death penalty in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | मृत्युदंड

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

मृत्युदंड

मनोगत
मृत्यूदंड ही माझी कादंबरी वाचकांसमोर प्रस्तूत करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ही पुस्तक म्हणजे एक भावना आहे. ही पुस्तक एकलव्यावर आधारीत असून बराचसा भाग मी एकलव्याचा घेतलेला आहे. कोणी म्हणतात की गुरु द्रोणाचार्यनं गुरुदक्षीणा म्हणून अंगठा मागतांना पक्षपात केला. परंतू ती कृती काही अंशी चूक असली तरी नाण्याच्या दोन बाजूनुसार सखोल विचार केल्यास बरोबरही वाटते. त्याचं कारण म्हणजे पोट. पोटासाठी माणूस चोरीही करतो. असो. तो आपला मुद्दा नाही. मुळात कादंबरीतून मी त्याच गोष्टीची उकल केली. मी लिहिलं की यात द्रोणाचार्य दोषी नाही. दोष होता अर्जूनाचा. कारण त्यानंच एकलव्याचे करतब पाहताच म्हटलं होतं,
" गुरुवर्य, आपण मला वचन दिलं होतं की मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवणार आणि हा तर आपण नाव घेतो. म्हणतो मी शिष्य द्रोणाचार्यचा. कदाचित आपणच तर पक्षपात करीत मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्या ऐवजी याला तर बनवलं नाही."
हिच शंका. याच शंकेनं घेतला एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यनं. कारण त्याला वाटत होतं की कदाचित अर्जून आपल्या पितामहा भिष्माकडे जाईल व भिष्मपितामहा मला नोकरीवरुन निष्काषीत करेल.
गुरु द्रोणाचार्यनं गरीबी पाहिली होती. त्यातच त्याचा मित्र असलेला राजा ध्रृपद. त्यानंही अपमान केला होता द्रोणाचार्यची गरीबी पाहून. शेवटी पोट भरणे मुश्कील होते. कसातरी तो भटकंटी करीत असतांना त्याला हस्तीनापूरला नोकरी मिळाली. त्यातच पुन्हा नोकरी गमावण्याचं संकट. खरंच आजच्या काळाचा विचार केल्यास गुरुधर्मासाठी कोणीतरी नोकरी गमावेल काय? आजचा जर विचार केला तर बरेचसे शिक्षक मंडळी संस्थाचालक व शिक्षणाधिकारी साहेबांचे मांडलिक झाल्यासारखे वागतात. गुरुधर्म बाजूला ठेवतात. फक्त नी फक्त राजधर्म पाळतात. मग यात गुरु द्रोणाचार्यचं काय चुकलं. अंगठा गुरुदक्षीणा म्हणून मागीतला तेवढंच ना. तो जातीनं ब्राम्हण असल्यानं ती जात फैक्टर मधात टाकून गवगवा झाला. परंतू खरा दोषी कोण हे ओळखण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. खरा दोषी होता अर्जून. निव्वळ अर्जूनच नाही तर ज्यानं गुरुधर्माचं पालन करता येवू नये म्हणून द्रोणाचार्यला वचनबद्ध केलं होतं तो भिष्म पितामहा. पितामहानं राजसत्ता वचनामुळे ताब्यात घेतली नाही. परंतू भर दरबारात लुटली जाणारी द्रोपदीची इज्जतही वाचवली नाही ना.
या सर्व गोष्टीचा उलगडा आहे या पुस्तकात. कादंबरी लहान आहे. परंतू अर्थपूर्ण आहे. आपण ती वाचावी व विचार करुन आपलं मत मांडावं. विनाकारण माझी कादंबरी वाचून वादविवाद करु नये. ते माझे विचार आहेत. काही चुकलं असेल माझं तर मला माफ करावे. कारण प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा,अधिकार आहे. तो अधिकार संविधान व स्वातंत्र्यानं बहाल केला आहे.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०



मृत्यूदंड (कादंबरी)
अंकुश शिंगाडे

क्रिष्ण परेशान होता सततच्या लढायानं. कारण सततची युद्ध लढता लढता नाकीनव आलं होतं. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच त्या शत्रूपक्षाकडे एक असाही वीर होता की ज्याचेसमोर मोठमोठे वीर अपयशी ठरत होते नव्हेतर तोच जगातील त्या काळातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. त्याच्यापुढे साक्षात तो देवही अपयशी ठरत होता.
शत्रूपक्षातील तो वीर. तो कोणी राक्षस नव्हता ना तो कोणी देव. तो एक साधारण मानव होता. परंतू त्याचेचमुळं परेशानी होती त्या राज्याला. जिथे त्याचे आजोबा राज्य करीत होते आणि तो एक राज्याचा कोणीही नसला तरी कार्य सांभाळत होता. हवं तर तो त्याला ठार करण्याची इच्छा करीत होता. परंतू एवढा निष्णात वीर एवढ्या लवकर मारुन काही उपयोग नाही. म्हणून त्यालाही विचार होता. कारण शत्रूपक्षातील तो वीर जरी निष्णात धनुर्धर असला तरी क्रिष्णाला त्याला ठार करणं हातचा मैल काढण्यासारखं होतं. तो वीर असल्यानं त्याला तो खेळवत होता परेशान असला तरी.
क्रिष्ण हा लीलाकारी होता. त्यानं मोठमोठे राक्षस यमसदनी पोहोचवले होते. तसंच त्यानं महाबली अशा आपल्याच मामाला म्हणजे कंसालाही ठार केलं होतं. त्यातच तो या वीरावर चिडूनच होता. त्याला संध्याही भरपूर आल्या होत्या. परंतू क्रिष्ण हा विद्वानांचा पुरस्कर्ता असल्यानं मग तो शत्रूपक्षातील का असेना, त्याच्या विद्वत्तेची किंमत करीत होता. म्हणून की काय, क्रिष्णानं आजही त्याला जीवंत ठेवलं होतं.
आज क्रिष्ण त्या क्षणाची वाट पाहात होता. हवं तर तो त्याला केव्हाही दंडीत करु शकत होता. परंतू ती वेळ यायची होती. ती वेळ येताच तो दंड देणार होता. कारण त्या शत्रूपक्षातील वीरानं सर्वच मापदंड ओलांडले होते नव्हे तर तो त्याला मदत करीत होता, जो राक्षसी वृत्तीचा होता नव्हे तर जो जनतेवर अत्याचार करीत होता. ज्याने त्याच्या आणि परराज्यातील कित्येक स्रीयांना वेश्या बनवले होते. म्हणून क्रिष्णानं त्याचेसाठी एकच दंड ठरवला होता, तो म्हणजे मृत्यूदंड. तो मृत्यूदंडच देणार होता त्याला. परंतू त्याची ती वेळ यायची होती.
कोण होता तो की ज्याच्यासाठी एवढ्या उशिरा मृत्यूदंड. काय नाव होतं त्याचं की ज्या वीराच्या विद्वत्तेची एवढी इज्जत. अन् जो विद्वान असूनही अत्याचार दूर करण्यासाठी लढण्याऐवजी अत्याचारींना मदत करतो नव्हे तर जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता अर्जून आणि कर्णापेक्षाही........
होय, तो कर्ण आणि अर्जूनापेक्षाही महारथी वीरच होता. त्याचं नाव होतं एकलव्य. ज्याला कोणत्याही गुरुनं शिक्षा दिलेली नव्हती. परंतू तरीही तो गुरु मानत होता त्या माणसांना. ज्यानं गुरुदक्षीणा तर घेतली होती. परंतू गुरुदक्षीणा देवूनही त्यानं त्याचं गुरुपण स्विकारलं नव्हतं नव्हे तर ज्यानं त्याला शिषत्व प्रदान केलं नव्हतं.
एकलव्य........रानावनात भटकणारा वीर बालक. लहानपणापासूनच त्याची आबाळ झालेली. तो लहानपणापासूनच हूशार होता. तसाच लहानपणापासूनच जिद्दीही. त्याची जिद्द वाखाणण्याजोगी होती. लहान असतांना तो अशा अशा क्लृप्त्या करायचा की सगळे दंग राहात असत त्याच्या क्लृप्त्या ऐकून. तसं पाहता एकदा असाच तो आपल्या मित्रासोबत तलावात पोहायला गेला असता त्या दाट जंगलझाडीत त्याचेवर अचानक एका वाघानं हल्ला केला. परंतू त्या वाघाचं एकलव्यासमोर काहीही चाललं नाही. त्यातच अगदी लहान वयातच त्यानं त्या वाघाला ठार केलं होतं. असा हा एकलव्य. तो क्रिष्णाच्या काकाचा मुलगा होता. एकलव्याचा जन्म म्हणजे एक रहस्यच होतं. कोणी म्हणतात की तो क्रिष्णाच्या काकाचा मुलगा होता. परंतू त्याचा जन्म होताच राजज्योतिषानं म्हटल्यानुसार त्याला वनात सोडण्यात आलं होतं. याचाच अर्थ असा की राजज्योतिषानं भविष्यवाणी केली होती की हा मुलगा पुढे जावून यदूवंशाचा कर्दनकाळ ठरेल. हीच भविष्यवाणी ऐकून क्रिष्णाच्या काकानं त्याला जंगलात सोडलं होतं. कारण क्रिष्णाचा काका आणि क्रिष्ण यदूवंशाचे होते.
एकलव्याला अवघ्या लहानशा वयात जंगलात सोडलं असता तो त्या भयाण वनात रडत होता जीवाच्या आकांतानं. त्यातच तो एका राजाला भेटला. ज्याचं नाव निषादराज हिरण्यधनू होतं व त्याच्या पत्नीचे नाव सुलेखा होते. सुलेखा कोमल आणि दयाळू स्वभावाची होती. त्यातच त्याचे पिताही शुरवीर असून तो व त्याचा सेनापती गिरीबीर यांची ख्याती शुरवीरात येत होते. ते दोघंही श्रृंगवेरपुरला राहात होते. अर्थात श्रृंगवेरपूर इथे राज्य करीत होते.
यादव वंशाची उत्पत्ती ही पुष्कळ पुरातन असून त्याचा इतिहास थोडक्यात असा.
भगवान विष्णूच्या नाभीपासून ब्रम्हाची उत्पत्ती झाली असे सांगीतले जाते. ब्रम्हाच्या डोक्यातून अत्रीची निर्मीती झाली. अत्रीनं भद्रशी विवाह केला व त्या दोघांना सौम्भ नावाचा मुलगा झाला. सौम्भ अर्थात चंद्र. त्यानंतर या सौम्भकडे बृहस्पतीची पत्नी तारा आकर्षित झाली. त्यातच तिला एक मुलगा झाला. त्याचं नाव बुध ठेवलं गेलं. या बुधाचं प्रेम सुर्यवंशी राजा मनूची मुलगी इलावर झालं व दोघांच्या मिलापातून पुरर्बा नावाचा पुत्र जन्मास आला. त्यानंतर राजा पुरर्बा जेव्हा तरुण झाले. तेव्हा ते स्वर्ग अप्सरा उर्वशीच्या प्रेमात पडले व त्यापासून त्यांना एक संतान झाली. ज्याचं नाव आयू ठेवलं गेलं. या आयूनं राजा स्वर्बभानूची मुलगी प्रभाशी विवाह केला. या आयू आणि प्रभा जोडीला पाच मुलं झालीत. ज्यांची नावं नहूष, क्षत्रवर्ध, रंभ, रजी, अदेना होतं. त्यानंतर युवराज नहूष हा उत्तराधिकारी बनला.
राजा नहूष याने व्रजा नामक स्रीशी विवाह केला. तिला सहा मुलं झाली. तसेच एक मुलगी. त्यांची नावं अनुक्रमे यति, ययाति, समति, अयति, वियति, किर्ती व रुची. या रुचीचा विवाह चवन त्रृषी चवन व सुकन्या यांचा मुलगा अपनवनशी झाला.
राजा नहूष हा उदार व्यक्तीमत्वाचा असून त्याचा मोठा मुलगा यति हा धार्मीक प्रवृत्तीचा होता. त्याला राज्य करण्यात उत्साह नसल्यानं नहूषचा दुसरा मुलगा ययाति हा राजा बनला.
महाराज ययातिचे दोन विवाह झालेत. पहिली पत्नी राक्षस गुरु शुक्राचार्यची मुलगी देवयानी होती तर दुसरी पत्नी शर्मीष्ठा होती. जी भ्रष्ट प्रवाहची मुलगी होती. या दोन पत्नीपासून ययातिला पाच मुलं झाली. (संदर्भ - त्रृग्वेद) पहिल्या पत्नी देवयानीपासून यदू आणि तुर्वसू. तसेच दुसरी पत्नी शर्मीष्ठापासून द्रुह्यू, अनू आणि पुरु झाले. याच यदूपासून पुढे यादव वंशाची उत्पत्ती झाली तुर्वसूपासून यवन वंश उदयाला आला. तसेच दुस-या पत्नीच्या द्रुह्यूपासून भोजवंश अनूपासून मलेक्ष वंश व पुरुपासून पौरव वंश निर्माण झाला. पुढे यदूपासून सहस्रजीत, कोष्ठा, नल आणि रिपू. त्यानंतर कोष्ठा गादीवर बसला. तद्नंतर कोष्ठापासून तेरा मुलं झाली. त्या कोष्ठाच्या तेराव्या मुलाचं नाव होतं विधर्म. याच विधर्मपासून विदर्भ राज्य अस्तित्वात आलं. या विधर्मला तीन मुलं झाली. कथ, कौशिक आणि रोमपद. रोमपदला अंग देशाचं राज्य मिळालं होतं. ज्यानं दशरथकन्या शांताशी विवाह केला होता. त्यानंतर विधर्मच्या मोठ्या मुलाला म्हणजे कथला पंधरा मुलं झाली. त्याच्या पंधराव्या मुलाचे नाव भीमसत्वत असून भीमसत्वतला सात महापराक्रमी मुलं झालीत. त्यांची नावं होती भाजी, भजमान, दिव्य, देववृद्ध, वृष्णी, अंधक आणि महाभोज. या सातही मुलांमध्ये अंधक आणि वृष्णी महापराक्रमी होते. वृष्णीला दोन मुलं झाली. देवमोड आणि योध्याजीत. देवमोडला दोन राण्या होत्या. मनिषा आणि विष्पर्णा. देवमोडच्या पहिली पत्नी मनिषापासून शुरसेन व शुरसेनची पत्नी मारियापासून दहा मुलं झाली व पाच मुली झाल्या. या दहा मुलांमध्ये वासूदेव सर्वात मोठे होते. तसेच मुलींमध्ये सर्वात मोठी पृथा होती. जिला कुंती म्हटलं जातं. त्यानंतर देवमोड व विष्पर्णापासून पार्जन्याचा जन्म झाला. पार्जन्यला नव मुलं झाली. ज्यात सर्वात मोठा नंद होता. तसेच भीमसत्वच्या मुलाला अंधकच्या वंशात देवकी व कंसचा जन्म झाला. वासूदेव हा यदूवंशी असून त्याला दोन पत्नी होत्या एक देवकी व दुसरी रोहिणी. देवकीच्या पोटून क्रिष्ण व रोहिणीपासून बलराम झाला. देवकी ही चंद्रवशी यादव राजा उग्रसेनची मुलगी होती तर वासूदेव हा शुरसेनचा मुलगा होता.
एकलव्य जसजसा मोठा होत होता. तसतशी त्याच्यामध्ये चाणाक्ष शक्ती वाढत चालली होती. तो रानावनात भटकत होता आपल्या सवंगड्यासोबत. त्यातच त्याला त्या राज्यातील निषादराज हिरण्यधनूने तो सापडताच त्याची रितसर दत्तकपुत्रासंबंधीची प्रक्रिया पार पाडून त्याला दत्तक पुत्र म्हणून स्विकारले. तसा तो लहानाचा मोठा होवू लागला.
राजा निषादराजने त्याला दत्तक पुत्र म्हणून स्विकारताच त्याचं नामकरण करण्यात आलं व राजज्योतिषानुसार त्याचं नाव अभिद्युम्न ठेवण्यात आलं. अभिद्युम्न हे नाव कठीण असल्यानं त्याला अभय म्हटल्या जावू लागले. अशातच तो पाच वर्षाचा झाला.
अभिद्युम्न पाच वर्षाचा झाला असता त्याला शिक्षणासाठी टाकण्यात आलं व त्याच्या शिक्षणाची व्यवस्था निषादराजने कुलीय गुरुकूलात केली.
राजा निषादराज एक कुलीन राजा होता. त्याला जंगलाचा अभ्यास होता. कोणत्या प्राण्यांना तसं वशमध्ये करायचं याची विद्या त्याला ज्ञात होती. तेच बाळकडू राजा निषादराजने आपल्या मुलाला पाजले होते अगदी बालवयातच. त्यामुळं पुढं जावून त्यानं द्रोणाच्या श्वानाला इजा न होवू देता सात बाण मारुन त्याचं भूंकणं बंद केलं होतं.
ते श्रृंगवेरपूर राज्य....... प्रयागजवळच्या आजुबाजूच्या प्रदेशात पसरले होते. त्यातच आजुबाजूच्या प्रदेशात निषादराजची विरता पसरली होती. त्यातच त्याचा सेनापती गिरिबीरचीही. राजा व राणी सुलेखा यांचा राज्यकारभार नियंत्रीत आणि सुव्यवस्थीत असून त्या कारभारानं जनता अतिशय सुखी होती आणि तेवढीच संपन्नही. राजा राज्याची सुत्रे अमात्य परिषद अर्थात गणपरिषदेच्या सल्ल्याने हलवीत असत. तसं ते त्याकाळचं कुलीन गणराज्य असलं तरी एक प्रतिष्ठीत गणराज्य होतं.जिथे राजा विशिष्ट परिवारातील होता. तसेच मंत्रीपरीषद लोकांमधून निवडली जात होती. ती परिषद राजाच्या हुकूमशाही तत्वानुसार बनत नव्हती. निषादराज राजा व महाराणी सुलेखा हे प्रजेवर विश्वास करणारे होते. ते प्रजेच्या सल्ल्याने चालत असत. तसेच प्रजेच्या सल्ल्यानच एखाद्या संकटसमयीही मार्ग काढत असत.
राजा निषादराजच्या कर्तबगारीचे बाळकडू अभयला अगदी लहानपणापासूनच प्यायला मिळाले. त्यानंतर तो पाच वर्षाचा होताच त्याचं नाव रितसर पद्धतीनं आश्रमात टाकण्यात आलं आणि या आश्रमातील गुरु त्या मुलांना शिकवित असतांना ज्ञानार्जनासोबतच अर्थार्जनही शिकवीत असत.
एकदा एका पुलक नामक ॠषीनं त्याची चाणाक्ष बुद्धीमत्ता पाहिली. त्यातच त्यांनी सांगीतलं की त्याला अशा गुरुच्या आश्रमात टाका की जिथे तो शिक्षणाच्या सर्व कक्षा पार करेल.
ते श्रृंगपूरवेर राज्य.......गंगा तटावर बसलं होतं ते राज्य. त्यावेळी श्रृंगपुरवेर राज्याची शक्ती ही मथूरा, हस्तिनापूर, मगध, चेदि व चंदेरी इत्यादी प्रकारच्या राज्यांसारखीच होती. प्रचंड बलाढ्य शक्ती असून निकटतटवर्तीय राज्यांना सरासरी जेरीस येत नव्हता या ठिकाणचा निषादराज. त्यामुळंच त्याला वाटत होतं की राज्य जर टिकवायचं असेल तर आपला वारसही तेवढाच दमदार असावा. म्हणून की काय, त्या त्रृषीच्या सल्ल्यानुसार एकलव्याला दूर चांगल्या गुरुच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठवावे, असा विचार निषादराजनं केला. त्यातच तो अशा गुरुंचा शोध घेवू लागला की ज्यांच्या शिकविण्याची ख्याती पंचक्रोशीत आहे.
द्रोणाचार्य........शास्र पुराणानुसार द्रोणाचार्य हा देवगुरु बृहस्पतीचा अवतार मानण्यात येतो. मान्यता आहे की देवगुरु बृहस्पतीने द्रोणाचार्यच्या रुपात जन्म घेतला होता.
टेस्ट ट्यूब बेबी. आधुनीक काळातील जन्म देण्यास आलेले आधुनीक तंत्रज्ञान. लोकांना वाटते की हे तंत्रज्ञान आजच जन्माला आलं आहे. कारण याचा शोध नुकताच लागलेला आहे. परंतू ही सारासार चूक असून हे तंत्रज्ञान पुर्वीही विकसीत होतं असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. कारण पुर्वीच्या वेदशास्रात याचे संदर्भ मिळतात. म्हणतात की गुरु द्रोणाचार्याचा जन्म त्याच्या मायबापाच्या मिलनातून नाही तर विचित्र विधी संपन्न करुन झाला. तसेच रामायणातही राजा दशरथाला पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागला. हे तत्वज्ञान याच टेस्ट ट्यूब बेबीची आठवण देते.
गुरु द्रोणाचार्यचा जन्म चमत्कारीकच म्हणता येईल. म्हणतात की एकदा गंगाद्वार नावाच्या ठिकाणी महर्षी भारद्वाज राहात होता. तो ऋषी अतिशय व्रतशिल असून पराक्रमीही होता. एकदा ते यज्ञ करीत असतांना त्याने काही महर्षींना सोबत घेवून गंगास्नानाला आरंभ केला. अगदी त्याचवेळी तिथं एक घृताकी नावाची अप्सरा आंघोळ करुन निघत होती पाण्याच्या बाहेर. ते पाहताच महर्षी भारद्वाजच्या मनात कामवासना जागृत झाली त्यानं आपल्या मनातच तशी कल्पना केली. त्यातच त्याचं रक्तबीज गळलं. ते रक्तबीज त्यानं आपल्या यज्ञपात्रात ठेवलं. त्या रक्तबीजाच्या स्पर्शानं गुरु द्रोणाचा जन्म झाला.
द्रोण जेव्हा थोडा मोठा झाला, तेव्हा त्याला अग्नीवेश नावाच्या महर्षीनं शिकवलं. त्यातच गुरु द्रोणाची हुशारी पाहून त्याला अग्नीवेश मुनीनं आग्नेयास्र प्रदान केलं. जे त्याला कधी काळी महर्षी भारद्वाजनं दिलं होतं. त्यानंतर हळूहळू द्रोण जेव्हा मोठा झाला आणि विवाहयोग्य झाला. तेव्हा त्याचा विवाह करण्यात आला. त्याचा विवाह हा शरद्वानची मुलगी कुपीसोबत झाला. कृपीच्या गर्भातून महाबली अश्वत्थामाचा जन्म झाला. जन्माच्या वेळी अश्वत्थामानं अश्वाच्या समान गर्जना केली होती. म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा ठेवण्यात आले.
परशूरामानं पुर्ण पृथ्वी निक्षत्रीय केली होती व आपल्या जवळील सर्व दान करुन तो महेंद्रांचल पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला होता.
द्रोणानं आपल्या पित्याकडून वेद विद्या शास्र, अस्र, शस्र यांचं ज्ञान मिळवलं होतं. त्यातच या द्रोणासोबत प्रषत नामक राजाचा पुत्र ध्रृपदही शिक्षण घेत होता. तिथंच ध्रृपद व द्रोणाची घनदाट मैत्री झाली. शेवटी शिक्षण पूर्ण होताच ध्रृपद आपल्या राज्यात निघून गेला. तसं द्रोणाचंही शिक्षण पूर्ण झालं.
एकदा गुरु द्रोण महेंद्राचल पर्वतावर गेले. त्यांनी पाहिलं की महर्षी परशूराम तपश्चर्या करीत आहेत. तेव्हा द्रोण म्हणाले,
"आपण मला काही दान द्यावं." त्यावर क्षणाचाही विलंब न करता परशूराम म्हणाले,
"मी इथे येण्यापुर्वी माझं सर्व धन ब्राम्हणांना वाटून दिलं आहे. मी तुला काहीही देवू शकत नाही. हं, एक वस्तू आहे माझ्याकडे. ती म्हणजे ज्ञान. तेवढं मी तुला देवू शकतो."
परशूराम बोलून गेले खरे. त्यातच गुरु द्रोणानं अक्कलहुशारीनं ती गोष्ट स्विकारली व ते परशूरामपासून विद्या शिकण्यास तयार झाले. अशाप्रकारे ते परशूरामाचे शिष्य बनले होते. परशूरामानं द्रोणाला अस्र शस्र विद्या शिकवली. त्यातच गुरु द्रोणाचार्य सर्व विद्येत पारंगत झाला होता.
द्रोणाचार्यचा विवाह झाला होता. तसा विवाह झाल्यानंतर द्रोणाला काही दिवस गरीबीचा सामना करावा लागला. त्यातच त्याला आठवलं की आपला एक मित्र आहे ध्रृपद. आपण त्या मित्राला जावून भेटावं व काहीतरी दान मागावं. तसा विचार करताच व आपल्या पत्नीशी विचारविमर्श करताच द्रोण ध्रृपद नगरीत निघाला. ध्रृपद नगरीत जाताच तो ध्रृपदला भेटला व मदतीबद्दल आर्जव केली. परंतू ध्रृपदनं त्याचं काही एक न ऐकता उलट त्याचा अपमान केला व त्याला राज्यातून हाकलून दिले. (द्रोणानं मदतीमध्ये एक गाय मागीतली होती. परंतू ती ध्रृपदनं न दिल्यानं त्यानं ध्रृपदला चेतावणी दिली की मी एका गाईच्या बदल्यात उद्या तुला हरवून तुझ्या गाई घेवून जाईन.
द्रोण ध्रृपद राज्यातून अपमानीत होवून निघून हस्तीनापूर मार्गे जात होता. तशी हस्तीनापूरातील काही राजपरीवारातील मुलं खेळत होती. ती खेळत असतांना गुरु द्रोणानं पाहिलं. तसा तो थकलेला होताच. त्यातच तो थकलेला असल्यानं एका झाडाच्या सावलीत तो खेळ पाहात बसला. तशी खेळता खेळता त्या मुलांची गिल्ली विहिरीत पडली. त्यातच ती मुलं ती गिल्ली काढायला लागले. परंतू ती मुले गिल्ली काढत असतांना गुरु द्रोण हसत होता. तसं एका मुलांचं लक्ष हसत असलेल्या द्रोणाकडं गेलं. तयं त्यानं आपल्या बालसवंगड्यांना इशारा केला आणि म्हटलं की तो व्यक्ती आपल्या वागण्यावर का हसत आहे ते त्याला जावून विचारावं.
सुचनेचा अवकाश. सर्व मुलं द्रोणाजवळ आली. त्यांनी त्याला हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा गुरु द्रोण म्हणाले,
"मी अगदी सहजतेनं तुमची गिल्ली काढून देतो."
त्यावर मुलं म्हणाली,
"काढा बरं."
द्रोण उठले. त्यांनी बाणाला दोरी कसली व बाणाचा अंबार रचून त्यांनी विहिरीतून गिल्ली काढून दिली. तशी ती मुलं म्हणाली,
"आपली ओळख काय?"
मुलांचा हा बाळबोध प्रश्न. गुरु द्रोण हसले. तसे म्हणाले,
"ते तुमच्या भिष्म पितामहाला विचारा."
मुलांनी द्रोणाचं बोलणं ऐकलं. तसं त्याला थांबायला लावून ते धावतच राजमहालात गेले. त्यांनी धावतच भिष्म पितामहाला गाठलं. घडलेली घटना सांगीतली व विचारलं,
"पितामहा, हा गृहस्थ कोण आहे. जरा आम्हाला सांगता का?"
भिष्म पितामहानं ते सगळं ऐकलं. मनात तसा विचार केला व क्षणात ओळखलं की हा मनुष्य दुसरा तिसरा कोणीही नसून तो गुरु द्रोणच असावा. तसे भिष्म पितामहा मुलांसोबत त्याला भेटण्यासाठी निघाले.
काही वेळ असाच गेला. तसा काही वेळात भिष्म पितामहा गुरु द्रोणाला भेटायला गुरु द्रोणाजवळ आले. त्यांनी द्रोणाची भेट घेतली आणि त्यांना राजदरबारात घेवून गेले. त्यांचा यथोचित आदरसत्कार केला व म्हटलं,
"आपण गुरुकूलातील मुलांना शिकवावं. आम्हाला असं वाटते की हस्तीनापूरातील सर्व राजकुमार वेद विद्या शस्र शास्र यामध्ये पारंगत व्हावी व कोणत्याही राज्यानं याकडे आक्रमण केल्यास त्यांच्यावर विजय मिळवता यावा."
भिष्म पितामहाचं कथन गुरु द्रोणानं ऐकलं. तसा गुरु द्रोण गरीबच होता. गरीबीच्या झळा विवाह झाल्यापासून झेलतच होता. तशी आपली गरीबी दूर करण्याची नामी संधी गुरु द्रोणाला चालून आली होती. तसा तो शिकविण्याचा प्रस्ताव गुरु द्रोणानं स्विकारला व तद्नंतर गुरु द्रोण हस्तीनापूर राज्याचा मुख्य प्रशिक्षक बनला. मात्र यात एक अडचण होती. ती म्हणजे प्रशिक्षक बनविण्यापुर्वी भिष्मानं गुरु द्रोणाकडून एक वचन घेतलं होतं, ते म्हणजे त्यानं कोणाला शिकवू नये. फक्त त्यानं हस्तीनापूरातील मुलांनाच शिकवावं. कारण भिष्माचा त्यात उद्देश होता. तो म्हणजे हस्तीनापूरच्या राजकुमाराशिवाय इतर राज्यातील राजकुमार गुरु द्रोणाकडून विद्या शिकू नयेत. त्यातच एखादा शत्रूराष्ट्रातील मुलगा गुरु द्रोणाकडून शिकून जावून हस्तीनापूरवर भारी पडू नये.
गुरु द्रोणाची हस्तीनापूरच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होताच तो गुरुकूलात हस्तीनापूरच्या मुलांना शिकवीत होता. त्यातच त्याच्यासमोर राज्यातील काही बंधनं होती. तशीच एक भीतीही होती की काही चुकल्यास हस्तीनापूर राज्य आपल्याला निष्काशीत करेल. कारण त्यानं तसं वचन दिलं होतं भिष्माला. त्यातच गुरु द्रोणानं कितीतरी प्रमाणात प्रशिक्षक बनण्यापुर्वी गरीबी काढली होती नव्हे तर गरीबीचे जीवन व्यथीत केले होते. त्यातच त्या गरीबीला पाहून त्याचा चांगला मित्र असलेल्या ध्रृपद राजानं अपमान केला होता. शेवटी मजबूरीच ती. ती द्रोणाला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडत होती.
त्याला क्षणोक्षणी आठवत होतं ते ध्रृपदचं बोलणं. ध्रृपद म्हणाला होता की मित्रता आपल्या बरोबरीच्या व्यक्तीशी करायची असते. गरीब, कुलीन आणि कायरशी नाही. ते बोचरे बोल आज द्रोणाच्या मनात काट्यासारखे रुतत होते. ती आठवण आली की गुरु द्रोण व्यथीत व्हायचा. त्याला राहावसं वाटत नव्हतं. कधीरधी वाटायचं की मी केव्हा ध्रृपदचा बदला घेईन व केव्हा ध्रृपदला धडा शिकवेन. तसं अगदी होवून गेलं होतं.

****************************************

अभय आपल्या श्रृंगवेरपूरच्या आश्रमात होता. तसा तो चाणाक्ष. त्याच आश्रमात अभयला एक नवीन नाव मिळालं एकलव्य. मुनीनं सांगीतलं,
"हा चाणाक्ष आहे. आपण ह्याच्या बुद्धीमत्तेची इज्जत करुन याला चांगल्या आश्रमात नेवून टाका. आपण याला सर्वश्रेष्ठ वीर बनवा. जेणेकरुन आपल्या राज्याला याचा फायदा होईल."
मुनीचं म्हणणं बरोबर होतं. तशा मुनीनं निषादराजाला सुचविलेल्या गोष्टी त्याच्या मनात घोळू लागल्या. एकलव्य त्याचा तसा एकुलता एक मुलगा. त्यामुळं की काय, त्यानं गुरु द्रोणाकडं त्याला विद्या शिकवायला आणलं. त्यावेळी एकलव्य बराच मोठा होता विचारीही झाला होता.
निषादराजनं गुरु द्रोणाची भेट घेतली व विनंती केली की त्यानं एकलव्य हुशार असल्यामुळं त्याला आपल्याकडे विद्या शिकविण्यासाठी आणलेले आहे. आपण त्याला विद्या शिकवावी म्हणजे झालं.
निषादराज बोलून गेला खरा. परंतू त्यावर गुरु द्रोण विचार करु लागला. तसा विचार करता करता त्याला विचार आला की श्रृंगवेरपूर राज्य म्हणजे मगधचा एक भाग. मगध राज्य हस्तीमापूरचं शत्रू राष्ट्र. जर आपण याला विद्या शिकवलीच तर तो हस्तीनापूरला घातक होईल. तसं पाहता आपण गराबी पाहिलेली आहे. या हस्तीनापूरनं आपल्या पोटाला भाकर दिली. आपली गरीबी दूर केली. फार उपकार आहेत हस्तीनापूरचे आपल्यावर. जर मी हस्तीनापूरच्या या शत्रूराष्ट्रातील मुलाला विद्या शिकवलीच तर ती हस्तीनापूरशी गद्दारी केल्यासारखे होईल आणि शेवटी जर हस्तीनापूरला ही गोष्ट माहित पडलीच तर उद्या हेच हस्तीनापूर आपल्याला आपल्या पोटापाण्यापासून वंचित करेल. मग पुन्हा आपल्याला गरीबीचे तेच मागचे जीवन आणि पुन्हा आपली बायकापोरं उपाशी राहणार."
गुरु द्रोणाचा तो विचार. त्यानं सुरुवातीला नकार दर्शवला. त्यातच निषादराजानं एकलव्याला राज्यात माघारी फिरण्याविषयी म्हटलं. परंतू मनोमन ज्याप्रमाणे एक स्री आपल्या भरताराला वरते. तसे एकलव्याने गुरुला वरल्यामुळे एकलव्य माघारी फिरण्यास नकार देवू लागला. त्यातच निषादराजानं पुन्हा द्रोणाचार्यांना विनंती केली. तसा अंतिम विचार करुन गुरु द्रोण म्हणाला,
"मी ठेवतो. परंतू माझी एक अट आहे."
"कोणती?"
"मी याला सेवक म्हणून ठेवणार. ही गोष्ट याला मंजूर असेल तर यानं होकार द्यावा. अन्यथा आपल्या राज्यात एकलव्यानं निघून जावे."
एकलव्यानं ते ऐकलं. तसा एकलव्य तयार झाला सेवक बनण्यासाठी. त्याला वाटत होतं की कदाचित त्याला सेवक रुपात का होईना, लपूनचोरुन विद्या शिकता येईल. तसं पाहता शिक्षणाची आस आणि विद्येची कास त्याला सेवक बनायला का असेना, शिक्षणासाठी तयार करीत होती नव्हे तर तो विद्या मिळविण्यासाठी नव्या दमानं तयार होत होता.
एकलव्य सेवक म्हणून गुरूच्या आश्रमातील होता. तो द्रोणाचार्यचं इमानीइतबारे सेवा करीत असे. त्यातच दुपारच्याला तो जंगलातही जात असे. त्याचबरोबर आश्रमातील मित्रांसमवेत तो माधुकरीही मागायला जात असे.
एकलव्य जी माधुकरी मागून आणत असे. ती सर्वात जास्त असे. ते खावून द्रोणाचार्य अतिशय खुश होता. परंतू तो तरीही त्या एकलव्याला विद्या शिकवू शकत नव्हता. कारण तसं करणं हे त्याच्या कर्तव्याच्या आड येणारी गोष्ट होती.
द्रोणाचार्य विचार करीत होता त्याबद्दल. परंतू त्यावर उपाय निघत नव्हता. शेवटी गुरु द्रोणानं त्याला विद्या शिरवलीच नाही.
ती गुरुकुलातील मिलं सकाळी सकाळी उठायची. योग्याभ्यास करायची. त्यातच धनुर्विद्येचं आणि इतर विद्येचं शिक्षणही. तसा एकलव्य हुशार होताच. तो अगदी लपून चोरुन तो योग्याभ्यास पाहायचा अगदी मन लावून. त्यानंतर दुपारी वेळ मिळाला आणि कोणीही तिथे उपस्थीत नसला तर त्या विद्येचा सराव करायचा. त्यातच आता तो निष्णांत झाला होता धनुर्विद्येत. तसं बाळकडू त्याला त्याच्या राज्यातच मिळालं होतं. बस, थोडीशी फुंकर घालायची होती त्यात. ती फुंकर द्रोणाचार्याची विद्या, मग ती चोरुन लपून का असेना, त्या विद्येनं फुंकर घातली जात होती. त्यातच त्या विद्येचा चोरुन सराव करीत असतांना तो अर्जूनाला दिसला. त्याचबरोबर त्या अर्जूनाचं ती गोष्ट आपल्या प्रिय गुरुला सांगीतली व गुरुनं ती गोष्ट सांगताच एकलव्याला बोलावलं.
एकलव्य.........तो स्वाभीमानी होता. खोटं बोलणं त्याला जमत नव्हतं. त्यातच गुरु द्रोणानं त्याला तसं स्पष्टीकरण विचारताच त्यानं सगळं सत्य कथन केलं. त्यामुळं ती कृती राज्याच्या विरोधात असल्यानं गुरु द्रोणानं त्याला अक्षरश: हाकलून दिलं होतं.
एकलव्य तसा स्वाभीमानीच. गुरु द्रोणानं त्याला हाकलून देताच तो अतिशय व्यथीत झाला. तसा गुरु द्रोणानं त्याला हाकलून देताच तो सरळ आपल्या राज्यात गेला नाही. तो जंगलात गेला व तिथं गुरु द्रोणाचा एक मातीचा पुर्णाकृती पुतळा बनवून त्या पुतळ्यासमोर तो त्यानं शिकलेल्या विद्येचा सराव करीत होता. त्यातच तो अगदी अल्पावधीतच पारंगतही झाला.
एकदा असाच प्रसंग. गुरुकुलातील मित्रांनी म्हटलं की आम्हाला जंगलात विहार करायला जायचं आहे. तेव्हा आपणही सोबत चाला.
ती शिष्यांची इच्छा. गुरु द्रोण वनविहारासाठी निघाले होते. तसा त्याचेसोबत एक श्वानही होता. तो श्वान पुढे होता व ते सर्व शिष्य गुरु द्रोणाचार्यसोबत गुरु द्रोणाच्या मागं मागं चालत होते. अचानक तो श्वान एकलव्याच्या जवळ गेला. तेव्हा एकलव्य अगदी तन व मनानं तो शिकलेल्या विद्येचा योगाभ्यास करीत होता. त्यातच तो श्वान त्याला पाहून भुंकत होता. तसा तो जोरजोरात भुंकत असल्यानं एकलव्याच्या योगाभ्यासात व्यत्यय येत होता. तशी अडचणही वाटत होती. शेवटी एकलव्यानं आव ताव न पाहता योगाभ्यासात हा श्वान व्यत्यय आणत आहे म्हणून त्याच्या तोंडात सात बाण मारले व त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत न करता त्याचा आवाज बंद केला व श्वानाचं ओरडणं बंद केलं. त्यानंतर पुन्हा एकलव्य डोळे मिटून योगाभ्यासाला बसला.
थोड्याच वेळाचा अवकाश. श्वानाचा आवाज बंद झाला होता. तसा काही वेळात गुरु द्रोण आपल्या शिष्यासमवेत त्या स्थळी आला, ज्या स्थळी एकलव्य योग्याभ्यास करीत होता. त्यानं पाहिलं की एक मुलगा आपलीच एक प्रतिमा बनवून त्या प्रतिमेसमोर योगाभ्यास करीत बसलेला आहे. तो अगदी तल्लीन होवून व डोळे मिटून योगाभ्यास करीत आहे. त्यानंतर त्यानं पाहिलं की त्या मुलाच्या पुढं एक श्वान उभा असून तो आपलाच श्वान आहे व त्या श्वानाच्या तोंडात सात बाण खुपसलेले असून तो श्वान भुंकत नसून अगदी चूप बसला आहे. त्यातच त्या बाणानं श्वानाला कोणतीही इजा झालेली नाही.
ती श्वानाला बाण मारण्याची विद्या......ती गुरु द्रोणाला येत नव्हती. तसेच कोणत्याच गुरुनं त्याला ती विद्या कधीच शिकवली नव्हती.
तसा गुरु द्रोण विचारात पडला. मुलाचा चेहरा पाहिल्यासारखाच होता. क्षणातच त्यानं त्याला ओळखलं. तसा तो विचार करु लागला.
'हाच तो एकलव्य. मी याला हाकलून दिलं होतं गुरुकूलातून. तो हाच. अन् माझी ही प्रतिमा. तिही मातीच्या स्वरुपात आणि हा मुलगा डोळे मिटून इथं काय करतोय. कदाचित यानंच या श्वानाच्या तोंडात बाण मारलेत की काय, चला विचारुनच पाहू.'
क्षणाचाच विलंब. त्यानं त्या मुलाला आवाज दिला,
"वत्स, तू एकलव्यच ना."
एकलव्यानं डोळे उघडले. त्यानं पाहिलं की प्रत्यक्ष गुरु द्रोण आपल्या समोर उभे अाहेत. तसा तो क्षणाचाही विलंब न करता उठला. तसा तो नतमस्तक झाला द्रोणाच्या पायावर. परंतू ते आश्चर्यच. गुरु द्रोण तो नतमस्तक होताच मागे सरले. म्हणाले,
"वत्स, तू एकलव्यच ना?"
"होय, मी एकलव्यच. बोला गुरुदेव, काय आज्ञा आहे ती? मी आपल्या आज्ञेचं अवश्य पालन करील."
"तू एकलव्य आणि ही माझीच प्रतिमा काय."
"होय, ही माझीच प्रतिमा."
"का बरं बनवली माझी प्रतिमा?"
"आपण माझे गुरु आहात म्हणून."
"गुरु आणि मी! छे! मी कसा काय गुरु तुझा?"
"होय, आपणच माझे गुरु आहात."
"बरं आणि हो, हे श्वानाला बाण कोणं मारले?"
"मीच मारले."
"पण ही तर विद्या मलाही येत नाही. मग तू कशी शिकला?"
गुरु द्रोणाचा तो प्रश्न. एकलव्य चूप होता काही क्षण. तसा तो विचार करीत होता. त्यातच त्यानं दुसरा प्रश्न फेकला.
"का बरं मारले याला बाण?"
"गुरुदेव हा ओरडत होता."
"मग काय झालं एवढं? श्वान आहे तो. ओरडणारच."
"गुरुदेव, त्यानं माझ्या योगाभ्यासात व्यत्यय येत होता. मग काय करु?"
एकलव्य बोलून गेला खरा. परंतू गुरु द्रोण विचारात पडला की हा एकलव्य........ज्या मुलाला त्याच्या योगाभ्यासात अडचण येते म्हणून तो या साध्या श्वानाला बाण मारतो आणि त्याचं ओरडणं बंद करतो. व्यत्यय येतो म्हणून त्याला त्याची दया येत नाही की हा एक निरपराध मुका जीव आहे. श्वानाचं ओरडणं नैसर्गीक आहे. कोणीही नवीन व्यक्ती दिसला की तो ओरडणारच. त्याचा एवढा बाऊ करावा काय? याचाच अर्थ असा निघतो की हा एकलव्य स्वार्थी असून त्यानं आपला स्वार्थ साधण्यासाठी ही कृती केलेली आहे. हा कुणाचाही शिष्य होण्याच्या लायकीचा नाही. कारण आज यानं आपल्याला व्यत्यय होतो, म्हणून या श्वानाला स्वार्थानं सात बाण मारले. उद्या हाच एकलव्य स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेवू शकते.
त्याचा तो विचार.......त्यातच त्यानं आणखी विचार केला आणि विचारलं,
"वत्स, तुझा गुरु कोण?"
"आपणच गुरुदेव."
"म्हणजे?"
"आपणच आहात माझे गुरु."
"म्हणजे?''
"म्हणजे आपल्यामुळेच मी एवढ्या पुढे गेलोय."
"हो का."
"होय."
"पण मी ही विद्या कधीच तुला शिकवली नाही. कारण मी ती अजीबात जाणत नाही, त्याचं काय? मग मी तुझा गुरु कसला?"
"गुरुदेव, आपणच माझे गुरु." एकलव्य अतिशय नम्रतेनं हात जोडून दंडवत घालून बसला होता.
एकलव्य परत चूप बसला. तसा गुरु द्रोण विचार करु लागला पुढच्या भविष्याचा. जे भविष्य त्याला पुढील काळात घडवायचे होते. त्याला अर्जूनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवायचे होते. त्याला कदाचित त्यावेळी भविष्यातील त्या अठरा दिवस लढलेल्या महाभारताचं भविष्य दिसत होतं आणि वाटत होतं की या बालकाला आजच रोखलं नाही तर उद्या हाच शत्रूराज्यातील बालक हस्तीनापूरला धोकादायक ठरेल. कारण मगध आणि हस्तीनापूर यांचं पुर्वीपासूनच वैर आहे. जर हा बालक जर विरोधी गटातून लढला तर उद्या हस्तीनापूरची आनं बाण, शान धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्यासाठी माझी हस्तीनापूरनं प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तसेच ज्यासाठी मी या हस्तीनापूरच्या मुलांना अगदी पुरेपूर शिक्षण देवून तयार करीत आहे.
वचन आणि किंमत. यात अडकलेला द्रोणाचार्य. हवं तर त्या द्रोणाचार्यनं एकलव्याला वचन मागायला पाहिजे होतं की त्यानं असं वचन द्यावं की हस्तीनापूरवर आक्रमण कधीच करणार नाही. कारण त्यावेळी वचनावर समाज चालत होता. परंतू द्रोणाचार्यनं ते केलं नाही. केलं ते भलतंच की ज्याचा विचार समाज करु शकत नव्हता. तसा द्रोणाचार्य विचार करीत असतांना विचार पूर्ण झाल्यावर तो म्हणाला,
"तू माझा शिष्य ना. मग माझी गुरुदक्षीणा देशील. तशी तर गुरदक्षीणा मी गुरु असल्यानं तुला द्यावीच लागेल."
"जी गुरुदेव."
"मला गुरुदक्षीणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवाय. बोल देशील!"
"होय गुरुदेव."
"मग वेळ कशाला करतोय. दे पटकन." क्षणाचाही विलंब न करता द्रोणाचार्य म्हणाला.
ते कपटाचे शब्द. पक्षपातीपणानं शब्द काढला होता तो गुरु द्रोणाचार्यनं. कारण त्यानं भिष्माला तसं वचन दिलं होतं की तो अर्जूनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवेल. तेच वचन पाळण्यासाठी द्रोणाचार्यनं अंगठा मागीतला होता एकलव्याचा.
एकलव्यानं ते सगळं ऐकलं. तसा द्रोणाचार्यच्या तोंडून 'वेळ कशाला लावतो अंगठा द्यायला' हेही शब्द ऐकले. त्यातच त्यानं क्षणाचाही विलंब न लावता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापला व तो द्रोणाचार्याच्या चरणाजवळ ठेवीत म्हणाला,
"गुरुदेव हा घ्या अंगठा. ह्या अंगठ्याचा तुम्ही स्विकार करा म्हणजे झालं."
अंगठा पायाजवळ होता. तसा एकलव्य खाली मान टाकून बसला होता नतमस्तक होवून. वेदनेनं विव्हळत होता तो. गुरुदेव ते सगळं पाहात होते.
द्रोणाचार्य तो पायाजवळ असलेला एकलव्याचा अंगठा पाहिला. त्यांना वाईट वाटलं की आपण अंगठा मागीतला जो आपल्या पायाजवळ आहे. त्यातच त्यांनी त्याला उठवलं व म्हटलं,
"वत्सा, तू धन्य आहेस की ज्यानं एका झटक्यात गुरुदक्षीणा म्हणून अंगठा कापून माझ्या चरणावर ठेवला. परंतू मी तरी काय करु? मी विवश आहे."
एकलव्य काय समजायचं ते समजला. तसा तो म्हणाला,
"गुरुदेव, आपण असे विवश होवू नका. एक अंगठा नाही म्हणून काय झालं. ही चार बोटं आहेत ना. मी या चार बोटानं बाण चालवीन. महत्वाकांक्षा असली तर सारं काही होतं."
द्रोणाचार्यनं ते सगळं ऐकलं. तसा तो माघारी फिरला. त्यातच तो विचार करीत चालला होता. द्रोणाचार्यनं एकलव्याचा अंगठा मागीतला. आज गुरु शिष्य परंपरा अगदी चांगल्या भावनेनं सुरु आहे. त्यातच अलिकडचा गुरु हा पक्षपातही करतांना दिसत नाही.
पुर्वीही असा गुरु नव्हता की ज्यानं निःपक्षपातीपणा केला. अपवाद गुरु द्रोण. त्यानं पाच कारणं पुढं ठेवून एकलव्याचा अंगठा मागीतला. ती कारणं अशी.
१) पहिलं कारण म्हणजे वचन. जे वचन त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होतांना भिष्माला दिलं होतं की मी हस्तीनापूरच्याच मुलांना विद्या शिकविणार. इतरांना नाही.
२) दुसरं कारणही तेच होतं वचन. त्यानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ बनविण्याचं वचनही भिष्माला दिलं होतं. त्यानं अंगठा न मागता गुरदक्षीणा म्हणून एकलव्याकडून वचनही मागीतलं असतं कदाचित की तो हस्तीनापूरवर कधीच चढाई करणार नाही भविष्यात. परंतू त्याला अर्जूनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धराच्या स्वरुपात पाहायचं होतं. ज्यात एकलव्याचा अंगठा बाधीत ठरत होता. त्याला वाटलं की एकलव्याचा जर मी अंगठा मागीतला तर उद्या अर्जूनापेक्षा एकलव्य सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनणार नाही. अर्जूनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर राहिल. कारण अंगठ्याविणा सारी कामं अडतात. परंतू त्याला हे माहित नव्हतं आणि त्याला समजलं नव्हतं की इतरही चार बोटानं सराव करुन एकलव्य सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनू शकेल. जो मुलगा त्याला विद्या न शिकवताही एवढी विद्या शिकला की त्यानं एका श्वानाचं भुंकणं बंद केलं. तो मुलगा इतर बोटानं सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्यासाठी प्रयत्न करु शकणार नाही काय. शेवटी तेच झालं की एकलव्यानं तद्नंतरच्या काळात त्याच्या उरलेल्या चालही बोटानं सराव केला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याचा. त्याचे प्रयत्न विफल झाले नव्हते.
३) तिसरं कारण होतं मगध आणि हस्तीनापूरचं शत्रूत्व. गुरु द्रोणाचार्यची नियुक्ती ही हस्तीनापूरला झाली होती की त्यानं हस्तीनापूरच्याच मुलांना विद्या शिकवाव्यात. इतरांना नाहीत. त्यामुळं एकलव्याला न शिकविण्याचं बंधन होतं.यदि कदाचित एकलव्याला शिकवलं आणि ही गोष्ट जर भिष्म पितामहला माहित झालीतर भिष्म पितामहा त्याला नोकरीवरुन काढून फेकेल. शेवटी पोटाचा प्रश्न होता.
४) चवथं कारण होतं गरीबी. हस्तीनापूरला प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होण्यापुर्वी त्यानं अतिशय गरीबीत दिवसं काढले होते. त्यावेळी त्याला पत्नी कृपीसह उपासमारही सहन करावी लागली होती.
५) पाचवं कारण होतं अपमान. त्याचा अपमान झाला होता. तो ध्रृपदानं केला होता. त्याचा बदला काढायचा होता त्याला. त्यातच प्रषत व मगधचं चांगलं पटत होतं त्यावेळी. त्यातच एकलव्य ध्रृपदच्या वाईट समयी त्याला मदत करणार नाही कशावरुन? याचाच परिणाम अंगठा मागण्यात झाला एकलव्याचा. तो परिणाम द्रोणावर झाला होता.
६) सहावं महत्वाचं कारण होतं. ते म्हणजे मुक्या जनावरांना आपल्या स्वार्थासाठी त्रास देणं. एकलव्यानं त्याला योगाभ्यासात व्यत्यय आणणा-या श्वानाच्या तोंडात सात बाण मारले होते. त्यावरुन द्रोणाचार्यला वाटत होतं की हा मुलगा पुढे जावून आपल्या विद्येचा वापर आपल्या स्वार्थासाठी कुणावरही करेल. वाईट प्रकारानं वापर करेल त्याचा.
७) सातवं कारण होतं, ते म्हणजे तो शत्रूराष्ट्राचा मुलगा होता. कदाचित शत्रूचा गुप्तहेरच. या सर्व कारणांनी राजहित आणि राष्ट्रहित विचारात घेवून गुरु द्रोणानं अंगठा मागतांना केलेला विचार हा रास्त होता. हे नाण्याच्या एका बाजूचे विचार होते. त्यानं नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करुन सर्व दोष आपल्यावर घेवून अंगठा मागण्याचा निरिणय घेतला. त्याला हेही माहित होते की उद्या हाच समाज आपल्याला दोष देईल व आपली समाजात बदनामी करेल. तसेच इतिहास आपल्याला कदाचित माफ करणार नाही. परंतू नाण्याची दुसरीही बाजू आहे हे द्रोणाचार्य विसरले होते. ती बाजू म्हणजे गुरु शिष्यपणाची.
गुरु द्रोणाचार्य हा एक गुरु होता. त्याचेसमोर येणारे सर्व शिष्य हे बालवयातील असून त्यांना काय चांगलं आणि काय वाईट हे कळत नव्हतं. त्यामुळं कोणती कृती चांगली आणि कोणती वाईट तेही कळायला मार्ग नव्हता. त्यातच असे शिष्य की जे गुरुवर निरतिशय प्रेम करतात. ते मग गुरुनं काहीही म्हटलं तरी ते कार्य करायला मागं हटत नाही.
गुरु.........मग तो द्रोणाचार्य का असेना, शिष्य त्यांचेवर प्रेम करतो. निःस्वार्थ मनानं. त्यातच त्यांचेसाठी काहीही करायला तयार होतो. जे एकलव्यानं केलं. असे असतांना नाण्याच्या दुस-या बाजूनुसार एकलव्यानं स्वतः अंगठा देवून स्वतःचं महत्पण सिद्ध केलं आणि गुरु द्रोणावर तो विद्वान असूनही कालिख पोतली.
महत्वाचं म्हणजे एक गुरु जेव्हा बनतो. त्या गुरुनं केवळ आपण गुरु आणि तो एक शिष्य असाच विचार डोक्यात आणून काम करावं. कोणाच्याही दबावात येवून काम करु नये. सर्व शिष्यांना समान स्थान द्यावे. कारण ज्ञानाला दोन बाजू असतातच.
ज्ञानाच्या दोन बाजूनुसार विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना कधीच विद्यार्थ्यांबाबत भेदभाव करु नये. कारण विद्यार्थी लहान असतांना त्याचं भविष्य आपण पाहू शकत नाही की तो कसा बनेल. उदाहरण द्यायचं झाल्यास रामायणातील देवू. राम अयोध्येचा राजा बनणार होता. परंतू एका झटक्यात रामाला चौदा वर्ष वनवास झाला व त्याला चौदा वर्ष अगदी वनवासात काढावे लागले.
नाण्याच्या एका बाजूनुसार वर्गात जे काही विद्यार्थी असतात. त्यातील काही विद्यार्थी आपल्याला मिळणा-या ज्ञानाचा वापर योग्यप्रकारे करतात तर काही विद्यार्थी आपण मिळविलेल्या ज्ञानाचा वापर वाईट कामासाठीही करीत असतात. एक विद्या समाजाचं हित करते तर दुसरी विद्या समाजाचं अहित. तेव्हा त्या लहानग्या वयात मुलांवर फुंकर घालून त्यांना निःपक्षपातीपणानं शिकविण्याची गरज आहे. त्यांच्याकडून अपेक्षांची पुर्ती करुन घेण्याची गरज नाही.
एक शाळा की त्या शाळेत विद्यार्थी सर्व भागातून येत असतात. सर्व धर्माचे येत असतात. तसेच सर्व जातीचे. परंतू त्या जात, धर्म आणि प्रांत प्रथा शिक्षकांनी पाळायचा नसतात. दोनच जाती फक्त तेवढ्या पाळाव्या लागतात. त्या जाती म्हणजे गुरु आणि शिष्य. तो एक गुरु असतो आणि हा शिष्य. फक्त दोनच जाती. तेव्हा शिकवीत असतांना समजा विद्यार्थ्यांचं काही चुकत असेल तर दंड नक्कीच करावा. परंतू तोही सौम्य. विद्यार्थ्यांना कठोरात कठोर दंड मागू नये. तसेच गुरुदक्षीणेची अपेक्षाच करु नये द्रोणाचार्यसारखी आणि अपेक्षाही केली तरी असा विचित्र प्रकार. लाजीरवाणा अंगठा मागण्याएवढा.
गुरुसमोर फक्त आणि फक्त एकच ध्येय असावं शिकविण्याचं. त्याचेसमोर फक्त शिष्य असावा. गुरुचं काम असतं शिकवणं आणि शिष्याचं काम असते शिकणं. तेव्हा असं शिकवणं सुरु असतांना तो विद्यार्थी शत्रू राष्ट्रातील, हा विद्यार्थी मित्र राष्ट्रातील हा भेदाभेद गुरुजवळ नसावाच. तसेच हाच माझा प्रिय शिष्य आणि हाच माझा नावडता शिष्य असा भेदभाव गुरुजवळ नसावा. तसेच हा शिष्य भविष्यात असाच निघेल हेही ब्रीद नसावे. ते ठरविणारे तुम्ही कोण. फक्त नि फक्त तुम्ही गुरु आणि ते शिष्य आहेत हेच असावं. तेव्हाच तुम्हाला निपक्षपातीपणानं व चांगलं शिकवता येईल आणि तुम्हाला तुमचे ध्येय उत्तमप्रकारे साकार करता येईल व साध्य करता येईल.
द्रोणाचार्यनं जसा अंगठा मागीतला तसा अंगठा देवून मोकळा झालेला एकलव्य अंगठा गुरुदक्षीणा म्हणून देवूनही व्यथीत झाला नाही. तो स्वतःला अतिशय धन्यच मानू लागला होता. त्यातच तो आपल्या श्रृंगवेरपूर राज्यात पोहोचला. त्यानंतर त्यानं योगाभ्यास बंद केला नव्हता तर तो सुरुच होता. तो आता आपल्या उरलेल्या बोटानं सराव करीत होता.
एकलव्य जसा आपल्या राज्यात परतला. तसा द्रोणाचार्यही आपल्या राज्यात परतला होता. तो मात्र दुःखी होता. तारण त्यानं आपल्या शिष्याबाबत पक्षपात केला होता. त्याला वाटत होतं की अर्जून हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनावा. इतर कोणीच नाही. त्यासाठीच त्यानं त्या एकलव्याचा अंगठा घेतला होता.
अशीच ती वेळ आली. एकदा गुरु द्रोण कक्षात बसला असतांना तिथे अर्जून आला. त्यानं गुरुदेवाला अतिशय व्यथीत असलेले पाहिले. तसा तो ब-याच दिवसापासून तशाच स्वरुपात गुरु द्रोणाचार्यला पाहात होता. तसा तो म्हणाला,
"गुरुदेव आपण एकलव्याचा अंगठाच का मागीतला गुरुदक्षीणा म्हणून?"
शिष्याचा तो बाळबोध प्रश्न. काय करावं सुचत नव्हतं. अशातच तो प्रश्न. द्रोणाचार्याच्या मस्तकात जावून भिडला. त्यातच त्याच्या मस्तकाला छिन्नविछिन्न केलं. त्यातच काय उत्तर द्यावं ते द्रोणाचार्यला सुचत नव्हतं. तसा तो विचार करायला लागला. शेवटी विचारांती तो म्हणाला,
"अंगठा यासाठी मागीतला की त्यानं ती विद्या चोरुन मिळवली होती."
गुरुदेवाचे ते उत्तर ऐकताच न समजलेला अर्जून तेथून परत फिरला. मात्र माझा प्रिय शिष्य अर्जून श्रेष्ठ बनावा यासाठी मी अंगठा मागीतला हे सत्य गुरु द्रोणानं अर्जूनपासून लपवलं होतं. याची चाणाक्ष झलक गुरु द्रोणाच्या चेह-यावर अगदी स्पष्ट दिसत होती. कारण त्यानं ते सत्य लोकांपासून तर लपवलं होतं. परंतू आपलं जमीर........आपलं मन.........ते मन त्याला पदोपदी खात होतं.

****************************************
दिवसामागून दिवस जात होते. तसा काळही बदलत चालला होता. एकलव्य आपल्या राज्यात गेला होता. त्यातच त्याचे वडील हिरण्यधनूनं त्याचा विवाह त्याचा एका निषाद मित्राच्या मुलीशी, जिचं नाव सुनीता होतं, तिच्याशी करुन दिला होता. त्यातच आता तो संसारात रममाण झाला होता.
एकलव्य संसारात तर रममाण झाला होता. त्यातच तो साधनापुर्ण प्रकारानं साधनाही करीत होता योगाभ्यासाची. त्यातच काही दिववस लोटले. तसे त्याचे वडील निषादराज हिरण्यधनू मरण पावले व एकलव्य राजा बनला.
एकलव्य राजा बनताच त्यानं मंत्रीपदाचीही सुत्रे हातात घेतली. त्यातच त्यानं गणपरिषद मिटवली व स्वतःच सेनेचं नेतृत्व करीत त्यानं साम्राज्यविस्तारही केला. तसा त्यानं आपल्या राज्याचा विस्तार करतांना त्यानं जरासंधाची मैत्री केली होती. त्यातच तो युद्धामध्ये जरासंधालाही मदत करीत होता. कारण त्याला मोठेपणी हे माहित नव्हते की तो यादवकुलीन असून क्रिष्ण त्याचा भाऊ आहे.
आज जरासंध क्रिष्णावर नाराज होता. कारण क्रिष्णानं त्याच्या मुलीला विधवा केलं होतं नव्हे तर क्रिष्णानं त्याच्या जावयालाही बराच त्रास दिला होता.
जरासंध मगधचा राजा होता. तो हूशार होता. तसेच युद्धामध्ये त्याला कोणी पराजीत करु शकत नव्हते. त्यानं कित्येक राज्यांना आपल्या कारागृहात बंदी केले होते. त्यानं त्यांना ठार केले नव्हते. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचं कारण म्हणजे त्याला या एकशेएक राजांचा बळी द्यायचा होता एकाचवेळी. ज्यामुळं तो अमर होणार होता.
तो मथूरा नरेश कंसाचा मित्रच नाही तर नंतरच्या काळात सासराही बनला होता. कारण कंसानं जरासंधाच्या अस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन्ही मुलीशी विवाह करुन त्यांना पट्टराणी बनवले होते. परंतू कंसाला क्रिष्णानं ठार केल्यानं जरासंघानं कंसवधाचा बदला घेण्यासाठी मथुरेवर सतरा वेळा स्वा-या केल्या होत्या. त्यामुळं क्रिष्ण परेशान होता. कारण त्या स्वा-यानं कित्येक निरपराध माणसं मारली जात होती.
जरासंधाच्या बापाचे नाव बृहद्रथ होते. त्यांना दोन राण्या होत्या. त्यातच तो राजा आपल्या दोन्ही राण्यांना एकच संतान हवी अशी इच्छा करुन होता. परंतू ते सहज शक्य नव्हते. त्यातच बृहद्रथ म्हातारा झाला होता.
एकदा राजानं ऐकलं की त्याच्या राज्यात एक महर्षी चंडकौशीक आले आहेत. जे एका आंब्याच्या झाडात थांबले आहेत. ते फार सिद्धीप्राप्त आहेत. ते ऐकताच बृहद्रथ त्या राजाजवळ गेले. त्यांना आपली कहाणी सांगीतली. त्यातच त्या मुनीला दया आली व त्या मुनीनं बृहद्रथाला एक आंबा दिला व सांगीतलं की हा आंबा दोन्ही राण्यांना खायला द्या.
राजा बृहद्रथाला दोन राण्या होत्या. दोघींवरही राजाचं सारखं प्रेम होतं. त्यामुळं त्यानं त्या आंब्याचे दोन समान तुकडे केले व दोन्ही राण्यांना ते समान तुकडे एकेक असे खायला दिले. त्यातूनच त्या दोन्ही राण्यांना अर्धे,अर्धे पुत्र झाले. त्यातच त्या दोन्ही राण्यांना भीती वाटली व त्यांनी त्या तुकड्यांना त्या आमवनात फेकले. त्यातच त्यावेळी एक तेथूनच जरा नामक एक राक्षसी जात होती. तिनं ते पाहिलं. तिनं ते तुकडे जोडले. त्यातच तिनं त्या तुकड्यांना जीवनदान दिलं व ते एकजीव झालेले दोन तुकडे एकत्र करुन जे बाळ तयार झालं. ते बाळ तिनं राजा बृहद्रथाला दिलं. अशाप्रकारे जरासंधचं माव जरासंध असं पडलं.
जरासंधनं अंदाजे ८६ राजांना कैद केले होते. तो पिशाच्यासमान राजांना वागवत होता. त्यानं त्या राजांना पहाडी भागात कैद केले होते.
जरासंध महाभारत काळातील एक शक्तीशाली सम्राट म्हणून पुढे आला होता. त्याचेजवळ विशाल सेना होती. त्यातच तो अतिशय क्रूर व अत्याचारीही होता. त्यानं काशी, कोशल, चेदि, मालवा, विदेह, अंग, वंग, कलिंग, पांड्य, सौबिर, मद्र, काश्मीर आणि गांधारच्या राज्यांना पराभवी करुन त्यांना मांडलिक बनवले होते. त्यातच काही जणांना मित्र. त्यापैकी त्याचा सर्वात जवळचा मित्र होता चेदिचा यादव राजा शिशूपाल. याशिवाय अासामचा राजा भगदन्त व मद्र देशाचा राजा शल्यराज, यवनदेशचा राजा कालयवन, कामरुपचा राजा दंतवक्र, कलिंगचा राजा पौण्ड्र, भीष्मकपुत्र रुख्मी, अंग, बंग, कोशल, दषार्ण, भद्र, त्रिगर्त इत्यादी राज्याचे राजे त्याचे मित्र होते. त्याला चक्रवर्ती सम्राट बनायचे होते. त्यातच शाल्वराज, पवनदेशचा भगदत्त, गाधारचा सुबल, नग्नजीतचा गोभर्द, दरद हेही मित्रच असल्यानं संपुर्ण भारतात त्यावेळी त्याचा दबदबा होता.
जरासंधचा आणखी एक मित्र होता कालयवन. कालयवन जेव्हा जरासंधसोबत मित्रता बनवून क्रिष्णावर चालून आला. तेव्हा क्रिष्ण आणि कालयवन या दोघानं ठरवलं की निरपराध सेनेला मारण्याऐवजी आपण दोघं लढू. त्यातच कालयवनला शिवभगवानाचं वरदान प्राप्त असल्यानं तो अमर असल्याचं त्याला वाटत होतं. त्यातच गर्वातच तो म्हणाला, की घाबरतो कोण तुला. हिंमत असेल तर दोघंही लढू. त्यातच श्रीकृष्णानंही शर्त मानली आणि कालयवननही. परंतू जेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरु झालं. तेव्हा क्रिष्ण मैदान सोडून पळू लागला. कालयवन देखील त्याच्या मागे धावू लागला. त्यातच शेवटी क्रिष्ण एका गृहेत गेले. तिथे एक व्यक्ती झोपला होता. त्याचे नाव होते मुचुकूंद. त्याला झोपण्याचे वरदान मिळाले होते. त्यातच त्याला मध्यंतरी जो कोणी उठवेल. तो जळून भष्म होईल. असा तो वरदान. त्या वरदानाबाबत क्रिष्णाला माहित होते. त्यामुळं त्यांनी कालयवनला त्या गृहेत नेलं. परंतू तिथे गृहेत शिरताच क्रिष्ण ओझल झाला व झोपलेल्या मुचुकूंदला कालयवन लाथेनं क्रिष्ण समजून उठवू लागला. त्यातच वेळेपुर्वी मुचुकूंद उठला व त्यानं कालयवनला जाळून भष्म केले.
************************************************
एकलव्य बापाच्या मृत्यूनंतर श्रृंगपुरवेरचा सम्राट बनताच तो आपल्या पित्याची जरासंधासोबतची मित्रता निभावू लागला. त्यातच ज्या ज्यावेळी जरासंध मथूरेवर कंसवधाचा बदला घेण्यासाठी आक्रमण करीत असे. तेव्हा तेव्हा एकलव्यही त्या जरासंधाला युद्धात मदतच करीत असे. त्याची त्या चारही बोटानं बाण चालविण्याची हातौटी वाखाणण्याजोगी असायची.
कंस हा अत्याचारीच राजा होता. त्यानं आपले वडील उग्रसेनला हटवून त्या जागी स्वतःला स्वतंत्र्य राजा घोषीत केले होते. तसेच उग्रसेनाला कैदेत टाकले होते. त्यातच आपली बहिण देवकी व वासूदेवालाही बंदीगृहात ठेवले होते.
कंस हा चंद्रवंशी यादव राजा होता. तो क्रिष्णाची आई देवकीचा भाऊ होता. कंसाच्या आईचे नाव पद्यावती व वडीलाचे नाव उग्रसेन होते.
कंस आपल्या राजगादीवर येताच त्याचे प्रजेवर अत्याचार वाढतच होते. ते पाहता देवांना चिंता पडली आणि म्हटलं जातं की प्रजेला भयमुक्त करण्यासाठी क्रिष्णाचा जन्म झाला.
क्रिष्णाचा जन्म बंदीगृहात झाला. त्यातच म्हटलं जातं की देवकीचे सहा पुत्र मारल्यानंतर सातवा पुत्र रोहिणी गर्भात गेला व आठवा पुत्र मारु नये म्हणून ज्या रात्री क्रिण्णाचा जन्म झाला. त्या रात्रीच क्रिष्णाला वासूदेवानं नंदाच्या घरी नेवून सोडलं. त्यावेळी बंदीगृहातील दरवाजे आपोआप उघडे झाल्याचे,उल्लेख पुराणात सापडतात. कंसाला ठार करतांना क्रिष्णानं पुष्कळ सा-या लीला केल्या.
कंसाचा जन्म साधारण जन्म नव्हता. एकदा दुर्मीला नामक मनाची शक्ती वाचण्यासाठी प्रसिद्ध असलेला गंधर्व मनाची शक्ती वाचण्यासाठी फिरत होता. अशातच त्या गंधर्वनं उग्रसेन राणी पद्यावतीशी उग्रसेन बनून समागम केला. परंतू समागमाअंती हा गंधर्व जेव्हा आपल्या अस्सल रुपात आला. तेव्हा राणी पद्यावतीला अतिशय वाईट वाटले. तिला भयंकर राग आला. कारण ती सतीत्वाची एक देवी होती. त्यातच तिला त्या गंधर्वाचं बाळ नको होतं. म्हणून तिनं त्या गंधर्वासमोरच आपल्या स्वगर्भाला शाप दिला की तिला होणारे मुल हे राक्षस म्हणून जन्माला येईल. म्हणतात की वास्तवमध्ये कंस आपल्या मागील जन्मात कावानेमी नावाचा राक्षस होता. ज्याला भगवान विष्णूनं ठार केलं होतं.
कंस आपल्या आठ भावामध्ये प्रसिद्ध योद्धा होता. ज्यावेळी जरासंधनं मथुरेवर पहिल्या वेळी आक्रमण केले. तेव्हा कंसानं एकट्यानं जरासंधाच्या सेनेला परास्त केले होते. त्यातूनच प्रभावीत होवून जरासंधनं आपल्या दोन्ही मुलींचा विवाह कंसाशी केला. त्यातच आता जरासंध व कंस दोन्ही एकत्र झाल्यानं कंसाची शक्ती फारच वाढली होती.
कंस राजा बनताच जेव्हा अत्याचार करीत होता प्रजेवर. तेव्हा योगमायानं आपल्या योगसामर्थ्यानं आकाशवाणी केली की देवकी व वासूदेवाची आठवी संतान तुझा वध करेल. त्यातच कंस भयभीत झाला व त्यातच भीतीनं कंसानं आपली बहिण देवकी व वासूदेवाला बंदीगृहात टाकले व एकामागून एक तिचे सहा पुत्र मारले. त्यानंतर क्रिष्ण जेव्हा मोठा झाला, तेव्हा त्यानं कंसाचा वध करुन त्याजागी आपण स्वतः राजा न बनता त्यानं आपल्या आजोबाला म्हणजे उग्रसेनाला राजगादीवर बसवले व स्वतः नियंत्रक म्हणून राज्यकारभार पाहू लागला.
(लेख कुणाचा माहित नाही. आधार म्हणून क्षमा मागून घेत आहे)
कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ होता, तशी ह्याची शिकवणही गूढ होती. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.
कृष्ण खोडकर होता. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नव्हता. अभिमन्यू चक्रव्यूहात असाच फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच. चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने काही सांगितलं नव्हतं. कृष्ण होताच असा अजब. आपल्याला फसवत होता. गंमत बघत होता. फुकटात काही देत नव्हता. अर्धा मार्ग दाखवत होता फक्त. रस्ता थोडासा उघडत होता. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावत होता. मोफत काही देत नव्हता.
तो म्हणत असे की चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नव्हता. काढू शकत होता, पण काढत नव्हता. फार चलाख होता तो. चालू होता. असंच म्हणा. हवं तर... चक्रव्यूहात सोडत होता आणि गंमत बघत होता.
तो सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात तर दोष देत बसू नका असे म्हणत होता. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहिले तर फक्त सौम्य हसत होता. फार अर्थ होता ह्या हसण्यामागे. तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगत होता. जे करायचे ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा.
त्यानं अर्जुनाला असंच अडकवलं होतं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जून जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता. स्वतः अर्जूनालाही वाटत होतं की आपण जिंकू शकत नाही.
श्रीकृष्णानं त्यावेळी सांगीतलं की मी "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" अशी शप्पथ घेऊन तो रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता तरीही. पण निशस्त्र! वरून अर्जूनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन.
*विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था*
*कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था*
*भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था*
कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल तो. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज. त्यातच अर्जून भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जूनामध्ये जिंकण्याची क्षमता होती म्हणून. तेही कृष्णाला पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुस-याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो.
*यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।*
*तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥*
जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे, तिथे विजय निश्चित आहे. का नसणार.? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल.
असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षीत होतो, कोण येतो हे तो बघत बसतो.
*रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने*
*रंगलो...कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो...*
तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती - अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.
*धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥*
तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन. म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.
कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे. श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत. श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली. आपले काहीही सुटत नाही. कारण आपण मोहमायात गुरफटले आहोत.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात जात नाही. कृष्ण आनंदाचा देव आहे. कारण एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही.
श्रीक्रिष्ण...... हिंदू धर्मात त्याला देव मानल्या जातं. क्रिष्णाबाबत विचार केल्यास क्रिष्ण हा देव नाही तर तो एक माणूसच आहे. हुशार माणूस. ज्यानं आपल्या अक्कलहुशारीनं सर्व सीमा प्रतिबंधीत केल्या होत्या. कंस हा दृष्ट विचारांचा प्रतिक होता तर क्रिष्ण सुविचारांचा. त्यातच कंसाचाच अत्याचार नाही तर इतर मानवांचा अत्याचार वाढत असल्यानं तो मिटविण्यासाठी क्रिष्णासारख्या चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाचा जन्म झाला.
प्रजा.......त्या प्रजेचे हितसंबंध जोपासणे हे चांगल्या राजाचे कर्तव्य असते. परंतू पुर्वी जे ही काही राजे रैजपदावर बसत. त्यापैकी काही राजे हे प्रजाहितदक्ष राहायचे. तर काही राजे हे वाईट प्रवृत्तीचे. कालयवन, जरासंघ, एकलव्य, कंस, शिशूपाल हे राजे याच श्रेणीतील. जे राजे बनताच प्रजेवर अत्याचार करायला लागले होते. त्यांचा अत्याचार हा अगदी सहन होत नव्हता. शेवटी तो अत्याचार दूर व्हावा यासाठी व असत्यावर सत्याचा विजय मिळविण्यासाठी क्रिष्णाची निर्मीती झाली.
क्रिष्ण वासूदेव व देवकी यांची आठवी संतान. त्याचा जन्म बंदिगृहात जरी झाला असला तरी तो मरु नये म्हणून नियतीनं तो होताच त्याला गोकुळात हलवलं. ज्यावेळी हलवलं, त्यावेळी यमुना अगदी तुडूंब भरली होती. त्यातच वासूदेव तर अख्खा बुडालाच होता यमुनेत. परंतू क्रिष्णाला गोकुळात पोहोचविण्याची जिद्द मनात असल्यानं वासूदेवानं यमुना कशीबशी पार केली. त्यातच तो त्या बाळाला त्या अर्ध्या रात्री गोकुळात यशोदा व नंदाजवळ ठेवून आला. तशी यशोदेला झालेली मुलगी योगमायालाही तो घेवून आला.
कंसाला बाळ जन्माची गोष्ट माहित होताच तो बंदीगृहात आला. त्यानं मुलीला पाहिलं व तो खदखदा हसला. त्यातच त्यानं तिचा जीव घेण्यासाठी खाली दगडावर आपटण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचे पूर्ण प्रयत्न विफल झाले. तशी योगमाया आकाशात गेली व म्हणाली,
"मुर्ख कंसा, माझा का तू जीव घेतोस. तुझा वध करणारा तो बालक केव्हाचाच जन्मास आला आहे."
त्यानंतर ती योगमाया खदखदा हसली व अंतर्धान पावली. तद्नंतर कंसानं त्याला मारण्यासाठी पुतना पाठवली. बकासूर, कागासूर पाठवले. गोकुळवासीयांचं अर्थाजन बंद व्हावं म्हणून कालियाला पाठवलं. कालिया डोहात लपून बसला व पूर्ण तलावाचं पाणी त्यानं विषयुक्त केलं. जे पाणी पिताच गोकुळातील गाई मरुन जायच्या. परंतू क्रिष्णाचं मरण नव्हतंच त्याच्यामुळं. शेवटी क्रिष्ण तरला व त्यानं कंसाला ठार करुन प्रजेला त्याच्या होत असलेल्या अन्यायातून बाहेर काढले. त्याचबरोबर त्यानं तुर्णावत, शकटासूर नावाचे राक्षसही ठार केले.
ते जंगल. त्या जंगलातील भयाण वाटा पाहिल्या होत्या त्या एकलव्यानं. अगदी लहानपणापासूनच एकलव्य ते मोठमोठे जंगल पार करीत व मोठमोठे डोंगर चढत होता एकलव्य. त्यातच तो बलवान बनला होता.
जरासंध. कंसाचा सासरा होता तो. कंसाचा क्रिष्णानं वध करताच तो अगदी चिडून गेला होता. त्यातच कधीमधी तो आक्रमण करीत होता मथूरेवर. आज त्या आक्रमणानं श्रीक्रिष्णानं द्वारका नगरीचीही निर्मीती केली होती. परंतू तरीही आक्रमणं थांबले नव्हते.
युद्ध सुरु झाल्यानंतर पराभव होताच जरासंध पळून जायचा व पुन्हा या त्या राजांना घेवून तो परत आक्रमण करण्यासाठी यायचा. आजही तसंच जरासंधनं आक्रमण केलं होतं आणि आज सोबतीला एकलव्य होता.
एकलव्यनं नुकताच राजसुर्य यज्ञ केला होता आपल्या राज्यात. त्यातच त्यानं देशोदेशीचे राजे बोलावले होते. त्यातच इंद्रप्रस्थ नगरीचा राजा असलेला युधीष्ठर, त्यालाही बोलावलं होतं यज्ञाला. यातच या यज्ञात युधीष्ठरचा सन्मान केला होता त्यानं. तो सन्मान म्हणजे जुते. त्यानं युधीष्ठरला जुते भेट दिले होते.
तो जेव्हा राजगादीवर बसला. तेव्हा जरासंधसोबत मथुरेत येवून युद्ध करीत असे. त्यातच जरासंध त्याची वीरता पाहून त्याला सेनापती बनवीत असे. कारण त्याला धनुष्यबाण अतिशय चपळाईनं चालवता येत असे. एकलव्य चारही बोटाच्या सहाय्याने तिरंदाजी करीत असे. कारण त्याच्यात तिरंदाजी कला कुटकूट भरली होती.
कंस मृत्यूचा बदला घेण्यासाठी एकलव्य जरासंध सोबत मिळून जेव्हा मथूरेवर चालून यायचा. तेव्हा खुद्द क्रिष्णालाही आश्चर्य वाटायचं. कारण त्याची बाण चालविण्याची प्रथा अप्रतिम होती. ज्यावेळी मथेरेवर आक्रमण व्हायचं आणि पराभव होताच जरासंध पळून जायचा. तेव्हा क्रिष्ण एकटा आपल्या यादवसेनेला न्याहाळत बसायचा. तेव्हा त्याला ते मरण पावलेले यादव वीर दिसायचे व हसत असलेला एकलव्य. परंतू क्रिष्ण शांत बसायचा. कारण त्याला एकलव्याला मारायचंच नव्हतं. त्याला वाटत होतं की असाही वीर जीवंत असावा की ज्याची चार बोटानं बाण चालविण्याची कला जगाला प्रेरणा देईल. एक ना एक दिवस त्या एकलव्याच्या विचारात फरक पडेल व तो सुधारेल. त्यातच तो जरासंधाला मदत करणार नाही. परंतू युद्ध होत असत, जरासंध नवीन दमानं काही राजांच्या सहकार्यानं युद्ध करण्यासाठी येत असे. त्यातच एकलव्यही. कारण जरासंध दृष्टप्रवृत्तीचाच होता.
आजचं ते आक्रमण श्रीकिष्णाला थोपवणं जड जात होतं. कारण एकलव्य जरासंधाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आला होता युद्ध करायला. तो जेव्हा तीर चालवत असे. तेव्हा त्या तीरानं शेकडोंच्या संख्येत यादव सेना मारली जात असे. काय करावं सुचत नव्हतं क्रिष्णाला. त्यातच या युद्धात अर्जूनाचा एक प्रिय मुलगाही मारला होता एकलव्यानं.
श्रीक्रिष्णानं ते पाहिलं. तसा नरसंहार करणारा एकलव्य पाहिला. तसा तो मनात विचार करु लागला की हा एकलव्य. हा एकलव्य जर जीवंत राहिला तर उद्या आपल्याला धोका होवू शकतो. आपली द्वारका कधीच सुखी राहू शकणार नाही.
क्रिष्णाचा तो विचार. एकलव्याला मारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण महाभारताचं युद्ध सुरु होणार होतं. तसा पुन्हा क्रिष्ण विचार करु लागला.
'एकलव्य. याला आज जर जीवंत ठेवलं तर उद्या महाभारत युद्धात हा हिरीरीनं भाग घेईल. तो भाग घेतांना पांडवांच्या बाजूनं भाग घेणार नाही तो शत्रूपक्षाच्या बाजूनं भेट घेईल. मग काय पांडवांना पराभवाचा सामना करावा लागेल. धर्मावर अधर्माची जीत होईल. सत्य हारेल व असत्य जिंकेल. काय करावं.'
क्रिष्णाचा तो विचार. शेवटी नाईलाज होता. त्यातच शेवटी क्रिष्णानं एकलव्याला चक्रव्युहात व बोलण्यात अडकवलं. तसं सुदर्शन चालवलं व एकलव्याचा अंत केला.
एकलव्य मरण पावला होता. परंतू त्याची इच्छाशक्ती मरण पावली नव्हती. त्याची इच्छाशक्ती होती द्रोणाचार्यचा वध करणं. त्यानं द्रोणाचार्यला अंगठा तर दिला होता एका झटक्यात कापून. तसाच अगदी आनंदानं हसतहसत. परंतू ते शल्य आजही त्याच्या मनामनात शलत होतं. ते दुःख त्याला काट्यासारखं बोचत होतं. वाटत होतं की केव्हा द्रोणाचार्य युद्धामध्ये आमोरासामोर येतो आणि केव्हा केव्हा त्याला मारतो. त्याला वाटत होतं की गुरुला मारताच तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल व त्याला अर्जूनलाही धडा शिकवता येईल. परंतू ही त्याची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. कारण द्रोणाचार्य कधीच युद्धात आजपर्यंत सामोरासमोर आला नव्हता. त्यामुळं ती इच्छा तो मरताच नेस्तनाबूत झाली.
ती दुर्दैम्य इच्छाशक्ती. त्यातच ती इच्छाशक्ती पूर्ण न झाल्यानं त्याला दुसरा जन्म घ्यावाच लागणार होता. तसंच कदाचित मागील जन्मातही त्याची इच्छा पूर्ण होणार नव्हती. कारण तो दुर्योधनाशी मित्रत्व असल्यानं त्याचेच बाजूनं लढला असता. त्यातच द्रोणाचार्यही दुर्योधनाच्या बाजूनंच लढण्यानं एकलव्याला ती इच्छा पूर्ण करता आली नसती. म्हणून की काय, त्याला आपला याजन्मीचा अवतार संपवावा लागला. त्यातच क्रिष्णाला तो विरुद्ध बाजूनं असल्यास पांडव जिंकू शकणार नाही हे भाकीत आधीच माहित असल्यानं क्रिष्णानं त्याला ठार केलं.
एकलव्य मरण पावला होता. त्यातच त्याचा दुसरा जन्म झाला. कारण त्याची इच्छाशक्ती पूर्ण झाली नव्हती. कोणी म्हणतात की द्रोणाचार्यला मारायचे असल्यानं त्यानं ध्रृपद पुत्र ध्रृष्ठधुम्नच्या रुपात जन्म घेतला होता.
ध्रृपद मित्र होता द्रोणाचार्यचा. त्यातच तो गरीब असल्यानं द्रोणाचार्य जेव्हा नदत मागायला ध्रृपदकडे गेला. तेव्हा ध्रृपदनं अपमान करुन द्रोणाचार्यला भर दरबारातून हाकलून दिले. त्यातच अपमानीत होवून गुरु द्रोण बदल्याची भावना मनात ठेवून पांचाल नरेश ध्रृपदला नष्ट करु पाहात होता. त्यातच तो प्रशिक्षीत करीत होता आपल्या प्रिय शिष्यांना. तसा तो अर्जूनालाही शिकवीत होता.
सर्व शिष्य आज प्रशिक्षीत झाले होते. त्यातच तो त्यांना शिकवीत असतांना त्याच्या मनात त्या ध्रृपदचा विचार येई व बदल्याची भावना जागृत होई. तसे आज राजकुमार प्रशिक्षीत झाले होते. तसा एक दिवस संधी साधून गुरु द्रोण आपल्या सर्व शिष्यांना म्हणाला,
"आपण सर्व प्रशिक्षीत झाला आहात. तेव्हा पूर्ण शिक्षण होताच गुरुदक्षीणा हवी असते. ती गुरुदक्षीणा. जशी एकलव्यानं दिली होती. ते आपण पाहिलंतच."
द्रोणाचार्य बोवून गेला खरा. परंतू सर्व शिष्य घाबरले. त्यांना वाटलं की कदाचित गुरु द्रोण आपला तर अंगठा मागणार नाही. निदान एखादा अवयव! ते पुरते घाबरले होते. ते घाबरणं स्पष्टपणे त्यांच्या चेह-यावर दिसत होतं. तसे भाव द्रोणाचार्यही त्या मुलांच्या चेह-यावर पाहात होता. तसा घाबरत घाबरत अर्जून म्हणाला,
"गुरुदेव म्हणजे आपण एकलव्याचा जसा अंगठा मागीतला, तसा आम्हीही अंगठाच द्यायचा काय?"
द्रोणाचार्यनं ते सगळं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"घाबरु नका माझ्या प्रिय शिष्यांनो. मी तुम्हाला अंगठा वैगेरे काही मागणार नाही. परंतू जोखमीचं काम नक्कीच देणार."
"म्हणजे?" शिष्य म्हणाले,
"मला ठाऊक आहे की तुम्ही सर्व प्रशिक्षीत झाला आहात. तेव्हा मला माझा प्रिय शत्रू तुमच्याकडून जायबंदी झालेला बघायचा आहे. तुम्ही सर्व मिळून ध्रृपदला जिवंत स्वरुपात माझ्या समक्ष जायबंदी करुन आणायचं आहे. तीच माझी गुरुदक्षीणा असेल. बोला कराल का जायबंदी राजा ध्रृपदला. आणाल का त्याला पकडून माझ्याकडे."
सर्व शिष्यानी ते बोलणं ऐकलं द्रोणाचार्याचं. त्यातच ते एकमेकांकडे पाहू लागले. तसा अर्जून उभा झाला आणि म्हणाला,
"गुरुदेव आम्ही तयार आहोत. आम्ही आणू ध्रृपदला बंदी बनवून. आम्ही त्यांना लवकरच तुमच्या समक्ष हजर करतो. आपण फक्त आज्ञा द्या."
अर्जूननं तसं म्हणताच सर्व शिष्यांनी होकार दिला व ते सर्वजण ध्रृपद राज्याच्या दिशेनं चालू लागले. ते जंगल आणि डोंगर द-या ओलांडून, खाचखळगे पार करीत ते चालले होते. थोड्याच वेळात ते पांचाळ नरेशचं राज्य आलं. तसं अर्जूनानं एक दूत पाठवला.
दुतानं समाचार देताच ध्रृपदही सैन्य घेवून सामोरासामोर चालून आला. त्यानं पाहिलं की समोर लहान लहान मुलं असून ते त्याला आव्हान देत आहेत. तसा त्याला अहंकार चढला. परंतू जेव्हा अर्जूनानं सपासप बाण त्याच्या दिशेनं चालवले व त्याला जायबंदी केलं. तेव्हा त्याचा भ्रम तुटला. ध्रृपदला अर्जूनानं जायबंदी करताच बाकीचे ध्रृपदचे सैन्य पळू लागले. तसा ध्रृपद जायबंदी झाला होता.
ध्रृपदला जायबंदी केल्यावर अर्जून तसंच त्याच्या प्रिय मित्रांनी त्याला द्रोणाचार्ससमक्ष हजर केलं. त्यातच द्रोणाचार्यंनं त्याचाही अपमान केला व त्याच्याकडून अर्ध राज्य छिनून घेतलं.
बदल्यावर बदला. त्यातच अपमानावर अपमान. ध्रृपदनं आधी अपमान केला होता द्रोणाचार्यचा आणि आता द्रोणाचार्यनं ध्रृपदचा अपमान केला. त्यातच आता ध्रृपदामध्ये बदल्याची भावना निर्माण झाली होती.
बदल्याच्या भावनेनं प्रेरीत झालेला ध्रृपद चालत होता ती वाट. तसं पाहता त्याला कोणतीही संतान नव्हती. त्याला वाटत होतं की बदला जर घ्यायचा असेल तर आपल्याला संतान हवी. कारण संतान जर नसेल तर मी बदला घेवू शकणार नाही. कारण आता तो युवावस्थेकडून म्हातारपणाकडे गेला होता.
चालता चालता ध्रृपद अनेक संतांकडे गेला. त्यातच त्यानं आपली कथनी सर्व संतांना कथन केली. परंतू कुणाकडूनच फायदा झाला नाही त्याला. कुणी मार्गही सांगीतला नाही. त्यातच तो फिरता फिरता कल्माषी नगरात आला.
ते कल्माषी नगर. सुसंपन्न नगर होतं. त्या नगरात दोन सख्खे भाऊ राहात होते. त्यांची ख्याती राजा ध्रृपदानं ब-याच दिवसापासून ऐकली होती. तो प्रथम उपयाजकडे गेला. तसं त्यानं त्याला सांगीतलं की माझा द्रोणाचार्यनं अतिशय अपमान केलेला असून माझं अर्ध राज्य आणि अर्ध पशूधनही त्यानं हिसकावलं आहे. काय करावं सुचत नाही. मला माझं राज्य हवं आहे गमावलेलं. परंतू ते मी मिळवणार कसं? मला तर संतान नाही. मला संतान हवी. दिव्य संतान.
उपयाजनं ते ऐकलं. परंतू त्यांनी मदत देण्यास नकार दिला. त्यातच राजा ध्रृपदला वाटलं की जर आपण या उपयाजची वर्षभर सेवा केली तर कदाचित उपयाज मला पुत्रप्राप्तीच्या यज्ञाच्या कार्यात मदत करेल. त्यातच तसा विचार करुन तो उपयाजची दिवसरात्र सेवा करु लागला.
वर्ष झालं होतं. तसा उपयाज ध्रृपदच्या सेवेनं प्रसन्न झाला. म्हणाला,
"तू माझ्या भावाकडे जा. माझा भाऊ नक्कीच तुम्हाला मदत करेल. जो माझ्यापेक्षा मोठा आहे."
उपयाजचं ते बोलणं. राजा ध्रृपद याजकडे गेला. याजला ती वस्तूस्थिती सांगीतली व याजनं त्याची कथनी ऐकून यज्ञ करवला व त्या यज्ञातून दोन दिव्य बालक उत्पन्न झाले. पहिला बालक पुत्र होता तर दुसरा बालक एक पुत्री होती. त्या यज्ञातून जो दिव्य बालक उत्पन्न झाला. त्या बालकाच्या मस्तकावर एक राजमुकूट होता. शरीर कवचानं वेढलेलं होतं. तसेच हातात धनुष्यबाण होता. अशातच एक दिव्य आकाशवाणी झाली की हाच बालक राजा ध्रृपदाची सर्व चिंता मिटवेल. हाच बैलक एकलव्य होता. ज्याची इच्छा त्याच्या पुर्व जन्माच्या एकलव्याच्या रुपात पूर्ण झाली नव्हती.
तो दिव्य बालक प्राप्त होताच राजाला मोठा आनंद झाला व त्यानं त्याचं नाव ठेवलं ध्रृष्ठधुम्न.
त्या यज्ञातून एक मुलगीही जन्मास आली. ती सुंदर होती. तशी तिच्या जन्मानंतरही एक आकाशवाणी झाली होती. त्या आकाशवाणीनुसार देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी या कन्येची निर्मीती झाली असून समाजातील दृष्ट प्रवृत्ती पुर्णतः समाप्त करण्यासाठी देखील हिची निर्मीती झाली आहे.
ते दोन्ही बालक. ते निर्माण होताच ध्रृपद राणी महात्मा याजकडे गेली व म्हणाली,
"महात्मा, आम्हा दोघा व्यतिरीक्त या बालकांनी कोणालाही माता पिता म्हणू नये."
महात्मा याजने तथास्तू म्हटलं. त्याचबरोबर ते दोन्ही बालक त्यानं ध्रृपदला सोपवले. याजनं त्यानंतर त्या बालकांचं नामकरण केलं. म्हटलं की या बालकाची उत्पत्ती ही अग्नीतून झालेली असून अग्नीकुंडाच्या द्युतीनं झालेली आहे. म्हणून याचं नाव द्यृष्ठधुम्न व ही बालिका कुष्णवर्णाची असून हिचं नाव कृष्णा ठेवावं. परंतू ती मुलगी ध्रृपदची मुलगी असल्यानं पुढं ती बालिका द्रोपदी म्हणून जग विख्यात झाली.
द्रोपदी पुर्व जन्मात माता सीता होती असं म्हटलं जातं. कारण ज्यावेळी सीता मारीच रुपातील हरणाला पाहते आणि सीतेच्या जिद्दीनं राम मारीच हरणाला पकडायला जातो. तेव्हा राम मारीच नावाच्या हरणावा पकडण्यापुर्वी सीतेला अग्नीच्या स्वाधीन करतो. त्यानंतर खरी सीता अग्नीजवळ असते व सीतेच्या आत्म्याचं अपहरण रावण करतो. परंतू ती गोष्ट राम आपल्या प्रिय बंधूला लक्ष्मणाला सांगत नाही. कारण ती एक परीक्षाच असते.
सीता ही पुर्वजन्मात वेदवती होती. ज्यावेळी राम रावण युग्द झालं आणि सीता रामाजवळ आली. तेव्हा रामाला ती म्हणाली की तुम्हीच मला पुढी जन्मात पती म्हणून हवे. त्यावर राम सीतेला म्हणाला,
"येथून पुष्करला जा. तपश्चर्या कर. तुझ्या सा-या इच्छा पूर्ण होतील."
रामानं तिला तसं म्हणताच ती पुष्करला गेली. तिथं एका जंगलात ती तपश्चर्या करु लागली. त्यातच तिच्या तपश्चर्येवर शिवभगवान प्रसन्न झाले व त्यांनी तथास्तू म्हटलं.
यावेळी शिवभगवानसमोर तपश्चर्या करतांना वेदवती उर्फ सीता म्हणत होती की मला एक पती हवा. परंतू या एका पतीचे बोल तिनं पाचवेळा म्हटले. म्हणून तिला पुढील जन्मात पाच पती मिळाले असे म्हटले जाते.
ध्रृपदच्या मनात राग खदखदत होता. त्याचबरोबर त्याचा पुत्राच्याही मनात. कारण त्याच्या पुत्राची ध्रृष्टधुम्नची मागील जन्मातील इच्छा पूर्ण झाली नव्हती. ध्रृपदला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. तर ध्रृष्टधुम्नला त्याच्या मागील जन्मातील अंगठा मागीतल्याचा बदला. त्याला वाटत होते की हं, मागावीही गुरुदक्षीणा. परंतू ती गुरुदक्षीणा म्हणून कोणाचे शरीरअवयव. ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट वाटत होती ध्रृष्टधुम्नला.
एकलव्याचं रुप संपवून या जन्मात एकलव्य द्यृष्टधुम्नच्या रुपात आला खरा. तेही मागील जन्मात राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. त्यातच तो या जन्मात अतिशय सहिष्णू आणि धर्माचं पालन करणारा होता. त्याच्या मनात या जन्मात प्राणीमात्राची दया होती. तसेच तो मागील जन्मासारखा क्रुरही नव्हताच. या जन्मात तो परोपकारी असून सत्य असत्य आणि धर्मअधर्म त्याला उमगत होतं. अगदी तो आज्ञाकारी असून तो पित्याच्या आज्ञेत होता.
महाभारताचं युद्ध सुरु होणार होतं. त्यातच कौरव आणि पांडव सेना आमोरासामोर होणार होती. परंतू ते युद्ध सुरु होण्यापुर्वी काही प्रसंग घडले.
ध्रृष्ठधुम्ननं आपल्या बहिणीच्या विवाहाची विवाहाची जय्यत तयारी केली होती. त्यातच द्रोपदी सजली होती त्या स्वयंवरात. त्या स्वयंवरात एक प्रतियोगीता होती. खाली उकळत्या तेलात पाहून वर लटकलेल्या व फिरत्या मासोळीचा डोळा फोडणे. अत्यंत कठीण गोष्ट होती ती. परंतू अर्जून त्या परीक्षेत पास झाला व त्यानं ब्राम्हण रुपात येवून द्रोपदीला जिंकलं.
वचन तसेच आज्ञेचे पक्के होते ते लोक. त्यातच ती आई कुंतीची आज्ञा. कुंती वनवासात राहात असतांना पाच पांडव माधूकरी मागून आणत. ते दरवाज्याच्या बाहेरुनच कुंतीला सांगत व कुंती आणलेली माधूकरी दररोज समसमान आपापसात वाटून घ्यायला सांगायची. त्यातच आज त्यांनी द्रोपदीला स्वयंवरात जिंकून आणलं व ते दरवाज्याजवळ गेले असता कुंतीनं दररोजच्या नियमाप्रमाणे आपापसात वाटून घ्यायला लावलं. अशाप्रकारे द्रोपदी पाच पांडवांची झाली.
द्रोपदी पाच पांडवांची पत्नी जरी झाली असली तरी तिला अजीबात दुःख नव्हतं. त्यातच महत्वाचा प्रसंग घडला. तो द्यूत खेळ.
पांडवांनी इंद्रप्रस्थला राजधानी स्थापन केली होती. त्यातच ती राजधानी निर्माण केली होती विश्वकर्मानं. तेही इंद्राच्या आदेशानं. ती जेव्हा कौरवांनी पाहिली. तेव्हा ती राजधानी कौरवांच्या नजरेत भरली होती. तसेच या ठिकाणी शिसमहल पार करतांना तिथं असलेल्या चक्रविवरात फसून दुर्योधन तोंडबुचक्या पडला होता. ते पाहून द्रोपदी हसली.
द्रोपदी हसली खरी. परंतू तो दुर्योधनाला त्याचा भयंकर अपमान वाटला. शेवटी या अपमानाचा बदला काढण्याचा त्यानं निश्चय केला. त्यातच तो बदला काढण्यासाठी त्यानं द्यूत खेळ आयोजीत केला होता.
***********************************************

शकूनी .........दुर्योधनाचा मामा होता तो. तो हित अहित न पाहता हस्तीनापूरला नेस्तनाबूत करु पाहात होता. त्यातच त्यानंही पांडवांची इंद्रप्रस्थ नगरी पाहिली होती. तसा ती नगरी पाहताच तो जळून खाक झाला होता. त्यातच पांडवांची केव्हा केव्हा वनोधारी लागतात हे त्यालाही वाटत होतं. तो द्यूत क्रिडेत माहिर होता.
त्याच्या मनात द्वेष निर्माण होताच त्यानं दुर्योधनाला उकसवलं. द्यूतक्रिडेचं आमंत्रण दिलं पांडवांना. मग काय खेळ सुरु झाला व पांडव एक एक करीत डाव हारु लागले. शेवटी काहीच उरलं नाही. तेव्हा दुर्योधन म्हणाला,
"एक वस्तू आहे ना जी तू दावांवर लावू शकतोस."
"कोणती?" युधिष्ठीर म्हणाला.
तशी त्याची नजर द्रोपदीवर होतीच. क्षणाचाही वेळ न दवडता तो म्हणाला,
"द्रोपदी........द्रोपदी आहे ना दावावर लावायला. बोल लावतोय."
द्रोपदी........द्रोपदी लाडाची राणी होती पांडवांची. तसा युधिष्ठीरला भयंकर राग आला. परंतू आता राग करण्यात काही उपाय नव्हता. कारण सर्वच गेलं होतं. तसा दुर्योधन म्हणाला,
"कदाचित तू जिंकून जाशिल. विचार कर. बदल्यात मी तुला सर्व राज्य व सर्व गोष्टी परत करेल."
युधिष्ठीर विचार करु लागला. कारण त्यानं राज्यासमवेत आपले वीर भाऊही गमावले होते. त्यातच त्याला वाटलं की आपण या डावात जिंकलो तर.......
त्यानं तेवढा विचार न करता द्रोपदी डावावर लावली आणि तोही डाव हारला. शेवटी भर दरबारात द्रोपदीला आणण्यात आलं. तिची अब्रू वेशीवर टांगण्यात आली. तसा तिला क्रिष्ण आठवला.
द्रोपदीला क्रिष्ण आठवताच ती क्रिष्णाचा धावा करु लागली. कारण एकदा क्रिष्णाला जखम झाली असता जे कार्य सुभद्रानं केलं नव्हतं. ते कार्य द्रोपदीनं केलं होतं. तिनं आपली नेसलेली नवी कोरी साडी फाडून जखम बांधली होती.
तिनं श्रीक्रिष्णाचा धावा करताच क्रिष्ण धावून आला व द्रोपदीची भर दरबारात लुटली जाणारी अबू वाचवली. त्यामुळं द्रोपदीची अब्रू वाचली. परंतू याचा धसका घ्रृष्टधुम्ननं घेतला. त्याच्या म्हणण्यानुसार मोठमोठ्या गोष्टी करणारा द्रोणाचार्यही बसलेला होता. तो रोखू शकत होता कौरवांना असे कृत्य करण्यापासून. परंतू त्यानं रोखलं नाही.
दिवसामागून दिवस जात होते. महाभारतातील युद्ध सुरु झाले. अशातच ध्रृपदनं पांडवांच्या बाजूनं भाग घेतला. त्याचबरोबर ध्रृष्टधुम्ननंही पांडवांच्या बाजूनं युद्धात प्रवेश केला. त्यातच भिष्म पितामहा युद्धातून मृत्यूशय्येवर जाताच द्रोणाचार्य कौरवांचा प्रधान सेनापती बनला. त्यातच चौदाव्या दिवशी ध्रृपद राजा द्रोणाचार्याकरवी मारला गेला.
ध्रृपद मरताच पुन्हा धृष्टद्युम्नचा पारा सातव्या आसमानात गेला. तसं पाहता त्याच्या मनात द्रोणाचार्यबद्दल पूर्वीपासूनच रोष खदखदत होता आणि आज त्याचा पिता मृत्यूस प्राप्त झाला होता द्रोणाचार्यकडून. बस आता बदलाच बाकी होता. अशातच ती घडी आली.
योजना आधीच बनवली होती की भीमानं आश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा आणि गवगवा करायचा की आश्वत्थामा मारला गेला. ते ऐकून द्रोणाचार्य व्यथीत होईल व शस्र सोडेल. त्यानंतर त्या निशस्र द्रोणाचार्यवर वार करायचा. कारण द्रोणाचार्यच्या हातात जेव्हापर्यंत शस्र आहेत. तेव्हापर्यत त्याला मारणं कठीण आहे. फक्त यावेळी युधिष्ठीरनं थोडं खोटं बोलायची गरज आहे.
त्या घडीनुसार आज आश्वत्थामा मारला गेल्याचा सूर द्रोणाचार्यनं ऐकला. भीमानं आश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला होता. त्यातच द्रोणाचार्यनं ते ऐकताच तो फार व्यथीत झाला व त्यानं शस्र टाकले. तसा तो युधिष्ठीरकडे आला व विचारु लागला की खरंच हा माझा पुत्र आहे का?
"होय गुरुदेव. नरो वा कुंजरवा ."
अर्थात अश्वत्थामा नक्कीच होय. परंतू तो हत्ती की मानव माहित नाही.
गुरु द्रोणाचार्यनं ते ऐकताच तो त्याला वाटलं की तो त्याचा पुत्रच होय. तशी त्यानं शस्र टाकली व तो रथाच्या खाली आला. शोक करु लागला पुत्रविरहाचा. सर्वजण ते दृश्य पाहात होते. त्यातच त्यात ध्रृष्टधुम्नही होता.
तो ध्रृष्टधुम्ननं.........त्याला सर्व आठवत होतं. तो मागील जन्माचा इतिहास. याच द्रोणाचार्यनं आपले अंगठा कापून घेतला होता अन् यानंच आपल्या बापाला वनोधारी लावलं होतं आणि यानंच आपल्या बापालाही ठार केलं.
विचारांचा अवकाश. तो त्वेषानं उठला. म्यानातून तलवार उपसली व तो द्रोणाचार्यच्या दिशेनं चालू लागला. कारण द्रोणाचार्यला मारायची हीच नामी संधी त्याच्याकडे चालून आली होती.
थोड्याच वेळाचा अवकाश. द्रोणाचार्य हताश निराश बसला होता खाली मान घालून. सारेच भिरभिर पाहात होते. ते भिरभिर पाहात असताना व नको मारु असे युधिष्ठीर सांगण्यापुर्वीच ध्रृष्टधुम्ननं तलवार चालवली ती द्रोणाचार्याच्या मानेवर. अन् क्षणात विचार करण्यापूर्वी द्रोणाचार्य गतप्राण झाला.
द्रोणाचार्य मरण पावला होता. तसा एकलव्य उर्फ ध्रृष्टधुम्ननंचा बदलाही पूर्ण झाला. तशी ही बातमी द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामाला समजली. कोण मारलं तेही समजलं. तशी त्याच्याही मनात प्रतिशोधाची भावना जागृत झाली. तो क्रोधाधिष्ट झाला व संधी पाहू लागला. पण तशी संधी चालून येईना. शेवटी तो एक दिवस आला.

***********************************************

आज महाभारत युद्धाचा शेवटचा दिवस होता. कौरव सेनेचे सर्व वीर संपले होते. अश्वत्थामा बाकी होता. आता कोणीही वीर न उरल्याने तोच प्रधान सेनापती बनला होता.
ती रात्र तशी कालरात्रच होती. त्या रात्री सर्वजण आपापल्या शिबिरात झोपले होते. मात्र अश्वत्थामाला झोप येत नव्हती. तो विचार करीत होता तसेच जागाही होता. तसा तो मनात काहीतरी षडयंत्र योजत होता.
ते षडयंत्र योजून पूर्ण झाले होते की काय, अचानक तो उठला व आपल्या काही निवडक सवंगडंयांनाही उठवले व तो चालू पांडव शिबीराची वाट. ज्या शामियानात पांडव व त्यांचे हितसंबंधीय झोपले होते. सर्वात प्रथम तो ध्रृष्टधुम्नच्या शामियानात गेला. त्याला उठवलं व म्हटलं,
"तूच माझ्या नि:शस्र पित्याची मान कापली ना. आता बघ, मिही तुझी नि:शस्र असताना कशी मान कापतो."
त्यानंतर अश्वत्थामा त्याला मारु लागला. ध्रृष्टधुम्नही मार खावू लागला. कारण रात्रीच्या गर्भात झोपेत असताना व बेसावध असताना त्याला काहीच सुचत नव्हतं. शेवटी वेळ न दवडता अश्वत्थामानं म्यानातून तलवार उपसली व ती बेसावध अवस्थेत असलेल्या ध्रृष्टधुम्नच्या मानेवर चालवली व क्षणातच ध्रृष्टधुम्नंही रक्ताच्या थारोळ्यात चित झाला. अशाप्रकारे एकलव्य जो वीर म्हणून प्रसिद्ध होता. तो पहिल्या रुपात श्रीकृष्णाचे हातून व दुस-या जन्मात अश्वत्थामाच्या हातून मारला गेला. परंतू मरण्यापुर्वी त्यानं आपला बदला पूर्णपणे पूर्ण केला होता. तो ध्रृष्टधुम्नच्या जन्म घेवून. म्हणूनच लोकांना तो बदला लक्षात राहिला नाही. कारण या जन्मात तो एकलव्य नव्हता तर ध्रृष्टधुम्न होता.
एकलव्य आणि एकलव्याचा अंगठा काळाच्या ओघात पदड्याआड झाला नाही. तो लोकांच्या चिरकाल लक्षात राहिला. कारण एका गुरुचं कर्तव्य. गुरुनं आपलं कर्तव्य बजावलं नसतांनाही अंगठा मागीतला होता.
एका गुरुनं जात पात, धर्मभेद, मर्मभेद व प्रांतभेद न करता शिष्यांना शिकवावं लागतं. कारण तो एक गुरु असतो. तो शिष्य पुढे काहीही बनो, त्याची चिंता गुरुला नसावी. ते भविष्य असतं आणि भविष्यात जर त्या शिष्यानं तसा अघटीत काम करण्याचा प्रयत्न केलाच तर परमेश्वर रुपी क्रिष्ण येवून त्या दृष्ट प्रवृत्तीचा नाईनाट करतो. जसं क्रिष्णाने एकलव्याचे केले. एकलव्य जेव्हा धर्म बाजूला ठेवून तो अन्यायी स्वभावानं वागला. तेव्हा क्रिष्णानं त्याला मृत्युदंड दिलेला आहे. तसेच द्रोणाचार्यही. त्यानंही परिसीमा तोडून व्यवहार केला एकलव्याशी. म्हणून त्यांनाही मृत्युदंडच भेटला. यात प्रत्यक्ष देव मानलेल्या क्रिष्णानं अत्याचार करणारे जरासंध, कंस, कालयवन, शिशूपाल, दंतवक्र, कागासूर, पुतना व कालियासारख्या अनेक राक्षसांना ठार केलेले आहे नव्हे तर मृत्युदंड दिलेला आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर अन्याय अत्याचार जास्तीत जास्त प्रमाणात वाढतो. तेव्हा तेव्हा देव प्रत्यक्षात येवून वा पृथ्वी तलावर जन्म घेवून तसला अत्याचार दूर करीत असतो नव्हे तर मृत्युदंड देत असतो. हा अत्याचार मागील जन्मात जर दूर करता आला नाही तर त्याला नवीन जन्मही मिळतो. जसा एकलव्याला मिळाला होता.
एकलव्य काळाच्या ओघात संपला. परंतू त्याची बाण चालविण्याची कला संपली नाही. लोकांनी ती कला उचलून धरली. आजही क्रिडा स्पर्धेमध्ये अंगठ्याचा वापर न करता लोकं चारच बोटं वापरुन आपल्या बाण शैलीचं प्रदर्शन करतांना दिसतात. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी एकलव्याचा अंगठा कापल्या गेला. तिथं एकलव्याचे एक प्रशस्त मंदिरही उभारलं आहे. ते लोकं त्या ठिकाणी एकलव्याची पुजा करतात नव्हे तर त्याला विशिष्ट समाज देवही मानत असतो.
एकलव्य हा त्या काळातील वंचीत घटक. त्याचा जन्म यादवकुळात झाला असला तरी त्याला सर्वप्रथम या यादवकुळानं विशिष्ट अशा आख्यायिकानं त्यागलं. त्यातच त्याची विद्या शिकण्याची इच्छा असूनही ती गुरुनं शिकवली नाही. उलट अंगठा मागीतला. त्यानंतर बरीचशी मंडळी गुरु द्रोणाचार्य ब्राम्हण असल्याने जातीभेदानं अंगठा मागीतला होता हे विशेषण लावले. परंतू तसं काही नव्हतं. काही बंधन होती. ती पुस्तकात आपण वाचलीच असेल.
महत्वपूर्ण गोष्ट ही की एकलव्याचा अंगठा मागीतला म्हणून एकलव्याची विद्या संपली नाही. ती उलट वृद्धींगत होत गेली. ती नवीन येणा-या विद्यार्थ्यांना एक शिकवण ठरली की शिष्य असावा तर एकलव्यासारखा आणि विद्या शिकावी तर एकलव्य बनून. परंतू गुरुदक्षिणा देताना थोडा विचार करावा. कोणालाही कोणत्याही स्वरूपात गुरुदक्षिणा देवू नये आणि गुरु द्रोणाचार्यसारखा जर गुरु असेल तर त्याला अंगठाच दाखवावा. तोही ठेंग्याच्या स्वरुपात. हीच शिकवण एकलव्यापासून घेण्यासारखी आहे.

************************************************************************************************************************************************

महाभारत संपलं होतं. तसे बरेच दिवस झाले होते. त्यानंतर ब-याच दिवसानंतर एक दिवस अर्जून श्रीक्रिष्णाला भेटला. म्हणाला,
"क्रिष्णा, तुम्ही पुर्व जन्मात एकलव्याला का मारले का मारले?"
अर्जूनाचा तो प्रश्न. क्रिष्ण म्हणाला,
"हे पार्थ, मी जर एकलव्याला ठार केले नसते. तर तू कधीच कौरवांवर विजय मिळवू शकला नसता. कारण एकलव्य हस्तीनापूरचा नाही तर तुझाच शत्रू होता. त्याला वाटत होतं की अर्जूनाचा प्रिय म्हणणा-या द्रोणाचार्यनं त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरवू नये. तर तोही एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि तेच सिद्ध केलं असतं त्यानं महाभारताचं युद्ध लढून.
माहित आगे पार्थ, दुर्योधनानं तुला नीच दाखविण्यासाठी कर्णाशी मित्रता केली. तशीच मित्रता त्यानं एकलव्याशीही केली होते. तो दुर्योधन वेळप्रसंगी त्याला भेटीचे आमंत्रण देत होता नव्हे तर मोठमोठे नजराणेही देत होता. आज त्याला कसे का होईना, मी ठार केल्यामुळं तुला कौरवांवर विजय मिळवता आला. नाहीतर आज कौरव विजयी झाले असते व तूही या जगात नसता."
अर्जून काय समजासचं ते समजला. तसा पुन्हा त्यानं प्रश्न केला,
"माधव, एवढा शक्तीशाली होता का तो?"
अर्जूनाचा प्रश्न. तसा क्रिष्ण म्हणाला,
"होय शक्तीशालीच. कारण जरासंधाला ठार केल्यानंतर त्यानं द्वारकेवर आक्रमण केले होते. जरासंधाच्या वधाचा बदला म्हणून. त्यात मी पाहिलं त्याला बाण चालवतांना. त्याची बाण चालविण्याची शैली फार विलक्षण होती. त्याच्या बाण चालविण्यात विलक्षण गतीही होती. ती गती वाखाणण्याजोगी आहे. त्याच गतीनं त्यानं कित्येक यादवसेनेला यमलोकी पाठवलं होतं. कदाचित यादवाचं राज्य संपतं की काय, असं होवून गेलं होतं. म्हणूनच मी ठार केलं त्याला. दुसरं कारण होतं ते म्हणजे त्यानं महाभारताचं युद्ध लढू नये. धर्मावर अधर्माची जीत होवू नये. समजा तो जर असता तर तूम्ही हे युद्धच जिंकू शकले नसते. कारण त्याला सगळ्या तोडी माहित होत्या. त्याला विलक्षण अशी धनुर्विद्या येत होती की तुमचा पराजय नक्कीच होता. हे मी जाणलं होतं त्यावेळी. मला भविष्य दिसत होतं. म्हणूनच मी त्याला ठार करण्याचा निश्चय केला. महत्वाचं म्हणजे त्याला माझ्याशिवाय कोणीही मारु शकला नसता. ते विधिलिखीत होतं. "
"माधव, तो एवढा कसा शिकला असेल विना गुरुनं?"
"पार्थ, माणूस गुरु नसेल तरीही ज्ञान शिकू शकतो. त्यासाठी गुरु असलाच पाहिजे याचं बंधन नाही. केवळ साधना करायला हवी. तसेच आपल्या डोळ्यासमोर साध्य असायला हवं. जर साध्य नसेल तर साधनाही होवू शकत नाही.
एकलव्याजवळ साध्य होतं की आपण धनुर्विद्या शिकायलाच हवी. जरी गुरुनं नाही म्हटलं तरी. त्यातच तो ती विद्या शिकण्यासाठी साधना करु लागला प्रामाणिकपणे. म्हणून तो यशस्वी झाला."
"माधव, तो यशस्वी कसा काय होवू शकतो विना गुरुनं."
"होवू शकतो यशस्वी पार्थ. का नाही होवू शकत? निव्वळ अनुभव आणि चाणाक्ष बुद्धीमत्ता आणि तीव्र दिव्यदृष्टी जर असेल तर माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होवू शकतो. त्यासाठी गुरुची गरज नाही."
"म्हणजे? गुरु नसेल तरीही?"
"होय पार्थ गुरु नसेल तरीही. "
अर्जून बोलत होता. तसा क्रिष्ण त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. तसा तो आजही स्वतःला सर्वश्रेष्ठ दुर्धर समजत होता. तसा त्यानं क्रिष्णाला शेवटचा प्रश्न विचारला.
"माधव, तुझ्या मते सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण?"
"अर्थात?"
"मी की एकलव्य?"
क्रिष्ण विचार करु लागला. सत्य कडवं आहे. ते सांगावं कसं? बरीच समस्या होती. त्यातच अर्जूनालाही वाईट वाटेल असंही वाटत होतं. काय करावं सुचत नव्हतं. परंतू सांगावं तर लागणारच. अर्जूनाचा भ्रम तोंडाला लागणारच. कारण अगदी लहानपणापासून अर्जूनालाही वाटत आहे की तोच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. त्याचाच गर्व आजही आहे त्याला. आपण हा गर्व तोडायलाच हवा.
क्रिष्णाचा तो विचार. तसा क्रिष्ण बोलता झाला.
" हे बघ, पार्थ, वाईट वाटून घेवू नकोस. परंतू जगात सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्यच होता. दुसरा कोणी नाही."
"म्हणजे? गुरु नसेल तरीही?"
"होय पार्थ गुरु नसेल तरीही. "
अर्जून बोलत होता. तसा क्रिष्ण त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. तसा तो आजही स्वतःला सर्वश्रेष्ठ दुर्धर समजत होता. तसा त्यानं क्रिष्णाला शेवटचा प्रश्न विचारला.
"माधव, तुझ्या मते सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण?"
"अर्थात?"
"मी की एकलव्य?"
क्रिष्ण विचार करु लागला. सत्य कडवं आहे. ते सांगावं कसं? बरीच समस्या होती. त्यातच अर्जूनालाही वाईट वाटेल असंही वाटत होतं. काय करावं सुचत नव्हतं. परंतू सांगावं तर लागणारच. अर्जूनाचा भ्रम तोंडाला लागणारच. कारण अगदी लहानपणापासून अर्जूनालाही वाटत आहे की तोच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. त्याचाच गर्व आजही आहे त्याला. आपण हा गर्व तोडायलाच हवा.
क्रिष्णाचा तो विचार. तसा क्रिष्ण बोलता झाला.
"हे बघ, पार्थ, वाईट वाटून घेवू नकोस. परंतू जगात सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्यच होता. दुसरा कोणी नाही."
क्रिष्णानं काय म्हणायचं ते म्हटलं. तसा अर्जून निराश झाला. तसा म्हणाला,
"तुही माधव, तूही तसाच मानतोस."
"होय आणि माझ्या मानल्या न मानल्यानं काय होणार. पुढे जगालाही तसंच वाटेल की सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्यच होता. अर्जूनाचा नाही. तसं तू आपल्या अंतरात्म्याला विचार."
अर्जून तसा विचार करीत होता. कारण आज त्याच्यापुढे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. प्रश्न होता की सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्यच की मी. त्यानं आपल्या आयुष्यात अनेक लढाया जिंकल्या होत्या. अनेक ठिकाणी विजयी झाला होता. महाभारताचीही लढाई जिंकली होती. त्यातही कौरवांनवर विजय मिळवला होता. तरीही एकलव्यच श्रेष्ठ. माधवनं असेच म्हणावे. तसा अर्जून म्हणाला,
"माधव, मी ब-याच वेळापासून विचार करतोय की मी एवढ्या लढाया जिंकल्या. तरीही तू मला सर्वश्रेष्ठ समजत नाही. मला प्रश्न पडलाय की मी कुठं कमी पडलोय?"
तसा क्रिष्ण सांगू लागला,
"पार्थ, तू अहंकारानं कमी पडलाय धनुर्विद्येत. त्याला सर्वविद्या येत होत्या. परंतू अहंकार
नव्हता त्याच्यात. माहित आहे गुरु द्रोणाचार्यसोबत तुम्ही फिरायला गेले तेव्हा एका श्वानाला त्यानं सात बाण मारुन चूप बसवले होते."
"होय, माहित आहे."
"अन् हेही माहित असेल की गुरु द्रोणालाही ती विद्या येत नव्हती."
"होय, हेही माहितच आहे."
"परंतू एकलव्य काय बोलला होता ते माहित आहे का?"
"नाही."
"ऐक पार्थ, गुरु द्रोणाचार्याच्या तो प्रश्न की मी ही विद्या शिकविली नाही. तू कुठून शिकला? त्यावर एकलव्य अतिशय नम्रतेनं हात जोडून म्हणाला होता की गुरुदेव आपल्याच मुळं ही विद्या मला शिकता आली. याचाच अर्थ असा की जी गोष्ट गुरु द्रोणाचार्यांना येत नव्हती, ती विद्या एकलव्याला आत्मसात होती. तूला तर गुरु द्रोणाचार्यनं शिकवलंय. एकलव्याला नाही. तरीही त्याला धनुर्विद्येचं पुरेपूर ज्ञान आलं. मग तूच विचार कर की श्रेष्ठ कोण? तू की तो?"
अर्जून काय समजायचं ते समजला. तो पुन्हा बोललाच नाही. तसा श्रीक्रिष्ण बोलता झाला.
"माहित आहे पार्थ, मी जर त्याला ठार केले नसते तर कदाचित तू जीवंत राहिला नसता आणि जिथं तूच जीवंत राहिला नसता तर आज तू जे काही प्रश्न करतोस ना. तेही तुला करता आले नसते. तसेच स्वतः मी श्रेष्ठ धनुर्धर असाही विचार तुला करता आला नसता.
तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरलाही असशील कदाचित तुझ्या मानण्यानं. परंतू तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही. माहित आहे, ज्यावेळी गुरु द्रोणानं विद्या शिकवली नसतांनाही एकलव्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागीतला. हवं तर तो मागण्याचा अधिकार नव्हता त्यांना. तरीही मागीतल्यावर तो देत असतांना एकलव्यानं अगदी हसत हसत दिला अंगठा आणि म्हणाला होता की गुरुदेव फक्त अंगठाच.......मी तर आपण मागीतली असती तर मानही कापून आपल्या चरणावर ठेवली असती. समजा त्याजागी तू असता आणि तुला गुरु द्रोणाचारियनं अंगठा मागीतला असता तर खरंच पार्थ तू विचार करुन सांग की तू खरंच अंगठा दिला असतास काय?"
अर्जून त्या प्रश्नावर विचार करु लागला. तद्नंतर म्हणाला,
"माधव, नाही. मी अंगठा देवू शकलो नसतो गुरुदक्षीणा म्हणून. माधव, युद्धमैदानावर लढणं सोपं आहे. शत्रूंचे बाण छातीवर झेलणं सोपं आहे. हवं तर शत्रूच्या हातून मान कापून घेणंही सोपं आहे. परंतू आपल्या हातानं साधी आपल्याला सुईही टोचून घेणं कठीण आहे. तो तर अंगठा आहे. माधव, तू आज माझे डोळे उघडलेले असून एकलव्यच खरा श्रेष्ठ धनुर्धर होता. मी नाही. आज मला माधव सत्य कळलेले आहे."
अर्जून काय समजायचं ते समजला. ती चूक त्याला उमगली. तसा क्रिष्ण पुन्हा म्हणाला,
"माहित आहे पार्थ द्रोणाचार्यनं तुला लहानपणापासूनच तू हुशार आहेस. मी तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविणार आहे. याचं वचन दिलं होतं. त्यातच तो तुझाच जास्त लाड करीत होता. तशातच तुलाच जास्त शिकवीत होता. त्यामुळं तू तर हुशार होणारच. परंतू कल्पना करुन पाहा की ज्याला असं पुरेसं ज्ञान मिळालं नाही. ज्याला विद्या शिकतांना गुरु द्रोणाचार्याकडून तिरस्कार मिळाला. ज्याची विद्या शिकतांना आबाळ झाली. तरीही तो शिकला. मग तोच सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही का? यावर पार्थ थोडा विचार कर. अरे ज्या मुलाला पुरेपूर खायला प्यायला दिलं आणि ज्याला अजीबात खायला प्यायला मिळालं नाही. तर कोण धष्टपुष्ट दिसणार? खायला प्यायला मिळालेला मुलगा ना आणि ज्याला खायला प्यायली मिळालेच नाही. तो कसा दिसणार.........कुपोषीतच ना. मग ते धनुर्विद्या शिकणं का असेना. एकलव्याचंही तेच झालं. त्याला विद्या शुकायला पुरेशी साधनं उपलब्ध झाली नाही. ती साधनं त्यानं स्वबळावर मिळविलीत. त्याला कोणीही विद्या शिकवली नाही. तो अगदी स्वबळावर शिकला विद्या आणि आपण शिकलेली विद्या राजमान्य व्हावी म्हणून त्यानं दिला अंगठा एका झटक्यात कापून. विचार केला की या जगाला वाटावं की एकलव्य कोणाचा शिष्य होता तर लोकांनी म्हणावं गुरु द्रोणाचा. आज त्याचंच नाव जोडलं जाणार गुरु द्रोणासमोर तुझ्या बरोबरच आणि तू जरी सर्वश्रेष्ठ धनुर्धर असला तरी लोकं त्यालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजतील. कारण इतिहास हा कधीच मिटविल्यानं मिटत नाही पार्थ. तो मिटविल्यानं अधीक चिघळत जात असतो."
अर्जून काय समजायचं ते समजला. तसा पुन्हा एकदा गप्प झाला. त्याचे डोळे उघडले होते. कारण सत्य त्याला माहित झालं होतं. ज्या सत्यापासून तो अनभिज्ञ होता आजपर्यंत. कारण आजपर्यंत तो स्वतःलाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजत होता.
क्रिष्ण त्याला सांगत होता व अर्जून क्रिष्णाचं ऐकत होता.
"हे पाहा पार्थ, एकलव्य प्राणीमात्रावर दया करायचा. तो जंगलातील प्राण्यांवर दया करायचा. त्याला प्राण्यांना त्रास दिलेला आवडायचा नाही. कारण त्याली ते पाप वाटायचं. ज्यावेळी जंगलातील लांडगे, कोल्हे मुक्या आणि लाचार असलेल्या हरणावर व त्याच्या पिल्लांवर हल्ले करायचे, तेव्हा तो विचलीत व्हायचा. तसं करतांना त्याला चांगलं वाटायचं नाही. त्यांच्याविषयी काहीतरी करावं असं त्याला वाटायचं. परंतू उपयोग नव्हता."
क्रिष्णाचं बोलणं मधातच थांबवत अर्जून म्हणाला,
"माधव ते सगळं बरोबर आहे. मग त्यानं त्या सहदेवनं पाळलेल्या श्वानाच्या तोंडात का बरं बाण मारले?"
"मारले बाण.अन् का बरं मारु नये. ज्या गोष्टीचा आपल्याला जास्त त्रास होतो, त्याला तर संपवायलाच हवं की नाही. आता तूच बघ, तू आपल्याच नात्यातील आपल्याच भावाबंधांना संपवलं ना. ते तुझे जवळचेच होते ना. हं, एकलव्यानं तर तसंही केलं नाही. त्यानं फक्त आपल्या अभ्यासात व्यत्यय आणणा-या श्वानाच्या ओरडण्यावर ताबा मिळवला. बस........काही रक्त वैगेरे काढलं का? नैही ना. अरे पार्थ तो तर निरतिशय प्रेम करीत होता प्राणीमात्रावर."
अर्जून त्यावरही काहीच बोलला नाही. त्याच्या मनात उद्भवलेल्या शंकेचं त्यानं निरसन केलं होतं. तसा काही वेळ तो विचार करीत बसला. तसा क्रिष्णच म्हणाला,
"हे पार्थ, तू वाईट वाटून घेवू नकोस. परंतू तुला आठवण म्हणून सांगतो की ज्यावेळी तू त्या श्वानाच्या तोंडातील ते सात बाण पाहिले. तेव्हा तू त्याबद्दल तुझ्या गुरु द्रोणाचार्यला सांगीतले. त्यावर गुरु द्रोणाचार्य एकलव्याची भेट घेण्यासाठी एकलव्याकडे गेले. तेव्हा एकलव्याला ते बाण त्यानंच श्वानाला मारले का? असं द्रोणाचार्यनं विचारताच त्यानं हो म्हटलं. हे बरोबर आहे का?"
"हो माधव. अगदी बरोबर आहे."
"त्यानंतर द्रोण एकलव्याला म्हणाले की तुझा गुरु कोण? त्यावर एकलव्यानं काय उत्तर दिले? जरा सांगशील का?"
"तो म्हणाला की माझे गुरु द्रोणाचार्य आहेत."
"त्यावर तुला कसे वाटले तेही सांगशील का?"
"काही नाही माधव. मला काहीच वाटले नाही."
"असं कसं? तुली काहीच वाटलं नाही. तुला आठवत नसेल तर मी सांगतो." असं म्हणत क्रिष्ण सांगू लागला.
"हे बघ पार्थ, तुझ्या मनात द्रोणाचार्यबद्दल शंका उत्पन्न झाली. तुला वाटलं की ज्या गुरुनं तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्याचं वचन दिलं. त्याच गुरुनं वचन मोडत या एकलव्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलंच कसं? बरोबर की नाही."
"हो माधव, बरोबर आहे."
"मग तू काय केलं?"
"मी क्षणात आचार्यजींना म्हटलं की गुरुदेव, आपण भेदभाव केला. मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविण्याचं वचन देवून ते वचन मोडलं. माझ्यापेक्षा तर श्रेष्ठ धनुर्धर हाच दिसतो."
"म्हणजे गुरुवर शंका घेतली तर........"
अर्जून त्यावर चूप बसला. तसा क्रिष्णच बोलला.
"हे बघ पार्थ, गुरु द्रोणाचार्यनं त्यावर काहीच म्हटलं नाही. त्यानंतर करुन दाखवलं.त्यांनी त्याचा अंगठा मागीतला गुरुदक्षीणा म्हणून. कारण त्यांच्या मनाला तुझे बोल लागले होते. वाटलं होतं की आपण ज्याला वचन दिलं, त्या शिष्यानंच आपल्यावर ताशेरे ओढावेत. आपण अर्जूनाला वचन दिलंय की त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविणार. परंतू इथं तर उलटंच होत आहे. सर्वश्रेष्ठ धनुर्धर एकलव्यच बनत आहे. जे होवू नये ते होत आहे. शेवटी गुरुधर्म सोडून केवळ राजधर्माचं आणि वचनाचं पालन करीत गुरु द्रोणाचार्यनं नाईलाजानं अंगठा मागीतला एकलव्याचा. कारण त्यांना वाटत होतं की जर मी बाणाची पकड करणारा अंगठा मागीतल्यास हा मुलगा कधीच बाण चालवू शकणार नाही व साहजीकच अर्जून सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरेल. परंतू द्रोणाचार्य त्यावेळी हे विसरला का जर अंगठा नसेल तरी एकलव्य बाण चालवू शकेल. त्यानंतर एकलव्यानं तेच केलं. माहित आहे पार्थ, ज्या माणसाला डोळे नसतीत. तरीही तो राजा बनून आपलं राज्य चालवू शकतो. चालवू शकतो की नाही? हे तू प्रत्यक्ष तुझ्या तातश्रीकडून अनुभवलं आहे. महाराज ध्रृतराष्ट्र आंधळे असतांनाही राजगादी सांभाळली त्यांनी आयुष्यभर. सांभाळली की नाही."
"माधव, बरोबर आहे. सांभाळली त्यांनी राजगादी. ते आंधळे असतांनाही."
"मग तो तर अंगठा होता. तो गुरुदक्षीणा म्हणून गेलाही असेल, तरी कौशल्य संपलं होतं का एकलव्याचं. नाही ना."
"नाही माधव."
"म्हणूनच तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरला."
या बोलण्यावर अर्जून काहीच बोलला नाही. तो निपचीत ऐकच होता क्रिष्णाचं बोलणं. कारण क्रिष्ण जेही काही बोलत होता. ते सगळं बरोबर होतं. तसा क्रिष्ण अाणखी पुढे सांगता झाला.
"पार्थ, एकलव्याचा, अंगठा गुरदक्षीणा म्हणून मागण्याचं काम गुरु द्रोणाचार्यनं केलं. परंतू त्या पापाचा भागीदार तूही आहेस."
अर्जूनानं ते शब्द ऐकले. तसा त्याला क्रिष्णाचा थोडा राग आला. तसा तो क्रिष्णाला म्हणाला,
"कसा काय मी भागीदार? मी जर म्हटलं एखाद्याला की तू विहिरीत उडी मार आणि त्यानं मारली तर त्याला दोष मला का? त्यानं तसा विचार करु नये काय की विहिरीत उडी मारताच माझाच जीव जाईल."
हो, ते सगळं बरोबर आहे. परंतू हे बघ पार्थ, ज्याप्रमाणे आत्महत्या करणारा दोषी असतो ना. तसाच दोषी असतो प्रत्यक्ष आत्महत्येला प्रवृत्त करणारा. पार्थ तू, तू स्वतः उकसवलं द्रोणाचार्यना की त्यानं त्याचा अंगठा मागावा गुरुदक्षीणा म्हणून."
"ते कसं काय माधव?"
"हे पार्थ, तू जर म्हटलंच नसतं की गुरुवर्य, तुम्ही मला वचन दिलं होतं की मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनविणार आणि हा तर तुम्हाला गुरु म्हणत आहे. कदाचित तुम्ही यालाही विद्या शिकवली तर नाही माझ्याही पेक्षा कितीतरी जास्त पटीची. हिच तुझी गुरुवर्यावर घेतलेली शंका गुरुंना एकलव्याचा अंगठा मागण्यास कारणीभूत ठरली. जर तू शंका घेतलीच नसती तशी तर कदाचित चित्र वेगळं असतं. गुरु द्रोणाचार्य पापाचा धनी ठरला नसता आणि तूही पापाचा भागीदार ठरला नसता."
"माधव, त्यात माझं काय चुकलं?मला काय कळत होतं त्या बालवयात?"
अर्जूनानं प्रश्न फेकला क्रिष्णासमोर. तसा क्रिष्ण विचार करु लागला. अर्जूनाचंही बरोबर होतं की ते बालवय होतं. परंतू क्रिष्णही काही कमजोर नव्हता. तो तर विद्वानांचा ज्ञाता होता. प्रत्यक्ष देवच होता तो. तसा काही क्षणातच को म्हणाला,
"पार्थ हे बघ, गुन्हा तो गुन्हाच. त्या गुन्ह्याला बंधन नाही. मग तो गुन्हा बालवयात जरी घडला असेल. बालवय आहे म्हणून त्या बाळानं आपल्या मायबापाचा जीव घ्यावा काय? आपण आपल्या लहान वयात आपल्या मायबापाचा जीव घेतो काय? नाही ना. तेवढं आपल्याला कळतं ना. आपल्याला जेवणात काय खावं अन् काय खावू नये हेही कळतं. शौच लागल्यास कुठे करावी, कशी करावी तेही कळतं. शंका, समाधानही कळतं. प्राण्यांना जीव असतो. त्यांना मारु नये, विनाकारण त्रास देवू नये हेही कळतं. तेव्हा गुन्ह्याला वय लागत नाही. काय करावं आणि काय करु नये हेही कळतं. असे असतांना तुला गुरु द्रोणाचार्यवर शंका का करावी ते कसं कळलं नाही. तेच मलाही कळत नाही. पार्थ, सर्व दोष गुरुवर आला. तुझं बालवय होतं. त्यामुळं तू बाजूला झाला रितसर. तुझा दोष कुणालाच दिसला नाही. दोष होता. परंतू सगळं माफ झालं. कारण जगाजवळ तेवढी चौकस दृष्टी नव्हती विचार करण्याची. ज्यानं त्यानं आपआपल्या मनानुसार शब्द मांडले आणि गोवलं गुरु द्रोणाचार्यला एकलव्याचा अंगठा गुरुदक्षीणा मागीतल्याच्या पापात. बिचारा गुरु. त्यानं गरीबी पाहिली होती महाभयंकर. त्यातच त्याचा गरीबीनं अपमानही केला होता ध्रृपदानं. त्यानं त्याला मदत करण्याऐवजी अपमान करुन हाकलून दिलं राजदरबारातून. शेवटी लाचार झाला तो. त्यातच ज्यावेळी भिष्मानं मोठ्या कटाक्षानं जेव्हा नोकरी दिली. तेव्हा भिष्माच्याही अटी की फक्त विद्या हस्तीनापूरच्याच मुलांना शिकवायची. इतरांना नाही आणि अर्जूनालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवायचं. इतरांना नाही. त्यातच वेळेवर एकलव्याचं शक्तीप्रदर्शन पाहताच तुझ्या मनाचा जळफळाट. तो तुझ्याकडून व्यक्त होताच द्रोणाचार्यला वाटलं की आता गुरुधर्म आणि राजधर्म दोन्ही धोक्यात आलं. गुरुधर्म पाळून राजधर्म न पाळल्यास नोकरी जाणार. मग पुन्हा गरीबी. तेच लाचारीचं जीणं. त्यातच सततचा अपमान. बदलाही काढणं कठीण ध्रृपदाच्या अपमानाचा. नोकरीही जाईल. मग काय करणार आपण? काय खाणार आपण? सारेच प्रश्न गुरु द्रोणाचार्यसमोर उभे ठाकले. तसाच दुसरा विचार होता की राजधर्म पाळल्यास गुरुधर्माचा अपमान होईल. लोकं कलंक लावतील की स्वार्थासाठी द्रोणाचार्यनं गुरधर्म सोडला. काय करावं हे गुरु द्रोणाला कळत नव्हतं. शेवटी त्यांनी राजधर्म पाळायचं ठरवलं. गुरुधर्माचा त्याग केला. कारण पोटाचा प्रळ्न होता त्यांचेसमोर. तसा वेळही नव्हता विचार करायला. मग ठरलं.
पार्थ गुरु द्रोणाचार्यनं विचार करताच ठरवलं की आपण आपला राजधर्म पाळायचा. त्यांनी कदाचित अंगठा न मागता सोडून दिले असते एकलव्याला. परंतू त्यांना शंका होती की कदाचित तू तुझ्या पितामहा भिष्माला त्याबद्दल सांगशील व भिष्म पितामहा त्यावर गुरु द्रोणाचार्यला पदावरुन निष्काषीत करतील. याच भीतीनं त्यांनी अंगठा मागीतला."
क्रिष्णाचं पूर्ण सांगून झालं होतं. तसा अर्जूनही शांत होता. त्याला आता अपराध्यासारखं वाटत होतं. स्वतःची लाज वाटत होती त्याला. परंतू आता उपाय नव्हता. तो एकलव्य काही जीवंत नव्हता की त्याची क्षमा मागता येईल. तसा तो विचार करु लागला. क्षणातच पापपुण्याचा लेखाजोखा मांडतांना त्याला आठवलं की ज्या क्रिष्णानं आपल्याला भवसागरातून काढलं नव्हे तर एवढ्या महाभारताच्या युद्धात जिंकवलं नव्हे तर हेही पापच होते. ते पाप क्रिष्णानं माझ्याकडून करवले. याचाच अर्थ
क्रिष्णही पापीच आहे. तसा तो क्रिष्णाला विचारु लागला,
"माधवा, एक विचारु?"
"विचार."
"माधवा, एवढं मोठं युद्ध झालं. शेकडो सैन्य मारले गेले. त्यात माझे बंधूही. हे पापच नाही का?"
"होय पापच."
"ते पाप तुम्ही करायला लावले नाही का?"
"होय, मीच करायला लावले."
"मग भगवन, तुम्ही पापी नाही का?"
"होय. मीही पापीच. तेव्हा तर महाराणी गांधारीनं मला शाप दिला की जसा तू माझ्या कौरव वंशाला संपवलं, तसा तुझाही यादव वंश संपेल. याचाच अर्थ मी पापी नाही का?"
अर्जून त्या बोलण्यावर विचार करु लागला. तसा तो विचारांती शेवटी चूप बसला होता. तसा क्रिष्ण सांगत होता.
"हे पार्थ, ज्यावेळी तू त्या एकलव्याला पाहिले, तेव्हा तुला त्याचेबद्दल द्वेष निर्माण झाला व तू ठरवलं की आपण काहीही करु. तसे एकलव्यापेक्षा जास्त परीश्रम करु आणि तू स्वतः तशी मेहनतही करु लागला. त्यातच तू तुला शिकविलेल्या धनुर्विद्येचा सराव रात्रीलाही करु लागला.
तू जेव्हा तसा सराव करु लागला असता एक दिवस तुला गुरु द्रोणाचार्यनं पाहिलं. तेव्हा गुरुनं म्हटलं की हे अर्जूना, काय करीत आहेस? तेव्हा तू गुरु द्रोणाला काय उत्तर दिलंस. माहित आहे का तुला?"
अर्जूनाला काहीही आठवत नव्हतं. कारण आजपर्यंत सर्वश्रेष्ठ धनुर्धरपणाचा मुखवटा चढवून होता तो. परंतू आज क्रिष्णाकडून ते सगळं ऐकता ऐकता डोळेही उघडत होते. काही वेळापुर्वीच क्रिष्णानं स्वतः त्यानंही अर्जूनासोबतच पाप केलं असल्याची मंजूरी दिली होती. त्या पापाची परियंती म्हणून आपल्याला गांधारीनं शाप दिला असल्याचं सांगीतलं होतं त्यानं. त्यातच तो शाप आपल्याला लागणारच. हेही सांगीतलं होतं त्यानं. प्रत्यक्ष भगवान क्रिष्णानं आपल्यासाठीच पाप केलं असल्याचं माहित होताच अर्जूनला पश्चाताप होत होता. क्रिष्ण सांगत होता व अर्जून ऐकत होता गुपचूप.
"एकलव्याला जिंकणं सहज सोपं नव्हतं पार्था. तो अतिशय हूशार होता. त्याला ठार करणं सहज सोपं नव्हतं. असं म्हण की मी त्याला ठार केल्यामुळं तुला युद्ध सहज जिंकता आलं."
"माधव एक विचारु"
"विचार. विचार." क्रिष्ण म्हणाला. तसा पाहता पाहता अर्जूनानं एक प्रश्न पुन्हा विचारला.
"मगाशी तू म्हटलं होतं की गुरुवर्य द्रोणाचार्यनं मला रात्रीला पाहतांना गुरुवर्य म्हणाले की काय करतोस. तेव्हा मी काय उत्तर दिले. जरा सांगशील का?"
"हो सांगणारच."
"सांग ना."
"सांगणारच पार्था. परंतू जरा वेळ येवू दे. कोणतीही गोष्ट वेळेपुर्वी आणि नशीबापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. नशीबात जेवढी असते, तेवढीच मिळते. त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. समजलं."
"माधवा, तू हे सगळं आमच्यासाठी केलं. त्यात तुझाही काही उदिदेश होता काय?"
त्याला स्वतःच स्वतःचा पश्चाताप होत होता. तसा तो क्रिष्णाला म्हणाला,
"माधव, मला तर काहीच आठवत नाही. सांग ना."
"तू तुझ्या अंतरात्म्याला विचार. तुझी अंतरात्माच सांगेल त्याबद्दल."
"नाही माधव, सांग. सांग मला. नाहीतर रात्रीची झोप मला येणार नाही. सांग ना माधव. तू तर आम्ही कौरवावर विजय मिळवता यावा म्हणून हे सगळं केलं ना."
"नाही. मी त्यासाठी माझं कार्य केलं नाही."
"मग कशासाठी केलं माधवा हे कार्य"
"मी सत्यासाठी केलं ते कार्य. धर्मासाठी केलं ते कार्य. मला तुम्ही जिंकले असते काय आणि ते जिंकले असते काय. मला फरक पडला नसता. परंतू कौरव जर जुंकले असते तर सत्य हारलं असतं. अधर्माची जीत झाली असती. म्हणून मला तुम्हाला जिंकवावं लागलं. मग ते माझ्या हातून पाप का झालं असेना."
अर्जून तसा चूप बसला. तसा क्रिष्णही. काही वेळ असाच गेला. तसा अर्जूनच बोलका झाला. म्हणाला,
"हे माधव, तू किती किती केलं पांडवासाठी. पांडवासाठीच नाही तर माझ्यासाठी. मी जिंकावा म्हणून तू का का नाही केलेस. माहित आहे माधवा, एकदा कर्णानं सर्प बाण मारला होता. तेव्हा त्या बाणावर सर्प राजा तक्षक आरुढ झाला होता. तो बाण मला लागणार व तो तक्षक सर्प मला दंश करणार. एवढ्यात तूच क्रिष्णा माझा रथ जमीनीत गाडलास आणि हेही तुला माहित असेल की जेव्हा माझा पुत्र अभुमन्यू मरण पावला होता. तेव्हा मी प्रतिज्ञा केली होती की जर मी माझ्या पुत्राला मारणा-या जयद्रथाला सुर्यास्तापुर्वी ठार केले नाही तर मी स्वतःच स्वतःची चिता बनवून त्यात उडी घेत स्वतःला संपवीन. तेव्हा तुच सुर्य झाकला होता आणि सुर्यास्त झालं असं दर्शवलं होतं. तसा सुर्यास्त झालेला पाहून जयद्रथ बाहेर निघाला.
माधवा, ज्यावेळी जयद्रथ बाहेर निघाला, तेव्हा तूच झाकलेल्या सुर्याला बाहेर काढलं व मला जयद्रथावर निशाणा साधता आला नव्हे तर माधवा, तूच माझे प्राण वाचवलेस. अरे माधवा, तू जर नसता तर मी कधीच पितामहावर विजय मिळवू शकलो नसतो आणि तू जर नसता तर त्या गुरुवर्य द्रोणावरही. त्यातच कर्ण आणि इतर सर्व लोकांवरही. मी तर असा म्हणेल माधवा, की जरी एकलव्य असता आणि तो प्रत्यक्ष युद्धात जरी उतरला असता तरी जीत माझीच होती. कारण तू माझ्या पाठीमागे उभा होता."
"तसं नाही पार्थ. प्रत्येक गोष्टीला हलक्यामध्ये घेवू नकोस. कारण प्रत्येक गोष्ट तशी बनलेली नसते. तुला एका गर्दभाची गोष्ट आठवत असेल. एक व्यापारी दररोज एका गाढवाच्या उरावर मीठाचं ओझं वाहून नेत असे. नेतांना तो पाण्यातून नेत असे.
एक दिवस असंच मीठ वाहून नेतांना गाढवं पाण्यात बुडालं. त्यानंतर त्याच्या पाठीवरील काही मीठ पाण्यात वाहून गेलं. तसं ओझं काही अंशी हलकं झालं. त्या दिवसापासून दररोजच गाढव पाण्यात बुडू लागलं. मीठ पाण्यात विरघळू लागलं. ओझं कमी होवू लागलं. परंतू या क्रियेत मालकाचं अतोनात नुकसान होवू लागलं. त्याला उपाय समजेना. काय करावं सुचेना. तसांएक दिवस विचार करता करता त्यावा उपाय सापडला. तो उपाय त्यानं दुस-याच दिवशी अंमलात आणला.
त्यानंतर त्यानं कापसाचं ओझं दिलं गाढवाच्या पाठीवर. ते गाढव त्याही दिवशी नदीतून गेलं. दररोज ठरल्याप्रमाणे आजही ते पाण्यात बुडालं. परंतू दररोज जे मीठ विरघळत होतं पाण्यात आणि मालकाचं जे काही नुकसान होत होतं. ते नुकसान झालं नाही. कापूस पाण्यात विरघळलं नाही. उलट ते भिजल्यानं फार जड झालं. त्यानंतर गाढव पाण्यातून निघताच त्याला ते वाहणं कठीण झालं. त्यानंतर ते पुन्हा पाण्यात कधीच बुडालं नाही मग त्याच्या पाठीवर मीठाचं ओझं का असेना."
एकलव्याला जिंकणं सहज सोपं नव्हतं पार्था. तो अतिशय हूशार होता. त्याला ठार करणं सहज सोपं नव्हतं. असं म्हण की मी त्याला ठार केल्यामुळं तुला युद्ध सहज जिंकता आलं."
"माधव एक विचारु"
"विचार. विचार." क्रिष्ण म्हणाला. तसा पाहता पाहता अर्जूनानं एक प्रश्न पुन्हा विचारला.
"मगाशी तू म्हटलं होतं की गुरुवर्य द्रोणाचार्यनं मला रात्रीला पाहतांना गुरुवर्य म्हणाले की काय करतोस. तेव्हा मी काय उत्तर दिले. जरा सांगशील का?"
"हो सांगणारच."
"सांग ना."
"सांगणारच पार्था. परंतू जरा वेळ येवू दे. कोणतीही गोष्ट वेळेपुर्वी आणि नशीबापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. नशीबात जेवढी असते, तेवढीच मिळते. त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. समजलं."
"माधवा, तू हे सगळं आमच्यासाठी केलं. त्यात तुझाही काही उद्देश होता काय?"
"होय, माझाही उद्देश होता त्यात. परंतू माझा उद्देश पूर्ण झाला होता."
"म्हणजे? कोणं पूर्ण केला होता माधव तुझा उद्देश?"
"तुम्हीच. तुम्हीच पूर्ण केला होता माझा उद्देश."
"कसा काय? मी समजलो नाही. जरा सांगशील का?"
क्रिष्णानं ते ऐकलं. तसा तो सांगू लागला. पाडवानं केलेल्या उपकाराची कथा. ज्यामुळं त्यानं पांडवांना महाभारताच्या अठरा दिवस चाललेल्या युद्धात मदत केली होती. क्रिष्ण सांगू लागला.
"जरासंध. कंस नावाच्या माझ्या मामाचा सासरा. कंस मामाला ठार करताच तो चिडला होता. तसा तो गुणी होता. चतूर होता. परंतू आसूरी वृत्ती भरली होती त्याच्यात. तो कंसमामाच्या वधाचा बदला काढू पाहात होता. तसं पाहता तो त्यासाठी हल्ले करीत होता मथुरेत. मी त्यानं हल्ले करताच त्याची पूर्ण सेना मारत होतो. परंतू त्याला मात्र जीवंत सोडत होतो. त्याचं कारणही तसंच होतं. तो परभवी होवून निघून गेला की कित्येक असूरांना गोळा करायचा आणि पुन्हा मथूरेवर युद्ध करण्यासाठी तयार होवून यायचा. त्यातच पुन्हा क्रिष्ण त्या सर्व जरासंधाच्या सर्व मित्रमंडळींना मारुन जरासंधाला सोडून द्यायचा. पुन्हा जरासंध पृथ्वीवरील सर्व असूरांना गोळा करायचा व पुन्हा मथुरेवर आक्रमण करायचा व पुन्हा क्रिष्ण तोच प्रकार करायचे. यात मला असूरांना मारण्यासाठी पृथ्वीवर फुरावे लागले नाही. आपोआपच जरासंधानं त्यांना मारण्यासाठी मथुरेत आणले. त्यातच मला त्यांना ठार करता आले.
एकदा दावू म्हणत होते की त्याला ठार का करीत नाही? परंतू मी म्हटलं, की माझं काम तो हलकं करीत आहे. मला पृथ्वीवर फिरावेच लागत नाही असूरांना मारायला. पूर्ण पृथ्वीवरचे असूर समाप्तही करता आले मला एकाच जागेवर. ते काम जरासंधनं साध्य केलं आणि जेव्हा ते असूर संपतील. तेव्हा मी स्वतःच त्याला ठार करील."
"माधव, मला सांग. तो एकलव्य तर असूर नव्हता. मग त्याला का बरं ठार केलं?"
"पार्थ, मी याचं कारण आधीही सांगीतलं आणि आताही सांगचो की मी त्याला मारलं म्हणून तुला युद्ध जिंकता आलं आणि हो, त्यानं जरासंधाच्या मृत्यूनंतर त्याच्या वधाचा बदला काढण्यासाठी द्वारकेवर स्वारी केली होती. त्यात कितीतरी यादवसेना मरण पावली होती. तशी त्याला द्वारकेवर युद्ध करायची काहीही गरज नव्हती. तरीही त्यानं हल्ला केला होता द्वारकेवर. म्हणूनही मारावं लागलं त्याला आणि माहित आहे, तुम्ही मला जरासंधाला मारायला मदत केली होती. जरासंधासोबतच्या चौदा दिवस चाललेल्या युद्धात मोठा भाऊ भीमानं त्याच्या शरीराचे दोन तुकडे बरेचदा केले. त्यात तो थकून गेला होता. त्यात त्राणही उरले नव्हते. वाटत होत, की भीम वीरगतीला प्राप्त होतो की काय, अशावेळी मला कल्पना सुचली व मी भीमाला इशारा केला. त्यानं बरेचदा केलेला प्रयत्न फसलेला असून आता ते तुकडे विरुद्ध बाजूला फेक. भीमानं माझा इशारा ऐकून व समजून मी सांगीतल्याप्रमाणे केलं. तसा जरासंध मरण पावला.
जरासंध.........यादवाचा मुळ शत्रू. त्यानं मथूरेवर आणि द्वारकेवर हल्ले करुन कितीतरी यादवसेना मारली होती. म्हणूनच मला जरासंधला मारणं भाग पडलं आणि त्याला मारण्याची जोखीम तुम्ही उचलली. म्हणून मीही तुम्हाला युद्धात मदत केली. नाहित आहे पार्था, जेव्हा मला बोटाला लागलं असतांना मी माझी बहिण शुभद्राकडं गेलो. तेव्हा शुभद्रेनं साधी चिंधीही माझ्या घावाला बांधून दिली नाही. त्यातच मी द्रोपदीकडं गेलो, तेव्हा द्रोपदीनं नवी कोरी साडी फाडली व माझ्या घावाला बांधून दिली. त्याचा परिणाम हा झाला की द्रोपदीला जेव्हा कौरवांनी द्युतसभेत जिंकले व तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मीच वाचवले तिला. तिची अब्रू लुटण्यापासून. मी साडी पुरवली होती तिला. मात्र शुभद्रेचा पुत्र अभिमन्यू चक्रव्युहात फसून मरणही पावला. परंतू मी त्याला मदत करु शकलो नाही.
पार्था मी त्यालाच मदत करतो की जो दुस-याच्या कामात येतो वा दुस-यांना मदत करतो. महत्वाचं म्हणजे परोपकार करतो. मग तो सगासोयरा का असेना. ज्याला परमार्थ साधता येत नाही. त्या सग्यासोय-यालाही मी मदत करीत नाही." क्रिष्णानं बोलणं थांबवलं होतं. मात्र अर्जून त्यावर पुन्हा बोलका झाला होता.
"माधवा, सांग ना मगाच्या प्रश्नातं उत्तर. सांग ना मी काय म्हणालो होतो माझ्या गुरुवर्यांना."
"तू म्हणाला होता की मलाही एकलव्यासारखं बनासचंय."
क्रिष्ण बोलला आणि चूप बसला. अर्जूनाचे क्रिष्णाला वारंवार प्रश्न व क्रिष्णाचेही अर्जूनाला वारंवार उत्तरे हे खुणावत होते की प्रत्यक्षात परमेश्वर त्यांनाच मदत करतो की जो एकदुस-याची निःस्वार्थ भावनेनं सेवा करतो. त्यांना मदत करतो. देव त्यांच्याच जवळ राहतो की जो त्याला लायक आहे. देव श्रीमंतांच्या घरी निवास करीत नसून फक्त रंजल्या गांजल्यांच्या घरी असतो, त्यांनाच मदत करीत असतो.
प्रत्यक्ष क्रिष्ण रुपातील देव कौरवांजवळ धनधान्य विपूल प्रमाणात असूनदेखील रंजल्या गांजल्या असलेल्या पांडवांच्या सोबत होता. तसेच त्यानं आपल्या कर्तबगारीनं शस्र न हाताळता त्यांना विजयही मिळवून दिला होता. तो विजय मिळविण्यासाठी प्रत्यक्ष क्रिष्णानं कर्णाचे छातीवर बारा बाणही झेलले होते.
तो शेवटचा प्रश्न. क्रिष्णानं उत्तर दिलं अर्जूूनाला. तसा क्रिष्ण चूप बसला. अर्जून म्हणाला होता आपल्या गुरुला की मलाही एकलव्यासारखं बनायचंय. गुरु द्रोण त्यावर काहीही बोलला नाही. कारण परिस्थीतीवश गुरु द्रोणानं एकलव्याचा अंगठा जरी मागीतला असेल, तरी ज्याप्रमाणे त्याचं अर्जूनावर प्रेम होतं, त्याचप्रमाणे अंगठा गुरुदक्षीणा म्हणून दिल्यानं एकलव्यावरही द्रोणाचार्यचं प्रेम निर्माण झालं होतं.
अर्जूनाची ऐकण्याची क्षमता होती. क्रिष्णाचं संभाषण को अगदी मन लावून ऐकत होता. परंतू प्रत्यक्ष देवच असलेल्या क्रिष्णाची सांगण्याची क्षमता संपली व तसा तो उठला. आपल्या रथावर बसला आणि वायुवेगानं त्या रथावर आरुढ होवून द्वारकेकडं प्रस्थान केलं. मात्र अर्जून स्थितप्रज्ञासारखा त्याच्या पाठमो-या आकृतीकडं पाहात होता अगदी निश्चींत होवून. त्याच्या डोळ्यासमोरुन भुतकाळ तरळत होतं. वाटत होतं की याच क्रिष्णानं जर आपल्याला जीवनभर मदत केली नसती तर आपण कदापिही कौरवावर विजय मिळवू शकलो नसतो.
अर्जूनाला तो मृत्यूदंड आठवत होता. क्रिष्णानं पृथ्वीवरील असूरांना दिलेला. ज्या मृत्यूदंडानं क्रिष्णानं अनेक बलवान असूर मारले होते पृथ्वीवरचे. कंस, जरासंध, शिशूपाल, कालयवन, दंतवक्र, कागासूर, पुतना, पौण्ड्र. सर्वांना मृत्यूदंड दिलेला होता. कारण त्यांना पृथ्वीवरील असूर साम्राज्य संपवायचं होतं. परंतू एकलव्य. तो तर असूर नव्हता. तरीही क्रिष्णानं त्याला मारलं. त्याचं उत्तर क्रिष्णानं त्याला दिलंही होतं. परंतू त्याला समाधान वाटत नव्हतं. त्याचं कारण वेगळंच असावं असं अर्जूनाला वाटत होतं. ते कारण म्हणजे असूरी वृत्ती. एकलव्याच्या मनात जरासंध मरताच असूरी वृत्तीनं जन्म घेतला होता. त्यामुळं नाईलाजानं त्याला संपवावं लागलं असावं असं अर्जूनाला वाटत होतं. कारण क्रिष्णाला अवतार संपविण्यापुर्वी पृथ्वीवरचे सर्व असूर संपवायचे होते. कारण दुसरा युग निर्माण होणार होता. परंतू क्रिष्णानं कितीही विचार केला असला तरी पृथ्वीवरचे असूर संपले नव्हते. कारण असूरांना क्रिष्णानं संपवलं असलं तरी त्याची पाळंमुळं अजूनही शिल्लक होती. ती पाळमुुळंच दोषी ठरली होती असूर संपण्यात. कारण कलीयुगात त्याच पाळामुळांना पालवी फुटली होती आणि आज कलियुगाच्या मध्यावर त्याच पाळमुळाचे रुपांतर एक विशाल वृक्षात झाले होते. जणू कलियुगात क्रिष्णाला नवीन जन्म घेण्यासाठी हे कलियुगातील विशालकाय वृक्ष आव्हान देत होते. जणू या विशालकाय वृक्षांना जळासकट उपटून फेकण्यासाठी. कलियुगात असूर नव्हतेच तर असूराचे संक्रमीत वंशज होते. जे असूरासारखेच वागत होते. त्यांनाच मृत्यूदंड देण्यासाठी क्रिष्ण जन्माला आला होता कल्की म्हणून. तो शिक्षाही देत होता अपराध्यांना. परंतू त्यात साधी माणसंही भरडली जात होती. कारण या साध्या माणसात राम आणि लक्ष्मणाचा समावेश होता.
तो राम......ज्यावेळी काळ अयोध्येत आला. त्यानं रामाची भेट घेतली आणि सांगीतलं की मला तुझ्याशी चर्चा करायची आहे. परंतू दरवाजाजवळ असा विश्वासू व्यक्ती ठेवा की आपल्या बोलण्यात व्यत्यय येणार नाही. तसा रामाचा विश्वासू अाणि अतिशय जवळचा होता लक्ष्मण. रामानं तोच विचार करुन लक्ष्मणाला दरवाजाजवळ द्वारपालक म्हणून ठेवले.
लक्ष्मण दरवाजाजवळ द्वारपालक म्हणून कर्तव्य बजावत असतांना थोड्याच वेळात तिथं दुर्वास मुनी आले. त्यांनी ताबडतोब रामाची भेट करुन दे नाहीतर पूर्ण अयोध्यानगरीला आपल्या तपोबलानं उध्वस्त करु अशी धमकी दिली. धमकीच ती. लक्ष्मण तरी काय करणार. पूर्ण अयोध्या नगरी वाचविणार की कर्तव्यपालन करणार. शेवटी अयोध्येला वाचविण्याचा विचार केला व नाईलाजानं त्यानं दुर्वास मुनींना आतमध्ये सोडलं. जिथं काळ आणि रामाचा संवाद चालला होता. त्यामुळं ते कर्तव्यपालन करतांना राम आणि काळाच्या बोलण्यात व्यत्यय आला. तोच त्या व्यत्ययाचा परिणाम . कर्तव्यपालन करतांना लक्ष्मण चुकला. त्याच्याकडून गुन्हा घडला व रामानं त्याचा गुन्हा नसतांनाही त्याला मृत्यूदंड दिला. तीच प्रथा कलियुगातही सुरु झालील होती. त्यामुळं कर्तव्यपालन करतांना कधी गुन्हा घडलाच तर ज्याप्रमाणे रामानं लक्ष्मणाला मृत्यूदंड दिला होता. तसाच मृत्यूदंड या कलियुगातही दिला जावू लागला. मात्र या काळात रामही देव अवतारात नव्हता, लक्ष्मण देव अवकारात नव्हता. कारण राम लक्ष्मण असूराच्या रांगेत साध्या माणसाच्या रुपात सहभागी झाले होते. स्वतःची ओळख न दाखवता. ते रुप कोणालाही ओळखू येत नव्हते. खुद्द कल्की रुपातील क्रिष्णालाही. क्रिष्ण रुपातील हा कल्की द्वापरयुगात त्याची इच्छा पूर्ण न झाल्यानं कलिययुगात त्यानं जन्म घेतला होता. तो सारेच असूर समाप्त करु पाहात होता. ज्यात देव, दानव सगळेच होते. राम, लक्ष्मणच नाही तर या युगात जरासंध, कंस, शिशूपाल, कालयवन, दंतवक्र, दुर्योधन, दुःशासनही होते. काही ध्रृतराष्ट्रही होते आंधळे असणारे. काही शंकूनीही होते. तर काही गांधारीही होत्या आणि काही द्रोणाचार्यही होते अन् तो एक वीर होता, ज्यानं द्रोणाचार्यसाठी गुरुदक्षीणा म्हणून अंगठा कापला होता. परंतू हा कलियुगातील एकलव्य हुशार झाला होता. तो गुरुदक्षीणा म्हणून कलियुगात आपल्या गुरुंना ठेंगाच दाखवीत होता. द्वापरयुगातील एकलव्यासारखा वागत नव्हता.

**********************************************

श्रीक्रिष्ण जेव्हा जेव्हा अर्जूनाला भेट द्यायला येत असे. तेव्हा चर्चा रंगत असत. अर्जून क्रिष्णाला प्रश्न विचारत असे. तसा एकदा पुन्हा श्रीक्रिष्ण अर्जूनाला भेटायला आला. त्यातच क्रिष्णाशी बोलता बोलता अर्जूनानं एक प्रश्न क्रिष्णाला विचारलाच. म्हणाला,
"माधव, मला कळत नाही की एकलव्य नेमका कोणाचा पुत्र आहे ते. कोणी म्हणतात की तो निषाद राज हिरण्यधनूचा पुत्र आहे. त्यामुळं त्याची जात नेमकी निषाद की जी अनुचीत जाती आहे. कोणी म्हणतात की तो तुमच्या काकाचा मुलगा आहे. त्यामुळं माझ्या मनात संभ्रम आहे. कृपा करुन सांगतोस का मला माधव. माझ्या मनात या प्रश्नानं गुंता निर्माण झाला आहे."
"का बरं गुंता निर्माण झाला पार्थ. अरे, तो माझा चुलत भाऊ. माझा काका देवश्रवाचा पुत्र. म्हणजे माझ्या वडीलाच्या चुलतभावाचा मुलगा तो. मग माझा तो चुलत भाऊच झाला ना."
"माधव, आणखी एक प्रश्न?"
"विचार अर्जूना, आणखी कोणता प्रश्न आहे तुझ्या मनात?"
"ही जात अनुचीत व चीत. हा काय प्रकार आहे? का जातीवरुन उच्च नीचता ठरवता येते का?"
"पार्थ, कोणतीही जात ही नीच नाही आणि कोणतीही जात ही उच्च नाही. त्यामुळं जातीवरुन कोणीही कोणाला श्रेष्ठ, कनिष्ठ ठरवू नये. जे ठरवतात, त्यांच्यासारखा महामुर्ख या जगात नाही. पार्थ जेव्हा जन्म होतो, तेव्हा ही जात घेवून आपला जन्म होतो काय? काय बाळाला जन्माबरोबरच कळतं का, की तो अमूक जातीचा आहे. अरे, निषादाचा दत्तक मुलगाही एकलव्य श्रेष्ठच ठरला की नाही. अन् हो तो निषाद राजा होता, त्याची आजुबाजूच्या प्रदेशावर हुकूमत होती. तो श्रेेष्ठच होता. मग तो कनिष्ठ कसा? ही जातीची उच्च नीचता. ह्या आपल्या भ्रामक कल्पना आहेत. त्याचा आपल्या वास्तवीक जीवनाशी काहीएक संबंध नाही. आणखी एक सांगतो की प्रत्येक माणसाचं रक्त, हाड व मांस एकसारखंच असतांना ह्या जाती कुठून आल्या? पार्थ, जात ही उच्च मानणा-या मानव समुदायानं आपल्या फायद्यासाठी तयार केली आहे. त्यामुुळं कोणतीही जात चीत नाही वा कोणतीही जात अनुचीतही होवू शकत नाही."
"माधव, एकलव्याचा जन्म का झाला असावा आणि एकलव्यानं मरतासमयी आपल्याला आपल्या मागीतलेल्या वचनाबद्दल सांगावे. मी असं ऐकलं आहे की एकलव्यानं आपल्याला मरतासमयी वचन मागीतलं होतं काहीतरी. कोणतं वचन होतं ते?"
"मी जेव्हा एकलव्याला पुढील संभाव्य धोका विचारात घेवून ठार केले. तेव्हा तो म्हणाला होता की भगवन् माझा बदला पूर्ण झालेला नाही. मला माझ्या गुरुशी लढायचं होतं. त्यांना विचारायचं होतं की त्यांनी माझा अंगठाच का मागीतला? तो मागण्याचा हक्क होता का त्यांचा. हं, मी हसतहसत दिला असेल अंगठा, परंतू उद्या कोणत्याच गुरुनं अशी शिष्याकडून वेगळीच गुरुदक्षीणा मागू नये म्हणून माझ्या स्वयं गुरुला धडा शिकवायचा होता. परंतू आता मी तर मरणाच्या दारात आहे. मी आता कसा काय त्याप्रमाणे माझ्या गुरुला त्याबद्दल विचारु शकेल? तेव्हा मी त्याला वचन दिलं की घाबरु नको एकलव्या, तुला पुढील जन्म मिळेल व पुढील जन्मात तुला जातीची अमानूषता विचलीत करणार नाही. तुला तुझा बदलाही काढता येईल. तुझ्याच हातून तुझ्या गुरुचा मृत्यू होईल. तुला वेदविद्या, शास्र शिकवायचीच गरज राहणार नाही. तू मुळात जन्म होताच शिकलेला असशील. मी तथास्तू म्हटले व त्यानंतर एकलव्यानं आपले प्राण मिटले. पुढे त्यानः आपल्या गुरुला ठार करुन बदला घेतला. आता तुझा दुसरा प्रश्न. एकलव्याचा जन्म का झाला असावा. हो ना. तर ऐक. एकलव्य जन्मापुर्वी श्रृंगपुरवेर राज्यात जंगलातील प्राणीमात्राची विपूल प्रमाणात शिकार केली जायची. त्यात हिंस्र व अहिंस्र प्राण्यांचाही समावेश असायचा. त्या जंगलात जे दरोडेखोर राहात. ते दरोडेखोर अशा जंगलातील कित्येक प्राण्यांची शिकार करुन त्या प्राण्यांचा पाषाणी मुर्तीवर बळी देत. त्यात विनाकारण प्राण्यांचा बळी जात असे.
राज्य..........राज्याची बागडौर सांभाळतांना हिरण्यधनूला नाकीनव यायचं. ह्या चोरांचा व दरोडेखोराचा बंदोबस्त लावता येत नव्हता. एक दिवस राजा हिरण्यधनू व महाराणी सुलेखा वनविहाराला गेले. तेव्हा एक दिवस हिरण्यधनूच्या पत्नीनं एका जंगलातील पशूला तडपतांना पाहिलं. तिला त्या पशूची वेदना सहन झाली नाही व त्यामुळं एक दिवस हिरण्यधनूची पत्नी सुलेखानं भगवान विष्णूजवळ आराधना केली आणि भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर तिनं एक वर मागीतला की तिला असा पुत्र द्यावा की जो या प्राणीमात्राचा रक्षक बनेल.
भगवान विष्णूनं ऐकलं. तसं तिचं पुत्रप्रेम उफाळून आलं आणि त्याच जंगलातील दाट झाडीत एका मुलांच्या रडण्याचा आवाज आला. हिरण्यधनू त्या मार्गानं गेले असता त्यांना एक लहानसं बाळ सापडलं. हेच ते बाळ पुढे एकलव्य म्हणून प्रसिद्ध झालं. माहित आहे पार्थ, या एकलव्यानं अगदी लहानपणीच जंगलातील चोरांचा व दरोडेखोराचा बंदोबस्त लावला होता. तसेच शेकडो मुक्या प्राण्यांचेही प्राण वाचवले होते."
अर्जून ऐकत होता ती कहाणी. त्याला ती कहाणी विचीत्र वाटत होती. तशी त्याची एकलव्यावरील इर्ष्याही कमी झाली होती. कारण त्याला एकलव्याची वास्तवीकता समजली होती. तशीच त्याची परोपकार वृत्तीही समजली होती.

*********************************************
अर्जून विचार करीत होता की आज एकलव्य जीवंत नाही. परंतू त्यानं केलेलं कार्य जीवंंत आहे. त्यानं गुरुदक्षीणा म्हणून गुरुला दिलेला अंगठा जरी मृत झाला असेल, तरी तो अंगठा आज जीवंत आहे.
क्रिष्ण नेहमीसारखा गेला होता आपल्या नगरीत. तो नेहमीच यायचा व नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर संवाद व्हायचे. परंतू आज क्रिष्णाची आठवण तशी येत नव्हती. कारण क्रिष्णानं आपला अवतार संपवला होता. तो आपला सखा सोडून गेला म्हणून अर्जूनाला फार दुःख झालं होतं. परंतू क्रिष्णही काय करणार. युग बदलणार होतं. त्यालाही कल्की अवतार धारण करायचा होता. तसं द्वापर युगातील कार्य संपलं होतं.
पांडवाचा वृद्धापकाळ जवळ आला होता. तसं युधीष्ठरानं अर्जून पुत्र परीक्षीतला गादीवर बसवून तो स्वर्गाच्या दिशेनं निघाला आपल्या सर्व भावांना व आपली प्रिय पत्नी द्रोपदीला घेवून.
श्रीकृष्णासारखा सखा सोडून गेला म्हणून अर्जून खूपच दुःखी झाला होता. एकामागून एक वाईट घटना घडल्यामुळे त्याच्या मनावर भयंकर ताण आला होता. तसा तो हस्तीनापुरात कसाबसा पोहोचला व बेशुद्धच पडला. त्याच्या चेह-यावर पाणी शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला. त्यानं आपल्या सर्व भावनांना व हस्तीनापूरातील सर्वांना बलराम, सात्यकी व श्रीकृष्ण यांचे देहावसान झाल्याचे सांगितले. समुद्राने त्यानंतर द्वारका कशी गीळली तेही सांगितले. दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आपले गांडीव धनुष्य निष्प्रभ झाले हेही सांगितले. आता जगण्याला काहीच अर्थ उरला नाही, असंही सांगितलं. त्यातच आता जगण्यात काहीही अर्थ नाही. असं सर्व पांडवांना वाटू लागलं होतं. त्यानंतर सर्व पांडव एकमतानं अखेरच्या प्रवासाला निघाले. त्याआधी युधिष्ठिराने राज्य परिक्षिताच्या हाती सोपवलं. त्याचा सल्लागार म्हणून युयुत्सु व गुरू म्हणून कृपाचार्य यांची नेमणूक केली. त्यांनी वल्कले परिधान केली.हस्तीनापूरातील सर्व नागरिकांचा प्रेमळ निरोप घेतला आणि सर्व भावांना घेवून तो स्वर्गारोहनाला निघाला. सोबत द्रौपदी पण त्यांच्यासह निघाली.
सर्व नगर शोकाकुल झालं होतं. मात्र पांडवांच्या मुखावर आत्मशांती विलसत होती. ते प्रथम द्वारका नगरीकडे निघाले. जिथे समुद्राने ती नगरी गिळंकृत केली होती, तिथे किनार्‍यावर उभे राहून श्रीकृष्ण, बलराम व वृष्णी घराण्यातील सर्वांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासमोर प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाला. तो म्हणाला,
“अर्जूना, तुझ्यासाठी मी वरूण देवाकडून गांडीव धनुष्य व बाणांचा भाता मागून घेतला होता. आता तुला त्याची काही गरज उरली नाहीच. म्हणून तू तो स्वहस्ते वरूणदेवांना परत दे.”
अर्जूनानं अत्यंत दुःखी होऊन, परंतू आदराने आपले गांडीव धनुष्य व भाता प्रदक्षिणा घालून ते समुद्रार्पण केले. त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले. जाता जाता मेरु पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदी पडली. तशी ती मरण पावली. ते भीमाला सहन झाले नाही. त्याने युधिष्ठिराला म्हटले,
“भ्राताश्री, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?”
त्यावर युधिष्ठर म्हणाला,
“भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतू, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जूनावर होते. हे एकप्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली. पुढं येवू शकली नाही.”
प्रवास सुरु झाला. तसा पुढे सहदेवाने प्राण सोडला. त्यावर भीमानं विचारले असता युधिष्ठर म्हणाला,
“सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला.”
त्यानंतर काही वेळ चालल्यावर पाठोपाठ नकुलानेही देह सोडला. तसं नकुलाबाबत भीमानं विचारले युधिष्ठराने असता त्यानं भीमाला सांगितले,
“नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता. म्हणून तो मृत्यू पावला.”
प्रवास पुन्हा सुरु झाला. तसं बराच वेळ चालल्यावर त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठर म्हणाला,
“आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारु, अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्धांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला.”
काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले,
“भ्राताश्री, मी काय केले म्हणून मला मरण येत आहे?” त्यावर युधिष्ठर म्हणाला,
“भीमा, तू माझा अत्यंत लाडका भाऊ आहेस. परंतू तुझ्यातही दोष असा आहे की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे. शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागते आहे.”
भीम मरण पावला होता. तसा युधिष्ठिर एकाकी पडला होता. त्याच्यासोबत एक श्वानही होता. तो आणि त्याचा श्वान पुढे मार्ग आक्रमत होते. अचानक मार्गात प्रकाश पसरला. इंद्रदेव आपल्या रथातून उतरत होते. ते म्हणाले,
“युधीष्ठर, तुला या रथातून माझ्याबरोबर स्वर्गात प्रवेश करायचा आहे.”
परंतू युधीष्ठराला आपले सारे बंधू व पत्नी नसताना स्वर्गात कसे जायचे, याचा संकोच झाला. तो इंद्रदेवाला म्हणाला,
“एकामागून एक माझे चारही भाऊ व माझी पत्नी मला सोडून गेले. ते जर बरोबर नसतील, तर मी तुझ्याबरोबर स्वर्गात कसा येणार?” इंद्र हसला व म्हणाला,
“युधीष्ठर, ते सारे स्वर्गातच आहेत. त्यांनी आपले मानवी देह मात्र इथे ठेवले आहेत. मी तुला सदेह स्वर्गात प्रवेश देण्यासाठी इथे आलो आहे.”
त्यावर युधीष्ठर म्हणाला,
“देवा, हा माझा मोठा सन्मानच आहे. परंतू, कृपा करून मला सोबत करणार्‍या या श्वानाला पण स्वर्गात प्रवेश करु दे. त्याने माझी खूप काळ सोबत केली आहे व त्याची माझ्यावर नितांत भक्ती आहे.”
युधीष्ठराचे हे श्वानावरचे प्रेम पाहून इंद्रदेवांना हसू आले. ते म्हणाले,
“युधीष्ठरा, तुला अमरत्व मिळत आहे. स्वर्ग प्राप्त होत आहे. तू भाग्यवान आहेस. माझ्या बरोबरीचा आहेस. परंतू या श्वानाला स्वर्गात जागा नाही. त्याला इथेच सोडावे लागेल.”
युधीष्ठर मात्र हट्टी होता. युधीष्ठराने हट्ट सोडला नाही. तसा इंद्र म्हणाला,
“तू अगदी मूर्खपणाचे वर्तन करीत आहेस. अजूनही तू मर्त्य मानवासारखा भावनांमध्ये गुंतून पडला आहेस. त्या श्वानाला माझ्या रथात मी घेऊच शकणार नाही.”
त्यावर युधीष्ठर म्हणाला,
“या श्वानावरची करुणा व दया मी जर सोडली, तर पुण्यकर्मांमुळे ज्यांना स्वर्गवास लाभला आहे, त्या सर्वांचाच नाश होईल. त्याचा त्याग करायचा नाही. हा माझा नियम आहे. तो माझ्यावरती विसंबून आहे म्हणून मी त्याला सोडू शकत नाही.”
त्याचं हे निर्वाणीचे बोलणं ऐकून त्या श्वासांनं आपल्या शरीराचा त्याग केला व त्याच्या जागी युधिष्ठिराला आपल्या पित्याचे म्हणजे यमाचे दर्शन झाले. यम म्हणाला,
“माझ्या मुला, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या करुणेने माझे ह्दय जिंकले आहे. आज मी पुन्हा तुझ्या सदाचरणाची परीक्षा घेतली. मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. तू तुझ्या पुण्याईने इंद्रासोबत स्वर्गात प्रवेश कर.”

************************************************************************************************

युधीष्ठरनं स्वर्गात प्रवेश केला होता. तसा प्रवेशद्वारावर स्वर्गातील सर्व देव व रहिवासी यांनी युधीष्ठराच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तो पहिलाच मानव होता की ज्यानं सदेह स्वर्गात प्रवेश केला होता.
स्वर्गात प्रवेश करताच युधीष्ठरानं पाहिलं की एकलव्य एका दिव्य सिंहासनावर विराजमान असून तिथे द्रोपदी व त्याचे भाऊ नाहीत. त्यावर युधीष्ठर आपल्या स्वर्गात नेणा-या दूताला म्हणाला,
"इथे माझे भाऊ नाहीत. माझे भाऊ जिथे आहेत. तिथे मला घेवून चाला."
दुतानं ते ऐकलं व युधीष्ठराला तो दूत नरकात घेवून गेला. तिथं विचीत्र दुर्गंधी येत होती. आजुबाजूला मुडदे दिसत होते. कावळे व घुबडंही होते तिथं. ते मांस खात होते. तसा युधीष्ठर स्वर्गदूताला म्हणाला,
"हे काय आहे? इथं अशी दुर्गंधी का?"
"हे नरक आहे."
युधीष्ठरानं आजुबाजूला पाहिलं. तसा तिथं त्याचा परीवार दिसला. तसा युधीष्ठर स्वर्गदूताला म्हणाला,
"तुम्ही परत जा. मी माझ्या भावासोबत इथंच राहतो."
तशातच सर्व देव तिथं हजर झाले. त्यांनी सांगीतलं,
"ज्यावेळी द्रोणाचार्यला मारलं गेलं. त्यावेळी हे युधीष्ठरा, तू थोडंसं खोटं बोलला. म्हणून तुला या स्वर्गाचं दर्शन घडलं आहे. परंतू तुझी आम्ही जी परीक्षा घेतली. त्यानुसार तू परीक्षेत पास झाला आहेस. आता स्वर्गात चल. स्वर्गाचा आनंद घे. तिथंच तुझे भाऊ व द्रोपदी तुझी वाट पाहात आहेत."
स्वर्गदूतांनं त्याला रथात बसवलं. तसा युधीष्ठर रथात बसला व रथ स्वर्गाच्या दिशेनं चालू लागला. त्यातच रस्त्यात देवगंगा नदी लागली. स्वर्गदूतानं रस्त्यात रथ थांबवला. त्यातच युधीष्ठरानं देवगंगा नदीत आंघोळ केली व आपलं मानव शरीर त्यागलं. तसा दिव्य शरीर धारण करुन तो पुन्हा रथात बसला व रथ पुन्हा स्वर्गाच्या दिशेनं चालू लागला. थोड्याच वेळात स्वर्ग आलं.
युधीष्ठरानं स्वर्गाचं निरीक्षण केलं असता त्यानं पाहिलं की त्याचे भाऊ सिंहासनावर विराजमान असून बाजूच्याच एका सिंहासनावर द्रोपदीही बसली आहे. भीम वायूजवळ, कर्ण सुर्याजवळ, नकूल सहदेव अश्वीनीकुमाराजवळ असून साक्षात द्रोपदी लक्ष्मीरुपात विराजमान आहे. त्यातच तिच्याचजवळ एकलव्यही बसलेला असून तोच न्याय करीत आहे. तेव्हा युधीष्ठरानं विचारलं,
"ही द्रोपदी लक्ष्मीस्वरुपात का दिसत आहे?"
"ती साक्षात लक्ष्मीच आहे. लक्ष्मीनंच द्रोपदीच्या रुपात जन्म घेतला होता."
"अन् तो ध्रृष्टधुम्न काय करीत आहे तिच्याजवळ?"
"तो ध्रृष्टधुम्न नाही.?
"मग कोण आहे तो?"
"तो एकलव्य आहे. त्याची तुम्ही मृत्यूलोकात परीक्षा घेतली ना. म्हणून तोही या स्वर्गलोकात परीक्षादूत म्हणून लक्ष्मीजवळ बसलेला आहे. तो प्रत्येकच इथं येणा-या जीवांची परीक्षा घेत आहे."
युधीष्ठर काय समजायचं ते समजला व नंतर काही बोलण्यासाठी आपल्या भावांना आवाज देवू लागला. परंतू त्याचा आवाज ते ऐकत नव्हते. तसा काही वेळात त्यानं आदेशही दिला. परंतू तो आदेशही त्यांनी ऐकला नाही. तसा तो स्वर्गदूताला विचारु लागला,
"असं काय होतंय."
स्वर्गदूत म्हणाला,
"भगवन, ते आता तुमचे भाऊ नाहीत. ती तुमची पत्नीही नाही. त्यामुळं ते तुम्हाला ओळखू शकत नाही. म्हणून तुमच्याशी ते बोलू शकत नाहीत. कारण ते आता मृत्यूलोकात नाहीत तर स्वर्गात आहेत. त्यांनी आपला पुर्वीचा अवतार संपवलेला आहे."
तसं त्यानं काही वेळातच पाहिलं की काही स्वर्गसेवक त्या स्वर्गात आलेल्या त्याच्या भावांना उकळत्या तेलात जबरदस्तीनं टाकत आहेत आणि काहींना मारत आहेत. काहींना अग्नीचे चटके देत आहे. ते पाहून द्रोपदी हसत आहे. ते सर्व विचित्र वाटत होतं. तसा युधीष्ठर म्हणाला,
"हे काय घडत आहे?"
"ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा. ते स्वर्गसेवक त्यांना दंड देत आहेत नव्हे तर हा मृत्यूदंड आहे. ते पृथ्वीवरचं मरण वेगळं आणि हे येथील मरण वेगळं. इथं येणा-या प्रत्येक जीवांला त्याच्या त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगावीच लागते."
"मला हे नाही समजलं की ती लक्ष्मीरुपातील द्रोपदी हसत आहे. तिला कोणतीच शिक्षा नाही. अन् त्या माझ्या चारही भावांना शिक्षा. असं का?"
"त्याचं कारण आहे की द्यूतसभेत तिचा अपमान होत असतांना हे सर्व पाप करीत होते. तिथं आवाज न चढवता व द्रोपदीला न्याय मिळवून न देता सर्वजण चूप बसले होते. म्हणून त्यांना अशा यातना मिळत आहेत."
"परंतू त्या कृत्याचा भागीदार मीही आहे ना."
"हो, म्हणूनच तुम्हाला जबर शिक्षा होणार आहे. कारण तुम्हाला त्या द्रोपदीला आणि तुमच्या भावांना द्यूतसभेत दावणीला लावायची काहीही गरज नव्हती. तसेच द्यूतससभेत द्रोपदीलाही दावणीला लावायची काहीही गरज नव्हती. तसंच महाभारताचं जे युद्ध झालं, त्या युद्धाचाही सेनापती तूम्हीच होता. तुमच्यामुळं शेकडो निरपराध लोकांचे प्राणम गेलेत. त्यामुळं आता या श्रेणीत तुमचा क्रमांक आहे. म्हणूनच स्वतः प्रत्यक्ष यम तुम्हाला न्यायला आले होते पृथ्वीवर. कारण तुमचे कर्म वाईट होते. ज्यामुळं युद्ध घडलं."
"मला माहित आहे. परंतू त्या द्रोपदीचा त्यात काहीच दोष नव्हता की तिला लक्ष्मीचं स्थान मिळालं?"
"नाही. तिचा कोणताच दोष नव्हता."
"ती दुर्योधन जेव्हा इंद्रप्रस्थच्या भुलभुलैय्यात अडकला. तेव्हा ती विनाकारण हसली ना आणि म्हणाली होती की अंधे का पुत्र अंधा. म्हणूनच तर दुर्योधनानं मला द्यूतक्रिडेचं आमंत्रण दिलं. मग यात तिचा काहीच गुन्हा नाही तर?"
"नाही. ती हसलीही असेल आणि म्हटलंही असेल की अंधे का पुत्र अंधा. परंतू तिचा उद्देश वेगळा होता. तिचा उद्देश दुर्योधनाचा स्वभाव बदलवणे होते. त्यानं पुढं पाहून चालावं नाहीतर धोका होईल हे दर्शवाचम होतं तिला. म्हणूनच ती हसली होती. परंतू दुर्योधनानं त्याचा बाऊ करुन तिला छळलं व मानही राखला नाही. ते पाप होतं."
"परंतू मी तर त्याला त्या पापाची शिक्षा दिली. मग मी पापमुक्त झालो नाही काय?"
"कसे होणार? अहो, पापातून पापमुक्ती मिळविण्याऐवजी पापच होणार नाही याची काळजी घेतली तर........तर मृत्यूलोकातून पापच नष्ट होईल व आम्हालाही त्रास होणार नाही. परंतू तसं घडत नाही. जिथं स्वर्गलोकातच पाप घडत असतं. त्यानंतर या स्वर्गलोकातील पापी लोकांचा जन्म मृत्यूलोकात होतो. तिथं तुम्ही मृत्यूलोकवासी. तुमच्या हातून तर पाप होणारच. त्यात तुम्हाला दोष जरी वाटत असला तरी तुम्ही पाप करण्यापासून थांबत नाही. मात्र तुमचं शुल्लक पाप असलं तर या स्वर्गलोकात तुम्हाला अशा किरकोळ शिक्षा देवून तुमचं शुद्धीकरण केलं जातं. जास्त पाप असेल तर नरकात पाठवलं जातं. नरकात नरकयातना दिल्या जातात. त्यातून आत्म्याला शुद्ध करुन मग स्वर्गात पाठवलं जातं. इथे आत्मा आल्यावर इथे ठरवलं जातं की याचे मागील जन्मातील कर्म काय? त्यानुसार पुन्हा मृत्यूलोकात तशा स्वरुपाचा जन्म दिला जातो. जर त्या मृत्यूलोकात तसा जन्म घेतल्यानंतर आपले कर्म चांगले झाले तर स्वर्गलोक मिळतो. अन्यथा कर्म पुन्हा वाईट घडल्यास पुन्हा नरक. हा फेरा साखळीसारखा सुरुच असतो जन्मोजन्मी. या फे-यातून सुटायचे असेल तर चांगले कर्म करण्याची गरज आहे. त्याशिवाय मुक्ती नाही. आपल्या हातून चांगले कर्म घडले तर आपल्याला स्वर्गात अढळ पद मिळते अगदी ध्रृवासारखे. दुर्योधनालाही शिक्षा मिळत आहे. त्यानं केलेल्या पापाची. त्याचं तर पाप अति जास्त आहे आणि तुम्हालाही स्वर्गसेवक सोडणार नाही शिक्षेपासून. तुम्हालाही शिक्षा होणारच आहे."
स्वर्गदूत सांगत होता. तसा तो काही वेळानं चूप बसला.
काही वेळ असाच गेला. थोड्याच वेळात स्वर्गसेवक आले. ते युधीष्ठरजवळ उभे राहिले. त्यांनी युधीष्ठरला न्याहाळलं व विचार करीत युधीष्ठरला रथातून उतरण्यास सांगीतलं. तसा युधीष्ठर रथातून उतरताच त्याला त्या स्वर्गदूतानं प्रेतासारखं पकडलं आणि ओढत ओढत नेत उकळत्या तेलात टाकलं. युधीष्ठरची आत्मा जशी तेलात पडली. तसा चणकन आवाज आला. तशी ती आत्मा तेलातून तळून निघाली.
आत्मा तेलातून निघाली असली तरी ती जीवंत होती. मात्र त्या आत्म्याला तेलात पडताच महाभयंकर त्रास झाला होता. ती आत्मा वेदनेनं विव्हळत होती. ते दृश्य पाहात लक्ष्मी रुपातील द्रोपदी व तिच्याच शेजारी असलेला एकलव्य हासत होता आणि जाणीव करुन देत होता की आतातरी सुधर आणि नवीन जन्म झाल्यावर नव्या जन्मात चांगले कर्म करशील. परंतू युधीष्ठरला ती द्रोपदी हासताच भयंकर राग आला होता. जणू तो राग येताच युधीष्ठर इंद्रप्रस्थला चक्रव्युहात पडलेल्या दुर्योधनासारखा वाटत होता. परंतू थोड्याच वेळाचा अवकाश. युधीष्ठरची आत्मा भानावर आली. क्षणातच त्या आत्म्याला इंद्रप्रस्थ आठवलं. क्षणातच तो दुर्योधनही. तशीच क्षणातच ती द्यूतक्रिडा. त्यातच ते अठरा दिवस चाललेलं महाभारताचं युद्ध. आपण आता तेच दुर्योधनाचे कर्म करीत होतो या स्वर्गलोकात. असंही त्याला वाटत होत.
युधीष्ठर भानावर येताच व त्याला तसा विचार येतात त्यानं आपला राग निवळला. तद्नंतर तो स्वर्गाची वाट चालू लागला. तिथंच कायमची वस्ती करण्यासाठी. आता तो विचार करीत होता की स्वर्गात राहून तो वाईट कर्म कधीच करणार नाही.
तो स्वर्गाची वाट चालत होता. तसा त्याला विचार येत होता त्याच्या आत्म्याचा. जी त्याची आत्मा तेलात तळली गेली होती. वाटत होतं की तेही एक मृत्यूदंडच आहे. दुषीत आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी योजलेलं. ज्याप्रमाणे मृत्यूलोकात कुणा निरपराध माणसांवर अन्याय, अत्याचार होवू नये म्हणून अन्याय अत्याचार करणा-या नराधमांना ठार करतात तसं. फरक एवढाच की याठिकाणी मृत्यूदंडानं आत्म्याचं शुद्धीकरण होतं आणि मृत्यूलोकात मृत्यूदंडानं माणसाचं.
युधीष्ठर स्वर्गाची वाट चालता चालता थोड्याच वेळात दिव्य प्रकाशझोत दिसला. इंद्र सिंहासनावर बसला होता. अप्सरा नाचत होत्या. तसा युधीष्ठरानं स्वर्गदरबारात प्रवेश केला. त्यावेळी प्रत्यक्ष युधीष्ठराचे स्वागत करण्यासाठी इंद्र उभा राहिला त्याचबरोबर त्याच्या दरबारातील अप्सराही. त्याचे स्वागत झाले होते. तसं त्याला सिंहासनावर बसविण्यात आले आणि इंद्रानं विचारलं की आता पुन्हा मृत्यूलोकात जाणार काय?
इंद्रानं तसं म्हणताच युधीष्ठर काही क्षण चूप बसला. तसं त्याला मृत्यूदंड आठवलं. तसा काही वेळानं विचार करीत तो म्हणाला,
"नाही. आता पुन्हा मृत्यूलोकात जाणे नाही. मी इथंच राहणार व चांगले कर्म करणार."
इंद्रानं त्याला संमती दिली व तसा होकार मिळताच युधीष्ठर इंद्रदरबारी रमला. त्यानंतर सर्वांनी एकेक करीत मृत्यूलोकात जन्म घेतला होता. परंतू युधीष्ठर मात्र आजही स्वर्ग सोडायला तयार नव्हता. कारण त्याला भीती होती मृत्यूदंडाची. प्रसंगी मृत्यूलोकातील मृत्यूदंड बरा. परंतू स्वर्गातील मृत्यूदंड बरा नाही असे त्याला वाटत होते. म्हणूनच तो स्वर्गात चांगलेच कर्म करीत होता. मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी नव्हे तर सततच्या जन्म मृत्यूच्या फे-यातून वाचण्यासाठी. कारण नेहमी नेहमी मृत्यूदंड बरा नाही असे त्याला वाटत होते.

************************************************************************* समाप्त**************