भाग – ५
त्यांची गाडी तेथून काही अंतरावर निघाली तेव्हा त्या स्त्रीचा पती बोलला, “ काय झाले ग असे तेथे आणि तू का बर अशी आवाज चढवून त्या तरुणांना बोललीस.” मग त्या स्त्रीने तिचा पतीला सावली बद्ल सांगितले आणि मग ती सावलीकडे वळली. ती स्त्री म्हणाली, “ तर सांग बेटा काय झाले होते आणि ते तुझ्या मागे का बर लागलेले होते.” मग सावलीने तीचाबरोबर घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो सगळा प्रकार ऐकून त्यांनी म्हटले, “ फार बरे झाले कि तू आमचा सोबत आलीस. तर आता सांग तुला इस्पितळात नेऊ कि तुझ्या घरी.” मग सावली बोलली, “ मला तसे फार लागले नाही आहे फक्त खरचटलं आहे. मी तशी बरी आहे फक्त थोडी दुखापत आहे. तर तुम्ही मला घरीच सोडा मी नंतर माझ्या आईसोबत इस्पितळात जाऊन येईल. शिवाय ते गुंड असे.....” असे म्हणून तिने सहज मागील बाजूस बघितले तर ते गुंड तरुण त्यांचा गाडीचा पाठलाग करत होते. ते बघून आता तिने एक निर्णय घेतला. सावलीने त्या पती पत्नीला म्हटले, “ तुम्ही मला थेट पोलीस स्टेशनला नेऊन सोडा मला त्यांचा विरुद्ध तक्रार आजच आणि आत्ताच करायची आहे.” असे म्हणून तिने गाडी पोलीस स्टेशनाकडे वळवायला लावली. ती आता पोलीस स्टेशनला येऊन पोहोचली होती आणि त्या दोघांनी तिला पोलीस स्टेशनचा आत मध्ये आणून बसवले. त्यानंतर ते त्यांचा घराकडे जाण्यास निघून गेले.
मग पोलिसांनी सावलीला तेथे येण्याचे कारण विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यांनी तिला तीचाबद्द्ल संपूर्ण विचारपूस केली त्यानंतर तिला तिचे येथे येण्याचे कारण विचारले. तर सावली म्हणाली, “ सर माझे नाव सावली आहे. मी लोखंडी पुलाजवळील साई नगरात राहते. तर मला मागील ....” असे बोलता बोलता सावलीने तिचा बरोबर घडलेला आणि आता हल्ली घडत असलेला प्रसंग सांगितला. तिने तो फोन नंबर आणि ते पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर तिने लिखित मध्ये त्या अनोळखी व्यक्तीबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली. सावलीचे संपूर्ण बोलने ऐकल्यावर इन्स्पेक्टरने सावंतानी तिला न घाबरण्याचा सल्ला दिला आणि आरोप्याला आम्ही लवकरात लवकर पकडून घेऊ असा तिला विश्वास दिला. त्यानंतर सावली त्यांना म्हणाली, “ सर माझी आणखी एक विनंती आहे स्वीकार कराल काय? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, “ हो बोला, काही हवे आहे काय तुम्हाला.” तेव्हा सावली म्हणाली, “ तुमचा पोलिसांचा गाडीत तुम्ही मला घरी सोडून द्याल काय?” तेव्हा ते म्हणाले, “ हो नक्कीच शिवाय तुम्हाला इजा झालेली आहे आणि तेव्हा आमचा काय सगळ्यांची पिडीताला मदत करण्याची जिम्मेदारी बनते.” असे म्हणून ते पोलीस स्टेशन मधून सावलीचा घराकडे निघाले.
ते दोन गुंड तरुण आताही सावलीचा माघारी होते म्हणून सावलीने इकडे तिकडे वळून बघितले तर तिचा नजरेत ते दिसले. सावलीने सावंत साहेबांना त्यांचा बद्दल माहिती दिली तर त्यांनी तुरंत वायरलेसवरून स्टेशनला फोन करून त्या गुंडांना अटक करण्यास सांगितले. बघता बघता एक गाडी त्यांचा पाठीमागून येऊ लागली होती. त्या गुंडांचा पाठी मागून पोलिसांची गाडी येत असलेले बघून ते दोघेही वेगळ्या दिशेने पडून गेले. त्यांना पडतांना सावलीने बघितले आणि साहेबांना सांगितले. साहेबांनी तुरंत त्यांचा सहकर्मी यांना माहिती दिली आणि ती गाडी सुद्धा त्या गुंडांचा पडण्याचा दिशेने निघून गेली. आता सावली सुखरूप तिचा घरी पोहोचली होती. पोलीस सोबत बघून सावलीची आई बाहेर आली आणि काय झाले म्हणून विचारणा करू लागली होती. तेव्हा आईला थांबवून सावलीने सावंत साहेबांचे आभार मानून त्यांना रवाना केले आणि मग आईसोबत घराचा आत मध्ये गेली.
घराचा आत गेल्यानंतर आईने सावलीला विचारले, “ काय झाले बाळा, तू अशी का बर लंगडत आहेस. तुझा अपघात झाला कि तुला त्या गुंडांनी....” असे म्हणून आई फारच काळजीत पडून गेली. तशी सावली सुद्धा आता थोडी फार घाबरली होती परंतु तिने तिचा आईकडे आणि तिचा उतरत्या वयाकडे बघितले आणि स्वतःला सावरून ती सहज होऊन बोलली, “ आई तसे घाबरण्याचे काही कारण नाही आहे. मी पोलीस स्टेशनला जात असतांना ते गुंड ....” अशाप्रकारे तिने आईला सगळ जे काही घडल ते सांगितले. त्यानंतर आई सावलीचा सुरक्षेचा विचार करून अधिकच चिंताग्रस्त होऊन गेली. तर सावलीने आपल्या तल्लख बुद्धीने ती वेळ मारून नेली आणि आईला जास्ती ताण न देता तिला सहज केले. तिने पुढे पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचा बद्दल आणि त्यांचा काम करण्याचा पद्धती बद्दल आईला सविस्तर पणे सांगून तिचा मनाला फार मोठा धीर दिलेला होता. सावलीने त्या वेळेस आपली वेदना सहन करून आईला फार मोठा आधार तर दिलेला होता. परंतु तिचा मनात आता पुढील परिस्थितीचा बद्दल द्वंद सुरु झाला होता. ती स्वतःला आता पूर्णपणे तयार करण्यास तत्पर होत होती. तिला आता स्वतःला आणि तिचा घरचा सदस्यांचा सुरक्षेचा बद्दल गहन विचार करावयाचे होते. याच दरम्यान आणखी एक भयंकर असे संकट सावलीचा आयुष्यात येण्यासाठी तत्पर झालेले होते ज्याचा बद्दल ती पूर्णपणे अनभिग्य होती.
शेष पुढील भागात........