King of Dalits in Marathi Moral Stories by Vishakha Rushikesh More books and stories PDF | दलितांचा राजा....

Featured Books
Categories
Share

दलितांचा राजा....


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891रोजी झाला. शाळेत व महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा अपमान झाला होता. व त्यांच्या हक्कासाठी त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएचडी या पदव्या मिळवल्या. आणि ते बॅरिस्टर ही झाले. मुंबईतील सिडनॅहम महाविद्यालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी महाविद्यालयात त्यांनी प्रध्यापक म्हणून काम केले. व नंतर काही वर्ष प्राचार्य पद ही सांभाळली उच्यवृगीयांकडून वर्षानु वर्षे होणाऱ्या पिळवणूकीने दलित समाज भरडला जात होता. या समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चिय केला. त्यासाठी त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन केली. शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा, या संस्थेचे ब्रीद वाक्य होते. आंबेडकरांना आपल्या समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते मूक या वृत्तपत्राचे नायक झाले. या वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवाना एक दिव्य संदेश दिला.'वाचाल तर वाचाल, वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय करून दिली. वाचनालये काढली, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे काढली. अशा कार्यावर बहिष्कृत हितकरणी सभेचा भर होता. आपल्या उतर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय या संस्था काढल्या, व नावारूपास आणल्या. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाड मध्ये 'चवदार तळे' याचा सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी ही सत्याग्रह केला होता. डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधी मंडळावर काम केले.गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. आणि स्वतंत्र्योतर काळ ते स्वतंत्र्य भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले.
14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विविध मंडळावर काम केले.1942 साली ते केंद्र सरकार मजुरीमंत्री होते.आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिली. मुंबईतील त्यांच्या 'राजग्रह ' या निवास्थानी त्यांच्या स्वतःचा फार मोठा ग्रंथासंग्रह होता. बाबासाहेबांनी 14 ऑक्टॉबर 1956 रोजी आपल्या लक्ष्यवेधी अनुयासह बौद्याधर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला भीमशक्ती प्रधान करून डॉ. भीमराव आंबेडकर हे आधीच अस्तंगत झाला. जातीप्रथेमुळे दलित समाजाला अन्याय सहन करावा लागत आहे, त्यामुळे दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांनी गुजरातमधील राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावून ऊना येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दलिताला हिंदू धर्माचा त्याग करण्याचा सल्ला दिला. मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी बोधी म्हणतात, "त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस.एम जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.

अनेक वर्तमानपत्रं केली. त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. ती वापरत असताना सद्हेतुने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला." मे 1956 मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं. भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात.बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो.तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या सामाजिक जीवनासाठी दिलेले योगदान कोणकोणते होते?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व दलितांसाठी जेवढे कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केले आहे. त्यांनी भारतीय संविधानात स्त्रीयांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला. देशातील महिला आजही "चूल आणि मुल" सांभाळत बसल्या असत्या.

स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. परंतु हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली. (जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.)

स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच समान अधिकार मिळवून दिला. दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

एका मागे एक असे वारंवार मूल जन्माला घालताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी व स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला. तसेच मुलं होऊ देणे अगर न देणे याचा निर्णय घेण्याचा महिलांना अधिकार दिला.

मुलगा हा वंशाचा दिवा व मुलगी ही परक्याचे धन अशा विचारसरणीतुन गर्भपात करून होणारी स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी जनजागृती केली.

एखाद्या देशाने किती प्रगती केली याचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती. दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मात्र त्यानंतर अगदी 50 दिवसात त्यांचा मृत्यू झाला. आंबेडकरांनी संविधानातून स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. आंबेडकरांनी जात, धर्म बघून कधीच वाटचाल केली नाही. पण आताची परिस्थिती काय बोलते कि हे 14 एप्रिल किंवा कोणता ही कार्यक्रम असला तर तो बौद्ध धर्माच्या जातीनेचं तो करावा. माझ्या दृष्टीकोनातून असं काय मला पहायला मिळालं कि उदा :- ऑफिस, शाळा, कॉलेज, अशा ठिकाणी गेलो आणि तेथील काम करत असणाऱ्या वर्कर किंवा शाळेतील विध्यार्थी यांना समजलं ही / हा, जय भीम म्हणचेच बौद्ध आहे म्हणून असं विचारण्यात येत कि 14 एप्रिल हा तुमचा सण आहे ना? असं क्वचित लोक आहेत ते तुमचं आमचं करतात. अरे! पण ज्या बापानी आपल्यासाठी इतकं केले त्याला तुम्ही तुमचं आमचं करता, त्या सणाला आपला सण नाही बोलणार, का तर आम्ही देव धर्म मानत नाही म्हणून, जीथे त्यांचा देवाधर्माचा सण असणार तिथे नटून थटून जाणार आणि 14 एप्रिल ला नाही. तुम्ही जात धर्म हे पाहू नका तर माणूस म्हणून पहा. जर माणूस म्हणून पाहणार तर सर्व गोष्टी करता येणार आहेत.14 एप्रिल हा सण जय भीम वाल्यांचाच नाही तर हा संपूर्ण महाराष्टचा सण आहे. म्हणून कोणताही सण बौद्ध धर्मातला सण असो किंवा इतर समाजातला प्रत्येक सण आपला म्हणून साजरा करा. एकत्र न येणारी व्यक्ती सुद्धा एकत्र यायला वेळ नाही लागणार. असे केल्यास आपल्या महाराष्ट्रातील लोक एकजुटीने आले कि कोणताही सण प्रत्येक व्यक्तीला अनुभवायला मिळणार व त्याचा आंनद प्रत्येकाला मिळणार. म्हणून जन्माला आलो तर त्या प्रमाणे जगता आलं पाहिजे. आणि प्रेत्येक व्यक्तीकडे प्रेमाची भावना असली पाहिजे तर माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे.आणि माणूस म्हणून एकत्र या.जय भीम जय हिंद! विशाखा ऋषिकेश मोर (विलास सावंत ) (दापोली भोपण पंदेरी ) 9137853889