Ek Pakda Wada - 5 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | एक पडका वाडा - भाग 5

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

एक पडका वाडा - भाग 5

तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली ती मला म्हणाली,
"ते बघ नेहा तिकडे त्या फरशीवर चल तिथे एकही साप नाहीये"

मी बघितलं खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता कारण त्याच्या भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडुपे ओलांडून त्या फरशीवर उभे राहिलो न राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे अशीं उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती एक आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती.

त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती.

आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्या सारखं सरपटत वर वर जाऊ लागलो. बराच वेळ सरपटल्यावर रक्षा ला थकवा आला म्हणून ती थोडावेळ थांबली जवळच एक लोखंडी कडी होती तिला धरून ती टेकली. मी सुद्धा त्याच्या विरुद्ध बाजूच्या लोखंडी कडीला धरून थोडी विसावली. जसं मी थोडं मागे सरकून बसण्यासाठी त्या कडीवर जोर दिला तसा माझ्या मागची भिंत सरकली आणि मी भिंतीपालिकडे घसरली रक्षा तिथेच राहिली मी एकटीच घसरत घसरत एका खोलीत जाऊन पडली.

बापरे!! मी इथे एकटी होती आणि रक्षा तिकडे एकटी आता काय होणार कमीतकमी तिला मी आणि मला ती सोबत तरी होतो पण आता जे काही होईल त्याला आम्हा दोघींना एकेकटीने तोंड द्यायचं होतं.

मी हळूहळू सगळीकडे नजर फिरवली संपूर्ण खोली रिकामी होती. अचानक माझं लक्ष वर गेलं आणि मी चरकलीच वर चारही कोपऱ्यात मोठमोठे वटवाघळे होते आणि छताच्या मध्यभागी सुद्धा एक तसंच मोठं वटवाघूळ होतं. अरे बापरे म्हणजे मी त्याच खोलीत येऊन पडली होती ज्यात काही वेळापूर्वी रक्षा अडकली होती. ते वटवाघळे झोपले असावेत असं मला वाटलं त्यामुळे मी काहीही हालचाल न करता जागीच थिजली. नजाणो मी इकडे थोडी जरी हालचाल केली आणि त्या वटवाघळाना जाग आली तर मला ते पंखांचे फटके मारून मारून जखमी करून टाकतील. त्यामुळे मी श्वास ही हळू हळू घेऊ लागली.

इथे मी एकटी आणि तिकडे रक्षा ची काय अवस्था होती काय माहीत? एकटी असल्याने ती सुद्धा फार घाबरली असेल ती तिथेच असेल की आणखी कुठल्यातरी खोलीत जाऊन पडली असेल काय माहीत? इकडे आम्हाला सोडवायला आलेले आमचे नातेवाईक सुद्धा वापस गेलेले दिसत होते. त्यांचा काहीच आवाज येत नव्हता.

तेवढ्यात सतत धुळीत आणि खाली तळघरात थंड वातावरणात राहिल्यामुळे मला शिंक येईल की काय अशी मला भीती वाटली आणि मला शिंक आलीच मी खूप तोंड दाबून शिंकण्याचा प्रयत्न केला पण थोडा आवाज झालाच आणि एका कोपऱ्यावरच्या वाटवाघळाने त्याचे पंख फडफडवले.

माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला. त्याची फडफड ऐकून इतर वटवाघळे सुद्धा पंख फडफडवू लागले.

बापरे! मला आत्ताच शिंका यायची होती, आता काय होणार, आता आपलं खरं नाही, पाचही वटवाघळे त्यांचे पंख जोरजोरात फडफडवत होते त्याचा आवाज खूप भयानक होता.

अत्यंत विद्रुप चेहरे असलेले ते वटवाघळे खूप विचित्र आवाज काढत होते. त्यांची उंची एखाद्या मानवाएवढी होती. हातपाय वाटवाघळासारखे पण चेहरा मानवी होता तरीही भेसूर आणि विद्रुप दिसत होता. लाल डोळे लांब दात जाड भुवया अत्यंत किळसवाणे दिसत होते.

मी फक्त क्षणभर डोळे मिटले तेवढ्यात जोरात एक फटका माझ्या तोंडावर बसला. मी एकदम दचकून उठून उभी राहिली पाहते तर काय पाचही वटवाघळे माझ्याच भोवती घिरट्या घालत होते.

मी सैरावैरा त्या खोलीतून पळत होती आणि ते वटवाघळे सुद्धा माझ्याच मागे घिरट्या घालत जोर जोरात पंख फडफडवत येत होते.

क्रमश: