"आज शांताबाई खूप रडत होती, घरी जेव्हा कामाला आली होती तेव्हा",शांभवी
"का काय झालं?",वैष्णवी
"अगं तिच्या जावयाने तिच्या मुलीला घराबाहेर काढलं",शांभवी
"पण का??",वैष्णवी
"अगं तिला आधीच तीन मुली आहेत आणि चौथ्यांदा ती गरोदर आहे आता तिचा नवरा म्हणतो की सोनोग्राफी करू आणि मुलगी असली तर abortion करून टाकू म्हणून. हे शांताबाईंच्या मुलीला शीला ला मान्य नाही आणि तिच्या नवऱ्याला तर वंशाचा दिवा हवाच आहे.",शांभवी
"बापरे! फारच कठीण आहे! मुलगा हवा म्हणून मुलीचा गर्भ संपवून टाकायचा! फारच रानटी आणि अडाणीपणा आहे हा.",वैष्णवी
"नाहीतर काय! मुलगा असो की मुलगी जे नैसर्गिकरित्या मिळतेय ते स्वीकारायचं त्यात अजून कुठे आपली आवड आणि निवड घुसडायची! वैज्ञानिक शोधही बरेचदा त्रासदायक वाटतात.",शांभवी
"ती बघ भैरवी येतेय! ये भैरवी आम्ही तुझीच वाट बघत होतो. काय म्हणते तुझी बहीण? तब्येत ओके आहे न तिची आणि बाळाची? आज अपॉइंटमेंट होती न तिची डॉक्टरकडे ?",वैष्णवी
"अरे कशाचं काय! आपण स्वतःला सुशिक्षित का म्हणवून घेतो हा प्रश्न पडला मला",भैरवी नाराजीने म्हणाली.
"का ग? काय झालं?",शांभवी
"अगं शिशिर चं जाऊदे पण माझी सख्खी लहान बहीण! ती सुद्धा तिच्या नवऱ्याचीच री ओढतेय.",भैरवी
"का काय केलं वासंतीने?",वैष्णवी
"वासंतीला तिसरा महिना पूर्ण झाला म्हणून आज सोनोग्राफी होती त्यात त्यांनी डॉक्टर तागडींना गर्भाचं लिंग निदान करण्यास सांगितले आणि त्या डॉक्टर ने सुद्धा कुठलीच हरकत न घेता त्यांना गर्भ मुलीचा आहे असं सांगितलं. शिशिर चं म्हणणं पडलं की आपण महागाई असल्याने तसंही एकच मूल होऊ देणार आहोत मग ते मूल मुलगाच का नको?शेवटी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि वासंतीला सुद्धा हे सगळं पटलं.",भैरवी
" मग काय करायचं ठरवलंय त्यांनी?",शांभवी
"पुढच्या आठवड्यात abortion आहे वासंतीचे",भैरवी
"बापरे म्हणजे शांताबाईचा जावई असो की तुझा बहिण जावई विचार सारखेच आहेत.",वैष्णवी
तेवढ्यात वैष्णवी चा फोन वाजला
"हॅलो",वैष्णवी
"हा दीदी मी चार आठ दिवस कामावर येनार न्हाई",वनिता
"का गं बाई?",वैष्णवी
"मला माझ्या नवऱ्याने हाकललं म्या माह्या माय कडे चाललो",वनिता
"तूला तर तीन महिन्यांचं बाळ आहे न मग अशा अवस्थेत तुझ्या नवऱ्याने कसं काय तुला हाकलले",वैष्णवी
"आहो दीदी तो मला सोडचिठ्ठी देनार म्हणतुया मला दोन पोरीचं हायेत आणि तिसरी बी पोरगीच झाली बगा. त्याचं म्हणण हाय की मला फक्त पोरीचं व्हत्यात म्हून तो दुसरी संग पाट लावणार हाये. बरं दीदी फोन ठेवतो माझ्या फोन मध्ये जास्त बॅलन्स न्हाई", असं म्हणून वनिताने फोन ठेवून दिला.
वैष्णवी दोन मिनिटं शांत बसून राहिली.
"काय झालं वैष्णवी?",भैरवी
"किती अज्ञान आहे आपल्याकडे ह्याचा मला खूप विषाद वाटतोय. माझी मोलकरीण वनिता चालली तिच्या माहेरी, तिचा नवरा तिला घटस्फोट देणार आहे आणि कारण विचार",वैष्णवी
"काय कारण?",शांभवी
"तिला फक्त मुलीच होतात म्हणून. तिला तिसरी सुद्धा मुलगीच झाली न म्हणून",वैष्णवी
"बापरे कठीण आहे हे सगळं. त्यांना कोण सांगेल की मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीवर अवलंबून नसतेच मुळी. ते पुरुषावर अवलंबून असते. पुरुषाच्या हातात नसते पण त्याच्यावर अवलंबून असते असे आपण म्हणू शकतो.",शांभवी
"ते कसं काय?",भैरवी
"अगं वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर होणाऱ्या अपत्याला आईकडून आणि वडिलांकडून क्रोमोझोम(रंगसूत्रे) च्या 23 जोड्या मिळतात. त्यातील ज्या 22 जोड्या आहेत त्यांना ऑटोझोम(autosome) आणि 23 वी जोडी आहे त्याला sex क्रोमोझोम म्हणतात.
आता आईकडून मिळालेले 22 रंगसूत्रे आणि वडिलांकडून मिळालेले 22 रंगसूत्रे ह्यांवर त्या अपत्याचे physical features ठरतात म्हणजे अपत्याचा वर्ण त्याची उंची, त्याच्या चेहऱ्याची ठेवण इत्यादी.
आणि आईकडून मिळालेला एक रंगसूत्र आणि वडिलांकडून मिळालेला एक रंगसूत्र अश्या दोन रंगसुत्रांमुळे त्या अपत्याचे लिंग ठरते म्हणजे ते अपत्य मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरते.",शांभवि
"हो पण तू म्हंटल न की ते पुरुषावर अवलंबून असते, ते कसं?",भैरवी
"तेच सांगतेय मी पुढे. की कुठल्याही स्त्री मध्ये जी sex chromosome (लिंग रंगसूत्र) असतात ती XX अशी असतात आणि कुठल्याही पुरूषा मध्ये जी रंगसूत्रे असतात ती XY अशी असतात त्यामुळे होणारे जे अपत्य असते त्याला आईकडून X किंवा X रंगसूत्र।मिळणार असते पण वडिलांकडून जर त्याला X रंगसूत्र मिळालं तर होणारं अपत्य मुलगी असते आणि Y रंगसूत्र मिळालं तर होणारं अपत्य हे मुलगा असते.
आणि हो होणाऱ्या अपत्याला X chromosome द्यायचा की Y chromosome द्यायचा हे पुरुषाच्या सुद्धा हातात नसते. ते देवाच्याच हातात असते.
स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे दोन एकमेकांना पूरक असे रूपं आहेत त्यामुळे एखाद्या दाम्पत्याला मुलगी होत असेल तर त्यात कमीपणा वाटण्याची गरज नाही आणि एखाद्या दाम्पत्याला मुलगा होत असेल तर त्यात शेफारून जायची सुद्धा गरज नाही.",शांभवि
"आता हे सगळं उद्याच वनिता च्या नवऱ्याला जाऊन आपण सांगू. बघू त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडतो का?",वैष्णवी
"मुळात मुलगा होण्यासाठी एवढ्या मुली होऊ देणं हे वनिताच्या नवऱ्याने आणि शांताबाईंच्या जावयाने योग्य केलं नाही. एकतर एवढ्या मुलींचं संगोपन करण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का हा विचार त्यांनी करायला हवा होता. लोकसंख्या कमी होणार नाही तर बेरोजगारी कमी कशी होणार आणि आपल्याला वंशाचा दिवा हवा म्हणून झालेल्या अपत्यांना आपण गैरसोयीचे आयुष्य का म्हणून द्यायचं? हेच मला पटत नाही.",शांभवि
"त्यांचं एकवेळ जाऊ दे पण ह्या उच्चशिक्षित शिशिर आणि वासंती चं काय? लिंगनिदान करणे आणि स्त्रीभ्रूणहत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे त्यांना आणि त्या डॉक्टर ना कळू नये हे केवढे दुर्दैव",भैरवी.
"आपण शिशिर आणि वासंती ला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करून बघू. आपण तेवढंच करू शकतो",शांभवि
"चला निघू आता आपापल्या घरी. उद्या वनिता,शांताबाई आणि वासंती तिन्ही ठिकाणी जायचंय",वैष्णवी
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★