महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
..कथा सुरु....
पंतांची हवेली :
वेळ सकाळी
8:45 am
पंतांच्या हवेलीत टेरीसवर एक हवनकूंड पेटला होता .
पेटत्या हवनकूंडातून तांबडी आग बाहेर पडत होती.
हवनकूंडासमोर एक पंडित बसले होते ,तोंडांनी मंत्रउच्चारत होते.
पंडितजींच्या समोर एक पन्नाशी गाठलेले
पुरुष बसलेले, डोक्यावर काळे केस, डोळ्यांवर चौकोनी फ्रेमचा चष्मा- चेह-यावर हसमुख भाव होते..
आणी ह्यांच नाव होत - श्रीसंथराव नरहरपंताचे प्रथम पुत्र- आणि आनिषाचे वडिल , आज पितृपक्ष
पुजेसाठी त्यांची उपस्थिती गरजेची होती, म्हंणूनक्ष ते आणि त्यांच्या पत्नी मीराबाई काळरात्रीच शहरातल्या घरातून निघाले होते आणि पहाटेपर्यंतच देवपाडा गावात पोहचले सुद्धा होते.
हवनकूंडासमोर बसलेले पंडितजी मंत्र म्हंणत होते .
हवनकुंडापुढे श्रीसंथराव बसलेले- त्यांच्या पुढे खाली एक गोलसर ताट होत - त्यात पिवळी ,भगवी , फुल होती- आणि त्या ताटातच तेळ टाकल होत.
श्रीसंथरावांच्या हातात एक आठ इंचाची काळ्या रंगाची पातळसर काठी होती- त्या काठीच्या पुढच्या टोकाला विशिष्ट प्रकारे पळीच रुप दिल होत - त्याच पळीला त्या ताटातल्या तेळात बुडवून श्रीसंथराव हवनकूंडात सोडत होते.
हवनकूंडा पुढे जरीच्या हिरव्या पानावर नैवेद्य ठेवल होत -
त्यात आमसुलाची चटणी, खीर, पालेभाजी, फळभाजी, आमटी,कढी,पापड,कुरडई,भजी,उडदाचे वडे,पोळी,पुरी,पक्वान,दुध,दहिसाखर , असा परिपूर्ण नैवेद्य होता .
टेरीसवर हलकीशी हवा सुटली होती.
सुर्याचा पिवळसर प्रकाश सर्व दिशेना पडलेला दिसत होता.
ललिताबाईंसहित सर्वजण टेरीसवर जमले होते.
निषाबाई- त्यांच्याबाजूला मीराबाई उभ्या होत्या, रिया,आनिषा- आर्यंश तिघेही जरा दुर उभे होते.
रघुवीरराव मात्र दरवेळेप्रमाणे कामाच कारण सांगूण ह्या दैवीपुजेच्या वेळेस अनुपस्थित राहिले होते.
तसंही त्या वाममार्गी मानवास ही पुजा बंधनकारक होती.
पंडितजींच्या तोंडून निघ-या मंत्रांनी त्यांच्या कानाचे पडदेच फाटले असते ,एवढी शक्ति त्या मंत्रांमध्ये.
...सर्वजण हसमुख चेह-याने पुज्या पाहत होते.
पन ललिताबाई ? त्यांच्या चेह-यावर मात्र गंभीर भाव पसरले होते. एक रहस्यमयी चिंता त्यांच्या चेह-यावर दिसत होती. राहून राहून हातांचा साडीसोबत चाळा सुरु होता.
आर्यंशची नजर ललिताबाईंवर पडली ,त्याचा हसरा चेहरा त्यांचे चेह-यावरचे ते गंभीर भीतीप्रदान करणारे भाव पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना पाहू लागला.
शेवटच मंत्र म्हंणून पंडितजींनी पुजा समाप्त केली.
इकडे पुजा समाप्त होताच - ललिताबाईंच्या
कपाळावरून घामाचे ओघळ बरसू लागले.
थरथरत्या हातांनी त्यांनी तो घाम पुसला.
आर्यंश अद्याप त्यांच्याकडेच पाहत होता , त्यांच ते विलक्षण वागण जरास बोचणार होत - जणू पुढे काहीतरी घडणार होत ,ज्याची चाहूल , ललिताबाईंना आधीच लागली असावी.
" श्रीसंथराव नैवेद्य दाखवायची वेळ झाली.. चला. !" पंडितजी म्हंणाले.
श्रीसंथराव जमिनीवरून ऊठले , त्यांनी दोन्ही हातांनी नैवेद्य उचल्ला, आणी सिमेंट कॉंक्रीटने बनलेल्या रेलिंगच्या दिशेने येऊन ,तो नैवेद्य त्यावर ठेवला.
" हे घ्या !" पंडितजीने हातात असलेला चांदीचा
ग्लास श्रीसंथरावांकडे दिला.
डाव्या हातात ग्लास पकडून त्यांनी उज्व्या हाताची ओंजळ बनवली ..
त्या ओंजळीत थोडस पाणि टाकल ..आणी ती नैवेद्यावर डावीकडुन - उजवीकडे फिरवत थोड थोड पाणी सोडल..!
श्रीसंथराव मागे सरले.
" का , का ,का , का, का !"
श्रीसंथराव आपल्या पितरास बोलवत होते .
उघड्या आकाशातून एक काळ्या रंगाचा कावळा उडत येताना दिसत होता.
श्रीसंथराव नैवेद्यापासून मागे सरळे.
काळ्या रंगाचा तो कावळा येऊन बरोबर नैवेद्यापासून
एक फुट लांब येऊन दोन पावलांवर उभा राहिला.
रियाने उत्सुकतेपोटी मोबाईल काढला आणि ह्या दृष्याची व्हिडिओ करायला घेतली .
एका डोळ्याचा तो कावळा नैवेद्यासमोर येऊन बसला होता -
ललिताबाई चिंतीत चेह-याने त्या कावळ्याकडे पाहत होत्या.
" खा,खा,खा.. !" आनिषा हळुच म्हंणाली.
ती एका लहान मुलासारखी बोलत होती.
आर्यंषने तिच्याकडे पाहिल आणि ह,ह,ह दात दाखवत हसला.. आनिषाची ही नजर त्याच्याकडे गेली तशी तीने जीभ चावली ..आणि गालातच हसू लागली.
काळ्या रंगाचा तो कावळा टून टून उड्या मारत नैवेद्याच्या दिशेने पोहचला -आणि आपल्या चोचीने नैवेद्य खाणार ..
ललिताबाईंच्या चेह-यावर हे पाहून हसू उमटल.
आर्यंषने हळकेच स्मितहास्य करत एकवेळ त्यांच्याकडे पाहिल आणि मग पुन्हा त्या कावळ्याकडे पाहू लागला.
अचानक नैवेद्यापासून पुढे रेलिंगबाजुलाच नरहरपंतांचा अतृप्त आत्मा अवतरला .
" ए आंधळ्या..हाड.. हाड .हाड ..!"
घोग-या खर्जातल्या आवाजात नरहरपंतांचा अतृप्त आत्मा खेकसला.
क्षणात त्या मुक्या पक्ष्याने पंख फडफडवत मागे झेप घेतली.
" मी मेलो नाही आहे ..आणि कधीच मरणार नाही आहे मी..! हे नैवेद्य खावून तू जर माझ्या आत्म्याला मोक्षाच्या दिशेने पाठवायला आला असशील तर गाठ माझ्याशी आहे."
वाकडी तिकडी मान हळवत एका डोळ्याने तो कावळा त्या ध्यानाला पाहत होता. वेड्या मांणसासारखा नरहरपंतांचा आत्मा त्या मुक्या पक्ष्याला दम भरत होता.
बाकीचे सर्वजण त्या कावळ्याला अस नैवेद्यापुढे मान वाकडी-तिकडी करून पाहतांना पाहत होते.
जणु तिथ कोणीतरी उभ होत -पन त्याच आस्तित्व फक्त त्या मुक्या पक्ष्यास जाणवतहोत.
" चालता हो इथून,.. चालता हो काळ्या न्हाईतर इथच घास घेईल तुझा ..! हो हो चालता इथून हट..हट..हट ." नरहरपंत जागेवर पायआपटू लागले..
फड फड आवाज करत तो कावळा आकाशात उडाला.
क्षणात सकाळच पांढए शुभ्र दुधी आकाश करपल, काळे ढग जमा झाले - आणी त्या ढगांभोवती न जाणे कोठून कसे वीस पंचवीस -कावळे आले.. आणी पंतांच्या हवेलीवर गोल- गोल घिरट्या घालू लागले.
" काव,काव, कांव, कांव , काव ,कांव, कांव"
त्या सर्व कावळ्यांचा उभा आसमनांत एकच नांद घुमत होता. आकाशात एवढे कावळे घिरट्या घालत होते.
परंतू एकही कावळा त्या नैवेद्यास शिवत नव्हता .
उभा आसमंत त्या "काँव,काँव,काव!" अशुभ ध्वनीने भरून गेला होता.
तोच धडाड काळ्या मेघांतून गर्जना करत एक विज बाहेर पड़ली , नागिणीसारखी सळसलत खाली येऊन आकाशात उडणा-या एका कावळ्याला डसली..
क्षणार्धात सेकंदाच्या काट्यागणीक त्या पक्ष्याच देह जळाल आणि तो काळा निळा पडलेला मृत कावळा..आकाशातून खाली - खाली येत त्या नैवेद्यात पडला.
जरीच्या पाणावरच ते नैवेद्य त्या जळुन काळ्या झालेल्या कावळ्याच्या मृत प्रेताने शिवल होत.
सर्वजन भयचकीत चेह-याने घडलेला हा थरार पाहत होते.
ललिताबाईंच्या चेह-यावर तर आश्चर्यकारक,नवल, भीति , चिंता सर्व भावनांचा जणू एकाचवेळेस स्फोट झाला होता.
पटकन एक आवंढ़ा गिळुन त्या म्हंणाल्या.
" मुलांनो आप- आपल्या रूम मध्ये जा पाहू ! सुनबाई मुलांना घेऊन जा !" ललिताबाईचा तो हुकूमच होता ,लागलीच निषाबाई- मीराबाई , आर्यंश- आनिषा , रिया सर्वजन खाली निघुन गेले.
काहीवेळाने...
ललिताबाईंच्या खोलीत .
वीस फुट उंच आणी वीस फुट रुंद अशी खोली होती.
खाली शाही फरशी होती - समोर ड़बल बेड दिसत होता .- त्यावर महागडी गादी- आणि त्याहीवर महागडी चादर अंथरलेली , एका रांगेत उश्या लावलेल्या दिसत होत्या .
बैडच्या डाव्या बाजुला बाथरूमचा बंद दरवाजा दिसत होता. बैडच्या पूढे एक उभट आरसा आणि त्याखाली टेबल होता -
बैडच्या उजव्या बाजुला ललिताबाई, पंडितजी,
आणी श्रीसंथराव तिघेहीजण उभे होते .
" अशुभ ...अशुभ आहे हे ललिताबाई ," पंडितजींनी चिंतींत नजरेने श्रीसंथरावांकडे पाहिल..
" गेली तीस वर्ष हे असंच घडत होत,नैवेद्यास कावळा शिवत नव्हत - पन आज जे काही घडलंय ते चांगल नाहीये!"
पंडितजी जरावेळ थांबून पुढे म्हंणाले.
" अक्षरक्ष पितरांच रुप घेऊन येणा-या कावळ्याचंच अंत झालं आणि त्याच मृत देह त्या नैवेद्यावर पडलं, ही बाब साधी - सुधी नाही ललिताबाई . हे सूड आहे , सूड...! जर गेली तीस वर्ष
नैवेद्यास कावळा शिवतच नाही आहे , तर त्याच एकच अर्थ आहे ,!" पंडितजींनी एक आव्ंढ़ा गिळला आणि काफ-या स्वरात म्हंणाले.
" नरहरपंतांचा आत्मा अद्याप ह्या वाड्यात- *हवेलीत )कोणत्यातरी अतृप्त इच्छेने वास करतोय ! आणि त्यांना अजुनही मोक्ष प्राप्ती झालेली नाहीये.आणि माझ्या मते जर इतकी वर्ष ते आत्मा स्वरुपात ह्या हवेलीत वावरत असतील तर त्यांची आत्मा पिशाच्छ रुपात गेली असेल. आणी पिशाच्च रुपी आत्मा ही चांगली नाही ." पंडितजींच्या ह्या वाक्यावर ललिताबाईंच्या कपाळावर घाम जमा झाला होता , गळा सुकला होता त्यांच्या डोळ्यांसमोर ही पुर्णत खोली गोल - गोल भिंगू लागली होती... त्यांचे श्वास वाढले जागेवरच त्यांना चक्कर आली..
" आई ss!" म्हंणतच श्रीसंथरावांनी त्यांचे खांदे पकडले. ललिताबाई बेशुद्ध झाल्या होत्या.
" पंडितजी ,पाणी द्या !"
बैड बाजुला असलेल्या टेबलावर पाणी होत.
तेच पाणी पंडितजींनी श्रीसंथरावांना दिल , त्यांनी ते पाणी ललिताबाईंच्या तोंडावर शिंपडल..
परंतू ललिताबाईंना शुद्ध आली नाही.
" श्रीसंथराव , ह्यांना इस्पितळात घेऊन जा ! मला वाटत आजच्या उपवासाने त्यांना हा त्रास होतोय." पंडितजी म्हंणाले.
त्यांच्या त्या वाक्यावर श्रीसंथरावांनी होकारार्थी मान हळवली.
" मीरा , मीरा ..!" श्रीसंथरावांनी आपल्या पत्नीस मोठ्याने हाक दिली.
" काय हो!" म्हंणत मीराबाई खोलीच्या उघड्या दारातून आत आल्या.
ललिताबाईंना बेशुद्ध झालेल पाहून त्यांच काळीज जोराने धडधडल होत.
श्रीसंथरावांचा आवाज ऐकून निषाबाई -रिया, आनिषा- आर्यंश सुद्धा ललिताबाईंच्या खोलीत पोहचले होते.
" अहो काय झालं आईंना !"
" मीरा, क आईला अचानक चक्कर आलीये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाव लागेल."
" तुम्ही एम्बुलेंसला कॉल केल का !"
" श्रीसंथराव एम्बूलेंस यायला उशीर होइल. त्यापेक्षा तुमच्या गाडीनेच जा ."
" हो बरोबर आहे , आनिषा?"
अस म्हंणतच , श्रीसंथरावांनी गाडीची चावी बाहेर काढली.. आनिषा समोर धरली ..परंतु घाबरलेली आनिषा मात्र चावीकडेच पाहत होती
" काका !" मध्येच आर्यंश बोलला... त्याने श्रीसंथरावांच्या हातातली चावी घेतली." तुम्ही आज्जींना घेऊन बाहेर या , मी तो पर्यंत गाडी काढतो !"
श्रीसंथरावांनी जरा नवळाने आर्यंष कडे गाडीची चावी सोपवली..! गाडी घेऊन आर्यंष खोलीतून बाहेर पडला. श्रीसंथरावांनी दोन्ही हातांत ललिताबाईंना उचल्ल आणि हवेलीतून बाहेर आणल..
आर्यंषने दरवाज्या बाहेरच श्रीसंथरावांची निळ्या रंगाची मारुती फ्रॉन्कस उभी केली होती.
ललिताबाईंच बेशुद्ध देह गाडीत ठेवल.
" ताई -मी रिया ईथेच थांबते.तुम्ही आणि आनिषा जा हॉस्पिटलला ." निशाबाई म्हंणाल्या .
आर्यंषच्या बाजुच्या सीटवर आनिषा बसली आणि मागे ललिताबाईंना ठेवल होत तिथेच मीराबाई बसल्या.
भुर्रर्र्र आवाज करत गाडी निघुन गेली.
निशाबाई - रिया दोघीही निळ्या रंगाच्या त्या गाडीला गेटमधुन बाहेर जातांना पाहत होत्या-.
गाडी गेटमधून निघुन गेली तस त्या दोघीही हवेलीच्या दरवाज्यातून आत घुसल्या.
रिया हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलपुढे असलेल्या खुर्चीवर येऊन बसली.
" काय होतंय हे कुणास ठावूक, विचार करून करून डोकं दुखू लागले माझं , एक काम करते एक कप चहा घेते बर वाटेल !" निषाबाई स्वत:शीच म्हंणाल्या.
" रिया , मी चहा टाकतेय ! तुला हवंय का ?"
" हो !" रिया एवढ़च म्हंणाली.
तिने खिशातून आपला स्मार्टफोन बाहेर काढला आणि काहीवेळा अगोदर , बनवलेली ती नैवेद्य खायला आलेल्या कावळ्याची व्हिडिओ पाहू लागली....
xxxxxxxxx
वेळ सकाळी
11:30am
भ्रतांर माळरान
आकाशात सुर्याचा भगवा गोळा दिसत होता.
जमिनीवर एक मोठ माळरान दिसत होत -
माळरानावर दूर दुर पर्यंत सोनेरी रंगाच पेंढ़ा झालेल वाळलेल गवत दिसत होता .
जिथे नजर जाईल तिथे फक्त जमिनीवर सोनेरी रंगाचा वाळलेला गवतच नजरेस दिसत होता..
.त्या व्यतिरिक्त कसलीच सजीवमय हालचाल दिसत नव्हती.
त्याच माळरानात खालची सोनेरी रंगाची माती दिसत होती..
तोच अचानक त्या मातीपुढे एक चौकोनी आकाराच सहा फुट उंच पांढर शुभ्र दिव्यद्वार अवतरल - त्या दिव्य द्वारातून निघणारा प्रकाश सुर्यापेक्षा प्रखर होता .
त्या दिव्यद्वारातून प्रथम अंगावर एक फुल बाह्यांचा भगव्या रंगाचा कुर्ता - आणि खाली एक सफेद रंगाची शिवलेली पेंट घातलेले समर्थ बाहेर आले. त्यांच्या मागून मेनका -आणि शेवटला दात काढत हसत गबलू आला.
तिघेही जसे त्या दिव्यद्वारातून बाहेर आले , मागच दिव्यद्वार पाण्यात बदल्ल .. आणि ते पाणि पटकन खाली जमिनिवर कोसळल.
माळरानाच्या सोनेरी मातीने ते पाणी शोषून घेतल.
गबलू मेनका दोघांनी मागे वळुन हा चमत्कारीक देखावा पाहिला होता.
समर्थ चालत पुढे आले ...
समर्थ कृणाल हे अमानवीय शक्तिं पासुन सृष्टीच रक्षण करतात. गबलू आणि मेनका हे त्यांचे दोन साथीदार आहेत जे त्यांना लढ्यात मदत करतात ह्या दोघां समर्थ आज नवि शक्ति देणार आहेत....आणी ते कसे ते आपल्याला वाचुन कळेल! ..
मेनका ह्या माळरानाच निरिक्षण करत होती ..
..गबलू ही ..दात काढत स्वत:शीच हसत आजुबाजुला पाहत होता.
" समर्थ!" मेनकाने समोर पाहिल, समोर पाठमो-या अवस्थेत समर्थ उभे होते.
" हंम्म!" पुढे पाहतच समर्थांनी हुंकार भरला.
" मी रहस्यमई जादूई ठिकाणे ह्या ग्रंथात एका माळरानाबद्दल थोडीफार माहीती वाचली होती.
ज्या माळरानाच नाव भ्रतांर आहे , आणि हे भ्रतांर माळरानाची खासियत अशी आहे - की ह्या माळरानाचा उपयोग फक्त अमानवीय शक्तिंविरुद्ध
लढ़ा देण्यासाठी केला जातो."
मेनकाच्य्या वाक्यावर समर्थांनी मागे वळुन पाहिल- त्यांच्या चेह-यावर स्मित हास्य होत.
" अगदी बरोबर आहे तुझ मेनका ! "
समर्थांनी मेनकाची स्तुती केली , तस मेनकाने गालात हसत गबलूकडे पाहून भुवया उडवल्या.
"आणि हे तेच माळरान आहे मेनका , भ्रतांर !"
समर्थ काहिवेळ थांबून पूढे बोलू लागले.
" एकप्रकारे सांगायचं झाल , तर भ्रतांर हे माळरान नाहीच! तर एक युध्द भूमि आहे ! जी फक्त युद्धासाठी वापरली जाते. ईथे इतिहासात न जाणे कितीतरी युद्ध झाले आहेत , दैवी शक्ति विरुद्ध अंधाराच्या रक्षकांच ईथे शेकडोने युद्ध झाले आहेत. ईथे सुरु होणार युद्ध सुर्य उगवल्या पासुन ते सुर्यअस्ताला जाई पर्यंत सुरु राहू शकत !कारण हो? ते युद्ध दोन्ही परस्पर शक्तिंच्या सहमतीने सुरु असत !"
" महाभारत , रामायन घडल त्या प्रकारे का, आईमीन सुर्य अस्ताला जाताच युद्ध थांबली जायची अस... !"
मेनकाच्या वाक्यावर समर्थांनी पुन्हा होकारार्थी मान हलवली.
" हो बरोबर ! "
" पन आपण इथे का आलो आहोत , आपण ईथे युद्धासाठी आलो आहोत का ? माझ्या कडे तर कसलीच शक्ति नाहीये , मग मी लढु कसा !"
गबलू किन्नरी आवाजात म्हंणाला.
" गबलू, आपण ईथे युद्धासाठी आलो नाही आहोत ! भ्रतांर हे जितक युद्धांसाठी जाणल जात , तितकच ते शस्त्र , सामग्री,लपवण्यासाठीही ओळखल जात - ईथे दैवी आणि अदैवी शक्तिंचे न जाणे कित्येक तरी शस्त्र आस्तित्वात आहेत- जे युद्धात वापरण्यास मनाई आहे."
" म्हंणजे बंदी घातलेले शस्त्र- आणी अदैवी शक्तिच्या पुजासामग्री विधी का?" मेनका..
" हो मेनका बरोबर ! ह्या ब्रम्हांड़ात असेही काही शस्त्र - सामग्री आहेत ,ज्या शस्तरांची शक्ति ब्रम्हाअस्त्रा इतकी शक्तिशाली आहे ! " समर्थांनी हाताची तर्जनी हवेत धरली आकाशाच्या दिशेने केली.
" आणी अश्याही काही सामग्री आहेत - ज्याने सैतानी देवांचच बळी देऊन , विद्या हासील केली जाऊ शकते. एकंदरीत पाहता , ह्या दोन्ही शस्त्र -आणि सामग्रींचा दैवांनाही - आणि सैतानांनाही
वाईट परिणाम भोगावू लागू शकतो - म्हंणूनच
हे शस्त्र आणि सामग्री इतर कोणत्याही लोकांत मिळत नाही - फक्त "
" भ्रतांर , मध्ये सोडून!" गबलू दात विचकत हसत म्हंणाला.
त्याच्या त्या वाक्यार समर्थांनी मंद स्मित हास्य करत मान होकारार्थी हळवली.
" चला ह्या भ्रतांर माळरानातच तुम्हा दोघांचे शस्त्र आहेत ! या माझ्या मागे या !"
"पन समर्थ आताच तर तुम्ही म्हंणालात ना ! की ईथे फक्त बंदी असलेले शस्त्र असतात ! ज्यांचा उपयोग युद्धात केला जात नाही. "
" मेनका ! तुम्हा दोघांना दिले जाणारे शस्त्र !
हे घातकी नाहीत - आणि मी तशी शस्त्रखात्याकडून परवानगी ही घेतली आहे चला !"
समर्थांच्या वाक्यावर गबलू दात विचकत हसला त्याने मेनकाकडे पाहिल..ती ही नव्या शक्ति मिळतील ह्या विचाराने खुष झाली होती.
समर्थ चालत पुढे जाऊ लागले.
त्यांच्या मागून गबलू आणि मेनका सुद्धा निघाले..
XXXXXXXXXXXXX
हॉस्पिटलची लांबच्या लांब कोरिड़ॉर दिसत होती.
दोन्ही बाजुंना निळ्या रंगाच्या भिंती , खाली पांढरट रंगाची फरशी दिसत होती.
दोन्ही तर्फे बंद दरवाज्यांच्या कितीतरी रूम
होत्या - त्या प्रत्येक रूममध्ये पेशंट होते .
ह्याच कोरिड़ॉर मध्ये सरळ शेवटची रूम आई.सी.यू रूम होती.
आई.सी.यू रूमचा दोन झापांचा बंद दरवाजा -आणि त्या दरवाज्यावर पांढ-या पट्टीवर लाल इंग्रजी अक्षरात (i.c.u.) अस नाव लिहिल होत.
त्या दरवाज्यापुढे एक लाकडी बाक दिसत होता, त्यावर मीराबाई- आणि त्यांच्या बाजुलाच आनिषा बसली होती.
तर दरवाज्या जवळ श्रीसंथराव चिंतीत चेह-याने उभे होते .
आणि ह्या सर्वाँपासून दूर एकटा आर्यंष हाताची घडी घालून उभा होता.
" काय हो ! " मीराबाई बोलत होत्या.
" टेरीसवर तर एकदम ठणठणीत उभ्या होत्या आई - मग खोलीत असं अचानक काय झाल की आईना चक्कर आली.?"
मीराबाईंनी विचारल. आनिषा - आर्यंष दोघेही श्रीसंथरावांकडे पाहत होते.
श्रीसंथराव सांगू की नको ह्याच पेचात पडले होते. कारण ते काय सांगणार होते ? माझ्या वडिलांचा आत्मा हवेलीमध्ये पिशाच्छ योनीत भटकत आहे.- गेली तीस वर्ष त्यांच्या आत्म्याने कावळ्यास नैवेद्य खाण्यापासून थांबवलं आहे.?
" मीरा ,मला नाही माहीत ! बट मला अस वाटतं की मी जे काही सांगेल , ते एकतर तुम्ही हसण्यावर घेऊन जाळ किंवा त्या सांगण्याला काही अर्थ नाही."
श्रीसंथराव बोलले.
त्यांच्या त्या वाक्यावर बाकीचे हे तिघेहीजन न समजल्यासारखे श्रीसंथरावांकडे पाहत होते.
कारण त्यांच्या बोलण्यातून ह्या तिघांना काहीच अर्थबोध लागल नव्हत.
" बाबा तुम्ही काय म्हंणताय काहीच कळत नाही आहे !" आनिषा म्हंणाली.
आर्यंश हाताची घडी घालून गप्प उभ राहत सर्वकाही ऐकत होता.
" यू नो बेटा काही गोष्टी अश्या असतात की ज्या कल्पनेत आपण विचार करतो , पन त्या सत्यात आस्तित्वात आहेत !" श्रीसंथराव पुन्हा कोड्यात म्हंणाले.
तेवढ्यात ही गुढमय शांतता तोडत आई.सी.यू रुमचा दरवाजा उघडला , उघड्या दरवाज्यातून
सफेद शर्ट,काळी पेंट, गळ्यात स्टेथोस्कोप घातलेले
डॉक्टर सरोदे बाहेर आले.
" सरोदे !" श्रीसंथराव पटकन म्हंणाले.
डॉक्टर सरोदे हे श्रीस्ंथरावांचे मित्र होते
ओळख तशी जुनी होती -ओळखीची होती.
" आई कशी आहे ! "
" श्रीसंथ, वहिनी ! काकू- एकदम ठिक आहेत ,फक्त आजचा दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये राहूदेत , आणि आई.सी.यू मध्ये ठेवण्याची काही गरज नाही मी वॉर्डबॉयझ ना सांगून त्यांना दुस-या रूम मध्ये शिफ्ट करतो !" ...
डॉ:सरोदे म्हंणाले.
" सरोदे , नक्की घाबरायचं काही कारण नाही.!" श्रीसंथरावांनी पुन्हा विचारल.
त्यांच्या शब्दांत आपल्या माते करवी काळजी जाणवत होती.
" श्रीसंथ ! तस घाबरण्याच काही कारण नाहीये, पण!" डॉ:सरोदे शेवटच्या श्ब्दावर जरासे गंभीर झाले.
" पन काय सरोदे भाऊजी !"
मीराबाई चिंतेच्या सुरात उच्चारल्या.
" हे पहा ! मी बावीस वर्ष झाली डॉक्टरच काम करतोय , आणि माझ्या स्व:अनुभवानुसार मला रुग्णाच्या रोगातून त्यांच्या भावना सुद्धा ओळखता येतात .! मला अस वाटत की काकूंना कसलीतरी एक भीतिमय काळजी सतावत आहे, सकाळ- संध्याकाळ दिवसरात्र ते त्या काळजीत असतात. आणि म्हंणूच त्यांच नीट खाण, पिण,विश्रांती ह्या सर्वाँकडे दुर्लक्ष होतोय ! आणि जर असंच चालू राहिल...तर सध्यातरी परिणाम ईतके घातक नाहीयेत , पण पुढे! "
डॉ:सरोदे पुढे काहीच बोल्ले नाहीत.
कारण सर्वजण त्यांना जे काही बोलायचं होतं ते समजून गेले होते.
" चला येऊ मी! " डॉक्टर सरोदेंना अचानक काहितरी लक्षात आल. " आणि हो वॉर्डबॉयझना यायला अर्धा तास तरी लागेल तो पर्यंत तुम्ही केंटीन मध्ये जाऊन नाश्ता करुन घ्या. !" डॉ:सरोदेंनी अस म्हंणतच सर्वाँचा निरोप घेतला , ते निघुण गेले.
ते जाण्या अगोदर श्रीसंथराव आणि डॉ:सरोदेंनी हस्तांदोलन करत हातमिळवणी केली होती.
" चला सर्वकाही ठिक आहे , आणि मला ही थोडीफार भुक लागलीये - सो काहीतरी खाऊन घेऊयात!" श्रीसंथराव थोडेसे हसत म्हंणाले. त्यांच्या त्या वाक्यावर मीराबाई- आनिषाही हसल्या- आर्यंष
ही मंदस्मित हास्य करत होता.
xxxxxxxx
तीच ती लालरंगाची खोली ..
चित्र - विचित्र सैतानी, राक्षस, हैवान ह्यांच्या देहाचे आकार पोतळेल्या लाल भिंती. खाली शेणाने सारवलेली भुवई, आणि त्यावर मधोमध एक हवनकूंड त्यातून निघणारी लाल फेसाळती रक्तासारखी आग , त्या आगीचा उजेड त्या 10×10 च्या बारीकश्या खोलीत असा काही पडला होता - की जणू आत मावतच नसावा...त्या प्रकाशाला जणु अजुन जागा हवी होती..
हवनकूंडासमोर काळी साडी घातलेले रघुवीरराव बसले होते- डोक्यावरुन काळ्या साडीचा पदर घेतला होता.
" एडकाssss!" रघुवीररावांनी लाडिक किन्नरी स्वरात त्या सैतानाला हाक दिली.
पहिल्या हाकेला काहीच प्रतिउत्तर आल.. नव्हत.
" एडका , ये एडका..! ये पाहू ..खायला हवंय ना !"
अंधारातून हवा धावत येत होती.
एक लांबच्या लांब कोरिड़ॉर दिसत होता - खाली लाल सतरंजी, कोरिड़ॉरच्या दोन्ही तर्फे खोल्यांची रांग होती-आणी त्या सरळ रांगे मधुन ही हवा अगदी वेगाने सरळ धावत निघाल होती - काहीसेकंदातच कॉरिडॉरच्या शेवटच्या रूमपाशी येऊन ती हवा थांबली- धाडकन खोलीचा बंद दरवाजा उघडला- ही खोली नरहरपंतांची होती- ती अमानवीय हवा खोलीत सैरभैर फिरू लागली- आणी त्यातच तिची नजर त्या नरहरपंतांच्या पेंटिंग वर पडली.
" हा , हा, हं,हं!" विशिष्ट प्रकारचा आवाज काढत ती हवा पेंटींगच्या दिशेने आली - आणी अलगद त्या पारदशक पडत्यातून आत जाव तस पेंटींगमध्ये शिरली.
पेंटींगच्या पलीकडे एक गुप्त मार्ग दिसत होता- एक अंधाराने भरलेली फट दिसत होती - आणी त्या फटीच्या आंतिम शेवटच्या बाजुला एक उजव्या बाजुला वळण होत - आणि समोर दोन झापांचा दरवाजा होता.
ती अमानविय हव त्या बंद दारावर आदळली..धाड आवाज करत दरवाजा आतल्या बाजुने उघडला..आणी काळ्या विषारी धुराने त्या सैतानाच रुप साकारायला सुरुवात केली.
सुकलेली प्रेताड त्वचेची सहा फुट उंच यष्टी -अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्यांचा झब्बा, पायांत काळे चकचकीत बूट- डोक्यावर कोरीव टक्कल, पांढरट पीठासारखा चेहरा , मोठ मोठे दोन पिवळेजर्द घुबडेसारखे वटारलेले डोळे.. त्यांवर एकही भुवई नव्हती- नाक चेटकीणी सारख टोकदार होत - ओंठ पांढरेफ़ट्ट बर्फाची लिपस्टिक लावल्या सारखे होते- हातांची त्वचा पांढरी फ़ट्ट होती- पंज्याना धारधार मोठ मोठाले नखे होती.
" आये.....अये...!मसाला.. मसाला.. हिहिहिहि
हिहिहिहिहिहीही...खिखिखिझी!" ते सैतान दोन्ही हात हवेत उंचावून हसत होता. अंधार त्याच्या हसण्याने गडद झाला होता.
वातावरण गंभीर झाल होत.
रघूवीररावांच्या ओठांवर कुत्सिक हास्य पसरल.
" आये..आये...! एक पोरगा पळाला ग , पण दुस-याला मारला मी, खिखिखिखी...! मसाला मसाला काढला. " रघुवीररावांनी फक्त होकारार्थी मान हलवली.
" माहीतीये मला एडका, पाहीलंय सर्व मी ! आता माझ्याकडे तुझ्यासाठी एक दुसर काम आहे बघ, करशील ना?"
" हो करीन ना , बोल ..!"
एडका घोग-या आवाजात म्हंणाला. त्याच्या डोळ्यांत एक आसुरी लकाकी आली होती- मृत्यु, मरण यातना देण जणू त्याला खुप आवडायचं. मानवाच्या देहासोबत मृत्युच खेळ खेळायला त्या सैतानाला खुप खुप मज्जा यायची.
" आज रात्री तालूक्याच्या हॉस्पिटलला जायचं! तिथ एका रूममध्ये एक थेरडी झोपली असेल !"
रघुवीररावांनी एक फोटो बाहेर काढल आणि तेच एडकाला दाखवल.
" ही बघ , नीट बघ हिला - "
रघुवीर रावांच्या हातात ललिताबाईंचा फोटो होता.
रघुवीररावांनी माणुसकीची सीमा ओलांडली होती.
ज्या मातेने आधार दिला, छ्त्र दिल,तिचाच काळ
रघुवीरराव तिच्या दिशेने पाठवत होते.
" एका रात्रीत ह्या थेरडीच काम तमाम करायचं! काय? झोपेतच जिंदा मौत द्यायची, आणि हा ? "
एडकाने लहान मुलासारखे डोळे लहान मोठे केले - ती सरड्यासारखी जीभ ओठांवरून फिरवली- आणि ते पुर्ण जबडा भरलेले बुता-यासारखे ते टोस्कूले दात दाखवत हसला.
" यमाला पळवून लावायचं ! आणि ह्या रांxxxचा आत्मा धरून आणायचा - मईत खाटवर सोडायचं- बाहुलीसारखी अव्स्था करायची , हात पाय तोडून टाकायचं ! मान माग फिरवायची, डोळ ,जीभ संमध बाहेर काढ़ायचं! खूळ - खुळा बनवायचा म्हातारीच्या मयताचा , पाहणारा बी थरथर काफला पाहिजे तापान ..काय?"
रघुवीर रावांच्या एक नी एक शब्दाने एडकाच्या अंगावर उत्सुकतेने शहारा उमटत होता.
" हिहिहिहिहिहिही,हा..हा.! ए ..आये ए..आये मसला..मसाला....पाहिजे मला ! " एडकाच सर्व देह पुन्हा काळ्या धुरात बदल्ल मागच्या दरवाज्यातून बाहेर निघुन गेल.
रघुवीररावांंनी डोक्यावरचा पदर मागे सोडला..
त्यांच्या डोक्यामागे दूर भिंतीजवळ नरहरपंत उभे होते.
त्या प्रेताड चेह-यावर तोच अमानवीय लालसर प्रकाश पडला होता.
" काय आहे रे थेरड्या, पाहाव तेव्हा अचानक अवतरतोस हरामी ! "
" तुला भीती वाटते का रे !हिहिहिहीहिहिही!"
नरहरपंत चालत हवनकूंडापूढे आले.
चालतांना त्यांच्या कोल्हापूरी चपला वाजत होत्या. करकर भयान आवाज होत होता..
ते घारोळे चिंचोळे डोळे रघुवीररावांना पाहत होते..काहीही म्हंणा, नरहरपंतांचा आत्मा त्या लाल रंगाच्या आगीने जळणा-या हवनकूंडाच्या आसपास येत नव्हता - कारण ती आग आत्म्यांसाठी श्रापीतलेली होती- जर त्या आगीच्या संपर्कात आत्मा आली-तर त्या हवनकूंडातली लालसर आग त्या आत्म्यास आपल्यात शोषून घ्यायची.
" फालतूच्या बोलण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे! तू का आला आहेस ते सांग ! नेहमीसारख आजही नैवेद्य खायला आलेल्या कावळ्यास धुडकाऊन लावलस तर लावलस , पन त्याला करपावायची काय गरज होती ? नुस्तीच स्टंटबाजी भोवू शकते हा आपल्याला. "
" मी कुणाच्या बापाला घाबरत नाही रघ्या!
ही माझी हवेली आहे, इथ फक्त माझ चालतं..!"
नरहरपंतांचा आत्मा खेकसत म्हंटला.
त्यावर रघुवीररावांनी फक्त कुत्सिक हसत मान हळवली.
" रघ्या ?"
" काय?"
" मला त्या विधीबद्दल सांग, जी करून तू मला माझ देह पुन्हा मिळवून देणार आहेस."
" विधीच काम सुरु झालंय पंत !" रघुवीरराव गंभीर आवाजात बोलत होते .
" मी त्या म्हाता-या जखोबाला सामग्री आणायला पाठवलं आहे !"
" दोन दोन दिवस ? " नरहरपंताच्या वाक्यावर रघुवीररावांनी त्यांच्याकडे कसतरीच पाहिल..
" दोन दिवसां अगोदर त्या जखोला मी ईथे पाहिल होत ! आणी सामग्री घेऊन यायला काही इतका उशीर लागतो का? गंडवतो का मला तू , गंडवतो ? !"
" पंत ही तुमच्या काळातली सामग्री नाही जी कोण्या बाबा- चेटूक करणारा मांत्रीक- किंवा मसणातल्या अघो-याकडे मिळावी ! ही सामग्री श्रापीत आहे , ह्या त्रिलोकांत ती कुठेच सापडत नाही - ! फक्त एकच जागा आहे जिथे ही सामग्री आस्तित्वात आहे !"
" कोणती जागा ? " नरहरपंतांनी विचारल.
तसे रघुवीरराव हळु आवाजात म्हंणाले.
" भ्रतांर ..!"
क्रमश :
×××××××××××××
पुढील भागात
" आनिषा...! तुला आठवतय का ? आज सकाळी मी त्या कावळ्याची पितृपक्षाच नैवेद्य खातावेळेसची व्हीडीओ रिकोर्ड केली होती."
रिया फुळलेल्या श्वासांसहित म्हंणाली.
" हो , त्याचं काय?"
" अंग त्या व्हीडीओमध्ये काहीतरी भलतंच दिसत आहे . "
" भलतंच म्हंणजे?"
" अंग भलतंच म्हंणजे- असकारत्मक लहरी..! भुत प्रेत पिशाच्छ!"
xxxxxxx
" कृणाल? ही काळ्या कपड्यातली मांणस काय शोधत असतील? "
" नक्कीच ही वाममार्गी आहेत - सामग्रीच शोध घेत आहेत!" समर्थ म्हंणाले.
समर्थ, मेनका , गबलू, तिघांन पासून सत्तर मीटर अंतरावर जखोबा पाठमोरा उभा होता -
त्याच्या पुढ्यात काळे पायघोळ झगे घातलेले सैतानाचे काम करणारे मजूर लोक , हातात फावडा कुदळ घेऊन खालची सोनेरी माती उकरत होते..
पुढिल भाग लवकरच :
.