मल्ल प्रेमयुध्द
दोघेसुद्धा पूर्ण रस्त्याने काहीही बोलत नव्हते.वीर गाडी चालवत तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत होता.
"दोन महिन्यात तुम्ही माझं मन वळवणार व्हता. पण माझ्या मनासारखं झालं... तुम्हाला प्रयत्न करायची गरज न्हाय आपल्या दोघांवरच राज्य हुकल अंबानी आपला मार्ग मोकळा केला. तुम्ही माझा इचार नका करू मी खुश हाय हे लग्न मोडलं म्हणून..." क्रांती म्हंटल्यावर वीरने गाडी बाजूला घेतली आणि गाडीचा ब्रेक जोरात दाबला.
" हा आता बोला काय म्हणाला? आणि हो हे माझ्या डोळ्यात बघून बोला." क्रांतीने नजर खाली केली.
"का आता काय झाल?" वीर
"तुम्ही आबांचं ऐकावं एवढंच मला वाटतं... मी तर अजून तुमास्नी होकार पण दिला नाय...मग उगच कशाला माझ्यात अडकून तुमचा यळ वाया घालवताय...स्वप्नाली चांगली, शिकलेली पोरगी हाय... मला माझी स्वप्न पूर्ण करू द्या तुमी तुमच्या माणसंच एका..." क्रांती
"मग तुमी कोण ? अन तुमचा नकार असताना तुमच्याशी साखरपुडा केला, दोन महिने थांबून तुमच्या होकाराची वाट बघत थांबणार व्हतो.. तुम्ही नाय म्हणा क्रांती... तुमच्या डोळ्यात मला जे दिसतंय ते प्रेम हाय फकस्त तुम्ही उघडपणे कबुल करत न्हाय एवढंच... मनात ठवताय... असुद्या मी माझा निर्णय घीन तुमी नका सांगू... पण इतकंच सांगतो तुमच्या शिवाय मी कुणाशीच लग्न करणार न्हाय." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हलकेच केस कानामागे केले. त्याने दिलेले कानातले झुमके तिने घातले होते. तो बराच वेळ तिच्या त्या हलणाऱ्या झूमक्यांकडे बघत होता. त्याला कळत नव्हतं
"एकीकडे ही स्वप्ना बरोबर लग्न कर म्हणतीये आणि मी दिलेले झुमके घालून तीच प्रेम हाय हे सुद्धा सांगती. तुमास्नी नक्की काय सिद्ध करायचंय की तुमच्या पर्वम झुरत बसू का???" वीर गाडीमधून खाली उतरला आणि आणि पुढं जाऊन गाडीला टेकून उभा राहिला. क्रांती गाडीमधून खाली उतरले आणि त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
"मला काय पण सिद्ध न्हाय जारायच जे माझ्या डोळ्यात दिसतंय ते खर हाय... पण ते आता शक्य न्हाय..." क्रांती
"मी असताना शक्य न्हाय... हे पण तुमचं तुमचं ठरवलं... ठीक हाय... चला बस गाडीत घरी सोडतो." वीर निघायला लागला तोच क्रांतीने त्याचा हात घट्ट धरला. वीर थांबला. त्याने मागे वळून क्रांतिकडे बघितलं तिच्या टपोऱ्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवेना.
"नको हो क्रांती... अश्या नका पेचात राहू अन मला पण पेचात पाडू..." क्रांती त्याने काही बोलायच्या आत त्याला जाऊन बिलगली. वीरने तिला कवटाळले. दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत शांत विसावले होते. दोघांनी भावनांना वाटा मोकळ्या करून दिल्या होत्या. वीरने तिला बाजूला केले.
"चला माझं उत्तर मला भेटलं..." वीर हसला.
"मी हा कुठं म्हंटल..." क्रांती लाजून म्हणाली.
"आता तोंडानं न्हाय म्हणाला तरी चालल..." वीरन क्रांतीचा हात हातात घट्ट पकडला. क्रांतीने त्याच्या हातावर पुन्हा तिचा हात ठेवला.
"वीर आता आयुष्य एकत्र काढायच ठरवलंय ना आता मग माग नाय हटायच... दादा पण आपल्या बरोबर हायत.." क्रांती वीरच्या डोळ्यात बघत बोलली.
"व्हय... मला मग कुणीतरी का म्हणलं लग्न करा स्वप्ना बर... चला मला निघायला पाहिजेत स्वप्ना अली असलं घरी.. तिला हो म्हणायला पाहिजे ना..." वीरने क्रांतीला चिडवलं.
क्रांतीने त्याचा हात पटकन सोडला.
"इतकं कळत न्हाय का तुम्हाला भावना..." क्रांती
"तुम्ही तर मला सोडून निघाला साखरपुड्याच्या समद्या वस्तू परत पाठवल्या." वीर
"हम्ममम पण कानातल सोडून..." क्रांती हसली.
"म्हणूनच तर आलो न तुमच्याकडं, तुमच्याशिवाय चैन न्हाय मला... लग्न मोडलं हे आबांनी सांगितलं तवा पहिला तुमचा चेहरा डोळ्यापुढ आला. काय बोलावं? रडावं, ओरडाव का इरोध करावा मला कायच समजत न्हवत... आज एक गोष्ट सांगतो. खर्च मी फक्त बदला म्हणून लग्न करायचा इचार केला व्हता पण तुमचा खेळावरचा प्रामाणिक पणा अन धडपड बघून मी दिसवसेनदिवस तुमच्यावर जास्त प्रेम करायला लागलो. क्रांती तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा. लग्न झालं म्हण आपण आपलं स्वप्न बघायची नायत का? आता आबांच्या मतान वागलो तर आपलं आयुष्य थांबलं. माझं न्हाय म्हणता येणार पण तुमचं नक्कीच थांबलं तवा आत्ताच इरोध केला तर ठीक न्हायतर संपलं.. प्रेम सगळं शिकवत. हे आत्ता कळतंय. आणि हो आपण जायचं बर पर्वा एकत्र मुंबईला... अन राडा करायचा."
वीर मनापासन बोलत व्हता. क्रांती शांतपणे ऐकत होती.
"पण मला आत्ता आत्ता पर्यंत तुमी आवडत नव्हता. कारण मी बोलत नव्हते ना तुमच्याशी... स्वभाव कळला नि..." क्रांती बोलायची थांबली.
"आन..." वीर
"काई नाय..." क्रांती
"नका सांगू...पण जवा म्हणाल तो दिस माझ्यासाठी लय खास असलं बघा..." वीर
"निघायचं का? ... तुमची वाट बघत असल कुणीतरी.." क्रांती
"व्हय ते हायचं... चला" वीर हसला वीरने गाडीचा दरवाजा उघडला. क्रांती आत बसली न मग वीर.
"क्रांती गावात आबांच्या शब्दाला मान हाय... म्हातारं, तरण, लहान पोरग सुदा त्यांचा शब्दाला मान देत्यात. मला तुमच्याशी लग्न करायचं म्हंटल अन त्यांनी लगीच तुमाला मागणी घातली. आज वाटत असलं का त्यांना की त्यांनी माझं मन दुखवलंय. त्यांचा पाहिजे तो मुलगा म्हणून एकेक शब्द पाळलाय. मी सूदा अन दादान सुदा... तो तर एका शब्दानं उलट बोलत न्हाय. पण मी न्हाय अस हुन देणार माझ्या मनात तुम्ही हाय हे त्यांना पटवून देणार अन तुमच्याबर लाग करणार..." वीर म्हणाला.
" पण त्यांना दुखवून आपण लग्न न्हाय करायचं त्यांच्या आशीर्वादान आपलं लग्न व्हायला पायीजे..." क्रांती.
"हे आता श्यक्य व्हईल अस वाटत न्हाय..." वीर
"आपण मिळुन करू शक्य..." क्रांतीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. वीरने तिचा हात परत हातात घेतला.
"माझी निवड चुकीची असूच शकत न्हाय.." क्रांतीला तिच्यावर वीरचा बसलेला विश्वास बघून बरं वाटलं.
वीर घरी पोहचला तेंव्हा सगळे घरात बसले व्हते.
संग्राम, तेजश्री, सुलोचना, आबा, आत्या, मामा, स्वप्नाली, ऋषी... ह्या गंभीर विषयावर त्यांची चर्चा सुरू असतानाच वीर आलेला बघून सगळे शांत झाले.
"करायची ना लग्नाची तयारी..." आत्या म्हणाली.
"व्हय... करू की..." वीर म्हणाला.
"हाय त्याच तारखेला व्हईल लग्न... मला ठाव हाय वीर माझ्या शब्दभायर नाय..." आबा आनंदाने म्हणाले.
क्रमशः
भाग्यशाली राऊत.