Moksh - 8 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 8

The Author
Featured Books
Categories
Share

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 8





8


पंतांची हवेली !

रात्री 12 वाजता ...


पंतांच्या हवेलीला चारही बाजुंनी पांढरट भिंतीच कंपाउंड होत..आणि मधोमध एक आठफुट उंचीचा काळ्या उभ्या सळ्यांचा, गेट होता.

कंपाउंड आत आणि बाहेर धुक्याची तमाम अंतयात्रेत उभ्या मांणसासारखी गर्दी उभी होती.

गेटच्या सळ्यांमधुन पुढे धुक्याने घेरलेली पंतांची तीन मजल्यांची स्तबध बधित- अपशकूनी हवेली दिसत होती.

हवेलीच्या मागे डोक्यावर ...

आकाशातल्या दुधाळ चंद्राच्या गोळसर कायेजवळून
अजुनही ते काळे सर्पट विषारी ढग सरतांना दिसत होते..

चंद्र मागे असल्याने त्या वास्तूच्या सफ़ेद भिंतींवर त्याचा उजेड पडला नव्हता !

म्हणुंनच की काय त्या शुभ्र भिंती अंधाराने गिळून त्यांना काळसर श्रापित रुप दिल होत .

दिवसा शोभनीय वाटणा-या त्या दुधाळ रंगास आता किड लागली होती.

हवेलीत वावरणा-या त्या अभद्र ध्यानाच्या आस्तित्वाने तिथली हवा, प्रसन्नता, जस ते बाहेर पडायचं तिथे ह्या सर्वाँना पुर्णविराम लागत होता.

आता ही लागल होत.

दिवसा शुभ भासणारी ही हवेली (वास्तू) आता पुन्हा एकदा मळीन- झाली होती..

रातकिड्यांची किरकिर वाजत होती..
हवेलीबाहेर असलेल्या बागेतली हिरवट झाड बारीकस गवत सर्वाँवर धुक्याने हळकेसे पाण्याचे द्रवबिंदू जमा झाले होते.

बागेतच थोड बाजुला आजच रियाने एक झोपाळा बनवून घेतला होता..

जो अंधा-या रात्री एकटाच कोणितरी त्यावर बसल्यासारख मागे पूढे झुलत होता..
त्या स्मशान किर्रर अंधा-या धुक्यात ती झोपाळ्याची फळी हळूच कुई...कुई.....कुइं.....विशिष्ट प्रकारच्या भीतीमय आवाजासहित गुंजत मागे पुढे झुळत होती..

.....

हवेलीतल्या हॉलमधला काचेचा झुंबर , दिवे सर्वकाही विझवल होत.

मोठ मोठ्या खिडक्यांच्या काचेंवर चंद्राचा निळसर प्रकाश पडला होता ..जो की तपकिरी पडद्यांमुळे हॉलमध्ये पडण्यापासून रोखला जात होता..

तरीसुद्धा हॉलमध्ये अंधुक का असेना दिसत होत..
सोफा - मधोमध टिपॉय , तीन फुटाचे फुलदाणी टेबल, डायनिंग टेबल सर्वकाही शांत निर्जीव पणे उभे होते.

तोच अंधरातून एक जळता कंदील आला.
कंदीलावर दोन हाड़कूले हात होते.

तो बहादूर होता.. आज सकाळीच ललिताबाईंनी त्याला तिस-या मजल्यावरची उघडी खिडकी ब्ंद करायला सांगितल होत, परंतु बागेच्या, आणि इतर कामांमुळे तो विसरला होता.
आणी त्याला त्या गोष्टीची आठ्वण आता आली होती.

" अह्ह्ह्ह!" बहादूरने एक जांभई दिली.

एका हातात रॉकेलच पेटत कंदील धरलेल , त्याचा तांबडा प्रकाश त्याच्या तोंडावर पडला होता.

दुसरा हात तोंडावर ठेवत त्याने जांभई दिली..

" जाम झोप आली बाबा !" तो स्वत:शीच म्हंटला.
" खिडकी आधीच ब्ंद कराला पाहिजे होती? पन कामामूळे विशरलो ! आणि ब्ंद नाय केली? तर चोरांचा पन धोका आहे ? कोणी चोर घुसल तर नोकरी जायची !"

तो स्वत:शीच बोलत होता.. हळुच त्याने जिन्याच्या पाय-या चढल्या आणि तिस-या मजल्याव जाऊ लागला..

मागे अंधारात असलेले सोफे, खुर्च्या, टेबल सर्वजन त्याच्या पाठमो-या आकृतीला पुढे पुढे जातांना रोखून पाहत होते.

XXXXXXXXX

सीन 2

" आर्यंश ही तुझी रूम !" रिया आर्यंश - आनिषा तिघेही दुस-या मजल्यावर एका कोरिड़ॉर मध्ये उभे होते.

समोरच खुपसा-या ब्ंद रूम होत्या..
त्यातल्याच एका ब्ंद दरवाज्याकडे हात करत रिया म्हंणाली.

तिच्या वाक्यावद आर्यंशने फक्त मान डोळावली.

तेवढ्यात रियाच फोन वाजू लागल.

" मी आलेच हं , तो पर्यंत तुमच चालुद्या !"
तिने हसतच आनिषा आर्यंशकडे पाहील.. जरा बाजुला निघुन गेली.

आनिषाकडे बोलण्यासाठी तसं खुप होत. परंतु तरीही ती गप्प बसली होती...जणु कोठून सुरु कराव ह्याचा विचार करत असावी ?

" थँक्यु !" मध्येच आर्यंश म्हंणाला..तस आनिषाने जरा तोंडाचा आ -वासत त्याच्याकडे पाहिल..

" थँक्यु ? का बर?" ती ..

" तुझ्या आज्जीने मला विचारलेल्या प्रश्नाच उत्तर दिल्या बद्दल..! " आर्यंश ...

" औह अच्छा, असं काय ! मग मी ही तुला थँक्यु म्हंणते - थँक्यु अँड सॉरी !"

" सॉरी ........सॉरी...का ?" आर्यंश न समजून म्हंणाला.

" अरे , !:" ती मध्येच बोलायचं थांबली...

" आधी एक सांग ? मी तुला नावाने हाक मारली तर चालेल ना ?"

आनिषा तिचे पांढरेशुभ दात दाखवत त्याच्या कडे हसत पाहत होती.

तिच ते देखणरुप , ते गुलाबी ओठांतल्या आत लपलेल्या हि-यासारख्या चकाकणा-या दातांच हास्य पाहून

...आर्यंशने एकक्षण तिच्याकडे मग जरा बाजुला पाहिल आणि मग पुन्हा तिच्याकडे पाहत मंद स्मित हास्य करतच होकारार्थी मान हळवली..

त्याच्या होकारार्थी मान हळवण्यावर ती पुन्हा हसली..... व बोलू लागली..

" त्या रात्री तू माझी मदत केलीस ना म्हंणून थँक्स ! "
तिने तिचा सडपातळ गोरापान हात त्याच्या दिशेने वाढवला..

आर्यंशनेही हळुच आपल हात वाढवून तिचा हात हातात घेत हात मिळवणी केली...

" आणी सॉरी ह्यासाठी की , मी तुझे आभार मानायचे विसरले .. !"

आनिषाच्या वाक्यावर आर्यंशला एकक्षण स्वत:ची स्वत:च्या... विचारांची-लाज वाटली..! एवढी वर्ष तो ज्या भावनेत जगत होता..की ह्या व्यवहारी दुनियेतल्या मांणसाना उपकाराची जाणच नसते . जो तो स्वत:च्याच हिताचा विचार करत असतो , हे जग म्हंणजे फक्त आणि फक्त पैसा आहे ..aआणी त्या पैश्यावर चालणारी मांणस.. ह्या जगात वावरणा-या मांणसांमध्ये जराशीही माणुसकी शिल्लकच नाहीये.

पन आज त्याला एक माणुसकीचा नमुना मिळाला होता.

मिरची जरी तिखट असली .. आणी ती खाऊन तोंडात आग लागत असली... तरी साखर खाल्ल्यानंतर तोंडातली ती आग कमी होतेच ना ? देव जरी भक्तावर रूसला असला तरी एन संकटात एका हाकेसरशी धावून..येतो.

ज्याप्रकारे करवंदांच्या झाडाला गोड करवंद उगवतात आणि आपण ती आवडीने खातोही , पन खात असतांना कडू करवंद -आंबट सुद्धा लागतातच ना ? तस्ंच जग जरी कितीही वाईट असलं ..तरी काहींच्यात चांगूलपणा असतोच !

त्यातलीच आपली आनिषा होती.

आर्यंश एकटक आनिषाकडेच पाहत होता..
ती सुद्धा हसतच त्याच्याकडे पाहत होती...

तेढ्यात बाजुच्या जिन्यावरून कोणीतरी वर येऊ लागल. अंगावर काळी घोंगडी आणि हातात रॉकेलचा कंदिल..

असा बहादूर..

" बहादूर काका !" आनिषाने अस म्हंणतच

आर्यंशच्या हातातून झटकन आपला हात काढून घेतला..

" ताईशायेब ? तुम्ही इथ ? आणि हा पोरगा ?"
बहादूर ह्या दोघांपासून जरा दहापावल पुढे उभा होता..

" ओ बहादूर काका !" रिया आर्यंश आनिषा दोघांमागून चालत आली..

" हा आर्यंश आहे , आपल्या आनिषाचा मित्र !"
तिने गालात हसतच आपल्या खांद्याने आनिषाच्या खांद्याला धक्का दिला..

" हा काही दिवस इथेच राहणार आहे , पन तुम्ही इतक्या रात्री कुठे निघालात ?"

"जी बाईशायेब , तिस-या मजल्यावरची एक खिडकी चुकून उघडी राहिली आहे , तीच ब्ंद करून येतो ! रात्रीची येळ हाई ना - आणि चोरा चिलट्यांची भीती बी है ..ना ! तुम्हाला सांगतो.."

" बहादूर काका !" मध्येच रिया त्याला थांबवत म्हंणाली.

बहादूर एकदा बोलायला लागला की तो सहजासहजी थांबत नसायचा - हे रियाला ठावूक होत..

" अहो बहादूर काका आम्हाला जरा काम आहे खाली.!चल आनिषा!" तिने बळजबरीनेच आनिषाच हात पकडल.

नाहीतर हा बहादूर त्यांना चांगलाच पकवणार होता.

" , गूड नाईट आर्य्ंश, बाय !" रिया घाईघाईतच म्हंटली.. तिने आनिषाच हात पकडल व तिला ओढतच घेऊन जाऊ लागली..

तेवढ्या वेळेत आनिषाने तीन-चार वेळा आर्यंशकडे ... मागे वळून पाहिल होत..

तिच्या मनाला अस वाटत होत की आर्यंश सोबत रहाव त्याच्याशी गप्पा माराव्यात- त्याच्याशी बोलतच रहाव..

ही कसली ओढ होती..? प्रेम तर नसेल ना! ..

आर्यंश सुद्धा तिच्याकडे पाहतच होता..जो पर्य्ंत ती जिन्याच्या पायरीवरून खाली निघुन नव्हती गेली..

बहादूरने रिया आनिषा जाताच आर्यंशकडे पाहिल व जरासा हसला.

" आर्याशायेब तुम्हाला सांगू ..?!"

तो पुढे काही बोलणार तोच आर्यंशने आपल्या बैग उचलल्या आणि..खोलीत निघुन गेला..व धाडकन दरवाजा बहादूरच्या तोंडावर लावून घेतला .

" कमाल आहे , चोरांच्या गोष्टी ऐकायला घाबरतात ही पोर , पन मी नाय घाबरत ! चल बहादूर खिडकी ब्ंद करून येऊ चल !"

बहादूर स्वत:शीच म्हंणाला आणि त्याची पावले तिस-या मजल्यावर घेऊन जाणा-या जिन्याच्या दिशेने निघाली..

XXXXXXXX

सीन 3 ....

मृत्युयोग स्पेशल भाग 31 पंतांचा वाडाsssss

रात्री बाराच्या सुमारास पंख फडफडत '(काव,काव, काव' ओरडत तो काळ्या रंगाचा कावळा एक संदेश घेऊन आला होता !

तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्ण उमटल असेल की कसला संदेश ? प्रश्न तरी साहजिकच अहे !

पन त्या मागे लपलेला कपट, दुष्परिणाम मात्र भयंकर आहेत !

रात्रीच्या अंधारात उडत येणारा हा कावळा कोणी साधारण कावळा नव्हता..तो एक संदेश घेऊन आला होता. -मृत्युचा संदेश !

( नामदेव आबा आणि सुर्यकांत रावांच्या मयताचा
दाखला घेऊन आला होता . त्या दोघांचही ह्या पृथ्वीवरच पाव्हणचार आता कायमचंच संपल जे होत.)

नामदेवआबाच्या वाड्यात त्यांच्या खोलीत दारूच्या नशेत दोघेही टिंग झाले होते.

भिंग-याला सुद्धा दोन विदेशी चप्ट्या देऊन ह्या दोघांनी खाली घालवल होत.

भिंग-या आणि त्याचा साथीदार सूद्धा ती दारु पिऊन ब्ंद दरवाज्याला पाठ टेकवून झोपले होते.

पिऊन टिंग झालेले आबा आणी सुर्यकांतराव दोघेही ह्याच आविर्भावात होते की काही संकट आलच तर भिंग-या त्याचा साथीदार दोघेही संभाळून घेतील..

पन त्या दोघांचही सुरक्षा कवच गळून पडल होत..
त्या कवचाला दोघांनी स्वत:च्या हातानेच ब्ंद केल होत.
त्यासाठी ते दोघेच कारणीभूत नव्हते का? असो!

काळ्या रंगाचा तो कावळा आबांच्या वाड्यावरच्या लाल रंगाच्या कौलारु छप्परावर बसला होता. वाकडी मान करुन त्याच्या लाल रंगाच्या एक डोळ्यातल्या काळ्या बुभळाने तो खाली पाहत होता.

ही वाड्याची मागची बाजू होती..
कंपाउंड आत असलेली दोन केल्याची झाड,आणी पुढे गोलसर कठड्याची विहीर..आणी त्या सर्वाँपुढे होत..कंपाउंडच अंत आणि सुरु होत होती ..बाजरीच्या शेतांच माळरान...


हवेत पांढरट धुक फिरत होत..जमिनिवर बाजरी गवत उगवलेल्या त्या गवताला द्रवबिंदूनी भिजवून टाकल होत..

वाड्याच्या कौलारू छप्परावर बसलेल्या त्या कावळ्याने एक दोन वेळा डावीउजवीकडे तिरकसपणे मान फिरवली..

त्या पक्ष्याला काहीतरी दिसत होत का? कसली अभद्र जाणिव की अनाहूत चाहुल लागत होती का.?

काहीवेळा अगोदर भिंग-याने पाहिलेला बाजरीच्या शेतातल्या उंच काठीवर बांधलेला तो बुजगावण न जाणे कोठे गायब झाला होता.?

ती क्रॉस सारखी काठी रिकामी होती.

बाजरीच्या शेतातल्या पाचफुट कन्सांची कोणितरी आतून चालत येतोय अशी 'सळसळ ' आवाज करत हालचाल होऊ लागली.

त्याचा वेग इतका होता की दोन सेकंदाला धप धप आवाज करत पाच पावल पडत 10 मीटरच अंतर कापत होती.

हे अस आत नक्की होत तरी काय ? की जे इतक वेगवान होत ? माफ करा अमानविय वेग ! नाही का?
अभद्र सैतानी क्लिष्ट शक्तिंच्या ह्या प्रचिती आहेत .

त्यातलंच काही इथे अवतर होत का?
की कोणी स्वत:हून त्यास हुकूम दिला होता.

" काव ,काव !" ]तो कावळा ओरडला...

आणि जसा ओरडला.. त्या बाजरीच्या शेतातल्या पहिल्या कंसांना बाजुला सारत एक अवाढव्य साडे सहा फुट उंचीच तेच ते बुजगावण पिसाळलेल्या येड्यासारखा बाहेर आल.

तपकीरी फुल बाह्यांच जागो जागी चिंध्या झालेल.. सद-रा , त्याच्या अंगावर होता. आणी खाली एक सफेद शिवलेली पेंट होती., डोक्याच्या जागी v आकाराचा पेंढ़ा असलेला मुकुट होता आणि त्यावर रेखाटलेले काळे टपोरे डोळे आणि जबडा विचकलेल लालसर रंगाच हास्य...अस साडे पाच फुट उंचीच ते भयान अभद्र बुजगावण होत..

" काव ,काव,काव,काव!" त्या बुजगाण्याकडे पाहून तो कावळा ओरडला..

" गप्प ये तुझ्या आईला तूझ्या !" खर्जातला आवाज.
भयानक अति भयानक , कानाचे पडदे फाटून आतून रक्ताची धार वाहिल अस , छाताडात घूसून ते ब्ंद करेल असा आवाज..

" मयीत पाहिजे... मयीत पाहिजे तुला ! खिखिखी..!
मसाण पेटीवतो , मसान पेटीवतो मी हिहिहिही . पितारांना बोलिवतो..तेरा दिवसाची जत्रा भरवतो.. संंमध.. स्ंमध...करतू..मी ! हिहिहि.. !" ते बुजगावण खर्जातल्या आवाजात बोलत होता..

बोलतांना त्याच्या लालसर जबड्यातले किडके चौकलेटी दात दिसत होते..

तर टपो-या डोळ्यांची नजर पिवळ्याजर्द रंगाने चकाकत होती.

तो कावळा अद्याप त्या ध्यानाकडेच पाहत होता.
त्याचा मण्याएवढ़ा लालसर डोळा , अंधारात बिंदूप्रमाणे चकाकत होता.

.
" धप,धप !" मोठमोठ्या ढेंगा टाकत पावलांचा भयान आवाज करत ते ध्यान शेतातून बाहेर आल..

काळ्या मातीच्या चिखलात त्याचे ते काळ्या रंगाचे बूट माखले होते..त्यांचा तो भला मोठा आकाराचा ठसा जमिनिवर उमटत होता..

" हिहिही, हिहिहिही!" मध्येच दात विचकत ते येड्यासारख हसत होत.

आसुरी आनंद व्यक्त करत होत.

" मयीत मयीत ..पाडणार म्या ! खिखिखिखिखिखी...
अक्ख्या गावाला सुतिक लावणार म्या ..! हिहिहिह..
मेलेल्यांच्या घरात तेरा दिसाची जत्रा भरवणार म्या ...!
ये आये.....ये .....आये .., मसाला... मसाला...! पाहीजे...मला....हिखिहिखी..हिखी ..!"

येड्यासारख तोंडावर बोट ठेवून ते खिदळून हसत होत.. न जाणे त्याला इतका कसला आनंद झाला होता...?
तो सैतानच जाणो .. ज्याने त्यास बनवल होत. साकारल होत!

भिंग-या त्याचा साथीदार दोघेही झोपेच्या आधीन होते.
भिंग-या तर तोंडाचा आ-वासून ढ़ाराढुर झोपला होता..मिनिटा मिनीटाला त्याच्या तोंडातून शिट्टी सारखा आवाज येत होता..

त्याच आवाजाने ))भिंग-याच्या साथीदाराची झोप मोड झाली..

नशेने जड झालेल्या डोळ्यांच्या पापण्या त्याने कशातरी उघडल्या . आणि भिंग-याला एक गावरान शिवी हासडली..

" रांxxxच्या काय पोपटावाणी घोरतोय रे !"
त्याने भिंग-याच्या पाठणावर मारल..पन खाऊन खाऊन गेंड्यासारखी माजलेली ती अंगावरची कातडी तिला मार कस बसेल? मच्छर चावल्यासारख भिंग-या ती जागा खांजल्ली. आणी तोंड बैलासारखा काहीतरी खात असल्यासारख हलवत पुन्हा झोपी गेला..

भिंग-याच्या साथीदाराची झोप आता थोडी कमीच झाली होती.

पन डोळ्यांवरच्या पापण्या जराश्या जड भासत होत्या..

" तोंड धवून घेतू ! म्हंजी डोचक ताल्याव येइल..!"
तो स्वत:शीच म्हंणाला.. एक कटाक्ष झोपलेल्या भिंग-यावर टाकल..

व तो वाड्या मागे असलेल्या विहीरीच्या दिशेने निघाला..

काळा अंधार मृत्युयोग घेऊन निघाला होता.
रात्रीच्या प्रहारीला , एन अभद्र अवसेच्या वेळेला यमाच रुप
घेऊन सैतान आला होता.

पन यम तरी निर्दयपणे मारत नाही ! तो फक्त आत्मा घेऊन जातो.

हा सैतान ? हाळ हाळ करून मारणार ! लहान मुल जस बाहुलीशी खेळत , तिचे हात पाय तोडून , मान मोडुन हिडिस फिडिस रूप देत ..तसंच हा सैतान होता...

मानवी देहाशी खेळून त्याचा अक्षरक्ष खूळखूला बने पर्य्ंत तो खेळणार होता.. त्याचा आसूरी खेळ त्यात दया,माया अस काहीच असणार नव्हत.


XXXXXXXXX

सीन 4

देवपाडा मंदिर ....


रात्रीचे बारा वाजले होते.

नेहमीप्रमाणे तुकडो पुजारींची ही झोपण्याची वेळ होती..

वय वाढत चाललं तस झोप कमी होते हेच खर..

बारा वाजता झोपलं की ते नेहमीप्रमाणे सहा वाजता उठायचे..

मग त्यांचा दिवसाचा दिनक्रम सुरु व्हायचा..
नित्यकर्म , अंघोळ झाली की देवांची पुजा ,संध्याकाळची पुजा ..हेच कार्य पुन्हा पुन्हा व्हायचं..!

.

तुकडो पुजारींनी देव्हा-यातच एकाबाजुला अंथरूण टाकल होत.

समोर महादेवाची बैठी पाषाणाची काळी आकृती जशीच्या तशी होती. मुर्ती पुढ्यात खाली पायांजवळ तपकीरी रंगाचा मंद वातीचा दिवा पेटत होता..तेवढ़ाच काय तो तिथे उजेड.

बाकी आजुबाजुचा परिसर म्ह्ंणजे अंधारीची काळी शाही फासली होती.

तुकडो पुजारी अंथरूणावर मांडी घालून बसले..
हळुच डोळे ब्ंद करून दोन्ही हात जोडले..

" जय शिव शंकर ..!"
ते हळुच पुटपुटले..

मग सर्व देह अंथरूणावर झोकणार तोच बाहेरून आवाज आला..

" .. बाबा , ओ बाबा !"

तुकडो पुजारींनी एक दोन वेळेस प्रश्नार्थक नजरेने बाहेर पाहील...

मंदिराच्या दरवाज्या बाहेर पाय-यांखाली अंधारात एक काळी आकृती उभी दिसत होती..

अंधारात त्या आकृतीच्या अंगावरचे कपडे दिसत होते..

पांढरट रंगाचा फुल बाह्यांचा सदरा , आणी खाली एक निळ्या - रंगाची लुंगी असा उस्मान काका देऊळा बाहेर उभा होता.

तुकडो पुजारी उस्मानकाकांना ओळखत होते.
कधी कधी ते त्यांच्याकडून भाजी घ्यायचे ना ! ...

" उस्मान ? इतक्या रात्री !"

ते स्वत:शीच म्हंणाले.

अंथरूणावर उठले.. तेवढ्यात महादेवासमोर जळणारा दिवा फडफडला, न जाणे त्या दिव्यामार्फत देवच काहीतरी अशुभ संकेत चाहूल देत असावा ?

तुकडो पुजारींनी त्या दिव्याकडे पाहिल..
पन हवेची एक थंड झुलूक येऊन त्यांना स्पर्शून गेली..
त्यांच्या मनाने हेच मानल की ह्या हवेने दिवा फडफडला..

देव्हा-यातून चालत ते बाहेर पाषाणाच्या व्हरांड्यात आले.

पाषाणाच स्पर्श पोस्टमॉर्टम च्या आत चालू असलेल्या एसीमार्फत थंड झालेल्या फरशीसारखा जाणवला...

त्या खोलीत घडणा-या प्रेतांची होणारी चिरफाड आणि त्यातून निघणारा घाणेरडा ओकारी युक्त मानवी मांसाचा वास , तस्ंच न जाणे कोठून तुकडो पुजारींच्या नाकात घुमत होता.

तूकडो पुजारींच्या मनाला जाणवणारी ही वेगळीच भावना त्याचा अर्थ तरी काय होता..

आता ह्याक्षणाला एवढी वर्ष ते रहात असलेली ही जागा , हा मंदिर -ही सगळ काही परक वाटत होत.

इथली हवा हे पाषाणी खांब, हा छ्त्र हे आस्तित्व सर्वकाही जे काहीवेळा अगोदर आपलस होत -ज्यात मायेची ओळखीची उब होती ते सर्वकाही एकाक्षणात परकेपणाची जाणीव करून जात होत.

हळू हळू मंदिरावर काळी काजळी पसरू लागली होती..तो पाषाण आता अंधारातल्या शेवाळाने गिळायओआ सुरुवात केली होती.

" उस्मान ? तू आहेस का ? " तुकडो पुजारी चालत
मंदिराच्या पाय-यांजवळ आले..पन मंदिरातून खलै माटर उतरले नाहीत.

" हो..हो..मीच..मीच उस्मान , उस्मान !"
घोगरा खर्जातला दम देणारा आवाज.

त्या म्हाता-या उस्मान काकांचा नरमयुक्त स्वर कुठे? आणि हा गर्विश्ठीत , अहंकाराने भरलेला स्वर कुठे? जराही ताळमेळ बसत नव्हत.

" काय रे उस्मान ? आवाजाला काय झालं तुझ्या ?"
तुकड़ो पुजारींनी विचारल पन प्रतिउत्तर म्हंणून हो नाही की चू नाही...

जणू ....जणू ते गांगरल होत. काय बोलू ?काय नको अस?

" घसा बसला आहे का तुझा ? पानी देऊ ?"

" हो ...हो...हो..! पाणी ..पाणी हवंय मला !"
तोच तो खर्जातला पटकन बोललेला आवाज..

" थांब हं आणतो मी !" तुकडो पुजारींनी एक प्रश्नार्थक कटाक्ष अंधारात उभ्या उस्मानकाकांवर टाकला..
तस त्यांना काहीतरी दिसल , ज्याने त्यांचे डोळे जरासे मोठे झाले..तोंड़ वासल, आणि गळ्यात श्वास अडकून बसला..

तुकड़ो पुजारींना उस्मान काकांची उंची ठावूक होती..
साडे चार फुट उंचीचे शरीराने मध्ये होते ते.

पन अंधारात त्यांच्या सारख रुप घेऊन आलेल हे ध्यान
त्यांच्या शरीराची पुर्ण पने खोटी नक्कल त्याने केली होती...

निसर्गाच रूप चोरल होत.

ज्याला अनैसर्गिकतेने दिलेल ते रुप भकास ,क्लिष्ट, अभद्र दिसत होत.

पुर्णत देहाची काडी झाली होती , हाता पायांना जणू मांस नव्हतच, नूसत्या काठ्या पासुन त्या हिडिस अभद्र फस्क्या नकली देहाला उंच आकारा दिला होता.

तुकडो पुजारींनी मडक्यावरची (माठ) थाली सरकवून ग्लास बुडवून तो आतल्या पाण्याने भरला, मग पुन्हा थाली मडक्यावर ठेवली.

तुकडो पुजारीना धोक्याची जाणिव झाली होती,
मंदिरा बाहेर आलेल हे ध्यान नक्कीच आपल प्राण हरण करायला आलेल आहे हे त्यांना कळून चुकल होत.

आणी ह्या संकटातून सुटकेचा एकच मार्ग होता.
सर्वपिता महादेव.

तुकड़ो पुजारी चालत महादेवाच्या मुर्ती जवळ आले..

ती पाषाणी साडे पाच फुट उंचीची महादेवाची मुर्ती पाहून तुकड़ो पुजारींना एक आत्मविदारक विश्वास प्रदान होत होता.


मनातल्या भीतीच कवच तुटून विश्वासाची ढाल आता मजबूत होऊ लागली होती.


मंदिरात असलेला तो सर्वपिता महादेव , त्या देवावरचा विश्वासच आता बाबांना वाचवणार होता.

पन तो देव मदतीला येईल का ? या पाहूयात..

" हे महादेव, तुम्हीच आता मला मार्ग दाखवा !"
तुकड़ो पुजारींनी तो पितळचा तांब्या दिव्या बाजुला ठेवला..

आणी हात जोडले डोळे ब्ंद केले.

तुकडो पुजारींच्या बंद डोळयांआड एक दैवी चमत्कार घडला..

महादेवाच्या बैठी मुर्तीच्या आशिर्वाद देणा-या हातातून एक सुर्य किरणांची रेष बाहेर निघाली आणि ती जाऊन थेट त्या तांब्यातल्या पाण्यावर पडली...

दोन तीन सेकंद करीता हा दैवी चमत्कात घडला..आणी मग ती दैवी प्रकाश रेषा पून्हा महादेवाच्या हातात जाऊन लुप्त झाली.

तुकड़ो पुजारींनी डोळे उघडले तर समोर पाहता..त्यांना आश्चर्यकारक धक्का बसला.

त्या गोळसर पितळचा तांब्या तांबड्या रंगाने चकाकत होता.

" आविश्वसनी!" नकळत तूकडो पुजारींचे हात वर येत पुन्हा जोडले गेले... त्यांच्या डोळयांत पाणी भरल होत .

ही किमया होती असीम भक्तीची , एवढी वर्ष जी नेक मनाने पुजा अर्चा केली..त्या सर्वाँची ही श्रद्धा होती..देवाच आपल्या भक्तावरच प्रेम होत.

तो आहे ! तो पाहतोय, आणि मदतीला धावून येइल!...

" तुमच्या मनात जे आहे ते मला कळलं आहे महादेव !"

" ओ बाबा ...ओ बाबा...! अहो बाहेर याना ...लवकर .
या बाहेर या ..पाणी आणता ना पाणी!"

क्षणार्धात त्या अभद्र चेटक्याच्या आवाजात किती बदल झाला होता! अंतीम स्वर संपताच ते खदखदून हसणार जहरील पाश्वी हसू आल होय..

त्या स्वरात हवरटपणा, घाई , आसुरी भुक, क्रोध ,लोबू ह्या सर्वाँच मिश्रण जनु ठोसून ठोसुन भरल होत.

ते हसू कानाचे पडदे फाटून रक्ताची धार टपकावी ,

आवाजात कोणीतरी रागात खेकसून आज्ञाधारकपणे गर्जून बोलाव तसा तो आवाज होता..

" हो आलो ..आलो..! " पुजारी बाबांना तो तांब्या हाती घेतला..

देव्हारा पार करून ते अभद्र सोंगट्याच्या दिशेने निघाले..

" आलात आलात !" ...अंधारात उस्मान काकांच रुप घेतलेल त्याच देह वाकड तिकड हळत होत..

" होय ! आणि तुझ्यासाठी पाणी आणल आहे ! ये आत ये ! वाटलंस तर पायरीवर बसून पी."

तुकड़ो पुजारींना पक्क माहीती होत ! की हा हरामखोर पाताळी सावल्या, मंदिराच्या पायरीला स्पर्श सुद्धा करणार नाही , त्याची सीमा फ़कट बाहेर आहे अंधारात आहे..

तुकड़ो पुजारींच्या वाक्यावर कसलही उत्तर न येत आहे हे पाहून ते पुन्हा म्हंणाले..

" काय रे उस्मान काय झाल, ये ! रोज तर आत येतोस. आता का येत नाही आहेस ! ये पाहू आत ! हे बघ मी तुला आमंत्रण देतो आहे ..ये.. . "

आमंत्रण श्बदात काय होत काय होत त्यात ? आत्मसमर्पण ! देह त्याग , आत्मात्याग , ...

तुकड़ो पूजारींना हे ठावूक होत ह्या पिशाच्छांना जर आमंत्रण दिल तर ते कोठेही येऊ शकता , अक्षरक्ष देवघरात सुद्धा , मग ते त्यांचा अंताच कारण ही का न ठरो!

उस्मान काकांच रुप घेऊन आलेल ते ध्यान , त्याच्या भवताली असलेला काळा अंधार , न जाणे कोठून निळसर प्रकाश उमटला...

त्या उंच सहा फुट आकारावर पडला.
पांढर प्रेताड चेहरा , वटारलेले डोळे, आसुरी आनंदाने हदत भरलेले ते काळसर ओठ, ..

" हिहिहिहिही,भटा..! " खर्जातला आवाज , बोलतांना त्याच्या बत्तीसच्या बत्तीस कंगव्यासारख्या मोठाले पातळसर धारधार पांढरट दातांच दर्शन घडत होत..

सश्यासारखे ते मोठाले पांढरट कान ज्यांवर मोठाले केस होते.

उस्मान काकांचे ते कपडे सर्वकाही काळ्या राखेसहित हवेत उडून गेल..आणी त्या सहाफुट ध्यानाच्या अंगावर एक काळसर पायघोळ कॉटनचा झगा आला..

" घात झाला भटा घात झाला...हिहिहीहिहिहिही, चुक केली चुक केली..तू ! आमंत्रण...आमंत्रण देऊन.. मला हिहिहिही... ! आता ..आता...तुला ह्या दगडा समोरच फाडणार मी...! मसाला बाहेर काढणार ..मसाला.....ए आये ..आये..!" ते ध्यान वर आकाशात पाहत ..त्याचे पिवळेजर्द डोळे काजवासारखे चकाकत होते...

तो निळसर फ़ेसाळता अभद्र प्रकाश फुटक्या खराब थोबाडावर पडला होता..

" मारणार मारणार तुला मी , आतडा कोतडा...!
मटानाला मसाला लावून खाणार .. ! तुझ पिरित म्हढ इथल मशाण पेटवणार म्या...आरती करनार म्या तुझ्या मयताची आरती करणार... सुतीक सुतीक ...लावणार मी ह्या गावाला...ए आये...ए आये. ... मेला भट मेल..हिहिहिहिही.."

त्याचा खर्जातला आवाज गुंजत होता. त्याच हास्य ऐकून तुकडो पुजारींच्या हातात असलेला तांब्या लट लट कापू लागला...

त्या ध्यानाच कल्पनेत जे विचार केल होत.त्याही पेक्षा हे ध्यान कित्येक तरी पटीने जास्त भयानक होत..भीतीदायक होत..

त्याच ते रुप काळजाला धडक बसवत होता. काळजात
ह्दय झटक्याचे तीव्र प्रतिसाद उमटत होते...


बाबांना भीतीने हातांना घाम फुटला होता.
भीती काय असते? हे आज तेख-या अर्थाने
पाहत-अनुभवत होते.


"धप !" काटकूल्या काठीसारख प्रेताड पाय त्या ध्यानाने हळुच तुकड़ो पूजारीँच्या दिशेने वाढवल..

तस तोच त्या..क्षणि भीतीने मेंदू बधीर झालेल्या पुजारी बाबांकडून हातातून तो तांब्या अलगद निसटला...

" भट्याsss!" त्याने तो जबडा विचकला..
ते कंगव्यासारखे पाताळ्सर धार धार दात बाहेर आले..

ते पिवळेजर्द डोळे..त्यातला तो काळसर टीपका....चकाकला..


अंगातला तो काळसर झगा आणि ती उंची...
ते भयान रूप पाहून तुकड़ो पुजारी मागे सरले..

हातातून निसटलेला तांब्या , पायरीवर आदळला..
तस त्यातल ते पाणी पायरीवर सांडल..तर अर्धे थेंब हवेत उडाले..

तेच ते दहा -बारा थेंब हवेत उड़ताच त्यांचा रंग बदल्ला...

तांबडाधमक अगदी लाव्ह्यासारखा झाला.. आणी तेच लाव्हारूपी दैवीजल जाऊन थेट त्या ध्यानाच्या झग्यावर चिटकले..

' फस,फस, फस ' असा एका लयीत आवाज घुमला..
त्या लहानसर थेंबाच्यात अस काय होत ? त्या साधारणश्या पाण्याने त्या ध्यानाच्या अंगात असलेल्या झग्याला बारीक बारीक भेग पडली, तो झगा अक्षरक्ष वितळला..


तर अर्धे थेंब त्याच्या लांबसडक मृत ,हिडिस पांढ-या प्रेताड हातांवर उडाले.

मग अशी वेदना झाली , की ते गरजल !
मुळाच्या देठापासून आक्रोश केला....ती विव्हळ
अक्षरक्ष अंधार चिरत गेली..

उस्मान काकांच देह त्यात तो घुसला होता...ते देह ते शरीर मंदिराच्या पायरीपाशी कोसळल..आणि ते ध्यान मात्र

" अर्घअर्घअर्घ्ज.....घरर्र्र...र्ग्घ्ह...!"
भयाण विचीत्र चित्कार करत .. मंदिरापासून जरा दूर पळत आल..

धावताना हात पाय अक्षरक्ष वेड्या गबलू सारखे हलवत होत.

मंदिरापासून जरा लांब येऊन ते पुन्हा जागेवर थांबल

वळुन तुकड़ो पुजारींकडे पाहिल..

त्याच्या तोंडावर निळसर फेसाळता प्रकाश पडला होता..

त्याच्या पिवळ्याजर्द डोळयांत कमालीचा स्ंताप झळकत होता. आमंत्रण असतांना सुद्धा न मिळालेला भक्ष्य सुटल्याने त्याच गर्व अहंकार ठेचाळल होत..

" वाचलास..भट्या! वाचलास , त्या म्हाद्या मुळ वाचलास...!

पन गावच मसाण पेटणारच , मयताची आरती
ओवाळणारच ...गावाला सुतीक लागणार म्या उद्या...! तू वाचलास म्हंणून काय झालं ...त्या दोघांच म्हढ पाडणार म्या
खिखिखी.." डोळे फाडून तुकडो पुजारी ते सर्व ऐकत होते..त्या ध्यानाचा एक नी एक शब्द त्यांचा काळीज गार करत होत..

" ए भट्या हे असल मुxx शिंपडतो काय हा? म्या नाय घाबरत तुझ्या ह्या असल्या वारांना..आता तू बघच तेरा दिवसाची कशी जत्रा भरवतो ते , मधींत मईत बसवतो ते!
संमधा गावाला सुतीक लावतो . दिवसभर मसनाचा दिवा पेटता राहिल अशी व्यवस्था करतो की नाय बघ !"

तुकड़ो पुजारी मोठ मोठे श्वास घेऊन ते सर्व ऐकत होते. अ किंवा ब त्याच्या तोंडून बाहेर पड़त नव्हता...

त्या पिवळ्याजर्द वखवखलेल्या नजरेने ते पाच सहा सेकंद , दात दाखवत त्यांच्याकडे पाहून हसत होत..

मग ते काळसर रंगाच धुर उडवत तिथून नाहीस झाल.

क्रमश :

xxxxxxx

पुढील भाग लवकरच ...