Radha Prem Rangli - 1 in Marathi Love Stories by Chaitrali Yamgar books and stories PDF | राधा प्रेम रंगली - भाग १

Featured Books
  • ડાન્સિંગ ઓન ધ ગ્રેવ - 2

    સ્વામી શ્રદ્ધાનંદની ખલીલી પરિવારમાં અવર જવરના સમયે ઇરાનની રા...

  • horror story

    હવે હું તમને એક નાની ભયાવહ વાર્તા સાંપડું છું:એક ગામમાં, રાત...

  • ઢીંગલી

    શિખા ને ઉનાળાનું વેકેશન પડ્યું હતું, તે હવે ચોથા ધોરણમાં આવવ...

  • હમસફર - 18

    વીર : ( શોકડ થઈ ને પીયુ ને જોવે છે) ઓય... શું મુસીબત છે ( એ...

  • ફરે તે ફરફરે - 12

    ફરે તે ફરફરે - ૧૨   એકતો ત્રણ ચાર હજાર ફુટ ઉપર ગાડી ગોળ...

Categories
Share

राधा प्रेम रंगली - भाग १

" प्रेम बेटा ..उठ जल्दी ...आज हमें अस्पताल जाना है...आज मुझे बहोत काम है वहा..." माँसाहेब प्रेम ला म्हणजेच आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला उठवत होत्या...विमल शर्मा ,व्यवसायाने डॉक्टर होत्या आणि घराशेजारीच गाडीने अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या...लाडाने त्यांना सर्वचजण माँसाहेब बोलायच्या ...

" हा माँ ,बस दोन मिनिटं अजुन..." प्रेम बोलतो आणि परत आपली रग घेऊन झोपतो... डिसेंबर चा महिना त्यामुळे कडक थंडीचे दिवस ... मुंबई त यावेळी खुप थंडी पडली होती..नाताळाच्या सुट्या असल्याने प्रेमला आज शाळेत न जाता माँसाहेब त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणार होत्या...आणि आज दोन तीन सर्जरी असल्याने त्यांना जरा घाई होती आणि त्यात साहेब प्रेम कुंवर उठायचं नाव घेत नव्हते...

" हे बघ प्रेम ...राहुल आणि तुझे डॅड सकाळीच त्यांच्या कामासाठी गावी गेले आहेत... त्यामुळे मी तुला असं एकट्याला सोडून जाऊ शकत नाही...पुढच्या दोन मिनिटात नाही ना उठलास तर तर.." माँसाहेब त्याच पांघरूण काढत बोलत असतात...

" तर तु माझ्या अंगावर माँसाहेब..." तो चटकन उठून बोलतो, " पाण्याची बादली ओतशील असचं ना..."

" हम्म लवकर समजलं कि तुला..." माँसाहेब त्याच्या पाठीत धपका मारत बोलते..

" माँ ,तुझ्या हातचे पराठे..." तो मॉंसाहेबांनी हातात दिलेला ब्रश घेत बोलतो..

" हो माय डिअर सन...मला माहित आहे कि तुला आज पराठे खायचेत..." माँसाहेब हसत त्याच्या बेडवरची उशी नीट करत बोलते, तो काही बोलणार तोच पुढे त्याच म्हणतात," हो हो , आलुचे पराठे आणि त्याला खुप मख्खन लावुन...माहित आहे मला प्रेम ...आधी तु जा आणि आवर बरं लवकर..." त्या आता त्याचे घालायचे कपडे काढत बोलतात...

" हो आलोच माँ, तु हो पुढे..." म्हणत प्रेम त्यांना बाहेर ढकलतो...

" हा प्रेम पण ना..." म्हणत त्याही आपलं आवरायला जातात...

" ऐ तिला धरा रे ...तिने माझं वॉलेट चोरलं आहे‌.." मुंबई च्या सिद्धी विनायक गणपती समोर एकच गोंधळ उडाला होता...एक बारा वर्षांची मुलगी पुढे पळत होती तर मागे तिच्या काही माणसं ...ज्याचं वॉलेट चोरल होतं तो मात्र मागुन नुसता आरडाओरडा करत होता...

" नुसतं आरडाओरडा करून काय होणार आहे...?? त्यापेक्षा तुम्ही ही सहभागी व्हा ना त्या माणसांच्या मदतीला...लवकर सापडेल ती मुलगी..." मंदिरात आलेला एक माणुस त्या ओरडणार्या माणसाला बोलतच असतो कि खुप जोरात आवाज होतो...

" आई गं..." तीच बारा वर्षांची मुलगी समोरून येणार्या गाडीला धडकते आणि तिच्या तोंडातुन जोरात आवाज आला तसे सगळे एकाच जागी स्थिर झाले..‌पण तिच्या मदतीला धावुन कोणी गेलं नाही ... तो माणुस आला आणि त्याने ही तिची मदत न करता हातातुन तिच्या वॉलेट हिसकावुन घेतले व निघून ही गेला...पोलिस आले होते गोंधळ ऐकुन पण ते ही घुम्यासारखे पाहत राहिले होते...तो गाडीवाला ही तिलाच शिव्या देऊन गेला...

तेवढ्यात तिथे एक पांढरी कार आली...कोणाला ही काही न बोलता गाडीतुन त्या व्यक्तीने आपल्या ड्रायव्हर ला सोबत घेऊन खाली उतरली आणि आपल्या कारमध्ये त्या मुलीला घातलं आणि आली तशी ती कार निघून ही गेली....इतका वेळ तमाशा पाहणारे लोक ही आपल्या आपल्या कामाला निघून गेले ... मुंबई त हे रोजचंच आहे असा विचार करून गर्दी पांगते....


" माँसाहेब...तुझा मला हाच स्वभाव आवडत नाही ,कोण ती मुलगी..कुठली ती मुलगी...तिचे कपडे बघ...गरीब घरातील दिसते ती...आणि अशा मुलीला तु आपल्या बरोबर घेऊन आलीस..." प्रेम माँसाहेबांच्या केबिनमध्ये येत बोलतो...


" प्रेम मी डॉक्टर आहे आधी...आणि त्या छोट्या मुलीला असं त्रासात मी नाही पाहु शकत... डॉक्टर पेशा ला त्याचा पेशंट पेशंट असतो...त्याचे उपचार करताना आम्ही गरीब श्रीमंत,लहान मोठा यांचा विचार नाही करत आम्ही प्रेम..." त्या आपल्या प्रेमला समजावत बोलतात...तो मात्र तोंड वाकडं करत तिथुन निघून जातो... चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये...हिथे तो आठवड्यातुन एकदा चक्कर टाकत असल्याने त्याचे बरेच मित्र झाले होते...


" हे हाय शंतनु..." चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये येताच एक त्याच्याच वयाच्या मुलाला तो ग्रीट करतो..

" हाय प्रेम...आज बर्याच दिवसातुन आलास..." तो त्याला हग करत बोलतो..

" हो अरे एक्साम वर एक्साम चालू होत्या कि गेल्या दोन आठवड्यात जमलंच नाही यायला ...पण आता रोजच येईल दहा दिवस..‌" तो स्पष्टीकरण देतो...


" ओह व्वाव यार...मग मजाच आहे...पण राहुल भैय्या नाही आला का...?? " तो आनंदात म्हणतो..


" नाही तो डॅड बरोबर आमच्या गावी म्हणजे यु पी ला गेलाय...दहा दिवसांसाठी..." प्रेम...


" ओके ...अरे मीट न्यू फ्रेंड ...राधा ...आजच आली आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये ..." शंतनू त्याच्याबरोबर असलेल्या एका मुलीचं एंट्रो देत बोलतो...प्रेम त्या मुलीला पाहतो...आणि पाहतच राहतो...कारण ती मुलगी तिच होती जीला मघाशी रस्त्यात त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांच्या बरोबर माँसाहेबांनी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं..जिने मंदिरासमोर ईतका हल्लाकल्लोळ माजवला होता...

मघाशी गलिच्छ अवतारात आलेली राधा मात्र आताच्या या हॉस्पिटल मधल्या कपड्यांत गोड ,लोभस दिसत होती... काळीकुट्ट दिसणारी राधा , हॉस्पिटलमध्ये आल्यावर अंघोळ वैगेरे करून आल्याने खुप गोरी भासत होती..वाटतच नव्हतं कि ती गरीब घरातील असेल...प्रेम ने तर तिला ओळखलच नव्हतं ...पण आताच आलेली एकच लहान मुलांच्या पेशंट मध्ये ती एकटीच असल्याने प्रेमला कळालं कि ती तिच आहे...


" हे काय...?? मघाशी काळी चिचुंद्री दिसणारी आत्ता स्वर्गातील अप्सरा कशी काय झाली...?? इतके वर्ष अंघोळ वैगेरे करत नव्हती कि काय...??" प्रेम तिला चिडवत बोलला...पण ते ऐकुन मात्र तिचं तोंड पडतं...


" प्रेम..." मागुन आलेल्या माँसाहेब ओरडतात, " तु तिला असं का बोलतोय...जा बरं रवी काकांनी तुला आवडतात म्हणून व्हेज सॅन्डविच आणलय ते जाऊन खा..." त्या त्याला दटावत आपल्या राऊंडला जातात...


" शंतनु मी आलोच...तो पर्यंत तु बस बोलत या काळ्या चिंचुद्री शी..." प्रेम तरी परत तिला चिडवत तिथुन निघून जातो...प्रेम हा मुंबई तला एका प्रसिद्ध अशा कुमार शर्मा ट्रॅव्हल एजंसी चा व डॉक्टर विमल शर्मांचा ,धाकटा मुलगा..मोठा मुलगा राहुल...राहुल प्रेम पेक्षा दोन वर्षांनी मोठा ...राहुल दोन वर्षांचा असताना त्यांचे डॅड मुंबई त आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढवायला म्हणून आले आणि हिथेच स्थायिक झाले...प्रेम चा जन्म मुंबई चा...बाकी त्यांचे पाहुणे यु पी मधल्या एका छोट्याशा गावात वास्तव्य करत होते...दादा दादी,२ चाचा , चाची, त्यांची मुलं असा मोठा परिवार होता त्याचा पण सगळे तिकडे...हिथे त्याच घर आणि त्याची एक बुआ आपल्या एका मुलाबरोबर राहत होती...ह्यांच्याच घरी...घटस्फोटीत होती..‌शैला नाव होतं तिचं...

" शंतनु , आय हेट दॅट पीपल्स...हु ईज व्हेरी पुअर...मला त्या गरीब लोकांचा खुप तिटकारा येतो...जे रस्त्यावर भीक मागत असतात...कामं काही न करता...आणि आपल्या सारख्या श्रीमंत माणसांवर त्यांच पोट भागवत असतात....आयतं बसुन..." शंतनु ला प्रेम सांगत असतो...


" हम्म ..म्हणून तर..." शंतनु बोलता बोलता थांबतो...


" काय...काय म्हणून तर..." प्रेम त्याला आपल्या भुवया जुळवत विचारतो..



" काही नाही ...म्हणजे मला असं म्हणायचं होतं कि म्हणून च तु आल्यापासुन गेले दहा दिवस त्या नविन आलेल्या राधेचा ईतका राग राग करतोयेस..." शंतनु आपल्या हातातील बॉल टप्पा मारत बोलतो...



" हो...पण काही म्हण ती खुप वेगळी वाटते रे मला...असं काहीतरी आहे तिच्यात कि मला फक्त तिच्याकडेच पाहावस वाटतं..." तो समोरून येत असलेल्या राधेला पाहून बोलतो...


" काही बोललास का...??" शंतनु ला मात्र ऐकायला जात नाही म्हणून तो परत विचारतो...


" काही नाही.." तो आपल्या मनात हुश्श करतो कि बरं झालं शंतनु ने काही ऐकलं नाही ते म्हणत, " चल बास्केट बॉल खेळुयात..." म्हणत तो त्याच्या हातुन बॉल हिसकावुन घेतो आणि दोघे बास्केट बॉल खेळायला ही लागतात...तोच या दोघांत तिसरी व्यक्ती ही सामील होते आणि त्यांच्याबरोबर खेळायला ही लागते...पुढच्या पाच मिनिटात तिने चार पॉंईट ही घेतले होते ...पाचवा ती व्यक्ती घ्यायला जाणारच कि प्रेम व तिची धडक होते ज्यामुळे दोघे एकमेंकावर पडतात...तो त्याच्या ही नकळत तिच्या डोळ्यांत हरवुन जातो...आणि ती ही.‌‌..


" हैलो ...बॉल प्लीज......" एक पंचवीस वर्षांचा मुलगा सेम त्याच्याच वयाच्या दुसर्या मुलाला बोलतो तसं तो मुलगा भानावर येतो...


" प्रेम काय हे....अरे तु त्याला का बॉल दिला...बघ हरलो का नाही आपण एका पॉंईट ने..." त्याचा मित्र त्याला रागवत बोलला..


" चिल शंतनु अजुन गेम संपला नाही ना..." प्रेम त्याला कुल डाउन करत बोलतो...

" हो आहे ,अजुन दहा मिनिटे...पण मला एक सांग तु कुठे हरवला होतास...सानिया च्या का मोनाली च्या..." शंतनु हसत त्याला विचारतो..


" तिच्या डोळ्यांत...तेरा वर्षांनंतर ही मी अजुन तिथेच अडकलो आहे...तिच्या त्या घार्या डोळ्यांत..." तो मात्र अजुन ही त्या डोळ्यांत हरवला होता...


" कोण ती..?? आणि कुणाचे घारे डोळे ‌‌....??" शंतनु मात्र त्याच्या या बडबडीने वैतागतो... असंबद्ध बडबड होती जी त्याच्यासाठी...


" कोणी नाही शंतनु ..तु हो पुढे मी आलोच पाणी पिऊन..‌" प्रेम पळतच बाहेर गेला .‌‌..एका भिंतीचा आडोसा पाहुन तिथे थांबून त्याने आपल्या खिशातून वॉलेट काढलं आणि त्यातला खुप जुना असा फोटो काढला...


" मी अजुनही तुला विसरलो नाही ...तु कुठे आहेस...मला भेटशील का परत माझ्या दिलाची राणी .??" तो त्या फोटो कडे पाहुन खुप भावना विवश होत बोलला...खिशात ते पाकिट टाकलं...आणि एक दिर्घ श्वास घेऊन पळत शंतनु जिथे होता तिथे गेला...आजची मॅच त्यांच्या साठी खुप महत्वाची जी होती...



क्रमशः