" ही राधा स्वतः ला खुप हुशार समजते काय..." समोर पेशंटशी दिलखुलास बोलत असलेल्या राधेला पाहत प्रिती स्नेहा ला बोलते..
" तु का सकाळपासुन तिच्या मागे हात धुवून लागली आहेस...करू देत ना तिला काय करायचे ते..." वैतागलेली स्नेहा प्रिती ला एक बोट दाखवत ओरडतेच जवळ जवळ...कारण मनवा ने सांगितल्यापासुन आता लंच टाईम पर्यंत राधा सर्व पेशंटची हिस्ट्री मनापासुन जाणुन घेत असते...तर मिस प्रिती , हॉस्पिटल आपल्या बापाचे असल्याप्रमाणे सकाळ पासुन नुसतीच उंडरत होती एका वॉर्ड मधुन दुसर्या वॉर्ड मध्ये...
" ऐ आवाज कुणावर वाढवते गं..." तिच्या बोटात आपलं बोट अडकवुन प्रिती बोलते, " हा शहाणपणा माझ्यासमोर नाही करायचा हं... मी जर तुझं नाव सुचवलं नसतं ना तर तु आज हिथे ईंटर्न शिप करू शकली नसती..." प्रिती आपल्या स्वभावाप्रमाणे अरेरावी च्या भाषेत बोलते...
" हो..." स्नेहा मान हलवत शांत होत बोलते, " म्हणून तर तुला सकाळपासुन सहन करत आहे...एकदा फक्त माझं कर्तृत्व मला दाखवायचा चान्स या हॉस्पिटल मध्ये मिळू दे ,मग मी कोण आहे सांगेन तुला..." स्नेहा चेहर्यावर एक हलकीशी स्माईल आणत राधेकडे जात हळू आवाजात म्हणते..
" ह...ये हुयी ना बात..." राधा ही हसत तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलते, " सॉरी पण मी तुला आणि तिला दुपारपासून पाहत होते...तेव्हा माझा असा ग्रह झाला होता कि तुला फक्त चमचेगिरी करायला आवडतं...पण आता खरं कारण कळालं आणि ते ऐकुन मनाला खुप आनंद झाला कि या वर्षभरात मला तुझ्यासारखी हुशार मुलगी मैत्रिण म्हणुन भेटणार...फ्रेंड्स " राधा बोलत बोलत तिच्यापुढे आपला हात करत म्हणते....तिच्या चेहर्यावर ची स्माईल क्षणात आपल्या मनावरचा ताण कमी करेल इतकी भारी होती...
" ऑफकॉर्स फ्रेंड्स...ॲन्ड डॉंट बी सॉरी फॉर दॅट...कारण पहिल्या भेटीत कायम सर्वजण मला असंच समजतात...तिच्याबरोबर असले कि... कॉलेज मध्ये यामुळे ईच्छा नसुन ही दुश्मनी खुप पत्करली पण ..." ती उदास होत बोलते..
" छोडो कल कि बातें ..कल कि बात पुरानी..." राधा गाणं म्हणत तिला चिअर करते...तसं ती ही हसुन पुढचं कडव म्हणत गाणं पुर्ण करते...
" चलो अब हम दोनो ,एक नयी शुरूवात करते है आजसे..हमारे नये मंजिल कि....हॉस्पिटल एकत्र पाहुयात...." राधा हसुन बोलते..
" हो ते पाहुयात...पण त्या आधी पेटपुजा...??" स्नेहा आपल्या पोटावर हात ठेवत ,बारिक चेहरा करत...भुकेची आठवण करून देते...तशी ती हसतच ओके म्हणते...आणि दोघी कॅंटिन मध्ये गप्पा मारत जातात...
" प्रेम ..यावेळी आपल्या ईंटर्न म्हणे सर्व मुलीचं आहेत..." शंतनु प्रेमला बोलतो...दोघंही कॅंटिन मध्ये सध्या तासाभरासाठी कोणतीच ड्युटी नसल्याने चील करत असतात...
" मग...??" कॉफीचा आस्वाद घेणारा प्रेम रूक्ष आवाजात बोलतो...तो त्याचवेळी संपुर्ण कॅंटिन वर ही लक्ष देत असतो...
" त्याला असा काय फरक पडणार आहे, शंतनु...??" त्याच वेळी मनवा त्या दोघांना जॉईन होतं बोलते...
" हम्म ते ही आहे म्हणा ..." तिला पाहताच शंतनु एक उपहासात्मक श्वास घेऊन सोडत बोलतो, " ही पांढरी पाल असल्यावर प्रेम ला काय म्हणा इतर चिंचुद्री शी घेणं देणं असणार आहे म्हणा..." शंतनु ही आता कॉफीचा आस्वाद घेत पुटपुटतो...
" चिचुंद्री...?? कुठेय...??" पण नेमकं त्याच्या शेजारी येऊन नुकत्याच बसलेल्या अतुल च्या कानावर पडतं आणि तो आपले पाय खुर्चीवर घेऊन घाबरून बोलतो..
" चिल अतुल...कॅंटिन हे सिटी हॉस्पिटल चे आहे...आणि तो चिंचुद्री बाकीच्या मुलींना म्हणाला आणि मला नेहमी प्रमाणे पांढरी पाल..." मनवा मात्र अशी बोलते कि शंतनु च्या तशा बोलण्याचा तिच्यावर काही ही फरक पडत नाही या भावनेत...
" तुला ..माहित आहे...??" शंतनु मात्र चांगलाच तिच्या या वाक्यावर गडबडतो...
" हो मला माहित आहे..." ती तोंड वाकडं करत बोलते आणि प्रेमजवळ सरकते...प्रेम च्या हातात तिचा एक हात असतो तर दुसर्या हाताने त्याचीच उष्टी कॉफी पिणं चालू असतं तिच आरामात...ते ही त्याला तसं काही न विचारता....
प्रेम मात्र शंतनु कडे , काय ही मुलगी या नजरेने पाहत आपली नकारात्मक मान हलवतो...आणि त्या कॉफीचा मग तिच्याच हातात सोपवुन तिथून निघून जातो..
" आता ह्याला काय झालं...?? जाऊ दे, ही कॉफी तरी पुर्ण मला मिळाली प्यायला...ते ही एक रूपया न खर्च करता..." मनवा बोलते आणि परत हळूहळू त्या कॉफीचा आस्वाद घ्यायला लागते...शंतनु ही काही न बोलता आपली कॉफी संपवतो आणि तिथुन लगेच निघून जायला उठतो...
" ओह शट..." तो लक्ष नसल्याने मागे उभी असलेल्या मुलीला जाऊन धडकतो..." सॉरी ते माझं लक्ष नव्हतं ..." म्हणत तो पुढे पाहतो आणि समोरच्या व्यक्तीला पाहुन तो चांगलाच शॉक मध्ये जातो...
" तु राधा आहेस ना...??" तो ज्या मुलीला धडकला तिच्या शेजारच्या मुलीला विचारतो..
" हो..राधा च आहे मी...पण तुम्ही मला कसं ओळखलं...?? " राधा मात्र स्नेहा कडे विचित्र नजरेने पाहत त्याला विचारते..." म्हणजे मी तुम्हांला ओळखते का...??" तर तिकडे स्नेहा मात्र शंतनु ला पाहून लट्टू होते...
“ अगं असं काय करतेस…?? इतक्या लवकर मला विसरलीस तू..?? आणि सिटी हॉस्पिटल ला तरी ओळखतेस ना...?? कि त्याला ही विसरली आहेस...?? " तो गमतीत तिला हसत बोलतो...
" सॉरी पण खरंच मी ओळखलं नाही तुम्हांला..." ती कन्फ्युज होत त्याच्याकडे पाहत बोलते..
" ओके.. रिलॅक्स...तु बारा वर्षांची होतीस ना तेव्हा या हॉस्पिटल मध्ये आली होती...आठ चं दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली होतीस त्यानंतर परत कधीच दिसली नाहीस...तसं मी ही तुला विसरलो च होतो पण तुझे डोळे व कपाळावरचे हे व्रण.." तो बोलतच असतो कि ती आपल्या कपाळावरच्या व्रणाला हात लावते, " त्यामुळे मी ओळखलं तुला..." मधलं तो काय बोलला ना तिच्या कानावर पडले ना डोक्यात शिरले...
" अच्छा...पण खरं सांगू ,मला खरंच नाही आठवत आहे काही.." ती दिलगिरी व्यक्त करत बोलते..
" इट्स ओके.. त्यावेळी आपण दोघे तसे खुप लहान होतो..." तो हसत बोलतो, " त्यावेळच नाही आठवत ,ठिक आहे पण आता तर मैत्री करू शकतो ना.." तो आपलं हसु काही केल्या थांबवत नव्हता... त्यामुळे गालावर पडणारी खळी मोहक दिसत होती..
" मैत्री...??" ती आता पेचात पडते, हो म्हणावं कि नाही...
" आपण होऊयात ना फ्रेंड्स.." ती पुढे काही बोलणार तोच स्नेहा त्याच्यापुढे हात करत बोलते..तसं शंतनु चं लक्ष तिच्याकडे क्षणभरासाठी च गेलं आणि त्याने तिला ईग्नोर केलं सरळ सरळ....
" हे राधा...बोल ना... फ्रेंडस ??" तो राधासमोर हात करत बोलतो, " हे बघ ह्यात ही तुझाच फायदा आहे...कारण मी ही हिथला एक सिनियर डॉक्टर आहे... त्यामुळे तुला पुढे गरज लागली तर माझी हेल्पच होईल..." तो परत हसतच तिला बोलतो..
" ओके..." खुप विचार करून राधा त्याच्या हातात हात देते..ते ही कसनुस हसु असतं तिच्या चेहर्यावर..
" चिल...फ्रेंड्स आहोत हे माझ्या चांगल्या लक्षात राहिल.. त्यामुळे तसं फ्लर्ट वैगेरे करणार नाही..." तो गमतीत बोलतो..तसं तिच्या चेहर्यावर कुठे आता खरी स्माईल येते..
" ह्याला म्हणतात खरं हसु..." तो तिच्या हसण्यात हरवत बोलतो...दोघांची काही सेकंद नजरानजर होते...तिकडे मात्र डोळ्यांची उघडझाप करत स्नेहा त्याला च पाहत असते...ज्याच्याकडे मात्र या दोघांचं ही लक्ष नसतं...
" तुम्हांला काही ड्युटी नाही का आज... डॉक्टर शंतनु..." एक रागीट आवाज येतो कानावर तसं इतकावेळ हातात दिलेला हात झटकन राधा काढून घेते...समोर डॉक्टर मनवा असते...
" ते मॅम..." तिला पाहुन तर अजुन तिची व स्नेहा ची धांदल उडते...दोघींची ततपप सुरू होते...मनवा ला पाहून त्या काढता पाय घेते...
" कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..." गुणगुणत शंतनु ही तिथुनच जात असतो कि..
" सिनियर ने कसं वागायचं असतं ज्युनिअर शी याच तुला आता प्रशिक्षण द्यावं लागणार आहे का..?" एक रूक्ष आवाज कानावर पडतो...तसं तो मागे वळून पाहतो तर अर्थातच ती डॉक्टर मनवा असते...
" डॉक्टर मनवा...मी कसं वागावं आणि काय करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही...तुम्ही ज्युनिअर च्या लीड आहात ...माझ्या नाही...हो कामाशी काम ठेवावे..." शंतनु रागात बोलतो आणि तिथुन निघून जातो...
" ऐ डॉक्टर ताई...तु आऊट आहेस...." चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये आज नेहमीपेक्षा जास्त गोंधळ होता... त्यामुळे आपल्या केबीन कडे जात असताना प्रेम च लक्ष गेलं...केबिन आणि चिल्ड्रन्स वॉर्ड चा रस्ता एकच होता..जी त्याला माँसाहेब च्या केबिन कडून त्याच्या केबिनकडे जाणारी ही एकमेव वाट होती..
" सिस्टर ,हा का गोंधळ लावला आहे..." प्रेम ने वैतागत नर्स मारिया ला विचारले...साहेबांचा अजुन एक द्वेष ...लहान मुलं डोक्याला हेक्टिक असं मानत असतो त्यामुळे त्याला ते नजरेसमोर ही नको असायची...तो दारातच अजुन उभा होता...
" ते सर..." ती नर्स गडबडून जाते त्याला असं अचानक पाहुन..." चिंटू इंजेक्शन ला नको म्हणत होता..." ती हळूच मान खाली घालून बोलली..
" आणि म्हणून डॉक्टर अशी फालतुगिरी करत आहे...राईट...??" त्याने रागात लुक देत विचारले..नर्स मारिया ने फक्त हो मध्ये नाही मध्ये अशी दोनदा मान हलवली...
" हो नाही...हे नक्की काय ..?? सिस्टर मारिया, त्या नविन ईंटर्न आहेत..त्यांना हिथले रूल्स माहित नाही पण कमीत कमी तुम्ही तरी सांगायचे..." प्रेम नर्स मारिया वर जवळ जवळ ओरडलाच आणि त्याच्या मोठ्या आवाजाने सर्व लहान मुलं चटकन आपल्या बेडवर घाबरून जाऊन बसले...
" डॉक्टर ताई...मला इंजेक्शन दे पटकन..." चिंटू हि आपल्या बेडवर जाऊन बसला आणि तिच्या समोर हात करतच बोलला...ती मात्र गोंधळून प्रेम कडेच पाहत होती...
" डॉक्टर , मला वाटतय हितं तुम्हांला पेशंटला चेकअप साठी पाठवलं आहे...नाही त्यांच्याबरोबर मस्ती करायला..." ती वेड्यासारखी आपल्याला पाहत आहे याची जाणिव होताच तो तिच्यासमोर चुटकी वाजवत बोलतो तशी ती भानावर येते...
" ओह सॉरी डॉक्टर..." म्हणून ती पटकन चिंटू जवळ जाणार इंजेक्शन द्यायला तसं तोच तिच्या हातुन इंजेक्शन घेतो व चिंटूला दुसर्याच क्षणी देऊन ही टाकतो...ते ईतकं फास्ट असतं कि तिला काय बोलावं पुढे ते ही समजतं नाही...
" डॉक्टर यापुढे लक्षात ठेवा , अशा चुका परत जर घडल्या तर माफी तर नाही मिळणार पण या हॉस्पिटल मधुन तुम्हांला सस्पेंड केलं जाईल...आणि पुढे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुमचं इंटर्नशिप होणार नाही याची ही नोंद घेतली जाईल..." तो त्याच आवाजात बोलतो व तिथुन निघून जातो...ती मात्र तशीच पाहत राहते...
" ताई ,तो खडूसच आहे..तु नको लक्ष देऊ..." चिंटू तिचा हात पकडून म्हणतो, " तु मला गोष्ट सांगण्याचं प्रोमिस केलं होतं...आता तरी सांग..." तो तिला हट्ट करत आपल्या जवळ बसवतो ...मग ती ही हसुन त्याला गोष्ट सांगायला लागते...
दारातच उभा असलेला ,पाठमोरा प्रेम दोघांचं बोलणं ऐकतो...तिच्या कडे पाहतो...ती पांढर्या चुडीदार मध्ये खुप गोड दिसत होती..तिचे ते सिल्की केस , ज्याची एक बट तिच्या गालावरून खाली आलेली,तिच्या सौंदर्यात अजुन भर टाकत होती...तो तिच्याकडे पाहतच राहतो...तिचे ते उघडबंद होणारे लालचुटुक ओठ त्याला आकर्षित करत होते...
" व्हॉट अ नॅचरल ब्युटी !!" त्याच्या तोंडून अचानक वाक्य बाहेर पडतं...तसं तिचं लक्ष त्याच्याकडे जातं.....
क्रमशः