिजू म्हणत, मदत दहा लोकांना करावी. त्यातून दोन जरी आपलं नाव घेत असतील तर ते दहा लोकांना मदत केल्यासारखं होईल. त्यात काय सत्य होतं ते मला माहित नाही. मात्र मी त्यातून एकच शिकलो की शिवरायांना मदत करणारे त्यांचे मावळे आजही इतिहासात अभ्यासले जातात. इतर मंडळी नाही. तसंच सावित्री फुलेंना मदत करणारी फातिमा आजही अभ्यासली जाते, झाशीच्या राणींना मदत करणारी झलकारी बाई आजही इतिहासाच्या पानात दिसते अन् आजही भारतीय स्वाकंत्र्यात मदत करणारे क्रांतीकारक अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमात अग्रपानावर दिसतात हे तेवढंच खरं आहे. मात्र यातून आपल्याला जो बोध घ्यायचा ते आपल्यावर आहे. मी सांगू शकत नाही हे तेवढंच खरं आहे.

************************************************

अनिता.........अनिता सुंदर होती. लहानपणापासूनच लाडाची होती. तिचे मायबाप तिच्यावर अतिशय प्रेम करीत असत नव्हे तर जीव ओवाळून टाकत असत.
म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. परंतू अनिताबद्दल सांगायचं झाल्यास लहानपणापासून तिच्या वात्रट गोष्टी कधीच दिसल्या नाही. तशी ती वाह्यात निघेल असंही वाटलं नाही. सुुकोमल मनाची होती ती.
अनिता पाहिजे तेवढी सुंदर नव्हती. त्यातच तिची शरीरयष्टीही चांगली नव्हती. परंतू तरीही तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता.
अनिता बारीक होती. तिची कमर पतली होती. चेहरा लांबूळका होता. आज ती एकेचाळीस वर्षाची झाली होती. तरीही ती सुंदरच वाटत होती. चेहरा तजेलदार होता. चेह-यावर अजुनही सुरकृत्या पडल्या नव्हत्या. चेहरा चिकनचोपडा होता.
अनिता साधी राहात नव्हती. तिला मेकअप करण्याची हौस होती. ती नित्यनेमानं सौंदर्य प्रसाधनाचा वापर करुन नित्यनेमानं सौंदर्य प्रसाधनात राहात होती. ती ओठाला ओष्ठरंग लावत होती. चेह-यावर कोणतीतरी क्रीम लावत असे. त्यावर पावडर लावत होती. केस कुरळे होते व ती केसाचे वेगवेगळे प्रकार करुन फोटो काढत होती.
वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढण्याची तिला सवय होती. तसं पाहता मोबाईलवर सेल्फ फोटो काढून तो फेसबूक, व्हाट्सअपच्या माध्यमातून मित्र मैत्रीणींना पाठवण्याची हौस बाळगायची. परंतू ते फोटो व्हाट्सअप, फेसबूक माध्यमातून पाठवितांना मोबाईलवर काय काय घडू शकतं याची तिला कल्पना नव्हती.
अनिता तसं पाहता खुप आळशी होती. अशी आळशी की तिला कोणतीही कामं करणं अजिबात आवडायचे नाही. ती तासन् तास एकाच जाग्यावर बसून राहायची आणि तासन् तास ती मोबाइल पाहात राहायची. त्या मोबाईलवर आलेले मेसेज, त्या मोबाईलवर आलेले व्हिडीओ, त्या मोबाईलवर आलेली दृश्य.......मग ते चांगले असेना की वाईट. तिला ते पाहतांना आवडायचे. ती खुश व्हायची. तासन् तास तिला मोबाइल पाहतांना थकल्यासारखं वाटायचं नाही.
लहानपण अतिशय गोड वातावरणात गेलं होतं. मायबापानं तिला अतिशय प्रेम दिलं होतं.
अनिताला एक बहिण होती व एक भाऊ. भाऊ वयानं मोठा होता. त्याचा विवाह झाला होता. तो आपल्या संसारात खुश होता. त्याला बहिणीबद्दल काहीही वाटत नव्हतं. त्यानं तिला कान कापून सोडलं होतं. कारण आज तिचा स्वभाव महाभयंकर असा बनला होता. कधी स्वप्नातही विचार केला नसेल असा आज तिचा स्वभाव होता.
माणसांची पारख करण्याची तिला कल्पना नव्हती. ती कोणत्याही माणसाच्या जाळ्यात नेहमी अडकत असे आणि जेव्हा प्रसंग बेतत असे. तेव्हा मात्र तिचे डोळे उघडत असत. मात्र तेव्हा वेळ गेलेली असे.
अनिताच्या आयष्यात असे बरेच मोड आले की ज्या प्रत्येक मोडवर ती खड्ड्यातचच पडली. तरीही तिनं सुधारणेचे नाव घेतले नाही. त्यातच आज तिचं डोकंही चालेनासं झालं होतं.
अनिताला एक मुलगी होती. परंतू तिचीही तिला अजिबात आठवण येत नसे. त्याचं कारण होतं तो मोबाइल. तिचं मोबाइलवर निरतिशय प्रेम होतं. ती एकप्रकारे सर्वकाही सोडेल, परंतू मोबाइल सोडू शकत नव्हती. एवढा जीव होता तिचा मोबाईलवर.
****************************************

ती तारुण्याची अवस्था. बालपण अनिताचं सुखात गेलेलं. बाप एसटीत कर्मचारी होता. त्यानं तिनंही लेकराबाबत कधीच भेदभाव केला नाही. तिनंही लेकरं चांगलीच होती. त्यामुळं तिच्या आयुष्यातही असं काही घडेल असं तिला वाटत नव्हतं. तसा बाप तिनं हठ्ठ करताच तिला आपल्यासोबत एसटीमध्ये घेवून जायचा तेही आपल्या गोदीत बसवून. त्याला काय माहित होते की आज आपण जिचा लाड करतो, ती वाह्यात निघेल म्हणून.
तो काळ मोबाइलचा नव्हताच मुळी. परंतू जसं बालपण सरलं. तसं अनितानं तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले. त्यातच त्या नादान अल्पवयातच ती एका मुलाच्या प्रेमात पडली. बस अनिताचं इथंच चुकलं.
सुरेश नाव होतं त्याचं. तो तिच्यावर प्रेम करीत होता की कुणास ठाऊक. परंतू ते दोघंही एकमेकांसोबत फिरत होते. हातात हात घालून फिरत होते. बागबगीचे, चित्रपटगृहे, होटल्स सारं ती त्या सुरेशसोबत फिरली होती. तसं पाहता ते तरुण वय. त्या वयात तरुण मुलांसोबत फिरतांना कोणत्याही मुलीला बरं वाटते. अगदी तिलाही बरं वाटत होतं. त्यामुळं की काय, प्रेमाच्या आणाभाका टाकत ते दोघंही एकमेकांसोबत फिरत होते. अशातच अनिता शिक्षणही शिकत होती. मन लावून अभ्यासही करीत होती.

***********************************************

प्रत्येक आई आपल्या बाळाला जन्म देत असते. त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारत असते. परंतू जेव्हा ती त्या बाळाला सोडून जाते. तेव्हा त्या बाळाचा कोणताच दोष नसतो. परंतू तरीही त्या बाळाला दोषी समजलं जातं.
मोहिनी नावाची ती मेव्हणी. त्या मोहिणीनं उत्कर्षा नावाच्या आपल्या मुलीला जन्म दिला आणि ती मोकळी झाली. त्यातच ती मुलगी आपल्या मोठ्या बापाकडं राहू लागली. मोठा बाप तिला लहानाचा मोठा करु लागला.
उत्कर्षा........ती लहान होती. तेव्हापासूनच त्या उत्कर्षावरुन भले मोठे वाद होत. त्या वादातून तिचा मोठा बाप म्हणत असे की मोहिनीनं उत्कर्षाला न्यावं. परंतू तिची मोठी बहिण उत्कर्षाला पाठवायला तयार नव्हती. त्याचं कारण होतं मोहिनीचा विवाह. उत्कर्षाचा बाप मरताच मोहिनीनं एका बदमाश व्यक्तीसोबत विवाह केला होता. जो विवाह तिच्या मोठ्या बहिणीलाच नाही तर तिच्या जिजूलाही पसंत नव्हता. त्यांना वाटत होते की उत्कर्षा वयात येताच तिचा तो नवीन बदमाश पती तिला विकून टाकेल. परंतू तिच्या आईला त्याची लेनदेन नव्हती. तिची आई तर स्वतः म्हणत होती की माझी मुलगी मला द्यावी. मी तिचे जीवन बरबाद करो की काहीही करो. ती माझी मुलगी आहे. मी तुमची तक्रार पोलिस स्टेशनला देईल.
नेहमीच्या या गोष्टी. त्यात मुलीचा दोष नव्हता. मोहिनी अगदी आनंदित होती. मात्र मोहिनी व उत्कर्षावरुन उत्कर्षाच्या मोठ्या बापाकडेच वाद होत असत.
उत्कर्षाच्या मोठ्या बापाचं नाव आनंद होतं. त्याचं नाव आनंद जरी असलं तरी त्याच्या घरी आनंद नव्हता. तो दुःखी होता. एवढा दुःखी की कोणी कल्पनाही करु शकत नसेल.
आनंद आपलं दुःख लोकांना सांगायचा. काही लोकं त्याचं दुःख ऐकायचे. काही लोक ते दुःख ऐकताच त्याला साांत्वना द्यायचे. काही लोकं भडकवायचे तर काही काही मजाही घेत असत. तशी ती चर्चा हळूहळू त्याच्या कार्यालयात गेली. तशी एक महिला म्हणाली,
"सर, आपण तिच्यात आणि आपल्या मुलीत थोडासा भेदभाव करा. जेणेकरुन तुमची पत्नी तिला मोहिणीला देवून टाकेल. तुमचं घर डिस्टर्ब झालं आहे. ती आनंदात आहे आणि तुम्ही आपलं जीवन दुःखात का काढावे."
आनंदानं होकार तर दिला. परंतू तो उत्कर्षा आणि आपली मुलगी यात भेदभाव कसा करणार! तोही तिला मुलगीच मानत होता. स्वतःच्या मुलीएवढेच प्रेम तिलाही देत होता. त्यानं आतापर्यंतच्या काळात उत्कर्षाला कधी अंतर दिलं नाही. अगदी अंगाखांद्यावर खेळवलं होेतं तिला. मग तो भेदभाव कसा करणाार. तसा त्यांच्या घरच्या भांडणात उत्कर्षाचा कोणता दोष? दोष होता तिच्या आईचा. तिनंच आपले जीवन सावरण्यासाठी पती केले होते. परंतू तिच्या विवाहात त्या लहानग्या बाळाची इच्छा नसल्यानं तिचे पती टिकत नव्हते. ती प्रेमाच्या मागं धावत होती. परंतू प्रेम तिला मिळत नव्हते. खरे प्रेम त्या मुलीत होते. तिच्या पती करण्यात नव्हते. परंतू ती तिला सांभाळण्याऐवजी ती पती करीत सुटली होती.
काही लोकं म्हणत होते की असा भांडण करीत करीत सांभाळ कोणीच करु शकत नाही. परंतू आपण सांभाळ करता आहात ही एक आनंदाची गोष्ट असून आपणाला याचा आशिर्वादच लागेल. परंतू काही लोकं म्हणत होते की असे म्हणणा-याला आपण म्हणा की काही दिवस या मुलीला आपल्या घरी घेवून जा. तिची थोडी सेवा करा व आपल्याला जे काही पुण्य मिळेल. त्याचे भागीदार बना.
ते लोकांचे बोल. ते ऐकले की आनंदच्या मनात विचारांची कालवाकालव व्हायची व ती गोष्ट घरी काढताच त्याची पत्नी व त्याच्यात भांडण व्हायचं व पुन्हा आनंद दुःखी व्हायचा. तसा आपल्या मेव्हणीबाबत विचार करायचा. परंतू ती याचा विचार करीत नव्हती. ती तर मुलीच्या जबाबदारीतून मोकळी होवून रंगरलिया मनवीत सुटली होती. तिला परीवारांची आठवण येत नव्हती. तसेच तिच्या मुलीचीही. तसेच तिच्या मुलीवरुन घरात भांडण होत असलं तरी तिची मुलगी नाबालिग होती. तिला आपले बडे पप्पा का भांडण करतात तेही कळत नव्हते.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आनंदचं घर डिस्टर्ब असलं आणि लोकंही त्याला चांगलं वाईट या दोन्ही गोष्टी शिकवीत असले तरी त्या चांगल्या वाईट गोष्टीचं पालन करायचं हे त्याचं त्यालाच माहित होतं. तसा तो विचार करीत होता चांगल्या मतानं. काही लोकं सांगतही होते की उत्कर्षाही चांगली निघणार नाही. कारण तिची आईच बदमाश आहे. परंतू ते उद्याचं भविष्य होतं आणि उद्याच्या भविष्यासाठी आनंद आजचं वर्तमान खराब करु पाहात नव्हता. ती मुलगी कशीही का निघेना, आनंद त्या मुलीबाबत चांगलेच विचार करीत होता. जरी त्याची भांडणं त्याच्या पत्नीसोबत झाली, तरी त्यानं कधी मुलीशी भांडणं केली नव्हती. जरी लोकं त्याची मुलगी व उत्कर्षा यात भेदभाव करायला लावत असतील, तरी त्यानं कधी त्या दोघीत भेदभाव केला नाही.
आज आनंद म्हातारा झाला होता. त्याची मेव्हणीही म्हातारी झाली होती. तिचा शेवटचा पती तिला म्हातारणातही दुःख देत होता. तो म्हातारपणातही तिला मारत होता. त्यानं तिच्याचसमोर दुसरी पत्नी केली होती. त्यामुळं तो तिला प्रेम देत नव्हता. आताही तिला उत्कर्षाची आठवण येत होती. परंतू उत्कर्षा काही तिच्याजवळ जायला तयार नव्हती. मात्र ती आज आनंदच्या मुलीपेक्षाही जास्त आनंदला जपत होती. आनंदनं जे काही उत्कर्षासाठी केलं होतं. आज तिच उत्कर्षा व्याजासह त्याची सेवा करुन त्याचे ऋण खंडवीत होती. एक दुरचा बाप असला तरी त्याला सख्खा बाप मानत होती.
प्रत्येकच आई बाळाला जन्म देत असते. ती आपल्या बाळाचं संगोपन करीत असते. त्याला खावूपिऊ घालण्यापासून तर त्याला कपडेलत्ते घेवून देण्यापर्यंत तसंच पुढं त्याला शिक्षण देण्यापर्यंतही आई आपल्या बाळासाठी करीत असते. ती आपल्या बाळासाठी आपला देह झिजवीत असते हे अगदी खरं आहे. परंतू याला काही अपवादही आहेत.
काही काही महिला ज्या नोकरी करीत असतात. त्याही महिला आपल्या इवल्याशा बाळाला त्याचं चांगलं संगोपन व्हावं म्हणून त्याला पाळणाघरात टाकत असतात किंवा त्याच्यासाठी आयांचा बंदोबस्त करीत असतात. जणू आपला बाळ आपलाच आहे अशाप्रकारचे वर्तन करीत असतात.
काही काही माता याला अपवाद आहेत. त्या बाळाचं संगोपन करणं सोडा, त्या स्वतःच्या बाळाचा जीवही घेत असतात. एक प्रसंग सांगतो.
मोहिनी अशीच एक आई. बालपणापासून तिच्या वडीलानं तिला अगदी लाडानं प्रेमानं वाढवलं. तिला चांगलं चांगलं खावू पिवू घातलं. परंतू ती जेव्हा वयात आली. तेव्हा तिला भलतीच सवय लागली व ती प्रेमाच्या चक्करमध्ये फसली.
प्रेमच ते. आजचं प्रेम हे खरं नसतं. त्या प्रेमात फक्त आणि फक्त वासना असते. स्वार्थ दडलेला असतो त्यात. मोहिनीचंही तसंच झालं. खरी प्रेम करणारी मोहिनी, ती याच गोष्टीची शिकार बनली. ती वाढत्या वयाबरोबर प्रेम करायला तर लागली. परंतू त्या प्रेमात तिला धोका मिळाला व एक दिवस जेव्हा वेळ आली, तेव्हा त्या मुलानं विवाह करण्यास नकार दिला. त्यातच मोहिनीची मती बिघडली. तिला आपलं जगात कोणीच नाही असं वाटायला लागलं. शेवटी तिला त्या मुलाची सवय पडल्यानं तिला राहवत नव्हतं. त्यातच तिनं दुसरा मुलगा पकडला. तिथंही तिला खरं प्रेम मिळालं नाही. ती प्रेमाची भुकेलीच राहिली. शेवटपर्यंत तिच्याशी मुलांनी स्वार्थासाठीच प्रेम केलं. परंतू मोहिनीशी कुणीही विवाह केला नाही. याच दरम्यान तिला एका तरुणापासून एक मुलगीही झाली. ती लहानाची मोठी होवू लागली. शेवटी त्या मुलीनं म्हटलं की आई, तू अशी का करतेस. हे धंदे सोड. नाहीतर या मुलीला पारखी होशील. परंतू ती काही ऐकली नाही. तिनं मुलगी असतांनाही असे पती करणे सुरुच ठेवले.शेवटी मुलीनं तिला सोडलं. ती आता आपल्या मोठ्या वडीलांकडे आनंदानं राहात होती. लहानाची मोठी होत होती. आईच्या कृत्याबाबत तिला कोसत होती. देवाजवळ ती सुधरु दे अशी प्रार्थना करीत होती.
आज मोहिनीजवळ एकही पती टिकला नव्हता. ती फक्त प्रेम पाहात फिरली होती. परंतू कोणीही तिला प्रेम दिलं नव्हतं. मुलीनंही तिला टाकून दिलं होतं. त्यातच तिनं पकडलेल्या वासनाधीन पुरुषांनीही. आज ती एकाकी झाली होती. तिला मुलीची आठवण येत होती. तिला मुलीला फोन करावासा वाटत होता. ती फोन करीतही होती. परंतू ती मुलगी काही फोन उचलत नव्हती. तसंच तिला मुलीला भेटावसंही वाटत होतं. परंतू मुलगी काही भेटत नव्हती. मुलीचं हे वागणं म्हणजे तिच्या आईला धडा शिकविण्यासारखं होतं. ती हताश निराश मोहिनी आज मुलगी मुलगी करुन रडत होती. कारण ती मुलगी म्हणजे आज तिला तिच्या काळजाचा तुकडा वाटत होता. तिला आत्महत्या करावीशी वाटत होती. परंतू नियती अशी निष्ठूर झाली होती की ती तिला आत्महत्याही करु देत नव्हती.
मुलगी ती. मुलीचा आवाज ऐकण्यासाठी ती तरसत होती. परंतू मुलगी काही बोलत नव्हती. आज तो दिवस उजळला. तिच्याच्यानं राहणं जमलं नाही. तसा न राहवून तिनं आपल्या मुलीला फोन केला. परंतू मुलीनं काही तिचा फोन उचलला नाही. तसा तो फोन तिच्या मोठ्या वडीलानं उचलला. अत्यंत संयमानं त्याचं बोलणं सुरु झालं. तशी ती म्हणाली,
"माझी मुलगी मला परत करुन द्या."
"कशासाठी?" वडील भाटवा म्हणाला.
"मला जगवत नाही."
"मग मी काय करु?"
"मला मुलगी हवी."
"कशाला? अजून एखादा पती शोधून घे. परंतू मुलगी दे म्हणू नको."
मोठ्या वडील भाटव्याचे ते बोललेले शब्द. ते शब्द काही खोटे नव्हते. त्यात किंचीतही खोटेपणा नव्हता. परंतू मोहिनीला ते शब्द बोचरे ठरले होते. तशी ती भीती दाखविण्यासाठी पुन्हा म्हणाली,
"मुलगी नाही देणार तर मी आत्महत्या करीन आणि तुम्हा सर्वांना फसवीन. नाहीतर मी तुमच्या नावानं पोलिस तक्रार करीन आणि तुम्हाला फसवीन. तुमची नोकरी खाईन."
मोहिनीचा राग......ती काय बोलत होती हे तिलाही कळत नव्हतं. तसा वडील भाटवा म्हणाला,
"हा विचार तेव्हाच करायला हवा होता. जेव्हा तुझी मुलगी पती नको करु म्हणत होती. तू फक्त आपली वासनेची तृष्णा पाहिली. मुलगी पाहिली नाही. आता मुलगी तुला टाळते, त्यात माझा काय दोष? तू एक आई म्हणून वागलीच नाही. आई म्हणून वागली असती तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती."
ते शब्द........वडील भाटव्याचे शेवटचे शब्द ठरले. मोहिणीला त्या शब्दानं भयंकर वाईट वाटलं. तशी मोहिनीनं एक चिठ्ठी लिहिली व त्यात माझी माझ्या भाटव्यानं जिंदगी खराब केली असं लिहून एक दोर घेतला. तो छताला लावला व आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं.
मोहिनी संपली होती. तशी ती फाशीची गोष्ट लोकांना माहित झाली. पोलिसांनी तपास केला. तपासात मोहिनीजवळ एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीतील मजकूर सापडला. मजकूर वाचला. त्यानुसार पोलिस वडील भाटव्याच्या घरी आले. त्याला त्या चिठ्ठीनुसार अटक केली. अटकेनंतर ती केस न्यायालयात चालली. न्यायालयात सर्वांचे बयाण झाले. त्यातच तिच्या मुलीचेही बयाण झाले व तो वडील भाटवा बा इज्जत बरी झाला.
मोहिनी मरण पावली होती. तसा दोष तिचाच होता. ती फक्त आपल्या सुखासाठी जगली होती. परंतू तिनं तो दोष दुस-यावर लावला होता. आज तिच्या मुलीनच तिला धडा शिकवला होता नव्हे तर तिला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं होतं.
प्रत्येक आईनं आपल्या बाळाला जन्म द्यावा. परंतू सर्व प्रकारचा विचार करुन. जर बाळाला पोसायचे नसेल आणि असे पतीच करत सुटायचं असेल तर आपल्या बाळास जन्म देवूच नये व मुलांना वा-यावर सोडून आपलं सुख शोधू नये आणि शोधलंच तर त्याचा दोष कुणावरही लावू नये हे तेवढंच खरं आहे. प्रत्येक आईनं बाळाला जन्म देण्यापुर्वी आपल्या बाळाच्या संगोपनाचा विचार आधीच करावा. जेणेकरुन आपल्या कृत्याचा परीणाम बाळाला सोसावा लागू नये म्हणजे झालं.

*********************************************

एकदाचा तो दिवस. त्या दिवशी अनिता सकाळीच त्याचे घरी गेली. म्हणाली,
"मला, तुझ्याशी विवाह करायचा आहे."
ते अनिताचे शब्द. सुुरेशनं ते शब्द ऐकले. तसा तो विचार करु लागला. त्या विचाराच्या चक्रातून बाहेर पडून तो म्हणाला,
"वेडी झाली का? मला तुझ्याशी विवाह करायचा नाही. मला टाईमपास करायचा होता. तो मी केला. माझं काम झालं. आता तू जावू शकतेस."
सुरेशचे ते शब्द. ते शब्द तलवारीच्या धारेसारखे होते. ते शब्द विषारी गळ ओकून गेले. त्या शब्दानं अनिताला आपलीच मान कापल्यासारखी वाटली. तसा तिला त्या शब्दाचा भयंकर राग आला व ती म्हणाली,
"साले मादरपाट, मी काही टाईमपास करायची वस्तू आहे का?"
ती बोलून गेली रागाच्या भरात. काही काही बरळत होती. तोही काहीतरी प्रतिउत्तरात बरळत होता. परंतू तिच्यानं त्याचे बोललेले शब्द सहन होत नव्हते. तशी ती त्याचेजवळ गेली व त्याच्या दोन कानशिलात लावल्यानंंतर ती माघारी आली.
अनिता माघारी फिरली खरी. ती घरी आली. तिला घरी काही करमत नव्हते. घर उदासल्यासारखं वाटत होतं. ते घर तिला खायलाही धावत होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. उपाय काही सापडत नव्हता. तसा तो वस्तीतच राहात होता.
अनिता घरी तर राहात होती. परंतू तिला त्याला धडा शिकवायचा होता. अशातच त्याला जळविण्यासाठी तिनं एक प्रकाश नावाचा मुलगा पकडला. जो घराजवळच राहात होता. कदाचित तिला वाटत होतं की ती या मुलाच्या गाडीवर वा सोबत फिरतांना त्याचा जळफळाट होईल व तो पुन्हा प्रेम करायला लागेल.
सुरेशसोबत असलेलं तिचं ते पहिलं प्रेम.......तिच्या जीवनात अंधार करुन गेलं. तिला वाटलं की सुरेशशी विवाह करावा व आपला सुखी संसार थाटावा. तसे तिनं स्वप्न पाहिले होते. परंतू त्याच्या नकारानं तिच्या मनातील ते स्वप्न फोल ठरले होते. त्यानं नकार दिला होता. परंतू अजुनही तिच्या मनात सुरेशबद्दल नफरत निर्माण झाली नव्हती. त्यामुळंच ती सुरेशला जळविण्यासाठी प्रकाशसोबत फिरत होती.
प्रकाश एक अनिताचा चांगला मित्र होता. तो अनिता सोबत फिरत होता. त्याच्या मनात अनिताबद्दल वाईट नव्हतेच. तो एकंदर तिला मदत करण्यासाठीच फिरत होता. तसा तोही प्रेम करायला लागला होता. परंतू अनिताचे त्याचेवर प्रेम नव्हतेच. ती तर सुरेशवरच प्रेम करीत होती. तसं तिनं प्रकाशला सांगीतलं होतं. हे प्रेम कधीतरी द्वितर्फी होईल असं प्रकाशला वाटत होतं.
आज असे बरेच दिवस झाले होते. अनिता प्रकाशसोबत फिरत होती. तिला वाटत होतं की सुरेश कधीतरी आपलं प्रेम परत मिळवेल. कधीतरी येईल व कधीतरी आपली माफी मागून आपल्याशी विवाह करण्याची चर्चा करेल नव्हे तर आपल्याशी विवाह करेल. रोजची तिची स्वप्न. परंतू ती स्वप्नच ठरत होती. तो दिवस कधी उजळतच नव्हता.
प्रकाशही अनिता सोबत फिरत होता. तिला मदत करीत होता. ते प्रेम द्वितर्फी होण्याची वाट पाहात होता. परंतू तेवढे दिवस फिरुनही जेव्हा त्याला जाणवलं की अनिता ही कधीच आपल्यावर प्रेम करु शकत नाही. तेव्हा त्यानं मनात निर्णय घेतला. त्यानं तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश अनिताच्या घरासमोरच राहात होता. त्याचं घर किरायाचं होतं. त्यानं अनिताला मदतच केली. परंतू शेवटी नाईलाजानं त्यानं घर सोडलं. कारण त्याचेसमोर पर्याय नव्हता.
अनिताचे प्रकाशसोबत फिरणे सुरेश नजरेनं पाहात होता. त्याला सगळं दिसत होतं. परंतू तो काही पिघलत नव्हता. त्याला वाटत होतं की बरं झालं आपण या कचाट्यातून वाचलो. कारण अनिताशी विवाह केल्यानंतरही अनितानं अशी कितीतरी पोरं पकडली असती व आपलं जीवन आणि आपला संसार अस्ताव्यस्त झाला असता. त्याला ते बरं वाटत होतं. त्याला वाटत होतं की या अनिताच्या जोखडातून आपण सुटलो म्हणून बरे झाले. मात्र अनितानं आपल्याला मिळविण्यासाठी प्रकाश नावाचा मुलगा सोबतीला पकडला व ती आपल्याला जळविण्यासाठीच प्रकाशची मदत घेत आहे हे मात्र त्या सुरेशलाही समजले नाही वा तो समजू शकला नाही. तसेच ते समजून तो अनिताकडे कधीच भटकला नाही. जर तो अनिताचं प्रेम समजून अनिताकडे आला असता व त्यानं प्रेमानं अनिताला समजावून सांगीतलं असतं तर अनिताचं जीवन बरबाद झालं नसतं व अनिताचा संसारही सुखी झाला असता.
आज प्रकाश अनिताच्या जीवनातून निघून गेला होता. त्यानं काही दिवसच अनिताच्या जीवनात प्रकाश पाडला आणि जातांना तिच्या जीवनात अंधार करुन गेला.
प्रकाश अनिताच्या जीवनातून निघून जाताच अनिताला अजून झटका बसला. आताा तर जगावंसं वाटत नव्हतं. ते घर पुन्हा तिला खायला धावत होतं. ती वस्तीही तिला खायला घावत होती. ज्या वस्तीत ती राहात होती. कारण त्याच वस्तीत तो सुरेश राहात होता. तिला वाटत होते की आपण असं मरण्यापेक्षा आपण दूर जावं. एवढे दूर की त्या सुरेशलाही माहित पडू नये. तसा तिनं निर्णय घेतला व ती बापाच्याही दूर परीवाराच्याही दूर जायला तयार झाली.

********************

अनिताची आई मरण पावली होती. एक बहिण होती. ती बहिण तिच्यावर अतिशय प्रेम करीत होती. ती समजदार होती. बाप जीवंत होता. त्याचीही त्याची पत्नी गेल्यानं प्रकृती खराब होत होती. त्याचं बरोबर वागवत नव्हतं. त्यातच अनिताचे असे प्रेमप्रकरण. त्याला तिचा राग येत होता. परंतू तो हतबल होता. कारण पत्नीविरहात त्याला एकटंपण जाणवत होतं. तो स्वतःला एकाकी समजत होता.
अनिता शिकत होती. शिकता शिकता तिचे असे धंदे पाहून वडीलानं म्हटलं की आपण हिला शिकवूच नये. शिक्षण घेवून ही काही दिवे लावणार नाही. परंतू वडील बहिणीला वाटत असे की आपण हिला शिकवावं. ही जशी प्रेमप्रकरणात हुशार आहे. तशी अभ्यासातही. त्यातच ती आपल्या पायावर उभी होताच आपल्याला तिची परीवारात मदत होईल व तिच्यानं आपलं घर भागेल.
अनिताची मोठी बहिण. तिचं नाव संगीता होतं. संगीता शांत स्वभावाची होती. तिनं शिक्षकी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तिला वाटत होतं की आपण जसे आपल्या पायावर उभे होणार. तशी आपली बहिणही आपल्या पायावर उभी व्हायला हवी. त्यासाठी की काय, तिनं आपल्या वडीलाला न सांगता तिचा जबरदस्तीनं परीचारीका प्रशिक्षणाचा अर्ज भरला व काही कालावधीतच तिनं आपल्या बहिणीला परीचारीका म्हणून प्रशिक्षीत केलं.
अनिता परीचारीका बनली खरी. त्यातच ती एका खाजगी रुग्णालयात परीचारीकाही बनली. वाटत होतं की तिच्या पैशाचा उपयोग आपल्या घरादारात होईल. घरखर्चात तिच्या पैशाचा वा कमाईचा हातभार लागेल. तसे स्वप्न तिच्या मोठ्या बहिणीनं म्हणजे संगीतानं पाहिले होते. परंतू ते स्वप्न सर्व फोल ठरले होते. कारण अनिता नोकरीवर लागताच व पैसे कमवायला लागताच आपला संपूर्ण पैसा बागबगीचे फिरण्यात व आपल्या प्रेमीसोबत होटलींग करण्यात खर्च करीत होती. कमाईचा एकही पैसा ती आपल्या बहिणीला देत नव्हती.
बहिण संगीता एका खाजगी शाळेत लागली होती. तिला परमानंट करु असं त्या संस्थाचालकानं निव्वळ तिला आश्वासन दिलं होतं. त्यातच ती फसली. तसं पाहता तिला मिळणारे वेतन हे घर चालविण्यासाठी पुरेसे नव्हतेे. त्यातच तिचा बाप आजारी पडून तो कमरेनं घुसत होता. त्याला नीट चालताही येत नव्हते.
अनिताला आपल्या वडीलाच्या आजारीपणाची चिंता नव्हती. तशी तिला घरखर्चाचीही चिंता नव्हती. तशी ती अल्लडपणे वागत होती. याच तिच्या वागण्यावरुन संगीता आणि अनिताची घरात भांडणे होत. संगीता तिला पैसे मागत असे. परंतू अनिता त्यावर उलट जबाब देवून ती गोष्ट टाळत असे. तेव्हा संगीताला रडू कोसळत असे आणि ती तिच्यासमोर न रडता वेगळी कोप-यात जावून त्या कोप-यात बसून रडत असे. ते रडणं बापाला दिसत असे व हळूच बाप तिच्याजवळ जावून तिच्या खांद्यावर हात ठेवत असे व तिला सांत्वना देत म्हणत असे,
"रडू नकोस बाळ. ती बला आहे आपल्या घरची. नुसती खाते अन् बदल्यात खायचा पैसाही देत नाही. उलट त्रासच जास्त देत असते. बेटा, हे आपल्या पुर्वजन्माचं पातक समज की आपल्याला असेही दिवस पाहायला मिळत आहेत. परंतू बेटा बघशील. हे बघशील की ही जीवनात कधीच सुखी राहणार नाही."
बापाचे ते बोल. संगीता पदोपदी ऐकत असे. बाप जवळ येताच तिही अगदी लहानशा बाळागत चूप होवून जाई. तशी ती बापाला म्हणत असे.
"दादा, मी कुठे रडतेय."
तिचे ते रडवेले शब्द. बाप काय ते समजून घ्यायचा. बापाला वाईट वाटायचं त्याबद्दल. परंतू आपल्या मोठ्या मुलीला उगाचंच त्रास नको, म्हणून तोही चूप बसायचा. अनिताला कोसत कोसत तोही आपल्या वाणीवर विराम द्यायचा. मात्र मोठ्या मुलीला दुःख द्यायचा नाही.
अनिताला आज करमत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर सुरेशचीच प्रतिमा उभी राहात होती. तो तिच्या डोळ्यासमोरुन किंचीतही ओझल व्हायचा नाही. त्यातच तिची प्रकाशशी मैत्री. आज प्रकाशही तिचे ते वागणे पाहून कितीतरी दूर निघून गेला होता. परंतू अनिताला प्रकाश काही आठवत नव्हता. तिला सुरेश एके सुरेशच दिसत होता.
आज तिला घरी राहाणं मुश्कील जात होतं. कारण मोठी बहिण ताणे देत होते. तिला घर चालवायला पैसा मागत होती. त्यातच कधीकधी एखाद्यावेळी ती काही पैसे देवून द्यायची. परंतू तिला संसाराची गोडी नव्हती. ती वस्ती ते घर तिला तिला खायला धावत होतं. प्रेम तर मिळतच नव्हतं या घरी उलट मोठ्या बहिणीचे गरळ ओकणारे शब्द. ते शब्द तिला घायाळ करीत होते. तसं पाहता मोठ्या बहिणीचंही बरोबर होतं. कारण तिनंच तिला शिकवून तिच्या पायावर उभं केलं होतं. म्हणून तिचा जीव दुखत होता.
अनिता घर सोडायचा विचार करीत होती. तशी ती संधी शोधतच होती. परंतू संधी काही सापडत नव्हती. अशातच आज एक वर्तमानपत्रात बातमी झळकली. "एक कामवाली बाई पाहिजे."
'एक कामवाली बाई पाहिजे' अशा आशयाचा तो मजकूर होता. खाली पत्यासह संपर्क क्रमांक दिलेला होता. तशी अनिताला ती नामी संधी वाटली व तिनं त्या मोबाइल क्रमांकावर फोन फिरवला. त्यातच पलीकडून फोनवर आवाज आला.
अनिता बोलती झाली. फोनवर ती तिची मुलाखत. मुलाखत हळूहळू प्रेमात बदलली व दररोजचे तासन् तास बोलणे सुरु झाले.
अनिता पुरेसे पैसे घर संसाराला देत नाही व पूर्ण पैसा मोबाइलवर बोलण्यात उडवते व हाटेलींग करण्यात आणि बागेत फिरण्यात उडवते असा विचार करुन संगीता आणि अनिताची ती भांडणं. असाच तो प्रसंग. आजही तिचं मोबाइल फोनवर पैसा का उडवते यावरुन झालेलं भांडण. संगीतानं मोबाइल हिसकला. त्यातच मोबाइल दे असं म्हणून अनितानं संगीताच्या पायावर जोरदार काठीचा फटका मारला व ती मोबाइल घेवून घरातून पळून गेली. कुठं गेली ते कळत नव्हतं.
तीन महिने झाले होते. अनिताचा काही कुठे पत्ता नव्हता. संगीतानं तिला शोधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतू ना तिचा फोन लागत होता. ना ती मिळत होती. ती मरण पावली की जीवंत आहे हेही काही केल्या समजत नव्हतं. शेवटी संगीता व तिच्या बापानं निर्णय घेतला की आता अनिताची आठवण करायची नाही. तरच आपण तिला विसरु. तसेच अनिता नावाची कोणतीच मुलगी जन्माला आली नाही असंही समजू. त्या निश्चयानुसार व निर्णयानुसार ते वागू लागले व दिवस कंठू लागले.
आज तीन महिने झाले होते. अचानक अनिताच्या एका मैत्रीणचा फोन खटखटला. तशी ती मैत्रीणीशी बोलती झाली.
"हैलो."
"कोण?"
"मी अनिता बोलतेय."
अनिता गायब झाल्याची कल्पना तशी तिच्या मैत्रीणीलाच नाही तर पंचक्रोशीला होती. मात्र परीवारवाल्यांनी फालतूची झंझट पाठीमागं लागू नये, म्हणून तिची पोलिसस्टेशनला तक्रार केली नव्हती हे तेवढंच खरं होतं. तशी तिची मैत्रीण म्हणाली,
"बोल अनिता, कुठे आहेस?"
"मी अमुक ठिकाणी आहे. अति दुःखी आहे आणि माझ्याजवळ पैसेही नाही आहेत. मला गावाला परत यायचं आहे. तेव्हा माझ्या बहिणीला सांग की पुरेसे पैसे पाठव. मी परत येवू इच्छीत आहे."
अनितानं फोन केला. एखादा रुपया असेल कदाचित तिच्याजवळ. त्यावेळी एसटीडी डबे होते. कुठूनही बोलता यायचं. मात्र एक रुपया टाकला की तेवढंच बोलणं व्हायचं. तशी तिची अवस्था. आज अनिताला तो गृहस्थ पैसे देत नसल्यानं व त्रास देत असल्यानं तिला गावाला परत यायची इच्छा झाली होती. तिला वाटत होतं की मी केव्हा केव्हा या जोखडातून सुटते आणि केव्हा नाही. त्यातच पारीवारीक आठवणही जोर पकडत होती.
अनिताचा फोन कट होताच मैत्रीणीनं संगीताला अनिताबद्दल सांगीतलं. संगीताही बरीच दुःखी झाली. तसं तिनं आपल्या बापाला सांगीतलं. बाप म्हणाला,
"मरु दे तिले. काही पैसे पाठवायचे नाही अन् काही आणायचं नाही. ती बला आहे बला. विचारुन गेली का? एक फोन तरी."
बाप नाना रंगाचं बोलत होता. परंतू संगीता समझदार होती. तिनं बापाचं ऐकलं नाही. तिला अनिताची दया आली. तसा जवळ पैसा नव्हताच. तरीही तिनं उसनवारी करुन अनिताला तिनं दिलेल्या पत्त्यावर पैसा पाठवला. तशी अनिता परत आली.
अनिता घरी परत आली होती. तिला फार वाईट वाटत होतं. ती बापाच्या नजरेला नजर मिळवीत नव्हती. कारण तेवढी हिंमत तिच्यात नव्हती. कारण तिची चूक होती.
काही दिवस असेच गेले. बापानं राग गिळून टाकला. तशी अनिताही सुधारल्यासारखी आव आणू लागली. तसं एक दिवस संगीतानं विचारलं,
'असं काय घडलं की तू परत आली.'
तशी अनिता सांगू लागली.
"तो अतिशय सुंदर वाटत होता. सुरुवातीला तो गोड गोड बोलत होता. मला वाटलं की त्याचा स्वभाव चांगला असेल, तसं पाहता त्याचा स्वभाव चांगलाच होता. परंतू तो सारखा दिवसभर दारुच प्यायचा आणि आई आई करीत बसायचा. मला वाटत होतं की तो काही दिवसानं आई आई करणं बंद करेल, परंतू माझा तो विचार शेवटी विचारच राहिला."
"अनिता तू त्याच्या जाळ्यात कशी फसली?"
"मला ही वस्ती सोडायची होती. या वस्तीत राहायचं नव्हतं मुळीच. म्हणून मी गेले."
"तो कसा काय भेटला?"
"मी वर्तमानपत्राला जाहिरात वाचली. वाचलं की एक स्वयंपाक करायला मोलकरीण हवी. त्यातच आपलं भांडण. मग मी कुठं जाणार! शेवटी मी त्याचेशी संपर्क केला व तो मला पोसायला तयार झाला. सुरुवातीला मी मोलकरीण म्हणूनच गेली. परंतू तो ऐकत नव्हता. शेवटी त्यानं मला अर्धांगीनी बनवलं."
"का बरं! त्याला पत्नी नव्हती काय?"
"पत्नी होती. परंतू ती पत्नी आपल्या दोन लेकरांना घेवून सोडून गेली होती माहेरला. तिची केस सुरु होती."
"का बरे सोडून गेली होती ती?"
"कदाचित तो दारु पित होता. त्यामुळं ती सोडून गेली असेल त्याला."
"तू कशी गेली इथून? तो न्यायला आला होता की काय?"
"नाही, मी रेल्वेनं गेली आणि हं, माझ्याकडं पैसे नसल्यानं मी विनातिकीटनं सुरुवातीला प्रवास केला. मी तशी संपर्कातच होती त्याच्या. तो मला तिथे रेल्वेस्टेशनवर भेटायला आला होता. त्यानच मला तिथं येवून नेलं."
"मग तू तर आपल्या मर्जीनं गेली. मग मला फोन का बरं केला? का बरं म्हटलं की तू दुःखात आहे अन् का बरं म्हटलं की तू तिकीटाचे पैसे पाठव?"
"तो दिवसभर दारुच प्यायचा. कामावर जायचा नाही. निव्वळ माझ्याजवळ राहायचा. केवळ लैंगीकतेशी खेळायचा आणि हं, मला एक छदामही द्यायचा नाही. तसेच त्याची आई एखाद्या चेटकीनीसारखी माझ्याकडं एकटक पाहात राहायची. ती मला पिशाचिनीच वाटायची. मला तर वाटते की त्यानं फक्त मला मोलकरीण म्हणून केवळ आपल्या लैंगीकतेची परीपुर्ती करण्यासाठीच बोलावलं होतं."
"तो कामधंदे कोणते करायचा?"
"तो नेव्हीमध्ये होता. ती नेव्हीची नोकरी त्याला त्याच्या बापाच्या जागेवर लागली होती असं कळलं. बहुतेक त्याचे बाबा अकाली मरण पावल्यानं घर कसं चालावं म्हणून त्याला नोकरी मिळाली होती नेव्हीत."
"तू विवाह केला काय?"
"नाही, अद्यापही नाही."
"आता तुझा निर्णय काय आहे?"
"म्हणजे?"
"तुला त्याचेशी विवाह करायचा आहे काय?"
"होय, परंतू मला त्याची आई आवडत नाही."
"आई, केव्हापर्यंत जगणार?"
"होय, तुझंही म्हणणं बरोबर आहे ताई."
अनिताचं बोलणं झालं होतं. तशी ती गोष्ट संगीतानं आपल्या वडीलाला सांगीतली व वडील ब-या बोलानं तयार झाले.
वडील ब-या बोलानं तयार झाले खरे. परंतू त्या मुलाचं घरदार पाहायला जाणार कोण? प्रश्न होता. स्वतः जाणार तर पायानं चालणं जमत नव्हतं आणि दुस-यांना पाठवणार तर दुसरा एवढ्या दूर अंतर जायला तयार होईल का? संगीताला विचार येत होता. तसा तिच्या वडीलांनाही. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी एक उपाय सापडला. तो उपाय म्हणजे संगीताचा मित्र.
संगीताचा एक मित्र होता. जो तिच्यावर प्रेम करीत नव्हता. परंतू त्यालाही एक आधार हवा म्हणून तो तिच्या घरी जात होता. त्यालाही एक पत्नी होती, जी पत्नी त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्याचं नाव अर्जून होतं.
अर्जूनला परीचारीका आवडायची. तशी त्याची पत्नी परीचारीकाच होती. त्यामुळं ती त्याला आवडत होती. परंतू ती माहेरी निघून गेल्यानं अर्जूनला ती फार आवडत होती. अशातच आपला वेळ गमविण्यासाठी अर्जून संगीताच्या घरी जात होता एक मित्र बनून. तिला प्रेम देण्यासाठी नाही तर स्वतःचा वेळ घालविण्यासाठी. अशातच अर्जून संगीतासमोर अनिताच्या होणा-या पतीचं घरदार पाहण्यासाठी व गोष्टी करण्यासाठी एक पर्याय म्हणून समोर आला. तसा संगीतानं व तिच्या वडीलानं अर्जूनसमोर तो पर्याय ठेवला. तसा तो तयारही झाला. बस आता काय राहिलं. तोच जाण्याचा दिवस उजळला व अनिताला घेवून अर्जून रेल्वेनं तिच्या होणा-या पतीसाठी भेट निघाला.
रेल्वेची तिकीट अर्जूनच काढली होती. त्यातच तो जेव्हा त्याच्या शहरात पोहोचला. तेव्हाही तेथील संपूर्ण प्रवासाचा खर्च अर्जूनच केला. त्यावरुन वाटलं की तो तिच्या लायक नाही.
अर्जून तिथे पोहोचला खरा. परंतू अनितानं तेथे अर्जूनसोबत चांगला व्यवहार केला नाही. ते नवीन शहर. त्या शहरात अर्जूनच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. तो ते शहर फिरत होते. त्यातच तो त्यांच्या मागंमागं चालायचा. परंतू अनिता त्याला म्हणाली की त्यानं पुढं चालावं. आम्ही मागेच आहोत. जेव्हा तो पुढे चालायचा व थोडे अंतर चालल्यावर जेव्हा तो मागे वळून पाहायचा. तेव्हा त्याला ती अनिता त्या होणा-या पतीसोबत त्या भर रस्त्यावर अश्लिल चाळे करतांना दिसायची. जसे अश्लिल चाळे त्यानं कोणत्याही मुलीसोबत आपल्या शहरात पाहिले नव्हते. त्यातच त्याला वाटत होतं की हिला अश्लील चाळे भर रस्त्यावर करायचे होतेच तर त्याला तिनं सोबत का आणलं असाव. शेवटी ते सर्व दृश्य भर तारुण्यात असलेल्या व नुकतीच पत्नी माहेरी गेल्यानं पत्नीविरहात तडपत असलेल्या अर्जूनला सहन होत नव्हते. परंतू मनामध्ये आवंढा गिळत तो ते सर्व दृश्य सहन करीत होता. वाटत होतं की मी हिच्यासोबत बेकारच या प्रवासाला आलो.
रात्र झाली होती. तसे रात्रीचे साडे दहा वाजले होते. ते तिघेही जण घरी परत आले. त्यातच अनितानं त्याला जेवन वाढून मग त्याची झोपायची व्यवस्था लावून नंतर त्याच्यासोबत फिरायला जायचं होतं किंवा त्याला झोपण्यापुर्वी तिनं सासूसोबत झोपायचं होतं. परंतू ते न करता ती त्याला जेवन वाढण्याऐवजी घरचे जेवन न करता ती होटलात जेवायला गेली. होटलात यासाठी की तिला त्याचेसोबत दारु प्यायची होती. ती दारु ती त्याचेसोबत घरी कशी पिणार! हा प्रश्न होता.
अर्जूनला ती बाहेर फिरायला जाताच तिच्या सासूनं जेवन दिलं. तो जेवन जेवला व बाजूला टाकलेल्या बिछानावर पहूडला.
अर्जून बिछाण्यावर पहूडला खरा. परंतू त्याला झोप येत नव्हती. तो सारखी या कडावरुन त्या कडावर कुस बदलवीत होता. तसे अंदाजे बारा वाजले असतील. अनिता आली व ती थेट जेवन न करता त्या कम-यात शिरली. जी त्याची बेडरुम होती.
ते तिचं पापच होतं की जे पाप विवाहापुर्वी ती करीत होती. ते पाप की ज्या पापानं त्या अर्जूनचं दिल जळलं होतं. ते पाप की ज्या पापानं अर्जूनचा विश्वासघात केला होता.
तो विश्वासघातच होता. तशी ती रात्र त्याचेसाठी काळरात्र ठरली होती. त्या रात्री त्याला बरोबर झोप आली नाही. तशी सकाळ झाली. तसा पाखरांचा किलबिल किलबिल आवाज सुरु झाला. अर्जून उठला. तशी अनिता उठायचीच होती. ती कशी उठणार एवढ्या लवकर. कारण तिनं रात्रीला रासलीला साजरी केली होती.
अर्जून उठला. त्यानं हळूच दरवाजा उघडला. तसा तो बाहेर पडला. त्याला ते घर खाण्यास धावत होतं. तसा तो बाहेर पडताच तो अतिशय जड अंतःकरणानं पावले टाकू लागला. तसं एक दत्तात्रयाचं मंदीर आलं. तसा तो त्या मंदीरात गेला. त्यानं मनोमन हात जोडले व भगवंताला बळ मागीतलं व पुन्हा कधीच त्या घरी न जाण्याचा निर्णय घेतला.
तो निघाला तो थेट रेल्वेस्टेशनवर. गाडीला वेळ होता. तसा तो एका चप्पलपालिसवाल्याजवळ टाईमपास करीत बसला. तसा थोड्या वेळानं त्याला टिटीनं पकडलं. तशी त्याला विचारपुस करण्यात आली. तसा त्यानं तिचा मोबाइल नंबर दिला व ते दोघेही त्याला सोडवायला आले. त्यांनी त्याला रेल्वे पोलिसाच्या जोखडातून सोडवलं. तसा तो घरी आला.
तो घरी आला खरा. परंतू रात्रीच्या अनिताच्या वागण्यानं त्याला किंचीतही करमत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी ठरलं जेवन झाल्यावर तिही त्याच्या सोबत येणार. परंतू तो भ्रम होता नव्हे तर पुन्हा एकदाचा विश्वासघात. जेवन तर झालं. तिही यायला तयार झाली. तशी रेल्वेस्टेशनवर त्यानं तिची तिकीट काढली. तसा तिचा एक हात अर्जूनच्या हातात होता. दुसरा त्याच्या. गाडी सुरु झाली होती. गाडी जोर पकडत चालली होती. आता वेगही वाढला होता. तसा तिनं अर्जूनच्या हाताला जोरात झटका मारला व दोघेही असे पाठीमागं पळत सुटले की जरी अर्जून खाली उतरला असता तरी ते सापडले नसते.
आधीपासूनच पुरुषांचा छंद जोपासणारी अनिता........ त्यावेळेपासूनच तिच्या वाह्यात गुणांची पावले दिसत होती. ती कधीतरी एखाद्या जोखडात सापडेल, ज्यातून ती कधीच सुटू शकणार नाही असे वाटत होते.
अर्जून गाडीतच बसला होता विचार करीत. जिला घेवून आणि जिच्यावर विश्वास ठेवून तो इथंपर्यंत आला. ती काबिल धोकेबाज ठरली होती. तिच्यासाठी आपण गाडीतून उतरायचे नाही आणि आपलं नुकसान करायचं नाही असा विचार करुन तो गाडीचा प्रवास करीत होता एकटाच. मनात मात्र विचार होता की संगीता आणि तिचे बाबा काय म्हणतील.
अर्जून घरी पोहोचला होता. तसा तो संगीताच्या घरी पोहोचला. संगीतानं अनिताबद्दल विचारलं की त्यानं अनिताला सोबत का आणलं नाही. तसा अनितानं आपल्यासोबत कशी वागणूक दिली याचा कित्ता त्यानं संगीताला सांगीतला. तशी संगीता चूप राहिली.

********************

आठ दिवस असेच चालते झाले. अनिता आठ दिवसानं घरी आली. तिला परीवारानं चांगलं झापलं. परंतू तिनं त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यातच आता ती त्याच्या शहरीतही जायला तयार नव्हती. काय झालं ते समजलं नव्हतं.
काही दिवस असेच गेले. तिनं आपला होणारा पती सोडला म्हणून अर्जूनला फार आनंद झाला होता. त्याचं कारण होतं, त्यानं तिच्यासोबत केलेला व्यवहार. दोष तसं पाहता त्याचा नव्हताच. टाळी काही एका हातानं वाजत नाही. दोष तिचाच होता. तिचंच कोणत्याही व्यक्तीशी पटत नव्हतं. त्यामुळंच कदाचित ती घरी परत आली असेल.
ते तिचं घर. ज्या घरी तिला राहावसं वाटत नव्हतं. ती पुन्हा काही दिवस राहिली.
अर्जूनला अनिता परत येताच आनंद झाला. तशी ती निराश दिसत होती. तिचं निराशपण अर्जून अगदी जवळून पाहात होता. तसा तोही निराशच होता आपल्या जीवनात. कारण त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.
अनिता त्याला सोडून आली आहे हे अर्जूनला माहित झालं. तसं त्याला वाटलं, अनिताशी विवाह करावा व आपण हिला भरपूर सुख द्यावं. तिही दुःखी आणि आपणही दुःखी. त्यासाठीच तो तिच्यावर प्रेम करु लागला होता. परंतू ती काही त्याचेवर प्रेम करीत नव्हती. तो तिला फिरायला नेवू लागला होता. तो तिच्या जीवनात बहार आणू पाहात होता. त्यानं तिला विवाहसोहळ्यात, बागेत फिरवले होते. तसं तिच्या फिरण्यावरुन ती आपल्यावर प्रेम करते असं त्याला वाटत होते. अशातच एक प्रसंग घडला.
आजचा प्रसंग म्हणजे अर्जूनच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग ठरला. आज अनिता म्हणाली,
"चित्रपट दाखवता काय?"
तसं पाहता अर्जूनची पत्नी त्याला सोडून गेल्यानं अर्जूनची फरफट होवू लागली होती. त्यातच तो तिच्याशी प्रेमही करु लागला होता. त्यातच आता तिनं चित्रपट दाखव म्हणण्याचा प्रसंग अर्जूनला अगदी आनंद देवून गेला. तसे पाहता चित्रपटासाठी पैसे त्याचेच जाणार होते.
आज तो तयार तर झाला खरा चित्रपट पाहायला. परंतू आज त्यानं ठरवलं होतं की तिला आपल्या प्रेमाचं सांगून टाकावं. तसा तो घरुन निघाला. तो आटो स्टँडवर. तसं पाहता आटोस्टँड दूर होतं तिच्या घरापासून. तसा तो अवकाश मिळाला होता अर्जूनला आपल्या भावना व्यक्त करायला. तसा तो तिच्यासोबत चालत असतांना तिला म्हणाला,
"अनिता, मी तुझ्यावर प्रेम करतोय. तू सांग तुला काय वाटतंय? अन् हं, मी तुझ्याशी विवाह करायलाही तयार आहे. बोल करशील माझ्याशी विवाह?"
सारेच प्रश्न....... अर्जूननं ते प्रश्न एका दमात सांगून टाकले आणि वाट पाहात बसला तिच्या उत्तराशी. तशी ती काही वेळ स्तब्ध झाली. म्हणाली,
"नाही, मी काही तुमच्यावर प्रेम करीत नाही."
"का बरं?"
"कारण की माझ्या बहिणीचं प्रेम आहे तुमच्यावर."
"परंतू माझं प्रेम. मला विचारलं का तिनं. माझं तर तुझ्यावर प्रेम आहे."
"नाही, मी तुमच्या लायक नाही. माझी बहिण चांगली आहे. तुम्ही तिच्यावरच प्रेम करा. तिचं भलं करा."
"नाही अनिता. मी तुझ्यावर प्रेम करणं सुरु केलं. ते आता तिच्यावर प्रेम करणं आता शक्य होणार नाही. तू समजून घे. तुझी बहिण चांगली आहे. मी वाईटच असेल बहुतेक. त्याचमुळं माझी पत्नी गेली असेल. ती कुवारी आहे अन् मी तुझ्याचसारखा. तू जशी तीन महिने एका व्यक्तीसोबत राहिली. तसा मीही एका स्रीसोबत राहिलो. दोघांच्या आयुष्यातील घटना बहुतेक सारख्याच आहेत. तिला चांगला पती मिळेल कदाचित. तू तुझं भविष्य पाहा."
"नाही. तुम्हीही चांगले आहातच. माझी बहिण लाईक करते तुम्हास. तिला अंतर देवू नका. ती तुमच्यावर प्रेम करते. तसं तिनं मला सांगीतलेलं आहे."
"परंतू अनिता........"
"नाही. तुम्ही समजून घ्या आणि शांतपणे विचार करा."
"अनिता एक बोलू."
"बोला."
"तू जरी मला नाही मिळाली, तरी हा अर्जून त्याच्यामध्ये जेव्हापर्यंत श्वास असेल, तेव्हापर्यंत तुझ्यावरच प्रेम करीत राहणार. इतरांवर नाही.त तुझ्या बहिणीवरही नाही. तू हो म्हण की नाही म्हण."
अर्जूनचा मुळ खराब झाला होता. तसा अर्जून चूप झाला होता. तशी तिही दुःखी आणि निराश झाली होती. त्यातच आज ज्या चित्रपटाच्या इराद्यानं ते निघाले. ते काही चित्रपटाला गेले नाही. ती अनिता त्याला घेवून आपल्या मैत्रीणीच्या घरी घेवून गेली.
सायंकाळचे नव वाजले होते. अंधार पडला होता. तशी अनिता घरी आली. अर्जूनही आपल्या घरी गेला. तो रात्रभर विचार करीत राहिला. कदाचित संगीता आपल्यावर प्रेम करीत असेल काय? की तिनं तिच्या बहिणीचा विवाह जुळावा म्हणून ही बंडल तर मारली नसावी? की तिनं तिच्या बहिणीला सांगीतलं असावं की ती अर्जूनवर प्रेम करते. वैगेरे नानाविध प्रश्न आज अर्जूनच्या मनात होते. परंतू अर्जूननं अनितावर प्रेम करणं सोडलं नव्हतं. त्यानं तर तसं वचनच दिलं होतं अनिताला की तो तिच्यावर त्याचेमध्ये श्वास असेपर्यंत प्रेम करेल. तिनं त्याला समजून घेतलं नाही हे सत्य होतं. तसंच एकाचसरी प्रेम तिच्या नाकारण्यानं कमी होईल हेही काही सांगता येत नव्हतं. तसा मनावर ताबा ठेवून अर्जून जगत होता. परंतू त्यानं अनितावरचं प्रेम काही कमी केलं नाही.
आज अनितावरचं ते अर्जूनचं प्रेम. अनिताला त्या प्रेमाची जाणीव होती. तसं पाहता अनिताला वाटत होतं की त्यानं संगीतावर प्रेम करावं. त्यामुळं की काय, ती त्याला टाळत होती. तसं तिला वाटत होतं. तिला वाटत होतं की अर्जूननं आपला नाद सोडावा. यासाठीच की काय तिनं पुढील तीन दिवसात आपला विवाह उरकवला. त्यावेळी तिनं त्याची माहितीही काढली नाही.

***********************************************

तो नवीन व्यक्ती. तो चांगल्या स्वभावाचा होता. परंतू तो नेहमी दारु पित असे. त्याचं नाव लोभेस होतं.
लोभेस नावाप्रमाणे नव्हता. त्याला लोभ नव्हताच. सुरुवातीला त्यानं दारु पिणं कमी केलं होतं. तो कामालाही जात होता.
अनिता आणि त्याची नेहमी भांडणं होत. ती भांडणं तिच्या फोनवरुन होत. ती लोभेसच्या घरी विवाह करुन गेली असली तरी तिचे फोन करणे बंद झाले नव्हते. ती आपल्या जुन्या मित्रांना फोन करीतच असे. त्याचे कारण काय होते ते माहित नाही.
विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी तिला धोका दिला. त्या व्यक्तींना अनितानं फोन करायची गरज नव्हतीच. तरीही ती फोन करायची.
सुरुवातीला तिच्या फोनवर लोभेसनं दुर्लक्ष केलं. परंतू ते दुर्लक्ष तरी कसं होणार! त्यावर विचारले असता ती म्हणायची की हे माझ्या कार्यालयातील लोकं आहेत.
ते कार्यालयातील लोकं. त्यातच ती परीचारीका म्हणून नोकरी करायची. परंतू या कार्यालयातील लोकांचा फोन तिला कधीकधी रात्रीला यायचा. तेव्हा रिटर्न काल करुन लोभेस ते काल पडताळून पाहायचा. त्यातच लोभेसच्या मनात हळूहळू शंका निर्माण झाल्या. त्याला वाटायचं की असे पुरुषांचे फोन रात्रीला दोन वाजता यावेत का? असे रात्रीला एका महिलेला फोन करणारे खरंच चांगले पुरुष राहू शकतात का? त्यातच ते फोन करणारे व्यक्ती त्या कार्यालयातील लोकं आहेत का? अन् असं कोणतं अकस्मात आणि महत्वाचं काम असतं की त्यांनी रात्रीला एका महिलेला फोन करायचा. त्यातच अशी महिला नको की जिनं परपुरुषाचे फोन रात्रीला दोन वाजता उचलावेत? वैगेरे सारे प्रश्न आज लोभेसच्या मनात निर्माण झाले होते. त्यातच याच रात्रीच्या फोनवरुन त्यांचे भांडण व्हायचे.
आज लोभेस तिच्या फोनवरुन फार दुःखी आणि चिंताग्रस्त होता. तिला फोन बंद कर म्हटल्यास ती तो फोन बंद करायची नाही. त्यातच त्या फोनवरुन त्यांचे सतत वाद व्हायचे. त्यातच ती फोन करणं बंद करीत नव्हती. तसा कमाईचा बहुतेक पैसा असा फोनमध्येच ती उध्वस्त करायची. शेवटी त्याला वाटलं की आपण जोही पैसा कमवतो, तो पैसा कमविण्यात काहीच फायदा नाही. कारण असा बराच पैसा हा निघून जातो फोन करण्यात. पैसा कमविण्याचं चीज होत नाही. तेव्हा आपण मेहनत करुन असा पैसा कमविण्यापेक्षा घरीच बसून राहिलेलं बरं. तसा तो नाईलाजानं पर्याय नसल्यामुळं घरीच बसला. त्याला वाटलं की जेव्हा घरी उपवासाचे फाके पडतील. तेव्हा तिचा मोबाइल बंद होईल.
लोभेस घरी बसला. तशी घरी उपासमार होवू लागली. त्यातच अनिताला काय करावं सुचेनासं झालं. कारण तिला मोबाईलची सवय होती. परंतू तिच्याजवळ पैसा नसल्यानं आता समस्या निर्माण झाली. तिला बोलता येत नव्हतं. त्यातच घरची उपासमार. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी अनिता घरसंसार आणि मोबाइल वर बोलणं. या दोन्ही गोष्टीसाठी कामासाठी घराबाहेर पडली.
अनिता कामासाठी घराबाहेर पडली. तसा ती बराच पैसा कमवू लागली. हा पैसा तिचा होता. आता तिला काही कुणाची भीती नव्हती. ती आता लोभेसलाही घाबरत नव्हती.
लोभेस घरी राहात असला तरी त्याला तो मोबाइल फोन पचत नव्हता. रोजच त्याच्या डोळ्यात तो मोबाइल फोन खुपत असे. रोजच तिच्या गैरहजेरीत तो मोबाइल फोन पाहात असे. त्याचेतील काल पाहात असे. त्यातच तो त्या कालवर रिटर्न काल करीत असे. त्यातच त्यातील बरेचसे काल हे महिलांचे न निघता पुरुषांचे निघत आणि ते जेव्हा पुरुषांचे निघत. तेव्हा मात्र तिचा भयंकर राग यायचा. वाटायचं की तिला घरातून हाकलून द्यावं. परंतू आता पर्याय नसल्यामुळं तो चूप बसला.
अनिता आणि लोभेसचं हे सतत मोबाईलवरुन होत असलेलं भांडण.......अशातच त्यांना एक पुत्ररत्नही झालं.
अनिताला एक पुत्ररत्न झालं असलं तरी अनिताला संसाराची गोडी वाटत नव्हती. तिच्या पुत्राला तो सांभाळत होता. परंतू ती मात्र मोबाइल वर फोन करण्यात गुंग होती. कधी कधी ती मुलगी भुकेनं रडायची. परंतू मोबाइल मध्ये गुंग असलेली अनिता आपल्या मुलीला दूध पाजण्याऐवजी मोबाइलच्या नादात आपल्या मुलीला बदबद मारायची. हे जेव्हा लोभसला माहित व्हायचं, तेव्हा त्याचा पारा चढलेला असायचा. तिला मुलीचाही कळवळा वाटत नव्हता.
अनिताचं असं मोबाइल प्रेम. हे प्रेम वाढतच चाललं होतं. त्यात किंचीतही सुधारणा होत नव्हती. लोभेसला काय करावं सुचत नव्हतं. त्यानं सारेच प्रयत्न करुन पाहिले. परंतू त्याला काहीच उपाय सापडत नव्हता. त्यातच लोभेसचं मोबाईल तपासणं कुठेतरी अनिताच्या मोबाईल करण्यावर व्यत्यय आणणारी घटना ठरली.
आज अनिताचे मोबाइल प्रेम. अनिताला मोबाइलवर बोलल्याशिवाय जमत नव्हतं. त्यातच दररोजची भांडणं. कधीकधी त्या भांडणावर पर्याय म्हणून अनिता आपल्या बहिणीच्या घरी यायची. ती बहिण. ज्या बहिणीचा पती कधीकाळी अनितावर प्रेम करायचा. ती अनिता त्याच्या घरी येताच ती त्याचं पुर्वीचं प्रेम असल्यामुळं तो तिला जुळवून घ्यायचा. सांभाळून न्यायचा. तिला रागवायचा नाही. बस हेच चुकलं अर्जूनचं. अर्जूननं तिच्या चुकांवर पांघरुण घातल्यानं अनिताला परपुरुषाची हवा लागली. ती आता आपल्या पतीलाही ऐकायला तयार नव्हती. परंतू यामध्ये तिच्या मुलीचं अतोनात नुकसान होत होतं.
लोभेस ती अंघोळीला जाताच तिचा मोबाईल तपासायचा. त्यातच तो आपण अंघोळीला जाताच लोभेस मोबाइल तपासतो हे लक्षात येताच आता अनिता आपला मोबाइल स्नानगृहात न्यायला लागली. त्यातच काही दिवस तिनं काय केलं माहित नाही. परंतू ती मोबाइल स्नानगृहात घेवून जाते हे त्याला माहित झाले होते. सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं, तिच्या मोबाइल स्नानगृहात नेण्यावर. परंतू आज त्याला ती मोबाइल का बरं स्नानगृहात नेते असा प्रश्न पडला. शेवटी त्यानं त्याचाही छडा लावण्याचा विचार केला. शेवटी एक दिवस त्यानं ती अंघोळीला स्नानगृहात जाताच ती मोबाइलचा वापर कसा करते हे पाहण्यासाठी तो स्नानगृहाजवळ गेला आणि स्नानगृहाजवळच्या खिडकीतून तो डोकावून पाहू लागला तर पाहतो काय, त्याला ती व्हिडीओवर आपली अंघोळ व्हिडीओ काल करुन दुस-यांना दाखवत असलेली दिसली. ते दृश्य त्यानं त्यावेळी आपल्या मुलीलाही दाखवले. तसं ते दृश्य पाहताच त्याचं डोकंही चक्रावलं होतं. जो विचार त्यानं केला नव्हता, ते त्यानं पाहिलं होतं. आता त्याला वाटत होतं की अनिता ही दुस-यासोबत लटकलेली असून तिचे अफेअर दुस-यासोबत सुरु आहे.
लोभेसनं संगीताला तिच्याबाबत आणि तिच्या अंघोळीबाबत शिकायत केली. तशी संगीता आपल्या बहिणीची बाजू घेवून तिच्याच बाजूनं बोलू लागली. ते पाहून तर लोभेस पुन्हा दुःखी झाला. कारण त्यानं स्वतः अनिताला अंघोळ करतांना तशा अवतारात पाहिलं होतं. आज तो काही खोटं बोलत नव्हता. परंतू संगीता त्याला म्हणत होती की तू खोटं बोलतोय. तसा अर्जूनही संगीतावर विश्वास ठेवून तसाच बोलत होता.
संगीता आणि अर्जूननं वेळोवेळी लपविलेल्या अनिताच्या गोष्टी........त्यातच अनिताला दिलेला वेळोवेळी पाठींबा हे पापच होतं. वरचा विधाता त्या सर्व गोष्टी पाहात होता. त्यातच त्याचा हिशोबही ठेवत होता. तसा तो एकदाचा प्रसंग घडला आणि तेच तात्कालिक कारणही. एकदा लोभेसनं सर्व पाहूण्यांसमोर अनिताला रांड म्हटलं.
"रांड" नावाचा तो शब्द......ती एक शिवीच होती. त्याचं अनिताला वाईट वाटलं. तसा पाहूण्यांसमोर तो शब्द वापरल्यानं तिला तो अपमानही वाटला. तसं म्हणताच ती अर्जूनच्या घरी आली. प्रत्यक्ष काय घडलं ते काही अर्जूनला माहित नव्हतं. तरीही विश्वास ठेवून प्रकरणाची शहानिसा न करता त्यानं पुन्हा एकदा तिला थारा दिला. यावेळी तिला कधीच पाठवायचे नाही असा त्यानं विचार केला. तशी अनिता लय सुखी झाली.ती आता अर्जूनच्या घरी व्यवस्थीत राहायला लागली. त्यातच तिचं हळूहळू लोभेसवरुन मन तुटू लागलं. तसं एकटी राहता राहता अाणि परपुरुषाशी बोलता बोलता तिचं एका पुरुषाशी सुत जुळलं. ती नोकरी करता करता त्याचेशी रात्रदिवस बोलू लागली. तशी ती एक दिवसची रात्र. त्या रात्री तो बोलत होता. म्हणत होता की त्यानं दिड लाखाचं बक्षीस पाठवलंय. ते तिनं सोडवावं म्हणजे ते सोडविल्यावर तो तिच्याशी विवाह करणार. तिची मुलगीही स्विकारणार. तसं त्या रात्री ती अर्जूनला सांगत होती. त्या व्यक्तीनं पाठविलेले बक्षीस......म्हणजेच तो खोका तीस हजार रुपयात सोडवायचा होता. त्यातच त्या रात्री ती अर्जूनला तीस हजार रुपये मागत होती. परंतू अर्जून तो. त्याला तिच्या बोलण्याचा राग आला आणि त्यानं लोभेसला फोन लावून त्या अर्ध्या रात्री त्याला घरी बोलवलं.
लोभेस रात्रीला घरी आला. तसं त्यानं तिला अर्ध्याच रात्री आपल्या घरातून हाकललं. परंतू तिची त्या घरातून जायचीच इच्छा नव्हती. तिला अर्जूनच्याच घरी राहायचे होते म्हणून की काय, तिनं लोभेसला सांगीतलं की हा माझी छेड काढत होता. म्हणून मी याला नकार देताच यानं तुला फोन करुन बोलावलं व मला हाकलतो आहे.
लोभसजवळ पत्नी सुधारण्याची चांगली नामी संधी होती. परंतू त्यानं यावेळी आपल्या पत्नीवर विश्वास ठेवला. त्याला माहित होतं की त्याची पत्नी कशी आहे. तरीही त्यानं पत्नीवर विश्वास ठेवला. तशी त्याची पत्नी विश्वासपात्र नव्हतीच. तरीही तिनं बोललेलं कथन लोभेसला खरे वाटले व तो अर्जूनवर चवताळून आला. तेव्हा त्याचा भाचा मधात येत त्यानं वाद सोडवला.
आज अनिता त्याच्या घरी गेली. तसा दुसरा दिवस उजळला. या दिवशी प्रकरणाची शहानिशा झाली व प्रत्यक्ष काय प्रकार होता तो, ते लक्षात आलं. ती एक अफरातफर करणारी कंपनी होती.
अनितासोबत घडणारे एकशेएक प्रसंग. तरीही ती सुधारत नव्हती. अशातच पंधरा वीस दिवस गेले. पुन्हा त्या दोघात असंच मोबाईलवरुन भांडण झालं. तशी दोघांनीही एकमेकांची डोकी फोडली. त्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. तसा तिचा संगीताला फोन आला. फोनमध्ये तिनं सांगीतलं की तिला अंधारी येत असून प्रसंग उद्भवल्यास ती कोमातही जावू शकते.
संगीतानं उचललेला फोन. त्यातच ती घाबरुन गेली. तसा काही वेळात अर्जून कामावरुन घरी आला. त्याला न राहवून संगीतानं ते प्रकरण सांगीतलं. तसा अर्जून म्हणाला,
"तिची ही प्रकरणं नित्याची झाली. प्रत्येक वेळी मी तिला वाचवतो व प्रत्येक वेळी ती आपलाच तोरा दाखवत मला धारेवर धरते. उलट आरोपही लावते. आता मी काहीही करु शकत नाही."
"अहो, माझी बहिण जर मरण पावली तर मला माझी पाठची बहिण दिसणार नाही. तुम्ही ऐका हो. मी तुमच्या पाया पडते. हवं तर नाक रगडते." संगीता बोलून गेली.
संगीताचं ते गयावया करणारं बोलणं. तसं त्याला मागील बरीच प्रकरणं आठवत होती. अनिताला त्यानं प्रत्येक प्रसंगात मदत केली होती. मागचंही प्रकरण असंच होतं. त्यावेळी तर त्याचा कोणताही दोष नसतांना तिनं त्याच्यावरच विनयभंगाचा आरोप लावला होता. त्यावेळी तिचा पती त्याचेवर चवताळून जात होता.
अर्जून विचार करु लागला. तसा त्याचा स्वभाव दयाळूच होता. त्याला अनिताची लवकरच दया यायची. तसं त्याला वाटायचं की तिच्याच कृपेनं आज त्याला संगीता मिळालेली आहे. तशी तिनं त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी त्याला केलेली मदतही आठवायची. त्याची मुलगी तिच्याचमुळं वाचली होती.
आजचा तो प्रसंग. आजच्या प्रसंगात संगीताचे गहिवरणे. नाक रगडतो म्हणणे नव्हे तर पाठची बहिण दिसणार नाही म्हणणे. प्रत्यक्ष अर्जूनला ते प्रकरण संभाव्य धोक्याचे सुचक वाटत होते. त्यातच तो म्हणाला,
"तुझी बहिण कशी आहे ते मला माहित आहे. दोष तुझ्याच बहिणीचा आहे. परंतू एक लक्षात ठेव. आपण आणू अनिताला. परंतू याचे गंभीर परीणाम तुला आणि मला भोगून द्यावेच लागतील. कारण आपल्यामुळं बिचा-या लोभेसला फार त्रास भोगावा लागत आहे. त्याचा कोणताच दोष नाही. दोष मला तुझ्या बहिणीचाच वाटत आहे. यावेळी जर आणलं तर आपल्याला जीवनातही फार त्रास होणार आहे."
अर्जूनचं ते बोलणं. तशी संगीता म्हणाली,
"मी भोगून देईल त्याचे परीणाम. आपण आणू अनिताला. तिला आपल्याजवळ ठेवू. ती आता चांगली वागेल. मला शाश्वती आहे."
प्रत्येक वेळी संगीता तेच म्हणायची. प्रत्येक वेळी संगीता गिडगिडायची आणि आपल्या पतीच्या मागे लागून प्रत्येक वेळी ती तिला घरी आणायची. परंतू प्रत्येक वेळी जातांना अनिता संगीताच्या घरात भांडणं लावूनच जायची. तिचा बाप तिला बला म्हणायचा. तशी ती बला समजूनच वागायची.
संगीता नेहमी नेहमी करीत असलेली बहिणीची सलगी. त्यातच त्या दिवशी संगीता गहिवरुन अर्जनला अनिताच्या घरी घेवून गेली.
ते अनिताचं घर. त्या घरी पोळीवर रक्त सांडलेलं होतं. तसंच ते रक्त आजूबाजूला पसरलेलं होतं. दोघांचेही डोके फुटलेले होते. तशी अनिता संगीताची बहिण असल्यानं तिनं आपल्या बहिणीला आणलं. तिच्यावर उपचार केला. परंतू लोभेेस मात्र त्या उपचारापासून वंचित राहिला.
लोभेस अनाथ होता. त्याला मायबाप नव्हते. भाऊही अगदी तरुण वयात मरण पावला होता. त्यातच त्याला कोणी नसल्यानं त्याची दया कोण घेणार.. ते पाप घडत होतं.
आज अनिता बरी झाली होती. परंतू अनिताची सवय काही सुटली नव्हती. प्रत्येक वेळी ते मोबाइलवर बोलणार नाही असं म्हणून घरी यायची. मात्र काही दिवस जाताच ती पुन्हा मोबाईलवर बोलणं सुरु करायची. याचा जसा लोभेसला त्रास होता. तसा त्रास अर्जूनलाही होत होता. मागचं प्रकरण आजही त्याच्या लक्षात होतं. तो विनयभंगाचा आरोपही त्याच्या लक्षात होता.
यावेळी पुुन्हा सुधरताच अनितानं आणखी बोलायला दुसरा पुरुष पकडला. तिला हे पुरुष कुठून मिळत होते कुणास ठाऊक. परंतू प्रत्येक वेळी वेगवेगळे नमूने पकडून त्यांच्याशी सलगी करण्यात तिचा हातखंडा होता.
आजही तेच घडलं होतं. यावेळी आणखी तिनं जो पुरुष पकडला. तो पुरुष तिच्याशी बोलत होता. तसा तिच्या बोलण्यावर अर्जून फारच ओरडायचा. परंतू ती काही ऐकत नव्हती. ती आपल्याच तालात वागत होती.
यावेळी पकडलेला पुरुष. तो पुरुष बोलत असतांना अर्जून तिच्याजवळ गेल्यास ती त्याला म्हणायची. 'खडूस आया है। बाद मे बात करेंगे।' असे शब्द ऐकताच अर्जूनचा पारा सातव्या आसमानात पोहोचलेला असायचा. वाटायचं की ही अनिता ज्याच्या घरी खाते. त्याच्याच घरी विष्ठाही करुन ठेवते.
अर्जून सगळं सहन करीत चालला होता. त्याला काय करावं काय नाही सुचत नव्हतं. तसं म्हणायचं झाल्यास अर्जूनच्या अनुपस्थीतीत ती काही करीत नव्हती. परंतू जेव्हा अर्जून तिच्या जवळ बसायचा. तेव्हा ती उठायची. हात पाय धुवायची. त्यानंतर हळूच कंगवा घ्यायची व केस विंचरायची. हळूच लिपस्टीक काढायची. ती ओठाला लावायची. हळूच क्रीम लावून त्यावर पावडर चोपडायची. त्यातच तो फुल मेकअप झाला की फोटो काढायची. अशा दोनचार फोटो काढून झाल्या की त्यातील दोन तीन फोटो कुणाला तरी व्हाट्सअपवर पोष्ट करायची व हळूच मोबाइल तार कानात कुचकून तासन् तास अर्जूनसमोर बोलत बसायची. ते पाहिलं की अर्जूनचा पारा सटकलेला असायचा. त्याला वाईट वाटायचं.
रोज रोज अनिताचं असं वागणं अर्जूनला त्रासदायक वाटत होतं. नेहमी नेहमी तो तिला हाकलत होता. नेहमी नेहमी तिची व लोभसची मोबाइल वरुन भांडणं व्हायची व नेहमी नेहमी अर्जून तिच्या बहिणीच्या विनंतीवरुन आणायचा.ती येतांना कुणाला फोन करणार नाही असेच म्हणायची. परंतू ती घरी येताच ते सर्व विसरुन पुन्हा फोनवर लागायची. त्यातच अर्जूनला त्रासदायक ठरायची. शेवटी अर्जूननं ठरवलं की तिला आपल्याजवळ ठेेवायचं नाही.
अर्जूननं तिला तिच्याच भावाच्या घरी किरायानं ठेवलं. या घरी ती वीजबिल भरत असे. परंतू तिनं त्याही घरी असतांना मोबाईलचा नाद सोडला नव्हता. अशातच तिनं एक पुन्हा पुरुष पकडला. ज्याच्याशी ती पुन्हा मोबाईलवर बोलू लागली होती.
अनिताचं मोबाईलवर बोलणं. त्यातच आता मिळालेला नवीन पुरुष. तो पुुरुष तिच्याशी गोडगोड बोलत होता. म्हणत होता की तो पंचवीस हजार रुपये महिना कमवतोय. त्यातच त्यानं तिला आश्वासन दिलं की तो तिला आणि तिच्या मुलीला पोसणार. बस त्याचं गोड गोड बोलणं. त्या बोलण्यावर अनिता भाळली व तिनं त्याचेसोबत आवताव न पाहता व मागचा पुढचा विचार न करता विवाह केला. त्यानंही अगदी करारनामा करुन त्या करारनाम्यानुसार तिच्या मुलीला पोसण्याचं लिहून दिलं. हा करारनामा फक्त सहा महिण्याचा होता. ठरल्याप्रमाणं अनिता त्याचेसोबत आपल्या मुलीला घेवून गेली. जातांना एक राणी नावाची कुत्री व तिच्या मुलीलाही घेवून गेली. तशीच तिनं तिथं एका रुग्णालयात नोकरीही पकडली. यावेळी तिची मुलगी दहा वर्षाची झाली होती. यााचं नाव सुहास होतं.
सुहास एक क्रमांकाचा खोटारडा गृहस्थ होता. त्यानं सांगीतलं की तो पंचवीस हजार रुपये महिना कमवतोय. परंतू ज्यादिवशीपासून ती विवाह करुन त्याच्या घरी गेली. तेव्हापासून त्यानं एकही रुपया कमवला नाही. कारण तो कमविणारा नव्हताच. ज्यावेळी अनिताची नोकरी रात्रीला राहायची. त्यावेळी तो अनिताच्या लहानशा मुलीचे कपडे वर करायचा. ती आपल्या आईला सांगायची. परंतू तिची आई पतीप्रेमानं त्याकडं लक्ष द्यायची नाही. ती आई.......तिला तिचा पती आवडत असल्यानं गप्प राहायची नव्हे तर आपलं लैंगीक सुख सांभाळायची. तसं पाहता तिनं आपल्या मुलीसाठी नाही तर आपल्या लैंगीक सुखासाठीच विवाह केला होता.
सुहास कमवीत नव्हता. ती ते पाहात होती. त्यातच ती कमावती होती व तो तिला काहीही बहाणे करुन पैसे मागत होता.
सुहासचं वागणं तिला काही सहन होत नव्हतं. त्यातच सुहास कामावर जात नव्हता. तसं पाहता तिनं सुहासशी विवाह केला. त्याचं कारण होतं. तिची लैंगीक इच्छा आणि त्याचं कामावर जाणं. त्यानं मी कोच आहे व मी पंचवीस हजार रुपये महिना कमावतो म्हणल्यामुळं तिनं त्याच्याशी विवाह खेला होता.
दिवसामागून दिवस जात होते. तो काही विवाह केल्यापासून कामाला जात नव्हता. उलट तिलाच पैशानं लुटत होता. त्यानं असा कितीतरी पैसा तिच्याकडून लुटला होता. कधी मोबाइल विकून व त्याचा पैसा कमवून तो पैसा स्वशौकासाठी वापरत होता आणि घरी सांगत होता की मोबाइल हारवलाय. त्यातच तिच्याशी बोलण्यासाठी तो मोबाइल घेवून देण्याचा हट्ट करीत होता. त्यातच ती भोळ्या मनाची अनिता त्याला मोबाइल घेवून देत होती.
ती वासनेची धुंदी......ती लैंगीकता केव्हापर्यंत असणार. पंधरा दिवस एक महिना. आज अनिता जावून एक महिना झाला होता. त्यातच अनिता त्याला कामाला जा म्हणून म्हणत होती. ती कामाला जात होती. परंतू आधीचा पती कामाला न जात असल्यानं तिला वाटत होतं की दुसरा पती कामाला जाईल. तसा मला संसारात मदत होईल. परंतू तिची योजना जाम फसली होती. हा दुसरा पतीही कामाला जात नव्हता.
सुरुवातीला अनिता त्याचेबाबत चांगलेच बोलत होती. त्यातच त्याचं चांगलंच सांगत होती. तो दारु पित नाही, ख-यापाण्याचा त्याला शौक नाही. खुप चांगला आहे. पंचवीस हजाराची नोकरी आहे वैगेरे चांगल्या गोष्टी. परंतू कालांतरानं माणसाचे खायचे दात व दाखवायचे दात जसे असतात. तसे दिसत होते. त्यातच आज अनिता तो कामाला न जात असल्यानं त्याचेशी भांडत होती.
ती भांडणं........त्यातच त्यानं दारु पिणंही सुरु केलं होतं. तसा गांज्याचा छंदही त्याला जडला होता नव्हे तर खर्रा देखील तो खायला लागला होता. चांगला गुण एकच होता. तो म्हणजे पुजापाठ करणं. तेवढं काम तो करीत होता.
अनिताचा नवीन पती हा तीन व्यक्तींना खपत नव्हता. पहिला म्हणजे तिच्या जुन्या पतीला सहन होत नव्हता. तो तिलाच पैसे मागायचा आणि तिची आठवण विसरण्यासाठी खुप दारु प्यायचा. त्याची नशाही वाढली होती. त्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणजे अर्जून. ती अर्जूनची पत्नी नव्हतीच. तरीही त्याला वाटत होतं की तिचे सगळे पती तसेच निघतात. म्हणून तो पती तिला सहन होत नव्हता आणि तिसरी म्हणजे तिची मुलगी. ती नाबालिग जरी असली तरी तिला आपलाच बाप आवडत होता. तो नवीन बाप आवडत नव्हता.
अनिताची सुहाससोबत जी रोजची भांडणं चालायची. त्यात एकदाचा तो प्रसंग. आज सकाळचे पाच वाजले होते. सगळेजण झोपले होते. तसा सकाळीच पाच वाजता फोन आला.
"हैल्लो, आप अनिता की दीदी बोल रही ना।"
"हाँ, बोलो, कौन? क्या बात है?"
"मै अनिता का आदमी। आप उसे लेकर जाईये। वह बहोत ही परेशान करती रहती है।"
सुहासचे ते संगीताला बोलणे. तसा मोबाइल फोन अर्जूननं आपल्या हातात घेतला व ओरडून म्हणाला,
"आपने क्या हमें पुछकर शादी की क्या? अब जैसी शादी की, वैसे निभाओ।"
त्यानंतर बरंच बोलणं झालं व शेवटी फोन बंद झाला. त्यानंतर जवळपास आणखी पंधरा दिवस गेले. अनिता फार आजारी झाली. ती रुग्णालयात काम करीत होती. परंतू तिच्या आजारपणात तिचं रुग्णालयात जाणंही बंद झालं. नोकरी सुरुच होती. मागील महिण्याचा पगारातील पैसा जवळपास संपला होता. यावेळी जवळ पैसा नव्हता. असेल पुरनिपूर दोनचार हजार. तो अनिताला रुग्णालयात जाण्यासाठी पेट्रोलला लागत होता. त्यातच आता त्याच्यासमोर पैशाचा प्रश्न उभा राहिला.
अनिताचं आजारपण. परंतू तो काही तिला दवाखान्यात नेत नसल्यानं तिनं संगीताला फोन केला. 'मी फार आजारी आहे. हा मला रुग्णालयातही नेत नाही. काय करु?' त्यावर संगीतानं आपला पती अर्जूनला विचारलं. तसंच लहानग्या मुलाचा वास्ता देत पुन्हा म्हटलं,
"तुम्हाला माझी शपथ. माझी पाठची बहिण दिसणार नाही. अहो, लहानशा मुलीसाठी तरी करा. त्या लहान मुलीला तिची आई दिसणार नाही. तिला येवू द्या. आपण तिच्यावर उपचार करु.'
संगीताचं ते बोलणं. तशी अनिता त्याला विचारुन गेली नव्हतीच. तसा त्यानं नकार दिला. परंतू ती संगीता होती. ती आपल्या पाठच्या बहिणीला कशी सोडणार. ती परत म्हणाली,
"ती माझी बहिण आहे म्हणून काय. जर ती तुमची मुलगी असती तर......."
ते संगीताचे अनितासाठीचे शब्द. संगीता अशीच अर्जूनला भावनेनं घायाळ करुन आपल्या बहिणीला सांभाळून घेण्यासाठी विवश करायची आणि अर्जूनमध्येही माया तयार व्हायची व अर्जून तिला वेळोवेळी सांभाळायला तयार व्हायचा. त्यात त्याचा दोष जरी नसला तरी ती आजारपणातून सुधारल्यावर अर्जूनचं न ऐकता त्याला त्रास देण्यासाठी मोकळी व्हायची. असं कितीतरी वेळा घडलं होतं.
संगीतानं भावनातिरेकानं बोललेले ते शब्द. अर्जून मानला व म्हणाला,
"बोलव तुला वाटते तर........ आपण तिचा उपचार करु."
बस........अर्जूननं बोललेले ते शब्द. संगीतानं अनिताला घरी बोलावलं. ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत. अनिताही अतिशय आजारपणात आणि वेदनेत संगीताच्या घरी आली आपल्या मुलीला घेवून. ज्यावेळी ती घरी आली. त्यावेळी ती पायी चालण्याच्याही स्थितीत नव्हती.
****************************************

अर्जून दुपारी घरी आला होता. तशी त्याला अनिता घरी अंथरुणात झोपलेली दिसली. तिची हालत गंभीर होती. ती आजारीच होती.
अर्जूननं तिला पाहिलं. तसे अर्जूननं कपडे बदलवले नाही. हातपायही धुतले नाही वा जेवनही केले नाही व अनिताला घेवून तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांची तिच्यावर स्वखर्चानं औषधी केली. तिला सुधरवलं व तिला अंथरुणातून उठून उभं केलं. अर्थात जे काम तिच्या पतीचं होतं, ते काम अर्जूनला करावं लागलं होतं.
प्रत्येक वेळी अनिता आजारी होवून यायची. त्या आजारपणात तो एकमेव भाटवा तिच्यावर उपचार करुन तिच्यावर कृपा करायचा. तिचा बापही सांभाळायचा. तसेच शिव्या देत रात्र जागविणा-या तिच्या जुन्या पतीलाही सांभाळायचा. यातच त्याचं आयुष्य जात होतं आणि ती बरी झाली की ती अर्जूनचं न ऐकता त्यालाच खोटी ठरवून पती पती करीत आपल्या पतीजवळ जात होती. पती वाईट असूनही अर्जूनला त्रास देत आपल्या पतीला खरी ठरवत होती आणि प्रत्येक वेळी फसत होती. आज अनिताचं असं फसवेगीरीचं वागणं अर्जून अगदी त्रस्त झाला होता. याच आयुष्याच्या उंबरठ्यावर असतांना अर्जूनची चाळीशी झिजली होती. आता मात्र तिचं ते वागणं सहन होत नव्हतं. तिही पसतीस वर्षाची झाली होती. परंतू स्वतःला अगदी तरुणच समजत होती.
अनिता आजारपणातून सुधारली. तशी परत सुहासशी बोलायला लागली. तसं पाहता तो तिचा पती होता. एक दिवस अर्जून म्हणाला,
"तुला पती आवडतो का?"
"होय."
"का बरं?"
"मी त्याचेशी विवाह केलाय."
"बरं. मग माग त्याला आपल्या खाण्याचे पैसे. म्हण की तू पती आहेस. मला नोकरी नाही. तेव्हा तू खायला पैसे पाठव वा मला पोसायला ये. जर त्यानं काहीतरी पैसे दिले तर तो यशस्वी पती. नाहीतर तू त्याला सोडून दे कायमचा."
अर्जूनचा सल्ला तिला पटला. तसा तो सल्ला लाखमोलाचा होता. तसं तिचं आजपर्यंत लोभेससोबतचंं जीवन असंच कटकटीत गेलं होतं. तशी ती त्याला पैसे मागू लागली. परंतू जो व्यक्ती कमावता असतो. जो पतीपणाची जबाबदारी स्विकारतो. जो स्वतःला पती समजतो व एका स्रीला पत्नी. तोच पैसे पाठवणार ना. सुहासचंही तेच झालं. त्यानं सुरुवातीला तीन हजार रुपये देतो म्हटलं. त्यानंतर तो तिनशे रुपयावर आला आणि शेवटी म्हणाला,
"भूक से मर रही है क्या? इतनी भी लाचार हो गई हो, तो कटोरा लेकर रास्ते पर भीख माँगो।"
हे सुहासचे शब्द. अनिताला बरे वाटले की नाही कुणास ठाऊक. परंतू अर्जूनला मात्र ते बोल वाईट वाटले. तसा अर्जूनला त्याचा भयंकर राग आला आणि तो ओरडून म्हणाला,
"आजपासून त्याच्याशी फोनवर बोलायचे नाही. ज्याला पतीपणाची जबाबदारी समजत नाही. अशानं लग्न तरी का करावं? आजारपणात उपचार करायची ज्याच्याजवळ ताकद नाही. त्या माणसासोबत तुनं विवाह केला. तो खोटारडा आहे. आजपासून त्याला सोडून दे."
अर्जूनचं ते बोलणं बरोबर होतं. परंतू ती समजेल तेव्हा ना. अर्जूननं त्याचेशी बोलण्याची मनाई केली तरी ती त्याचेशी बोलतच होती. त्यातच काही दिवसानं तिला अर्जूनच्या शहरात नोकरीही लागली.
नोकरी लागेपर्यंत अनिता ठीक राहिली. परंतू नोकरी लागताच अनिता पुन्हा शिरजोर बनली. तिला वेतन मिळणारच आहे याचा गर्व झाला. तसं वेतन व्हायचंच होतं. तशा नोकरीवर पहिल्याच महिण्यात वेतन होण्यापुर्वी आठ दिवसाच्या सुट्ट्या घेवून ती सुहासच्या गावी गेली. तिनं अर्जूनला म्हटलं की त्यानं बारा हजार रुपये द्यावे. ती तिथे जावून आपलं सोनं, आपली गाडी व सामान घेवून येणार. तसं अर्जूनलाही वाटलं की तिथं गहाण असलेलं सोनं आणि तिचं सामान ती आणत आहे. म्हणून तिला त्यानंही स्वखुशीनं बारा हजार रुपये दिले व म्हटलं की तिनं आपलं सामान आणावं. त्याला आणू नये. हीच त्याची अट आहे. जर त्याला आणलं की तो त्याच दिवशी पैसे परत मागणार. मग तिनं ते पैसेे कोठूनही द्यावे.
अनितानं अर्जूनकडून बारा हजार रुपये घेतले. अट मान्य केली. तशी ती सुहासच्या गावी गेली आणि पुन्हा अर्जूनशी दगलबाजी करीत त्याला अर्जूनच्या शहरात आणण्यासाठी सभा घेवू लागली. ती त्याच सुहासच्या शहरात त्याच्या नातेवाईकाची भेट घेत फिरु लागली आणि पुन्हा तिनं अर्जूनला सुखदपणे मानसिक धक्का दिला.
अर्जूननं तर तिला बारा हजार रुपये त्याला न आणण्याच्या अटीवर दिले होते. परंतू ती काही ऐकत नव्हती. तिला तो कमावता नसला तरी प्रिय होता. कारण तिची लैंगीक इच्छा पुर्ती. तिनं आपल्या मुलीपेक्षा लैंगीकतेला प्रथम प्राधान्य दिलं होतं. तिच्यासमोर, पैसा, प्रतिष्ठा, मुलगी, नातेवाईक, बहिण भाटवा सारे गौण होते. लैंगीकता सर्वश्रेष्ठ होती. मग ते तिचे पती पैसाा कमविणारे असो वा नसो. तो दारु पिणारे असो वा तिला मारझोड करणारे असो. तिला ते आवडत होते. ती लैंगीकतेशिवाय राहू शकत नव्हती.
अर्जूनला माहित झालं की ती आपल्या पतीला आणायला गेली असून तिनं त्यासाठीच बारा हजार रुपये घेतले आहेत. तिचा सोनानाणा काही गहाण नसून तो तिचा शुद्ध बहाणा आहे. तिनं आपल्याशी दगलबाजी केेलेली असून आता काही तिला माफ करणे नाही. शेवटी त्यानं तिला ते बारा हजार रुपये परत येताच मागीतले. कारण तिनं अट मोडली होती. तिनं आपला पती आणला होता. तिचं काहीच चुकलं नसेल त्यावेळी. कारण तो रिकामा अनकष्टी का असेना. तिचा पती होता. तोच पती तिच्या लैंगीकतेची तृप्तता करु शकणार होता. तिनंही त्या बारा हजाराची पुर्तता केली. अर्जूनच्या शहरात येताच तिनं कानातले कर्णफुलं गहाण ठेवले व बारा हजार रुपये परत केले. अर्जूननं मात्र त्या दिवसापासून तर तो सुटेपर्यंत म्हणजेच काही दिवसपर्यंत तिच्याशी रिश्ताच समाप्त केला होता. त्यालाही तिची आणि त्या लहानशा लेकराची आठवण येत होती. तरीही तो त्या आठवणी अगदी मनावर मैलाचा दगड ठेवून सहन करीत होता. सुरुवातीला त्याला त्या आठवणी अति तीव्र यायच्या. परंतू नंतर मात्र सवय पडल्यागत तो जीवन जगत होता. जुना अध्याय समाप्त करुन.......
***********************************************

तिनं अर्जूनचं न ऐकता आपला पती आणला होता. काही दिवस त्यांचं चांगलं चाललं. काही दिवसानं तो परत आपल्या गावी गेला. दोघंही तिथं एक महिना राहिले. दरम्यान तो तिथं पुजारी बनून राहिला. त्यातच तिलाही त्यानं पुजेवर बसायला लावलं. परंतू ती पुजेवर बसायला तयार झाली नाही. त्यातच त्या दोघांचं पुन्हा एकदा बिनसलं. त्यातच तिची नोकरीही गेली. तिला पुन्हा समस्येचा सामना करावा लागला.
पुन्हा अनितानं नोकरीचा दुसरीकडे अर्ज दिला. यानंतर पुन्हा तिला नोकरी मिळाली. या दरम्यान पुन्हा ती त्याला इथे येण्याविषयी विनवू लागली. तसा तो पुन्हा परत आला व आल्यानंतर आठ दिवसात तो जायला तयार झाला. परंतू ती त्याला जावू देईना. तेव्हा तर त्याचेजवळ पैसेही नव्हते. तिही त्याला जाण्यासाठी पैसे द्यायला तयार झाली नाही. शेवटी आता जायला पैसे नाही म्हणून त्यानं तिला नोकरीवर जावू दिलं व सिलेंडर आणि मिक्सर विकून तो चालला गेला. त्यातच तिची खाण्यापिण्याची आबाळ झाली.
काही दिवस असेच गेले. पुन्हा तिनं त्याला बोलावलं.बोलवताना ती तिकीटंही करुन द्यायची. पुन्हा तो आला व दोनचार दिवसानं पुन्हा भांडण करुन जायला तयार झाला. यावेळी तिनं त्याच्या गळ्यावर चाकू धरला व म्हणाली,
"जायचं नाव घेवू नकोस. नाहीतर मी तुझा खुनच करुन टाकीन."
बिचारा तिच्या जाळ्यात अडकलेला, हतबल व्यक्ती. एक दिवस त्याचवेळी संगीताच्या घरी आला. म्हणाला,
"वह मुझे औलाद नही दे सकती, तो वह मेरे कौनसे कामकी।"
हे त्याचे शब्द. त्याला काय म्हणायचं होतं ते कळलं. त्याला वंश चालविण्यासाठी वारस हवा होता. परंतू त्यानं विवाह अशा वयोवृद्ध स्रीशी केला होता की जी त्याला वारस देवू शकत नव्हती. तसा तो तिच्याकडून पैसे घेण्यासाठी तिच्याशी नित्यनेमानं खोटंच बोलत होता. यावेळी तो जेव्हा जायला निघाला. परंतू त्यानं त्याच्या विवाहाची गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. तसा तो गेला.
सुहास गावी जाताच त्याच्या मित्रानं व परीवारवाल्यांनी सांगीतलं की त्यानं विवाह केलेला आहे. परंतू तिचा त्यावर विश्वास बसेल तेव्हा ना. तिचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. शेवटी तिला वाटलं की आपण याची पडताळणी करावी. त्यासाठी तिनं पुन्हा एक मित्र पकडला. तो मित्रही तिच्याशी गोडगोड बोलत होता. ती त्याचेवर भाळली व त्यानं त्याच्या घरी नको जावू असे म्हणूनसुद्धा ती शहानिशा करण्यासाठी सुहासच्या घरी गेली. त्यातच तिनं त्याला रात्री झोपेत चार वाजता एका मुलीसोबत पकडलं. आता तिची शंका शाश्वतमध्ये बदलली व समजलं की त्यानं पत्नी केली. तो मात्र पळून गेला. हाती लागला नाही.
अनिता गेली तशी परत आली. तिनं पुन्हा दुसरा मित्र पकडला होता. ती त्याचेसोबत राहात होती. एक दिवस ती संगीताला म्हणाली,
"मला करमत नाही. मला तुझ्याकडंही येता येत नाही. तुझ्या पतीनं यायला मनाई केली."
अनिताचं ते बोलणं. संगीता म्हणाली,
"अनिता, तू रागे भरुन स्वतः गेली. कुणी तुला जा म्हणलं नाही. वाटल्यास तुला यायचं असेल तर येवू शकतेस."
"मला यायचं आहे. परंतू तू तुझ्या पतीला विचार."
अनितानं तसं म्हणताच संगीतानं आपल्या पतीला म्हणजे अर्जूनला विचारलं. तसा अर्जून म्हणाला,
"मी काही तिला मनाई केली नाही. हवं तर ती येवू शकते. मी अजूनही तिला मनाई करीत नाही. असं समज की तिच्या येण्यानं आपलं लेकरु आपल्याजवळ आलंय."
संगीतानं ते सांगीतलं. तशी अनिता आली. ती बाहेरच उभी होती. तिच्या मनात शल्य कुरकुरत होतं. तसा अर्जून तिला म्हणाला,
"ये आत ये."
अर्जूनचं ते बोलणं. अनिता आत आली.
अनिता आता ये- जा करायला लागली होती. त्यातच एक दिवस अनिता म्हणाली,
"हा व्यक्ती खुप चांगला आहे. परंतू आता मी माझं स्वतःचा निर्णय घेवू शकत नाही. तूम्ही मंजूरी द्याल तरच मी विवाह करणार."
तिचं ते बोलणं.........अर्जूनला ते बोलणं ऐकून बरं वाटलं. तसा अर्जून म्हणाला,
"परंतू एक अट आहे."
"कोणती?"
"तू त्याला आधी पैसे माग. जर तो पैसे देत असेल किंवा दिले तर तो चांगला समजावा नाहीतर नाही." तशी अनिता यावेळीही म्हणाली,
"तो फारच चांगला आहे. कारण त्याला कोणीही भाऊ नाही. तो एकटाच आहे. फक्त एक आई आहे आणि सगळी संपत्ती तो माझ्याच नावानं करणार आहे." तसा अर्जून म्हणाला,
"ते सगळं ठीक आहे. परंतू तो जर पैसे द्यायला तयार असेल तर तू त्याच्याशी विवाह कर. कमीतकमी दहा हजार तं आधी मागून पाहा."
अनिताला ती गोष्ट पटली. तसा तो तिला आधी पैसे द्यायला तयार झाला. तो तसा पुन्हा गोड गोड बोलायला लागला. परंतू ते गोड बोलणं काही दिवसच चाललं. त्यानं एक छदामही तिला टाकून दिला नाही वा कदाचित तोही धोकेबाज असेल, त्यानं आपला मोबाइल बंद केला व तिच्याशी बोलणं बंद केलं. अशातच अनिताचा पारा सरकला व ती आजारी पडली. त्यातच तिची मुलगीही. दोघंही फार आजारी होते. चालू फिरु शकत नव्हते.,अशातच पुन्हा अर्जूननं तिला आणलं. दोघीही मायलेकीवर त्यानं उपचार केला. दोघींनाही त्यानं चांगलं सुदृढ बनवलं. परंतू अनिताची लैंगीकता जाईना. शेवटी अनिता उठून उभी होताच अनितानं पुन्हा वाईट पाऊल उचललं व ती परत दुसरा एक व्यक्ती पकडून साहजीकच त्याच्या जाळ्यात ओढली गेली. यादरम्यान ती म्हणत असे की मला जोही मिळतो, तो धोकेबाजच मिळतो. मी आजपासून ब्रम्हचारी राहिन. आपल्या मुलीसाठी जगेन. परंतू पुन्हा दुसरा कोणताच पुरुष पकडणार नाही.
अर्जूनला ते ऐकताच बरं वाटलं होतं. त्याला वाटलं होतं की ती आता सुधारेल. आपली मुलगी घेवूनच राहिल. पुन्हा दुसरा पकडणार नाही. त्यातच तिच्यावर विश्वास ठेवून तो तिला पोसायलाही तयार झाला होता.
***********************************************

संस्कार........संस्काराला तिलांजली देवून काही महिला वागत असलेल्या दिसतात. आजही काही महिला कारंट्या आई असल्यासारख्या आपल्या इवल्याशा बाळाला सोडून पळून जातात. असं वाटतं की अशा आईंनी कशाला बाळांना जन्म दिला असावा.
तो प्रसंग सांगतो. अनिता तिची आई. त्या आईनं तिची मुलगी बारा वर्षाची असतांना व तिचा पती मरण पावलेला असतांना आपल्या मुलीला बळ देण्याऐवजी अचानक विवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती बारा वर्षाची मुलगी म्हणाली,
” आई, विवाह करु नकोस. मला तो पसंत नाही." त्यावर आई म्हणाली,
"बेटा, मला भविष्याची चिंता आहे. तुझ्या पतीनं मला पोषलं नाही तर........" त्यावर मुलगी म्हणाली,
"आई, मी त्याला सोडून देईल."
"पण तेव्हापर्यंत मला कोण पोषेल?"
"आई, मी फाटके वस्र घालणार. हवं तर आपला प्लाट विकून टाकू. परंतू तू दूसरा विवाह करु नकोस."
"नाही बेटा, तू अजून लहान आहेस. तुला कळणार नाही मी विवाह का करतोय."
"ठीक आहे मग. मी तुझ्याजवळ कधीच राहणार नाही. तू मला मुलगीही म्हणायचं नाही. तू तुटली मला. मी तुटलो तुला आणि आता माझ्या राहण्याचा प्रश्न सोडव."
"तू तुझ्या मोठ्या पप्पाकडे राहशील."
तिची आई सहजपणे बोलून गेली. तशी मुलगी म्हणाली,
"ठीक आहे आई, बडे पप्पा मला पोषायला आहेत म्हणून ठीक आहे. नाहीतर तू मला रस्त्यावर सोडून गेली असती काय?"
"नाही."
"मग काय केलं असतं?"
"मी तुला आश्रमात ठेवलं असतं नाहीतर अनाथाश्रमात."
आई बोलली. त्याचबरोबर मुलीच्या डोळ्यातून अश्रू गळले. परंतू त्या आईला एवढंसं सुद्धा रडू आलं नाही. त्याचं कारण होतं तिची वासनेची भावना. त्यावेळी अनिता एकेचाळीस वर्षाची होती.
अशी अनेक प्रकरणं आज भारतासारख्या देशात रोजच घडत आहेत. रोजच मुलींच्या आई मिसींग होत आहेत आणि रोजच अशी मुलं आश्रमात वा अनाथालयात दाखल होत आहेत. तसेच रोजच अशा आईंमुळं त्या मुलांमुलींना अनाथालयाचं दुर्दैवी जीवन जगावं लागत आहे. यात त्या लेकरांचा कोणता दोष असतो. कोणताच नाही. हे आजपासूनच घडत नाही तर हे प्राचीन काळापासूनच घडत आहे.
मी लहान असतांना माझ्या आईनं एक प्रसंग सांगीतला. एक महिला.......तिचा पती तिला इवली इवली मुलं असतांना मरण पावला. तिला चार मुलं होती. त्यानंतर ती महिला त्या चारही मुलांना पोषण्याऐवजी गावातल्याच एका व्यक्तीसोबत पळून गेली. त्या मुलांचा विचार न करता. ती मुलं नंतर भीक्षा मागत जगली. ही वास्तविकता आहे. हे असं का घडतं. आज याचा विचार केला तर आपण आपल्या भारतात आलेल्या पाश्चात्य संस्कृतीला दोष देवू. परंतू हे तर पुर्वापारच घडून येत आहे. मग यात पाश्चात्य संस्कृतीचा दोष कसला?
मायबापाचं कर्तव्य असतं, ज्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला जन्म दिला. त्याप्रमाणे त्याचं पालनपोषण करणं हे त्या मायबापाचं आद्य कर्तव्य. परंतू काही काही मायबाप तसे करीत नाहीत. ते चक्क आपल्या वासनेच्या पुर्तीसाठी आपल्या मुलाबाळांना सोडून जातात. मग विचार येतो कशाला जन्माला घातली ही मुलं. लहानपणीच मारुन टाकली असती अशी मुलं तर बरं झालं असतं.
विश्वात जन्मणारे सारे जीवजंतू. त्या जीवजंतूंमध्ये सारेच प्राणी आपल्या मुलांना जन्म देतात. त्यानुसार प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा आहे. ते प्राणी आपल्या मुलांचा त्रास सहन करु शकत नाहीत. एक गाय आपल्या पाडसाला सावली मिळावी म्हणून तो बसला असतांना स्वतः उन्हं अंगावर घेवून आपल्या बाळावर सावली धरते. एक विंचवी आपल्या बाळाला जन्म देवून स्वतः त्यांचं पोट भरण्यासाठी त्या पिल्लांचे भक्ष ठरते. तसेच चिमण्या पाखरं.........आपलं बाळ लहान असतांना त्याला मोठे करीत असतांना त्यांना घास भरवतात. तसेच जंगलातील काही जीव आपल्या बाळाला वाचविण्यासाठी वन्य प्राण्यांचे स्वतः भक्ष ठरतात. या सर्व वन्य प्राण्यात फक्त एकच अपवाद आहे. तो प्राणी म्हणजे साप. तो आपल्या बाळाला जन्म देतांनाच त्या पिल्लांला खावून टाकते. त्यामुळं अशी बाळाला सोडून जाणारी आई ही तिच्या वागण्यानं नागीणच असल्यासारखी वाटते.
स्रीयांबद्दलची आजची उदाहरणं चांगली आहेत. म्हणतात की एक पुरुष पत्नी मरण पावल्यानंतर आपल्या मुलांबाळांचा विचार न करता केवळ आपल्या लैंगीक सुखासाठी विवाह करतो आणि सांगतो की मी माझ्या मुलासाठी विवाह केला. परंतू असं काहीच घडत नाही. कारण ती येणारी नवीन त्या बाळाची आई त्याच्या मुलांना सांभाळत नाही. म्हणून म्हणतात की महिला कशीही असो, ती आपल्या मुलांचे पतीनिधनानंतर संगोपन करते. परंतू तेही काही अंशी चूकच आहे. कारण आजही मी ब-याच महिला पाहतो की पती निधनानंतर लैंगीकतेची पुर्तता करण्यासाठी विवाह करतात. आपल्या मुलाबाळांचा विवाह न करता. हा येणारा नवीन बाप, तिची मुलगी आहे. ती उद्या तरुण होणार असा विचार करुन विवाह करतात. त्यातच तो बाप ती मुलगी तरुण होताच तिच्यावरही नजर टाकतात. त्यातच तिला जाळ्यात ओढतात. तसेच तिच्या आईलाही मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करतात किंवा तिच्या आईला, मुलीला मारुन टाकीन अशी धमकी देवून गप्प राहायला सांगतात आणि हवी तेव्हा वासना पुर्ण करतात. ही देखील वास्तविकता आहे. यात काही प्रकरणं उघडकीस येतात. काही मात्र अशीच दबून जातात.
माणसानं जीवन जगतांना अगदी प्राणीमात्रापासून शिकायला हवं. मुलं पैदा करतांना त्याच्या योग्य पालनपोषणाचा विचार करुनच मुलं पैदा करावीत. विनाकारण मुलं पैदा करुन त्यांचं नुकसान करु नये वा त्याला वेळी अवेळी अनाथासारखं जीवन जगण्यासाठी सोडून जावू नये. तसा विचार आधीच करावा. जेणेकरुन मुलांचं नुकसान होणार नाही. असे जर करण्याचा विचार असेल तर मुलं जन्मालाच घालू नये. तसेच मुलांना वा-यावर सोडू नये. मग कोणत्याच अडचणी येत असतील तरी. त्याचा सामना करण्याची ताकद मनात ठेवावी म्हणजे झालं.
एका वर्तमानपत्राला एक दिवस अशीच एक बातमी वाचली. वाचून मन शुन्न झालं.वाटलं की आजच्या काळात स्रीवर नाही तर पुरुषांवर अत्याचार सुरु आहेत की काय?
खरं आहे ते. कारण अशीच ती बातमी. दिल्ली हायकोर्टातील अशीच ती बातमी. घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत महिलेला सासरी राहण्याचा अधिकार हा हिंदू विवाह कायद्यानुसार आहे. ते खरंही आहे. त्यातच मुलासोबत सुन राहात नसल्यानं सासूनं तिला घरात राहण्याचा अधिकार सासूनं फेटाळून लावला होता. परंतू या प्रसंगी दिल्ली न्यायालयानं सांगीतलं की सदर प्रकरणात जरी ती मुलासोबत राहण्यास तयार नसेल, तरी ती मुलासोबत न राहता सासूच्या घरी ती राहू शकते.
कौटूंबीक हिंसाचार कायदा बनला. त्यातच या कायद्यातंर्गत सासू, सासरा, दीर, ननद हे शिरजोर ठरु लागले. त्यातच ते एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप लावू लागले. यानुसार मुली वरचढ ठरल्या तर मुलं मात्र वरचढ न ठरता खालमानी ठरली.
पुर्वी मुलींचे स्वयंवर होत असत. या स्वयंवरात मुलींना पाहायला व जिंकायला मुलं येत. ते आपल्या कर्तबगारीनं मुलींचं मन जिंकत असत. त्यातच एक स्पर्धा असे. या स्पर्धेत जो जिंकला. तोच तिच्याशी विवाह करीत असे. मग त्याला कितीही पत्न्या का असेना.
स्वयंवरच ते......... त्या स्वयंवरानंतर ती स्री पत्नी म्हणून पतीच्या घरी येत होती. त्यातच पुढे कमी कमी जास्त झाल्यास ती मायबापाला दोष देत नव्हती. त्याचे कारण म्हणजे ते मायबाप म्हणत असत की बेटा, तू स्वयंवरात स्वतः पती निवडला. आम्ही तुला वर निवडून दिला नाही. तेव्हा तू त्याला पती म्हणून स्वतःच स्विकारले असल्यामुळे आम्ही आता त्यांनी कमीजास्त केल्यास त्याला काहीही बोलू शकत नाही वा जाब विचारु शकत नाही. तेव्हा तूू दिल्या घरी सुखी राहा. होणा-या त्या वाईट गोष्टीचा विचार न करता मायबाप तिला कसायाला दिली गाय आणि तिची आशा काय, म्हणत तिला आसरा देत नसत. त्यातच तो पती तिला हातातील कळसुत्री बाहूली समजत तिचा हवा तसा वापर करीत असे. तसेच तिला ठारही करीत असे वा तिच्याचसमोर दुसरी पत्नी विवाह करुन आणत असे. असे त्या काळात मोठमोठे राजे रजवाडे होवून गेले की त्या राजांनी चार चार आणि त्यापेक्षाही कितीतरी जास्त भार्या बनवल्या होत्या. आज मात्र तशी परीस्थिती नाही. मुस्लीम विवाह पद्धतीत दोन किंवा त्या पेक्षाही कितीतरी जास्त पत्नी बनविण्याचा अधिकार आहे. परंतू त्यात बंधन आहे एक. ते म्हणजे लाचार मुलगी जर असेल समाजात तर दुसरा विवाह मुस्लीम बांधव करु शकतो. हिंदू विवाह पद्धतीत एकच पत्नी विवाहाची पद्धत आहे तर ख्रिश्चन मध्ये काँन्टैक्ट मैरेज. त्यामुळं ही विवाहाची पद्धत पाश्चात्यांनीच सडवली आहे. असं वाटायला लागलं आहे. आज सरकारनं दिल्ली हाईकोर्टातून घटस्फोटानंतरही पत्नीला सासरी राहण्याचा हक्क देवून पतीला एकप्रकारे सारासार आत्महत्याच करायला लावलेली आहे. त्यातच आज या प्रकारच्या निर्णयातून पत्नी वर्ग विचारानं शिगेलाही पोहोचू शकतो. प्रत्येक पत्नी आता दिल्ली हायकोर्टाचा हवाला देवून हे घटस्फोट झाल्यानंतरही घरात येईल. परंतू पतीला हात लावू देणार नाही. आज तीच गोष्ट दररोज पाहू पाहू पतीवर्ग गुदमरुन मरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिकडे सरकारनं हा घटस्फोटानंतरच सासरी राहण्याचा खटला नाही, तर आज सरकारनं दुसरा असा कायदा आणला आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. यामध्ये कोणताही माणूस कोणत्याही अठरा वर्षे वयाच्या मुलीसोबत अगदी विवाह न करता राहू शकतो. त्यामुळं साहजिकच विवाहाचं महत्व पूर्णतः कमी झालेले असून ही गोष्ट बिघडलेल्या लोकांसाठी ठीक आहे. तसेच आपली कामाख्या पुर्ण करुन घेणा-या लोकांसाठी ठीक आहे. कारण त्यांची वासना पुुर्ण होवू शकते यातून. वासना पूर्ण झाली की सोडा एकमेकांना. जीवनभर विवाह करुन बंधनात राहण्याची गरज नाही. परंतू यात मुलांचं नुकसान होतं. आज याच वासना पुर्तीच्या लोभानं व वासनापुर्तीसाठी अगदी खुल्लेपणानं कोणाचीही भीती न बाळगता लोकं लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहात असतात. किंबहूना यात एक नुकसान झालं. ते म्हणजे मुलांचं नुकसान. लोकांना लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत संधीच मिळाली एकत्र राहण्याची. मग अठरा वर्षे पेक्षा वयाची मुलंं मुलीच नाही तर चाळीस ते पन्नास वयाचे विवाहीत असलेली मंडळीही आपआपल्या पत्नीला सोडून लिव्ह इन रिलेशनशिप अंतर्गत राहायला लागली. त्यातच पुलिस स्टेशनला मिसींगच्या तक्रारीही वाढल्या. अमुक महिला गायब झाली. अमुक पुरुष हरवला आहे. त्यातच अशा घटनांच्या वाढत्या प्रमाणानुसार पोलिसांनीही अशा हरविलेल्या महिला पुरुषांचा शोध घेणे बंद केले. याचा परीणाम त्यांच्या मुलांवरही झाला. त्यांचे जे आजोबा होते. ते आजीआजोबा ते युगल पळून जाताच आपल्या नातवंडाला सांभाळू लागले. याबाबत एक प्रसंग सांगतो.
एक महिला, जिला दोन लहान मुलं होती. ती एका घराजवळच्या माणसासोबत पळून गेली. त्यातच तोही तिच्या बहिणीसोबत पळून गेला. पुढे ती दोन मुलं. ती मुलं वस्तीकर्त्यांनी ती मंडळी काही दिवसानं परत न आल्यानं आश्रमात टाकली.
महत्वपूर्ण गोष्ट ही की त्या मुलांचा गुन्हा काय की त्यांना आश्रमात राहावं लागावं. ती मुलं गुन्हेगार कशी की त्यांना मायबाप दोघांनी सोडावं. त्यानंतर ते युगल सापडलेही. तरी त्यांना, त्यांनी मुलं सोडली तरी शिक्षा देता येणार नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिप. मग कशाला हवं असलं लिव्ह इन रिलेशनशिप. जी लहानमुलांची जिंदगी बरबाद करु शकते.
एक दुसरा प्रसंग सांगतो. यात एक महिला दुस-या मुलांसोबत राहण्यासाठी आपल्या मुलांला जीवंत गाडण्याचा प्रयत्न करीत असतांना समाजसेवक मंडळी वाचवतात. शेवटी या समाजसेवक मंडळींच्या धाकानं ते पोलिस स्टेशनला देतील म्हणून तो मुलगा तिला पळून जातो. हे असलं असतं लिव्ह इन रिलेशनशिप. फक्त मतलबापुरतं. ते ऐन संकटाच्या वेळी कामात येत नसतं. हं मतलब असला की बरोबर सुचतं मतलबासाठी मतलबापुरता लिव्ह इन रिलेशनशिप.
आज असंच लिव्ह इन रिलेशनशिप चालत आहे. वासनापुर्ती होत आहे. मुलं वा-यावर सुटत आहेत. सापडले तरीही शिक्षा नाही. परंतू मुलं वा-यावर सुटतात त्याचं काय? याचसाठी आणखी थोडा विचार करण्याची गरज आहे. तसाच हाही विचार करण्याची गरज आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नक्की राहा. परंतू आपल्या मुलांची योग्य विल्हेवाट लावा. असे जर झाले नाही तर त्या विवाह तोडणा-या आणि पळून जाणा-या लोकांना माफी देवू नये. त्यांना अटक करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्यासाठी या लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्यात थोडा बदल करण्याची गरज आहे हे तेवढंच खरं. तसेच घटस्फोटाबाबतही कायदे बदल. हेही तेवढंच गरजेचे आहे.
बालक सुरक्षा.......त्यांच्या सुरक्षेचेे महत्व आहे. कारण त्यांची सुरक्षा ही त्यांच्यावर संस्कार घडवीत असते. परंतू आज या बाबत काळ बदलला आहे. या बदलत्या काळानुसार पाश्चात्य धोरण आज भारतानही स्विकारले आहे. जे देशाला घातक आहे.
आपला भारत देश आधीपासूनच सुजलाम सुफलाम आहे. इथे धनधान्यात सुसंपन्नता आहे. त्याचप्रमाणे इथे मानमर्यादेतही सुसंपन्नता आहे. ती आजही काही लोकांमुळं टिकून आहे.
सामाजीक क्षेत्राचा विचार केल्यास स्री मर्यादा ह्या गोष्टी विचारात घेवून पावलं उचलायला हवी. परंतू त्याला पाश्चात्य विचारसरणीनं तिलांजली दिली आहे. आज याच पाश्चात्य विचारसरणीच्या प्रकोपानं भारतातील संस्कार कितीतरी पटीनं दूर गेले आहेत.
पुर्वी या भारतात संस्कार होते. मर्यादा पुरुषोत्तम रामानं केवळ एकच पत्नी केली. जरी ती त्याचेसोबत राहिली नाही. तरी त्यानं दुुस-या पत्नीचा विचार मनात आणला नाही. त्याच विचारांचा भारत देश, आज या भारत देशातही लिव्ह इन रिलेशनशिपचे वारे वाहात आहेत. आज याच पाश्चात्य विचारसरणीच्या हव्यासानं लोकं मुलंही पैदा करीत नाहीत. आजही मुलं पैदा करतांना लोकं दहा वेळा विचार करतात.
लिव्ह इन रिलेशनशिप ही वासनेची परीपुर्ती करण्यासाठी उपयोजीलेली कृती होय असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज एक महिला आपला पती, आपले इवले इवले मुलं सोडून लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यातंर्गत दुस-या अनोळखी व्यक्तीसोबत राहात आहे. ज्या व्यक्तीची पुर्ण माहितीच तिला नसते. जसा काळ जातो. तसंतसं तिला त्याचेबाबत माहिती होतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यावेळी तिला परीवाराची, त्या लहान लहान मुलांची आठवणही येते. परंतू ती त्यावेळी परत येवू शकत नाही. कारण तिनं त्यांना केव्हाच सोडलेलं असतं. अशावेळी तिची मुलंही तिला स्विकारत नाहीत.
लिव्ह इन रिलेशनशिप हा एक प्रकारचा आजारच आहे चांगल्या सुखी जीवनशैैलीला बिघडविणारा. ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस विदेशातून आला आणि त्यानं इतर देशातील लोकांनाच नाही तर भारतीय लोकांनाही त्रास दिला. तसा त्रास आज विवाहीत मंडळींना होत आहे. आज याच विवाहबाह्य संबंधातून देश पोखरला जात आहे. संस्काराला व संसाराला छिद्र पडलेले आहे. ते छिद्र एवढे मोठे आहे की त्याची डागडुगी करता येत नाही. यातूनच त्यांची जी मुलं आहेत. त्या मुलांवर संक्रात आली आहे.
एक प्रसंग सांगतो. एके ठिकाणी एक माता आपल्या प्रियकराच्या मदतीनं एका जीवंत मुलाला खड्ड्यात कोंबत होती. एवढ्यात सामाजीक कार्यकर्त्यानं त्या इवल्या मुलाला वाचवलं. दुस-या प्रसंगात एक माता आपल्या लहान दोन मुलांना टाकून पळाली. तिला पोलिसांनी पकडलं तेव्हा उत्तरार्थी ती माता म्हणाली, 'मला भरल्या परीवारात राहायचं नाही. मी आणि माझा पती आम्ही दोघंही वेगळे राहू.'
परीवारानं तोही उपाय केला. परंतू ती टिकेल तेव्हा ना. पुन्हा ती मुलगी त्या पतीच्या घरुन पळाली. शेवटी ती पोलिसांनाही मिळाली नाही. शेवटी ती मुलं आजी आजोबाजवळ आहेत.
समाज नेहमी अशा घटना ऐकतो की गुप्त धन मिळविण्यासाठी काही ठिकाणी माता पित्यानं आपल्या मुलांचा जीव घेतला. काही गोष्टी अशाही ऐकतो की बापानं मुलीवर बलत्कार केला. परंतू समाजानं कधीही असंं ऐकलं नाही की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी स्वतःच्या मुलांचा बळी घेतला. ठार केलं. परंतू महत्वपूर्ण गोष्ट ही की अशा घटना ब-याच घडल्या. परंतू त्या उजेडात आल्या नाहीत. कारण मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करतांना आपल्या मुलाचा विचार नाही. ज्याच्यासोबत ती राहणार असेल, त्याला तिची मुलं आवडत नाही. त्यातूनच त्याच प्रियकराच्या मदतीनं तिच्या मुलाला संपविण्याचे विचार चालत असतात. ते विचार वृद्धींगतही होत असतात. ती जेव्हा आपल्या मुलाला संपवते. तेव्हा ती, ती क्रिया राजरोषपणे करीत नाही. अगदी लपूनछपून ते कृत्य करीत असते. त्यामुळं ते सत्य उघडकीस येत नाही.
काही काही महिला आपल्या मुलाला सोडून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. त्यामुळे मुले उघड्यावर पडतात. अशा मुलांना पोलिस अनाथाश्रमात सोडून देतात. यात मुलांचा दोष नसतो.
महत्वाचं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचे कायदे नक्कीच बनवावे. परंतू त्याचा होणारा मुलांवरील परीणाम लक्षात घेता या लिव्ह इन रिलेशनशिप कायदे बदलविण्याची गरज आहे. ते कायदे बदलवावे. जेणेकरुन मुले सुरक्षीत होतील. हे तेवढंच लक्षात घ्यावे.
***********************************************

जीवनात सहा महाविद्या असतात. वशीकरण, स्तंभन, शांतीकर्म, विद्वेषण, उच्चाटन आणि मारण. या महाविद्येला अभिचार कर्म असेही म्हणतात. हे सहा कर्म षटकर्म म्हणूनही ओळखले जातात. यालाच संमोहन असंही म्हणतात. हे संमोहन करण्यासाठी काही सिद्ध्याही प्राप्त कराव्या लागतात असं काही तांत्रीक सांगतात. परंतू काही विज्ञान तत्ववेत्ते याला अंधश्रद्धा मानुन त्यावर विश्वास ठेवायला सांगत नाही. परंतू त्यांचं ते बरोबर आहे. कारण त्यानुसार मानव हा अंधश्रद्धेच्या जाळ्यात आपोआपच ओढला जात असतो.
शास्रामध्येही या सहा कर्माचा उल्लेख आढळतो. यामध्ये एक शांतीकर्म जर सोडला, तर बारी सर्व कर्म हे वाईट विचारांचे प्रेरक आहेत. यामध्ये एक कर्म आहे वशीकरण अर्थात संमोहन. याचाच अर्थ असा की एखादी वस्तू वा व्यक्तीला आपल्या वशमध्ये करणे. अर्थात प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याचा ज्याच्याशी संबंध येत असेल, असा एखादी व्यक्ती आपल्या शब्दाच्या बाहेर जायला नको. त्यानं आपल्या गोष्टी ऐकायला हव्यात.
कालपर्यंत वशीकरणाचा प्रयोग चांगल्या गोष्टीसाठी केला जात असे. परंतू आज मात्र तसे नाही.,आज वशीकरणाचा प्रयोग वेगळ्या गोष्टीसाठी केला जातो. कालचे वशीकरण हे शत्रूला गारद करण्यासाठी असायचे. आजचे वशीकरण एखाद्या स्रीला वशमध्ये करुन तिच्याशी कुकर्म करण्यासाठी वापरले जाते. आज एखाद्या स्रीवर वशीकरण करुन आपली लैंगीक तृप्तता होईपर्यंत तिला वशमध्ये ठेवून आपली लैंगीक तृप्तता झाली की तिला सोडून देणे एवढा एकच उद्देश आज वशीकरणाबाबत घेतला जात आहे. वशीकरण हे होतं की नाही हे मला माहित नाही. फक्त एवढंच सांगेन की जगात देव जर आहे असे आपण जेव्हा मानतो. तेव्हा वशीकरणही आहे हेही मानावेच लागेल. आजचे वशीकरण केवळ माणसाच्या चेह-यावरुन होत नाही.,आज तसं पाहता वशीकरणाची पद्धत बदललेली आहे. आजचे वशीकरण हे मोबाईल नंबर वा केवळ नावावरुनही होत असते.
वशीकरणाबाबत महत्वपूर्ण गोष्ट ही सांगेन की आज काळ खराब आहे. एखाद्या स्रीचं सौंदर्य पाहून तिला आपलंसं करण्यासाठी वशीकरण केलं जातं. तसेच एखादा व्यक्ती श्रीमंत असेल तर त्याचा पैसाही लुटण्यासाठी वशीकरण केलं जातं. म्हणूनच चांगल्या सात्वीक व्यक्तीनं सावध राहिलेलं बरं. वशीकरण झालेल्या माणसाची बुद्धिमत्ता चालत नाही. त्याला केवळ तेच ते दिसतं. जे त्याला अपेक्षीत असतं.
वशीकरणात वार, मुहूर्त तारीख लागते. असे मांत्रीक सांगतात. वशीकरणात त्या व्यक्तीची बुद्धीच बांधली जाते. ज्या बुद्धिमत्तेचा वापर करुन तो निर्णय घेवू शकतो. परंतू बुद्धीच बांधली गेल्यानं तो स्वतंत्र निर्णय घेवू शकत नाही. मग ती बुद्धी जो बांधतो. त्याच्याच निर्णयानुसार तो वागत असतो. मग त्याला त्याचे नातेवाईक आवडत नाहीत. त्यांनी सांगीतलेले सल्लेही आवडत नाहीत. एवढंच नाही तर त्याला स्वतःची मुलंबाळंही आवडत नाहीत.
सध्याच्या परीस्थीतीत वशीकरण हे तरुण तरुणीमध्ये जास्त प्रमाणात दिसत असून मुलगा मुलींवर जास्त प्रमाणात वशीकरण करतांना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे कामवासना. मग अशा कामवासनेच्या पुर्ततेसाठी मुलगा वशीकरणाला जास्त महत्व देतांना दिसत आहे. अपवादात्मक परिस्थीतीत मुलगीही वशीकरणाचा आधार घेत आहे. ज्या व्यक्तीवर वशीकरण झालं. ती व्यक्ती आपलं बरंवाईट काहीच समजू शकत नाही. तसेच तो व्यक्ती स्वतःच्या मानअपमानाची चिंताही करीत नाही.
वशीकरण ही एक विद्या आहे. तिचा वापर विद्येसारखाच करावा. वशीकरण हे सार्वकालीक टिकणारी वस्तू नाही. तिचा प्रभाव काही दिवसानं नक्कीच समाप्त होतो. तेव्हा त्या विद्येचा वापर चांंगल्या गोष्टीसाठीच करावा. वाईट गोष्टी वा हेतू ठेवून त्याचा वापर करु नये. असे जर केले तर त्याचे गंभीर परीणाम आपल्याला भोगावे लागतात. ज्यातून आपल्याला त्रास होतो व ती शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. म्हणून त्याचा प्रयोग करण्यापुर्वी सावधान असलेलं बरं हे तेवढंच खरं आहे.
अर्जून तिला पोसणार होता. तशी तिला नोकरी नव्हतीच. तो तिच्या मुलीला पोषत होता. परंतू एक दिवस मुलगी म्हणाली,
"बाबा, तुम्ही जसे मला पोषता. तसं माझ्या आईला पोषायला काय झालं?"
ती बाळबोध मुलगी. त्यातच तिचा तो निरागस प्रश्न. तो प्रश्न विचार करणारा ठरला. त्यातच अर्जूननं विचार केला की आपण या मुलीचं ऐकावं व तिच्या आईलाही पोसावं. ती तिची आई कितीसं खाणार!
अनिता तसं पाहता जास्त जेवत नव्हती. तशी तिची प्रकृतीही बरोबर राहात नव्हती. ती शरीरयष्टीनं बारीकच होती.
अनितानं 'मी ब्रह्मचर्य पाळीन ' असं बोललेलं वाक्य........त्या वाक्यानं प्रभावीत होवून अर्जूननं तिला पोसायचं ठरवलं. तिही नोकरीसाठी प्रयत्न करु लागली. परंतू तिला नोकरी मिळत नव्हती. तशी ती अर्जूनच्याच घरी अगदी शांततेनं राहात होती. तिला अर्जूनच्या घरी काही कमी नव्हते. तसे पंधरा दिवस गेले.
आज पंधरा दिवस निघून गेले. अनिता पुन्हा फोनवर बोलायला लागली. तसा अर्जूनला विचार आला की कुठंतरी पाणी मुरत असावं. एक दिवस तो म्हणाला,
"आतापर्यंत वाटत होतं की तू सुधारली असेल, परंतू आता वाटतं की सुधारली नाहीस. सांग कुणाला फोन करतेस?"
"मैत्रीणीला." अनिता असं म्हणून गप्प झाली. तसा अर्जूनही गप्प झाला. असेच काही दिवस गेले. अनितानं एक दिवस म्हटलं की माझ्या मुलीला चार दिवस ठेवा. मी याच शहरात होम पेशंट पाहायला जात आहे. मला कोणीही फोन करायचा नाही. मीच फोन करेल."
अर्जूनला वाटलं की अनिता होम पेशंटला जात आहे. तीच फोन करणार आहे. आपण करायची गरज नाही. तसं त्यानं व संगीतानं तिला अगदी हसत हसत रवाना केलं. परंतू अर्जूनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यानं मोबाईलवर ट्रैकर डाऊनलोड करुन तिचं लोकेशन ट्रैक केले. ते लोकेशन दिल्ली दाखवत होते. तसे त्यानं तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवले. परंतू ती मोबाइलवरचे पाहात नव्हती. अर्जून वेगवेगळ्या फोननंबरवरुन फोन करीत होता. परंतू ती फोनही उचलत नव्हती. तसेच स्वतःही फोन करीत नव्हती. त्यातच अर्जूनला वाटलं की ती फोन उचलत नाही. मेसेज उचलत नाही. फोनही करीत नाही. असं अकस्मात काय घडलं की ती एखादा फोन करीत नाही. काय कारण असावं. कदाचित तिला कोणी अपहरण करुन तर नेलं नसेल. असेच दोन दिवस निघून गेले.
अनिताला ना लहानग्या मुलीची आठवण आली ना परीरावाराची. तसं पाहता अर्जून नावाचा तो जिजू........तिच्या भावानं तर त्या दोघी बहिणींना टाकून दिलं होतं. परंतू अर्जूननं तिच्या बहिणीला टाकलं नव्हतं. आजही त्याला वाटत होतं की तिनं आपली लैंगीक भावना सोडून आपली मुलगी घेवून राहावं. मुलगीच तिला मदत करेल. परंतू आता तिची मुलगी लहान असूनही तिची आई तिला फोन करीत नव्हती. म्हणूनच अर्जूनला वाईट वाटलं. एकतर ती कोठे जाते हे सांगीतलं नसल्यानं भीतीनं त्यानं पोलिसस्टेशनला तक्रार केली की ती मिसींग आहे. फोन उचलत नाही. मेसेज पाहात नाही आणि फोनही करीत नाही. कुठे गेली, कुठे नाही याचा थांगपत्ताही नाही. काय करावं सुचत नव्हतं.
अर्जून जेव्हा पोलिस स्टेशनला गेला, तेव्हा पोलिसांनी तिला फोन केला. त्यावर ती बोलली की मी याच शहरात आहे. मी घरी सांगून आली. माझी काळजी करायची गरज नाही. एवढे बोलून तिनं तसा फोन कापला. त्यानंतर पोलिसांनी तिला बरेच फोन केलेत. परंतू पोलिसांचेही फोन तिनं उचलले नाही नव्हे तर फोन बंद करुन ठेवला. हे पाहून अनिताबद्दल पोलिसांनाही शंका आली की यामध्ये खरंच घातपात असू शकते. तिला कोणंतरी अपहरण करुन नेलं असेल. त्यामुळं की काय, अनिताची मिसींग तक्रार पोलिसांनी नोंदवली व पोलिस तपास करु लागले. असेच दोनतीन दिवस गेले. आज अनिताचा फोन मुलीच्या मोबाईलवर आला. अनिताचं जवळपास एकोणवीस मिनीट बोलणं झालं. त्यातच अर्जूननं पोलिसांना फोन केला की अनिताचा अमूक अमूक क्रमांकावर फोन आला. ती अमूक अमूक बोलली. तेव्हा पोलिसांनी तो नंबर ट्रैक केला आणि सांगीतलं की अनिता ही दिल्लीला आहे. ती या शहरात नाही.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती दिल्लीला आहे असं म्हणताच अर्जूनला तिच्या खोटेपणाचा भयंकर राग आला व ती येताच तिला आपण चांगलेच बोलू असा त्यानं निश्चय केला. परंतू ती गोष्ट त्याला वाटत होती. ती मात्र निर्भीड होती.
दोन तीन दिवस अनिता दिल्लीला राहिली. आज अनिता दिल्लीवरुन परत अर्जूनच्या गावी आली. जिथे तिचा अधिवास होता. जिथे तिची मुलगी होती. ती मुलगी आतूरतेनं आईची आठवण करीत होती.
अनिता एकुण पाच दिवस दिल्लीला राहिली. ती पाच दिवसानं परत आली. म्हणाली,
"आता मी दोन महिने जाणार नाही. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसच झाले होते, अनिता पुन्हा दिल्लीला निघाली. यावेळी पुन्हा अर्जूनसमोर प्रश्न निर्माण झाला की आता अनिताचं काय करावं.
अनिता दिल्लीसाठी निघाली. तिनं दिल्लीला जाण्यासाठी ट्रेनची तिकीट बूक केली होती. त्यातच ती जाणार होती. परंतू तिच्या मुलीची इच्छा होती की तिनं पती करु नये. वाटल्यास ती कामाला जाणार.
बारा वर्षाची ती पोर. तिचं ते कोवळं वय. त्या कोवळ्या वयाच्या मुलीसमोर अनिताला कोणतीच दया येत नव्हती. तसं पाहता त्या मुलीसमोर अनिता दुर्बलही वाटत नव्हती.
ती मुलगी म्हणत होती की आई मी तुला पोसीन. तो तिचा आत्मविश्वास. आज तो आत्मविश्वास महत्वपूर्ण होता. कोणतीही चांगली आई, त्या आत्मविश्वासापुढं हारली असती. परंतू अनिता कारंटी आई होती की त्या मुलीच्या इच्छेसमोर आणि आत्मविश्वासासमोर हार न मानता ती तिला सोडून गेली. त्यातच ती सोडून जात असतांना अनिताला मुलगी म्हणाली, 'जर बडे पप्पा मला पोसायला नसते तर......' तरीही त्या कारंट्या आईला दया आली नाही. 'आई, तू गेल्यावर मी जहर पिणार.' तरीही आईला दया आली नाही. 'आई, मी कामाला जाणार.' 'आई मी फाटके वस्र घालणार.' 'आई आपण प्लाट विकून जगू.' तरीही आई थांबली नाही. कारण तिच्यावर लैंगीकतेचं भूत स्वार होतं.
अनिता आपल्या मुलीला सोडून गेली. परंतू याहीवेळी ती फोन करीत नव्हती. तसंच अर्जूननही घरी सांगून ठेवलं होतं की तिला फोन करायचा नाही वा तिला मेसेज करायचा नाही. यातच काही लोकं सांगत होते की ती ज्यांच्या घरी गेली. त्यानं तिला वशीकरण केलं. तशी काही दिवसानं ती परत आली होती. परंतू आल्यावर ती फार क्रोधीत होती. कारण अर्जूननं तिला तिच्या मुलीशीच बोलू दिलं नव्हतं.

**********************************************

आज वशीकरणाला जास्त महत्व आलं आहे. त्याचं कारण आहे मुली न मिळणे. भ्रुणहत्येनं आज मुलींची संख्या कमी झालेली आहे.
आज मुलगा हाच वंशाचा वारस समजून लोकांनी गत वीस तीस वर्षाच्या पुुर्वीपासून लोकांंनी मुलीच्या भ्रृणाला पोटातल्या पोटात ठार केलं. त्यासाठी गर्भलिंगाचं परीक्षण केलं. त्यानुसार लोकांना ते भ्रूण मुलींचे दिसताच त्याची कत्तल झाली. आज ही लोकसंख्या याच दृष्टीकोणानं अतिशय कमी झालेली आहे. काल लोकांनी सर्रास भ्रुणहत्या केल्या. आज त्याचे परीणाम दिसून येत आहे. सन २००१ च्या जननगणनेनुसार स्री पुरुष प्रमाण १००० ला ९३३ असे होते. ते आज वाढलेले दिसत आहे.
आज असे मुलींचे घटते प्रमाण. त्यातच मुली गर्भाच्या झालेल्या भ्रृणहत्या ह्या आज मुलांना मुली मिळतांना त्रासदायक ठरत आहेत. मुलांची आज संख्या जास्त असल्यानं व मुलींची संख्या कमी असल्यानं मुलींचे भाव आणि मुली असलेेल्या वडीलांचेही भाव वाढलेले असून आज मुली विवाह योग्य तरुणाला मिळत नाहीत.
ग्रामीण भागाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मुली जन्माचं प्रमाण १९९१ मध्ये ९७२ होते. ते २००१ मध्ये ९५९ झाले. कारण ग्रामीण भागात निरक्षरता व अंधश्रद्धा जास्त असल्यानं ग्रामीण भागात दिवसेेंदिवस मुली जन्माला घालणं कमी कमी होत गेलं. तसं शहरी भागात झालं नाही. शहरी भागात १९९१ मध्येे ८७५ व २००१ मध्ये ८७४ होते.
राज्याचा विचार केल्यास काही काही राज्याचे प्रमाण सांगावेसे वाटते. जसे १९९१ मध्ये केरळ ९३६, तामीळनाडू ९७४, महाराष्ट्र ९३४, मध्यप्रदेश ९१२, गुजरात ९३४, हरीयाणा ८६५, पंजाब ९९२, उत्तरप्रदेश ८७६,बिहार ९०७ असे स्रीजन्माचे प्रमाण होते. तेच प्रमाण २००१ मध्ये केरळ ९५६, तामीळनाडू ९८६, महाराष्ट्र ९२२, मध्यप्रदेश ९२०, गुजरात ९२१, हरियाणा ८६१, पंजाब ८७४, उत्तरप्रदेश ८९८, बिहार ९२१ होते. आता हा झाला प्रमुख राज्याचा मुलींचा जन्मदर. यामध्ये तसं पाहता सर्वच राज्यात मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. परंतू सर्वात जास्त मुलींचे कमी झालेले प्रमाण हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश मध्ये जास्त आहे. सध्या गुजरातही या रांगेत आहे. आता भारताचा एकंदर विचार केल्यास १००० जर पुरुष जन्म घेत असतील तर स्रीयाचाा जन्म सरासरी ९४० असा आहे. याचाच अर्थ मुली १००० मागे साठच्या सरासरीनं कमी होत आहे. या स्रीजन्माला दिल्लीतही सोडलं नाही. दिल्लीत हे प्रमाण ८६८ आहे.
आज याच प्रमाणावरुन मुलींच्या अत्याचारात वाढ झालेली असून मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना विवाहाला मुली मिळत नाही. मग काय अशी मुलं टोळ्या करुन ज्या राज्यात मुली जास्त असतात. त्या भागातून मुलींची तस्करी करतात. अशी तस्करी करीत असतांना त्यांना मुलींच्या वयाचंं बंधन नाही. त्या तस्करीत अगदी चार वर्षे वयाच्या कोवळ्या कळ्यांपासून तर अगदी पन्नास वर्षे वयाच्या महिलेपर्यंतच्या स्रियांचा समावेश होत असतो. अशी मुलींची तस्करी राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यासह इतरही राज्यात होते. परंतू त्यामध्ये वरील सात राज्ये आघाडीवर असल्याचे जाणवते. यासाठी काही काही दलंही सक्रीय असल्याचे दिसते. तसेच त्याला पोलिसांचं पाठबळही असल्याचं जाणवतं. आज महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये विवाहाच्या नावावर सर्रास मुली विकल्या जातात नव्हे तर दिल्ली, पंजाब, हरियाणा व राजस्थानसारख्या भागात फूस लावून मुली पळवल्या जातात. एवढंच नाही तर राजस्थान, हरियाणा व दिल्लीमध्ये वशीकरणासारख्या तंत्र विद्या वापरुन मुलींना वशमध्ये केलं जात असून वशीकरण ही जरी अंधश्रद्धा असली तरी तिचा राजरोषपणे वापर करण्यावर भर दिला जात आहे. आज या मुलींची तस्करी करुन पाहिजे त्या प्रमाणात त्यांचे शारीरिक शोषण करुन घेवून त्यानंतर या मुलींना जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकललं जातं. त्यातून पैसा कमवला जात आहे. त्यातच काही मुलींचे (वयस्क स्रीया) शारीरिक अवयव विकून त्यातूनही रग्गड पैसा कमवला जात आहे. जसे किडनी, यकृत, डोळे इत्यादी अवयव. शेवटी त्या अवयवाचं काम झालं की त्यांच्या मृत शरीराची योग्य विल्हेवाटंही लावली जाते. मात्र यात एेवढी काटेकोरता वापरली जाते की ती माहिती उघडकीस येत नाही. जसे मागील काही दिवसापुर्वीच्या काही राज्यातील घटना.
महत्वपूर्ण गोष्ट ही की माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी व मुलगाच वंशाचा वारस समजून मुलांचे गर्भलिंग परीक्षण केले. त्यातच मुलींचे भ्रूण दिसताच मुली गर्भीच्या हत्या झाल्या. त्यांनी त्याचा उद्या जावून कोणता परीणाम होईल याचाही विचार केला नाही. परंतू आज याच मुलींचे प्रमाण कमी झाल्याने व मुलांची संख्या जास्त असल्याने व विवाहाला मुली मिळत नसल्याने त्यांची जबरदस्तीनं तस्करी करुन वा त्यांच्यावर संमोहन (वशीकरण) करुन त्यांचं अपहरण तर केलं जातं.. परंतू यामध्ये ज्या स्रीयांची तस्करी होते. त्यांना जर लहान लहान मुलं असतील आणि त्यांचाही दोष नसेल तरी त्यांचंही नुुकसान होते. ज्यातून त्या मुलांचे वडील आपली शारीरिक कामना पुर्ण करण्यासाठी दुसरा विवाह करुन टाकतात नव्हे तर यातूून त्या मुलांचे हालहाल होतात. काही मुुले रस्त्यात लावारीससारखे भीक्षा मागतात. अशी मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडेही वळतात. काही मुले अनाथालयातही जातात. परंतू त्यांचा कोणीही विचार करीत नाहीत. हे तेवढंच सत्य आहे.

************************************************

अर्जून आपल्याला आपल्या मुलीशी बोलू देत नाही असा विचार करुन अनिता दिल्लीतून आली. ती काही दिवस शहरात राहिली. परंतू अनिताची मुलगी तिच्याजवळ नव्हती. तसा तिचा पतीही तिच्याजवळ नव्हता. ती एकटीच राहात होती. कधीकधी तिची आठवण तीव्र होत होती. तिला मुलगी आठवत होती. परंतू ती मुलगी तिच्याशी बोलेल तेव्हा ना. मुलगी म्हणत होती की जिनं माझं न ऐकता विवाह केला. ती माझी आईच होवू शकत नाही. तिनं फक्त आपलं सुख पाहिलं. माझं सुख पाहिलं नाही. त्यामुळं मी कधीच तिच्याशी बोलणार नाही वा तिचं तोंडही पाहणार नाही.
मुलीलाही आठवण येत असेल कदाचित. परंतू मुलगी ती आठवण ह्रृदयात दाबत होती. आपलं दुःख अंतर्मनात दाबत होती.
मुलीची येणारी आठवण........ त्यातच आता पती तिच्याजवळ नसल्यानं अनिता मुलीला मिळविण्यासाठी अर्जूनची तक्रार करायला पोलिस स्टेशनला गेली. म्हणाली,
"अर्जून मला मुलीला भेटू देत नाही. मी मुलीला जन्म दिला तरी. त्यानं माझी मुलगी हिसकून ठेवली. तो मुलीला माझ्याशी बोलूही देत नाही. त्याचा माझ्या मुलीला अति त्रास असून मला माझी मुलगी हवी आहे. तो ती देत नसेल तर त्याला आतमध्ये घाला."
अनितानं बोललेले वाक्य. त्यातच तिनं आठ दिवसापुर्वी धमकी दिली होती की ती पोलिस स्टेशनला जाईल व त्याची पोलिसांना तक्रार करुन त्याची नोकरी खाईल. परंतू अर्जून सत्यावर होता. त्याच्या बोलण्याचा अनिताला कदाचित त्रास होतही असेल कदाचित. परंतू ते तिच्या मुलीसाठी बोल होते. त्याला वाटत होतं की अनिता ही मुलीजवळच राहावी. तिनं मुलीला प्रेम द्यावं. पती करीत सुटू नये.
आज एखाद्या मुलाला सांभाळणे ठीक होते. परंतू मुलीला सांभाळणे कठीण होते. त्याला माहित होतं की ज्यावेळी चांगलं होईल, त्यावेळी लोकं त्याला चांगलं म्हणणार नाही. परंंतू काही वाईट झाल्यास नक्कीच दोषारोपण करतील. तसा त्यांचा रास्त होता. समाजात जगत असतांना अशा घटना स्वाभावीक होत्या.
अनिता पोलिसस्टेशनला गेली खरी. तिनं पोलिसांना तक्रारही केली खरी. परंतू पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. तिला दोन्ही बाजू ऐकविण्याची गोष्ट केली. त्यानुसार त्यांनी अर्जूनला बोलावलं. तसा अर्जून आपली पत्नी, तिची मुलगी घेवून पोलिसस्टेशनमध्ये आला व तिथे आपल्याबद्दलचं मत सांगू लागला.
"साहेब, मी नोकरी करणारा गृहस्थ. मला एक मुलगी व ही माझी पत्नी आहे. फिर्यादी माझी मेव्हणी आहे. माझा या दोघीत काहीच वाटा नाही. ही माझ्या पत्नीची बहिण आहे. ही सतत विवाह करीत फिरते व आपल्या मुलीकडं लक्ष न देता ती मुलगी माझ्याच घरी आणून ठेवते.मी मात्र माणूसकीच्या दृष्टीनं तिला ठेवतो. तिला सांभाळतो. यात माझं काय चुकतं ते सांगा. ही बाई ऐन मुलीच्या परीक्षेच्या वेळी दिल्लीला गेलेली होती. हिला विचारा की ही आतापर्यंत कुठे गेली होती?"
अर्जूननं पोलिसांना सांगीतलेली माहिती अगदी खरी होती. ती त्यांना पटली. तसे ते पोलिस म्हणाले,
"बाई, तू विक्षीप्त आहेस का? आपल्या मुलीचे पेपर सोडून त्या दिल्लीला कशासाठी गेली होती? अन् तू अगदी का चोरुन बसली होती? फोन उचलत नव्हती आणि मेसेजही."
"साहेब, हा मला नुसता त्रास देतो फोन आणि मेसेज करुन."
"हो, ठीक आहे तो बदमाश आहे. परंतू तू आमचेदेखील फोन उचलत नव्हती त्याचं काय?"
पोलिसांचे ते बोल. अर्जून गप्प राहून ऐकत होता. तशी काही वेळ गप्प बसून ती म्हणाली,
"साहेब, मला माझी मुलगी पाहिजे काहीही करा व मला मुलगी मिळवून द्या."
"ते आम्हाला सांगू नको. मुलगी जर यायला तयार असेल तर खुशाल घेवून जा."
पोलिसांचं तिला बोलणं. तशी ती मुलीला म्हणाली,
"चलते का माझ्याजवळ राहायला?"
"नाही. मी तुझ्याजवळ येवू शकत नाही. तू तुझा पती सोड. तू जेव्हा एक वर्षपर्यंत एकटी राहशील. तेव्हा येणार. तुला पती सोडावंच लागेल जर मी पाहिजे तर........."
मुलीचे ते शेवटचे बोल. तिला तिचा पतीच प्रिय होता. मुलगी तिला प्रिय नव्हती. तशी ती रडली व रडत रडत म्हणाली,
"पोरी, आजपासून तू मेली मला व मी तुला. आजपासून मी तुझी आई नाही व तू माझी मुलगी नाही. आजपासून तू तुझ्या मोठ्या आईकडंच राहा."
एवढ बोलताच ते ऐकणारे पोलिस म्हणाले,
"बाई, जिथे मुलगीच तुझ्याजवळ यायला तयार नाही. तिथे आम्हीही काहीच करु शकत नाही आणि तुला मुलगी हवीच असेल तर तू न्यायालयाचा दरवाजा ठोकू शकतेस.
अनितानं ते ऐकलं. पोरीचा लाड केला व रडत रडत ती रवाना झाली. आपल्या मुलीकडे मागे वळून न पाहता. मात्र या दरम्यान दोघीही रडत होत्या. परंतू लेकीला मायची व मायला लेकीची सोबत राहण्यासाठी दया येत नव्हती. अनिताला दोन दिवसाचा पती हवा होता. शारिरीक कामवासना पूर्ण करण्यासाठी. मुलगी हवी नव्हती. कारण मुलगी तिची ती कामेच्छा पूर्ण करु शकणार नव्हती.
अनिता घरी गेली. तिनं दोन तास काय केलं माहित नाही. परंतू काही वेळानं तिचा फोन आला. फोनची सुरुवात शिव्या देत झाली. तिच्या बोलण्यात रोष होता. जास्त राग अर्जूनवरच होता. ती म्हणाली,
"यालाच प्रेम म्हणावे काय?"
प्रेम आंधळं असतं........प्रेम आंधळं बनायला लावतं. हे खरंच आहे.
अलिकडे प्रेमाला फार महत्व आहे. कारण जीवनात प्रेम जर नसेल तर माणसं जगू शकणार नाहीत. ती जीवंत असली तरी त्यांची अवस्था मेलेल्या मुदड्यागत होईल यात काहीच शंका नाही.
आज जग प्रेमावरच आधारलेले आहे. प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे. परंतू आज प्रेम निःस्वार्थपणे करीत नाहीत लोकं. लोकं प्रेमाला स्वार्थाच्या कक्षेत मोजत असतात.
प्रेम काही एकाच प्रकारचं नसतं. प्रेम हे देवावरचं असू शकतं. प्रेम मायबापावरचं असू शकतं. बहिणीवरचं असू शकतं. तसेच एखाद्या मैत्रीणीवरचं असू शकतं. परंतू आपल्याला फक्त एकच प्रेम कळतं. ते म्हणजे आपलं प्रेयसीवरचं प्रेम. तेच जगात सर्वात मोठं प्रेम वाटत असतं माणसाला. जर ती मुलगी असेल तर तिला मित्राचं प्रेम आईपेक्षाही मोठं वाटतं. परंतू तेव्हा हे कळत नाही की ती किंवा तो आपल्या लायक आहे की नाही. प्रेमात अगदी आंधळं होवून आपण आपल्या हालचाली करीत असतो.
अशावेळी आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी आपली आई आपल्याला आवडत नाही. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारा आपला पिता आवडत नाही आणि निःस्वार्थ प्रेम करणारी आपली भावंडं आवडत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आवडतो तो प्रियकर आणि मुलाला आवडते ती प्रेयसी. तेच आपल्याला विश्व वाटतं. अर्थात ज्याप्रमाणे एखाद्या मासोळीला एखादा तलाव म्हणजे समुद्र वाटतो. अगदी तशीच व्याख्या प्रेयसी प्रियकरांची एकमेकांबद्दल असते. परंतू जेव्हा तलाव सुकतं आणि त्या मासोळ्या तडफडून मरतात. तशी अवस्था मायबापाचं न ऐकल्यानं या तरुण तरुणीची होते.
प्रेम हे आंधळं बनविणारं असतं. प्रेयसी आणि प्रियकर यात आंधळे बनत असतात. त्यांना इतर भागातलं काहीच दिसत नाही. दिसतं फक्त तिच्याबद्दलचं भाकीत आणि तिला त्याच्याबद्दलचं भाकीत. तो तिला मी आत्महत्या करील जर तू नाही मिळाली तर असं म्हणून विवश करीत असतो. तिही तशीच. दोघंही एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत असतात. मग यावर मायबाप कितीही सांगत असले. कोणी इतरही माणसं कितीही सांगत असले तरी ते आपल्याला वाईट सांगतात असंच वाटतं. तो वाईटही बोलत असेल, तरी त्याचं बोलणं तिला चांगलंच वाटतं. त्याची अवस्था तशीच.
एक प्रसंग सांगतो. दोन प्रेमविरांचा प्रसंग. हवं तर ही कथा आहे. या प्रसंगात प्रियकर म्हणतो,
"मी तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो." तशी प्रेयसी म्हणाली,
"जर तू माझ्यावर जीवापाड प्रेम करीत असशील तर एक काम करशील?"
"कोणतं?"
"आपला विवाह होण्यापुर्वी मला तुझ्या आईचं ह्रृदय हवं. बोल, आणशील का? ते आणल्यावरच आपण विवाह करु."
मुलगा प्रेमात आंधळा. तो तिला ती काय बोलत आहे हे समजू शकला नाही. ते ऐकताच तो ताबडतोब घरी गेला. त्यानं आईचा खुन केला. तसं ह्रृदय काढलं व ते हातात घेवून तो चालू लागला. वाटेल त्याला एक ठोकर लागली. तसं त्याला खरचटलं. त्याला थोडफार लागलं व तो वेदनेनं विव्हळू लागला. तसं ते ह्रृदय म्हणालं,
"बाळ, काही लागलं तर नाही."
ते ऐकताच बाळाला काही वाटलं नाही. कारण तो प्रेमात अगदी आंधळा झाला होता. तसा तो ते ह्रृदय घेवून प्रेयसीकडे आला. म्हणाला,
"हे घे ह्रृदय, तुझ्यासाठी मी माझ्या आईचं ह्रृदय आणलं." तशी ती म्हणाली,
"नको मला तुझ्या आईचं ह्रृदय अन् नको मला तुझं प्रेम. जो व्यक्ती माझं प्रेम मिळविण्यासाठी आपल्या आईची हत्या करु शकते. तो व्यक्ती उद्या माझ्याहीपेक्षा सुंदर मुलगी मिळाल्यास माझीही हत्या नक्कीच करील."
ती प्रेयसी असं म्हणताच त्याला सोडून जाते. महत्वाचं म्हणजे आज त्या मुलाजवळ काही नाही राहात. त्या मुलाची अवस्था ही तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं, अशी होते. शेवटी तो पश्चाताप करतो. परंतू आता त्याला धड आई दिसत नाही आणि प्रेयसीही मिळत नाही.
आज समाजात प्रेमविरांची अवस्था काहीशी अशीच असलेली दिसते. आईचं प्रेम मिळविण्यासाठी प्रत्यक्ष विष्णूनं पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्यातच त्यांचे पुराणात वेगवेगळे अवतार दिसतात. कोणी त्याला भाकडकथाही समजतात. परंतू आज समाज त्या गोष्टीला मानत नाही. आज समाजात प्रेम म्हणजे निव्वळ वासनेची भावना तृप्त करणारी यंत्रणा वाटते. मायबापापेक्षा वा इतर प्रेमापेक्षा प्रेयसीचं प्रेम मोठं वाटतं. त्या गोष्टीसाठी ते सर्व सोडायला तयार होतात. कधी आम्ही एकमेकांना जीवंतपणी नाही मिळू शकत तर मेल्यानंतर असं समजून ते आत्महत्येचा मार्ग पत्करतात. शेवटी त्यांचं काय जातं. जातं फक्त त्यांच्या परीवाराचं. ज्या परीवारातील ते सदस्य असतात.
अलिकडं मुलींची संख्या कमी आहे. या काळात तर प्रेम मिळवणं कठीण गोष्ट बनली आहे. तेव्हा आजच्या काळात असं प्रेम मिळविण्यासाठी वशीकरणासारखे मार्ग वापरले जातात. नव्हे तर ब्लैकमेलिंगचे प्ररार वाढलेेले आहे. तू मला जर मिळाली नाही तर मी आत्महत्या करणार.. तुला फसवणार इत्यादी गोष्टी आज सुरु आहेत आणि एकदा का ते प्रेम मिळालं की बस त्यानंतर तिला वासनेची शिकार केलं जातं. ही वासना तृप्त झालीच की तिचा व्यापार केला जातो. अगदी देहाचा व्यापार. ती भविष्यात सुखी राहात नाही. ती तोही मार्ग स्विकारते. कारण ती मायबापापासून तुटलेली असते.
महत्वपूर्ण गोष्ट ही की यालाच प्रेम म्हणावं काय? असा प्रश्न पडतो. कारण अशा प्रेमातून काही साध्य होत नाही. मिळते फक्त नैराश्य. ज्य नैराश्येतून मार्ग निघत नाही आणि ब-याचदा जो मार्ग निघतो. तो निव्वळ मृत्यूचा मार्ग असतो वा क्लेष देणारा मार्ग असतो. म्हणून प्रत्येकानं प्रेम करण्यापुर्वी सावधान असावं. खरं प्रेम विवाहापुर्वी होतच नाही. विवाहानंतरच होते. विवाहापुर्वीचं प्रेम हे धोक्याची सुचना असते. यशस्वी जीवनाचा श्रीगणेशा नाही. म्हणूनच प्रेम जर करायचंच असेल तर विवाहानंतर करावं, विवाहापुर्वी नाही. याबाबत आपण सखोल विचार करावा. हे तेवढंच खरं आहे.
'माझी मुलगी मला पाहिजे' ही एका आईची आर्त हाक. परंतू आज मुलगी तो तिला द्यायला तयार नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं.
अनिता तिचं नाव. अनितानं तिला जन्म दिला होता. त्या परीस्थीतीत. ज्या परीस्थीतीत तिच्याजवळ पैसा नव्हता. तिचा पती कमवता नव्हता नव्हे तर तिनं विचार न करता निकम्मा पती निवडला होता.
अनिताचा जिचा चांंगला होता. चांगल्या पोस्टींगवर होता. त्याला चांंगले लोकं ओळखत होते. तसा तो इज्जत सांभाळून होता.
अनितानं आपल्या जीवनात बरेच पती केले होते. परंतू एकाही पतीनं तिला सांभाळलं नव्हतंं. तसेच सुखंही दिलं नव्हतं.
अर्जूनचा काय रिश्ता होता तिच्यासोबत ते अर्जूनला कळत नव्हतं. परंतू अर्जून तिच्यावर निरतिशय प्रेम करीत होता नव्हे तर अर्जूनच्या डोक्यातून ती काही केल्या जात नव्हती. अर्जून बेचैन होता. त्याला एक एक दिवस कापणं कठीण होत होतं. तशी अनिताला जी एक मुलगी होती. तिला सांभाळत असतांना तिला विचार यायचा की तिच्या मुलीला सांभाळायचं कसं? कारण आज एक एक दिवस कठीण जात असतांना एवढे दिवस कसे काढता येईल. तशी अनिताची मुलगी लहान होती.
अनिता पोलिस स्टेशनमधून घरी परत येताच तिचा मुड आफ झाला व ती त्यालाच नाही तर त्याची जी आई मरण पावली होती. त्या आईचा दोष नसतांनाही त्याला शिव्या देत होती. तसं तिचं तिच्या दृष्टिकोणातून बरोबर होतं. कारण ती मुलगी आजपासून तिला भेटणार नव्हती.
दोनचार दिवस झाले होते. तशी तिच्या आईला मुलीची आठवण येत होती. जगणं कठीण जात होतं. परंतू ती सर्व मनातल्या मनात सहन करीत होती. तसा अर्जूनही त्रस्त होता. त्याला वाटत होतं की तो चुकत असून त्याच्या हातून काहीतरी पाप नक्कीच घडत आहे. तसा तो मुलीला म्हणाला,
"बेटा, आज तुझ्या आईला भेटायला जावू. तुझी आई तुला भेटायला हवी. तसं तूही तुझ्या आईला भेटायला हवं. जर तू तुझ्या आईला भेटणार नाही ना. तर ती जगूच शकणार नाही. कदाचित ती डिप्रेशनमध्ये जावू शकते."
अर्जूनच्या म्हणण्यानुसार अनिताची मुलगी तिला भेटायला तयार झाली.
ते अनिताचं घर. अनिता घरीच होती. अर्जूननं तिला नेलं होतं तिच्या आईशी भेटायला. तसं अर्जूननं सांगीतल्यानुसार ती मुलगी आपल्या आईशी बोलली. तशी ती म्हणाली,
"मम्मी, किती बारीक झाली आणि किती काळी पडली. काय जेवत वैगेरे नाही का तू?"
तशी तिची आईही बोलली,
"जेवते बाळ. तू ही जेवत चल."
दोघींचं बोलणं. ते माता पुत्र प्रेम. अर्जूनला अगदी गहिवरुन आलं होतं. परंतू ते प्रेम चेह-यावर न दाखवता अर्जून त्या माता व पुत्रीला सोडून दूर परतला. त्यातच ती माता व ती पुत्री अगदी निर्भीडपणे बोलू लागली.
प्रेमाचा छंद बरा नाही असं अनेकांना वाटतं. ते तसं खरंही आहे. ब-याचशा स्रिया या भोळ्याभाबड्या असतात. कोणी गोड गोड बोललं की अगदी सहजच विश्वास ठेवून पुढील वाटचाल करीत असतात. त्यांना सहजपणे कोणीही फसवू शकतं. याला काही अपवादही असतात.
आज ब-याचशा तरुण मुली बिघडतात तर कधी जाणूनबुजून बिघडवल्या जातात. त्याचं कारण आहे मुलींची संख्या.मुलींची संख्या साधारणतः कमी आहे. ही संख्या ज्या राज्यात कमी आहे. त्या राज्यातील तरुण भुंगे ज्या राज्यात मुली जास्त आहेत, त्या राज्यात येवून अशा कोमल फुलरुपी तरुणीवर झडप घालत असतात. त्यांच्यावर स्वार्थी प्रेमाचा वर्षाव करतात. त्यांना जाळ्यात ओढतात. मग काय, त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार तर करतातच. व्यतिरीक्त त्यांना त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की विकूनही टाकत असतात. असे बरेचदा घडले आहे..टिव्हीवरील सावधान इंडीया, क्राईम पेट्रोल मधून सारंच सत्य दाखवलं जातं. तरीही तरुण तरुणींचे डोळे उघडत नाहीत. आजचं प्रेम हे स्वार्थी असून असा छंद जोपासणं योग्य नाही.
आज लोकं प्रेम करीत असतात. आणाभाका टाकत असतात. त्यातूनच कधी दोघांचं प्रेम होत असतं. मग ते एकमेकांशी बोलत असतात. सारखे व्यस्त असतात फोनवर. त्यानंतर असं सारखं फोनवर बोलता बोलता त्यांच्यात वितुष्ट निर्माण होते व दोन जोडीदारांपैकी एकाच्या मनात संशय निर्माण होतो. ही संशयात्मक वृत्ती वाढीस लागते. त्यातूनच त्या प्रेमाची परीयंती एकतर्फी प्रेमात होते.
एकतर्फी प्रेम चालत असतं दोघांचं. कधी तो तिला टाळतो. परंतू तिचं त्याचेवर जीवापाड प्रेम असतं. कधी ती टाळते. परंतू त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम असतं. यातूनच त्यांचं तेे प्रेम वृद्धींगत होत जातं. ते एवढं वाढतं की त्याला जगावंसं वाटत नाही. कारण तिच्याकडून रिस्पांन्सच नसतो कोणताही. शेवटी यात कोणालाही भाव न मिळत असल्यानं या प्रकरणात एकाचा मृत्यू होतो.. कारण एकजण या एकतर्फी प्रेमात आत्महत्या करतो.
आजचं प्रेम असंच आहे. निव्वळ आजच्या काळात प्रेम हे स्वार्थासाठी निर्माण झालंंय. आज खरं प्रेम राहिलेलं नाही. खरंं प्रेम असं असतं. ज्यात प्रेमी प्रेमींचे सुख शोधत असतो. त्याचं जर खरं प्रेम असेल, तर तो आपल्या मनात वासना ठेवत नाही.या ख-या प्रेमात प्रेमवीर तिचं जर दुस-यावर प्रेम असेल तर तेही स्विकारत असतो.
आज प्रेमाच्या या प्रकारात डर चित्रपटासारखं दृश्य दिसतं. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि सनीचं एकाच प्रेयसीवर प्रेम दाखवलंं आहे. ते प्रेम जुहीवर आहे. परंतू जुही सनीवर प्रेम करते. शाहरुखवर नाही. शाहरुख मात्र शेवटपर्यंत तिच्यावर प्रेम करीत असतो. आजचं प्रेम असंच आहे. ज्याला ते प्रेम मिळतं. तो नशीबवान असतो. त्याला प्रेमाची किंमतच कळत नाही आणि ज्याला ते मिळत नाही. त्याला प्रेम म्हणजे काय ते कळतं. त्याचा खरा अर्थ कळतो. एवढंच नाही तर तो निस्वार्थपणे ख-या स्वरुपाचं प्रेम करीत असतो.
आजच्या प्रेमाला मुळ सुरच गवसत नाही. एक व्यक्ती दुस-यावर प्रेम करते. परंतू ती व्यक्ती त्याचेवर प्रेम न करता दुस-याच व्यक्तीवर करते. तोही व्यक्ती तिच्यावर प्रेम करण्याऐवजी दुस-यावर करते.
आजच्या ब-याच प्रेमामध्ये वासनेनं शिरकाव केलेला आहे. आजच्या प्रेमाचा अर्थच मुळात लोकांनी वासना हाच घेतलेला आहे. ही वासना पूर्ण करण्यासाठी लोकं प्रसंगी आपली मुलंबाळं, आपले मायबाप, आपले भाऊबहिण सोडून जातात. त्यातच वासना पूर्ण झाल्यास ह्याच मंडळींपैकी काही काही परत येतात. काही मात्र आत्महत्या करतात. काही काही तरुण तरुणी प्रेमाला वासनेचाच रंग चढवतात. ते तर स्वतः आपलं प्रेम व्यक्त करतांना म्हणतात की मी तुझ्यावर फक्त तुझ्या विवाहापर्यंत प्रेम करेल. याचा अर्थ काय? याचाच अर्थ वासना....... मी आणि तू तुझ्या विवाहापर्यंत प्रेम करु. वासनाही पूर्ण करु. म्हणजे तू आणि मी. विवाह करु नये. याचाच अर्थ असा की विवाह करतांना तू माझा विचार करु नकोस. कारण मला माझ्या जातीत विवाह करायचाय. जात बंधनं पाळायचीय. तुझ्याशी विवाह करुन जातीबंधनं तोडायची नाहीत.
वयात येताच मुलींना आज अतिशय जपण्याची गरज आहे. मुली अठरा वर्षाच्या झाल्या की कायद्यानं तिला बंधनमुक्त केलेलं आहे. ती आपला निर्णय स्वतः घेवू शकते. तिला स्वतः स्वतःच्या मर्जीनं विवाह करता येतो. परंतू ते अठरा वर्षाचं वय म्हणजे ती विचारानं परीपक्व झालेली नसते. तिला अठरा वर्षे वय झाल्यावरही बरोबर जोडीदार निवडता येत नाही. यात ब-याच मुलींची फसगत होते.
विवाहयोग्य वर निवडतांना काही काही मुलींना योग्य वराची निवडच करता येत नाही असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरत नाही. याबाबत एक प्रसंग सांगतो. अनिताचा पती मरण पावताच तिनं ऐन बेचाळीसव्या वर्षी विवाह केला. यावेळी तिच्या बारा वर्षाच्या मुलीचा विरोध असतांना व तिचे शाळेचे पेपर सुरु असतांनाही तिच्या परीक्षेची चिंता न करता तिचा पुनर्विवाह. हा हास्यास्पद विषय आहे. तरीही तिचा विवाह.......तिला जर अक्कल असती तर तिनं मुलीचं ऐकलं असतं. त्यातच तिनं मुलीच्या परीक्षेचं नुकसान केलंं नसतं.
आज बरीचशी अशीच प्रकरणं आहेत की ज्यात महिला आपल्या मुलांचे नुकसानच करीत असतात. यात अचानक पती पत्नींचे वाद होतात. पत्नी पतीला सोडून माहेरी जातात. मग मधातच त्या आपल्या मुलाबाळांच्या शाळेची चिंता न करता त्यांना अगदी लहानच वयात जबरदस्तीनं त्या मुलांना माहेरी घेवून जातात. परंतू यात त्यांचं एवढं चुकतं की त्यात मुलांच्या अभ्यासाचं नुकसानच होतं.
ब-याचशा मुली बिघडतात. त्याचा प्रसंगही सांगतो. तो प्रसंग असा. एक मुलगी आपल्या चांगल्या स्वभावाच्या मैत्रीणीला घेवून आपल्या बायफ्रेंडला भेटायला गेली. ती त्या बायफ्रेंडसोबत कम-यात शिरली. मैत्रीण बाहेर उभी होती.
काही क्षणभर मैत्रीण उभी राहताच तिच्याही वासनेच्या भावना उफाळून आल्या. काही वेळातच एक तरुण आपल्या मित्राला भेटण्याच्या बहाण्यानं तिथे आला. त्यानं आपल्या त्या मित्राच्या घरी तिला पाहिलं. तसा तो हाय हल्लो करीत बोलला. मग काय, त्याच दिवशी तिनं वासनेचा करार केला. शेवटी काय, ते त्यांच्या विवाहापर्यंत वासना पूर्ण करीत राहिले. मुलगी श्रीमंत होती. तिनं त्याला पैसा देवून त्याचं जीवनच एकंदर बदलवून टाकलंं होतं.
मुळात प्रेम करावे. ते प्रेम करायला मनाई नाही. परंतू ते प्रेम द्वितर्फी असावं. एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करु नये. तसेच सर्व प्रकारचे छंद परवडले. परंतू प्रेमाचा छंद परवडत नाही. तसेच प्रेम हे मतलबासाठी करु नये. तसेच प्रेमातून आत्महत्या; असं प्रेम करताय असं म्हणण्याची पाळी कुणावर येवू नये म्हणजे झालं.

***********************************************
दुसरा भाग

दोन तीन दिवस झाले होते. अनिताला सारखी तिच्या पतीची आठवण येत होती. ती पाचपाच मिनीटांनी त्याला फोन लावायची. तसा कधीकधी तोही फोन लावायचा. त्यातच एकदा घरी पाहूणे आले होते. तेव्हाही ती पाहूण्यांशी न बोलता मोबाइलवरच बोलत बसली होती. तसतसा अर्जूनला तिचा राग येत होता.
आज तिच्या पतीचा तिला फोन आला होता. त्याचं नाव शरद होतं. त्याचा फोन येताच अर्जून तिला म्हणाला,
"मला फोन दे. मी त्याचेशी बोलतोय."
अर्जूननं तसं म्हणताच अनितानं अर्जूनला फोन दिला व अर्जून तिला तो फोन ऐकविण्यासाठी त्याच्याशी बोलत बसला. तसा अर्जून म्हणाला,
"हैलो, मै बोल रहा हूँ।"
"आप कौन?"
"अनिता का जिजा."
"बोलो, क्या बात है?"
"देखो, अनिता की बच्ची छोटी है। आप उसे दिल्ली बुलाने की बजाय आप यहाँपर ही क्यो नही आते? आप यहाँपर आओ और जबतब उसकी बेटी की शादी नही होती, तबतक रहो। बाद में दिल्ली शहर आपका ही है।"
शरदनं अर्जूनचं बोलणं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"आप उसे ही समजाईये। वह मानती ही नही है। कहती है मै यहा आना चााहती हूँ। मेरी टिकीट करवा दो। उसे समजाईये की वही आयेंगे।-अभी फिलहाल यहाँपर काम है। जब काम खत्म होगा। मै स्वयं ही आ जाऊँगा। तब तक राह देखो कहना।"
मोबाइल वर बरंच बोलणं झालं. तसा अर्जूननं आता बोलणंं बंद करुन तो फोन अनिताजवळ दिला. तसं अनिताचं बोलणं बंद होताच तो तिला उपदेश करु लागला. परंतू अनिता ऐकेल तेव्हा ना. तिच्यावर प्रेमाचा भूत आरुढ झाला होता.
प्रेमाचं भूत आरुढ होवू देवूू नका. उतरवणं जरा कठीण जातं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. प्रेमाचं ते भूत........सगळ्यांवर आरुढ होत असतं. हे भूत वय, काळ काही पाहात नाही. ते एवढं आरुढ होतं की त्या प्रेमवीरांना कळतही नाही की ते काय करतात. याबाबत एक प्रसंग सांगतो.
अनिता अशीच मुलगी. आज बेचाळीसवं सुरु होतं. आज प्रेम करता करता ती बेचाळीसच्या वयात पोहोचली. त्यातच या बेचाळीसच्या वयात अनितानं आपला पती व आपली एक मुलगी सोडून पुन्हा आपली लैंगीकता दूर करण्यासाठी दुसरा व्यक्ती प्रेम करण्यासाठी पकडला. त्यातच ती आपल्या मुलीला विसरुन ती वाहवत चालली होती. अशातच तिला परीवारवाले समजवायचे. काही चांगल्याही गोष्टी सांगायचे. परंतू या चांगल्या गोष्टी तिला काही समजत नव्हत्या. काय करावं हे आता तिच्या परीवारवाल्यांना कळत नव्हतं. परीवारवाल्यांनी तिच्या मुलीला तर ठेवून घेतलं. परंतू तिला मोकळी केल्यानं अजून एक वाद तयार झाला.
अनिता आपल्या मुलीला घेवून न जाता ती एकटीच रासलीलेला गेली. त्यातच तिला तिच्या प्रेमवीरांनं पैशाची मागणी केली. त्यासाठी तिच्याशी गोड गोड बोलत राहिले. प्रेमात वेडी झालेली अनिता आपल्या जवळ होता नव्हता, तो सर्व पैसा त्या प्रेमवीरांला दिला.त्यानं पैशासाठी विवाह केल्यानं तिला शब्दाच्या बाहूपाशात घेवून तिला पैशानं बरबाद करुन टाकलं. शेवटी तिच्याजवळचा पैसा संपताच तो प्रेेमवीर तिला मुलीला आणण्यासाठी तकादा लावत असतांना तिनं स्पष्ट नकार दिला. त्यातच ती ब-या बोलानं ऐकत नाही हे पाहून त्यानं तिला मुलगी. आणण्याविषयी जबरदस्तीही केली. परंतू तिनं त्यावर स्पष्ट नकार देताच शेवटी तो प्रेमवीर आपले रंग दाखवू लागला.
त्या प्रेमवीरांला तिची मुलगी हवी होती. कारण ती तरुण होणार होती. ती तरुण होताच तिला वासनेची शिकार बनवायचे होते त्यांना. परंतू अनितानं नकार देताच त्यानं रंग दाखवला. त्यासाठी आता तो कुवैत. कम-यात बंद करुन ठेवू लागला. त्यातच तिच्या शरीराचा ठाव घेण्यासाठी वेगवेगळी पुरुष मंडळी तिच्या कम-यात पाठवून तिच्यावर अत्याचार करु लागला. त्यातच तो प्रेमवीर पैसाही कमवू लागला. ती माणसं कम-यातून जाताच तिला मुलगी आण असे म्हणू लागला. परंतू आज तिला तिच्या कर्माची जाणीव होवू लागली. त्यातच तिनं निर्धार केला की आता काहीही झाले तरी आपली मुलगी आणायची नाही.
अनिताचा मोबाइल फोन तिच्या परीवारवाल्यांकडेही होता. तो प्रेमवीर ती जीवंत आहे हे दाखविण्यासाठी तिला कधीकधी फोन देत असे. ती परीवारवाल्यांशी. मनमोकळेपणानं बोलत असेे. परंतू बोलतांना तिनं आपल्या वेदना परीवारांना कधीच सांगीतल्या नाहीत. कारण तिला वाटत होतं की परीवारवाले चिंतेत पडतील. तशी त्यांची धमकी देखील राहायची.
आज प्रारब्ध अनिताचं खराब होतं की कुणास ठाऊक. त्या प्रेमवीरांला मुलगी न मिळाल्यानं त्याचं मानसिक संतुलन ढासळलं होतं. त्यातच आज तिला त्यानं दिवसभर जेवन दिलं नाही. परंतू पैसा कमविण्यासाठी तिच्या कम-यात दिवसभर माणसं पाठवली. शेवटी रात्रीही जेवन खावण न देता पाचसहा जणांनी तिचे हातपाय बांधून ठेवून तिच्यावर पाशवी बलत्कार केला. त्यातच ती बेशुद्ध पडली.
अनिता बेशुद्ध पडताच प्रेमवीराचीही शुद्धी जाग्यावर आली. ह्रृदयाचे ठोके वाढले. थोडी भीती वाटली. आता जर ती शुद्धीवर न आल्यास आपण हिला सांंभाळू शकणार नाही असंही त्याला वाटलं. शेवटी रुग्णालयात नेलं तर आपलंही बिंग फुटेल असं त्याला वाटलं. शेवटी त्यानं ठरवलं की हिचा जीव घ्यायचा आणि मुंडकं दुुसरीकडं गाडायचं व प्रेत दुसरीकडे. त्यानं त्या बेशुद्धावस्थेत तिची मान कोंबडं कापल्यागत धडापासून वेगळं केलं. शेवटी ते मुंडकं धडापासून वेगळं होताच त्यानं ते प्रेत जमीनीत पुरलं व मुंडकंही जाळून टाकून पुर्ण पुुरावा नष्ट केला. त्यानंतर त्यानं ते गाव सोडलं व दुस-या दूर अशा गावात येवून राहू लागला.
परीवारवाले पुर्वीसारखेेच आताही फोन करु लागले. परंतू ती काही फोन उचलत नव्हती. परीवारवाल्यांशी बोलत नव्हती. आज तिच्या मृत्यूनंतर तीन चार महिने झाले होते की ती बोलली नव्हती. मात्र ती नेहमीच ऑनलाइन दिसत होती. मेसेज पाठवीत होती. पाहात होती. त्यावर विचारले असता उत्तर देत होती. ते पाहून परीवारवाल्यांना शंका आली की ती जीवंत नसेल. शेवटी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार टाकली. तक्रारीत निष्पन्न झालं की ती तीन चार महिण्यापुर्वी मृत झालेली असून तिचा मोबाइल जीवंत आहे. शेवटी शहानिशा केली गेली व मोबाइलच्या लोकेशनवरुन त्यालाही पकडण्यात आले.
विशेष सांगायचं म्हणजे प्रेम सगळेच करतात. लहान मोठे सगळेच. प्रेम जर नसेल तर जगताही येत नाही. सर्वांना जीवन जगण्यासाठी प्रेम हवं असतं. परंतू प्रेम करणा-या माणसांना आपण ओळखायला हवं. इथं जवळचाच व्यक्ती धोकादायक ठरतो. तिथे अनोळखी व्यक्तींबाबत काय सांगावं. अनिता ओळखीच्या व्यक्तीसोबत पळून गेली नाही. त्यातच तिचं चुकलं. जर ओळखीचा नात्यातील व्यक्ती असता तर अनिता मरण पावली नसती वा तिच्यावर सामुहिकपणे बलत्कार झाला नसता व ती बेशुद्ध पडली नसती वा तिचा खुनही झाला नसता त्यानंतर.
प्रेम करायलाा मनाई नाही. प्रेम करु शकता. कुणावरही करु शकता. परंंतू ज्या प्रेमाचा अंत असा अनितासारखा होईल असे प्रेम कोणीही करु नये. अनोळखी माणसं नक्कीच दहाबाजी करतात. काही ओळखीची माणसंही अशी दगाबाजी करु शकतात. तेव्हा अशा व्यक्तींवर प्रेम करायचं झाल्यास टाळा. माणसं ओळखा. ओळखायला शिका. आपला स्वभाव बदला आणि हं, माणसं जर ओळखता येत नसतील तर आपल्या मायबापांना सांगा त्या व्यक्तींबाबत. मित्रांना सांगा आणि नातेवाईकांना. ते जर होकार देत असतील तरच पुढचं पाऊल टाका. तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्यासाठी चुकीचं ठरु शकते. तेच पाऊल कधीकधी चांंगलंही ठरु शकते. म्हणून पाऊल टाकण्यापुर्वी सावधानता बाळगा. संयम ठेवा. वेळ तुमचीच आहे. तुमच्यासाठीच आहे. तुमचे वडीलधारी तुम्हाला चुकीचं कधीच सांगणार नाही. कदाचित त्यांचं ऐकून जर संसार थाटलाच तर तो संसार सुव्यवस्थीत व चांगला होवू शकतो हे मात्र निश्चीत.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की प्रेम करा. परंतू ते करतांना अनोळखी माणसं निवडू नका. सर्वात जास्त दगाबाजी अनोळखीच माणसं करीत असतात हे लक्षात घ्या. प्रेम अवश्य करा. परंतू त्या भुताला स्वतःवर आरुढ होवू देवू नका. जर का ते प्रेमाचं भूत एकदा का आरुढ झालं की त्याला उतरविणं कठीण होवून जातं हे लक्षात घ्या.

************************************************

आज आलिशाचा विवाह झाला होता. ती श्रीमंत कुटूंबात पडली होती. तिचा पती खुप चांगला होता. तिच्यावर निरतिशय प्रेम करीत होता. तसं पाहता ज्या चक्रव्युहात अनिता पडली होती, त्या चक्रव्युहात आलिशा फसली नव्हती.
आलिशानं समाजात, रितीरीवाजानं विवाह केला होता. तिचा विवाह अर्जूनच करुन दिला होता. तसं पाहता ती अर्जूनच्या मतानुसार चालली होती नव्हे तर त्यानं आपलं जीवन सुखी बनवलं होतं. तिनं समाजात विवाह केला. कारण तिला आपल्या आईची आपबीती माहित होती.
अर्जूनही म्हातारा झाला होता. त्याचबरोबर संगीताही. त्यानं आलिशाला लहानाचं मोठं केलं होतं. आज ती अर्जूनला मानत होती. कारण अर्जूनचे उपकार तिच्यावर होते.
काही दिवसानं आलिशाला पुत्री झाली. सर्वांना आनंदीआनंद झाला. तसा अर्जूनलाही झाला. तसा नामकरण सोहळा उजळला. बाळाचं नाव काय ठेवावं यावर विचारविमर्श करण्यात आला. तसा अर्जून म्हणाला,
"आपण हिचं नाव अनिता ठेवूया. कारण अनिता आलिशाच्या जीवनातून अकालीच मरण पावली. तिचं प्रेम आलिशाला मिळालं नाही. ते प्रेम मिळावं, म्हणून आलिशाच्या पोटी अनितानं जन्म घेतलाय. आलिशा तिचं नाव अनिताच ठेव."
अर्जूननं केलेली गोष्ट अालिशाला पटली. आलिशानं अर्जूनच्या मतानुुसार तिचं नाव अनिता ठेवलं. आज अर्जूून आलिशाच्या मुलीला खेळवू लागला. लाड करु लागला. परंतू त्याला अनिताची जेव्हा आठवण येत होती. तेव्हा मात्र जीव कासावीस होत होता.
अनिताला खेळवता खेळवता व जुन्या अनिताची आठवण करता करता अर्जून दिवसेंदिवस खंगत गेला. आलिशाच्या पोटी अनिता झाल्यापासून त्याची आठवण तीव्र होत गेली. तसा त्या आठवणीत जगता जगता लवकरच अर्जून मरण पावला. तोच महिना आलिशाला सामावला व आलिशाला लवकरच पुत्र झाला.
आलिशाला पुत्र झाला खरा. त्याचंही नामकरण करायचं ठरवलं. सर्वांनी वेगवेगळी नावं ठेवली. तशी आलिशा आपल्या पतीला म्हणाली,
"हेच माझे बडे पप्पा आहेत. जे माझ्या आईला चाहायचे. निरतिशय तिच्यावर प्रेम करायचे. तिनं सुधारावं म्हणून प्रयत्न करायचे. परंतू माझी आई काही केल्या सुधारली नाही. शेवटी ती मरण पावली. त्यानंतर मला लहानाची मोठी माझ्या याच पप्पानं केलं. माझ्या या पप्पाची इच्छा होती की अनितानं सुधारावं व त्याच्याजवळ राहावं. परंंतू अनिता सुधारली नाही.
आज अनिता माझ्या घरी माझी पुत्री म्हणून अस्तीत्वात आहे. मला वाटते अनितानं आपली इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी पुनर्जन्म घेतलाय. तसा माझ्या बड्या पप्पानं म्हणजेच अर्जूननही जन्म घेतलाय. तेव्हा माझ्या या बाळाचं नाव अर्जून ठेवावं. ज्याप्रमाणे मला माझ्या आईची गरज आहे. तशी मला माझ्या पप्पाचीही. मी माझ्या स्वतःच्या पप्पाला तर कधीच पाहिलंं नाही. परंतू मी अर्जूनला पाहिलं. तोच अर्जून माझा मम्मी पप्पा ठरला. त्याची इच्छा होती मम्मीसोबत राहायची. मी या माझ्या पुत्राचं नाव अर्जूनच ठेवणार आणि आपणही तशी मला परवानगी द्या."
आलिशाचा पती काय समजायचं ते समजला. तो तसा आलिशावर फारच प्रेम करायचा. तशी त्यानं स्विकृती दिली.
आज अर्जून व अनिता सोबत सोबत भाऊबहिण म्हणून राहात होते. आपले सुख दुःख सांभाळून लहानाचे मोठे होत होते. अनिताची इच्छा पूर्ण झाली होती. त्याचबरोबर अर्जूनचीही. कधीकधी अर्जून व अनिता जेव्हा एकमेकांशी भांडत. तेव्हा आलिशा ते दृश्य पाहात असे. तेव्हा तिला बालपणीची आठवण येत असे व अनिता आणि अर्जूनचं भांडण आठवत असे. काही वेळानं अनिता व अर्जूनचं भांडण शांत होताच तिला तिच्या बालपणीचाही प्रसंग आठवत असे. तिच्या बालपणीही अनिता व अर्जून असेच एकमेकांशी भांडत व क्षणातच ते भांडण विसरुन जणू असे वागत की त्यांचं कधी भांडणच झालं नसावं.
आज अनिता व अर्जून लहानाचे मोठे होवू लागले. त्याचबरोबर आलिशाच्या आठवणी जीवंत होवू लागल्या. एक एक प्रसंग तिला आपल्या आईची आठवण देत होता. त्याचबरोबर अर्जूनचीही. आज अर्जूनचीही इच्छा पूर्ण झाली होती. तिच्यासोबत राहण्याची. तशी अनिताचीही. मात्र गतकाळातील अर्जूनला अनिताच्या कृतकृत्याची आठवण नव्हती. तशी अनितालाही. दोघेही अतिशय आनंदात राहात होते.
झाडाची पानं गळली होती. तशी आज झाडाला थोडी पालवी फुटली होती. नव्हे तर झाडावर बहार आला होता. आज असाच बहार आलिशाच्या जीवनातही आला. बिचा-या आलिशाला अनिता जीवंत असतांना आईचं प्रेम मिळाले नाही. परंतू ती मरण पावल्यानंतर आज आलिशा तिच्या जीवनात बहार घेवून आली. जेव्हा जेव्हा आलिशाला अनिता तसेच अर्जूनची आठवण यायची. तेव्हा तेव्हा ती अनिता व अर्जूनला खेळतांना पाहात असे. तेव्हा तिला अतिशय आनंद होत असे. तशी गतकाळातील आठवणंही तिला येत असे. तेव्हा तिचं ह्रृदय भरुन येत असे आणि ती आपल्या डोळ्यात अश्रू आणत असे. ते तसे अश्रू येताच अनिता व अर्जूून तिच्याजवळ येत. तिला रडण्याचं कारण विचारत. तेव्हा ती त्यांना जवळ घेत असे. अंगाशी लावत असे व गतकाळातील आठवणी काढून मस्त मनसोक्त रडत असे. तेव्हा अनिता व अर्जूनही तिचे अश्रू पुसत असे व म्हणत असे की काय झाले. तेव्हा आपल्या सेवाच्या पदरानं तिचे अश्रू पुुसत असे व म्हणत असे की काही झालेलं नाही. तेव्हा ती मुलं समजून दूर आणखी खेळायला पळत. तेव्हा आलिशा गदगद होवून ते दृश्य पाहात असे नव्हे तर सुखी जीवनाची स्वप्ने रंगवीत असे.

**********************************************
तो एक दिवस कासावीस वाटत होता. आलिशाला आईची सारखी आठवण येत होती. आज मातृदिन होता.
अनिता आज जगात नव्हतीच. परंतू त्या अनितानं तिला जन्म दिल्यानं तिचे अनंत उपकार तिच्यावर होते. आज अनिता जरी जीवंत नसली तरी ती अनिता तिच्या पुत्रीच्या रुपानं जन्म घेवून तिच्या घरी आली होती.
आलिशाचे दोन्ही पोरं एकमेकांशी भांडत असत. आजही ते भांडत होते. तशी आलिशाला तिच्या आईची आठवण तीव्र झाली. तसं तिला वाटायला लागलं की असेच माझी मम्मी व मोठे पप्पा भांडायचे.
तो एक दिवस आलिशा अजुनही विसरली नव्हती. ज्या दिवशी अनिताचं मोठ्या पप्पासोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्या दिवशी अनितानं मोठ्या पप्पावर हातही उगाळला होता. कारण होतं त्यानं रागाच्या भरात आपल्या मुलीवर उचललेला हात. त्यानं अनिताचे होणारे पती पाहून ते सहन न झाल्यानं भांडण केलं होतं. शेवटी ह्या भांडणाचा परीणाम वाईट निघू नये म्हणून आलिशानं आपल्या मम्मीला मोठ्या पप्पापासून दूर नेलं. त्या दिवशीपासून तिचे मोठे पप्पा काही दिवस इच्छा असुनही तिच्या डोळ्याला दिसले नव्हते. ते मोठे पप्पा भांडत असत. परंतू ते काही वेळानं विसरुनही जात असत.

****************************************

मायबाप हे मुलांना जन्म देतात. लहानाचं मोठं करतात. त्यांंच्या भावना जपतात. परंतू या भावना जपत असतांना कधीकाळी ते मायबापही महिलांना जड वाटायला लागतात. त्यानंतर ते आपल्या मुलीचा विवाह करतात. परंतू या मुली संसारातही खुश नसतात. त्या फेसबुकवर बोलत असतात दुस-यांशी व गोड गोड फेसबुुकवर बोलणारे चांगले वाटायला लागतात. अशातच ती आपल्या भावनांची कदर करणारा व्यक्ती शोधते पतीच्या भावना न जपता........
आपल्या मुलांच्या भावना जपत असतांना त्याच आईवडीलाच्या आडून व पतीच्या आडून, कधीकाळी या भावना जपणारे भुंगेे आजुबाजूला फिरत असतात. ते भक्ष शोधत असतात त्यांच्याही शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. अशातच पतीपत्नीच्या नात्यात वितृष्ट आलेल्या या महिलांना असे गोड गोड बोलणारे भुंगे आवडतात. नकळतच त्या जाळ्यात ओढल्या जातात. मग काय, त्यांचा जेवढा वापर करायचा, तेवढा वापर हे भुंगे करतात. शेवटी सोडून देतात ते भुंगे.
आज हेच भुंगे जेव्हा दगा देतात, तेव्हा पतीची आठवण येते. परंतू जेव्हा पतीला हे भुंगे आवडत नाहीत. तेव्हा पती तिला कायमचे सोडून देतात. शेवटी जीवनात काय उरतं. तर काहीच नाही. ती महिला एकटी पडते आणि त्यातून आत्महत्या घडतात.
ही फेसबूकची कहाणी जरी असली तरी वास्तविक जीवनात अशा कहाण्या ब-याच प्रमाणात घडत आहेत.
मुलांचं टेन्शन. तसंच मातापित्यांचं टेन्शन. या टेन्शनमध्ये अपत्यांना सर्व समस्या झेलाव्या लागतात. त्यात त्यांचं नुकसान होतं. अभ्यासाचंही नुकसान होतं आणि महत्वाचं नुकसान होतं मुलांच्या भावनेचं. मु