Moksh - 18 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 18

The Author
Featured Books
Categories
Share

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 18




मोक्ष 18


तीच ती लाल रंगाची खोली दिसत होती.

शेणाने सारवलेल्या भुवईवर खाली मधोमध चौकोनी हवनकूंड पेटला होता .

हवनकूंडातली ती रक्ताळलेली लालसर आग पुर्णत खोलीत लाल रंग पोतून गेली होती.

त्या हवनकुंडासमोर तीच ती काळ्या साडीतली म्हातारी डोक्यावर पदर घेऊन- खाली भुवईवर मांडी घालून बसली होती.

डोक्यावर पदर घेऊन बसल्याने नेहमीसारखाच तिचा चेहरा दिस नव्हता - फक्त हाता पायाची वयाने सुरकूतलेली त्वचा दिसत होती.

त्या पेटत्या हवनकूंडापासून थोड पुढे नरहरपंतांच आत्मा उभा होता.

उभट राकीट चेहरा , जाड भुवया आणि बारीकसे घारे चिंचोळे डोळे, टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या..

डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी होती.

अंगात सिल्कचा पांढरा सदरा ..आणी त्यावर चौकलेटी कोट , आणी खाली पांढरट धोतर होत...

पायांत चामड्याच्या चपली होत्या -चालतांना त्यांचा भयाण 'चट, चट,!" आवाज व्हायचा.

नरहरपंतांच्या चेह-यावर लालरंगाचा प्रकाश पडला होता .

" का हो त्या बिचा-याला अस ओरडलात.. घाबरला ना बिचारा !" ती म्हातारा किन्नरी स्वरात म्हंणाली.

त्यावर नरहपंतांनी वरचे दात खालच्या ओठांखाली दाबले - घारे चिंचोळे डोळे वटारून दाखवत.. ते खर्जातल्या खवखवत्या आवाजात म्हंणाले.

" ए .. रघ्या.....बंद कर...! बंद कर तुझी ही नाटक दलभद-या .....तुझ हे नाटक फक्त त्या एडका समोर चालू ठेव , माझ्यासमोर नाही ! मला त्या पोराच शरीर ..हव आहे ..! घुसायचं मला त्यात ..भोग घ्यायचाय सर्वाचा , माझ्याशी गद्दारी केलेल्या त्या थेरडीच - रांxxच लचका तोडायचं मला. ! सूड...सूड..घ्यायचं..मला...!"

नरहरपंत बोलत होते- त्यांचा तो खर्जातला खवखवता आवाज दमा झालेल्या मांणसासारखा होता.

" ए म्हाता-या !"

अविश्वासनिय , आश्चर्यकारक, नवळाची गोष्ट घडली होती.
त्या काळ्या साडीतल्या म्हातारीच्या तोंडून
प्रथमच पुरुषी आवाज बाहेर पड़ला होता.

त्या म्हातारीचा सुरकूतलेला हात हळकेच वर आला- डोक्यावरच्या पदराला पाचही बोटांनी गच्च मुठीत धरल .

आपण ज्या काळ्या साडीतल्या मानवी आकृतीला एक वयोवृद्ध म्हातारी समजत होतो - ती एक म्हातारी नव्हतीच ! म्हातारीच रूप घेऊन कोणीतरी वेगळच त्या हवनकूंडासमोर बसत होत - ती काळी , जादू टोन्याची विद्या पार पडत होत.
कित्येकतरी वर्षाच्या रहस्याचा उलगडा आता होणार होता.

त्या काळया साडीत म्हातारीच रुप घेऊन कोण बसायचं? आणि त्या सैतानाला हुकूम कोण देत होत? हे सर्वच , ईथे घडणा-या प्रत्येक गोष्टीचा आता उलघडा होणार होता-
एक महागुढ समोर येणार होत..
चांगूलपणाच मुखवटा घालून लपलेला कप्टी निच धुर्त कोण होत त्या साडीत.. ! ...

या पाहूयात पुढे .
त्या पाचही सुरकूतलेल्या बोटांनी .. पदर धरून ठेवला होता.

.तोच त्या पाचही बोटांनी तो पदर हळकेच वर उचल्ला...मागे पाठणावर सोडला..

हवनकूंडातला लालसर आगीचा प्रकाश त्यांच्या
चेह-यावर पडला जात .. लाल रंगाने उजळला चेहरा समोर आला ..आणि तो चेहरा होता..

' रघुवीरराव!'
ललिताबाईंचे द्वितीय पुत्र.
नाव देवाच होत - सर्वाँसमोर ते चांगूलपणाचा मुखवटा लावून वावरत होते. परंतु त्यांनी हे सर्व का केल होत ?
ह्या सर्वाँमागे त्यांचा काय कप्टी हेतू होता ? .

" गप्प बस्स थेरड्या !"
सर्वाँसमोर रघुवीररावांचा आवाज किती सौम्य, नम्रतेने भरलेल असायचा - आणि आताचा हा आवाज, त्या सौम्य आवाजापेक्षा किती तिरसट, तुच्छपणाने भरलेला होता? जमिन आसमानाचा फरक !

" तू आता जास्तच डोक्यावर चढत चाल्ला आहेस हा थेरड्या - एक गोष्ट विसरुन जाऊ नकोस , की तुला पुन्हा ह्या जगात मी आणलंय,ईथे तुला जो हा थरा मिळतोय ना , - तो फक्त माझ्यामूळे, आणी अजुन एक - मी तुझा मुलगा नाही आहे, दत्तक घेतलंय मला तुम्ही. "

' धडाड ' आकाशात एक विज कडाडली ..
रघुवीरराव? हे ललिताबाईंचे पुत्र नव्हते किती मोठ गुढ रहस्य , समोर आल होतं.

"रघ्याsss तु पन हे विसरू नको, की तुला दत्तक मी घेतलं होत- त्या रांxxने नाही.तुला वाढवल मी आहे -ही सर्व विद्या मी शिकवली आहे तुला ..!"

" माहीतीये रे मला , सांगायची गरज नाही !
तू मला दत्तक घेतलं ते काय माझ्यावर उपकार नाही केले - ही विद्या तू मला शिकवलीस ,त्यात तुझा स्वार्थ होता थेरड्या, तू फक्त माझा वापर केला आहेस ," रघुवीररावांच्या वाक्यावर नरहरपंतांच्या चेह-यावर एक आसुरी हास्य आल..व ते हसू लागले

" ए हा हा ह अअह..अहा..हा...हं..! हो , हो मी तुझ वापर केल - पन त्याबदल्यात तुला ही ताकद भेटली नाही का? ह्या कलियुगात सामान्य माणुस विचार करू शकत नाही अशी शक्ति तुला माझ्या मुळे मिळालीये फक्त माझ्या मुळे- "

नरहरपंतांच्या ह्या वाक्यावर रघुवीरराव जरासे गप्प बसले. जणू त्या श्ब्दांना प्रतिउत्तर देण त्याना जमत नव्हत . किंवा नरहरपंतांच बोलण बरोबर असाव.

" हे बघ रघ्या भांडायची वेळ नाही ही- मला नव तरणबांड शरीर हव आहे. तू हव ते कर, पन मला त्या आर्यंशच मृत देह मिळवून दे ! "

" अरे थेरड्या, त्या मुलाच्या देहात काय ठेवलं! त्यापेक्ष जर मी तुला तुझ हेच देह परत मिळवून दिल तर ? आणि ते सुद्धा सैतानी शक्तिसंहित!" रघुवीररावांच्या ह्या वाक्यावर नरहरपंतांचे घारे चिंचोळे डोळे एका विशिष्ट लयीने चकाकले गेले.

" काय ? अस होऊ शकत ? " त्यांनी खर्जातल्या आवाजात विचारलं.

" हो नक्कीच , मी पुरान ग्रंथात एक विद्या वाचली आहे ज्याने अस होऊ शकत..! "

" कोणती विद्या आहे ती?"

" शोषक विद्या - !" रघुवीर रावांचा आवाज.

" शोषक विद्या?" नरहरपंत.

" होय शोषक विद्या- ही विद्या फक्त पौर्णिमेला पार पाडू शकतो.पन ह्या विद्येनुसार एका सैतानाच बळी द्याव लागेल-तरच तुला तुझ देह शक्तिसहित परत मिळेल."

" सैतानाच बळी ? आता सैतान कोठून आणायचं?"

" आणायची गरज काय आहे पंत-तो तर आहेच आपल्याकडे!" रघुवीररावांच्या चेह-यावर आसूरी हास्य उमटल..

" कोण ..?" नरहरपंत जरासे विचारात पडले. मग काहीवेळाने ते म्हंणाले" एडका "

" होय एडका.. ! " रघुवीरराव इतकेच म्हंणाले.
क्रमश :
xxxxxxxxxx





कथा सुरु......


पंतांच्या वाड्यात हॉलमध्ये ड़ायनिंग टेबलासमोर सर्वजन जेवायला बसले होते.

ललिताबाई मुख्य होत्या - त्यांची खुर्ची टेबलाच्यावर मधोमध होती.

त्यांच्या उजव्या हाताच्या लाकडी खूर्चीजवळ रघुवीरराव बसायचे, परंतु ते आता तिथे नव्हते. आणि त्यांच्या बाजुला त्यांच्या पत्नी निषाबाई बसल्या होत्या- त्यांच्याही बाजुला त्यांची लेक रिया बसली होती.-

ललिताबाईंच्या डाव्याबाजुला आनिषा बसली होती- आणि तिच्या बाजुला - आर्यंष बसला होता.

प्रत्येकाच्या ताटात , चपाती,दोन भाज्या, भात, वरण ,पापड, लोंच असे विविध पदार्थ होते.

" सुनबाई ! " ललिताबाईंचा आवाज.

" जी आईसाहेब!" निषाबाई म्हंणाल्या.

" रघुवीर दिसत नाहीये."

" जी आईसाहेब ते जरा कामानिमीत्त बाहेर गेले आहेत !" निषाबाईंच्या वाक्यावर ललिताबाईंनी फक्त होकारार्थी मान हळवली.

ह्या सर्वाँना कुठे माहीती होत - की रघुवीररावांच काय काळबेर ,क्रियाकांड सुरु आहेत ते.

निषाबाई , आनिषा- रिया तिघींचही बोलण सुरु होत.

पन आर्यंश? तो मात्र एकटक गप्प बसला होता..
कोणत्या तरी गुढ - गहाण विचारांत बुडाल्यासारखा. आज सकाळी पुजारीबाबांच त्याच्याकडे ते विचीत्र नजरेने पाहण मग त्यांचा झालेला तो मृत्यू ते सर्वच्या सर्व दृष्य त्याच्या नजरेसमोरून एका चित्रफित प्रमाणे फिरत होत.

" आर्यंश !"

ललिताबाईंना आर्यंश गप्प गप्प बसला आहे.. अस दिसल - तस त्यांनी त्याला आवाद दिला.

त्यांच्या हाकेने आर्यंश भानावर आला ..
रिया - निषाबाई ! आनिषा आर्यंशकडेच पाहत होत्या.

"अं काय! " तो म्हंणाला.

" काय रे , कसल विचार करतोयस ! जेवणाकडे सुद्धा लक्ष दिसत नाही आहे तुझ- ."
आनिषा काळजीपूर्वक नजरेने त्याच्याकडे पाहत होती.

" नाही ..अस काही नाही आहे !"
आर्यंश काहीतरी लपवत होता. किंवा त्याला काहीतरी सांगायचं होत- पन शब्द जिभेवर येऊन माघार घेत होते.

" हे बघ आर्यंष, कसलेही आढेवेढे घेऊ नकोस ! तू आमच्या नातीला वाचवून जे उपकार आमच्यावर केले आहेस तेच आम्ही तुझी मदत करून फेडू , काही पैश्याची गरज आहे का? किती हवे आहेत * "

ललिताबाईंच्या ह्या वाक्यावर आर्यंष जरासा औपचारिक हसला.

" पैसे ! नाही नाही पैश्यांची गरज नाही आहे ! "
खर तर आर्यंषला त्याच्या एका फाईटचे पैसे वीस - एकवीस लाख रुपये मिळायचे , ज्या कारणाने त्याला पैश्यांची बिल्कुल कमी नव्हती..-त्याच्या बैंकमध्ये करोडोंवर पैसा होता.

" मग तरीसुद्धा सांग , हे बघ मनात कोणतीही
गोष्ट ठेवू नये!" ह्यावेळेस निषाबाई म्हंणाल्या.

" बर ठीक आहे सांगतो- ते आज सकाळी पुजारी बाबा.."

" आईसाहेब ..!" आर्यंष सांगत होता तोच अचानक मध्ये हा आवाज आला.

सर्वाँनी आवाजाच्या दिशेने पाहिल.

" बाबा..!" रिया तिच्या वडीलांना पाहत म्हंणाली.

समोरून रघुवीरराव चालत येत होते.
प्रत्येकाकडे मंद स्मित हासरा कटाक्ष टाकत ते पुढे पुढे चालत येत होते.

हा चांगूलपणाचा लावलेला चेह-यावरचा मुखवटा- त्या मुखवट्याखाली किती महापाताळयंत्री
माणुस लपला आहे , ह्या सर्वाँपासून सगळेच अजाण होते

" ये रघुवीर बैस्स !"

" हो !" रघुवीरराव मंदस्मित हास्य करत निषाबाईंच्या बाजूला बसले.

" सुनबाई ताट वाढ !"
निषाबाई रघुवीररावांच ताट वाढु लागल्या.

" सुनबाई म्हंणाल्या कामानिमीत्त बाहेर गेला होतास?"


" हो आईसाहेब, एक डिल पक्की करण्यासाठी गेलो होतो!"

" अच्छा मग काय झाल!"

" हो ! डिल पक्की करूनच आलो आहे , पुर्णत साडेचार कोटींची डिल मिळाली आहे !"

" अरे व्वा छानच की !"
ललिताबाई म्हंणाल्या

" आभिनंदन आज्जी आणी अप्पा !"
आनिषा मध्येच म्हंणाली.

तिच्या त्या वाक्यावर रघुवीरराव ललिताबाई दोघेही एकसाथ हसले.

" माझ्याजवळून ही आभिनंदन सर.. !"
आर्यंष म्हंणाला.

" थँक्यु - थँक्यु ..! पन सर वगेरे काय म्हंणतोस रे ! काका ,मामा तुला आवडेल ते म्हंण! काय आईसाहेब!"

" हो नक्कीच !" ललिताबाई इतकेच म्हणल्या.

" बर ! आभिनंदन काका !" आर्यंष पुन्हा म्हंणाला.

निषाबाईंच रघूवीररावांना ताट वाढुन झाल होत .
आर्यंषने काढलेला विषय आता बंद झाला होता?
रघुवीररावांनी ताट जरा आपल्याजवळ ओढल..
हळकेच चपातीच एक तुकडा तोडला ..आणि ताटात गोलसर काचेच्या वाटीत असलेल्या दुधाच्या खिरेत बुडवला तोच ..त्याचक्षणाला ...त्यांच्या हाताला एक चटका बसला , ती पांढरट दूधाची खीर नासली गेली, काळ्या रंगात बदल्ली-

चटका बसलेला हात रघुवीररावांनी
कोणालाही न समजू देता - टेबलाखाली आणला..
अंगठा आणि त्याच्या बाजुच बोट भाजल होत- वेदना होत होती पन ती चेह-यावर दाखवली जात नव्हती.

त्यांनी हळूच खीरेच्या वाटीवर चपाती ठेवली-
कोणाला कळायला नको ना ?

" छोठी आई खीर खुप छान झाली आहे हा!"
आनिषा ...

" हो मग होणारच ना , आधी देवाला संपुर्णत खीरेच नैवेद्य जे दाखवलं !"

निषाबाईंच्या ह्या वाक्यावर रघुवीररावांच्या चेह-यावर घृणास्पद भाव उमटले होते.

" तुला माहीतीये ह्यांना तर खीर खुप आवडते .!"
निषाबाईंनी रघुवीररावांकडे पाहिल .

" हो की नाही ओ!"

रघुवीररावांनी निषाबाईंकडे पाहिल व पुन्हा मंद स्मित हास्य करत म्हंणाले.

" हो ना !" ते ईतकेच म्हंणाले

" मग आई , आज तु बाबांना खीर भरव ना तुझ्या हातांनी!" रियाच्या ह्या वाक्यावर - निषाबाई लाजल्या.

तर रघुवीररावांच्या पोटात गोळा उभा राहिला..
त्या दगडासमोरच खाण म्हंणजे ह्या तामसी- वाममार्गी, अघोरी सैतानी शक्तिच्या हस्तकांना विष पिण्यासारख होत.

" रिया ! " त्यांचा आवाज जरा कठोर होता.

" कमॉन बाबा !"

" रिया वात्रटपणा पुरे हा , आता काय आम्ही तरूण आहोत का?" निषाबाई जरा लाजत म्हंणाल्या.

" छोठी आई - तू तर तरूणच दिसतेस ! आणि अप्पाही काही म्हातारे झाले नाही आहेत! आणि अशी चान्स पुन्हा पुन्हा मिळणार नाही बर का ? भरव ना प्लीज!" आनिषा हट्टहास करत म्हंणाली. तिने रियाला हळकेच डोळा मारला..

आर्यंष हसत हे सर्व पाहत होता..
ललिताबाई सुद्धा हसत पाहत होत्या - इतक्या वर्षानी त्यांच्या परिवारात सुख आल्यासारख जे वाटत होत.

" ए पोरींनो तुम्ही गप्प बसा हा- काय चावट पणा लावला आहे हा , आई तुम्हीच सांगा ना.. !" निषाबाईंनी लाजेने चूरचूर होऊन खाली मान घातली..

" हाई हाई... रिया छोठी आई कसली लाजली बघ . !" आनिषा अजुनच चिडवत म्हंणाली.

" ए मुलींनो गप्प जेवा पाहू आता ,ती दोघ काही लहान आहेत का आता ? जेवा पाहू गप्प!"

ललिताबाईंच्या वाक्यावर रिया- आनिषा दोघींनीही गालात हसत एकमेकांकडे पाहिल...

" खर तर रघू भरव तिला खीर !"
ललिताबाईंच्या ह्या वाक्यावर रिया- आनिषा दोघीही तोंडाचा आ- वासून ललिताबाईंकडे पाहत होत्या..कारण त्या अस काही म्हंणतील ह्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

ललिताबाईंच्या बोलण्याला धुडकाऊन लावण रघुवीररावांच्या सुस्वाभाविक स्वभावाला न पटणार होत.

" जी आईसाहेब!"
मोठ्या कठोरतेने त्या वाममार्गी चांडाळाने हे पाऊल उचल्ल.

ताटातला एक चमचा हातात घेऊन त्यांनी तोच चमचा निषाबाईंच्या खीरेच्या वाटीत बुडवला आणि निषाबाईंच्या भरवला..

निषाबाई लाजेने इतक्या चूर चूर झाल्या होत्या की त्यांचे गाळ टोमेटोसारखे लाल लाल झाले होते .

" बस्स , खुष!"

" अस कस अप्पा - तुम्ही छोठी आईला भरवलत ना ? मग आता छोठी आई तुम्हाला भरवेल."

आनिषाच्या ह्या वाक्यावर रघुवीरराव गालात हसले.

पन त्यांच्या मनात असंख्य भीतिच्या लाटा उसळत होत्या.

" आई भरव ना!" रिया..

" अंग हो हो भरवते."

निषाबाईंनी ताटातला चमच्या उचलून
खीरेच्या वाटीत बुडवला-
रघुवीरराव डोळे फाडून त्या खीरेला पाहत होते.

" घ्या ! " अस म्हंणत रियाबाईंनी ती खीर रघुवीररावांना भरवली.

देवाच नैवेद्य सैतानाने प्राषण केल-
शुद्ध गंगाजलच एक थेंब जरी अमानवीय शक्तिच्या अंगावर पडल तर त्या जागेवर तीव्र असहनीय वेदना होते..

आणी ईथे तर रघुवीररावांनी थेट ते गंगाजलच प्राशनच केल होत.

घश्यात एक तीव्र वेदना झाली- असंख्य काटे, घशात अडकल्यासारखे, घशात उकळत पाणी ओतल्यासारखी आग होत होती.

रघुवीरराव झटकन जागेवरून उठले .
अजुन थोड उशीर ते ईथे थांबले तर न जाणे काय होऊन बसेल..

" अरे जेवण तर कर !" ललिताबाई रघुवीररावांना अस उठलेल पाहून म्हंणाल्या.

" नाही आईसाहेब-झाल माझ!"
लागलीच घाई असल्यासारखे ते तिथून गेले- जिन्याच्या पाय-या चढुन खोलीच्या दिशेने गेले..



आर्यंष एकटक आनिषाकडे पाहत होता.
नकळत एक अनाहूत ओढ त्याला तिच्या दिशेने खेचून घेत होती-तिच्या दिशेने खेचला जात होता.

तिच्या प्रत्येक कृतीला अस मंदस्मित हास्य करत फक्त पाहतच रहाव , अस त्याला वाटत होत- ही भावना जणू नशेसारखी त्याच्या मनावर चढत चालली होती .
आनिषा भेटल्यापासून त्याच्यात कितीतरी बदल झाले होते- हे तो ओळखू शकत होता ! न जाणे कितीतरी वेळ तो एकटक तिच्याकडेच पाहत बसला होता , हे त्यालाच कळलं नव्हत. परंतू आलेल्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

" दादा...ओ दादा..! भाजी वाढु का , ओ दादा.!"
त्याने झटकन वळून डाव्याबाजुला पाहिल तिथे ग्ंगु, वाड्यात काम करणारी मोलकरीण उभी होती.

" नाही ...नाही नको...नको !"
तो कसतरीच हसला -मग त्याने एक कटाक्ष आजुबाजूला टाकल सगळीजण त्याच्याकडेच पाहत होती.

आनिषाने त्याच्याकडे पाहूण हळकेच पुढे आलेल्या केसांची बट मागे नेहली...तर रिया एका गालात हसत त्या दोघांकडे पाहत होती..

एकक्षण त्याच्या अश्या वागण्याने त्याला लाजच वाटली.

" माझ झालं!" तो पटकण म्हंणाला.

" अरे तरी सूद्धा बस्स!"
रिया ..
" नाही , एक्च्यूली मला जरा गावात जायचं!"

" काय ह्या वेळेला !" आनिषा पटकन म्हंणाली. तस सर्वाँनी न समजून तिच्याकडे पाहिल.

तस ती जरा बिचकत म्हंणाली.

" आई मीन- नाही म्हंणजे खुप वेळ झाली आहे ना ! आणि ह्यावेळेला अस बाहेर पडणही चांगल नाही आहे !"

" आर्यंश !" ललिताबाई बोलू लागल्यां." आनिषा बोलतीये ते बरोबरच आहे - वेळ खुप झाली आहे ! आणी अस रात्री भटकण चांगल नाही..

त्यापेक्ष आता तू आराम कर , तुझ जे काही काम असेल गावात - ते उद्याच कर !"

ललिताबाईंच्या वयाचा आदर राखून आर्यंशने

" ठिक आहे !" अस म्हंटल..!
आर्यंषच हे उत्तर ऐकून आनिषाला किती बर वाटल, ह्यावेळेस जर तो बाहेर पडला आणि इथल्या गुंडाणी जर त्याला काही केल तर ?! एक क्षण ह्या विचाराने तिच्या छातीतच श्वास अडकला होता .

तिच मन त्याच्यासाठी झुरत होत -ही प्रेमाची भावना होती- हा धागा होता प्रेमाचा जो तिला त्याच्यासोबत जोडत होता.. -

आर्यंषने तिच्याकडे पाहिल मग हळूच डोळे मिचकावले ..

जणू तो त्या इशा-याने म्हंणाला असावा

" की नको काळजी करूस नाही जाणार आहे मी!"

××××××××××××

रघुवीरराव आपल्या खोलीत आले-

' हा ह हा !" एकापाठोपाठ त्यांच्या तोंडून ' हा 'असा हवेसारखा आवाज निघत होता.

त्यांच्या ओठांवर काळसर रक्त लागल होत.

खोलीत येऊन ते काहीतरी शोधत होते. त्यांनी कपाटाच दार उघडल..एक दोन क्षण कपाटात शोधा शोध केली आणि त्यांना ते मिळाल.

एक काचेची दहा इंचा एवढी बाटली..
त्या बाटलीत गडद काळ्या रंगाच द्रव होत.
तीच बाटली घेऊन ते बाथरूम मध्ये आले..
आरश्यासमोर उभे राहीले.. त्यांनी एक नजर स्वत:वर टाकली-

पुर्णत घश्याजवळच मांस होरपळून गेल होत -
चामडी फाटली होती- आतल्या घश्यातून काळसर रक्त बाहेर आणि - पू,बाहेर पडत होत, घाणेरडा कुजका सडका वास येत होता.

रघुवीररावांच्या पोटात एक कळ उठली- त्यांनी शर्टाची बटण खोल्ली आणि आत पोटावर नजर टाकली..

पोटावर लाल रंगाचे चट्टे पडले होते- त्याला लहान लहान छिद्र पडले जात त्यातून ..वळवळणा-या अळ्या बाहेर येऊ पाहत होत्या..

रघुवीररावांनी हातात असलेली ती काळ्या रंगाची बाटली तीच बुच हळुच उघडल..आणी पुर्णत बाटली तोंडाला लावली

गट,गट आवाज करत त्या बाटलीतल सर्व द्रव ते प्यायले..

त्या द्रवात असलेल्या अमानवीय घटकांनी
त्यांच काम सुरु केल- रघुवीररावांच्या गळ्याभोवतालचा होरपळलेला भाग-पोटावर पडलेले लाल चट्टे, ते होल- त्या अळ्या सर्वाच्या सर्व नाहिश्या झाल्या...

घामेजलेल्या देहाने रघुवीरराव स्वत:ला आरश्यात पाहत होते.

" ह..ह..ह..ह..अह....या...हा अहाह..हा..!"
मग ते स्वत:शीच हसू लागले.



क्रमश :



मेराsssss मनssss

... क्यु तुम्हे चाहेssss मेरा...मनsss

ना...जाणे ssss..

जुड गया कैसेsssss

ये बंधन..ssss

कैसी यह...दिवानगीssssssss...

कैसा हैssssss दिवानाssss पन..

मेरा मन....... क्यु तुम्हे चाहे...

मेरा मन..मन ssss

...😍🤩😘....