मल्ल प्रेमयुध्द
"काय खरं सांगतोयस?" संग्राम जवळ जवळ किंचाळला.
"व्हय दादा लंग्न करिन... नक्की करिन पण फकस्त क्रांतीबर" वीर म्हंटल्यावर संग्रामच्या चेहऱ्यावर आनंद पण बाकी सगळे बसलेले उठून उभे राहिले.
"वीर... खेळ न्हाय हा..." सुलोचनाबाई म्हणाल्या.
"खेळ तुम्ही लावलाय म्या न्हाय... तुम्ही म्हणता म्हणून म्या लग्न करायच तुम्ही म्हणाला कि माझं ठरलेलं लगीन मोडायचं... आबा माझं मन हाय का न्हाय? मला इचारात घ्यायला पाहिजे व्हतं तुमी... आत्या तुला ठाव हाय माझं किती प्रेम हाय क्रांतीवर तुम्ही तरी आबा अन आईला समजवायचं..."वीर बोलून गेला.
"म्हंजी गावातला प्रत्येक माणूस माझा शबूद मानतो ते येडे हायत अन तुमी एकटेच शाहने..." आबा रागाने बोलले.
"न्हाय आबा आज तुमचा हा गैरसमज मोडतो ते तुम्हाला मामान्तयथे जरी खरं असलं तरी ते तुमास्नी घाबर्टीत म्हणून तुमचं एकत्यात हे मान्य करा तुम्ही आबा..." संग्राम म्हणाला.
"संग्राम... आव तुम्ही कुणाला बोलताय ?" सुलोचनाबाई म्हणाल्या.
"आई आजपर्यंत एकल कि... आता माझ्या न्हाय त्याच्या मनासारखं तरी करा." संग्राम म्हणाला.
"आत्या तुला दुखवावं आस अज्याबात न्हाय. फकस्त माझ्या मनाचा इचार कर इतकंच." वीर म्हणाला.
"आबा आर कशापाई लेकराच्या मनाच्या इरुद्ध करतोस ? आपण जरी लगीन लावून दिल तरी ते मनं समाधानी असणार हायीत का? पोरांची आयुष्य उध्वस्त व्हायचीत." आत्या आबांना समजावत व्हतीत.
" म्हणून व्हणाऱ्या सुनेला हाप पॅंटीवर कुस्ती खेळायला पाठवू व्हय." आबा रागात म्हणाले.
"आबा लोक आता हाप पॅन्ट न्हाय बघत, त्यांना पोरींच्या गुणांचं कौतुक असत... चांगलं ते घेत्यात अन तुम्ही सुद्धा आता तुमचं इचार बदला." वीर पहिल्यांदा आबासोबत असा बोलत व्हता.
"तुम्ही शिकवा मला कि कस बोलायचं अन कस वागायचं..." आबा
"आबा मी परवा मुंबईला जातोय. लग्न त्याच तारखेला व्हईल तुम्ही न्हाय म्हणाला तर मी माझं लग्न क्रांती बरोबरच करीन " वीर म्हणाला आणि वर गेला.
" आबा आर नको नाराज व्हवूस... मला काय बी वाटलं न्हाय नको वाईट वाटून घेऊ... क्रांती चांगली पोर हाय बघ तुझ्या घराला सांभाळून घेईल." आत्या
"आक्क्का मला आता माझं वाईट वाटतंय, माझी पोर मला कधी असं बोलली नव्हती ग... म्हंजी म्या चुकीचा हाय का?"
"आबा आव लेकरं ती आता मोठी झाल्यात, त्यांची मत हायत कि त्यांना अन आयुष्याचा प्रश्न असल्यावर त्यांनी का शांत बसावं?' आबांचे दाजी त्यांना समजावत व्हते. तिथून ऋषी उठला अन वीरच्या रूमकडे गेला.
"दाजी आज खऱ्या अर्थानं पोर मोठी झाल्याची समजली मला... माझंच चुकलं..."आबा
"असं न्हाय आबा... त्यांच्या जागेवर जाऊन इचार करा आजकालची पिढी संस्कार जपेल पण त्यांचं करियर त्यांच्यासाठी तेव्हढचं महत्वाचं हाय, आता त्यांच्या मताप्रमाणे आपल्यात बदलकरया पाहिजे." सपना आणि तेजश्री उठून वर रूममधी गेल्या.
"है पोरीला माझ्या वाईट वाटलं असणार हाय." सुलोचनाबाई स्वप्नालीला जाताना बघत म्हणाल्या.
"काय नका काळजी करू... क्रांती तुमास्नी सून म्हणून शोभल स्वप्ना न्हाय... ती शिकली महान न्हाय आमास्नी तीच इचार म्हायती हायत म्हणून...अन ती थोड्या दिवसात इसरल बी ह्या गोष्टी ती जागेवर माग थांबणाऱ्यातली पोर न्हाय... " दाजी म्हणाले.
"आबा नको ताणून धरू त्यांची आयुष्य आपण न्हाईत ठरवायची हा मात्र चुकीच्या वाटण जात असत्याल तर अडवायचं तिथं त्यांचं काय बी ऐकायचं न्हाय. आबा क्रांती हुशार हाय ती लै पुढं जाणार हाय तिचा तुला एक ना एक दिवस अभिमान वाटलं बघ नक्की." आत्या म्हणाली. आबा काहीही न बोलता वर निघून गेले.
इकडे वीर त्याच्या रूममध्ये डोकंधरुन बसलं व्हता.
"ये दादा मी येतानाच स्वप्नाताईला म्हणालो होतो. कि तू डोक्यात काही धरू नकोस... दादाच क्रांतिवाहिनीवर एवढं प्रेम आहे कि तो इतर कोणाचा विचार सुद्धा करणार नाही. दादा मला माहित होत हे असच घडणार आहे." ऋषी
"ऋषी सगळं ठीकी हाय पण मला वाईट वाटतंय, मी बोलिन स्वप्ना सोबत..." वीर म्हणाला
" दादा ताईला माहित होत हे असच होणारे तरीसुद्धा ती आली फक्त आबामामा साठी अन..." ऋषी बोलता बोलता थांबला.
"या काय?" वीर
"काही नाही जाऊदे..." ऋषी
"सांग हा नायतर मला म्हाईत हाय तू इथं का आल्यास माझ्या माग मी चिनुला भेटायला नेणार न्हाय.." वीरने ऋषींचा कां पकडला.
" आ आ दादा यार सोड... सांगतो."
"हा आता कस ." वीरन त्याचा कान सोडला.
"अरे ती तेजू वहिनी तासंतास तिच्याशी फोनवर बोलत असते. तिला क्रांती वाहिनीपेक्षा स्वप्न य घरात यावी असं वाटतंय." ऋषी " काय??? तेजू वहिनीला...? पण का ?"
त मला माहित नाही. त तूच विचार वहिनीला..." ऋषी म्हणाला तेवढ्यात आत्या मामा आले.
"वीर..." त्याच्या वीरच्या डोक्यावंर मायेने हात फिरवला.
"आत्या मामा माफ करा मला..." वीर म्हणाला
"माफी मागायची गरज न्हाय... लेकरं तुझया मनाचा इच्छा करायला पाहिज की नको." आत्या
"हो अन आम्ही आलोय तर क्रांतीकडं जावं म्हणतुया... गाडी काढतोस...?" मामा म्हणाले.
"व्हय नक्की..." वीर म्हणाला. त्याला ऋषीं 'डोल मारला.
"ऋषी तू थांब घरी, आम्ह जाऊन येतो." वीर हसत म्हणाला.
"ये नाही मला वहिनीला भेटायचंय." ऋषीने पटकन गाडीचं चव उचलली आणि खाली गेला.सगळं हसायला लागले.
"वहिनी मला माहीत होत हे असावं घडणार, उगाच आले स्वतःचा अपमान करू घ्यायला अन हा तुझ्यामुळं झालाय लक्षात ठेव. तू जर मला फुस लावली नसती नसतीस तर मी आलेच नसते." स्वप्नाली वैतागली होती.
"आग शांत हो जरा, तुला वाटतंय व्हय मामांजी एवढ्या लगीच हार मानत्याल. तू घाई नको करू लगीच काई तरी नक्की व्हईल तुझं मामा तुझया चेहर्याव नाराजगी न्हाय बघू शकणार." तेजश्री
"एवढ सगळं होऊन तुला असं वाटत का आता की आजून आमचं लग्न होईल?" स्वप्ना
" हा वाटतंय. कारण आबासाहेब हायत ते हार मानणार्यातला नाहीत." तेजश्री
"आता मला न्हाय वाटत कि काह होईल, मी माझ्या जॉबच्या मागे लागली होती. तू मला आशेचा किरण दाखवलास म्हणून मी इथपर्यंत आलं तर हे सगळं ... " स्वप्ना
"तू हार की मानती, जरा तू तुझ्या बाजून प्रयत्न कर, आबांच्या समोर जरा डोळ्यांतन पाणी गाळ ... बघ चमत्कार..." तेजश्री तिला शिकवत होती.
"हे अस खोटं वागायला मला नाय जमणार... हे बघ माझं प्रेम आहे वीर वर पण त्याने जर मला मानाने आणलं तरच न्हायतर गेला खड्यात.. काय आहे न माझ्यापुढ मागे करायला लाईन असती पोरांची... पण मी ह्याच्या मग तर हा मला झिडकारून देतोय.. राग येतो ग वहिनी मला..." स्वप्ना रागात बोलत होती.
"असो... हा राग त्याच्याशी लग्न झाल्यावर कधी आता तुमचं लग्न कसं व्हणारे याच्यावर इचार करायला पाहिजे..." तेजश्री म्हणाली.
"मी प्रयत्न करीन नक्की... झालं तर लग्नानंतर सगळ्या अपमानाचा बदला घेईन." स्वप्ना
तेवढ्यात ऋषीचा आवाज आला.
"स्वप्ना ताई आम्ही सगळे क्रांतीवहिनीला भेटायला निघालोय तू येणार आहेस का?" ऋषी
"मला तिची तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही." स्वप्ना हळूच म्हणाली.
"पण तू जा तिला सांग की तुमचं लग्न होणार नाही. आबांना हे मान्य नाही. बघ ती वीरला नकार देईल." तेजश्री
"हो इच्छा नसली तरी तिला त्रास द्यायला मला जावंच लागणार नाहीतर ती माझ्या वीरला माझ्यापासून लांब करेल." स्वप्नाने अंगावरची ओढणी नीट केली आणि खाली गेली.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत