Bhanumati a Ylgar in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | भानुमती एक यल्गार

Featured Books
Categories
Share

भानुमती एक यल्गार

मनोगत

भानुमती एक यल्गार ही कादंबरी वाचकांसमोर ठेवतांना मला नेहमीसारखाच एक आनंद आहे. भानुमती ही एक सामान्य स्री. परंतू तिचे विचार उच्च होते.
भानुमतीवर एकप्रकारे अत्याचारच झाला होता विचारस्वातंत्र्याचा. तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला तो दुर्योधनानं. तिची दुर्योधनाशी विवाह करण्याची इच्छा नसतांनाही तिला नाईलाजानं दुर्योधनाशी विवाह करावा लागला व पती पसंत नसतांनाही आयुष्यभर त्याचेसोबत राहावं लागलं. हे दुःखच होतं तिच्या जीवनात आलेलं.
भानुमती जेव्हा दुर्योधनाला समजंवायची की त्यानं पाच गावं देवून द्यावी पांडवांना. तेव्हा को तिचं ऐकायचा नाही. तो तसे वागत असतांना तेही दुःखच वाटायचं तिला आणि जेव्हा तो मरण पावला अकाली. तेही दुःखच होतं तिच्या वाट्याला आलेलं. तरीही तिनं कुणबा जोडला.
हा कुणबा नेमका कोण? तिचं शेवटी काय झालं? तिनं कुणबा कसा जोडला? याच काहीशा तथ्यांशावर आधारीत ही माझी ऐतिहासीक पुस्तक आहे. यापुर्वी मी ब-याच ऐतिहासीक पुस्तका लिहिल्या आहेत. गोविंदा गोपाळ गायकवाड, राजा दाहीर, बाप्पा रावळ, उर्मीला, शांता, सुजाता व मृत्यूदंड. त्यापैकी ही एक आहे. आपण वाचावी व आनंद मिळवावा. तसेच एक फोन मला स्फुर्ती म्हणून अवश्य करावा ही विनंती.
आपला
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०





भानुमती एक यल्गार (कादंबरी)
अंकुश शिंगाडे

ती खुप सुंदर होती. द्रोपदीपेक्षाही. तसा तिला आपल्या सौंदर्याचा गर्वही होताच. वाटत होतं तिला की तिला खूप शूरवीर पती मिळावा. ज्यानं आपल्यावर निरतिशय प्रेम करावं नव्हे तर ज्याचा तिन्ही लोकांत झेंडा असावा.
ती सुंदर असल्यानं तिला तसं स्वप्न पाहणं साहजीकच होतं. तसा तिला तो पती मिळालाही असता. कारण पुर्वीपासूनच सौंदर्याला प्रथम स्थान देण्याची प्रथा होतीच.
पुर्वी मुलींचे विवाह करतांना स्वयंवरही होत असत. स्वयंवरात मुलींना इच्छीत वर शोधून त्याच्या गळ्यात वरमाला घालायची परवानगी होती. त्यातच कोणीतरी शूरवीर येई व आपल्या बलसामर्थ्यानं स्वयंवरात सर्व योद्ध्यांना आव्हान करीत असे आणि सर्व राजांचा पराभव केल्यावर त्या कन्येचं अपहरण करुन नेत असे. तेव्हा मात्र कन्यांना विचार येई. कारण मनायोग्य पती त्यांना मिळत नसे.
स्रियांचं मुळातच असं कुजबुजलेलं जीवन. पुर्वीपासूनच त्यांना कोणीही प्राथमीक स्थानच दिलं नाही. फक्त तिच्या सौंदर्याचाच ते उपभोग घेत गेलेत. बदल्यात त्यांना काहीही दिलेलं नाही. म्हणतात की त्याही काळात स्रिया विद्वान होवून गेल्या. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. शास्रार्थ केला. शेजारच्या राज्यांना हारवलं नव्हे तर आपली अब्रू जावू नये म्हणून त्यांनी स्वतः इच्छा नसतांना सतीप्रथा अवलंबली. परंतू त्या दुस-या राजांच्या वासनेच्या बळी ठरल्या नाहीत. बदल्यात काय मिळालं त्यांना. काहीच नाही. उलट आमचे राजे ती जीवंत असतांनाच तिच्यासमोर तिची सवत उभी करत. एका एका राजांना कित्येक पत्नी असायच्या त्या काळात आणि त्या स्रिया ते सगळं नाईलाजानं सहन करायच्या. कारण मायबापाचे संस्कार.
मुलगी जन्माला विरोध करणारी परंपरा पुर्वीपासूनच चालत आलेली असून आजही मुलगी झाल्यास आनंदोत्सव साजरा केला जात नाही. मुलगा जन्माला आल्यास लोकांना एवढा आनंद होतो की त्यांना वाटते या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नाही. सर्वात जास्त तर मुलगा जन्माचा आनंद वयोवृद्ध महिलांनाच होतो पुरुषांपेक्षा. त्या महिला असूनही. तरीही महिलांनी आपआपल्या काळात रणांगणावरही पुरुषार्थ गाजवला आहे अर्थात पराक्रम केला आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजारामाची पत्नी ताराबाई, शिवरायांच्या मातोश्री जीजाबाई, अहिल्याबाई होळकर, रजिया सुलताना इत्यादी स्रिया रणांगणावरही लढल्या. तसेच सीता, उर्मीला, मंदोदरी, द्रोपदी, कुंती याही स्रियांनी त्यांचे पती असलेल्या पुरुषांना सोबतच केलेली आहे. आज अशी कितीतरी स्रियांची उदाहरणे आहेत की ज्या स्रियांनी आपल्या पुरुषांना मदत केली आणि अशा कितीतरी स्रिया इतिहासात होवून गेल्या की ज्या स्रियांची नावंही आपल्याला माहित नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की ज्यावेळी या स्रियांचे पती रणांगणांवर मरण पावले आणि त्यांच्या स्रियांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या गेला, तेव्हा या स्रियांनी जोहार करीत स्वतःला संपवलं. तेही संबंध राज्यातील स्रियांसह. त्यात विरांगणा राणी पदमावती व राणी संयोगीताचा समावेश आहे. आज ब-याच जणांना इतिहासाची एवढी भूरळ पडली आहे की त्यांना महाराणी पदमावती आणि महाराणी संयोगीताच आठवत नाही. त्या कोण होत्या? कोणाच्या राण्या होत्या हेही आठवत नाही. एवढंच नाही तर येथील राजांना ठार केल्यानंतर विदेशी मंडळींनी (मोहम्मद बिन कासीम) या देशातील राजा दाहिरच्या मुलींना बगदादला नेलं. तेथील खलिफाला बक्षीस द्यायला. जेणेकरुन त्यांच्याशी खलिफाला विवाह करता यावा व एक दिवसाच्या अंथरुणाची सोय व्हावी यासाठी. तेव्हा ते अंथरुण स्विकार नसलेल्या राजा दाहिरच्या मुलींचं बलिदान आज व्यर्थ गेल्यासारखं वाटतं. आज सिंध प्रांत टिकविण्यासाठी राजा दाहीर लढला मोहम्मद बिन कासीमशी. पराभवात मारला गेला मोहम्मद बिन कासीमकडून. त्यानंतर मोहम्मद बिन कासीमनं त्याच्या मुली सुर्यादेवी उर्फ सुलेखा व प्रेमादेवी यांना खलिफासाठी पाठवलं होतं. परंतू त्या दोन्ही मुली खलिफाच्या हाती लागल्याच नाही. उलट त्यांनी युक्तीनं मोहम्मद बिन कासीमला तर ठार केलंच. व्यतिरीक्त खलिफालाही आणि स्वतःचं आत्मबलिदान केलं. परंतू आजच्या पिढीला माहीत नाही.
महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना राजा दाहीरच माहीत नाही. त्या लोकांना प्रेमादेवी व सुर्यादेवी कोण हे कसं माहीत असणार.

************************************************

भानुमती..........एक महिलाच. तिनंही त्याग केला आपल्या आनंदाचा. परंतू काय मिळालं तिला. तिच्याकडं दुर्लक्षच करण्यात आलं. पारिवारीक दुर्लक्ष तर झालंच. एरवी समाजाचंही दुर्लक्ष झालं.
कोण होती ही भानुमती? कोणता त्याग केला होता तिनं? समाजानं का दुर्लक्ष केलं तिच्यावर? वैगेरे प्रश्न आज अनुत्तरीत आहेत आजही. आजही कुंती, द्रोपदी, गांधारी या सर्व महाभारतील पात्रांना ओळखलं जातं. परंतू भानुमतीची पाहिजे तेवढी ओळख कोणाला नाही.
भानुमती......... एक यल्गार होती ती भविष्याचा. ती सुंदर होती. सुडौल होती. आपल्या सुंदरतेचा गर्वही होता तिला. अन् का नसणार नाही.
भानुमतीचं बालपण अगदी सुखात गेलं होतं. त्यातच भानुमती लाडाची मुलगी होती घरी. तिचा जन्म राजप्रासादात झाला होता.
ती कम्भोजचा राजा चंद्रवर्माची मुलगी असून ती लहानपणापासूनच हुशार होती. तिचा जन्म राजप्रासादात झाल्यानं तिला घरी काहीही कमी नव्हतं. त्यातच तिच्या वडीलानं तिला शस्रापाठोपाठ कुस्तीचंही शिक्षण दिलं होतं.
तलवारबाजी यायची तिला. ती अगदी त्यात निष्णांत झाली होती. त्यातच तिला बाण चालविण्याचंही कसब माहीत झालं होतं. कुस्तीमध्ये तर ती माहीरच होती. परंतू तिच्या वडीलानं तिच्यामध्ये संस्कार कूटकूट भरले होते.
ते बालपण. तसं तिचं बालपण रम्य होतं. त्यातच तिला विचार यायचे की आपल्याला जर शस्रविद्या आली तर ही विद्या उद्या वेळप्रसंगी कामात येईल. म्हणून तिही अस्रशस्र विद्या शिकत होती.
भानुमतिची एक जीवलग मैत्रीण होती. ती मैत्रीण तिच्यावर अगदी जीव लावायची. तशी भानुमतिही तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. तिचं नाव सुप्रिया होतं.
सुप्रियाशी लहानाचं मोठं होत असतांना तिचं बालपण केव्हा संपलं. तेही तिला कळलंच नाही. तशी ती तरुण झाली.
सुप्रिया.........तिची बालपणची मैत्रीण असून तिच्याशी ती तासन् तास बोलत असे नव्हे तर संवाद करीत असे. आज तिनं अशाच संवादात तरुणपण गाठलं होतं.
ते तरुणपणही रम्यच होतं. तसं त्या काळात स्रियांचे विवाह हे स्वतःच्या मर्जीनं होत असत. याचाच अर्थ असा की असे विवाह हे होतांना त्या कन्येच्या आई वा वडीलांची इच्छा चालत नसे. तिनंं जर विचार केला की मी अमूक व्यक्तीशी विवाह करेल. तर तिला करता येत होतं.
अलीकडे विवाहाचं स्वरुप बदललेलं असून लोकांचा कल प्रेमविवाहाकडे जास्त आहे. त्यातच मुली त्या मुलांची परीक्षा न घेता सरसकट विवाह करतात व फसतात. यापेक्षा मायबापाच्या मर्जीनं विवाह केलेला बरा आणि तसा जर विवाह करायचा नसेल तर प्रेमविवाह करण्यापुर्वी आपल्या जोडीदाराची कठोर परीक्षा घ्या. स्वयंवरात पुर्वी घेतली जात होती तशी. तेव्हाच तो जोडीदार निवडा. म्हणजे तो जोडीदार तुमच्या जीवनाच्या कसोटीच्या परीक्षेतही पास होईल व तुम्हाला जीवनात पदोपदी साथ देईल.
त्या पद्धतीला स्वयंवर पद्धत म्हणत. स्वयंवर पद्धतीत मुलीला पाहायला जागोजागचे वीर पुरुष यायचे. त्यातच स्रीपक्ष स्पर्धा लावायचे की जो कोणी राजकुमार त्या स्पर्धेत पास होईल. त्याला ती वधू वरमाला घालून त्याचा पती म्हणून स्विकार करेल. तसं पाहता स्रिला स्वतःचा पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. परंतू कधीकधी तिची फसगतही होत असे असा पती निवडतांना. कारण असा वीर स्पर्धा परीक्षा तर पास होत असे. परंतू तो तिला आवडेलच असा नसायचा.
स्वयंवर विवाहाची पद्धत. गावोगावची राजे मंडळी यायची या विवाहात. ते वीर असायचे. तसेच ते आपआपल्या श्रेत्रात अगदी पारंगत असायचे. ते कसब दाखवायचे आपआपल्या श्रेत्रात. त्यातच जो पराक्रमी ठरला. त्याच्या गळ्यात त्या मुलीला वरमाला घालावी लागायची.
स्वयंवर पद्धत ही स्रिच्या जीवनाची एक अग्नीपरीक्षाच होती. तशीच ती पुरूषांच्या जीवनाचीही एक अग्नीपरीक्षाच. कारण ब-याचशा स्वयंवरात स्री ताब्यात घेण्यावरुन भांडणंही होत. ती मुलगी जर त्या राजाला आवडली आणि तिनं भलत्याच्या गळ्यात वरमाला घालण्याचा प्रयत्न केलाच तर युद्ध होत. या युद्धात जीवही जाण्याची भीती असायची. तो राजा इतर राजांशी भांडणं करुन वधू बळजबरीनं ताब्यात घेत असे आणि नंतर विवाह करीत असत बळजबरीनं. भिष्म पितामहानंही जेव्हा अंबा, अंबिका व अंबालिकाला जिंकलं. तेव्हा त्याला त्यातील एक स्री म्हणाली की माझ्याशी जर तुमची विवाह करण्याची इच्छा नव्हती तर तुम्ही स्पर्धेत मला जिंकलेच कसे? माझ्याशी विवाह करा. त्यावर भिष्मानं नकार देताच ती म्हणाली की मीच तुमच्या मृत्यूचे कारण बनेल. त्यानुसार म्हटलं जातं की हीच स्री पुढे श्रीखंडी बनून अर्जून रथावर आरुढ झाली व त्यानुसार अर्जुनाला भिष्माला घायाळ करता आलं.
स्वयंवर अशी पद्धती होती विवाहाची की त्यात एक परीक्षा असे. आज जसे परीक्षेचे पेपर सोडवितात तसे. त्यानुसार त्या परीक्षेत शूरवीर राजकुमारांना भाग घेवून त्या परीक्षेत पास व्हावं लागायचं. जसे द्रोपदी स्वयंवराचे वेळी खाली उकळत्या तेलात पाहून वर लटकलेल्या व फिरत्या तबकडीतील माशांचा डोळा फोडणे ही परीक्षा होती. तसेच सीता स्वयंवराच्या वेळी सीतेला मिळविण्यासाठी शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा चढविण्याची परीक्षा होती. तसेच तो तोडण्याचीही. त्यानुसार वधूला वर व वराला वधू मिळत असे.
पुर्वीही स्वयंवर विवाहाच्या दोन पद्धती होत्या. एक म्हणजे अशा स्वयंवरात परीक्षा असायची की ज्या परीक्षेत वीर पुरुष भाग घेवून तो ती परीक्षा पास करीत असे. त्यातच जो जिंकला. त्याच्याशी ती मुलगी विवाह करीत असे. दुसरी पद्धत म्हणजे वीर पुरुष रांगेत उभे राहात व ती वधू वरमाला घेवून त्या रांगेनं चालत असे. त्यातच राजभाट वीर पुरुषांचं एकएक करीत वर्णन सांगायचा आणि त्या नववधूला तो जर वीर पुरुष नाही आवडला तर ती पुढे सरकायची. जसा श्रीकृष्ण विवाह.
आजही विवाहाच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे प्रेमविवाह व दुसरा मायबापानं करुन दिलेला विवाह. पुर्वी स्वयंवरात मायबापाची मर्जी चालायची नाही.
आताही स्वयंवर होतातच. फक्त त्याचं नाव बदललं आहे. त्यालाच आता प्रेमविवाह नाव आलेलं असून त्याला प्रेमविवाहाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. पुर्वीही स्वयंवरात मुली फसायच्या. कारण ते त्यांचं प्रारब्ध असायचं. जसं द्रोपदी आणि सीतेचं झालं. काही स्वयंवरं चांगले निघाले. जसे रुख्मीनीचे स्वयंवर. आताच्याही स्वयंवरासारख्याच असणा-या प्रेमविवाहात तेच आहे. आताच्या विवाहात मायबापाची मर्जी चालत नाही. त्यातच काही मुली इच्छीत तरुणांच्या जाळ्यात अडकून त्याच्याशी विवाह करतात आणि फसतात. हा स्वयंवराचा दुसरा प्रकार झाला. परंतू पहिल्या स्वयंवराच्या प्रकारात मुली जशा मुलांच्या परीक्षा घ्यायच्या व काही अपवाद जर सोडले तर फसायच्या नाहीत. तशाच परीक्षा आजही घेण्याची गरज आहे. आज मुलींना प्रेमविवाह करायला कोणीही रोखत नाही. कारण तो त्यांच्या मर्जीचा विवाह झाला. त्या भरपूर शिकत असल्यामुळं त्या आपल्या आवडीचा जोडीदार निवडतात. तसं निवडणं फारच चांगली गोष्ट आहे. परंतू ते त्या मुलींनी सहजपणे निवडू नये. अशी मुलं निवडत असतांना त्यांची परीक्षा घ्यावी. स्वयंवरात घेतली जात होती तशी. त्यानुसारच तो वीर पुरुष जसा चांगल्या स्वभावाचा निघायचा. तसाच आजचा राजकुमारही तशी परीक्षा घेतल्यास चांगला निघू शकतो. हे तेवढंच खरं आहे. बाकी आपलं आपलं भाग्य आहे. ज्याला आपण नशीब म्हणतो. जे नशीब आपल्याला पाहता येत नाही.
महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रेमविवाह करा. तो करायला मनाई नाही. परंतू तो विवाह करतांना पुरुषांची आपल्या मनमर्जीनं अशी परीक्षा घ्या आणि तपासून पाहा की तो विवाहयोग्य उमेदवार तुमच्या जीवनाच्या कसोटीत किती योग्यतेचा ठरेल. मगच विवाह करा. नाहीतर आपल्या आईवडीलांच्याच मर्जीनं विवाह केलेला बरा.
भानुमती तरुण झाली होती. त्याचबरोबर सुप्रियाही. तशी ती एकदा सुप्रियाला म्हणाली,
"अगं, हे तारुण्याचं वय. या वयात एखादा राजकुमार यावा व आपल्या अंगाला हळूच स्पर्श करुन जावा असं तुला वाटत का?"
"होय, मलाही तसंच वाटंतंय. परंतू राजकुमारी साहेबा, आमच्या नशिबात कसलं आलं असं सूख. आम्ही काही राजकुमारी नाही की तसा एखादा राजकुमार येईल व आम्हाला स्पर्श करुन जाईल."
"म्हणजे? स्पर्श करायलाही राजकुमारी व्हावं लागतं?"
"होय राजकुमारीजी. राजकुमारीच व्हावं लागतं. नाहीतर लोकं नाव बोटं ठेवतात. म्हणतात की अमूक मुलीनं असं केलं. तमूक मुलीनं असं केलं. आपण राजकुमारी आहात. आपलं खपूनही जाईल एखाद्या वेळी. परंतू आमचं तसं खपणार नाही. कारण आम्ही सामान्य माणसं."
"हं, तुझंही म्हणणं बरोबरच तर."
"राजकुमारीजी एक प्रश्न विचारु का?"
"प्रश्न! विचार विचार प्रश्न. परंतू सुप्रिया कोणता प्रश्न विचारतेय तू?"
"आधी ऐकून तर घ्या राजकुमारीजी."
"विचार. एक नाही हजार प्रश्न विचार. ही भानुमती तयार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला. विचार प्रश्न."
"राजकुमारीजी......." ती बोलायचं थांबताच भानुमती बोलली.
"सखे का थांबली? विचार ना प्रश्न? कोणता प्रश्न आहे तुझ्या मनात तो?"
"अगं एखाद्या राजकुमारानंं तुमच्या मनाची जागा घेतली की काय?"
"इश्यं. काय बोलतोस सुप्रिया. मी आणि तशी."
"क्षमा असावी राजकुमारीजी. परंतू आपल्या चेह-यावरुन खरंच असंच जाणवतेय."
"म्हणजे? माझा चेहरा तुला वाचता येतोय तर......."
"होय. चेहरा वाचता येतो तुमचा आणि हेही वाचता येतं की तो राजकुमार कोण?"
"मग सांगच तू सुप्रिया की तो राजकुमार कोण ते?"
"सांगू."
"होय, सांग. परंतू एक अट आहे."
"कोणती अट आहे?"
"मला तुमच्याबरोबर न्यावं लागेल. बोला न्याल काय?"
"नेईल नेईल. आता तर बोल सुप्रिया."
"नाही. अशी अट मंजूर होत नाही. तू माझ्या हाताला चिमटा घे आणि तुझ्या हातालाही चिमटा घेवू दे. म्हणजे तू जर वचन मोडलंच तर हा चिमटा तुला या वचनाची पदोपदी आठवण देईल."
"बरं बरं, घेतेय चिमटा."
भानुमतीनं सुप्रियाला चिमटा घेतला व तिलाही आपला चिमटा घ्यायला लावला. तशी ती म्हणाली,
"सुप्रिया आतातरी सांग की तो राजकुमार कोणता की जो माझ्या मनात भरला."
भानुमतीचा तो प्रश्न. तशी सुप्रिया सांगू लागली.
"तो राजबिंडा. ज्याच्या हातात धनुष्यबाण अगदी शोभून दिसतो. जो बाणेदार दिसतो. ज्याला चार भाऊ आहेत. ज्याचा एकच भाऊ महापराक्रमी असून त्याला हजार हत्तीची ताकत आहे आणि ज्याला सर्वश्रेष्ठ म्हणून जगात ओळखलं जातं."
"म्हणजे? मी नाही समजले गं सुप्रिया. जरा खुलवून सांगशील."
"होय राजकुमारी साहेबा. तुम्ही किती भोळ्या आहात. मला नाही वाटत की तुम्ही आपल्या पतीला आपल्या ताब्यात घ्याल. मला नाही वाटत की तुमचा पती तुमच्या मनानं चालेल."
"अगं, पण तो आहे तरी कोण? लवकर सांग ना. अशी उतावीळ का करतेय. सांग लवकर. लवकर सांग."
"तो राजकुमार दुसरा तिसरा कोणीही नसून हस्तिनापूरचा युवराज अर्जून आहे. होय ना."
अर्जून........अर्जूनचे नाव ऐकताच भानुमती लाजली. तशी ती म्हणाली,
"इश्यं. परंतू सुप्रिया. तू हे कसं ओळखलंस. होय, तू ओळखलं ते अगदी बरोबर आहे. परंतू मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटते की तू हे ओळखलं कसं?"
"मी ओळखलं ना की तुमच्या मनात कोण आहे ते. परंतू एक विचारु राजकुमारीजी. आपल्याला अर्जून खरंच आवडतो का?"
"होय. अगदी शंभर टक्के मला अर्जून आवडतो."
"का? असं काय आहे त्यांच्यात?"
"ते देखणे आहेत. शिवाय जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेत. त्यांच्या जोडीचा या जगात दुसरा धनुर्धारी कोणीच नाही."
"कोणीच नाही! असं कसं बोलता राजकुमारीजी. अहो, या जगात दुसरा निपूण धनुर्धारी कर्ण देखील आहे. माहिती आहे राजकुमारीजी, ज्यावेळी गुरु द्रोणाचार्यनं सर्व राजकुमारांची परिक्षा घेतली. तेव्हा अर्जूनापेक्षा कर्णच श्रेष्ठ ठरला होता आणि आपण म्हणताय की अर्जून श्रेष्ठ."
"अगं, ते सगळं जावू दे. मला अर्जून आवडतो ना. मग बाकीच्या गोष्टीची का लेनदेन आहे तुला. अन् तुला काय करायचं आहे त्याचं. प्रश्न माझा आहे. मला आवडतो ना. मग तर झालं."
भानुमतीनं सुप्रियाला म्हटलं. तशी सुप्रिया गप्प झाली. तिला थोडासा भानुमतीचा राग आला. परंतू राग मनावर आणि चेह-यावर दिसू न देता ती म्हणाली,
"राजकुमारीजी, आपण जावूया का घरी. बराच वेळ झालाय."
सुप्रियानं तसं म्हणताच भानुमती भानावर आली. तिनं भानावर येताच इकडंतिकडं पाहिलं. तसा आजुबाजुला अंधार पडलेला होता. तशा त्या उठल्या व आपल्या राजमहालाचा रस्ता चालू लागल्या. थोड्याच वेळात राजमहाल आला.

****************************************

ती रात्रीची वेळ होती. बाहेर चंद्राचा शीतल प्रकाश पडलेला होता. तसा अंधारच होता. परंतू जास्त अंधार नव्हता. तशी पौर्णिमा नसल्यानं काळोख दिसत नव्हता. जेवन खावण झालं होतं आणि भानुमती अंथरुणावर पहूडली होती. तसा तिला विचारही येत होता.
भानुमती अंथरुणावर पहूडली. तसा तिला विचार आला की माझ्या मनातील अर्जून सुप्रियानं ओळखला कसा? का? अर्जून तिच्या स्वप्नात आला की काय? परंतू जावू दे. अर्जून छान आहे दिसायला. मध्यम बांध्याचा आहे. शिवाय त्याला पूर्ण धनुर्विद्या अवगत आहेत. तो आपलंच नाही तर आपल्या पत्नीचंही शत्रूंकडून रक्षण करु शकतो. त्यानं कित्येक राक्षसांना ठार केलेले आहे. एवढंच नाही तर त्याला क्रिष्ण वेळोवेळी मदत करीत असून क्रिष्णाचा तो सोबतीच आहे. असा पती जर लाभला तर जीवनाचं भाग्यच बदलणार असं मला वाटते. हे जीवन जणू त्याच्याचसाठी निर्माण झालं की काय?
भानुमतीचा तो विचार. तसं तिला वाटायला लागलं की तो अर्जून.......तो अर्जून कसा मिळणार. ती त्याबाबत विचार करु लागली. तसं क्षणात तिला सुप्रियाची आठवण आली. सुप्रिया......जी माझ्या मनातील युवराज ओळखू शकते. तीच माझ्या मनातील हा राजकुमार कसा मिळवता येईल तेही सांगेलच.
भानुमतीनं तसा विचार केला. तिला विचार करता करता झोपही येत नव्हती. तिच्या मनात आता अर्जूनाचं स्फुर्लीग फुटलं होतं आणि त्यावर उपाय म्हणून तिनं सुप्रियाची मदत घेण्याचा विचार तिनं केला होता. त्यामुळं आता रात्र केव्हा केव्हा जाते व दिवस केव्हा केव्हा निघतो असं होवून गेलं होतं. ती सारखी कुश बदलवीत होती. अशातच पहाट झाली व तिला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही.
सकाळ झाली होती. तसे सकाळचे नऊ वाजले होते. राजमहालातील सर्वजण उठले. परंतू भानुमती काही उठली नव्हती. तशी ती आईवडीलांची लाडाची मुलगी असल्यानं तिला कोणी उठवलंही नव्हतं.
सकाळचे नऊ वाजले होते. परंतू सुर्य अजून राजमहालात पोहोचला नव्हता. तशी ती उठली. तसं तिला कळलं की तिला उठायला बराच वेळ झाला. तशी तिला सुप्रियाची आठवण झाली. त्याचबरोबर ते रात्रीचे विचार आठवले. आपल्याला सुप्रियाला विचारायचंय की हा माझ्या मनातील अर्जून मला कसा मिळवता येणार. ती अंथरुणातून उठली व अंथरुणाच्या बाहेर झाली. तिनं लवकरच प्रातःविधी आटोपवला व ती लवकरच सुप्रियाला भेटायला निघाली. लवकरच ती सुप्रियाच्या घरी पोहोचली.
सुप्रिया.....तिची जीवलग मैत्रीण. ती गरीब होती. परंतू ती जीवापाड प्रेम करीत होती भानुमतीवर आणि भानुमतीही सुप्रियाला चाहतच होती. दोघींची मैत्री अगदी घट्ट होती.
भानुमती जेव्हा सुप्रियाच्या घरी पोहोचली. तेव्हा तिनं तिला विचारलं. तशी सुप्रियाला घरातच पाहून ती आनंदीत झाली. तशी सुप्रिया म्हणाली,
"का गं, आज सुर्य कोणीकडून निघालाय?"
"म्हणजे?"
"मी म्हटलं की आज एवढ्या लवकर कशी काय आली? काही काम वैगेरे आहे का?"
"नाही गं. अशीच आली. मला तुझी आठवण आलीय ना."
"हो का? आजपर्यंत तर येत नव्हती अशी आठवण. अन् आजच कशी काय? हं आठवलं. काल मी त्या अर्जूनाबद्दल बोलली होती. म्हणून आली की काय गोष्टी करायला."
"इश्यं. तू ना."
काही वेळ असाच गेला. दोघीही अगदी गप्प होत्या. तशी सुप्रिया म्हणाली,
"का गं, तूला त्या अर्जुनापेक्षा तो दुर्योधन का नाही आवडत? तोही तर शूर आहे. तोही तर सर्वश्रेष्ठ गदाधारी आहे. शिवाय हस्तीनापूरच्या राजघराण्याचा होणारा वारस आहे तो."
"हट् गं. कोणाचं नाव काढलं. तो अर्जूनाची बरोबरी तरी करु शकतो का? तो तर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचीही बरोबरी करु शकत नाही. तो कसला शूरवीर? अन् कसला गदाधारी? माहीत आहे तुला. त्याचा जेव्हा जन्म झाला होता. तेव्हा त्याचं ओरडणं एका गर्दभासारखं होतं. तेव्हा राजज्योतिषानं म्हटलं होतं की याचा त्याग करा. नाहीतर हा कुलनाशक ठरेल. कदाचित ती भविष्यवाणी खरी होते की काय?"
"हं तू ना. अगं, असं म्हणू नकोस. नशीब काही कुणाला सांगून येत नाही. हं, एक सांगू. ज्या गोष्टीला तू नकार देतेस ना. कदाचीत तीच गोष्ट तुझ्या नशिबात घडली तर........"
"म्हणजे?"
"अगं, तुला पती म्हणून तो दुर्योधनच मिळाला तर......."
"छे! तसला पती. मला नाही सहन होणार. ती कल्पनाही मी कदापिही सहन करु शकत नाही. कसला विचित्र माणूस आहे तो. हं, एक सांग की मला."
"काय सांगू?"
"एक सांग. त्या अर्जुनाला कसं मिळवता येईल ते सांग."
"ते सांगू. ते अगदी सोपं आहे."
"सोपं........सोपं म्हणजे?"
"अगं, विवाहासाठी स्वयंवर आयोजीत करायचं. स्वयंवरात येईलच तो. तेव्हा त्याच्याच गळ्यात वरमाला घालायचीय म्हणजे झालं. त्याला वरमाला घालताच तो तुझा पती ठरेल."
"आणि त्यात इतर राजपुरुषानं स्वयंवराची परिक्षा पास केली तर........."
"स्वयंवराची परिक्षा ठेवायचीच कशाला? अगं रांगेत उभे करायचे युवराजांना. मग राजज्योतिषी ओळख करुन देतात युवराजांची. तेव्हा परीचय करून देताच वरमाला घालायची. म्हणजे ज्याला आपण मनोमन पती मानले तो आपला."
"अन् तो आलाच नाही तर........."
"तर ते तुझं नशीबच. परंतू तो येईल. नक्कीच येईल तुझ्या स्वयंवराला. तो अर्जून आहे. शब्द पाळतो. दगा देत नाही कुणाला. फक्त निरोप तेवढा पाठवायचा म्हणजे झालं."
अर्जूनवर भानुमतीचं असलेलं प्रेम. ते प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. अर्जूनाला तिनं कधीच पाहिलं नव्हतं. परंतू राज्यात त्याच्या पराक्रमाच्या चर्चा कानावर येत असत. त्या चर्चा ऐकतांना बरं वाटत होतं तिला. आपल्याला पती म्हणून ती नेहमी प्रार्थना करीत असे विधात्याजवळ.
ती सुप्रियाशी बोलायची कधीकधी. चर्चाही करायची. अर्जुनाबद्दलच्या. परंतू साक्षात अर्जून मिळत नव्हता. कारण ती उपवर जरी झाली असली तरी अजून तिचं स्वयंवर योजन बाकी होतं. त्याच क्षणाची ती प्रतिक्षा करीत होती.
दिवसामागून दिवस जात होते. तसं भानुमतिचं अर्जुनावरचं प्रेम वाढत चाललं होतं. त्याच्याशी आपण विवाह केव्हा करतो आणि केव्हा नाही असं तिला होवून गेलं होतं.
ती दिवसभर विचार करायची अर्जुनाचा. तसा अर्जून तिच्या स्वप्नातही येत होता. तो स्वप्नात आल्यानंतर हळूच स्पर्श करुन जायचा. तेव्हा तिला फारच छान वाटायचं आणि वाटायचं की हा अर्जून आपल्याला केव्हा केव्हा मिळतोय.
भानुमती उपवर झाली होती. तसा तिच्या विवाहाचा प्रश्न तिच्या वडीलांना सतावू लागला. त्यामूळं की काय, त्यांनी तिचं स्वयंवर ठेवलं.
भानुमतीचं ते स्वयंवर. गावोगावी चर्चा गेली होती. तशी चर्चा दुर्योधन व कर्णाच्याही कानावर आली. तशी अर्जूनाच्याही कानावर. भानुमतिला वाटत होतं की अर्जून स्वयंवराला येईल व आपण त्याला पाहताच त्याच्या गळ्यात वरमाला टाकू. परंतू ते तिचं स्वप्न होतं. तसा स्वयंवराचा दिवस उजळला.
तो स्वयंवराचा दिवस उजळला. तसे तिच्या स्वयंवराला गावोगावची राजे मंडळी हजर झाली होती. काही वयोवृद्ध राजे होते तर काही अनेक पत्नीवाले. तसा दुर्योधन आपला परम मित्र कर्णासोबत हजर झाला होता.
भानुमतिनं अर्जुनाला पाहिलं प्रत्यक्ष नव्हतं. फक्त त्याचेबाबत ऐकलं होतं. मात्र सुप्रियानं सांगीतलं होतं की अर्जूनही तिच्या स्वयंवराला येईल.
कर्ण दुर्योधनासोबत भानुमतिच्या स्वयंवराला आला होता. अजूनपर्यंत राजज्योतिषानं राजकुमारांची ओळख करुन दिली नव्हती. त्यातच तिचं लक्ष कर्णावर गेलं व तिला वाटलं की हाच अर्जून असावा. ती त्याला पाहू लागली. अचानक त्याचेवरच प्रेम निर्माण झालं. परंतू हे प्रेम जास्त वेळ टिकलं नाही. राजज्योतिषानं त्याचा परीचय करून देताच भानुमतीचा भ्रमनिराश झाला व तिचं मन विचलीत झालं.
राजज्योतिषी एकाएकाची ओळख करून देत होता. सर्वांची ओळख झाली होती. आता स्वयंवराचे उमेदवार संपले होते. कोणीही शिल्लक नव्हते. अर्जून काही आला नव्हता स्वयंवरात. ज्याला तिनं मनोमन वरले होते. काय करावं. तसा भानुमतीला विचार आला. कोणाच्या ना कोणाच्या गळ्यात वरमाला घालायचीच. परंतू शूरवीर हवा. कोण आहे यामध्ये असा. कर्ण.........
कर्ण........कर्णाबद्दलही भानुमतिनं बरंच ऐकलं होतं. त्याच्या दानाच्या व शूरतेच्या गोष्टी प्रसिद्ध होत्या. परंतू तो सूतपुत्र होता. कशी काय त्याला वरमाला घालायची. एका राजकन्येनं त्याला वरमाला घालायची. विचार बरोबर वाटत नव्हता. परंतू आता उपाय काय? अर्जून तर आला नाही आणि आपल्याला तर शूरवीर हवा. तसा तो सूतपुत्र असला तरी अंग देशाचा राजा आहे तो. काय करावं? तो प्रश्न. शेवटी तिनं विचार केला. तसा समाज काय म्हणेल. याचाही विचार होताच तिच्या मनात. शेवटी तिनं मन पक्कं केलं. अर्जून जरी आज उपस्थीत नसेल तरी चालेल. आज आपण कर्णाच्याच गळ्यात वरमाला घालायची. निदान कर्णाच्या रुपानं मला शूरवीर पती तर मिळेल. विचारांचाच अवकाश तिनं वरमाला हातात घेतली व ती कर्णाच्या दिशेनं चालू लागली.
कर्ण दुर्योधनाच्या व दुःशासनाच्या रांगेत उभा होता. तशी रांग सुरु झाली. राजभाट वर्णन करु लागला एकेका राजांचा व भानुमती एकेक राजे सोडत सरकू लागली पुढे.
संस्कार..... भानुमतिला तिच्या वडीलांनी चांगले संस्कार दिले होते. त्यानुसार ती वागत होती. आज ती ते सारे करीत होती. अदबीनं वागत होती.
ती स्वयंवराच्या पात्र युवराजांची रांग. त्या रांगेत दुर्योधनही होता. तो काही भानुमतिला आवडत नव्हताच. तशी भानुमती एकेक उमेदवार सोडत चालली होती. तसा दुर्योधनाचा क्रमांक आला.
भानुमतिनं एक कटाक्ष दुर्योधनाकडे टाकला. तशी भानुमतिची नजर दुर्योधनाच्या नजरेस मिळाली. त्याचबरोबर त्याचीही नजर तिच्या नजरेस मिळाली. परंतू नजरेचं एकमत झालं नाही. कारण तिनं आज कर्णाच्या गळ्यात वरमाला घालायचं ठरवलं होतं. तशी ती हळूच दुर्योधनाजवळून पुढे सरकली दुर्योधनाच्या गळ्यात वरमाला न घालता.
दुर्योधन पाहात होता. दुर्योधन पाहात होता की भानुमतीनं त्याला वरमाला न घालता ती पुढे सरकत आहे. तसं त्याला वाईट वाटलं. त्याला वाटलं की भानुमती ही आपल्याला मिळायला हवी. तशी ती सुंदर असल्यानं दुर्योधनाच्या नजरेत भरली होती.
भानुमती वरमाला घेवून पुढे सरकल्याचं पाहताच दुर्योधनाला वाटलं की आता भानुमती आपली नाही. आपल्याला ती वरमाला घालू शकणार नाही. आपली पत्नीही होवू शकणार नाही. ही पुढे सरकून दुस-या कोणाच्या तरी गळ्यात वरमाला घालणार व त्याची पट्टराणी होणार आणि आपली इच्छा इच्छाच राहणार. अधूरी इच्छा.....तसा तो तीव्र वेगानं विचार करु लागला.
विचारांती त्याला त्याचे पितामहाची कहाणी आठवली. त्याचे पितामहा, पितामहा भिष्म यांनी पराक्रम दाखवून जबरदस्तीनं अंबा, अंबिका आणि अंबालिकाला मिळवले होते. तसा विचार आला दुर्योधनाच्या मनात. मग काय, ताबडतोब ती दुस-याच्या गळ्यात वरमाला घालणार. तोच दुर्योधनानं तिच्या हातातील वरमाला जबरदस्तीनं हिसकली व आपल्या गळ्यात घालून घेवून तिला आपल्या बाहूबलांनी अलगद उचलून घेतले. तसे ते कृत्य बाकीचे राजे पाहात होते.
भानुमतीचं झालेलं हरण. त्यातच बाकीच्या अन्य राजांनी दुर्योधनाविरोधात उपसलेल्या तलवारी....... त्याचबरोबर शस्र पाहून दुर्योधन त्या राजांना म्हणाला,
"आपल्यात हिंमत असेल तर या माझ्या मित्राला, कर्णाला हारवून दाखवा. म्हणजे मला तुमच्यातील पुरुषार्थ कळेल. मगच माझ्याकडे या."
दुर्योधनानं म्हटलेले ते बोल. ते ऐकून संतप्त झालेले ते राजे. आता कर्णाशी युद्ध करीत होते. परंतू कर्ण काही कच्च्या गुरुचा शिष्य नव्हता. त्यानं सर्व राजांना चुटकीसरशी हारवलं. परंतू भानुमती अत्यंत क्रोधीत झाली. तिचा क्रोध मावेना. तशी ती म्हणाली,
"हे काय दुर्योधना. तू मला शूरवीर वाटत नाहीस आणि हे पतीधर्म नाही. पतीधर्मासाठी स्रीइच्छेचाही प्रश्न असतो. माझी इच्छा तुला पती म्हणून स्विकार करायची नाही."
"परंतू प्रिये, मी तुला जिंकलं आहे त्याचं काय?"
"परंतू हे पतीधर्मात बसत नाही त्याचं काय?"
"का बसत नाही पतीधर्मात. एखादं उदाहरण देतेस?"
"पतीधर्मात बसण्यासाठी स्रिची इच्छा नसावी काय? तेव्हाच ती पत्नी बनू शकेल की नाही. माझी तुला पती मानण्याची इच्छाच नाही तर मी तुला पती कशी मानेल?"
"अगं जबरदस्तीचा विवाह सांगतेस. त्या क्रिष्णानं रुख्मीनी मिळवतांना भर दरबारातून तिचं अपहरण केलं. तरीही तिनं त्याला पती म्हणून स्विकार केला. त्यावेळी तो पतीधर्म होता का?"
"हो, कारण तिथं तिची इच्छा होती क्रिष्णाला पती करण्याची. इथं माझी इच्छा नाही. मला सांगा एखादं असं उदाहरण की ज्यामध्ये असं बळजबरीनं जिंकल्यानंतर त्या स्रियांनी त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार विवाह केला. जर तुम्ही तसं प्रमाण द्याल. तरच मी तुमचा पती म्हणून स्विकार करेल. अन्यथा नाही. बोला, आहे असं एखादं उदाहरण? बोला, बोला, बोला, आहे का असं एखादं उदाहरण?"
"आहे. असंही उदाहरण आहे."
"मग सांगा ना. चूप कसे बसलात?"
"बरं ऐक तर......." असे म्हणत दुर्योधन सांगू लागला.
"ऐक माझ्याच कुटूंबात घडलेली अशी गोष्ट. माझे तातश्री भिष्म पितामहाचं कधी नाव ऐकलं आहे का?"
"होय, ऐकलं आहे. बरेचदा ऐकलं आहे."
"त्यांचीच ही गोष्ट आहे, ऐक."
असे म्हणत दुर्योधन सांगू लागला भानुमतिला. तशी भानुमतिही ती गोष्ट कान टवकारुन ऐकू लागली.
काशी नरेश........ त्यांना तीन मुली होत्या. एकीचं नाव अंबा, दुसरीचं अंबिका आणि तिसरीचं अंबालिका. राजा काशीनरेशनं तीनही मुलींचे स्वयंवर आयोजीत केले होते. त्यावेळी माझे तातश्री विना बोलावण्यानं गेले. त्यांनी आपल्या पराक्रमानं सर्व स्वयंवरातील राजांना हारवलं व त्या तिघींना घेवून ते हस्तीनापूरला आले. यावेळी अंबिका आणि अंबालिकानं माझे तातश्री विचीत्रवीर्यशी विवाह केला आणि तद्वतच त्यांचा पती म्हणून स्विकार केला. प्रिय भानुमती, हा जर आमच्या पुर्वजांचा इतिहास आहे. तर आपण यात बदल करणारे कोण? मी तुझाच पती बनण्याच्या लायक असून तू माझी पत्नी आहे. तुमच्या स्वयंवर पद्धतीच्या कुलाचारानुसार मी कर्णाच्या सोबतीने सर्व राजांना हारवलं आहे व नियमानुसार तूच माझी पत्नी बनलेली आहेस. आता आढेवेढे नको. आता यात तू बळजबरीचा विवाह समज की पसंतीचा. तू माझी पत्नी झाली म्हणजे झाली आणि हाच राजशिष्टाचार आहे."
"परंतू यात माझ्या वडीलांचा झालेला अपमान?"
"त्यात काय, माझी त्यात काहीही चूक नाही. मी राजशिष्टाचारानुसार बरोबर केलेलं आहे."
"ठीक आहे. हा जर राजशिष्टाचार आहे. तर त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्याही आयुष्यात भोगावेच लागतील. त्या परिणामापासून कोणाचीही सुटका होवू शकत नाही."
"ठीक आहे. पाहून घेवू. उद्याच्या भवितव्यासाठी आजचं वर्तमान खराब कशाला करतेय. चल आता हस्तीनापूरला."
असे म्हणत दुर्योधनानं भानुमतिला हस्तीनापूरला आणलं आणि आपली पत्नी बनवून तो अतिशय सुखमय राहू लागला. यावेळी त्यानं भानुमतिच्या विनंतीवरून तिची सखी सुप्रियालाही आणलं होतं.
दुर्योधनाच्या हस्तीनापूरला भानुमती आली होती. ती दुर्योधनासोबत राहात होती. तसं तिनं त्याचा पती म्हणूनही स्विकार केला होता.
भानुमतिला क्रिष्ण आवडत होता. ती त्याची भक्तच होती. कधीकधी याच क्रिष्णभक्तीवरुन भानुमतिशी वादही होत असत. कारण दुर्योधन क्रिष्णाचा राग करीत असे. तसा त्याला बलराम आवडत असे.
क्रिष्णाचा राग होता त्याला. त्याचं कारणंही तसंच होतं. ते कारण म्हणजे त्याला वाटत होतं की क्रिष्ण पांडवांच्या बाजूनं बोलतोय.
क्रिष्ण हा धर्माकडून बोलत होता. त्याला धर्म आवडत होता. दुर्योधन अधर्माकडून होता.
कितीतरी वेळा भानुमतिनं आपल्या पतीला म्हणजे दुर्योधनाला समजवलं होतं. परंतू दुर्योधन काहीएक ऐकत नव्हता. तशी ती त्याबद्दल सुप्रियाशी बोलायची.
"सुप्रिया अगं मी फसली गं."
"कशी काय?"
"अगं तुला तर माहीत आहे की मला अर्जून आवडत होता. परंतू माझं भाग्यच तसं की मला अर्जून मिळालाच नाही. अर्जून आलाच नव्हता त्या स्वयंवराच्या दिवशी. नाहीतर अर्जूनानं या दुर्योधनाशी सामना केला असता आणि त्या अर्जुनाला दुर्योधन आणि कर्णानही हारवू शकलं नसतं. मला अशारितीनं अर्जून मिळाला असता व अर्जूनाशी विवाह करता आला असता मला. पण आता काय करु? ती वेळ निघून गेलेली आहे. मला दुर्योधन कदापिही आवडत नाही. परंतू आता मी तरी काय करणार. मला आता तो आवडूनच घ्यावा लागेल."
"अगं भानुमती, आता तू जिव्हेवर ताबा ठेव. कारण आता तूझं रक्षण तुझी जिव्हाच करु शकेल. कारण ही जिव्हा जर तुझी बदलली तर तुलाच तुझ्या पतिरायांकडून त्रास होईल. तसं पाहता मी तुला याबद्दल आधीच सांगीतलं होतं की तू भानुमती असे स्वप्न पाहू नकोस. कदाचीत तुला तो अर्जून मिळणार नाही. एखादा नवीनच राजकुमार तुझ्या आयुष्यात येईल. तसा तू त्या गोष्टीचा स्विकार कर. परंतू तू ते ऐकायला तयार नव्हती. मग मी तरी काय बोलणार. आता घडलं नं तसंच अगदी. आता तरी स्वप्नात राहू नकोस. आता तरी पतीधर्म पाळ व दुर्योधनाला नाईलाजानं का होईना, पती मान व त्याच्याशी आनंदानं संसार कर."
"अगं पण, यांनी माझ्या वडीलांचा अपमान केला तो. तो अपमान एवढ्या लवकर विसरुन जावू की काय?"
"विसरावाच लागेल. कारण तू विसरली नाहीस की संसारात कलह राहणार. जो कलह बरा नाही."
"परंतू यांना क्रिष्णही आवडत नाही, त्याचं काय?"
"भानुमती, आता स्रिला प्रथम स्थान नाही. दुय्यम स्थान आहे. पत्नीचं कोणीही ऐकत नाही. कारण पत्नी ही एक महिला असते. तू महिला आहेस हे तरी तू लक्षात ठेव."
सुप्रिया बोलली होती. अगदी बरोबर बोलली होती. कारण त्यावेळेस महिलांना प्रथम स्थान दिलं जात नव्हतं.

***********************************************

महिलांना आज दुय्यम स्थान असलेलं दिसत आहे. निरनिराळी व्रतवैकल्ये आजही स्रियांना जेवढी करावी लागतात. तेवढी पुरुषांना करावी लागत नाही. साधं वडसावित्रीचं वडपूजन असो वा करवाचोथचे व्रत, पुरूषांना कधीही वडाला धागा बांधावा लागत नाही. तसेच स्रियांसाठी वा त्यांचं आयुष्य वाढावं म्हणून पुरुषांना नसतं. परंतू स्रियांना हे व्रत तर करावं लागतं. पुरुषांचं आयुष्य वाढावं म्हणून. तसेच स्रिया राजकारण, शिक्षण, अवकाश या क्षेत्रात पुढे गेल्या असल्या तरी त्यातही दुय्यम स्थानच दिसतं. खरं तर स्रियांचीही प्रगती व्हावी. दुय्यम स्थान दिसू नये.
महिलांना पुर्वीही दुय्यम स्थान होतं. आजही दुय्यम स्थान आहे. काल या दुय्यम स्थानानुसार सीता, उर्मीला, मांडवी, श्रृतकिर्ती या महिलांनी पुरुषांचा अत्याचार सहन केला. हे त्रेतायुगात घडलं तर द्वापरयुगात द्रोपदी, कुंती, गांधारी इत्यादी स्रियांनी अत्याचार सहन केला. आजही असा अत्याचार महिलांवर होत आहे. कारण आजही महिलांना असलेलं दुय्यम स्थान.
ज्यावेळी देश स्वतंत्र्य झाला. त्यानंतर या देशात संविधान बनलं व संविधानानुसार महिलांनाही समान स्थान मिळालं. त्यानुसार महिला आज शिक्षण, राजकारण, अवकाश या सर्वच क्षेत्रात आघाडीवर गेल्या आहेत. आज महिला कल्पना चावला व कैसर विल्यमच्या रुपात अंतराळात गेली आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी आहे.
महिला आपल्या कुटूंबाची आर्थीक परिस्थिती पाहून कामाला जात असतात. कामाच्या ठिकाणी पुरुषांची भुरटी नजर त्यांच्यावर पडत असते. अपवाद याला काही महिलाही आहेत. त्या महिला संविधानाचा वापर करुन आपल्या बॉसवरही आरोप लावून त्यांना ब्लॅकमेल करतात व कामाचा स्वतःवरील ताण कमी करुन घेतात.
काही काही घरीही पत्नी म्हणून येणा-या महिलांना दुय्यम स्थान जाणवतं. महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा. तिनं कपाळावर कुंकू लावावा. तिनं खाली मान टाकून राहावं. तिनं असं वागावं तसं वागावं. अशा नानावीध गोष्टी. ह्या गोष्टी ज्या घडतात. त्या गोष्टीही स्रियांचं दुय्यमच स्थान दाखवतात. आज स्रिया अवकाशात गेल्या, राजकारणात मोठमोठ्या पदावर गेल्या तरी स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकत नाही. राजकारणाचा विचार केल्यास त्यांचे पुरुषच कोणतेही राजकारणातील निर्णय घेतांना दिसतात. तसेच शिक्षीका म्हणून नोकरीला लागतात, तेव्हाही शाळेत काही काही निर्णय स्वतःच्या मतानं घेतांना दिसत नाही. आपल्या पतीच्या मतानं घेतात. आजची स्री स्वतंत्र्य असली तरी बालपणात आपल्या मायबापाच्या दबावात असतात आणि पतीच्या घरी पतीच्या दबावात. जेव्हा पती मरण पावतात, तेव्हा त्या मुलांवर अवलंबून असतात. याला स्रीचं स्वातंत्र्य म्हणता येते का?
पुर्वीच्याही काळी तेच झालं. उर्मीलाचं मन तोडून लक्ष्मण वनवासात गेला, तेव्हा उर्मीलाला दुय्यमच समजलं गेलं. द्वापर युगात भानुमतिचा तिच्या इच्छेनुसार विवाह झाला नाही. हेही दुय्यमच स्थान होतं.
महत्वाचं म्हणजे संसाररथाची जी दोन चाकं असतात. त्यामध्ये स्री ही संसाररथाचं एक चाक आहे व पुरुष दुसरं. जर एक चाक कमजोर असलं किंवा तुटकं असलं तर तो रथ चालूच शकत नाही. तसंच स्रियांचे आहे. विशेष सांगायचं म्हणजे स्रियांनाही प्रथम स्थान द्यावं. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांनाही संविधानानं जे समान स्थान दिलं आहे. ते द्यावं. जेणेकरुन त्यांनाही समाधानानं व सन्मानानं जगता येईल व स्वतःचा विकास करता येईल. हे तेवढंच खरं आहे.
भानुमती रागाचा घास गिळून राहात होती. तिला मन मारुन राहावं लागत होतं दुर्योधनाकडे. कधी काळी ती मन रमविण्यासाठी आपली मैत्रीण सुप्रियासोबत बोलून घेत होती आणि सुप्रियाही तिच्याशी चांगला संवाद करुन तिला आनंद देत असे. परंतू भानुमतीला शल्य वाटतच होतं की सुप्रिया आपल्याला केव्हापर्यंत मदत करेल. तिचा विवाह झाल्यावर ती आपल्या पतीकडं जाईल. संसारात रमेल व मला माझा संसार रूक्ष वाटू लागेल.
भानुमती संसारात तर रमली होती. परंतू तिला नेहमी नेहमी तिला दुर्योधनानं बळजबरीनं पळवून आणल्याचं शल्य टोचत होतं. त्यातच तिच्या वाडवडीलांचा झालेला अपमान टोचत होता. त्यावर काय करावं हेही सुचत नव्हतं. तशी सुप्रियाही विवाह करुन दूर जाण्याची चिन्हे दिसत होती. सुप्रिया आपल्याजवळच राहावी. आपल्या आसपास राहावी असं तिला वाटत होतं. तिनं सुप्रियाला मैत्रीण म्हणून बोलायला व मन रमवायला सुप्रियाला आणलं होतं. परंतू तिही उपवर झाली होती आणि सुंदरही. तशी ती तारुण्यात अगदी सुंदरच दिसत होती.
सुप्रिया ही भानुमतिची जीवलग मैत्री होती. परंतू ती आपल्या संसारासाठी तिच्या जीवनाचा सत्यानाश करु पाहात नव्हती. तिलाही वाटत होते की तिचा संसार बसावा व तिही कोणाशी विवाहबद्ध व्हावी. विचार एवढाच होता की ती आपल्या अवतीभवती राहावी. परंतू तिचा विवाह........ती गोष्ट तिचं प्रारब्धच ठरवणार होतं. ती नाही.
सुप्रिया काही दिवस भानुमतिच्या राजमहालात राहिली. काही दिवस जाताच तिची कर्णाशी ओळखंही झाली. तसा कर्ण तिच्यावर प्रेम करु लागला. तशी तिही. बघता बघता ही गोष्ट भानुमतिला माहित झाली व भानुमतिला वाटलं की जसं माझं जीवन उध्वस्थ झालं. तसं सुप्रियाचं होवू नये. हाच कटाक्ष पाळून भानुमतिनं तिला तिच्या घरी पाठवलं.
सुप्रिया आता एकटी होती. तिला आता करमत नव्हतं. त्यामुळच की काय, ती चित्रवत राजाची मुलगी असलेल्या आसावरीची दासी म्हणून काम करु लागली. आता तिला त्या राजमहालात करमत होतं. तिचा दिवसही आनंदात जात होता.

****************************************

कर्णाला द्रोपदी स्वयंवरातून अपमानीत होवून बाहेर पडावं लागलं. ते शल्य त्याचा पालनहार पिता अधीरथला सहन झाले नाही व त्यानं त्याचे विवाहासाठी मुलगी शोधणे सुरु केले. तेव्हा त्यानं एखाद्या कन्येविषयी सूत जातीचा असलेला व दुर्योधनाचा जो रथ चालवत होता. त्या सारथ्याला पकडलं. ज्याचं नाव सत्यसेन होतं. विचारलं,
"माझ्या मुलाचा कर्णाचा विवाह करायचा आहे. एखादी कन्या आहे का विवाहयोग्य?"
अधीरथ कर्णाचा पालनहार बाप होता. त्यानं तसं विचारताच सत्यसेन म्हणाला,
"जास्त शोध घ्यायची गरज नाही. माझी बहीण आहे वृषाली. ती सुंदर आहे. आपल्या कर्णाला ती नक्कीच पसंत पडेल."
सत्यसेननं माहिती सांगताच अधीरथानं त्याची बहीण वृषाली कर्णाला दाखवली. तशी ती कर्णाला पसंत पडताच अधीरथानं त्यांचा विवाह अगदी धुमधडाक्यात साजरा केला.
कर्णानं आपला विवाह वृषालीशी केला होता. तसा तो संसारात रमलाच होता की त्याची नजर सुप्रियावर पडली. सुप्रिया जेव्हा भानुमतिच्या महालात होती. त्याचं प्रेम तिथंच वाढत गेलं होतं. परंतू ती आता तिथं नव्हती. त्यानं वृषालीशी विवाह केला असला तरी त्याला तिची आठवण येत होती.
कर्ण दुर्योधनाचा मित्र होता. तो दुर्योधनाच्या महालात जात येत असे. त्यानंच दुर्योधनाला भानुमती जिंकून दिली होती. त्यामूळं दुर्योधनालाही भानुमतिशी विवाह करता आला.
एकदाची गोष्ट. कर्ण दुर्योधनाच्या राजमहालात आला होता. तशी त्याची नजर भानुमतिची जीवलग मैत्रीण असलेल्या सुप्रियावर पडली. तिनं तसं त्याचं मन जिंकून घेतलं होतं.
ती सुप्रिया......... कर्णानं तिला पाहताच तो मोहीत झाला होता तिच्यावर. आज जेव्हा तो सुप्रियाशी संसारात रमला होता. तेव्हा त्याला तो प्रसंग आठवत होता. त्याला पुर्वीचे प्रसंग आठवले की अंगावर रोमांच उभे राहात. असाच एक प्रसंग आठवला त्याला. तो प्रसंग म्हणजे सुप्रियानं त्याला केलेली मदत व त्यानं सुप्रियाशी केलेला विवाह.
आसावरी ही चित्रवत राजाची मुलगी होती. तिची ही सुप्रिया दासी. ही सुप्रिया जेव्हा आसावरीसोबत एकदा वनविहाराला गेली असता शत्रूच्या काही सैन्याने आसावरीवर अचानक हल्ला केला. परंतू ते प्रसंगावधान साधून सुप्रिया पुढं झाली. तशी तिही शूरच होती. तिनं ते आक्रमण परतावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू ती त्यात घायाळ झाली. तोच प्रसंग. तो प्रसंग तेथून जात असलेल्या कर्णानं पाहिला. त्याला ती आठवली. ही भानुमतिची मैत्रीण. आपण हिला भानुमतिच्या महालात पाहिलंय. तसा त्यानं विचार केला की आपण हिला मदत केलेली बरी. त्यानं तिला मदत केली व शत्रू सैन्याला आपल्या बाणानं ठार केलं व ते आक्रमण परतावून लावलं. परंतू त्यात अंगराज कर्ण सुद्धा जखमी झाला.
सुप्रियानं ते पाहिलं. तसं तिनं कर्णाला रथात बसवलं व तिनं राजकुमारी आसावरीला तिच्या राजमहालात सोडून त्या कर्णाला तिनं आपल्या घरी आणलं. त्यातच त्याच्या जखमांवर तिनं वैद्याकरवी उपचारही केला होता. जेव्हा सकाळ झाली आणि कर्णानं आपले डोळे उघडले, तेव्हा त्यानं पाहिलं की तो सुप्रियाच्या घरी आहे आणि त्याच्या जखमांवर सुप्रिया औषधोपचार करीत आहे.
थोड्याच वेळाचा अवकाश. राज्यातून एक दूत आला. म्हटलं की महाराज चित्रवतानं कर्णाला राजमहालात बोलावलंय. ज्यावेळी कर्ण राजमहालात पोहोचला. तेव्हा राजकुमारी आसावरीनं कर्णाचं स्वागत केलं. त्यातच ती कर्णावर प्रेम करायला लागली. तशी ही गोष्ट तिनं आपली दासी असलेल्या सुप्रियालाही सांगीतली. परंतू सुप्रियाही कर्णावर प्रेम करु लागली होती. ती त्याला आधीपासूनच ओळखत होती. तिला ते ऐकताच बरं वाटत नव्हतं. परंतू ती काय करणार. शेवटी ती आसावरीची एक दासीच होती.
कर्णाचं स्वास्थ ठीक झालं होतं. कारण सुप्रियानं दिवसरात्र त्याची सेवा केली होती. तसा तो पुर्णपणे सुधारताच राजा चित्रवताची भेट घेण्यासाठी गेला. तसा राजा म्हणाला,
"हे पांथस्था, तू माझ्या मुलींच्या प्राणाचं रक्षण केलं. बोल तुला काय मागायचं आहे ते मांग."
कर्णानं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"हे राजन, द्यायचं असेल तर आपली मुलगी आसावरी मला द्या."
कर्णाचे ते बोल. राजा चित्रवताला भयंकर राग आला त्या कर्णाचा. रागाच्या भरात तो म्हणाला,
"हे पांथस्था, आताच्या आता इथून चालता हो. मला आता तुझ्या तोंडून एकही शब्द ऐकायचा नाही. कारण तू सूतपूत्र आहेस."
सूतपूत्राचा लागलेला कर्णावरील कलंक. त्याला राजघराण्यातील मुलगी मागण्यापासून अडवीत होता. तसा तो ते ऐकताच अत्यंत क्रोधीत होवून बाहेर आला.
कर्णानं तसं म्हणताच व तो बाहेर पडताच तो काही विपरीत करेल असे भय बाळगून राजा चित्रवतानं आसावरीचं स्वयंवर घोषीत केलं. त्यात कर्णानंही भाग घेतला होताच. त्यातच सर्व राजांनी म्हटलं की आम्ही विवाहात भाग घेणार नाही. कारण यात सूतपूत्र आहे. त्यावर कर्णानं सर्वांना आव्हान केलं की माझ्याशी लढा. माझा पराजय होताच मी हा राजमहाल सोडून निघून जाईल.
कर्णानं तसं आव्हान देताच राजमहालातील युवराजांनी त्याचं आव्हान स्विकारलं. तसे ते कर्णाशी लढू लागले. परंतू कर्ण होता तो. जो अर्जुनालाही भारी होता. त्याच्या शक्तीपुढं त्या युवराजांचं काहीच चाललं नाही. त्यांचा पराभव झाला व कर्ण विजयी झाला.
कर्ण विजयी होताच आसावरी जवळ आली. तिच्या हातात वरमाला होती. आता ती वरमाला कर्णाच्या गळ्यात घालणार. तोच कर्ण म्हणाला,
"राहू दे आसावरी ही वरमाला. मला तुझ्याशी विवाह करण्याची मुळीच इच्छा नाही. तुझे वडील हे जात पात पाहतात. त्यांना मी सूतपूत्र विवाहासाठी चालत नाही. माझ्यासाठी ही सुप्रियाच बरी की जिनं माझ्या घावांवर औषधोपचार केला. ही कधीच माझ्या आयुष्यात मला कधी सूतपूत्र म्हणून अपमानीत करणार नाही. कळतं मला की मी आता जोही पराक्रम केला. त्यामुळं तू खूश होवून माझ्याशी विवाह बंधनात अडकायला तयार आहेस. ज्याला तुझ्या वडीलांची परवानगी नाही. मी शेवटी सूतपूत्रच आहे आणि शेवटी सूतपूत्रच राहणार."
कर्णानं असं म्हणत डोळ्यातून पाणी आणलं. त्यातच त्यानं आसावरीच्या हातातून वरमाला घेतली व ती सुप्रियाच्या गळ्यात टाकत तो म्हणाला,
"सुप्रिये, चल तू अंगदेशला. मी तुला कधीच नाखूश ठेवणार नाही. कारण मी प्रेमाचा भुकेला आहे. जे प्रेम तू देवू शकतेस. परंतू ही आसावरी देवू शकणार नाही." कर्ण म्हणाला.
ते शब्द न् शब्द अगदी खरे होते. ते शब्द देखील ते राजकुमारही ऐकत होते. ज्यांना नुकतंच कर्णानं पराभूत केलं होतं. तेही कर्णाला सूतपूत्र म्हणून बोलले होते. ज्या शब्दाचा आता त्यांना पश्चाताप होत होता.
कर्णानं सुप्रियाला आपली राणी बनवली व तो तिला घेवून आपल्या महालात आला होता. सुप्रिया आधीपासूनच दुर्योधनाची पत्नी भानुमतिची मैत्रीण होती. त्यातच आता ती कर्णाचीही पत्नी बनली होती. तशी ती भानुमतिची मैत्रीण असल्याने भानुमतिला अगदी हायसं वाटत होतं. तशी सुप्रिया भानुमतीकडेच जास्त प्रमाणात राहायची. तिलाही आनंद व्हायचा.
भानुमती कुस्तीत पटाईत होती. कित्येकवेळा तिनं दुर्योधनाला कुस्तीत चीत केलं होतं. तिला युद्धकला तर येतच होत्या. व्यतिरिक्त तिला चौसरही खेळता येत होते. चौसरमध्ये तर ती माहीरच होती. ती नेहमी दुर्योधन आणि कर्णाशी चौसर खेळत असे.
कर्णावर ती आताही प्रेम करीत होती. जरी तो तिला मिळाला नसला तरी. परंतू आता नातं तेवढं बदललं होतं. तशी एकदा ती कर्णासोबत चौसर खेळायला बसली.
आज काही तिचं भाग्य चांगलं नव्हतं. कारण आज कर्ण द्युत डावात वरचढ झाला होता. ती चौसरचा सामना हारत चालली होती. अशातच तिथे अचानक दुर्योधन टपकला.
तिथे दुर्योधन आला हे फक्त भानुमतिला माहीत होतं. परंतू ते काही कर्णाला माहीत नव्हतं. तो अगदी मन लावून चौसर खेळत होता.
कर्ण बलवान होता. तो दुर्योधनाचा मित्रही होता. परंतू तो आजही दुर्योधनाच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगत होता. त्याचं कारणही तसंच होतं.
ज्यावेळी शिक्षण पूर्ण झालेल्या हस्तीनापूरच्या युवराजांची परिक्षा झाली. तेव्हा त्या युवराजांच्या मध्ये असलेल्या त्या त्या कौशल्यानुसार द्रोणाचार्यानं अर्जूनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर घोषीत केलं होतं. परंतू ते सहन न झाल्यानं तिथं कर्ण आला. त्यानं अर्जून आणि द्रोणाचार्यला आव्हान दिलं. परंतू द्रोणाचार्य म्हणाला,
"तू सूतपूत्र आहेस. शिवाय एखाद्या प्रदेशाचा राजाही नाहीस. तेव्हा तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणवून घेण्यासाठी कसं या स्पर्धेत भाग घेता येईल?"
त्या प्रश्नावर दुर्योधनानं कर्णाला उपकाराच्या स्वरुपात अंग देशाचं दान दिलं होतं. हेच उपकार असल्यानं तो दुर्योधनाला घाबरत होता.
अचानक दुर्योधन आला. तसं त्याकडे लक्ष असलेली भानुमती लगबगीनं उठली. त्यावेळी कर्णाला वाटलं की भानुमती हा चौसरचा खेळ हारत असल्यानं ती मधातच खेळ सोडून जात आहे. त्यानं तिचा पदर पकडला व तो तिला चौसरच्या खेळासाठी बसवू लागला. त्यातच तिच्या पदराला असलेली मोत्यांची माळ तुटली व सर्व मोती इकडे तिकडे पसरले. त्याचवेळी दुर्योधनाचं तिकडे लक्ष गेलं.
ती कर्णाची कृती अक्षम्य नव्हती. तशी ती माळ तुटताच कर्णही भानावर आला. त्याचंही लक्ष दुर्योधनाकडे गेलं. तसे ते दोघंही जण घाबरले. कर्णाला आपण हे काय केलं असं वाटायला लागलं. त्यातच शरमेनं दोघांनीही खाली माना घातल्या. त्यावर किंचीतही न रागवता व न शंका करता दुर्योधन म्हणाला,
"अरे असे घाबरता कशाला? माळच तुटली ना. आता त्या माळेतील मणी दोघंही जण गोळा करा. होतंच आहे कधीकधी."
असं म्हणत तो कर्णाला म्हणाला,
"मला महत्वाचं काम आहे. माझ्या कक्षात ये. काही सल्लामसलत करायची आहे."
दुर्योधनानं काहीही म्हटलं नाही. तरीही कर्ण तसाही घाबरलाच होता. कारण दुर्योधनानं त्याला कक्षात बोलावलं होतं. त्यानं पटापट भानुमतिच्या मोत्याच्या माळेतील मणी गोळा केले व तो दुर्योधनाच्या कक्षात गेला. त्यानं सुरुवातीलाच दुर्योधनाची माफी मागीतली. परंतू दुर्योधन हा शंकेखोर नव्हता. तो स्पष्ट बोलणारा होता. तो स्पष्ट बोलत असल्यानं त्याचे शब्द इतरांना जिव्हेरी लागायचे. तसाही तो विचार न करता कधीकधी गर्वानंही बोलायचा. तो म्हणाला,
"मित्रा, मैत्रीमध्ये हे चालायचंच. शिवाय ती भानुमतिही तुझी मैत्रीणच आहे आणि ती जरी आता माझी भार्या झाली असली तरी ती माझी भार्या बनणं ही तुझीच देण आहे. यात माफीचा प्रश्नच आला कुठून? तू निश्चींत हो आणि मला राज्यकारभाराचा सल्ला दे."
असं म्हणत दुर्योधन कर्णाला राज्यकारभाराचा सल्ला मागू लागला. त्याचबरोबर आता कर्णाचीही दुर्योधन रागावण्याची भीती कमी झाली होती.
****************************************

अलीकडे काही लोकांची मानसीकता असते की दत्तक मुल घेतांना एवढे पैसे पडतात. एवढे पैसे अनाथ संस्थेंनी मागायला नको. परंतू का नाही मागायचे? तुम्ही त्या दत्तक वारसांना आयुष्यभर चांगलंच सांभाळाल. याचा का भरोसा. त्यामुळंच तसं लिहून घेतलं जातं. कारण हे जीवन आहे. या जीवनात कधी उतार चढाव येतोच. त्याची शिक्षा या अनाथ मुलांना भोगावी लागू नये. म्हणून हे प्रावधान. हे प्रावधान कठीण समयी दत्तक वारस नामंजूर करण्यासाठी नाही.
"मी सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही." अज्ञातवास पूर्ण करुन आलेल्या पांडवांना दुर्योधन म्हणाला. त्याचं क्रिष्णानं कारण विचारलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला,
"ही माझ्याच काकांची मुलं असतील कशावरुन? माझ्या काकाला मुनी किंदमचा शाप होता की तो जेव्हा एखाद्या स्रिला स्पर्श करेल. त्यावेळीच तो मृत्यू पावेल. मग माझ्या काकाला मुलं झालीच कशी? ही माझ्या काकाची मुलं नाहीत. मग यांना हस्तीनापूरचं राज्य कसं देता येईल. अगदी सुईच्या टोकावरही मावेल एवढीही जमीन देता येणार नाही. प्रसंगी युद्ध करावं लागलं तरी चालेल."
दुर्योधनाचं तसं पाहिलं तर बरोबरच होतं. परंतू क्रिष्णाचं म्हणणं होतं की साधारण दत्तक घेतलेल्या मुलालाही राज्याचा अधिकार मिळतो. ही गोष्ट पुरातन काळापासून चालत आलेली आहे. त्रेता काळात याच अंग देशाचं राज्य राजा रोमपदानं आपली दत्तक कन्या शांताला दिलं होतं. मग आता हा काळ म्हणजे द्वापर काळ. याच काळात नियम कसा बदलवायचा. तसा क्रिष्ण म्हणाला,
"दुर्योधना, केवळ बोलण्यानं चालत नाही. इतिहास बघ. इतिहासात तू जे राज्य कर्णाला दान दिलंय ना. त्याच राज्याचा अधीपती राजा रोमपदनं आपलं राज्य आपली दत्तक पुत्री शांताला दिलं होतं. ही तर पांडवाची मुलं आहेत. कुंती सांगतेय ना. मुलं कोणाची हे एका मातेलाच माहीत असतं. पुरुषांना नाही."
दुर्योधनानं ते सगळं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"क्रिष्णा, मला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नकोस. उद्या माझी काकी गावातील मुलं गोळा करुन आणेल व मला म्हणेल की ही मुलं माझीच आहे तर मी कोणाकोणाला राज्य द्यायचं."
दुर्योधनाचं ते अक्राळ विक्राळ बोलणं. क्रिष्णाला वाटलं की या मुर्ख माणसाशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. म्हणून तो चूप बसला व आल्यापावली निघून गेला.
अलीकडे दत्तक वारसालाही हक्कदार बनविण्याची तरतूूद संविधानात आहे. मुल दत्तक म्हणून घेतांना कायद्यानुसार ते मुल दत्तक देणा-या संस्था त्या दत्तक घेणा-या परिवारांकडून त्या मुलांना काय काय देणार. हे सगळं लिहून घेत असतात. कारण त्यांना भीती असते की पुढं जावून या परिवारांना त्यांचं स्वतःचं मुल झालं की त्यांचा स्वभाव बदलेल व ते त्या दत्तक वारसपुत्रांना काहीही देणार नाहीत. म्हणून हे प्रावधान. तसं स्वतःचं मुल झालंच की माणसांंचा स्वभाव बदलतो व ते त्या दत्तक मुलांना त्रास देवू लागतात. कारण ते मुल त्यांचं नसतं. त्यांच्या रक्ताचंही नसत.
आपण पारतंत्र्यात असतांना दत्तक वारस नामंजूर करीत इंग्रजांनी राज्यच्या राज्य खालसा केलीत. त्यांनी हाच दुर्योधनाचा नियम लावला. म्हणून अलीकडे हे सगळं कायद्यानुसार लिहून घेतलंं जातं.
यामध्ये मुख्य गोष्ट आहे. ती म्हणजे मुल अनाथ होणं. मुल अनाथ का होतं? त्याची बरीच कारणं आहेत. काही मुलांचे मायबाप अकाली निधन पावतात. अपघात, अकस्मात वैगेरे वैगेरे कारणांनी तर काहींचे मायबाप अफेअर करतात. त्यातून जेव्हा संतती जन्मास येते. तेव्हा ती संतती विवाहापुर्वीची असल्याने बदनामी होवू नये म्हणून बेवारस कुठंही अक्षरशः फेकली जाते. ही देखील मुलं अनाथ होतात आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे विवाह झाल्यानंतरही पती पत्नींचे खटके उडत असल्याने ते एकत्र राहात नाहीत. कधीकधी विवाहबाह्य संबंध ठेवून पळूनही जातात ते. अशीही मुलं अनाथ होतात. यामध्ये त्या मुलांचा दोष नसतो. अलीकडे काही लोकांना मुलं होत नाहीत. नशिबातच नसतात मुलं असं म्हणायला काही हरकत नाही. ती मंडळी मुलं अनाथालयातून दत्तक घेतात. मग कोणीतरी सांगतं की टेस्ट ट्यूब बेबी करा. मुल होईल.
अनाथालयातून घेतलेली मुलं. त्यानंतरच टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला. त्यानंतर समजा मुल जर झालं तर अशावेळी त्या अनाथ मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यांची हेळसांड होते. मग त्या अनाथ मुलानं जावं कुणाकडे? पाहावं कुणाकडे? हा प्रश्न उभा राहतो. म्हणून अनाथाश्रमं अशा दत्तक घेणा-या परिवारांकडून कायद्यानुसार त्याला सांभाळण्याचं परीपत्रक भरुन घेतात नव्हे तर काही मालमत्ताही त्याच्या नावावर लिहून घेतात. जेणेकरुन त्या मुलांना कोणीही केव्हाही दगा देणार नाही वा इंग्रजासारखी निती वापरून कोणीही दत्तक वारस नामंजूर म्हणणार नाही.
काही लोकं म्हणतात की अनाथ मुलं घेतो. परंतू जाचक अटी आहेत. कोण घेणार. त्यांना माझं म्हणणं हेच असेल की का विश्वास ठेवावा की तुम्ही त्या मुलाला तुमच्या संपूर्ण जीवनात प्रथमच स्थान द्याल? इथे आपल्याच जीवनाचा काही भरवसा नाही. तिथे ती अनाथ मुलं आहेत. आज तुमचे दिवस चांगले आहेत. उद्याही असतील असे नाही. त्या काळात मुलांनी कसं जगायचं. यासाठी हे प्रावधान. आपली साधारण स्वतःची मुलं असली की आपण आपल्याला सूख येवो की दुःख येवो, आपण त्यांना दुःखात ठेवत नाहीत. मग ही अनाथ मुलं झाली म्हणून काय झाले. तुम्हीच दत्तक घेतली ना. त्यानुसार ती तुमचीच मुलं झाली ना. मग ह्या देण्याघेण्याच्या व्यवहारात असा बदल आणि भेदभाव का?
प्रश्न मोठा भयावह आहे. अनाथ मुलं दत्तक घेतांनाही विचार. मोठा विचार. त्यांना सुख देतांनाही विचार. मोठा विचार.
महत्वपूर्ण गोष्ट सांगायची ही की कशाचाही किंतू परंतू मनात न ठेवता मुलं दत्तक घ्यावीत. त्याही मुलांना आपलीच मुलं समजावे. कारण अनाथ होण्यामागे त्या मुलांचा दोष नसतो. त्यांच्या मातापित्यांचा दोष असतो आणि प्रारब्धाचाही दोष असतो. त्याची शिक्षा त्या मुलांना देवू नये म्हणजे झालं. नाहीतर त्या इंग्रजात तसेच त्या दुर्योधनात आणि तुमच्यात काहीही फरक असणार नाही.
दुर्योधनाचंही काही अंशी चुकलं होतं. ते सर्व भानुमती ऐकत होती. त्या दुर्योधनाचं क्रिष्णाशी वाईट बोलणं तसं तिला खटकलं होतं. तसा क्रिष्ण जाताच भानुमती दुर्योधनाला म्हणाली,
"स्वामी असे काय बोलले क्रिष्ण की ते न बोलता गेले आणि तुम्ही असं बोलायला नको होतं. तो क्रिष्ण म्हणतोय ना की ती पाच पांडव कुंतीचीच मुलं आहेत. देवून टाका ना राज्य. कशाला स्वतःवर संकट ओढवून घेता. अहो, इथे दत्तक प्रावधान आहे ना. तुमच्याच अंगप्रदेशाचा इतिहास आहे. जो इतिहास क्रिष्णानं तुम्हाला अवगत केला. ऐका माझं. असं समजा की ती पाच पांडव तुमच्या काकांनी पंडूंनीच त्यांना मुलं होत नसल्यानं दत्तक घेतली असावीत आणि देवून टाका राज्य. तसं पाहता ते पांडव पूर्ण राज्य थोडं ना मागतात. फक्त पाचच गावं मागतात ना. अर्ध राज्यही नाही मागत ते."
भानुमती बोलत होती. परंतू तिचं बोलणं मधातच अडवत दुर्योधन म्हणाला,
"प्रिये, स्रियांनी राज्यकारभारात ढवळाढवळ करु नये. मी बरोबर निर्णय घेतोय. त्यासाठी मला सल्ला देण्याची गरज नाही. अन् माझा निर्णय जर बरोबर नसेल तर त्याचे परिणाम मी भोगायला सक्षम आहे. मला तुझा फालतूचा परामर्श नको."
दुर्योधनाचं बोलणं संपलं होतं. ते बोलणंं भानुमतीनं ऐकलं होतं. तिलाही वाईट वाटलं होतं. तसा दुर्योधन वाकड्या प्रवृत्तीचाच होता. त्याला परिणामाची चिंता नव्हती. त्याला वाटत होतं की जर युद्ध झालंच तर मीच जिंकणार. कारण माझ्याकडे द्रोणाचार्य, कर्ण, भिष्म यासारखे वीर आहे. ज्यानं परशूरामालाही हारवलं असा भिष्म. ज्यानं देवासूर संग्राम लढला असा भिष्म आणि ज्याला सर्व जगात हारवू शकत नाही असा गुरु द्रोणाचार्य आणि जो अर्जुनापेक्षाही सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असा कर्ण. हे सर्व रथी महारथी असल्यानं विजय आपलाच होणार याची दुर्योधनाला खात्री होती. त्यामुळं तो परिणामाची चिंता करीत नव्हता. कोणाचंही ऐकत नव्हता. खुद्द आपली प्रिय पत्नी भानुमतिचंही.
भानुमतिला दुर्योधनाचा अतिशय राग आला. तसा तो तिच्या आवडीचा पती नव्हताच. त्यानं तिला जबरदस्तीनं तिची इच्छा नसतांना स्वयंवरातून उचलून आणलं होतं नव्हे तर त्यानं तिच्या वडीलाचाही अपमान केला होता.
भानुमतिला राग येताच ती ताबडतोब कक्षात गेली व कक्षात जावून पती दुर्दैव्यानं रडत बसली होती. तसा काही वेळानं दुर्योधन आतमध्ये गेला. त्यानं पाहिलं की भानुमती आपल्या कक्षात रडत बसलेली आहे. तसं ते पाहताच तो तिच्याजवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी भानुमती वळली. तिनं दुर्योधनाकडे पाहिलं व पुन्हा आपलं तोंड वळवलं. तसा दुर्योधनानं तिच्या चेह-याला हात लावला. तिचे अश्रू पुसले व म्हणाला,
"काय झालं प्रिये, का रडतेस? अगं मी जे करतोय. ते बरोबरच करतोय. मी जर पांडवांना राज्य दिलं तर उद्या हाच इतिहास बनेल व उद्या कोणीही कोणाला स्वार्थासाठी मुलगा मानेल, कोणी बाप मानेल व मालमत्तेत भागीदार करेल."
दुर्योधनाचे ते बोल. भानुमती काय समजायचं ते समजली. तिनं आपली मान दुर्योधनाच्या छातीला लावली. तशी ती आणखी जोरात रडू लागली. तसा एक पिता आपल्या मुलांना जसा समजवतो. तसा दुर्योधन तिलाही समजवू लागला. तशी ती म्हणाली,
"स्वामी, मी विसरले आहे माझा भूतकाळ. तुम्ही बाकीच्यांसारखे नाहीत की ज्यांनी दोन चार राण्या केल्यात. मला माहीत आहे की तुम्ही पत्नीधर्म पाळता. त्यामुळंच मी तुमचा मृत्यू पाहू शकत नाही व तुम्हाला खोवू शकत नाही. म्हणून मी बोलली. तुम्ही निदान माझ्यासाठी तरी हा हट्ट सोडून द्या." असे म्हणत ती हळूहळू शांत झाली.
दुर्योधन त्यावर चूप होता. त्याला काय बोलायचं व काय उत्तर द्यायचं त्या बोलण्यावर ते कळत नव्हतं. परंतू बोलल्यास भानुमतिला जास्त राग येईल असं त्याला वाटत होतं.
दुर्योधनाचं त्याची पत्नी भानुमतीवर निरतिशय प्रेम होतं. परंतू तिच्याकडेही त्याला लक्ष द्यायला पुरेसा वेळ नव्हता. तो सतत आपल्या कार्यात व्यस्त राहात असे. त्याला कामंच एवढे होते की तो कोणत्याही स्रीकडे पाहात नसे. केवळ आणि केवळ पांडवांचं अहीत कसं करता येईल. याकडेच तो विशेष लक्ष देत असे. त्यामुळंच त्यानं द्रोपदीलाही एकदा आपली मांडी दाखवली होती.
भानुमती आपल्या पतीला चांगलीच बोलली होती. त्याला ती दाखवत होती की तिचं त्याचेवर प्रेम आहे. परंतू तिच्या मनात तिच्या वडीलांचा अपमान होता. जो अपमान तिच्या पतीनं तिच्याशी विवाह करतांना केला होता.
स्वयंवरानंतर जेव्हा भानुमती दुर्योधनाजवळ आली. तेव्हा दुर्योधनानं तिला आपल्याबद्दल सत्य माहिती व खुलासा दिल्यानंतर तिनं त्याला पती मानलं व त्याच्यासोबत संसार करु लागली. त्याचबरोबर तिच्यापासून त्याला दोन मुलं झाली. तसं त्यांचं नान ठेवण्यात आलं. मुलाचं नाव लक्ष्मण व मुलीचं नाव लक्ष्मणा ठेवलं.
आज लक्ष्मणा व लक्ष्मण लहानाचे मोठे होवू लागले होते. तसेच ते शस्रविद्येतही पारंगत झाले होते. मुलापेक्षा मुलगी एक पाऊल पुढंच होती.
ज्याप्रमाणे लक्ष्मण मोठा होत होता. त्याचप्रमाणे लक्ष्मणाही मोठी होत होती. आज ती उपवर झाली होती.
आज ती उपवर होताच ती श्रीक्रिष्ण व जांबवंती पुत्र सांबवर प्रेम करु लागली होती.
सांब.......जांबवती आणि श्रीक्रिष्णाचा मुलगा होता. तो हुशार व पराक्रमी होता. तो लहाणपणापासूनच आपल्या वडीलासोबत हस्तीनापूरला यायचा. तसा तो दुर्योधनाच्या दरबारातही जायचा. कारण भानुमती त्याची भक्त होती नव्हे तर सखी. ती भानुमती श्रीक्रिष्णाकडून सल्ला घेत असे व त्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार वागत असे.
सांबनं लहाणपणापासूनच लक्ष्मणाला पाहिलं होतं. तसा तोही उपवर झालाच होता.
सांब व लक्ष्मणा उपवर होताच दोघांचही एकमेकांवर प्रेम निर्माण झालं. जसं तिच्या आईचं भानुमतिचं अर्जुनावर प्रेम निर्माण झालं होतं तसं. त्यातच काल ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. तसंच आज लक्ष्मणा आणि सांबचं प्रेम. आज तेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. बघता बघता ते प्रेम वाढत गेलं. ते एवढं वाढलं की ती प्रेमाची गोष्ट हा हा म्हणता दुर्योधनाला माहीत झाली व इथंच गडबड झाली.
सांब हा सोळा विद्येमध्ये पारंगत होता. तसा तो सुंदरही दिसत होता. त्यामुळं तो तिला आवडत होता व ती त्याला आवडत होती. कारण तिही सुंदरच होती व तिही अस्र शस्र विद्येत आपल्या आईसारखीच पारंगत होती.
त्यांचे ते प्रेम. ते प्रेम माहीत होताच दुर्योधनानं तिचं स्वयंवर आयोजीत केलं. त्याला वाटत होतं की तिनं आपला मित्र कर्ण, त्या कर्णाच्या मुलाशी वृषकेतूशी विवाह करावा. त्यासाठीच त्यानं स्वयंवर आयोजीत केला होता. परंतू तिला ते माहीत होताच ती पळून गेली व तिनं सांबशी गंधर्वविवाह केला.
गंधर्वविवाह तो. तो विवाह दुर्योधनाला मान्य नव्हता. तसं ते स्वयंवर. त्याचं आयोजन झालं व त्यात गंधर्वविवाह करणारा सांबही हजर होता. तशी वरमाला लक्ष्मणाच्या हाती होती. तेव्हा सांबनं तिचा हात पकडला व तिला आपल्या रथावर बसवून तो आपल्या द्वारकेकडे निघाला. त्याचे पाठोपाठ कर्णपुत्र वृषकेतूही.
सांब आणि लक्ष्मणाचा विवाह होणं दुर्योधनाला पसंत नव्हतं. कारण त्याला क्रिष्ण आवडत नव्हता व सांबच्या रुपानं क्रिष्णाशी नातं जोडणंही त्याला आवडत नव्हतं. त्यामुळंच सांब त्याच्या मुलीचा पती. ही कल्पनाही त्याला असह्य होती.
क्रिष्ण न आवडण्याचं एकमेव कारण होतं. ते म्हणजे क्रिष्णाचे पांडवांच्या बाजूनं बोलणे. दुर्योधन अगदी लहाणपणापासूनच त्याचा मामा शकूनीनं त्याच्या मनात पेरलेल्या विषामुळं पांडवांचा द्वेष करीत होता.
सांबनं लक्ष्मणाला पळवून नेताच वृषकेतूच्या पाठोपाठ संपूर्ण कौरव सेना त्याच्या मागावर गेली. दुर्योधनही जाण्याच्या तयारीतच होता. तेव्हा भानुमती म्हणाली,
"पाहिलंत, काय घडत आहे ते. आज तुमची मुलगी त्या सांबसोबत पळून गेली. त्याचं तुम्हाला अतिशय वाईट वाटतंय. वाईट वाटतंय ना. परंतू आता विचार करा की काल जेव्हा मला आपण माझ्या मायबापाच्या घरुन जबरदस्तीनं उचलून आणलं. तेव्हा माझ्या वडीलांना कसं वाटलं असेल."
लक्ष्मणा सांबसोबत पळून गेली होती. त्यातच असा प्रकार मुलीनं घडविल्यानं दुर्योधनाला अतिशय राग आला होता. त्यातच आता भानुमती तसं बोलताच त्याचा संताप अनावर झाला. परंतू तो विवश होता. तो भानुमतिला काहीही बोलला नाही व हातात शस्रास्रे घेवून तोही सांबच्या मागावर निघाला. थोड्याच वेळात त्यांनी सांबला गाठलं. त्यानंतर कौरव सेना व श्रीकिष्णपूत्र सांबशी घनघोर लढाई झाली व त्या शेकडो कौरवांपुढं एकट्या सांबचं काहीही चाललं नाही व त्याला कौरवसेनेनं बंदी बनवलं.
सांबला बंदी बनविल्याची गोष्ट श्रीक्रिष्णाला माहीत झाली. त्याचबरोबर ती गोष्ट बलरामलाही. तो अतिशय क्रोधीत झाला. कारण तो यादवकुलाचा अपमान होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी बलराम हल घेवून हस्तीनापूरला आला. त्याच्या हलाच्या पुढे हस्तिनापूरच्या द्वारपालाचंही काहीच चाललं नाही. शेवटी भानुमतिच्या म्हणण्यानुसार सांबला सोडलं गेलं व बलरामच्या उपस्थितीत पुन्हा लक्ष्मणाच्या स्वयंवराचं आयोजन करण्यात आलं. ज्या स्वयंवराला सांबही उपस्थीत होता.
लक्ष्मणाचा दुस-यांदा स्वयंवर. परंतू या स्वयंवरात कोणीही राजकुमार आला नव्हता. फक्त कर्णपुत्र वृषकेतू उपस्थीत होता. त्यावेळी वृषकेतूनं म्हटलं की मी आता लक्ष्मणाशी विवाह करु इच्छीत नाही. त्यावर तोही स्वयंवरातून बाद झाला. शेवटी नाईलाजानं सांबचा स्विकार दुर्योधनाला करावा लागला व लक्ष्मणा सांबशी विवाहबद्ध झाली.
विवाह.......कालपरत्वे जो दुर्योधन सांब आणि लक्ष्मणाच्या विवाहाला पसंती देत नव्हता. त्यानं आज अगदी आनंदानं आपल्या मुलीच्या, सांबसोबतच्या विवाहाला पसंती दिली. त्याचं कारणंही तसंच होतं. ज्यावेळी लक्ष्मणा व सांबचा विवाह झाला, त्यावेळी तिथे बलराम उपस्थीत होता. ज्यानं दुर्योधनाला गदायुद्धाचे डावपेच शिकवले होते.
लक्ष्मणा उपवर होताच तिच्या विवाहाची जी चिंता दुर्योधनाला पडली होती. ती चिंता आज तिच्या विवाहानं मिटली होती. आज तो आनंदीत होता. त्याचबरोबर ती भानुमतिही. कारण या तिच्या पुत्रीच्या विवाहानं तिच्या अपमानाचा बदला पूर्ण झाला होता.
भानुमतिला जुनं सगळं आठवत होतं आज. त्या दुर्योधनानं आपल्याला कसं स्वयंवरातून उचलून आणलं आणि आपल्या वडीलाचा कसा अपमान केला तो. आज अगदी तसंच घडलं होतं. दुर्योधनानं अगदी भानुमतिला स्वयंवरातून उचलून जसं आणलं, तसंच त्या सांबनं लक्ष्मणालाही उचलूनच नेलं होतं स्वयंवरातून. एवढंच नाही तर सांबनं आपल्या यादवकुलाची अब्रूही वाचवली होती.

****************************************

महाभारताचं युद्ध सुरु होणार होतं. भानुमती ते टाळायचा प्रयत्न करीत होती. तिला माहीत होतं की या युद्धाचे परिणाम गंभीरच होणार. कितीही सेना आणि शूरवीर आपल्या पतीच्या बाजूनं असले तरी क्रिष्ण आज पांडवांच्या बाजुला असल्यानं आपला पती युद्ध जिंकूच शकणार नाही हे तिला माहीत होतं. तसं तिनं बरेचवेळा दुर्योधनाला समजावलंही होतं की मालमत्तेचा नाद सोडा. परंतू तो काही एक ऐकत नव्हता. पांडवांनाही त्याचा रागच होता. कारण भर दरबारात त्यानं द्रोपदीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता.
वृषाली..........कर्णाची पत्नी होती ती. ती सूतकन्या होती. परंतू ती सुशील व चारित्रवान होती. प्रेमळ होती. तसं तिला येणारं संकट कळलं होतं.
दुर्योधन प्रत्येक गोष्ट आपल्या पत्नीला सांगत असे. तो पत्नीवर अतिशय प्रेम करीत असे. तिच्यावर कधी शंकाही घेत नसे. मात्र भानुमतिला तो आवडत नव्हता कारण त्याचं कुत्सीतपण. त्याचं वागणंच विचित्र होतं आणि तो पत्नी भानुमतीवर निरतिशय प्रेम जरी करीत असला तरी तिचे सल्ले मात्र तो कधीच ऐकत नव्हता. त्यातच त्याचं नेहमीच अहीत होत गेलं. कारण भानुमती त्याला अकलेच्या गोष्टी सांगायची. परंतू तो मात्र आपली अक्कल त्यात लावत नव्हता. तो आपल्या मामावरही निरतिशय प्रेम करीत असे व आपल्या मामाच्याच सल्ल्याने चालत असे.
द्यूतक्रिडेची गोष्ट त्यानं भानुमतिला सांगीतली होती. ज्यावेळी दुर्योधनानं द्यूतडाव रचला होता. ती गोष्ट भानुमतिला दुर्योधनाकरवी माहीत झाली आणि हेही माहीत झालं की पांडव द्यूतडाव हारणार. तेव्हा संभाव्य धोका लक्षात घेवून तिनं आपली सखी असलेल्या सुप्रियाला ही गोष्ट सांगीतली आणि हेही सांगीतलं की त्या द्रोपदीला समजवा आणि तिला कसेही करुन तिच्या माहेरी पाठवा. म्हणजे तिची भर दरबारात अब्रू लुटली जाणार नाही. तेव्हा त्या सुप्रियानं ती गोष्ट आपली सवत असलेल्या वृषालीला सांगीतली व हेही सांगीतलं की नारी सन्मान व्हायला हवा. आता द्रोपदीची अब्रू आपल्याच हातात आहे.
वृषालीनं आपली सवत असलेल्या सुप्रियाकडून ही गोष्ट ऐकताच ती द्रोपदीकडे गेली व तिला संभाव्य धोका सांगून समजवू लागली की द्यूतक्रिडा खेळली जाणार आहे आणि त्यात पांडव डाव हारणार आहे. तसेच त्या डावात तुलाही लावायचा प्रयत्न पांडवहस्ते होणार आहे. तेव्हा शक्य तितक्या लवकर तिनं माहेरी जावं व आपली अब्रू वाचवावी.
वृषालीनं बोललेले शब्द. तशी द्रोपदी म्हणाली,
"सखे, तू मला सावध केलं ते बरं केलं. परंतू माझा माझ्या पतीवर विश्वास आहे. माझे पती प्रसंगी द्यूतडाव खेळतीलही. परंतू ते त्या द्यूतात माझा लिलाव करणार नाही. कारण मी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ओळखते."
द्रोपदीला वृषालीनं नानाप्रकारे समजावलं. परंतू द्रोपदीनं ते ऐकलं नाही. शेवटी ती निराश होवून द्रोपदीच्या राजमहालातून चालती झाली. त्यानंतर द्यूतक्रिडा खेळली गेली व आधीच नियोजन केल्यानुसार पांडवांना उकसवून दुर्योधनानं द्रोपदीलाही द्यूतडावात मांडायला बाध्य केलं व द्रोपदीला द्युतडावात मांंडले असता पांडव हारले. त्यातच कौरवांना द्रोपदीची अब्रू लुटण्यास मार्ग मोकळा झाला.
द्रोपदी बेसावध होती वृषालीनं तिला सावध केलं तरीही. त्यातच पांडव द्यूतडाव हारताच दुर्योधनानं दुःशासनाला द्रोपदीकडे पाठवलं. दुःशासन द्रोपदीकडं गेला. त्यानं तिला घडलेला प्रसंग सांगीतला व हेही सांगीतलं की आपल्या भावानं तिला बोलावून आणायला सांगीतलं आहे. जर ती येणार नसेल तर तिला तो ओढून नेलं जाणार.
द्रोपदीनं दुःशासनाकरवी ते सगळं ऐकलं. तिला निश्चीतच वाटलं की यात काहीतरी विपरीत घडलं आहे. कदाचीत यात दुर्योधनानं फसवलं आहे आपल्या पतीला. त्याशिवाय ते कधीच तिला द्यूतडावावर लावू शकणार नाही. तशी ती म्हणाली,
"दुःशासना, तू आणि तुझा भाऊ असा कसा बोलतोय की द्रोपदीला दरबारात आणा. ती सहज येत नसेल तर तिला ओढून आणा. माहीत आहे मी इंद्रप्रस्थची महाराणी आहे. मला सन्मानानं तुम्ही दरबारात न्यायला हवं."
द्रोपदीचे ते बोल. तसा दुःशासन म्हणाला,
"कोणतं इंद्रप्रस्थ आणि कोणती महाराणी? हे इंद्रप्रस्थही माझ्या भावानं जिंकलं आहे द्यूतात. त्याचबरोबर तुझे पतीही आमचे दास बनले आहेत आणि तूही आमची दासी. तुला माहीत व्हावं म्हणून सांगतो की दासीची दरबारात काहीही इज्जत नसते. आता ब-या बोलानं चाल. नाहीतर ओढत नेवू."
द्रोपदीनं ते दुःशासनाचे शब्द ऐकले. ते काळजाला चिरुन गेले तिच्या. तळपायाची आग मस्तकात गेली. तशी ती म्हणाली,
"नाही जर आली तर काय करणार?"
"ओढून नेणार. दुसरं काय?"
"हात लावून तर बघ."
द्रोपदीनं म्हटलेले शब्द. ते शब्द शब्दबाण ठरले नाहीत. तसा तिच्या बोलण्याचा दुःशासनालाही राग आला व तो तिच्या दिशेने धावतच माडीवर गेला. त्यानं तिचे केसं पकडले व तो तिला ओढत ओढत हस्तीनापूर दरबारात नेवू लागला व लाचार असलेली द्रोपदी आता वृषालीचे शब्द आठवू लागली. जो सल्ला वृषालीकरवी व सुप्रियाकरवी भानुमतीनं दिला होता. आता तिला वाटत होतं की जर मी वृषालीचं ऐकून माझ्या माहेरी गेली असती तर कदाचीत ही वेळ आली नसती.
दुःशासनानं द्रोपदीला, तिचे केस ओढत ओढत दरबारात नेलं होतं. त्यातच तिथं तिच्या पतीसमोरच तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले जावू लागले. परंतू ना कोणी तिचं रक्षण करीत होतं. ना कोणी धावत होता. तसेच तिथे उपस्थीत असलेले तिचे पतीही धावत नव्हते. शेवटी तिला आठवलं की आपलाही एक भाऊ आहे क्रिष्ण. जो यावेळी धावत येवून आपली मदत करू शकतो.
द्रोपदीनं अंदाज बांधला की यावेळी फक्त एक क्रिष्णच असा एक व्यक्ती की जो धावत आपली मदत करायला येवू शकतो. त्यामुळे तिनं सर्व सोडलं व ती क्रिष्णाचा धावा करु लागली.
ती ऐन संकटाची वेळ. क्रिष्णानं तिचा करुण आवाज ऐकला. तसा तोच एक धावून आला तिची अब्रू वाचवायला. परंतू त्याचवेळी त्यानं सांगीतलं की हे कौरवांनो, तुम्ही जे काही यावेळी केलं, ते बरं नाही केलं. कारण आजच्या तुमच्या वागण्यातून युद्धाचा शंखनाद फुंकला गेला आहे.
क्रिष्णानं आपले बोल ऐकवले. तसा दुर्योधन म्हणाला,
"हे क्रिष्णा, आम्हाला तुमचं काहीएक ऐकायचं नाही. आम्ही काय करावं आणि काय नको हे काही आम्हाला सांगायची गरज नाही."
दुर्योधनाचे ते वाह्यात बोल. ते ऐकताच क्रिष्ण खजील झाला. त्यानंतर तो चालता झाला. मात्र यावेळी त्याच्या मनात होतं की आता पुन्हा द्वारकेला यायचं नाही. तशी जणू तो प्रतिज्ञाच करून आज जात होता.
तो युद्धाचा थरार. भानुमतिनं व क्रिष्णानं महाभारत युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी बराच प्रयत्न केला. परंतू त्यांना अपयशच आले होते. भानुमती समजावून सांगत होती आपल्या पतीला. परंतू तो काही तिचं ऐकण्याच्या मानसीकतेत नव्हता. त्यामुळे तिलाच कधीकधी काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तिनं त्या दुर्योधनाला सांगणच बंद केलं. क्रिष्णानंही तेच केलं. परंतू कौरव किंचीतही समजत नव्हते. त्यामुळे काय करावं सुचत नव्हतं. तरीही शेवटची संधी म्हणून पांडवांनी दिशानिर्देश दिले, म्हणून क्रिष्ण पुन्हा एकदा हस्तिनापूरला जाण्यासाठी तयार झाला होता.

***********************************************

ही शेवटची वेळ होती कौरवांना समजवायची. कारण त्यापुर्वी बरेच वेळा क्रिष्णानं कौरवांना समजवलं होतं. परंतू कौरव काही ऐकतच नव्हते. शेवटी त्यानंही नाद सोडून दिला होता. परंतू यावेळी पांडव विनंतीला मान देवून क्रिष्ण हस्तिनापूरला आला.
क्रिष्णानं हस्तिनापूरला प्रवेश केला. ते यावेळी शांतीदूत म्हणून. तेव्हा क्रिष्णाचं हस्तिनापूरला चांगलं आगतस्वागत झालं. परंतू ज्यावेळी त्यानं शांतीदूत म्हणून शांतीचा प्रस्ताव मांडला, तेव्हा दुर्योधनानं क्रिष्णाचा दोष नसताना एकप्रकारे त्याचा अपमानच केला व एवढंच केलं नाही तर त्याला बंदी बनविण्याचाही प्रयत्न केला. परंतू तो क्रिष्ण होता. तो कसा काय बंदी होईल. शेवटी बंदीदरम्यान त्यानं आपले विराट रूप दाखवले. त्यानुसार त्याला कोणीही पकडू शकलं नाही. तो सुखरूप परत आला. शेवटी युद्ध झालंच.
सर्वांना कल्पना होतीच की युद्धामध्ये काय परिणाम निघणार. म्हणूनच ते समजावीत होते दुर्योधनाला. परंतू तो काही समजतच नव्हता. तसं भानुमतिनंही बरेच वेळा त्याला समजावून सांगीतलं होतं. परंतू तरीही त्यानं तिचंही ऐकलं नाही. आपण मोठे, आपली फौज मोठी, आपल्याकडे मोठ मोठे वीर आहेत. याच गुर्मीत तो जगत राहिला शेवटपर्यंत. त्यालाही वाटत होतं की हे पांडव माझा काका पांडवांची मुलं नाहीत व त्यांना या राज्यातील एक इंचही भुमी मिळू नये. कारण उद्या कोणीही येईल व ही माझीच मुलं असा प्रस्ताव ठेवेल व राज्याची मागणी करेल.
************************************************

महाभारतातील युद्ध सुरु झाले होते. एकेक वीर मरत होते. त्यांच्या पत्नी विधवा होत होत्या. शरणं पेटवली जात होती. तेव्हा त्या शरणात काही स्वामीनिष्ठ भार्या स्वतःला झोकून देत होत्या.
भिष्म पितामहा मृत्यूशय्येवर झोपले होते. काही वीर मरण पावले होते. त्यांचं शरणही पेटलं होतं व त्याची राखही थंड झाली होती. अशातच एकेक वीर मरण पावत चालला होता आणि एकेक विरांच्या मृत्यूच्या बातम्या भानुमतिच्या कानावर येत होत्या. अशीच तिच्या कानावर आलेली ती दुर्दैवी बातमी.
भानुमती अंगणात बसली होती. तसा एक दूत तिच्याजवळ धावत आला. तो अतिशय घाबरला होता. त्याच्या तोंडातून शब्दही फूटत नव्हते. तसं भानुमतीनं त्याला पाणी दिलं. तसा तो दूत पाणी प्यायल्यावर ती म्हणाली,
"काय झालंय. अशा धापा का टाकतोस?"
तो दूत. त्याच्या तोंडून शब्द फूटत नव्हते. तशी भानुमती म्हणाली,
"काय झालंय? युद्धच ते. कोणी ना कोणी मरणारच. आज कोण मरण पावलं? आपल्याकडील मरण पावलं की पांंडवाकडील?"
"महाराणीसाहेब, घात झाला."
"अर्थात?"
"महाराणीसाहेब, घात झाला."
"काय झालं? गुरुवर्यांना वीरगती प्राप्त झाली की काय? परमेश्वरा, हे युद्ध कशाला थोपवलंय हस्तिनापूरात. माझ्या पतिरायांना सद्बुद्धी का दिली नाही. कदाचीत ती बुद्धी थोडीशीही दिली असती तर आज युद्ध झालं नसतं. बोल दूता, काय झालं?"
" आपले लक्ष्मण.........."
"काय झालं लक्ष्मणाला?"
"ते आज जगात नाहीत."
"म्हणजे? कोणं मारलं माझ्या लक्ष्मणाला?"
"अभिमन्यू. अर्जून पुत्र अभिमन्यू."
दूतानं पुरता निरोप सांगीतला व तो निघून गेला. तशी ती विलाप करु लागली.
'माझा लक्ष्मण.......बिचा-याचे दुधाचे ओठंही सुकले नाहीत, त्या अभिमन्यूनं मारलं त्याला आणि तो युद्धात उतरला आणि त्या लहानग्यानं लक्ष्मणाला ठार केलं. त्या अभिमन्यूनं. तो लहान असून सरस ठरला. बिचारा माझा पुत्र. लवकरच तो वीरगतीस प्राप्त झाला. अन् त्याला मारत असतांना हे एवढे वीर, रथी महारथी काय करीत होते. तो द्रोणाचार्य काय करीत होता आणि कर्ण.........तोही मांडी घालून बसला होता की काय? अन् तो त्याचा बाप. तो तर मोठमोठ्या डिंगा हाकलत होता. युद्ध आपणच जिंकू. आपल्याकडे मोठमोठे वीर आहेत. गुरुदेव आहे. कर्ण आहे. भिष्म आहे. भिष्माचं ठीक आहे की ते मृत्यूशय्येवरच लोटलेले आहेत. परंतू कर्ण आणि गुरुवर्य! ते काय करीत असतील बरे! नाही. आज युद्धविराम होताच मला त्यांना भेटायला जावं लागणार. आपली कैफीयत सांगावी लागणार व म्हणावं लागणार की उद्याचा चंद्र त्या अभिमन्यूला दिसायला नको. पाहूच उद्या तो अभिमन्यू उद्याचा चंद्र कसा पाहतो ते. जर उद्याचा चंद्र दिसलाच त्याला तर या कौरवांच्याकडील रथी महारथी बांगड्याच घालायच्या लायकीचे राहतील.'
भानुमतिला अतीव दुःख झालं होतं. तशी ती विलाप करीत रडत होती आणि हेही म्हणत होती की शेवटी युद्धच ते. हे सर्व घडणारच.
सायंकाळ झाली होती. तसा शंखनाद झाला व युद्धविराम करण्यात आला. त्यानंतर कौरव पांडव युद्धात मरण पावलेल्या लोकांची भेट घेवू लागले. जे जखमी झाले होते व वाचले होते. त्यांचे हालहवाल विचारु लागले. त्यानंतर ते आपआपल्या छावणीत गेले.
ज्याप्रमाणे पांडव आपआपल्या छावणीत गेले. त्याचप्रमाणे कौरवही आपल्या छावणीत गेले होते. तोच तिथं भानुमती आपली सखी वृषाली व सुप्रिया आणि काही दास्यासह हजर झाली. तिनं पाहिलं की सर्व कौरवपती आपआपल्या सिंहासनावर बसलेले असून एकमेकांशी चर्चा करीत आहेत. तसा द्रोणाचार्य आणि कर्णही आपल्या आपल्या सिंहासनावर बसलेले असून एका सिंहासनावर तिचा पती दुर्योधनही आहे.
भानुमतीनं ते सगळं पाहताच संधी साधत ती रडक्या आवाजात म्हणाली,
"सिंहासनावर बसलेल्या सर्व रथी महारथींना माझे सादर प्रणाम. मी दुर्योधन पत्नी व लक्ष्मणमाता भानुमती आज तुम्हाला भेटायला आली आहे. भेटायलाच नाही तर चर्चाही करायला आली आहे आणि जाब विचारायला आली आहे की आपण एवढे मोठमोठे वीर. आपल्या केवळ नावानंच स्वर्गही थरथर कापतो. मोठमोठे राक्षस आपल्या केवळ बाहूबलापुढे ध्वस्त होतात आणि आज तुमच्याच या लाचारपणानं माझा लक्ष्मण मारला गेला. कोणं मारला माहीत आहे? त्या छटाकभर अभिमन्यूनं. अन् तुम्ही काय बांगड्या घालून बसले होते की काय हातात?"
भानुमती भानावर नव्हती. ती बोलत होती काहीबाही. ते जेष्ठ आहेत. श्रेष्ठ आहेत याचंही भान नव्हतं तिला. तसा दुर्योधन उभा झाला. म्हणाला,
"प्रिये, तू चूप बस. तुला कळतंय का की तू का बोलत आहेस? अगं हे सर्व तुझ्यापेक्षा मोठे आहेत. यांनी मोठमोठ्या लढाया पाहिलेल्या आहेत आणि शेवटी युद्धच ते. त्या युद्धात कोणी ना कोणी सगासंबंधी मारला जाणारच. त्यात एवढं दुःख करायचं कारण काय? तुला युद्धाचं काहीएक कळतेय का? तुला युद्धाचं काहीच कळायचं नाही."
सर्व कौरवअधीपती भानुमतिचे बोल ऐकत होते. तसा कर्ण उभा झाला. तो दुर्योधनाच्या जवळ गेला. त्याला जाग्यावर बसवत तो म्हणाला,
"मित्रा, खाली बस. बोलू दे भानुमतिला. तिलाही दुःख झालं आहे. ती दुःख व्यक्त करते आहे. ती दुःखात असल्यानं तशी बोलत आहे. पुत्रवीरहानं तिलाही राग आला आहे. त्यामूळं कोणीही राग मानायचं कारण नाही."
कर्णानं तसं म्हणताच दुर्योधन खाली सिंहासनावर बसला व पुन्हा भानुमती बोलायला मोकळी झाली.
"हे बघा, तुम्ही जर शूरवीर असाल आणि तुम्हाला एका आईचं रुदन जर कळत असेल तर एक काम करा. उद्या कोणत्याही परिस्थितीत अभिमन्यूनं रात्रीचा चंद्र पाहता कामा नये. तरच मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणेल आणि जगंही तुमच्यावर ताशेरे ओढणार नाहीत. नाहीतर तुम्हाला त्या विराट दरबारी बांगड्या घातलेल्या बृहन्नलासारखे संबोधावे लागेल."
भानुमती असं म्हणताच युद्धछावणीतून निघून गेली होती. तशी ती गेल्यावर सर्व कौरव महारथी अभिमन्यूहत्येचा कट रचत होते. त्यात दुर्योधनाचा जावई जयंद्रथंही होता.
भानुमतिच्या चिथावण्यानुसार द्रोणानं अभिमन्यूला ठार करण्यासाठी चक्रव्युहाची रचना केली. त्यानुसार ठरलं की अर्जुनाला आणि अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येतं. त्यामूळं कोणीतरी अर्जुनाला दुसरीकडं भटकवावं. म्हणजे अभिमन्यू चक्रव्युहात येईल व फसेल. कारण अभिमन्यूला चक्रव्युहातून बाहेर पडता येत नाही. मग जसा तो चक्रव्युहात फसला रे फसला की त्याला आपण ठार करुन टाकू.
द्रोणाचार्यनं लवकरच चक्रव्युहाची योजना बनवली व तो ती योजना कार्यान्वीत करण्यासाठी दिवस उजाडण्याची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात दिवस उजाळताच व युद्धाचा शंखनाद होताच त्यांनी योजनेनुसार अर्जुनाला लक्षापासून भटकवलं. त्यानंतर त्यांनी चक्रव्युह रचला व त्या चक्रव्युहाला तोडणारा अर्जून तिथे नसल्यानं साहजीकच ते चक्रव्यूह तोडण्यासाठी अभिमन्यूला जावं लागलं व त्यातच त्याचा अंत झाला. अभिमन्यूला दुर्योधनाचा जावई जयद्रथानं ठार केलं होतं.
अभिमन्यू मरण पावला होता. तशी ती बातमी हा हा म्हणता भानुमतिच्या कानावर आली. परंतू ती खुश झाली नाही. तिचा बदला पूर्ण झाला तरी. ती नाखुशच होती. कारण तिला माहीत होतं की युद्धामध्ये तिच्या चिथावण्यानं कोण्या मातेचा एक लहान मुलगा मरण पावला होता. ज्याचे दुधाचेही ओठ सुकलेले नव्हते.
भानुमतिला असं वाटत होतं की युद्ध विराम व्हावा. कारण हे युद्ध पुर्ण हस्तिनापूरातील व पूर्ण पांडवाकडील लोकं संपवेल. रथी महारथी मारले जातील. ती तशी प्रयत्नही करीत होती. परंतू तिचा पती तिचं ऐकेल तेव्हा ना. दुर्योधनाशी त्या गोष्टीवर ती बोलत असतांना तो तिलाच मुर्खात काढत चूप बसवायचा व तिचं ऐकायचा नाही.

************************************************

महाभारताचं युद्ध सुरु होताच सर्व राज्यात हाहाकार उडाला होता. त्यातच त्यांच्या भार्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. कोण केव्हा मरेल व कोणाच्या चितेवर केव्हा सती जावं लागेल याचा काही नेम नव्हता. अशातच बातमी पसरली की द्रोणाचार्य मरण पावला. त्यानंतर कर्ण.
कर्ण मरण पावला होता. त्याचं अतिव दुःख दुर्योधनाला झालं होतं. कारण त्याच्या विवाहाच्या पुर्वीपासूनच कर्ण हा त्याचा मित्र होता. त्याच्याचमुळे त्याला भानुमती मिळाली होती. तसेच त्याच्याचमुळं त्यानं कितीतरी युद्ध जिंकले होते. भानुमती स्वयंवराचे वेळी प्रतिस्पर्धेतून मागे न हटलेल्या जयद्रथालाही त्यानं धूळ चारली होती. त्याचाच पराक्रम पाहून पुढे जयद्रथ कर्णाचा चांगला मित्र बनला होता. त्यानंतर संबंध होवून तो दुर्योधनाचाही जावई झाला होता.
कर्ण...... कर्णानं पुष्कळ लढाया जिंकल्या होत्या. त्यानं प्रसंगी अर्जुनालाही युद्धात हारवले होते. असा शूरवीर कर्ण. ज्याला दिग्विजयी कर्ण संबोधलं जायचं. तो आज धराशायी झाला होता. त्यानं केलेली दुर्योधनाला अपार मदत. त्या मदतीमूळच दुर्योधनाला अतिशय हतबल वाटत होतं. आता युद्ध लढून काही उपयोग नाही असं त्याला वाटत होतं. परंतू शरणागती पत्करावी कशी? लोकं काय म्हणतील. याचाही तो विचार करीत होता. कर्णाच्या जाण्यानं आपला जणू उजवा हातच गेला आहे असं दुर्योधनाला वाटायला लागलं होतं.
कर्णाचं दुःख ज्याप्रमाणे दुर्योधनाला झालं. त्याचप्रमाणे ते दुःख वृषालीलाही झालं होतं. कारण ती त्याची पत्नी होती. तसंच सुप्रियालाही. कारण तिही त्याचीच पत्नी होती. परंतू भानुमतिलाही ते दुःख झालं. ही आश्चर्य करणारी गोष्ट होती. त्याचं कारणही तसंच होतं. ती जरी कर्णाची पत्नी बनली नसली, तरी तिचं कर्णावर प्रेम होतं. परंतू दुर्योधन आणि कर्णाच्या मैत्रीचं नातं आडवं आल्यानं ती चूप होती. तसं पाहता कधीकधी माहेरच्या प्रकरणावरुन भानुमती आणि दुर्योधनाचे खटके उडत. तेव्हा तेव्हा हाच कर्ण मधस्थी करुन ते वाद संपवत असे. तो दोघांनाही समजवीत असे व त्यांचे वादविवाद मिटवीत असे.
कर्ण मरण पावला. त्यावेळी भानुमतिला कर्णाच्या मागच्या सर्व आठवणी आठवत होत्या. त्याचा विवाह होण्यापुर्वीची त्याची शूरवीरता तिला आठवत होती व तोही क्षण आठवत होता. जेव्हा ती स्वयंवरात त्याचेच गळ्यात वरमाला घालणार होती. परंतू ती पुढे जाताच दुर्योधनानं तिची वरमाला घेवून ती आपल्या गळ्यात कशी घातली व आपण कर्णाला कशी तिलांजली दिली. हा सर्व भाग तिला आठवत होता. व्यतिरीक्त तो एकदाचा प्रसंग आठवत होता. जेव्हा ती कर्णासोबत चौसर खेळत असतांना तिचा पदर कर्णानं धरला असता. त्याच्या हातून मोत्याची माळ तुटली होती. त्यावेळी न घाबरणाराही कर्ण दुर्योधनाला घाबरला होता व तेही आठवत होतं की दुर्योधनानं त्यावर काहीही न म्हणता केवळ कर्णासोबत मिळून ते मोती गोळा कर. असं मिश्किलपणे म्हटलं होतं.
कर्णासोबत कर्णाच्या मृत्यूनं आज चौसर खेळणं संपलं होतं. भानुमतिचं जे काही कर्ण मनोरंजन करीत होता. ते सर्व संपलं होतं. आता जीवनात काहीच सारस्य राहिलं नाही असंही तिला वाटत होतं. कारण तो होता म्हणून तिचं दुर्योधनाशी आजपर्यंत पटलं नव्हे तर पटवून घेतलं. नाहीतर दुर्योधनाशी आपलं कधीच पटलं नसतं असंही तिला आज वाटत होतं. त्याला कारणीभूत होता दुर्योधनाचा स्वभाव.
कर्ण मरण पावला. त्याचं सर्वात जास्त दुःख जसं दुर्योधन व भानुमतिला झाले. तसेच सर्वात जास्त दुःख वृषालीलाही झाले. ती चारित्रवान स्री त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर सती गेली. परंतू पुत्रसांभाळ यासाठी सुप्रिया मात्र सती गेली नाही. ती बरेच दिवस कर्णाच्या मृत्यूनंतर वैधव्याचं जीवन जगत राहिली.

************************************************

भिमानं जसा दुर्योधनाच्या मांडीवर वार केला. तसा अगदी जीवाच्या आकांतानं भीम ओरडला. त्यातच तो धराशायी झाला.
दुर्योधन धराशायी होताच भीम तेथून निघून गेला व भीम निघून जाताच तिथे कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा आले. त्यांना दुर्योधनाची अवस्था पाहणे बरे वाटत नव्हते. तोही अति जराजर्जर वेदनेनं तळपत होता. तसे ते तिघंही दुर्योधनाजवळ बसले. ते त्याची सांत्वना करु लागले. तोच दुर्योधन म्हणाला,
अश्वत्थामा, मला आजच पाच पांडवांचे मुंडके हवेत. बोल आणून देशील."
अश्वत्थामानं काहीही विचार न करता होकार दिला. कारण त्याला वाटत होतं की त्यात पांडवांनी त्याचे वडील द्रोणाचार्यला अधर्मानंच मारलेलं होतं.
"आपण आताच जावूया पांडवांचे डोके कापण्या." अश्वत्थामा म्हणाला.
"आता! यावेळी. आता रात्र आहे. ते सर्व पांडव झोपले असतील आपल्या छावणीत आणि आता रात्र आहे. झोपेत कुणावरही प्रहार करु नये हा नियम आहे युद्धाचा." कृपाचार्य म्हणाले.
"नाही. मी आज नियम पाळणार नाही कोणताच. माहीत आहे पांडवांनी माझ्या वडीलाला ठार केलं, तेव्हा कोणता नियम पाळला होता. कोणताच नाही ना. मग आजच का पाळायचा नियम? आपण आजच जावूया व पांडवांचं मस्तक कापून आणूया."
दुर्योधनासमोरच अश्वत्थामाचं ते बोलणं. तसे ते त्याच रात्री पांडवछावणीत गेले व तेथे झोपलेल्या पांडवांच्या पाचही मुलाचं मस्तक छाटलं व ते मस्तक दुर्योधनाला त्यांनी आणून दिले. तसा दुर्योधन अगदी गदगद झाला. त्याला वाटलं की खरंच अश्वत्थामानं पांडवांना ठार करुन ते मस्तक त्याच्यासमोर आणलेले आहे. तसा तो म्हणाला,
"शाबास अश्वत्थामा शाबास. जे काम मलाही करता आलं नाही. ते काम तू अगदी सफाईनं केलं. विजय आपलाच झाला आहे. पांडव निव्वळ हारलेच नाही तर संपले आहेत. आता मी सुखाने मरेल. तुम्ही जा आता. मला एकटं सोडा. तुम्हीही थकले असालच कदाचीत. जा. आराम करा."
जराजर्जर वेदना भोगत असलेल्या दुर्योधनाचे ते शब्द. ते शब्द ऐकताच अश्वत्थामाला अगदी प्रसन्न वाटलं व तो दुर्योधनाला तिथं एकटं सोडून आपल्या छावणीकडं परतला. तसा दुसरा दिवस उगवला.

************************************************

हळूहळू एकेक वीर मरण पावले होते. द्रोणाचार्य मरण पावले, त्यानंतर कर्ण व त्यानंतर शकूनी. एकेक करीत सा-याच वीरांना वीरगती मिळाली होती.
आज अगदी अस्वस्थ वाटत होतं भानुमतिला. काय कारण होतं कुणास ठाऊक. सारेच वीर संपले होते आता. फक्त अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा शिल्लक होता आणि दुर्योधन. त्यातच दुर्योधनाला वाटत होतं की पांडवांनी सर्वांचा वध केला. आता माझाच क्रमांक आहे.
साक्षात मृत्यू पुढे पाहात असलेला दुर्योधन. तरीही तो शरणागती पत्करायला तयार नव्हता. त्याला आज शेवटच्या समयी भानुमती सल्ला देत होती की आताही वेळ गेलेली नाही. तेव्हा अजूनही काही बिघडलं नाही. आताही देवून टाका पाच गावं पांडवांना.
भानुमतिचा सल्ला. तरीही तो दुर्योधन तिचं ऐकायला तयार नव्हता. त्यातच आता तो मृत्यू समोर पाहून त्या तलावात लपून बसला. तेही अभय होवून. तरीही त्याला त्याची आई गांधारीनं नेत्र उघडून लोखंडाचं बनवलं होतं.
आज तिसरा दिवस होता दुर्योधनाला घायाळ होवून. त्याला भिमानं घायाळ केलं होतं. तसा त्यानं त्या भिमाचा बदलाही घेतला आहे असं त्याला वाटत होतं. कारण दुर्योधनानं सांगीतल्यानुसार अश्वत्थामानं त्या पांडवांच्या पाचही मुलांचे मुंडके कापून आणून दुर्योधनाला दाखवले होते व त्यावरुन दुर्योधनाला समजले होते की पांडव मरण पावले.
आज तिसरा दिवस होता. परंतू आज तिस-या दिवशी दुर्योधनाला युद्धाचा तिटकारा वाटत होता. वाटत होतं की युद्ध व्हायलाच नको. मग ते परिवारातील युद्ध का असेना, कारण युद्धामुळं बदल्याची भावना निर्माण होते. काल द्रोणाचार्यला ध्रृष्टधुम्ननं मारलं नव्हेतर पांडवानं आणि आज त्याच्या हत्येचा बदला घेत अश्वत्थामानं त्या धृष्टधुम्नला व पांडवांना मारलं. उद्या हे पांडव वंशज या माझ्या वंशजांना मारतील. पुढं माझे वंशज त्यांना. बदला आणि बदल्याची भावना कधीच समाप्त होणार नाही. परंतू आपण हे बंद करायला हवं. परंतू कसं करणार! कोणाला आवाज देणार. कोण येणार आपल्याजवळ? आपण तर साधे चालूही शकत नाही. तसा तो विचार करीत असतांना त्याला कोणाचा तरी आवाज आला. तसं त्यानं डोळे उघडून पाहिलं. त्याला त्याच्या समोर भानुमती उभी असलेली दिसली. तसा तो म्हणाला,
"बोल भानुमती, बोल काहीतरी."
"तुम्हीच बोला स्वामी. मी आज काहीच बोलणार नाही. फक्त ऐकणार आज तुमचं. बोला, बोला काहीतरी." ती म्हणाली व गप्प झाली. तसा तो बोलायला लागला होता आपल्या मनातील गोष्टी. त्याही आयुष्याच्या अंतिम समयी.

************************************************
भानुमतिचा डोळाही फडकत होता आज व वाटत होतं की आज काहीतरी विपरीत घडणार आहे. तसे सायंकाळचे चार वाजले होते.
आज तिसरा दिवस होता. दुर्योधन घायाळ झाल्याला. परंतू अजूनही कोणीच भानुमतिला त्याच्या रक्तबंबाळ झाल्याची कल्पना दिली नव्हती. तसे आज सायंकाळचे चार वाजले होते. तसा एक दूत धापा टाकत टाकत भानुमतीजवळ आला. तो भानुमतीजवळ येवून थांबला. तसा धापा टाकत टाकतच तो म्हणाला,
"महाराणीसाहेब, आपले राजे पडले."
"पडले अर्थात मरण पावले की काय?"
"नाही राणीसरकार. ते अजून जीवंत आहेत."
"म्हणजे?"
"राणीसरकार, त्यांना भिमानं घायल केलं. ते उठून उभे राहू शकत नाहीत."
"असं काय केलं त्यानं?"
"मांड्या फोडल्या आपल्या राजेसाहेबांच्या."
"म्हणजे?"
"म्हणजे तुम्ही जावून बघा प्रत्यक्ष."
दूत म्हणाला व निघून गेला.
भानुमतिला अत्यंत वाईट वाटत होतं. परंतू आता तिच्याजवळ उपाय नव्हता. तशी ती सुप्रियाच्या कक्षात गेली. तीच एकमेव तिची सखी होती की ती अजूनही जीवंत होती. तशी तिला ती म्हणाली,
"सुप्रिया, चालतेस का, आपण राजेसाहेबांना पाहून येवू."
भानुमतीचं ते बोलणं ऐकून आश्चर्यचकीत झालेली सुप्रिया म्हणाली,
"काय, झालं राजेसाहेबांना?"
"एक दूत आला होता. त्यानं सांगीतलं की त्या भिमानं घायाळ केलं राजेसाहेबांना. तेव्हा आपण भेटायला जावू त्यांना. कदाचीत त्यांचा थोडा त्रास आपल्या भेटण्यानं कमी होईल. चालतेस का?"
ते भानुमतिचे बोल प्रत्यक्ष सुप्रियानं ऐकले. तशी तिही एक विधवाच. तशी ती एका पायावर तयार झाली भानुमतीसोबत जायला. दोघ्याही मिळून कुुरुक्षेत्राकडे निघाल्या होत्या.
थोड्याच वेळात कुरुक्षेत्र आलं. तशी भानुमती आपल्या पतिचा शोध घेवू लागली. तसं तिनं पाहिलं. एका तलावाजवळ एक मनुष्य वेदनेने कण्हत असलेला दिसला. तशी भानुमती त्याचेजवळ गेली. तसं तिनं त्याला ओळखलं. हाच को बलशाली दुर्योधन. ज्याला युद्ध सुरु होण्यापुर्वी प्रचंड गर्व होता की आपल्याजवळ भरपूर वीर योद्धे आहेत. आपणच महाभारताचं युद्ध जिंकू. परंतू आज त्याचे पूर्ण योद्धे मारले गेले आहेत आणि तोही धराशायी झालेला असून वेदनेनं विव्हळत आहे.
भानुमतिनं त्याला पाहताच ती त्याचेजवळ बसली. तशी रात्र बरीच झाली होती. तसा वेदनेनं व पश्चातापाच्या अग्नीनं तळपत असलेला दुर्योधन भानुमतिला म्हणाला,
"भानुमती, आता मला कळंतय की मी जर त्याचवेळी तुझे सल्ले ऐकले असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. आज माझ्यावर ही वेळ माझ्या मुर्खपणामुळं आली. लवकरच मी आता मरणार असं मला वाटते. कारण मला फारच क्षीण वाटत आहे. रक्तही फारच वाहून गेलेलं आहे. बेशूद्ध होण्याची चिन्हं दिसत आहेत. परंतू मरतासमयी मी जेही काही सांगतो. ते नीट लक्ष देवून ऐक."
"बोला स्वामी." भानुमती म्हणाली. तसा दुर्योधन बोलू लागला.
"भानुमती, माझा मृत्यू अटळ अहे. परंतू एक गोष्ट लक्षात घे. ती म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तू पांडवाशी विवाह कर आणि दोन्ही परिवारात समेट घडवून आण. कारण मी मरण पावताच उद्या माझे वंशज कदाचीत या पांडवांना माफ करणार नाही व माझ्या हत्येचा बदला घेतील. परंतू मला हे मंजूर नाही. कारण मी अनुभवला आहे युद्धाचा परिणाम. युद्धात आपलेच मरत असतात. सगळं जागच्या जागेवर ठेवून."
दुर्योधन बोलून गेला होता. तो थोडंसंच बोलला. परंतू महत्वाचंं बोलला होता.
रात्र बरीच झाली होती. तसं दुर्योधनाचं रक्त बरंच वाहात गेल्यानं त्यानं ते अंतिम समयी भानुमतिला सांगीतलं होतं की शत्रुता मिटव आणि सर्वांशी समेट घडवून आण. तसा त्याला त्याचा मृत्यू जवळ दिसत होताच.
ती रात्र..........त्या रात्री दुर्योधनासोबत बोलता बोलता अर्धी रात्र निघून गेली होती. म्हणतात की दुर्योधन जखमी झाल्या दिवसापासून तीन दिवस जगला व नंतर त्यानं प्राण त्यागला होता.

**********************************************

दुर्योधन मरण पावला. त्यातच त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठी प्रेत सजविण्यात आलं. त्याचबरोबर भानुमतिलाही सजविण्यात आलं. तशी तिची सुरुवातीला पतीसोबत सती जाण्याची इच्छा होती. कारण तेव्हा प्रथाच होती की स्रियांनी वैधव्याचं जीवन जगण्यापेक्षा पतीच्या शय्येवर सती जावं. तसं पाहिल्यास भानुमतिच्या जीवलगापैकी कोण जवळ होतं. कोणीच नाही. मुलगी लक्ष्मणा श्रीक्रिष्णपुत्र सांबनं पळवून नेली होती. ज्याचं तिच्याशी पटत नव्हतं आणि मुलगा लक्ष्मणकुमार महाभारताच्या युद्धात सुभद्रापूत्र अभिमन्यूकडून मारला गेला होता. तसं पाहिल्यास तिच्या जगण्यात सारस्य नव्हतं काहीच. ती त्या काळच्या सतीप्रथेनुसार सती जावूही शकत होती. ती विचारच करीत होती सती जाण्याचा. परंतू इतक्यात कोणीतरी म्हणालं,
"भानुमती, सती जाणार आहे का?"
ते कोणाचे तरी शब्द होते. परंतू ते शब्द ऐकताच भानुमती भानावर आली. विचार करु लागली की मी जर सती गेले तर दुर्योधनानं मला जे म्हटलं होतं की माझ्या मृत्यूनंतर दोन्हीकडील नात्यात समेट घडवून आणशील. ते कार्य मी कसं पूर्ण करणार. कदाचीत माझ्या स्वामीला पश्चाताप झाला असेल व त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील विचार सांगीतला असेल मला. मला ते कार्य पूर्ण करायचं आहे. मग मी ते कार्य सती गेल्यावर कशी पूर्ण करणार.
तो मनातील विचार. त्यातच ती ओरडली.
"नाही. मला सती जायचं नाही."
ते धीरगंभीर वातावरण. त्यातच त्या भानुमतिचे ते ओरडण्याचे शब्द. त्या शब्दानं ते धीरगंभीर वातावरण पार चिघळून गेलं. तशी तिच्याजवळ गांधारी बसली. तिच्या पाठीवरुन प्रेमानं हात फिरवीत म्हणाली,
"भानुमती, तू कोणासाठी जगणार. हा जीवंत राहिलेला समाज तुला सतत डिवचेल. म्हणेल की तू त्या दुर्योधनाची भार्या. ज्यानं संपूर्ण नात्यातील माणसं स्वतःच्या मुर्खपणानं संपवलीत. विचारही केला नाही की मिही यात संपेन. अगं, माझे शंभर पूत्र मरण पावले या आगीत आणि एक जावईसुद्धा. बिचा-या या सर्व माझ्या पूत्रवधू अजूनही जीवंत आहेत दुःख झेलत. कारण त्यांची मुलं लहान आहेत. काही सती गेल्या आपल्या पतीसोबत. कारण त्यांना मागंपुढं तुझ्यासारखं कोणीच नव्हतं. भानुमती हा समाज फार वाईट आहे. हा समाजच तुला चांगल्या पद्धतीनं जगू देणार नाही. काही बाही बोलेल वारंवार. तुझी धिंडही काढतील कदाचीत. का, हेच बोलणं वारंवार ऐकण्यासाठी तू जीवंत राहणार आहेस काय?"
भानुमती ऐकत होती गांधारीचे शब्द. तशी रडत रडतच ती म्हणाली,
"होय, मी ते शब्द वारंवार ऐकण्यासाठीच जीवंत राहणार. मलाही पाहायचं आहे की माझे पती मरण पावल्यानंतर समाज कसा वागतो? कदाचीत मला दुषणे देतो की त्या पांडवांना आणि हेही पाहायचंय की ज्या पांडवांनी धर्मासाठी शेकडो कौरवांची कत्तल केली. ते तरी न्यायानं वागतात का? मला त्यासाठीच जीवंत राहायचं आहे. मला माहीत आहे की माझे पती जसे वागले, तसे मी कदापिही वागू शकणार नाही."
भानुमती त्वेषानं बोलत होती. तिनं आपला पती आपल्याशी शेवटच्या प्रहरी काय बोलून गेला ते गांधारी तसंच कोणालाही सांगीतलं नाही. ते आपल्या मनात ठेवलं.
काही वेळातच दुर्योधनाचं प्रेत शरणावर ठेवलं गेलं व क्षणार्धात ते अग्नीच्या व पाण्याच्या स्वाधीन झालं.

***********************************************

काही दिवस झाले होते. दुर्योधन मातीत तसेच पाण्यात मिसळला होता. परंतू त्याचे शब्द मात्र भानुमतिच्या मनावर कायमचे कोरले गेले होते. ती विचार करीत होती की ते शब्द खरे कसे करायचे.
तिनं विचार केला की त्या शब्दानं दुर्योधनाचे चरित्र स्वच्छ होईल व त्याचेवरील कलंक मिटेल. तसं विचार करता करता एक दिवस तिनं निर्णय घेतला की आपण अर्जुनाशी विवाह करावा. जेणेकरून तो कलंक मिटेल. कौरव व पांडव एक होतील व पुढे कधीच बदल्याची भावना राहणार नाही.
तिचा तो विचार रास्त होता. त्यामुळं की काय, पुन्हा कधीच बदल्याची भावना राहणार नव्हती. असं वाटत होतं तिला. तसा एक दिवस विचार करून तिनं एक दूत अर्जुनाकडे पाठवला. तसा तो दूत अर्जुनाकडे जाताच त्यानं म्हटलं की तुम्हाला राणीसाहेबानं बोलावलंय. त्याच्या म्हणण्यानुसार अर्जून तिला भेटायला तयार झाला होता.
ते तप्त उन्हाळ्याचे दिवस होते. तशी आजपर्यंत कधीच पांडवांना राज्यकारभार करताना पुरेशी सवड मिळाली नव्हती. कारण राज्यात काही विधवा होत्या. ज्यांचे पती महाभारत युद्धात मरण पावले होते. त्यांची सोय लावायची होती त्यांना. त्यातच त्यांना कोणीही काहीही बोलू नये. म्हणून संरक्षणही द्यायचं होतं. आज ते संरक्षण देतांना त्यांना पुरेशी उसंत मिळाली नव्हती. तशी आज पुरेशी सवड मिळाली असल्याने अर्जून भानुमतिला भेटायला आला होता.
भानुमतिच्या बोलावण्यानं अर्जून हजर झाला होता. तो भानुमतिच्या राजमहालात गेला तिची भेट घेण्यासाठी. कारण तिनं त्याला बोलावलं होतं भेटायला. तसा तो भेटायला आला असता भानुमतिचं विवाहापुर्वीचं प्रेम उफाळून आलं. जे तिनं आपल्याच मनात स्वप्नवत रंगवलं होतं. ती भूतकाळात जावून त्याच गोष्टीचा विचार करु लागली होती. तोच अर्जून म्हणाला,
"बोला राणीसाहेबा, काय बोलायचं ते बोला. आपण फक्त आदेश करा. आम्ही आपल्या आदेशाचं पालन करु. आम्हालाही आपल्या सेवेची संधी द्या."
".........." भानुमती काहीच बोलली नाही. तसा अर्जून पुन्हा म्हणाला,
"बोला, कशासाठी बोलावलंय? लाजू नका. घाबरुही नका. मी आपणाला काहीही म्हणणार नाही."
भानुमतिला विचार येत होता की त्याच्यासमोर कसा विषय मांडावा की आपल्याला कुणबा जोडायचा आहे. तशी ती म्हणाली,
"मला भिती वाटते की तुमच्याशी कसं बोलायचं."
"त्यात भिती कसली राणीसाहेबा? बोला निःसंकोच बोला."
भानुमती विचार करु लागली. तशी ती म्हणाली,
"सांगा, रागावणार नाही तर बोलते. बोला, रागावणार नाही ना."
"नाही रागवणार, बोला. काही ना काही बोला."
"मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. बोला कराल काय माझ्याशी विवाह? तुम्ही माझ्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे."
अर्जुनानं ते भानुमतिचं बोलणं ऐकलं. तसा तो विचार करु लागला. त्यातच तो म्हणाला,
"राणीसाहेब कसं बोलता? आपण होशात आहात का? अहो, आपण माझ्या मोठ्या भावाची भार्या आणि मी आपणाशी विवाह करावा. मला कल्पनाही करवत नाही."
"परंतू मला आज आधार नाही, त्याचं काय?"
"निव्वळ आधार..........त्या आधारासाठी तुम्ही विवाह करणार का? नाही. त्यासाठी जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर मला तो कसा मंजूर असेल?"
"दुसरंही एक महत्वाचं कारण आहे. जी तुमच्या भावाची इच्छा होती मरतासमयी."
"कोणती?"
"त्यांनी अंतीम समयी म्हटलं होतं की कुणबा जोडायचा."
"कुणबा आणि तो कुणबा कशासाठी जोडायचा?"
"संबंध जोडण्यासाठी व कौरव पांडवांच्या मनात जुन्या वैमनस्यावरुन वादविवाद राहू नये यासाठी."
"काय म्हटलं होतं अंतीम समयी माझ्या वडील बंधूनं?"
"म्हटलं होतं की उद्या आपल्या परिवारात कोणीही बदल्याची भावना ठेवू नये. म्हटलं होतं की मी युद्धाचे परिणाम भोगत आहे. आणखी म्हटलं होतं की माझ्या मृत्यूनंतर तू पांडवांशी विवाह करावा. संबंध सुदृढ करावेत. तसेच कौरव पांडवातील पारिवारीक विवाद मिटवावेत. मान्यता अशी आहे की एका स्रिचा शत्रूराष्ट्रातील राजांशी वा राजकुमाराशी विवाह होताच शत्रूत्व मिटतं. त्यानुसारच मी तुमच्याशी विवाह करायचं ठरवलं आहे. मला आशा आहे की माझा तुमच्याशी विवाह होताच हे कौरव पांडवातील शत्रूत्व कायमचं संपेल व नाते सुदृढ होतील. संबंध सुधारतील व त्यानंतर कधीही या दोघात बदल्याची भावना येणार नाही. कोणीही पुढं रक्तपात करणार नाही आणि सगळे सामंजस्यानं राहतील. मलाही असं वाटते की आपला विवाह व्हावा. मला आपला आधार मिळेल आणि राज्यातही चिरकाल शांतता निर्माण होईल."
भानुमती जे बोलायचं ते बोलून गेली. ते म्हणणं अर्जुनाला पटलं होतं. तिनं रास्त विचार मांडला होता. तो विचार राज्याच्या हिताचा होता. तसा त्या रास्त विचारानं अर्जुनाला नाईलाजानं होकार द्यावा लागला व त्यानं होकार देत मी माझ्या वडील बंधूंना त्याबद्दल विचारतो असे म्हटले व तो रवाना झाला.
अर्जून आपल्या दरबारात परतला होता. त्यानं आपला प्रिय भाऊ युधिष्ठीरचा सल्ला घेतला. कारण ते सर्व भाऊ पुर्वीपासूनच युधिष्ठीराच्या आज्ञेत वागत होते. त्याचाच आदर करीत होते. तो म्हणेल तीच पुर्वदिशा होती.
युधिष्ठीरला अर्जून भानुमतीबद्दल तिचे विचार सांगताच ते विचार रास्त असल्यानं ते विचार त्याला पटले व त्यानं अर्जुनाला विचारलं की तो विवाह करायला तयार आहे का? त्यानंतर अर्जुनानं त्या विवाहासाठी होकार देताच संपूर्ण राज्यात दवंडी झाली व भानुमतिच्या म्हणण्यानुसार तिचा व अर्जुनाचा विवाह धुमधडाक्यात राजरोषपणे पार पडला. अशाप्रकारे त्या विवाहाच्या रुपाने दोन्ही परिवाराचे संबंध जुळले गेले. राज्यात सामंजस्य निर्माण झाले. तशीच शांतताही. त्यांच्या विवाहानं आता कोणामध्येही बदल्याची भावना राहिली नाही. ना शत्रूत्व राहिलं. कारण त्यावेळी अशी व्यवस्था होती की दोन राज्यात जर शत्रूत्व असेल तर ते विवाहानं संपुष्टात येत असे. भानुमतिनं अगदी तेच केलं होतं. तिनं विवाह केला होता व दोन्ही परिवाराचे पारिवारीक संबंध सुधरवले होते. याला कुणबा जोडला असं म्हटलं आहे. याचाच अर्थ असा की भानुमतीनं कुणबा जोडला. म्हणूनच भानुमतीबद्दल म्हटलं आहे की कही की ईट कही का रोडा, भानुमतिने कुणबा जोडा.
भानुमती ही अर्जुनाची आठवी पत्नी होती. त्यानं भानुमतिशी विवाह करुन केवळ तिला आधारच दिला नाही तर दोन्ही राज्याचे संबंध परस्पर सौहार्दार्याचे केले होते.
अर्जुनाला आठ पत्नी झाल्या होत्या. द्रोपदी, सुभद्रा, चित्रागंदा, उलुपी, अल्ली, भोगावती, चित्रभानू आणि भानुमती. उत्तरासोबत त्यानं विवाहाला नकार दिला होता. नाहीतर ती त्याची नववी पत्नी राहिली असती.
भानुमतिचा विवाह झाला होता. तसे कौरव पांडवाचे संबंध सुधारले होते. दुर्योधनाचीही इच्छा पूर्ण झाली होती. काही का असेना, परंतू शेवटच्या क्षणी त्यानं चांगलं काम भानुमतीकडून करवून घेतल्यामुळं त्याला काही काळ स्वर्ग मिळाला होता असा उल्लेख पुराणात आहे. भानुमती आणि अर्जुनाचा विवाह. हा आठवा विवाह होता. अशातच भानुमती गरोदर राहिली.
भानुमतिची ती अंतिम घडी होती की काय, कुणास ठाऊक. ती गरोदर राहिली होती. त्यातच आता तिचं वय झाल्यानं तिचं वागवत नव्हतं. त्यातच ती गरोदर. तसे तिचे गरोदरपणाचे पूर्ण दिवस झाले व त्या गरोदरपणातच बाळंत होत असतांना तिला काळाचे बोलावणे आले. म्हणतात की भानुमती त्या बाळंतपणातच मरण पावली होती. तिला पुत्र झाला की पुत्री याचा उल्लेख पुराणात नाही. तिचा पुत्र वाचला की नाही वाचला याचे उत्तर पुराणात नाही. परंतू एवढं मात्र निश्चीत की भानुमतीनं कौरव आणि पांडवांचे जुने वैमनस्य दूर केले होते व त्या रुपात एक नवीन इतिहास बनवला होता. ज्याला कुणबा जोडला असे नाव आहे.
भानुमती एक सामान्य स्री होती. परंतू तिचे विचार उच्च होते. ते उच्चदर्जाचे विचार असल्याने आज त्याच भानुमतिला काळानं श्रेष्ठ बनवलं आहे.
महाभारतात एवढ्या स्रिया होत्या की ज्यांना लोकांनी उचलून धरलं. त्यांचा उदोउदो केला. परंतू भानुमती.......ती उपेक्षीतच राहिली. तिला कौरवाच्या परिवारानंच नाही तर दुर्योधनानंही उपेक्षीतच ठेवलं. त्यानंतर तिला समाजानंही उपेक्षीतच ठेवलं. तिच्या महानतेच्या कार्यावरही पदडा टाकण्यात आला. परंतू तिनं असं काही कार्य केलं की तिचं कार्य आज वर्तमानात लोकांच्या लक्षात आलं आहे. लोकं दुर्योधनाप्रमाणे तिलाही मानू लागले आहेत आणि म्हणत आहेत की भानुमतिही महान होती. महान आहे व महान राहणार. मध्यंतरीच्या काळात तिच्यावर लांच्छन लावलं गेलं की तिनं आपला स्वार्थ पाहात अर्जुनाशी विवाह केला. प्रत्येक व्यक्ती तसेच म्हणत होता. परंतू तिचे जर कार्य पाहिले तर भानुमतीनं तिच्या अंतीम समयी दुर्योधनाच्या मृत्यूनंतर जे काही केलं. ते अगदी वाखाणण्याजोगं आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास आजही वर्तमानात प्रत्येक घराघरात महाभारत आहे. कारण तिथं फक्त दुर्योधन आहे. गांधारी व द्रोपदी आहे. परंतू भानुमती नाही. एखादे वेळी तिथं भानुमतिही ठेवून पाहा. म्हणजे नक्कीच तुमच्याही परिवारातील संबंध सुधारतील व तिथं पुन्हा कधीही महाभारत घडणार नाही.
भानुमती एक यल्गार होती द्वापरयुगातील. तिनं दोन्ही राज्यातील केवळ संबंधच जोडले नाही तर ते संबंध सुदृढही केले. त्याचाच बोध तद्नंतरच्या पिढीनं घेतले. त्यांनीही त्यापासून बोध घेवून आपआपले संबंध चांगले केले व आपल्याही राज्यात शांतता निर्माण केली.
काळाच्या ओघात भानुमतिला लोकं विसरले असतील कदाचीत. ती काळाच्या ओघात संपलीही. आजही ती अगदी जीवंत नाही.
आज जर ती जीवंत असती, कधी शांतीदूत म्हणून तर कधी करुणेचा सागर म्हणून आली असती. त्यामुळे पुन्हा इथे महाभारत घडलं नसतं. महाभारत तिथंच संपलं असतं. ती नाही आहे म्हणून आज पुन्हा एकदा कौरव पांडवांचं याच भुमीवर महाभारत घडलं आहे. युद्ध नेहमी होत आहे. कधी शस्रानं तर कधी शब्दानं. आज ती नाही म्हणून पांडव नाही तर कौरव शिरजोर झाले आहेत. कारण कलियुग लागला आहे, पांडवांचा विनाश करण्यासाठी. कौरवांचा विनाश करण्यासाठी नाही. धर्मावर अधर्माचा विजय मिळविण्यासाठीच जणू कलियुगाने साक्षात जन्म घेतला आहे. सत्य हारत आहे आणि असत्य जींकत आहे जळी, स्थळी आणि न्यायालयातही आणि गरज वाटत आहे आज भानुमतिची. वाटत आहे की तिनं पुन्हा या धरणीवर जन्म घ्यावा व पुन्हा एकदा कुणबा जोडावा. म्हणजेच
कही की ईंट कही का रोडा, भानुमतिने कुणबा जोडा ही म्हण सार्थक करता येईल व भानुमतिच्या कर्तृत्वावरही विश्वास ठेवता येईल. हे तेवढंच खरं आहे.
भानुमती व अर्जूनही आज जीवंत नव्हते. काळाच्या ओघात ते संपले होते. परंतू भानुमतीचं कुणबा जोडण्याचं कार्य आजही संपलं नाही. ज्या ज्या वेळी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या देशात जेव्हा जेव्हा महाभारत घडतं. तेव्हा तेव्हा कोणीतरी अर्जून तयार होतो. कोणी भानुमतिही तयार होते व कुणबा जोडला जातो. कुणबा याचा अर्थ संबध.
भानुमती.........भानुमतिनं जे स्वप्न पाहिलं होतं अर्जुनाशी प्रेम करायचं, अर्जुनाशी विवाह करायचा. ते स्वप्न....... ते स्वप्न दुर्योधनाच्या मृत्यूनंतर का होईना, ते पूर्ण झाले होते. तिचा शांतता प्रस्थापीत करण्यासाठी का असेना, अर्जुनाशी विवाह झाला होता व ती अर्जुनाशी आता सुखमय जीवन व्यथीत करीत होती. आज ती उतारवयात का होईना, अर्जुनापासून गरोदर राहिली होती.
अर्जूनही तिच्यावर प्रेम करु लागला होता. तो तिला परायी समजत नव्हता तर आपल्या थोरल्या बंधूची पत्नी म्हणून तिची जास्त इज्जत करीत होता. त्यानं पुनर्विवाह केला होता तिच्याशी. परंतू तो पुनर्विवाह त्यानं आपल्या सुखासाठी केला नव्हता, तर तो विवाह त्यानंं तिच्याच सुखासाठी केला होता.
आज भानुमतिचा पुनर्विवाह झाला होता. ती सुखात रमली होती. परंतू जेव्हा जेव्हा कोणाचं स्वयंवर असायचं, तेव्हा तेव्हा तिचंही स्वयंवर आठवायचं आणि आठवायच्या त्या गोष्टी, ज्यावेळी दुर्योधनानं तिला उचलून नेलं होतं. ते सारंच आठवायचं तिला वसंताला फुटलेल्या पालवीसारखं. त्या आठवणी जाग्या व्हायच्या. तेवढ्यात अर्जून यायचा व त्या आठवणी क्षणात विरुन शिशिरातील झाडाच्या झडणा-या पानागत मनातून निघून जायच्या.
जे स्वातंत्र्य तिला दुर्योधन जीवंत असतांना मिळालं नव्हतं, ते स्वातंत्र्य आज अर्जुनाच्या घरी मिळत होतं. ती सुखी होती. आपलं सुख पाहून नाही, तर आपल्या गत कौरव राज्यातील त्या सर्व विधवांचं व प्रजाजनांचं सुख पाहून. कारण पांडवांनी तिला सुख आणि संरक्षण देण्याबरोबरच त्या कौरवांकडील सर्व विधवा व सर्व प्रजाजनांचाही विचार केला होता. त्यांनाही त्यांनी सुखी केलं होतं.
महाभारताचं युद्ध समाप्त झाल्यानंतर कुंती, गांधारी, धृतराष्ट्र व काही प्रजाजन अरण्यात निघून गेले होते. तसा एकदा अरण्यात वणवा लागला. त्यावेळी त्या वणव्यानं धृतराष्ट्र जिथे राहात होता. त्या पर्णकुटीला सभोवताल घेरलं. त्यातून कुंती डोळस असल्यानं निघून जावू शकत होती. परंतू धृतराष्ट्र व महाराणी गांधारीला वाचविण्याच्या चक्करमध्ये ती निघाली नाही. त्यातच तिलाही वणव्यानं आपल्यात सामावून घेतलं.
भानुमती मरण पावली होती. तिचं सुख अर्जुनाला जास्त काळ भोगता आलं नाही. परंतू त्याला आजही ती सदोदीत आठवत होती, जणू त्याच्या काळजाचा तुकडा बनून. तिनं कुणबा जोडण्यासाठी आपली अब्रू वेशीवर ठेवून अर्जुनाशी केलेला विवाहही त्याला आठवत होता आणि आठवत होतं तिचं मन, जे मन त्याला पदोपदी सांगत होतं की मला तुम्ही नाही सुख दिलं तरी चालेल, परंतू माझ्या प्रजेला सर्वतोपरी सुख द्या. त्याच भानुमतिच्या इच्छेनुसार हस्तिनापूरचे सर्व प्रजानन सुखी झाले होते नव्हे तर सुखमय जीवन जगत होते. ते भानुमतिचेच उपकार होते. पांडवांचे नाही.

******************************************************************************समाप्त************