" काय गं हा खडूस सिनियर काय म्हणत होता तुला...??" तो जाताच नुकतीच आत आलेली स्नेहा राधा ला बोलते..
" कोण सिनियर..?? " राधाला मात्र कळालं नाही कि ती कुणाबद्दल बोलत आहे...खरच तिला कळालं नव्हतं कि ती नाटक करत होती...डोन्ट नो...
" अगं तोच पांढर्या शर्ट मधला...तिथे दारात उभा राहून किती वेळ झालं तुलाच तर न्याहाळत होता...शिवाय काही तरी बोलला ना..." स्नेहा दाराकडे बोट करत म्हणते...
" तो तुमचा सिनियर प्रेम कुंवर शर्मा, आपल्या सिनियर डॉक्टर विमल शर्माचा मुलगा आहे..." सिस्टर मारिया मागुन येत त्या दोघींना बोलते, " बरं झालं तुम्ही दोघी एकत्र च मला सापडलात...ती तिसरी तुमची मैत्रिण कुठेय...तिला हि बोलवा आता किंवा मी सांगेन ते नंतर तिला सांगा सर्व..." सिस्टर मारियाच्या आवाजात गोडवा होता...जणु आताच त्यांनी पुरणपोळी किंवा आमरस खाल्ला असावा आणि त्या चवीच्या प्रतिभा मुळे त्यांच्या आवाजात इतकी मधुरता आली असावी....
" सिस्टर...ती आता कुठे आहे ते सांगता नाही येणार....पण काही हरकत नाही तुम्ही आम्हां दोघींना सांगा..." स्नेहा जरा घाबरतच बोलते..." आम्ही सां...." ती बोलता बोलता राधा कडे पाहते तर राधा मी नाही हं असा लुक तिला देते, " म्हणजे ती माझी जवळची मैत्रीण आहे तर मीच सांगेल तिला...डोन्ट वरी..." ती राधा ला ओके चा लूक देत परत सिस्टर मारिया ला पाहत बोलते...
" ते तुमचं तुम्ही पहा..कोणी कुणाला सांगणार ते..." सिस्टर मारिया दोघींकडे पाहत ,त्यांचा नजरानजरी चा खेळ लक्षात येताच बोलतात..आता आवाजात जरा जरब होती...त्या दोघींनी नुसत्या यांना हलवल्या आणि खाली मान घातली...
" ईतकं ही काही झालं नाही कि माना तुम्ही खाली घालाव्यात..." त्या आता हसत बोलतात, " त्याच काय आहे ना ,समोर डॉक्टर शर्मा होत्या...म्हणून मला आवाज वाढवावा लागला...सॉरी हं..." त्या आपलं तोंड कसंनुस करत बोलल्या ...तसं दोघी वर तोंड करून बघतात तर सिस्टर मारिया च्या चेहर्यावर आता एक भली मोठी स्माईल होती...आत्ता कुठे दोघींना बरं वाटतं...त्या मोठा श्वास घेवुन सोडतात...
" बरं आता मी तुम्हांला हिथले काही नियम समजावुन सांगते...जे खुप गरजेचे आहे..." त्या चालता चालता बोलू लागतात आणि त्या दोघी ही त्यांच्यामागे चालू लागतात...त्या प्रत्येक वॉर्डची अगदी खोलात जाऊन माहिती देत होत्या आणि वर तिथे जाताना ही ज्या अटी असतील ते ही सांगत होत्या..
" हे हॉस्पिटल आहे कि नियमांचे दुकान..." चालता चालता हळूच स्नेहा राधेच्या कानात बोलते..
" श्शु....हळू बोल जरा..त्या सिनियर ने ऐकलं ना तर आपलीच गोची व्हायची ..." तोंडावर बोट ठेवून आवाज काढत राधा तिला कानात बोलते..
" डॉक्टर ज्युनिअर्स ,लक्ष कुठेय तुमचं..." एक रांगडा आवाज ऐकुन आता मात्र दोघींची पायाखालची जमीन सरकते...राधेने तो आवाज ओळखला होता,कारण तो प्रेमचा आवाज होता...
" सॉरी सर..." परत दोघींनी माना खाली घातल्या..
" आज काही खरं नाही राधे तुझं...दोनदा सिनियर कडून ओरडा पडला आहे.." राधा खालीच मान घालून स्वतः शीच बोलली..
" स्वतःशी आणि एकमेंकीशी गप्पा मारून झाल्या असतील तर आता कामाचं बघा...सिस्टर मारिया मघापासुन तूम्हांला काहितरी सांगत आहेत आणि तुम्ही दोघी नुसत्या गप्पा मारत आहात..." आवाजात आता ही जरब होतीच त्याच्या...
" सॉरी सर ...पण आम्ही तर एक मिनिट ..." स्नेहा ही खाली मान घालून उभी असते,ती तशीच बोलते..ती पुढे बोलणार तोच राधेच लक्ष त्याच्या डोळ्यांत जातं..तो ही त्याच वेळी तिच्याकडे पाहत असतो...नजरानजर होताच राधा पटकन स्नेहा चा हात पकडून तिचा हात दाबते...साईन होतं कि आता पुढे काही बोलू नको..तशी ती ही शांत बसते...तो हि मग तिथुन निघून जातो..
" हम्म..तर काय नाव म्हणालात तुमचं...??" सिस्टर मारिया काही बोलणार तोच त्यांच्या लक्षात येत कि त्यांनी तर ह्यांना नाव च विचारलं नाही ईतका वेळ..
" सिस्टर, मी स्नेहा तर ही राधा...( राधा कडे बोट करून ) " स्नेहा ईंट्रो देते...
" ओके,तर डॉक्टर राधा आणि स्नेहा.." त्या हसत नाव उच्चारत त्यांना पाहुन बोलतात, " बॅक टू वर्क...हिथे शिस्त खुप पाळली जाते...तुम्हाला दिलेल्या शिफ्ट टायमिंग ला वेळेच्या आधी पाच मिनिटे जर लवकर आलात तर कोणी ही काही बोलणार नाही तुम्हांला...पण हो ,तेच जर तुम्ही शिफ्ट च्या टायमिंग पेक्षा एक मिनिट ही उशिर केलात तर फायर ही होऊ शकता...तुमच्या ड्युटी नंतर तुम्ही काय करता ह्याचा आम्ही काही ही आक्षेप घेणार नाही..मग तुम्ही उड्या मारा नाहीतर डांस....तो तुमचा प्रश्न असेल...शिवाय आपल्या कामात सिन्सियर पणा असायला हवा...फक्त बोलण्यातुन च नाही तर कृतीतुन ही... डॉक्टर राधा,मघाशी जे तुम्ही चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये गोंधळ घातलात तसा परत हिथे चालणार नाही..एवढ लक्षात असु दे...बस बाकीचे रूल्स ॲन्ड रेगुल्येशन वेळेवर कळतीलच..." त्या खुप मोठ्या मोठ्या ईंनस्ट्रक्शन देऊन थांबल्या...
" काय झालं..?? घाबरलात कि काय...??" पण दोघी मात्र त्यांच्याकडे अशा पद्धतीने टक लावुन पाहत होत्या कि तोंडावरील माशी हि उठत नव्हत्या त्यांच्या..." डॉक्टर राधा, डॉक्टर स्नेहा..." सिस्टर मारिया ने त्यांच्या समोर चुटकी वाजवली तेव्हा त्या दोघी भानावर आल्या...
" झाले रूल्स...??" स्नेहा एकदम आश्चर्य व्यक्त करत म्हणते..
" हो झाले...अजुन काही असतील.." सिस्टर मारिया बोलता बोलता थांबतात व त्या दोघींकडे पहायला लागतात... त्या दोघींच्या या रिॲक्शन वर त्या जरा भांबवतात...
" सिस्टर मारिया .... चक्कर यायची बाकी राहिली आहे...असं वाटतय आपण परत शाळेत आलोय...किती ते नियम आणि किती त्या अटी..." चक्कर आल्याची ॲक्टिंग करत स्नेहा बोलते... राधा तोंडाला हात लावुन हसत तिला दुसर्या हाताने सावरते...
" हम्म आज पहिलाच दिवस आहे तर ही वेळ आहे, तुमची डॉक्टर स्नेहा...पण उद्यापासुन कसं काय करणार...?? " सिस्टर मारिया हसत बोलते...
" तेव्हाच तेव्हा बघु सिस्टर..पण आता पळायला हवं...रात्री म्हणे पार्टी ही आहे आमच्या साठी.." त्या लॉकर रूम,जी खास ईंटर्न साठी बनवली होती तिथे जात दारातुनच स्नेहा बोलते..
" हो ती तर दरवर्षीच असते...त्याच काय...??" सिस्टर मारियांना तिच्या बोलण्याचा बोध होत नाही...राधा ही कन्फ्युज, हिला आता काय मध्येच झालं या भावनेने पाहत असते....
" हो तुमच्यासाठी दरवर्षी सिस्टर मारिया...पण ह्या बॅचला आता आम्ही नविन आहोत..." ती आपली सॅक अडकवत बोलते," म्हणजे ही पार्टी आमच्या साठी असेल ना...मग जरा आवरून..." ती पुढं कंटिन्यू करत बोलते..
" ओह त्या अर्थी...ओके ओके..ईंजोय युअर सेल्फ... डॉक्टर राधा तुम्ही सुद्धा...मी जाते आता..." सिस्टर मारिया स्नेहा ला पाहत गालात हसतात..आणि नकारात मान हलवत तशाच आपल्या कॉमन रूमकडे जायला लागतात....त्यांना स्नेहा च्या प्रत्येक हालचालींच कौतुक तर वाटत होतंच सोबत किती वेडी आहे मुलगी...पार्टीची दिवानी असावी हे ही लक्षात येतं...
" अगं राधा...तु नाही का जाणार घरी...?? पाच वाजलेत.. आता तसं पाहिलं तर आपली शिफ्ट ही संपली आहे.." ती आपल्या मोबाईल मध्ये पाहत बोलते..." आणि पार्टी ही रात्री आठ वाजता, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवली आहे...सो हिथुन थांबुन काय करणार आहेस..." राधा तशीच तिच्याकडे पाहत उभी आहे हे पाहुन स्नेहा तिला विचारते..
" हो गं..निघतेच आहे मी सुद्धा...तसं ही पार्टीला काही मी येणार नाही..." राधा आपल्या लॉकर जवळ जाऊन बोलते...
" का गं...अगं असं कस चालेल...?? पार्टीतर आपल्या साठी आहे आणि आपणच नाही गेलो तर सिनियर काय म्हणतील..??" स्नेहा ला तिच्या बोलण्याच आश्चर्य वाटतं...
" अगं हो मान्य आहे मला कि, पार्टी आपल्यासाठीच आहे पण काय करू...घरी पोहचेपर्यंत च आठ वाजतील मला या ट्रॅफिक मुळे...." ती तोंड पाडून बोलते...
" अच्छा ,हा प्रोब्लेम आहे तर..." स्नेहा आता हसत आपल्या हातावर दुसर्या हाताने टाळी वाजवत म्हणते, " मग असं करायचं का...??" ति विचार करत म्हणते..तशी काय या भावनेने राधा तिच्याकडे पाहते, "अगं, तु माझ्या घरी येशील का...?? घर हॉटेल पासुन दहा मिनिटांच्या अंतरावर तर आहे..."
" अगं पण ..." राधा पुढे काही बोलणार तोच स्नेहा तिचा हात धरून ओढतच बाहेर आणते आणि बळच हातात हेल्मेट देते...
" हे काय आता...??" ती हेल्मेट ला पाहुन गोंधळून जात म्हणते..
" अगं बाईक वरून जायचय माझ्या ,मग हेल्मेट नको का...? काय तु पण..." ती हसत चावी आपल्या बाईक ला लावत बोलते..
" तु पण ऐकणार नाही..." राधा हसत म्हणते, " का माहित नाही, पण मला असं वाटतय कि आपली ओळख आजची नाही तर जन्मोजन्मी ची असावी ..." ती हेल्मेट ला पाहत बोलते..
" ते जन्मोजन्मी चं नातं आहे कि नाही ते नंतर पाहु डिअर...आधी बाईकवर बस..आपल्याला नाहीतर पार्टीला उशीर व्हायचा..." स्नेहा बाइकला किक मारत बोलते..तसं हसुन राधा दिलेलं हेल्मेट घालते...
" तु हो पुढे...मी बाईक पार्क करून आले..." हॉटेलवर येताच स्नेहा राधाला आत जायला सांगते आणि ती मात्र पार्किंग ऐरियात आपली बाईक पार्क करायला जाते...त्यांना तसा पाच दहा मिनिटे पोहचायला उशीर च झाला होता...
" बरं ये लवकर ...मी आहे दारात च " म्हणत राधा ही हॉटेल च्या गेटवरच थांबते...
" हे ब्युटीक्वीन...हिथे का उभी आहे...चल ना आत जाऊ..." दारातच उभा राहून वाट पाहत असलेल्या राधेला शंतनु बोलतो...
" अमं..." तो आवाज ऐकुन जरा ती दचकते पण तो आहे म्हटल्यावर परत त्याच्याकडे पाहून एक स्माईल करते..." तुम्ही व्हा पुढे...ते माझी मैत्रिण यायची राहिली आहे..." ती इकडे तिकडे बघत च त्याला बोलते..
" ओह...ओके ..नो प्रोब्लेम..या तुम्ही आत मध्ये नंतर.." तो हसत बोलतो, " मला मात्र आताच जावं लागेल..एकतर ही पार्टी मीच ॲंरेंज केली आहे आपल्या कलिग बरोबर आणि त्यात ही मी आता उशीरा आलो आहे.." तो अजुन दात काढून बोलतो...
" हम्म ओके..." ती मात्र तुटक बोलते तसा तो हसुन तिला बाय करतो आणि आत निघून जातो...
" सॉरी शंतनु...तुला इतक्या सहज कशी विसरेन मी...??" पाठमोर्या शंतनु कडे पाहत ती उदास होत बोलते..
क्रमशः
काय असेल त्यांचा भुतकाळ ?? का अशी म्हणाली असेल राधा ... जाणुन घेण्यासाठी वाचत रहा राधा प्रेम रंगली ...कथा आवडत असल्यास नक्कीच कमेंट्स आणि स्टारचा पाऊस पडावा...