" ती हिथे काय करत होती...?? का तिला आपल्या ऑफिसमध्ये घेतलंस तू...??" अर्जून चे डॅड अर्जून ला ओरडत होते , संध्याकाळी घरी आल्यावर ...तर तो कशाला ह्यांना सांगितलं असं एक्स्प्रेशन देत रोहित कडे पाहत होता...रोहित मात्र एकदा अर्जून कडे तर एकदा त्याच्या चाचांकडे पाहत होता...
" काय विचारत आहे मी अर्जून ...?? ती आपल्या ऑफिसमध्ये काम का करत होती...??" अर्जून काहीच उत्तर देत नसल्याने त्याचे डॅड त्याला परत बोलतात...
" मला वाटतंय या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही..." अर्जून रागात बोलतो आणि आपल्या रूमकडे जायला लागतो..
" मिस्टर अर्जून..." तोच त्याच्या कानावर आवाज पडतो, तसा तो मागे वळून पाहतो...तो हसुन त्या व्यक्तीकडे पाहत जायला लागतो,तशी ती व्यक्ती आपल्या हातातील दांडुका दाखवते, " मिस्टर अर्जून,आय ॲम ऑन ड्युटी....सो आम्हांला सांगा ,मिस नगमा शेख आपल्या कंपनीत कशा काय...?? तुम्ही तुमच्या डॅडना उत्तर द्यायला जबाबदार नसाल पण मला वाटतंय तुम्ही या देशाचे नागरिक आहात ..त्याचे भान ठेवून तरी तुम्ही आम्हांला ॲन्सेरेबल असाल...." ती व्यक्ती कडक आवाजात बोलते..
" इन्स्पेक्टर प्रिती, तुम्ही बरोबर बोलत आहात..." तिचं वाक्य ऐकून तो मागे सरकत बोलतो, " मिस नगमा शेख...या आमच्या कंपनीच्या आता ईम्प्लॉयी आहेत...आणि त्यांचा इंटरव्ह्यू मी नाही तर माझा भाऊ ,रोहित यांनीच घेतला आहे....ते माझे असिस्टंट कम कंपनीचे मॅनेजर ही आहेत...सो यू कॅरी ऑन विथ मिस्टर रोहित..." अर्जून एवढ बोलून तिथून काढता पाय घेतो...खरंतर त्याला इन्स्पेक्टर प्रितीला पाहून खुप आनंद झाला होता...गेल्या दोन वर्षानंतर ती त्याला दिसली होती...
" भाई...काय रे हे...मी इतक्या मस्त मुडमध्ये हिथे आली आणि तू .." प्रिती आपली कॅप काढत त्याच्याकडे पळत जात बोलते, आणि त्याला एक टाईट हग करते...
" हंम्म...आणि मी तुझ्या सर्व मुडची टायटाफिश केली...असंच ना प्रितो...." तो ही तिला आपल्या कुशीत घेऊन बोलला...
" हो ना..." ती तक्रार करत म्हणते...सर्व त्यांच्याकडे आनंदाने पाहत असतात...
" चाचू...बायका आपल्या नवर्याला पाहून खुश होतात पण आमचं नशीब बघा...आमच्या बायकोला इतक्या दिवसानंतर येऊन ही नवर्या आधी भाईसाहेब लागतो..." रोहित त्या दोघांकडे येत बोलतो...
" मग तुला काय प्रोब्लेम आहे...तुला जेलसी फिल होते का..कि ती तुझ्या मिठीत नसुन माझ्या मिठीत आहे ते..." अर्जून त्याला चिडवत म्हणतो...
" तू हा ही चांस सोडू नकोस भाई..." रोहित प्रिती कडे हसत बघत म्हणतो, " अगं ऐ बाई...आता भाई कडून लाड झाले असतील तर जरा नवर्याचे ही लाड करा म्हटलं..." तो तिचा एक हात ओढत बोलतो..
" चला आता हितं आपलं काही काम नाही..." अर्जून चे डॅड अर्जून च्या मॉमला म्हणतात व त्यांना घेऊन इतरांना ही आपल्या आपल्या खोलीत जायला सांगतात...तसे सर्व हसत घरात जातात...
" रोहित...मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही..." ते सर्व जाताच मिठीतून बाहेर येत प्रिती गाल फुगवून म्हणते...
" का गं ..काय झालं आता...??" अर्जून रोहित कडे पाहत विचारतो.." रोहितने काय केलं सांग मला ..आता मी त्याला कामावरून काढून टाकतो..." रोहित चा कान पकडत अर्जून बोलला..
" अरे भाई...कान आहे माझा तो..." तसं रोहित ओरडायला लागतो..
" सांग प्रितो, काय केलं याने कि आमची बहिणाबाई नाराज आहेत..." तरी पण अर्जून त्याचा कान सोडत नाही...
" अरे भाई..खरच मी काही केलं नाही...अगं बये...बायको आहेस माझी कि दुष्मन...सोडायला सांग ना भाई ला कान..." रोहित मात्र अजून ओरडत बोलतो...
" तुझी बायको ती नंतर झाली ...आधी माझी ती लाडो प्रितो, बहिण होती...आता तूच सांग ..का त्रास देतोय माझ्या बहिणाबाईंना " अर्जून नजर रोखत बोलतो, रोहित तिच्याकडे दया कर बाई या भावनेने पाहत असतो तर ती मात्र निवांत अर्जून च्या खांद्यावर हात ठेवून, त्याला असंच पाहिजे ची ॲंक्टिग करत असते...तिला खुप मजा येत असते..
" अरे मला जर माहित असतं तर मी बोलणी खाल्ली असती का तुझ्या या लाडक्या बहिणाबाई ची..." तो कान सोडविण्यासाठी खुप प्रयत्न करत असतो..." अगं ऐ, आता माझा कान हातात आल्यावर सांगणार आहे का माझी काय चूक आहे ते..." तो तिला ओरडतो..
" भाई ...जाऊ दे माफ करू आपण त्याला..." तसं त्याला ईतकं काकुळतीला आलेल पाहून तिलाच कसतरी वाटत म्हणून ती अर्जून चा हात काढत बोलते...अर्जून ही मग जरा मागे हटतो...
" आ...यार ..." तसा रोहित कानावर हात ठेवून तिच्याकडे रागात बघतो, " बये आता चूक तर सांग..."
" हा ..काय केलं या तुझ्या लाडक्या नवरोबाने..." आता अर्जून तिच्याकडे पाहत बोलतो...
" अरे त्याला माहित होतं कि मी येणार आहे तरी ही स्टेशन ला मला घ्यायला आला नाही..." ती तक्रार करत म्हणते...
" काय...?? या माठ ला माहित होतं ...?? " अर्जून रोहितच्या पाठीवर धपाटा घालत बोलतो, " तरीच म्हटलं सकाळपासून साहेब एवढे खुश का आहेत...आणि का लवकर उठून आज सकाळीच ऑफिसला गेले ते..." अर्जून हसत बोलतो..
" बस ईतनी सी गुस्ताखी ला एवढी मोठी सजा..." तो एक हात कानावर तर एक हात पाठीवर चोळत ,वाकडं तोंड करत बोलतो........ " भाई ही मानलेली बहिण असुन ईतका मला त्रास देतोस आणि आपल्या कोमल ला जर असा मी थोडा त्रास दिला तर किती फैलावर घेशील...मला तर कळतच नाही कि नक्की सख्खी बहिण कोण तुझी..."
" हो ना...तुलाही हाच प्रश्न पडतो ना दाद्या..." तोच मागून एक आवाज आला तसे सगळे दाराकडे पहायला लागले, एक गुलाबी टॉप,त्यावर ब्ल्यू जॅकेट आणि खाली ब्लॅक जीन्स ...केसांची हाय पोनीटेल.... चेहर्यावर कसलाही मेकअप नसलेली ...प्रिती च्याच वयाची मुलगी दारात उभी असते...
" कोमल ...तू...." म्हणतच प्रिती तिच्याकडे पळत जाते...आणि तिला टाईट हग करते...
" रोहित ..तुमचं चालू द्या ..मी आलोच..." अर्जून त्याच वेळी रोहित ला बोलतो आणि जायला लागतो...तो जिन्यावरून पुढे जातच असतो कि...
" भाई...आता तू आपल्या किट्टू शी बोलणार ही नाही...." तशी कोमल पुढे येऊन त्याचा हात पकडत बोलते...पण तो काहीच बोलत नाही...तो तिचा हात काढतो...आणि वर जायला लागतो..." भाई आज रक्षाबंधन आहे...मी दोन वर्षानंतर आले आहे...निदान आज तरी गेल्या दोन वर्षापुर्वी चे विसरून माझ्याकडून राखी बांधून घे..." ती तरी ही प्रेमाने त्याच्याकडे पाहत ..पण उदास चेहरा करत बोलते...
" रोहित..." रक्षाबंधन च नाव ऐकताच अर्जून तिथल्या तिथे च उभा राहतो...त्याच्या डोळ्यांत पाणी तरळत पण तो पाठमोरा असल्याने कुणाला ते दिसत नाही...तो जरा कठोर आवाजात तसाच न बघता रोहितला हाक मारतो, " रोहित ..तू आणि तुझ्या बहिणीचे रक्षाबंधन झालं कि मला बोलव...मग मी प्रितो कडून राखी बांधून घेईन...आणि प्लीज तोपर्यंत तुझ्या बहिणीला सांग ...माझ्यासमोर ही तिने यायचं नाही यापुढे..." तो रूक्ष आवाजात बोलला..
" भाई अरे सोड ना...आता दोन वर्ष झाली ह्या गोष्टीला..." कोमल च्या डोळ्यांतील पाणी रोहित ला सहन झालं नाही... त्यामुळे तो बोलला पण त्याच ऐकायला अर्जून कुठे जाग्यावर होता...तो तर त्याला बोलून निघून गेला होता...
" किट्टू...आवर स्वतः ला..." तो जाताच रोहित तिला बोलला..
" किती आवरू दाद्या ...अशी कोणती मोठी चूक केली आहे रे मी कि भाई मला एवढी मोठी शिक्षा देत आहे.." ती आपले अश्रू उलट्या हाताने पुसत बोलते..." आय नो ,मी केली चूक ...चूक नाही भाईच्या शब्दांत गुन्हा केला...पण तो काय मी एकटीने च केला का...?? त्यात तू आणि प्रितीने ही मला साथ दिली कि नाही...तरीही त्याने तुम्हा दोघांना माफ केलं पण मला अजून..." तिला बोलता बोलता हुंदका फुटला आणि ती तशीच तोंडावर हात ठेवून आपल्या खोलीत गेली...
" आय नो किट्टू ...तुझी यात काहीच चूक नाही..." वर आपल्या खोलीतून दाराला पाठ लावून उभा असलेला अर्जून स्वतः शीच बोलला, " पण निदान खरं काय तू मला सांगितलं असतंस तर आज माझी नगमा मला अशी सोडून गेली नसती गं...खूप खूप प्रेम करतो मी नगमा वर...." तो आपले अश्रू पुसत बेडजवळ असलेल्या टेबल पाशी येतो...आणि नगमा व त्याची लग्नाच्या फोटोची असलेली फ्रेम हातात घेऊन नगमाला पाहत राहतो...डोळ्यांतून अश्रूचा तर पुर आलेला....
" आय मिस्ड यू जान...लवकरच आपण पुन्हा एक होऊ...आणि परत एकदा सर्व काही नीट होईल..." तो फ्रेमवर किस करत बोलतो, " म्हणूनच रोहितला कोणत्याही परिस्थितीत तुला शोधून काढायला सांगितले गेल्या सहा महिन्यांत आणि आपल्या कंपनीत जॉब द्यायला ही सांगितले..." तो एकटक बघत बोलतो...
" अम्मा..आज तारिख क्या है..." स्वतः चा राग गिळून शेवटी नगमा किचनमध्ये आपल्या आईला मदत करायला आली होती...भांडी घासता घासता ती अचानक बोलते.." अरे हा आज तो रक्षाबंधन होगा ना...भाई बहन का त्योहार ..." तिला परत काहीतरी आठवत तशी ती बोलते आणि तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते...
पात्रांची ओळख
अर्जून पंडित ( कथेचा नायक...)
नील आणि सुरभी पंडित ( नायकाचे आई वडिल,दिल्लीचे मोठे बिझनेसमन )
कोमल पंडित ( नायकाची बहिण )
रोहित व प्रिती पंडित ( नायकाचे कझन व वहिनी )
सुनील आणि लाचो ( नायकाचे काका काकू...रोहितचे मॉम डॅड...अजून त्यांची एंट्री नाही झाली पण पुढच्या दोन तीन भागात येतील...)
नगमा शेख ( नायिका )
शबनम शेख ( नायिकाची अम्मा...)
सध्या तरी एवढेच पात्र ..नंतर जसजसे येतील तश तशी ओळख होईलच ..
क्रमशः
काय झालं आहे असं नगमा व अर्जून मध्ये...आणि अर्जून व कोमल मध्ये...?? जाणून घेण्यासाठी वाचत रहा नागार्जुन