Tu Bhet na re Roj Roj Navyane - 3 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 3

The Author
Featured Books
Categories
Share

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 3







विकीने गौरीला रेल्वेस्टेशनवर पाहिले, तो तिच्याशी बोलण्यासाठी जाणार होता की, मध्ये रेल्वे आली आणि पुन्हा ती त्याला दिसली नाही. थोड्यावेळातच निल ही आला व विकी ही घरी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी विकी गौरीला शोधत आला. ती अजून शोरूममध्ये आली नव्हती. शोरूमच्या मागेच कंपनीचे वर्कशॉप होते. तो तिथे ही बघून आला. पण ती कुठे दिसली नाही. तो नाराज झाला आणि पुन्हा आपल्या डेस्ककडे जाण्यासाठी वळला की समोर गौरी येताना त्याला दिसली.

तो तीच्याशी बोलण्यासाठी जाणारच होताच की त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर बॉस नाव झळकत होत तस तो बॉसच्या केबिन कडे गेला.

सरांशी बोलून तो बाहेर आला. पण आता त्याच्या हातात दोन फाईल्स होत्या ज्या त्याला उद्यापर्यंत पूर्ण करायला बॉनी सांगितले होते. आता त्याला डोळ्यासमोर खूप काम दिसत होतं. गौरीसोबत नंतर बोलू अस म्हणून तो आपल्या डेस्कवर गेला.

लंचब्रेक झाला, सगळे टिफिन घेऊन कॅन्टीन मध्ये एकत्र बसले. नेहमीप्रमाणे गौरी एकटीच आपल्या जागी बसली होती.

" हाय! गौरी...." विकी तिच्या जवळ येत बोलला.

" हॅलो सर, काय काम होत का?" ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत बोलली.

" नाही सहजच ..." त्याला पुढे काय बोलावं ते समजेना

" जेवायला गेला नाही तुम्ही?"

" अ...नाही.. ,तू का टिफिन आणत नाही?" विकी धीर एकवटून बोलू लागला.


" मी सकाळी कामावर येतानाच जेवून येते..." ती मनात नसताना बोलत होती.

" मग तुला दुपारी भूक लागत नाही का?"

गौरी अविश्वासने त्याच्याकडे बघत बोलली.
" नाही! "

" तू कॉफी घेतेस का?"

" हो.."

" मी आलोच" अस म्हणून विकी तिथून बाहेर गेला.

पण गौरी विचारात पडली की, का विकी आज तिच्याशी इतकं बोलत आहे?

थोडयावेळातच विकी दोन कॉफी घेऊन पुन्हा गौरी जवळ बसला. हे पाहून गौरी मात्र गोंधळली आणि विचारात पडली,' याला काय झालंय आज ? रोज तर सगळ्यांसोबत जातो आणि आज का इथे असा?'

"गौरी..."

ती विचारात होती आणि अचानक विकीच्या आवाजाने आपल्या विचारातून बाहेर आली.

"अ...हा..सर" ती अडखळत बोलली

"कॉफी.." विकी तिच्या समोर कॉफी पकडत बोलाल.

" तुम्ही का सर...?"

" सर...???, आपण फ्रेंड्स पण आहोत हो ना. आणि मी पहिल्याच दिवशी तुला म्हणालो होती की सगळे मला विकी म्हणतात सर नाही..."

तशी ती मिश्किल पणे हसली व कॉफी घेतली व पिवू लागली.

" बाय द वे, मी काल तुला रेल्वे स्टेशन वर पाहिलं."

हे ऐकताच तिला जोरात ठसका लागला.

" हळूsss हळूss अग, कुठे पळून जात नाही तुझी कॉफी.." अस म्हणून तो हसू लागला.

ती ही जबरदस्तिने हसली.

"तू कोणाला रिसिव्ह करण्यासाठी आली होतीस?"

तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिला काय उत्तर द्यावे ते समजेना.

" ते....मी...हे..." ती अडखळी.

" तू तुझ्या भावाला रिसिव्ह करण्यासाठी आलेली ना" तो हसत बोलला.

"आ...हो...हो...मी भावाला घेण्यासाठी आले होते"

हे ऐकून विकीच्या चेहऱ्यावर गड जिंकल्याचे भाव दिसू लागले.

"हा वाटलंच मला...मी ही माझ्या मामाच्या मुलग्याला रिसिव्ह करण्यासाठी आलो होतो, तेव्हा समोरच्या प्लॅटफॉर्मवर तू उभी दिसली. मग तुझ्याकडे यावं अस वाटलं पण ब्रिज क्रॉस करून यावे लागणार होते म्हणून तुला कॉल करायचा म्हणून मोबाईल घेतला हातात, पण तेव्हाच रेल्वे आली आणि तू निघून गेली. मी ही लगेच आलो."

ती हे ऐकून थोडी रिलॅक्स झाली.

"पण तू मला आधी का नाही सांगितले की तू स्टेशनवर येणार आहे ते?, म्हणजे मी तुला रिक्षास्टॉपला न सोडता डायरेक्ट स्टेशनकडे नेल असत ना. उगीच इतक्या लांब चालत यावं लागलं तुला."

तिला काय बोलावे ते सुचेना ती काही तरी विचार करून बोलली.

"ते तुम्ही कुठे जाणार हे मला कस माहिती असणार ना, म्हणून मी नाही बोलले काही"

तो पुढे बोलू पाहत होता की गौरी त्याला कटवण्यासाठी बोलली.

" एक्सकुज मी सर, आता मी काम करू शकते का?"


" या... या ... शॉर..., मी जातो मला ही काम आहे, रिपोर्ट द्यायचे आहेत उद्यापर्यंत दोन फाईल्स चे, चल कर काम बाय."

"हुंम.." इतकंच बोलून ती पुन्हा काम करू लागली.


पण आता तीच कामात लक्ष नव्हतं.ती स्वतःशीच बोलू लागली.

" गौरी सांभाळून राहावं लागेल, जर कोणाला समजलं आपल्याबद्दल तर खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरे जावे लागेल. दहा महिने झाले आपण आपली ओळख लपवत आहोत चुकून जरी कोणाला समजलं तर...??"

ती स्वतःशी बोलतच होती की संकेत तिथे आला.
पुन्हा तिला अस बोलताना पाहून तो विचारात पडला. तो तिला विचित्रपणे पाहत तिथून पुन्हा बाहेर गेला.
हे पाहून गौरी ने डोक्यावर हात मारून घेतला आणि बोलली.

" या संकेतला पण अश्यावेळीच यायचं असत का?, नेहमी मला असा पाहतो जसा की मी खूप मोठा अपराध केला आहे. आणि बघतो अस जस की मी याची किडनी मागितली याच्याकडून..."आणि हसू लागली.

"मी काय जाणूनबुजून करते का?, सगळे कॅन्टीन मध्ये गेले असताना याला काय गरज असते जासुस होण्याची?", व तिने नाक मोडले.

हे सगळं संकेत अजून ही काचेतून पाहत होता.पण गौरी च लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. ती आपली बडबड करत होती.

संकेतला आता अंदाज आला होता की गौरीला स्प्लिट पर्सनॅलिटी चा त्रास आहे. आणि तो विचार करत तिथून निघून गेला.

गौरीच्या समोर एक व्यक्ती उभी होती. जी तिच्याकडे प्रेमाने पाहत होती. दिसायला एकदम हिरो सारखी पर्सनॅलिटी होती. गौरी बडबड करत होती. आणि तो प्रेमाने तिच्याकडे पाहत तीची बडबड ऐकत होता.


******

खरच गौरी भावाला घेण्यासाठी स्टेशनवर गेली होती का?,
संकेत ची शंका खरी आहे का??, गौरी समोर उभी असणारी ती व्यक्ती कोण होती?, आणि तो तिथे आलेल कोणी पाहिलं नव्हतं का??

जाणून घेऊ नेक्स्ट पार्ट मध्ये. हा भाग कसा वाटलं नक्की सांगा.

माझ्या शांत वाचकांनो कंमेंट्स करत चला, कंमेंट्स करतांना काय लिहावं सुचत नसेल तर निदान रेटिंग तरी देत चला.तेवढीच मनाला शांती की बाबा आपण लिहीत असलेली कथा आपल्या वाचकांना कितपत आवडते.
त्यामुळे कृपया रेटिंग द्यायला विसरू नका .

धन्यवाद!! 🙏😊

******