हळूहळू रक्षा शुद्धीवर आली.
"रक्षा काय झालं तुला? ही तुझी अवस्था हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे?",मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले.
"नेहा हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात अघोरी शक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेली तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं. मी आत जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली.
दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत पाच मोठमोठे वटवाघूळ खोलीच्या चार कोपऱ्यात चार आणि छतावर एक असे उलटे लटकलेले दिसले ते वटवाघळे साधे नव्हते त्यांचा आकार खूप मोठा होता मानवाच्या आकारा एवढे होते ते त्याचं धड वटवाघळा सारखं होतं आणि चेहरे मानवी होते पण खूपच विद्रुप होते.
मी खोलीत गेल्या गेल्या ते माझ्या चहूबाजुनी त्याच्या पंखांनी मला फटकारे मारत होते मी मोठमोठ्याने ओरडत रडत होती माझ्या हातावर चेहऱ्यावर सगळीकडे त्यांच्या काटेरी पंखांमुळे मला ओरखडे आले.",तिने हळूहळू मला सगळी हकिकत सांगितली.
"आता आपलं काय होणार काय माहीत? आपल्या मैत्रिणी आपल्या मदतीला कोणाला घेऊन येतील का? आपल्या आई वडिलांना सांगतील का? ",मी म्हंटल
"काय माहीत?",रक्षा
"आई! गं! ",तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी चावलं.
आम्ही बघतो तर काय सगळीकडे बारीक बारीक काळे किडे वळवळत होते. झपाट्याने ते आमच्या अंगावर चढायला लागले. आम्ही दोघी पटकन उठलो आणि कपडे जोरजोरात झटकत खालच्या व्हर्यांड्यातून अंगणात येऊन उभ्या राहिलो. आम्ही उभ्या राहून 2 सेकंद झाले नसतील तर तिथेही सर्वत्र तेच किडे आजूबाजूला वळवळू लागले. आम्ही तिथूनही पळालो.
घाईघाईत आम्ही तिथल्या उजव्या बाजूच्या खोलीत गेलो पण लवकरच तिथे जाऊन आम्ही खूप चूक केली हे आमच्या लक्षात आलं.
त्या खोलीत शिरल्या शिरल्या त्या खोलीचं दार सुद्धा धाडकन बंद झालं.
आम्ही घाबरून सगळी कडे बघितलं वर छतावर सुद्धा बघितलं पण कोणीच कुठे ही नव्हतं. त्या खोलीत चार लाकडी कपाटं होते बाकी दुसरं काहीच नव्हतं.
आम्ही तिथल्या एका भिंतीला टेकून बसलो. आम्ही दोघीही धापा टाकत होतो त्यामुळे आम्हाला काही बोलणं सुचत नव्हतं. घसा एकदम कोरडा पडला होता.
तेव्हा आम्ही एवढ्या घाबरलो होतो की आम्हाला काहीच सुचत नव्हतं. देवाचं नाव घ्यायचं सुद्धा आमच्या डोक्यात आलं नाही.
हळूहळू माझा श्वास पूर्ववत झाला. रक्षाने भिंतीला डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. मला डोळे मिटण्याची सुद्धा भीती वाटत होती.
तेवढ्यात त्या खोलीतील एका कपाटाचं दार फडकन उघडलं. आम्ही दोघीही दचकलो. आणि जे दृश्य आम्ही बघितलं ते बघून आमचे डोळे इतके विस्फारल्या गेले की ते आता बाहेर येतात की काय असं वाटलं.
त्या कपाटातून एक सांगाडा बाहेर येऊन पडला. आम्ही गडबडून उठलो आणि दाराकडे धावलो पण दार काही केल्या उघडल्या जात नव्हतं. तेवढ्यात दुसरं कपाट उघडलं आणि त्यातून आणखी एक सांगाडा आमच्या पुढ्यात येऊन पडला. त्याच्या पाठोपाठ तिसरे कपाट उघडले त्यातून चार पाच सांगाड्यांचा खच पडला. चौथं कपाट आता उघडेल की काय असं वाटून आम्ही चौथ्या कपाटाकडे रोखून बघू लागलो. काही मिनिटं निघून गेली पण ते चौथं कपाट काही उघडलं नाही.
एवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरजोरात ठकठक करत होते. मला वाटते आमच्या मैत्रिणींनी सांगितल्यामुळे आमच्या शोधात आमचे आईवडील आले होते बहुतेक.
थोड्याच वेळात आमच्या नावाचे मोठ्या आवाजात हाकारे आम्हाला ऐकू आले.
"नेहा!!! रक्षा!!! कुठे आहात तुम्ही दोघी? दार उघडा! घाबरू नका! आम्ही आलोय!" आमच्या कुटुंबीयांचा आणि मैत्रिणींचा आवाज येत होता.
आतून आमचे घसे एवढे कोरडे पडले होते की ओरडणं तर दूर आमच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता. मनातून कितीही ओरडावस वाटत होतं पण घशातून काहीच आवाज होत नव्हता.
क्रमशः