Shaapit Nadi Saraswati - 2 in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | शापित नदी सरस्वती - 2

Featured Books
Categories
Share

शापित नदी सरस्वती - 2

पुढे सुरु शापीत नदी भाग

तो अर्थसंकल्प........त्या वर्षी अमोलनं लोकसभा अध्यक्षांच्या मागे लागून लुप्त झालेल्या सरस्वती नदीसाठी अर्थसंकल्पात काही पैशाची तरतूद करुन घेतली होती. ती तरतूद......ती तरतूद पाहिजे तेवढ्या स्वरुपाची नव्हती. त्या तरतूदीची रक्कम कमी होती. ती एवढी कमी होती की की त्या रकमेनं केवळ सरस्वतीचं नावच तपासता आलं होतं.
अमोलला शोधकर्त्यांनी सांगीतलं की सरस्वती जेव्हा प्रकट झाली असेल, तेव्हा ती सात प्रवाहानं प्रकट झाली असेल. तिचं उगमस्थान एकच असेल. परंतू तिचे एकाच ठिकाणाहून सात प्रवाह निघत असतील व तिचे एकाच ठिकाणावरुन सात प्रवाह निघत असल्यानं तिच्या सातही प्रवाहाला तिचंच नाव देण्यात आलं असावं. ती सातही ठिकाणी वाहात असावी तिच्याच नावानं. तशीच ती सातही वेगवेगळ्या ठिकाणी संगम पावत असावी. ज्यात तिला आता मार्कंडा म्हटलं जातं. ही मार्कंडा नदी दुसरी तिसरी नसून सरस्वतीच असावी. सरस्वतीची दुसरी धार यमुनेला मिळालेली असावी. ज्यामुळं यमूनेचं क्षेत्र बदललं असावं. विस्तारीत झालं असावं. सरस्वतीचा तिसरा प्रवाह हा प्रयागजवळच गंगेला मिळालेला असावा. ज्यानुसार तिला प्रयागजवळच गंगा यमुनेसोबतचा त्रिवेणी संगम म्हटलं जातं. चवथा प्रवाह हा अरबी समुद्रात जात असावा सरळ सरळ याचाच अर्थ असा की ती थेट अरबी समुद्राला मिळाली असावी. तर बाकी प्रवाह नष्ट झाले असावे काळाच्या ओघात.
शोधकर्त्यांनी आपापलं मत शोध करुन सांगीतलं होतं. परंतू त्या वक्तव्यानं अमोलचं समाधान झालं नव्हतं. शोधकर्त्यांनी हेही सांगीतलं होतं की सरस्वती नदी काही लुप्त झालेली नसेल, ती आताही असेल, एकत्र प्रयागजवळच गंगा यमुना या नद्यात समाहीत झालेली.
शोधकर्त्याचा निष्कर्ष.......तो निष्कर्ष काहीसा सत्य होता. परंतू तो निष्कर्ष सत्य जरी असला तरी तो निष्कर्ष अमोलला मान्य नव्हता. त्याच्या मनात वेगळच काही होतं. त्याला वाटत होतं की सरस्वती ही आजही गंगा, यमुना या नद्यांसारखीच असून तिचा वेगळा प्रवाह आहे. तशीच ती या गंगा, यमुना नद्यांपेक्षाही सर्वात मोठी असून ती ब्रम्हपुत्रेसारखी विशालकाय नदी आहे. ती लुप्त आहे आणि ती आजही जमिनीखालून वाहात आहे. फरक हा आहे की ती शापीत असल्यानं ती आज लुप्त आहे. परंतू ज्यावेळेस ती शापमुक्त होईल, तेव्हा ती आपोआपच अस्तित्वात येईल आणि या कलियुगात तिला शापमुक्त करणं हे मानवाच्या हाती आहे.
त्याचा तो सरस्वती नदीबद्दलचा विचार. तो विचार रास्त होता. सरस्वती ही लुप्त झाली होती. ती कशी लुप्त झाली हे एक रहस्यच होतं आणि तेच रहस्य अमोलला शोधून काढायचं होतं. तेच एक आव्हान होतं अमोलसमोर. ज्याचा तो रात्रंदिवस विचार करीत होता.

**********************************************************

अमोल तात्पुरता अंबिकाला विसरला होता. त्यानं आपलं संपूर्ण लक्ष राजकारणाकडं वळवलं होतं. तसा तो सरस्वती नदीच्या अस्तित्वाचाही विचार करीत होता. त्यामुळंच त्याला अंबिकाचीही आठवण येत नव्हती. तसं पाहता तो सतत आपल्या मनाला कुठं ना कुठं गुंतून ठेवायचा. त्यामुळंच त्याला अंबिका आठवायची नाही. परंतू याउलट अंबिकाचं होतं. अंबिकाला तो सतत आठवायचा. त्याची आठवण तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. बदल्याची भावना काही पूर्ण झाली नव्हती. परंतू तिला कधीकधी वाटायचं की दोष त्याचा नव्हता. दोष आपलाच होता. आपण त्याच्याशी विवाहबद्ध झालो होतो.
विवाह........विवाह करतांना सर्वच गोष्टीचा विचार करायला हवा. त्याचा विचार आधीच करायला हवा की आपल्याला सुख हवं की दुःख. कारण सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुख. काही काही लोकांना जीवनभर सुखच सुख असतं तर काही लोकांना जीवनभर दुःखच दुःख असतं. जीवन जगत असतांना खरं तर जीवनाच्या कोणत्या मोडवर केव्हा काय होईल ते काही सांगता येत नाही.
आजच्या विवाहाचं विवरण असं. आज लोकांना विवाह करतांना आधीच विचार येतो. मुलंवाले असतील तर त्यांना मुलगी साधी हवी असते. संस्कारी हवी असते. उधळपट्टी करणारी हवी नसते. गोरीपान हवी असते. कारण संतती काळी निघायला नको. ती मुलं विवाह करण्यासाठी चांगली मुलगी पाहतात. त्याच मुलांना प्रेम करण्यासाठी वात्रट मुली चालतात. त्यांना प्रेम झालेल्या मुलींसोबत विवाह करावासा वाटत नाही. कारण त्या वात्रट असतात असा त्यांचा समज. मग विवाहासाठी जातीतील मुली चालतात. फक्त प्रेम आणि टाईमपास करावंसं वाटतं अशा ब-याच मुलींशी. परंतू विवाहासाठी आवड वेगळी असते.
मुलं तसा विचारच करीत नाहीत. मुलगी अशी हवी, तशी हवी या मुलीबद्दलच्या अपेक्षा. एखादाच असतो की जो प्रेम ज्या मुलीवर केलं, तिच्याशी विवाह करतो. मुलाची अपेक्षा असते की जेव्हा कधीकाळी मदत लागलीच तर ती मदत पुरविणारीही हवी असते त्याला. अर्थातच तिच्या बापानं तशी मदत करावी. हा हेतू असतो त्याचा. तशीच मुलगी हवी असते. तसंच मुलीकडील पार्टी असेल तर ते यापेक्षा वेगळा विचार ठेवतात मुलाबद्दल. त्यांना मुलगा म्हणजे पैशाची मशीन असायला हवा. जसा मशीनमध्ये हवा तेव्हा पैसा छापता यायला हवा आणि हवा तेवढा पैसा छापता येतो तसा. जेव्हाही पैसा मागण्याची वेळ येईल माझ्या मुलीला. तेव्हा तो पैसा मिळायला हवा माझ्या मुलीला त्या मुलांकडून. ही वधूपित्याची माफक अपेक्षा असते. तसाच तो गोरापानही असायला हवा. कारण संतती काळी निघायला नको. त्यातच त्याचेजवळ गाडी, बंगला, त्याच्या घरी नोकर, चाकर असायला हवं. सुख पाहिजे म्हणून घरी एसीची अपेक्षा. त्या मुली बापाच्या तरी घरी एसी वापरत नाहीत. परंतू पतीच्या घरी त्यांना एसी हवी असते. तशीच काही जमीनही हवी असते त्या मुलाच्या नावावर. हे अलीकडील आलेलं नवीनच फॅड आहे.
विशेष सांगायचं म्हणजे आपल्या मुलीचा विवाह करण्यापुर्वीच ते आजच्या सुखाची कल्पना करतात. त्यांची कल्पना तशीच असते. माझ्या मुलीला अपार सुख.
सुख........खरंच जीवनभर सुख असतं का आयुष्यात. तर याचं उत्तर नाही असंच येईल. कारण जीवन हे पाच मिनीटाचं अस्तीत्व नाही वा जीवन हे चार पाच वर्षाचं नाही की आयुष्यात अमाप सुख सुख असेल. दुःखाला थाराच नसेल जीवनात आणि दुःख आलंच तर काही काही महाभाग एकमेकांना सोडून देतात. महत्वपुर्ण गोष्ट ही की याला संसार तरी म्हणता येईल काय? अहो, इथं राजाचा रंक बनतो आणि रंकाचा कधीकधी राजाही. जीवन हे विवाहानंतर जवळपास पन्नास वर्षाचं आयुष्य असतं. या पन्नास वर्षाच्या आयुष्यात पन्नास पेक्षा जास्त कितीतरी संकटं येत असतात. इथं तर प्रत्येक पावलावर संकट असतं. सीतेचं उदाहरण पाहू. सीतेला काय कमी होतं. तेवढं मोठं राज्य सीतेचं. रामाच्था घरी आणि वडीलांच्या घरीही. रामाला जेव्हा वनवास झाला, तेव्हा रामानं म्हटलं,
"सीते, वनवास मला झालाय. मातेची आज्ञा. त्यात तू कशाला येतेय माझ्यासोबत. वाटल्यास तू महालात राहा." ते रामाचे बोल. त्यावर सीता म्हणाली,
"नाही. तुम्ही माझे पती आहे व मी तुमची पत्नी. पत्नीच नाही तर अर्धांगिनीही आहे. मग तुम्ही संकट झेलायचं आणि मी मजा मारायची. हे मला शोभेल काय? नाही मला हे शक्य होणार नाही. मीही येणारच वनवासाला."
सीता गेली वनात. रामाच्या मागं लागून जबरदस्तीनं. कारण ती खरी अर्धांगीनी होती. राम जिथं, तिथं सीता. त्याला काटे रुततील तर ते तिलाही. तो कंदमूळ खाईल. ते तिही. म्हणूनच आज त्यांचं नाव घेतलं जातं आदरानं. म्हणतात की राम सीतेसारखा जोडा हवा. सुख आणि दुःखाची कल्पना अशीच. अमाप सुख रामराज्यात आणि एका क्षणात दुःख. तशी पत्नी हवी. बिचारी स्वतः दुस-या वेळेस स्वतः वनवासात गेली आणि रामाला म्हटलं,
"माझ्यामुळं कलंकीत होवू नका आणि वनवासातही येवू नका. कारण तुमची प्रजेला गरज आहे. तुम्ही राजमहालातच राहा." ती स्वतः गेली वनवासाला. म्हणूनच त्यांना आज देव म्हटलं जातं. काहीजण मात्र उगाचंच आक्षेप घेत असतात.
आजची स्री तशी नाही. ती जेव्हा पत्नी बनून घरी संसार करायला येते, तेव्हा तिला सुख हवं असतं अमाप सुख. ती दुःखाची कल्पनाच करीत नाही आणि अशावेळेस जर दुःख आलंच तर ती चक्कं सोडून जाते त्याला. म्हणतांना म्हणते,
"तुम्ही सुख देणार होते ना. हे असंच सुख?"
दुःख सुखाची कल्पनाच आमची वेगळी आहे. बिचारी सीता जेव्हा वनवासात निघाली, तेव्हा वडील जनकानं म्हटलं,
"पुत्री चल माझ्यासोबत. जनकपुरीत राहा." तेव्हा ती बापास म्हणते,
"नाही बाबा. माझे पती दुःखात असतांना मला त्यांना सोडणं अवघड आहे. तुम्ही जा."
किती महान विचार तिचे. आजची मुलगी जर असती तर तिनं चक्कं म्हटलं असतं की ते काय ऐकायचं त्या सावत्र आईचं आणि पतीलाही म्हणाली असती की जा तुम्ही. जायचंच आहे तर. काही काही तर महिलांनी सासूला शिव्याच हासडल्या असत्या. कारण त्यांना दुःख नाही, सुख हवंय. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर शौचास गेला. तो ताबडतोब उठल्यानं तो शौचालयात ताडकन पडला व कोमात गेला. त्यावेळेस त्याच्या सेवेचा नेट आपल्याला नको म्हणून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आणि बिचा-याची सेवा भावानं केली. असे असतात काही भाऊही. लक्ष्मणासारखे. बिचारा लक्ष्मण. म्हणतात की रामाच्या चौदा वर्षाच्या वनवास काळात तो चौदा वर्षपर्यंत उपाशी राहिला. अन् काही भाऊ विभीषणासारखेही असतात. रावण जेव्हा मृत्युशय्येवर होता. तेव्हा राम म्हणाला,
"रावणा, तू माझ्यापेक्षा ताकदवान, विद्वान, बलदंड दुरदृष्टीचा आहेस. तेव्हा मला विचार येतो की तू हे युद्ध कसे हरलास?" त्यावर रावण म्हणतो,
"विचार कर की तुझा भाऊ तुझ्या सोबतीला होता. माझा भाऊ नव्हता."
असे असावे भाऊही की ज्यांच्यामुळे आपले प्राणही वाचेल. परंतू आजचे भाऊ असे नसतात. त्यांना आजची सीता मतलबासाठी रामापासून दूर नेते. एवढी दूर नेते की तो परत येवूच शकत नाही आणि काम संपलं किंवा मतलब साध्य होत नसेल तर लात मारुन सोडूनही जाते. मग बिचारा अधांतरी ताटकळत राहतो. तो ना इकडचा असतो ना तिकडचा. शेवटी तो रस्त्यारस्त्यांवर भीक मागत फिरत राहतो माणूसकी सोडून. ही आजची अवस्था आणि वास्तविकता आहे.
ह्या आहेत आजच्या पतीव्रता. अहो ज्या रामायणाला आम्ही आदर्श मानतो, त्या रामायणातील राम सीतेसारखं वा भरत मांडवी वा लक्ष्मण उर्मीलेसारखं थोडं तरी वागतो का आपण? त्या तिनही जोड्या किती आदर्श होत्या. एवढंच नाही तर रावणाची पत्नी सुद्धा त्याच्या जीवंत असेपर्यंत त्याला सोडून गेली का? तसंच ज्या महाभारताला आम्ही आदर्श मानतो, त्या महाभारतात तरी द्रोपदीनं पांडवांना दगा दिला का? तिही शेवटपर्यंत त्या पांडवांसोबतच राहिली ना. आयुष्यातील चढाव उतार झेलत. परंतू तिनं आपले पती सोडले नाही मरणापर्यंत. त्यांना धरुनच राहिली ती.
आज तसं नाही. आजच्या पतीपत्नीची कल्पनाच वेगळी आहे. आजच्या पत्नीला पतीच्या जीवनात जर दुःख आलं तर ते चालत नाही अजिबात. मग त्याचा थोडासा व्याभीचार कसा सहन होईल बरं! तो थोडासा बोलला की घटस्फोट. त्यानं एखाद्या महिलेला गाडीवर बसवून तिला मदत केली की संशयावरुन घटस्फोट. त्याचं एखाद्या महिलेशी बोलणं, त्याचं नशा करणं, आजच्या स्पर्धात्मक काळात काम लागत नसल्यानं त्यानं कमवून न आणणं. कधीकधी त्याची गरीबी ही आजच्या काळातील शुल्लक घटस्फोटाची कारणं. एक कारण तर असं की तो मायबापाचं व आपल्या नातेवाईकाचं ऐकतो. माझं अजिबात ऐकत नाही. का रामानं कैकेयीचं ऐकलं नव्हतं वनवासात जातांना. आणखी एक कारण घटस्फोटाचं. त्याची आई मधामधात बोलते. एक कारण तर आश्चर्यात टाकणारं, आईला वृद्धाश्रमात टाकत नाही.
किती विचीत्र कारणं घटस्फोटाची. विचार येतो की कोणी विवाहच करु नये. परंतू विवाह होणारच. कारण विधात्यांनी ही सृष्टी निर्माण करण्याचा ठेका घेतला आहे. त्याचे मजूर आपण आहोत ना. आपल्याला ते काम पूर्ण करायचं आहे. म्हणूनच विवाह करावा लागतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे विवाह करणे ही काही भातूकलीच्या खेळासारखी सहज सोपी गोष्ट नाही. पटलं तेव्हापर्यंत राहायचं व न पटल्यावर सोडायचं. तसंच सुख असेपर्यंत राहायचं व सुख निघून जाताच सोडायचं. हे काही बरोबर नाही. जीवन हे असंच असतं, सुख दुःखाच्या जाळ्यानं विणलेलं. सुखाची कल्पना केल्यास आज प्रत्येकच व्यक्ती सुखी नाही. प्रत्येकाच्याच जीवनात काही ना काही प्रमाणात थोडं ना थोडं दुःख असतंच. तेव्हा असं दुःख आल्यावर सोडून जाणं बरोबर नाही आणि तसं जायचंच असेल तर ते विवाहापुर्वीच ठरवावं. विवाहानंतर नको, आपल्याला विवाह करायचा की नाही आणि हं, सुख असतांना समजा दुःख आलंच तर सोडून जायचं असेल एकमेकांना तर त्यांनी विवाह न केलेलाच बरा.
तिला आता पश्चाताप होत होता. परंतू आता काही त्याचा फायदा नव्हता. कारण तिनंच घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात सादर करुन घटस्फोट घेतला होता.
ती निराश राहात असे आणि आता तिला कुत्रही विचारत नव्हतं. त्यामुळंच की काय, तिच्या चेहर्‍यावर तेज उरलं नव्हतं. तिची कांती निस्तेज झाली होती. गालपटं बसली होती. चेहर्‍यावर सुरकृत्या पडल्या होत्या. असं वाटत होतं की तिच्या मनात भयंकर चिंता असेल.
तिच्या चेहर्‍यावर चिंता होतीच. तिला त्याची आठवण यायची, तेव्हा तिचा जीव कासावीस व्हायचा.
परंतू आता काही उपाय नसल्यानं ती निपचीत पडली होती.
ती सायंकाळची वेळ होती. बाहेर गार वारा सुटला होता. दिवसभर सुर्य प्रखरतेनं तापला होता. परंतू आता गार वारा सुटल्यानं कदाचीत पाऊस येईल असं वाटत होतं. अशातच विजाही चमकायला लागल्या आणि पावसानं हजेरी लावली.
तो वळवाचा पाऊस. अक्राळविक्राळ रुप धारण केलेला तो पाऊस जणू तिला चुंबायला आला होता की काय, कुणास ठाऊक. परंतू त्या पावसानं तिच्या निराश अवस्थेत जन्म घेतला होता. तो वळवाचा पाऊस जसा आला. सोबत त्यानं मोठं वादळही आणलं होतं. कारण त्याच वादळानं झाडं कोलमडून पडली होती. काही जनावरांच्या अंगावर झाडं कोसळून तिही जखमी झाली होती. काही मरण पावली होती. विजेच्या तारा तुटल्या होत्या.
तो वळवाचा पाऊस पाहून सर्वजण आपापल्या घरात शिरले होते. मात्र अंबिका? अंबिका काही घरात शिरली नव्हती. ती त्या मुसळधार पावसात चिंब चिंब भिजतच राहिली. तिला चिंब भिजतांना आनंद वाटत होता नव्हे तर ती त्या मुसळधार पावसात चिंब भिजून आपल्या मनातील निराशा दूर करण्याचा प्रयत्न करीत होती.
काही वेळ गेला होता. तो पाऊस थांबला होता. त्याचबरोबर त्या विजांचे चमकणेही थांबले होते. वारा वाहणेही थांबले होते. मात्र जनजीवन विस्कळीत झालं होतं. जागोजागी झाडं पडली होती. पाळीव जनावरं मृत्युमुखी पडले होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास लोकांना अतिशय दुःख झालं होतं. परंतू अंबिका........ती मात्र खुश होती. तिला जणू पावसाच्या रुपानं कोणीतरी भेटायला आला असेल असं वाटत होतं. तो कोणी नव्हता भेटायला आलेला. मात्र पावसात भिजल्यानं तिच्या शरीराचा दाह कमी झाला होता. जी वेदना होती, तिच्या अंतर्मनात असलेली. ती वेदना वेळीच कमी झाली होती. ती वेदना आता जाणवत नव्हती.
ती त्या वळीवाच्या पावसात भिजली होती. दाहही शांत झाला होता शरीरातील. थोडासा थकवा जाणवत होता. परंतू आठवण. ती आठवण काही तिच्या मनातून जात नव्हती. तर तिला वाटत होतं की आपण स्वतःच जावं अमोलकडं. कडकडून मिठी मारावी व म्हणावं की माझी चूक झाली. तू मला माफ कर.
तो तिचा विचार. परंतू तो विचार कार्यान्वीत करायची हिंमत होत नव्हती. अन् हिंमत होणारही कशी? कारण दोष तिचाच होता. तिनंच आपल्या सुखी संसारात कैकेयीसारखी आग लावली होती व रामायण निर्माण केलं होतं. आता त्या रामायणाचं महाभारत झालं होतं.
चुकीलाही माफी असते. जर एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस चुकला तर. परंतू त्या चुकांना माफी कशी द्यावी की जी चूक वारंवार होते. काही लोकं वारंवार चुका करीत असतात. त्याची काही कारणं असतात. पहिलं म्हणजे आळसपणा. काम करायचा कंटाळा येणे. ज्या लोकांना काम करायचा अतिशय मोठ्या प्रमाणात कंटाळा येतो, ती मंडळी वारंवार चुकतात. काही मंडळी आपल्याला कोणी कामच सांगू नये म्हणून जाणूनबुजून चुका करीत असतात. काही मंडळी ही अनवधानानं चुकतात. काही मंडळी हे बेजबाबदारीपणानं चुकत असतात. त्यांना जबाबदारी काय असते ते समजतच नाही. तसंच काही मंडळींना चुका करायची सवय असते म्हणून चुकतात.
चुकांना माफी असावी. परंतू कोणत्या? ज्या चुका अनवधानानं होतात. तसेच ज्या चुका वारंवार होत नाही. एखाद्या वेळेसच होतात. तशाच ज्या चूका किरकोळ स्वरुपाच्या असतात. परंतू ज्या चुका कोणी आळस करुन करीत असेल, तर त्या लोकांच्यात नवा उत्साह भरण्यासाठी त्यांना चुकांवर माफी देवू नये. तसंच जी मंडळी जाणूनबुजून आपल्याला काम सांगू नये म्हणून चुका करतात. अशांना वेळीच फटकारले पाहिजे. अशांनाही चुकांवर क्षमा करु नये आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला वारंवार चुका करायची सवय असते. त्या व्यक्तीला कधीच माफी देवू नये.
कारण एक चूक. एक चूक पुर्ण व्यवहार चुकवून टाकते. एक चूक पुर्ण जीवन बदलवून टाकते अन् एक चूक पुर्ण आयुष्यच उध्वस्त करुन टाकते.
चुका...... चुका करणं सोपं काम आहे. परंतू त्या सुधारणं कठीण काम आहे. चुकीबद्दल एक उदाहरण देतो. आपण ताजमहालचं नाव ऐकलं असेलच. तो शहाजहान बादशाहानं आपली बेगम मुमताजमहलसाठी बांधला. कारण त्याचं प्रेम होतं तिच्यावर. बरोबर आहे. प्रेमच होतं आणि लोकं म्हणतात की विशेष प्रेम यासाठी की तिनं त्याचा विवाह आपल्या बहिणीसोबतही लावून दिलेला होता. तसंच तिनं शहाजहानसाठी अशा ब-याच गोष्टी केल्या होत्या की ज्या गोष्टीला विसरता येत नव्हतं. म्हणूनच ती सदैव स्मरणात राहावी. म्हणून शहाजहान बादशाहानं तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.
ज्या शहाजहान बादशाहानं ताजमहाल आपली लाडाची बेगम मुमताजमहल साठी बांधला. त्यावेळेस तो महल बांधून होताच त्याच्यासमोर बांधकामाचा कारागीर हजर झाला. म्हणाला,
"जहापनाह, मी महाल बांधून पुर्ण केला आहे. आता तो आपल्या खिदमतमध्ये तयार आहे. आपण हवं तर पाहून घ्यावं."
बादशाहानं ताजमहाल पाहिला. त्याचं रेखीवपण पाहिलं. तसा तो वास्तुकलेचा एक देखणा नमुनाच होता. ते पाहून बादशाहा भारावला व विचार करु लागला की यानं ताजमहाल तर बांधला. परंतू असा ताजमहाल दुसरीकडे कुठेच बांधला जावू नये. काय करावं.
बादशाहा विचार करु लागला. विचारांती त्याला समजलं की आपण याचे हातपाय कापावे. तसा विचार केला खरा. परंतू क्षणातच विचार आला की नाही. जर याचे हातपाय छाटले तरी हा मुखानं किंवा कोणत्याही स्वरुपात असा ताजमहाल उभारु शकतो. त्यापासून आपण याची बुद्धीच छाटली तर........ना रहेगा बास ना बजेगी बासरी. बुद्धीच छाटावी. परंतू ती कशी छाटणार. त्यासाठी डोकंच छाटावं लागेल. म्हणजे बुद्धी नष्ट होईल.
बादशाहा विचारच करीत होता. तोच तो बांधकाम कारागीर म्हणाला,
"जहापनाह, कसला विचार करताय?"
"विचार करतोय की आता बांधकाम पुरे झाले. झाले ना?"
"होय. बांधकाम पुर्ण झालं. आणखी काही आदेश आहे काय? निदान काही बांधकामाची अपुर्णता."
"काहीच नाही ना? फक्त एक बाकी आहे."
"नाही. काहीच बाकी नाही. पण एक बाकी आहे? मी समजलो नाही जहापनाह. जरा खुलवून सांगा."
"आता सांगतो मी माझा विचार." असे म्हणत तो आपले विचार सांगू लागला.
"मी विचार केलाय की यापुढं असं ताजमहाल सारखं बांधकाम कुठंही दुसरीकडं उभं राहू नये. म्हणून तुझी बुद्धी छाटायचं ठरवलं."
"बुद्धी! म्हणजे?"
"अरे, डोकं. तुझं डोकंच धडावेगळं करायचं आहे मला. म्हणजे ना रहेगा बास व ना बजेगी बासरी. तूच राहणार नाहीस तर अशी ताजमहाल सारखी इमारत पुन्हा कशी उभी राहील! माझ्या मतानुसार पुन्हा अशा स्वरुपाचा ताजमहाल उभाच राहू नये."
ते बादशाहाचे बोल. ते माहीतच होतं त्या कारागीराला. परंतू त्यावर किंचीतही न घाबरता तो म्हणाला,
"खुशाल छाटा. परंतू एक काम बाकी राहिलंय. ते पुर्ण करतोय. जेणेकरुन जहापनाह मी खुशीनं मरु शकेल व माझ्या आत्म्यालाही शांती मिळेल आणि आपल्या बेगमच्याही आत्म्याला शांती मिळेल."
"ठीक आहे." बादशाहा म्हणाला. त्याला काय माहीत होते की तो त्याचा जीव घेवून एक घोडचूक करीत आहे.
कारागीर गेला. त्याला बादशाहानं सांगीतलं होतं की तो त्याचा जीव घेणार. म्हणून त्यानं जाणूनबुजून एक अशी युक्ती केली नव्हे तर चूक करुन ठेवली की त्याचे परिणाम बादशाहाला मरणापर्यंत दिसलं आणि आजही दिसत आहे बादशाहा गेल्यानंतरच्या एवढ्या वर्षानंतरही. बादशाहानं केलेली एक लहानशी चूक आजही कित्येक कारागीरांना सुधरवता आली नाही. कित्येक पिढ्या गेल्या आणि कित्येक कारागीर गेले तरीही. ती चूक आहे वर छतावरुन गळणारं पाणी. ते छतावरुन गळणारं पाणी थेट मुमताजमहलच्या डोक्यावरच गळतं. बादशाहानं हयातीतही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतू जमलं नाही. त्यानंतर इतरही कारागीरांना ते काम जमलं नाही. कदाचीत त्याच व्यक्तीला बादशाहानं जीवंत ठेवलं असतं तर आजही त्या ताजमहालात तसं पावसाचं पाणी छतावरुन त्या कब्रच्या तोंडाजवळ गळलं नसतं.
भारतात आणखी एक चूक झाली, ती राजा दाहिरच्या काळात. राजा दाहिर हा हिंदू राजा. त्यावेळेस त्याला मारण्यासाठी मोहम्मद बिन कासीम नावाचा पहिला मुस्लिम व्यक्ती सैन्य घेवून भारतात आला. कसा आला? त्यावेळेसही एक चूक झाली. घोडचूकच ती. येथील अलोर किल्ल्याचा किल्लेदार ज्ञानमतला राजा बनायचे होते. त्याचबरोबर त्याचा सहाय्यक बुद्धभुषणला सेनापती. त्यांनी तशी मनिषा मोहम्मद बिन कासीमला बोलून दाखवली व मदत करण्याविषयी विनंती केली. त्यावेळेस मोहम्मद बिन कासीम बगदादला राहात होता. त्याला भारताबद्दल विशेष असं आकर्षण होतंच. त्यामुळंच त्या बोलण्यानं तो भारतात आला व त्यानं राजा दाहिरला ठार केलं. त्यानंतर त्यानं ज्ञानमत व बुद्धभुषणलाही ठार केलं. याचाच अर्थ असा की आपल्याच चुकीनं आपलंच तेल गेलं व तूप गेलं अशी स्थिती निर्माण झाली होती. ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली पृथ्वीराज चव्हाणच्या काळात. जयसिंग राठोडला दिल्लीचा शासक बनायचे होते. त्यानंही संधी केली मोहम्मद घोरीशी. मोहम्मद घोरी भारतात आला. त्याचं पृथ्वीराजशी तुंबळ युद्ध झालं. बदल्यात पृथ्वीराजला बंदी बनवून त्यांना मारल्यानंतर जयसिंगालाही त्यानं राजा बनवलं नाही. उलट त्याला ठार केलं व त्याच्या मुलाला दिल्लीचा दरवाजा तोडतांना त्या दरवाज्याच्या खिळ्याला लटकावलं व हत्तीच्या धडकेनं मारुन टाकलं त्याला. तरीही आम्ही सुधारलो नाही. सतराव्या शतकात मिरजाफरनं गादीवर बसण्यासाठी आपल्याच जावयाची म्हणजे मिरकासीमची हत्या करवली. बदल्यात मिरजाफरलाही तुरुंग झाला. तसंच रघुनाथरावानंही राजगादीवर बसण्यासाठी आपल्याच पुतण्याची म्हणजे नारायणराव पेशव्याची हत्या केली. हे कार्य इंग्रजांकडून करवून घेतलं गेलं. बदल्यात रघुनाथरावाला काय मिळालं? त्याला इंग्रजांनी तुरुंगात टाकलं.
अनेक ठिकाणी भारतीय मंडळी चुका करीत गेले स्वार्थासाठी. बदल्यात काहीच मिळालं नाही. उलट त्याचे गंभीर परिणाम होत गेले. आपल्यालाच पारतंत्र्य शोषावं लागलं. तरीही आम्ही सुधरलो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. काल आपल्याच चुकीनं आपण पारतंत्र्य भोगलं. एकसंघ राहिलो नाही. इंग्रजांची वेळीच चाल लक्षात घेतली नाही अन् आजही तशी चूक आपल्या लक्षात येत नाही. बरेचजणांना सत्ता पाहिजे. मला सत्तेवर कसं बसता येईल याचा प्रत्येकालाच विचार. कधी एकसंघ होणार नाही आपण. सामान्य लोकं वा बहुजन तर कधीच नाही. आज निवडणुकीचीच गोष्ट घेवू. देशात केवळ दोनच पार्ट्या असायला हव्या. अमेरिका किंवा इंग्लडसारख्या. परंतू आपल्या देशात किती पार्ट्या आहेत. कशासाठी आहेत? का उपयोग आहे एवढ्या पार्ट्यांचा? गरज नाहीच तेवढ्या पार्ट्यांची. तरीही स्वार्थपणा व मतलबीपणा यामुळंच प्रत्येकजण निवडणुकीत उभा राहतो. स्वतंत्र्यता आहे म्हणतो. निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आहे म्हणतो आणि उभा राहतो. परंतू निवडून येतो का? तर याचंही उत्तर नाही असंच येतं. आपली क्षमता नसतांना ही मंडळी का निवडणुकीत उभे राहतात तेच कळत नाही. शिवाय एवढे पक्ष उभे राहतात की त्यांच्यासाठी निवडणूक यंत्रणा राबवितांना देशाचा भरपूर पैसा खर्च होतो. ज्या खर्चाला बजेटमध्ये जोडलं जात नाही. ही झाली देशाची निवडणूक. परंतू साधी नगरसेवकाची निवडणूक पाहू. याही निवडणुकीची तसं पाहिल्यास काहीच गरज नाही. फालतूचा खर्च आहे. परंतू लोकशाही आहे. उभं राहण्याचा अधिकार आहे. म्हणूनच लोकशाहीच्या नावावर सारं खपतं.
आज देशातील पार्ट्यांचे निरीक्षण करता बहुतेक पार्ट्या ह्या बहुजनांच्याच आहेत. त्यांच्यात एकीच नाही. मग निवडून कसे येणार. ती आपली चूकच आहे. स्वातंत्र्य आहे, निवडणूकीला उभं राहण्याचा अधिकार आहे म्हणून सर्वांनीच टाळूवरचं लोणी खावून पाहायचं काय आपल्याच मतांचं विभाजन करुन आणि वारंवार चुका करुन देशाचा सत्यानाश करायचा काय? तो इतरांचा विचार. कारण आम्हाला स्वार्थ आहे ना. आमच्याच स्वार्थीपणातून चूक करण्याची सवय आहे ना पूर्वीपासूनच. ज्याप्रमाणे मोहम्मद बिन कासीम, मोहम्मद घोरी व इंग्रजांनी आमीष दाखवून आपल्याकडून त्या काळात जी चूक करुन घेतली. त्याच चूका आजही आपल्या लक्षात येत नाही व त्याच चुका आपण वारंवार करीत असतो. केवळ सत्तेवर येण्यासाठी नाही तर आपल्या स्वार्थासाठी. मला बसता येत नाही ना सत्तेवर. मग तुम्हीही बसायचं नाही सत्तेवर. जसं दोन मांजरांचं भांडण आणि माकडाचा लाभ. तसंच होत आहे आज.
आज एवढ्या पार्ट्या आहेत की या पार्ट्यांचा खर्च पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेची अपरीमीत हानी होते. परंतू त्याचा विचार कोण करतो? मुख्य पार्ट्या ह्या लहानमोठ्या पार्टी नेत्यांना भडकवून त्यांना मतांचं विभाजन करण्यासाठी उभं करतात. म्हणतात की आम्ही सत्तेवर आलो की तुम्हाला मंत्रीपद देवू. मग निवडणूक झाली आणि ते निवडून आले की मंत्रीपदही मिळतं. परंतू स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्याचा, विकास करण्याचा अधिकार मिळतो का? तर याचं उत्तर नाही असंच येतं.
पार्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास बहुजनांच्या तर शेकडो पार्ट्या आहेत. एकट्या अस्पृश्य समाजात एवढ्या पार्ट्यांची गरज नसतांना प्रत्येक घरामागे एक पार्टी आहे. त्यातच मुख्य पार्ट्यांनीही या अस्पृश्य समाजातील काही कुटूंबात घर केलं आहे. मग अस्पृश्यांच्या मताचं विभाजन झाल्यानं ते नेते कसे निवडून येतील! ती आपली चूकच आहे. बरं झालं आरक्षण आहे म्हणून. नाहीतर एकही अस्पृश्य समाजाचा नेता निवडून आला नसता. ही देखील आपली चूकच आहे.
चुका.....अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चुका करत आहोत आपण. कालही चुका करत होतो आपण अन् आजही. वारंवार चुका करीत असतो आपण आणि स्वार्थासाठी जाणूनबुजूनही चुका करीत असतो आपण. त्याबद्दल भोगलेच आहे आपण त्यांचे गंभीर परिणाम. तरीही सुधारलो नाही आपण. कधी सुधारणारही नाही. कारण जणू आपण शपथच घेतलीय ना. वारंवार चुका करण्याची. मग आपलं कितीही नुकसान होवो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे का चुका कराव्या? का वारंवार तीच कृती करुन वा त्याची पुनरावृत्ती करुन आपल्या चुकात वाढ करावी? अन् का आपण आपल्याच संकटात वाढ करावी? काल आपण चुका केल्या, ज्याचे परिणाम आपण भोगलेच आहे. आज वेळ आहे विचार करायला आणि आपल्या चुका सुधारायला. कारण आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्याला जसं निवडणुकीत उभं राहण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच आपल्याला विचार करण्याचंही स्वातंत्र्य आहे. आपण तसा विचार करावा व आपल्या चुका सुधाराव्यात. जेणेकरुन आपण पुन्हा कधीच गुलाम होणार नाही. नाहीतर अशाच आपल्या स्वार्थीपणानं आपण चुका वारंवार करीत राहिलो ना तर आज आपण स्वतंत्र आहोत, उद्या राहणार की नाही याचीच काळजी वाटते नव्हे तर शंका. आपण स्वतःला आणि आपल्या देशाला वाचवायचं असेल तर शक्यतोवर चुका टाळाव्यात. मग त्या किरकोळ स्वरुपाच्या का असेना. यात तिळमात्र शंका नाही.
अंबिकाची चूक झाली होती आणि तिला आता पश्चातापही येत होता. कारण तिच्या स्वार्थीपणानं तिचंच नुकसान झालं होतं नव्हे तर नुकसान होत होतं. जे नुकसान कधीच भरुन निघणारं नव्हतं.
आज ती अगदी एकाकी पडली होती. कारण तिचे मायबाप मरण पावले होते. काही दिवस तिचे बरे गेले होते. जेव्हापर्यंत तिचे मायबाप होते. परंतू मायबाप मरण पावताच तिला आज जगणं असहाय्य झालं होतं. जगावंसं वाटत नव्हतं. परंतू मरणार तरी कसं? हिंमत होत नव्हती. काय करणार. शेवटी चूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
अमोल राजकारणात रमला होता. त्याच्या मनात सरस्वती नदीच्या शोधाचा विचार घर करुन होता. तो सरस्वतीच्या शोधासाठी तडफडत होता. जणू त्याला सरस्वती म्हणजे त्याची आईच वाटत होती.
सरस्वती जेव्हा भुतलावर आली. तेव्हा त्या नदीला सतलज व यमुना या नद्या मिळत होत्या. ती त्या नद्यांची मुख्य नदी होती तर त्या सरस्वतीच्या उपनद्या होत्या. ही नदी हिमालयातून उगम पावत असल्यानं या नदीच्या उगमाचा भाग हा हिमनगानं भरलेला असायचा. ज्याला ग्लेशियर म्हणतात. त्यामुळंच या नदीत वर्षभर पाणी असायचं. कारण पावसाळ्यात पाऊस पडत असल्यानं कोणत्याही नदीला दुष्काळ नव्हता. ती सुकत नव्हती. परंतू उन्हाळ्यात ऊन्हं तापत असल्यानं ती सुकायची. परंतू सरस्वती नदीला पावसाळ्यात काही समस्या नव्हती. अन् उन्हाळ्यात हिमनग वितळत असल्यानं व त्या हिमनगाचं रुपांतर पाण्यात होत असल्यानं या नदीला उन्हाळ्यातही पाणी असायचं. त्यातच ही नदी बाराही महिने जलधारीनी राहायची. परंतू काही काळानं काळाचं परीवर्तन झालं. ज्या ग्लेशियरमधून पाणी मिळायचं या नदीला. ज्या ग्लेशियरमध्ये पाणी राहायचे. ते ग्लेशियर उन्हाळ्यात हिमनग वितळल्यावर खचले. त्यामुळंच हिमालयात हिमनग बनण्याची प्रक्रिया खंडीत झाली. व्यतिरीक्त सरस्वतीच्या पात्रातही भुकंप आले. त्यातच यमुना व सतलजच्या सरस्वतीला मिळणाऱ्या प्रवाहातही. त्यामुळं यमुनेनं आपला प्रवाह वळवला व ती सरस्वती नदीला जी मिळत होती. ती गंगेला मिळायला लागली. तशीच सतलजही, सतलज नदीही जी पुर्वी सरस्वतीला मिळत होती, ती आता सिंधूला मिळायला लागली. यामुळंच सरस्वतीला जो पाण्याचा पुरवठा होत होता. चारही बाजूनं होणारा. तो काळाच्या परीवर्तनानं बंद झाला. त्यामुळं तो प्रवाह सुकत गेला व सरस्वती लुप्त झाली.
अमोल आज उदास बसला होता. त्याच्या मनात सरस्वती नदीचाच विचार होता. त्याला वाटत होतं की आपण सरस्वतीसाठी काहीतरी करायचं. तिचं अस्तीत्व शोधायचं. परंतू कसं शोधणार. विचार होता. तोच त्याला आठवली गतकाळातील आठवण.
अमोल राजस्थानातील रहिवाशी होता. आज त्या राजस्थानात निव्वळ वाळवंट दिसत होतं. जिकडं पाहावं तिकडं रेतीचे ढिगारे होते. शुष्क असणारी काटेरी निवडुंगाची झुडपं. त्या रेतीवर बऱ्याच दूरपर्यंत पाणी नव्हतं. पाणी त्या रेतीच्या खोलात असेलही कदाचीत. परंतू कोणत्याच यंत्रणेनं ते पाणी शोधता येत नव्हतं.
अमोलला वाटत होतं की काल जी सरस्वती वाहात होती याच राजस्थानातून. तेव्हा काल राजस्थान हिरवागार होता. परंतू सरस्वती नदी आज तेथून लुप्त झाल्यानं आज याच कालच्या हिरवागार असलेला राजस्थानला अवकळा आलेली आहे. त्याच पाण्याच्या प्रवाहानं काल जी सरस्वती राजस्थानला हिरवेगार करीत होती. आज तिच्या लुप्तपणानं राजस्थान अगदी उदासल्यासारखा भासतो. नाही, आपण चूप हातावर हात ठेवून बसायचं नाही. सरस्वतीला शोधायचं. सरस्वतीचं अस्तीवं शोधायचं. त्याच्या मनात तो विचार आला होता. तसे त्याचे तिला शोधण्याचे प्रयत्न करणे सुरु होतेच.
अमोलला वाटत होतं की आपण राजस्थानला हिरवेगार करायचं. आपण सरस्वतीचं अस्तीत्व शोधायचं. त्यासाठीच तो प्रयत्न करीत होता. परंतू त्याचं ऐकणार तरी कोण? ना तो मंत्री होता ना संसदेत तो कोणत्या पदावर. तो एक खासदार होता. साधारणशः खासदार. म्हणूनच त्याचे स्वप्न पुर्ण होत नव्हते. जे स्वप्न त्यानं सरस्वतीच्या रुपानं राजस्थानला हिरवेगार करण्याचे पाहिले होते.
**********************************************************

निवडणूका होत होत्या. लोकंही निवडून येत होते. बरेचसे मंत्री बनत होते. तसा अमोलही निवडून येत होता. कारण त्याचं काम चांगलं होतं. परंतू तो आतापर्यंत काही मंत्री बनला नाही वा कोणत्याच मंत्रिमंडळात त्याला जागाही मिळाली नाही आजपर्यंत.
ही त्याची पाचवी रेजीम होती. कालपर्यंत अपेक्षा असूनही त्याला मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. याहीवेळेस आपण निवडून येणारच असं अमोलला हमखास वाटत होतं. परंतू नेहमीप्रमाणे आपल्याला जागा मिळणार नाही असं वाटत होतं. तशी अपेक्षाही नव्हतीच. तसा याहीवेळेस अमोल निवडून आला. तसा तो याहीवेळेस अगदी भरघोष मतानं निवडून आला. परंतू जागा. आजही त्याला मंत्रिमंडळात जागा मिळणार नाही असं वाटत होतं. परंतू ती अपेक्षा फोल ठरली. आज त्याला मिळालेल्या भरघोष मतानं त्याचं पक्षांतर्गत बाहूबल वाढलं. कारण तेवढे मतं त्याच्या व्यतिरीक्त कोणीही घेतले नव्हते. म्हणूनच की काय, पार्टी अध्यक्षानं प्रधानमंत्री म्हणून त्याचं नाव सुचवलं. तसा तो प्रधानमंत्री बनला.
अमोल प्रधानमंत्री बनला होता. तशी ती सरस्वती आईचीच कृपा आहे असं त्याला वाटत होतं. जणू त्याच आईनं आपल्याला वरदान देवून सोने पे सुहागा केला होता. कारण तो आजपर्यंत निवडून आला होता. परंतू त्याला आजपर्यंत तरी कोणतंच मंत्रिमंडळात पद मिळालं नव्हतं आणि यावेळेस.......यावेळेस केवळ मंत्रिमंडळात मंत्रीपदच नाही तर त्याला प्रधानमंत्री पद मिळालं होतं. जणू त्याला ती लॉटरीच लागली आहे असं त्याला वाटत होतं आणि आता आपण पाहिलेलं स्वप्न आपण पुर्ण करावं असंही त्याला वाटत होतं.
अमोलचं स्वप्न होतं. सरस्वतीचं अस्तीत्व शोधावं. परंतू ते अस्तीत्व काही वर्षापुर्वी त्यानं शोधलं होतं. अर्थसंकल्पातील बजेटनुसार एका शोधकर्त्या तज्ञ समीतीनं तिचं अस्तीत्व शोधून दाखवलं होतं. आता बाकी होतं सरस्वती योजना बनवणे व ती मार्गी लावणे.
अमोल प्रधानमंत्री बनताच सर्व अधिकार त्याचेजवळ आले. त्याचबरोबर सर्व योजनाही त्याला राबवता येत होत्या. त्यामुळंच लवकरच त्यानं सरस्वती प्रकल्पाच्या ज्या योजना आखल्या होत्या. त्या कार्यान्वीत करण्याचे प्रयत्न सुरु केले.
पाऊस पडत होता. तसतशी अमोलला सरस्वतीची आठवण सतावत होती. कारण या पावसाळ्यात सर्व नद्या दुथडी भरुन वाहात होत्या. त्यात त्याला सरस्वती कुठंच दिसत नव्हती. तसा अमोलला विचार आला.
अमोलला आलेला विचार. विचार असा होता की या नद्या. आज दुथडी भरुन वाहात आहेत. मात्र या नद्या....... उद्या पाऊस जाताच या नद्या सुकतील. यात किंचीतही पाणी उरणार नाही. परंतू ज्यावेळेस पुन्हा पाऊस सुरु होईल पावसाळ्यात. तेव्हा याच नद्या पुन्हा दुथडी भरुन वाहू लागतील. आजच्या नद्या अशाच. माणसांच्या स्वभावाप्रमाणे मतलबी. परंतू सरस्वती तशी नव्हती. तिच्यात वर्षभर पाणी. बिचारी कुठं लुप्त झाली तर.......शोधूनही सापडत नाही.
वर्षोपरांत सरस्वतीचं अस्तीत्व सापडलं. तिच्या वाहण्याचा रस्ताही सापडला. ती भुगर्भात आढळली. त्या भुगर्भाखाली. जो भुगर्भ उपसतांना शेकडो किमीचा पट्टा उपसावा लागेल. तसा तो उपसतांना पैसाही अतोनात खर्च होईल. काय करावं?
सरस्वतीचा तो विचार. बिचारा अमोल विचार करु लागला. काय करावं? सरस्वतीला दडलेल्या भुभागातून बाहेर काढावी की दुसरी नदी बनवावी. जिला सरस्वती नाव देता येईल.
सरस्वती.......नवीन नक्कीच नदी बनवता येईल. नवीन नावही देता येईल. परंतू ती सरस्वती होती. तिचं पाणी गोड होतं. तिच्यात भरपूर पाणी होतं. तशी गोड पाण्याची, जास्त पाण्याची नदी ना निर्माण करता येईल. ना तसं नवीन नाव देता येईल. काय करावं.
सरस्वतीचा तो ध्यास. तसा तो विचार करु लागला. तसा विचारांती त्याच्या मनात वेगळाच विचार चमकून गेला. आपण नवीन नदी निर्माण करु नये. नवीन नावही देवू नये. तर आपण त्याच भुगर्भात दबलेल्या म्हणजेच पृथ्वी आईच्या गर्भातून सिझर करुन सरस्वतीला बाहेर काढावं. तिचं खोदकाम करावं. प्रसंगी कर्ज घ्यावं. कोण नाही देणार सरस्वतीच्या नावानं पैसा. त्याचा तो विचार. विचारांती अमोलनं खर्चाचा तपशील तयार केला व तशी ती योजना बनवली व तो ती योजना कार्यान्वीत करण्याचा विचार करु लागला. त्याचा तो विचार. तसा त्यानं खर्चाचा तपशील तयार केला व तशी योजनाही बनवली.
अमोलनं तयार केलेली ती योजना. त्या योजनेनुसार त्यानं एक निविदा तयार केली व ती निविदा वर्तमानपत्रात टाकून आवाहन केलं की सरकारला सैटेलाईट द्वारा सरस्वती नदीचा शोध लागलेला असून ती भुगर्भातून वाहात असल्याचे निदर्शनास येत आहे. तसा तिच्या वाहण्याच्या मार्गाचाही शोध लागलेला आहे. सैटेलाईट द्वारा अंशतः माहिती मिळाली की ती हिमालयातून हरियाणा, पंजाब मार्गे राजस्थानातून गुजरातला जाते व पुढे अरबी समुद्राला मिळते. तसे नकाशेही बनवले आहेत सैटेलाईटच्या माध्यमातून.
अमोल विचार करीत होता. राजस्थानात वाळवंट पडलंच कसं? तशी त्यानं त्या रेती पडण्याबद्दलची माहिती ब-याच जणांना विचारली होती. परंतू त्याला त्याबद्दल कोणीच तशी माहिती सांगीतली नव्हती. कोणी म्हणत होते की निसर्गाची किमया की तशी रेती राजस्थानात निर्माण झाली होती. काहीजण म्हणत होते की राजस्थानात देवानं काहीतरी शाप दिला असावा की तिथं रेतीचं वाळवंट तयार झालं असावं. एक व्यक्ती तर सांगत होता की ही संपुर्ण पृथ्वी जेव्हा तयार झाली. तेव्हा यावर आगच आग होती सगळीकडं. हळूहळू ती आग शांत झाली व त्याची पृथ्वी बनली. परंतू त्या व्यक्तीनं फक्त पृथ्वी कशी बनली याबाबत सांगीतलं. राजस्थानात रेतीचं वाळवंट कसं तयार झालं असावं याबाबत सांगीतलं नाही.
अमोलला मिळणारी ही माहिती. त्याचं समाधान होत नव्हतं. तसा तो आणखी लोकांना विचारत होता. तसा विचारत असतांना एक व्यक्ती म्हणाला की पृथ्वी पुर्वी संपूर्ण पाण्यानं घेरली होती. त्यातच इथं समुद्र होता. तो समुद्र आटला. त्यानंतर तिथं फक्त रेती उरली. जी आता दिसते.
तो व्यक्ती बोलून गेला खरा. त्याचं शंभर प्रतिशत सत्य होतं. कदाचीत समुद्र असेल त्या ठिकाणी. कारण समुद्रातच रेती असते. पाणी आटलं व निव्वळ रेतीच उरली. हा निसर्गाचा चमत्कार. परंतू अमोलचं त्यामुळेही समाधान झालं नाही. त्याला वाटत होतं की जर समुद्र असता तर तो केवळ राजस्थान सारख्या एकाच भागात नसता आणि राजस्थानातही वाळवंट केवळ संपूर्ण राजस्थानात नाही. तर तो वाळवंट राजस्थानात काहीच भागात आहे. त्यामुळंच विचार असा करता येतो की या रेती स्वरुपात पसरलेल्या राजस्थानात जो भाग वाळवंट दिसतो. त्या भागात समुद्र नसेल तर त्या भागात एखादी विशालकाय नदीच असेल यात शंका नाही. याच नदीच्या गोष्टीचा तो विचार करु लागला. विचारांती त्याला समजलं की ह्या रेताड भागात नदी असू शकते. कारण रेती बहुतेक समुद्रातच किंवा नदीतच पाहायला मिळते. नदीच्या पाण्यानं ती नदी उंचावरुन खाली उतरत्या भागात वाहात येते. तेव्हा तिच्या पाण्याला व प्रवाहाला जोर असतो. यात ती आपल्यासोबत जोरात वाहात असल्यानं दगडही वाहून आणते. यातील दगडं हे वाहात असतांना एकमेकांशी घासतात. ते एकमेकांशी घासत असतांना त्याचे त्या दगडाच्या ठिसूळ पणामुळं छोटे छोटे कण बाहेर पडतात. ते कण वाहात असतात. ते कण म्हणजेच रेती होय. राजस्थानातील वाळवंटात हेच रेतीचे कण पाहायला मिळतात.
पुर्वी नद्यांना जेव्हा पावसाळ्यात पूर यायचा. तेव्हा त्या दुथडी भरुन वाहायच्या. त्यातच पुर्वी आठ-आठ, पंधरा-पंधरा दिवसाच्या झडी पडत असल्यानं पावसाळ्यात भरपूर पाणी असायचं. त्यामुळंच मोठ्या नदीची सर्वसाधारण रुंदी पंधरा पंधरा किमीच्या जवळपास असायची. त्या पंधरा पंधरा किमीच्या परीसरात रेतीच असायची. तसंच जेव्हा भुतलावर भुगर्भीय परीवर्तन झालं. भुकंप झाला असेल नदीपात्रात. अशा भुकंपातून टेकड्या निर्माण झाल्या असेल. ज्या काही टेकड्या दृश्य रुपात दिसतात. तर काही टेकड्या दृश्य रुपात दिसत नाहीत. पृथ्वीच्या पोटातून निघालेला टेकडीसदृश पुगीर भाग. ज्यानुसार रेतीचा हा भाग वर उचलल्या गेला असेल व त्या फुगीर भागावर रेती असल्यानं त्याला वाळवंट म्हटलं गेलं असेल. मग त्या त्या नद्यांनी आपल्या वहनाची दिशा बदलली असेल व जुन्या नदीच्या भागात पाणी न पोहोचल्यानंतर वाळवंट तयार झाला असेल. म्हणूनच ह्या नदीभागात आज रेती दिसते बरीच लांबपर्यंत पसरलेली. त्या भागात पाण्याचा अजिबात अंश नाही. अगदी कितीही रेती उपसली तरी. कारण या भागाचं पाणी भुतलावर झालेल्या नैसर्गिक परीवर्तनानं कित्येक वर्षापासून पोहोचलंच नाही. निसर्गानं ते पोहोचूच दिलं नाही.
अमोल हा चिकीत्सक बुद्धीचा होता. विचार करता करता त्याला वाटायला लागलं की हा रेतीचा भाग खोलगट नाही तर तो उंचावर कसा? तसा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा आकार घेवू लागला. तसा त्याला विचार आला की माणसाच्या शरीरात वरच्या कातडीखाली असंख्य गाठी असतात. कँन्सरच्या गाठी नाही तर अनेक इतर गाठी. त्यातील एखादी गाठ अचानक काहीही लागलेलं नसतांना अचानक वर डोकं काढते. ती आपण हात लावल्यास आपल्या हाताला जाणवते. काही दिवसानं ती गाठ आपोआपच विरुन जाते. तसंच एखाद्या इमारतीचं बांधकाम करतांना त्या इमारतीवरही त्या बांधकामाच्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात काही ठिकाणी हलकेसे उंचवटे तयार होतात. ते उंचवटे गॅसचे असतात. शरीरात काही विषारी वायू एवढ्या प्रमाणात तयार होतात की त्या विषारी वायूंना शरीरातून बाहेर पडण्यासाठी जागा नसते. असे विषारी वायू त्या गाठीतून बाहेर पडतात. त्या वायूचे पुर्णतः बाहेर पडून झाले की त्या गाठी आपोआपच विरुन जातात. तेच तत्व असतं बांधकामातील कामात. इमारती बांधतांना भिंतीत जी गॅस जमा होते. त्या गॅसला बाहेर पडण्याला मार्ग नसतो. ती गॅस अशा एखाद्या उंचवट्यातून बाहेर पडते. तीच गोष्ट पृथ्वीलाही लागू होते. पृथ्वीच्या गर्भात जो वायू असतो. तो भूकंपाच्या स्वरुपात बाहेर पडतो. त्याला लाव्हारस म्हणतात. तो वायू पृथ्वी गर्भात जास्त असेल तर अधू जागेवरुन तो मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. ज्याला आपण भुकंप म्हणतो. परंतू जर पृथ्वी गर्भातील गॅस कमी तीव्रतेची असेल तर ती कमी तीव्रतेनं म्हणजे हळूहळू बाहेर येते. ती गॅस जेव्हा बाहेर येते. तेव्हा तिला भरपूर वेळ लागतो व ती प्रक्रिया हळूहळू व सतत घडत असल्यानं कोणाला दिसतही नाही. याचाच अर्थ असा की ती गॅस कोणाला दिसत नसल्यानं सृष्टीतील परीवर्तन दिसत नाही. परंतू बदल घडतात एवढं नक्कीच. हे जे काही विषारी वायू वा वायू पृथ्वी पोटातून बाहेर पडतात. तेव्हा ते पडत असतांना त्यांना जागा हवी असते. ती जागा अधू असलेली हवी असते. समजा या रेती भागात तर लाव्हा हळूहळू बाहेर पडला. तर लोकांना तो दिसणारही नाही. परंतू त्या ठिकाणी एक उंचवटा तयार होवू शकतो. ज्यातून रेतीही वर उचलली जावू शकते. हेच घडलंय राजस्थानात. केवळ राजस्थानातच नाही तर राजस्थानसारख्या इतरही वाळवंटी प्रदेशात.
बरेचसे भुकंप हे नदीत होतात किंवा नदीप्रवण जागेत होतात. कारण नदीच्या पाण्यानं त्या नदीतील किंवा नदीप्रवण क्षेत्रातील जागा अधू झालेली असते. तेथून सहजतेनं पृथ्वीच्या पोटातील गॅसला बाहेर पडता येतं. राजस्थानातील रेतीत अशीच पृथ्वीच्या गर्भातील गॅस हळूहळू बाहेर निघाली असावी. उंचवटे तयार झाले असावे व तिथे असलेल्या रेतीचे डोंगर तयार झाले असावे.
राजस्थानात सरस्वती नदीच अस्तीत्वात असावी नव्हेतर राजस्थानला सरस्वती नदीचं वरदान तरी असावं. परंतू आता ती अस्तीत्वात नसल्यानं राजस्थानची स्थिती एखाद्या वृद्ध बेसहाय्य म्हाता-यागत आज झालेली आहे. जसं म्हातारपणात एखाद्या म्हाता-यांची गत होते तशी. तेथील दगडाची रचना पाहिल्यावर साहजीकच लक्षात येते की या ठिकाणी पुर्वीच्या काळी भरपूर मोठ्या प्रमाणावर भुकंप झाले असावे.
अमोल विचार करु लागला. नाही, आपण राजस्थानात समृद्धता आणावी. तेथील प्रत्येक माणसं सुखी व्हावीत नव्हे तर तेथील शेतकरीही सुखी व्हावा. आपण प्रयत्न करावा. विचारांती अमोलनं तयार केलेली ती योजना. त्या योजनेनुसार त्यानं एक निविदा तयार केली व ती निविदा वर्तमानपत्रात टाकून त्यानं आवाहन केलं की सरकारला सैटेलाईट द्वारा सरस्वती नदीचा शोध लागलेला असून ती भुगर्भातून वाहात असल्याचे निदर्शनास येत आहे. तसा तिच्या वाहण्याच्या मार्गाचाही शोध लागलेला आहे. सैटेलाईट द्वारा अंशतः माहिती मिळाली आहे की ती हिमालयातून हरियाणा, पंजाब मार्गे राजस्थानातून गुजरातला जाते व पुढे अरबी समुद्राला मिळते. तसे नकाशेही बनवले आहेत सैटेलाईटच्या माध्यमातून. योजना तयार आहे. परंतू ती कार्यान्वीत करणं बाकी आहे. आता आपल्याला सरस्वतीच्या प्रवाहाचा मार्ग बनवायचाय. आपल्याला लुप्त झालेल्या सरस्वतीला दृश्य रुपात आणायचंय. कल्पना करा की जेव्हा सरस्वती दृश्य रुपात येईल. तेव्हा ते विहंगम दृश्य कसे असेल. कल्पना करा की ती झुळझुळ मंजूळ आवाज करीत वाहात असेल. तिच्या आजुबाजूला हिरवीगार वनराई असेल. त्यावर पक्षी बसलेले असतील आपला मधूर आवाज काढत. पशू विहार करतील त्या वनराईत आणि कोणी बसलेले दिसतील ग्रंथ लिहित. कोणी ग्रंथसंपदा वाढवीत बसलेले असतील. शेतकरी शेतात वेगवेगळी पीकं घेत असलेले दिसतील. अन् हिंस्र प्राणीही आनंदानं नांदत असतील.
विचार करा की ही सरस्वती केवळ राजस्थान, हिमालय, गुजरात आणि हरयाणालाच पाणी देणार नाही तर ही नदी संपूर्ण देशाला पाणी देईल नव्हे तर विदेशालाही. तेही गोडं. एवढं पाणी तिच्यात आहे. याचं संशोधन झालंय. मात्र त्यासाठी गरज आहे धनाची. कारण कोणतंही काम करायला पैसा लागतो. पैशाशिवाय कोणतंही कार्य घडत नाही. शिवाय ही सरस्वती केवळ एक नदीच नाही तर आपली माता आहे. आपली आस्था आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. ते नसेल तर आपण जीवंतही राहू शकणार नाही आणि ते पाणी नदीत आहे. विचार करा की आपल्याला गोड पाणी लागतं प्यायला. परंतू ते कुठं सापडतं? याचा विचार केल्यास ते पाणी नदीतच सापडतं. समुद्रात सापडत नाही. समुद्राचं पाणी आपण पिवूच शकत नाही. कारण ते पाणी खारं असतं. ओका-या होतात त्या पाण्यानं. यासाठी आपल्याला भुगर्भात असलेल्या सरस्वतीला भुगर्भातून बाहेर काढणं आवश्यक आहे. ती येवू शकते भुगर्भातून बाहेर. परंतू त्यासाठी लागतो पैसा. भरपूर प्रमाणात पैसा लागतो. तेवढा पैसा शासनाजवळ नाही. तेव्हा विशेष करुन शासन स्तरावरुन आवाहन करतो की आपल्याला आपल्या लुप्त झालेल्या सरस्वतीला बाहेर काढायचं आहे भुगर्भातून. ती योजना तयार आहे हे मी आधीच सांगीतलंय. तेव्हा आपण सढळ हातानं मदत करा की जेणेकरुन तिला बाहेर काढता येईल. यात तुम्हाला काय फायदा होईल याचा विचार करु नका. पिढीचा विचार करा. पिढीचा विचार करा की येणारी तुमची पिढी किती सुखी होईल. येणा-या तुमच्या पिढीला सरस्वतीमुळं किती सुखाचे दिवस येतील.
ते आवाहन.......येणा-या पिढीसाठी असलेलं. तो विचार........येणा-या पिढीच्या सक्षम भविष्याचा वेध घेणारा. ते सात्वीक आवाहन व तो सात्वीक विचार. लोकांनी वर्तमानपत्रांतून वाचला. काहींनी टिव्हीवर पाहिला. काहींनी रेडीओतून ऐकला व त्यावर विचार केला. तशी बहुतेकांनी सढळ हातानं मदत केली व काही दिवसातच एवढा पैसा उपलब्ध झाला की त्या सरस्वती नदीला शोधण्याचं नाही तर तिला भुगर्भातून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु झालं होतं. सरस्वती दृश्य स्वरुपात आणण्याच्या योजनेत देशातूनच नाही तर विदेशातूनही पैसा आला होता. कारण सरस्वती नदी ही श्रद्धेचं स्थान होती नव्हे तर लोकं तिला आपली आईही समजत होते.
सरस्वती प्रकल्प.......त्या प्रकल्पासाठी पैसा गोळा झाला होता. तसा प्रकल्प सुरु होणारच होता. तसा काही पैसा शासनही देणार होतं.
योजनाही तयार झाली होती. तशी ती कार्यान्वीत करणं बाकी होतं. तशी तारीख निघणंही बाकी होतं. त्यातच अमोलच्या प्रेरणेनं त्या प्रकल्पाची तारीख निघाली व उदघाटन पार पडलं. त्याचबरोबर अगदी उगमापासूनच जेथून सरस्वती लुप्त झाली होती. तेथूनच खोदकाम सुरु झालं होतं.
**********************************************************

सरस्वती रुपानं सरस्वती नदीला न्याय देणारा अमोल. आज त्याच्या चर्चांना जगभरात उधाण आलं होतं. तसा पदोपदी तोच जनतेच्या मनात घर करुन होताच. लोकांना तो हवाहवासा वाटत होता. त्यातच हवाहवासा वाटत होता तिला. जी त्याची कधीकाळात पत्नी राहिलेली होती. असाच तो दिवस उजळला. तो दिवस उजाडताच त्याला सरस्वती प्रकल्पाची आठवण आली. तसा त्यानं त्या सरस्वती प्रकल्पाचा आढावा वाचला. मात्र ते वाचत असतांना त्याच्या मनात असंख्य विचार होते. तसा तो गतकाळात गेला.
तो गतकाळ. ते महाविद्यालयातील दिवस. ती अंबिका. सारंच काही त्याला हळूवार आठवायला लागलं. महाविद्यालयात असतांना त्याला आवडणारा इतिहास विषय आणि त्यातच कुठंतरी वाचतांना आढळणारा सरस्वती नदीचा उल्लेख. तसं पाहता अंबिकानं सुचविलेली गोष्ट की अमोल तू का नाही लावत सरस्वतीचा शोध?
ते तिचं बोलणं नव्हतं तर तो तिचा प्रश्न होता. तसं पाहता तिच्या त्या गंमतीच्या प्रश्नावर सारेच हसले होते. इतरांना वाटले होते की ती त्याची गंमतच घेत आहे. तशी ती त्याची गंमतच घेत होती. परंतू त्या बालमित्रांना कुठं माहीत होतं की तो एवढा पुढं जाईल की त्याच्या हातात देशाच्या राजकारणाची धुरा येईल नव्हे तर तो सरस्वतीच्या उद्धारासाठी तसेच तिच्या पुनर्जन्मासाठी प्रयत्न करेल.
तो आढावा घेता घेता जेव्हा त्याला अंबिकाची आठवण आली. तेव्हा त्यानं त्या आढाव्याचा कागद बाजूलाच ठेवला व ती आठवण काढत बसला.
ती अंबिका.......त्याच्या महाविद्यालयातील मुलगी नव्हे तर ती त्याच्या घराजवळचीही. सुरुवातीला ते एकत्र खेळत असत राजाराणीचा खेळ. त्या खेळात तो राजा बनत असे आणि ती राणी. तसे काही मित्र हे त्याची प्रजा. मग काही वेळानं त्यांच्याच भांडण होत असे व नंतर ते एकमेकांशी बोलत नसतं. तेच घडलं होतं त्यांच्या जीवनात. ते भविष्यात एकमेकांचे मित्र बनले होते नव्हे तर पती पत्नी. बालपणात खेळलेल्या भातूकलीच्या खेळातील राजाराणीसारखे आणि त्याच खेळात जसं भांडण व्हायचं त्यांचं. तसं त्यांचं जीवनातही भांडण झालं होतं. त्याचं अख्खं जीवन भांडणातच गेलं होतं.
त्याला जसा त्याचा भुतकाळ आठवला. तशी त्याला तिनं केलेली मदतही आठवली. तिनंच त्याला सरस्वतीचा शोध लावल्याबद्दल नाही तर तो प्रकल्प मार्गी लावण्याबद्दल उकसवलं होतं. तिला काय माहीत होतं की तो सरस्वतीचा प्रकल्प मार्गी लावू शकेल. आज ती त्याचेजवळ नव्हती. परंतू तिची आठवण आली होती सहज त्याला. आजपर्यंत देशाची कामं करीत असतांना तिची आठवण त्याला आली नाही. परंतू आज आलेली तिची आठवण त्याचा जीव कासावीस करीत होती. वाटत होतं की तिला आणावं. परंतू आणणार कुठून? ती कुठं असेल? कशी असेल? याचा थांगपत्ता नव्हता. तसं पाहता कदाचीत त्याला सोडल्यावर तिनं विवाह तर केला नसावा असंही त्याला वाटत होतं.
सायंकाळपर्यंत बराच वेळपर्यंत कार्यालय सुरु होतं. अमोलला दिवसभर त्या गतकाळातील आठवणींना उजाळा देता देता सायंकाळ झाली व आपलं कार्यालय बंद करायची वेळ झाली याचं भानच नव्हतं. तसा त्याला त्याच्या एका शिपायानं ती आठवण करुन दिली की सायंकाळ झालेली आहे. अमोलला शिपायाकरवी वेळ झाल्याचं माहिती होताच तो भानावर आला. तसं त्यानं आपल्या शिपायाला कार्यालय बंद करण्याचा आदेश दिला व तो कार्यालयातून घरी आला.
अमोल एक कर्तव्यदक्ष पंतप्रधान होता. त्याला आळस येत नव्हता. जीवनात कधीच त्यानं आळसानं कामं केलेली नव्हती. तो कधीकधी कार्यालयात अठरा अठरा तास राबायचा. शिपायाकडून वेळेची माहिती झाल्यावरही तो शिपायाला घरी जायला सांगायचा व स्वतः कार्यालयात एकटाच बसायचा काम संपेपर्यंत. काम करण्यासाठी त्याला वेळेचंही भान नसायचं.
तो तसा का वागायचा? त्याचं तसं कारणही होतं. आज देशाची धुरा त्याच्या खांद्यावर होती. परंतू त्याच्या खांद्यावर घराची धुरा नव्हती. त्यामुळंच त्याला कार्यालयात काम करतांना कोणी टोकणारंही नव्हतं. म्हणूनच तो कार्यालयात अठरा अठरा तास काम करीत बसायचा नव्हे तर कधीकधी तिथंच झोपायचाही. आज मात्र तो अंबिकाच्या आठवणीनं कार्यालयात राहिला होता.
आज त्याला येणारी अंबिकाची आठवण........ त्याला स्वस्थ बसू देत नसल्यानं तो घायाळ झाला होता. तो दिवस त्याचा आठवणीत व्यस्त गेला. परंतू ती रात्र.......त्यातच त्या रात्रीलाही तिची आठवण सतावत होती. त्यामुळंच की काय आज त्याला झोप येत नव्हती.
ती रात्र तशी जागरणातच गेली. कालच्याला झालेलं दिवसभर काम व रात्रीला न आलेली झोप. यामुळंच की काय, त्याचं आज सकाळपासूनच डोकं दुखत होतं. तसंच त्याचं आंगपायही दुखत होतं. आता संबंधीत अख्खी रात्रही गेली होती. तरी तिची आठवणच येत होती. त्याच आठवणीचा परिपाक की काय, आज त्याला वर्तमानपत्रात एक बातमी दिसली. बातमीचं शिर्षक होतं. 'पत्रकारांना सांगीतलं गुपीत. गुपीतमध्ये सांगीतलं की पंतप्रधान तिचे पती?'
ते वर्तमानपत्रात आलेलं शिर्षक. तसं ते शिर्षक वाचताच त्याला संपूर्ण बातमी वाचणे आवश्यक होते. तशी त्यानं ती संपूर्ण बातमी वाचली. संपूर्ण बातमी वाचताच त्याला अंबिका कोण आणि कुठं आहे हे कळलं होतं.
अंबिकाची ती माहिती. ती माहिती वर्तमानपत्रात छापून येताच व पत्रकारांनी तिची मुलाखत घेतल्याचं छापून येताच सकाळपासूनच पत्रकारांचा मोर्चा अमोलच्या निवासस्थानी वळला. पत्रकार अमोलच्या बाहेर येण्याची वाट पाहात होते. परंतू काल रातच्याला अमोलच्या मनात अंबिकाची आठवण सतावल्यानं तो जरा उशीराच झोपला होता. तसं पाहता आज सकाळीही तो उशिरा उठला होता आणि उठल्याबरोबर त्यानं जेव्हा वर्तमानपत्र वाचलं. तेव्हा त्याच्या निदर्शनास ती बातमी आली. त्याला काय माहीत होते की ते पत्रकार त्याच्या निवासस्थानी सकाळपासूनच पोहोचतील. त्याची मुलाखत घ्यायला. म्हणूनच तो अगदी निवांत झोपला होता.
ते वर्तमानपत्र. त्या वर्तमानपत्रात आलेली ती अंबिकाची बातमी. तसं त्या बातमीचा कात्रण कापून अमोलनं ते कात्रण आपल्या खिशात ठेवलं. तशी सकाळी सकाळीच तयारी करुन तो कार्यालयात जायला निघाला. तशी त्याला त्याच्या सेवकानंही सुचना दिलीच होती की ती पत्रकार मंडळी आली आहेत. ज्यांना यायला बराच वेळ झाला असून ते कोणत्यातरी प्रश्नांच्या प्रतिक्षेत आहेत.
तो अमोल जसा बाहेर पडला. तसं त्याला पत्रकारांनी घेरलं. परंतू घेरण्यापुर्वीच त्याला माहीत होतं की पत्रकार काय विचारणार आहेत. तसं काय उत्तर द्यावं याची तयारी त्यानं आधीच केली होती. पत्रकारांनी विचारलं,
"ही अंबिका कोण?"
"..........." पत्रकारांनी प्रश्न विचारताच अमोल चूप होता. तशी पत्रकारांनी अंबिकाबद्दल प्रश्नांची सरबत्ती सोडली.
अंबिका तुमची पत्नी आहे ना? तुम्ही का दूर झालात अंबिकापासून? आपण अंबिकाला का सोडलं? आपण विवाह केला होता काय की ही विवाहाची माहिती खोटी आहे? इत्यादी नानाविध प्रश्न पत्रकारांचे. तसा शेवटी अमोल म्हणाला,
"मी या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर देणार. ते म्हणजे मी या विषयावर काहीही माहिती सांगू शकत नाही. तो माझा वैयक्तीक मुद्दा आहे."
अमोलचं बोलणं. तसा एक पत्रकार म्हणाला,
"असं कसं? आपण देशाचे पंतप्रधान आहात. त्यामुळंच आपल्याला आपली वैयक्तिकही माहिती लपवून ठेवता येणार नाही. यात एका अबलेवर अत्याचार झालेला दिसून येतो आपल्याकडून. आपल्याला सांगावेच लागेल. ही माहिती आपल्याला सार्वजनीक करावीच लागेल."
ते पत्रकाराचं बोलणं. तशा त्या प्रश्नावर अमोल चूप बसला. पत्रकार मात्र काहीबाही बोलत होते. तसं अमोलचं मौन पाहून अंगरक्षक पत्रकाराला म्हणाले,
"चला जा आता. साहेबांना आपल्या कार्यालयात जायचे आहे. त्यांच्या जाण्याची वेळ झालीय."
पत्रकार निघून गेले. तसा अमोल आपल्या कार्यालयात गेला. तो कामाला लागला. परंतू सकाळीच जे पत्रकार येवून गेले व त्यांनी जे प्रश्न विचारले. ते प्रश्न त्याच्या मनात आताही घोळतच होते.
तो दिवस निघून गेला होता. त्या दिवशी त्या पत्रकारांना काहीही उत्तर न मिळाल्यानं ते निघून गेले होते. तसा दुसरा दिवस उजळला.
तो दुसरा दिवस. तसा तो दुसरा दिवस उजाडताच त्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापून आल्या. ज्यांचं शिर्षक होतं. अंबिकावर अत्याचार. पंतप्रधानाचं मौन.
त्या वेगवेगळ्या शिर्षक असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या अमोलनं वाचल्या. त्या बातम्या मनाला पटत नव्हत्या. परंतू ते पत्रकार होते. त्यांना कोण बोलणार. ते निर्भीड होते. त्यांना जर अमोल बोलला असता तर आणखीनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असतं. तसं पाहता अमोलनं त्यावर स्वतः चूप बसणं योग्य ठरवलं होतं.
तो अमोल. अमोलला अंबिकाचा आधीही त्रासच झाला होता. तरीही तो मौनच बाळगून होता. पुर्वीही त्यानं मौनच बाळगलं होतं. तिच्यामुळंच त्याला आजपर्यंत जरी तीव्र राग आला असला तरी तो गप्प आणि शांत राहायचा. तसा तो आजही शांत आणि गप्पच होता.
तो स्मार्टफोन. लोकांजवळ जसा स्मार्टफोन होता. तसाच स्मार्टफोन त्याचेजवळही होता. त्याला त्याचे फोनवर वेगवेगळे ट्विस्ट आले होते. परंतू ना तो वाचत होता, ना काही त्यावर हालचाल करीत होता. अमोलला वाटत होतं की आज कलियुग आहे. या युगात लोकं चांगल्या माणसांना वाईट म्हणतात आणि वाईटाला चांगलं. आपण लोकांचा विचार करायचा नाही. चांगलंच काम करायचं. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा. ते काम चांगलं असलं की लोकांना आपोआपच आवडेल. आपण जर अशा किरकोळच आणि फालतूच्या गोष्टीकडं लक्ष देत बसलो तर आपण देशातील कोणतीच कामं करु शकणार नाही. सरस्वतीचाही मुद्दा आपण सोडवू शकणार नाही.
अंबिकाचा स्वभाव माहीत होता त्याला. ती त्याला प्रत्येकवेळीच बदनाम करीत होती. आताची ही वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी. ही बातमी त्याला सतावण्यासाठी अंबिकानं छापली नसली तरी त्याला तसंच वाटत होतं. तसं पाहता तो आताच्या त्या बातमीनं खजील झाला होता. जणू तिला ठारच करावंसं वाटत होतं. परंतू आता त्याला विचार होता. विचार हा होता की तो आता एक सामान्य साधारण गृहस्थ नव्हता की जो विचार न करता काहीही करु शकेल. आता तो एका महत्वाच्या पदावर होता नव्हे तर तो देशाचा प्रधानमंत्री होता. आता तो प्रधानमंत्री पदावर बसल्यामुळं त्याला काहीही करता येत नव्हते.

************************************************

सरस्वती नदीचं खोदकाम सुरु झालं होतं. अनेक सा-या मशीना लागल्या होत्या. मजूरं खाली न राहता अविरत काम करीत होते. बरेच दिवस झाले होते की खोदकाम सुरु होतं. त्यातच तो दिवस उजाडला.
तो दिवस. त्या दिवशी ते खोदकाम करतांना एका दगडाचा भाग लागला. मशीनीनं त्या दगडाच्या खालच्या परतीचा अंदाज घेतला गेला. तसा कसातरी विचीत्र आवाज यायला लागलं व कळून चुकलं की ह्या दगडाखाली पाणी आहे.
तो दगडाचा भाग. तो दगडाचा भाग फोडत असतांना नाकीनव येत होतं. परंतू उपाय नव्हता. कारण सरकारचा आदेश होता आणि त्याखाली पाणी होतं. म्हणून तो दगड फोडावाच लागणार होता.
तो दगडाचा भाग उंचावर होता. हळूहळू पावले टाकत ते मजूर तो दगडाचा भाग फोडत होते. व्यतिरीक्त तो दगडाचा भाग फोडत असतांना, तो दगड फुटल्यावर त्या दगडाच्या भागातून एक झरा उत्सफुर्तपणे बाहेर निघाला. जणू उंचावरुन एखादा धबधबा जोरात खाली येतो तसा तो झरा खालून अर्थात भुगर्भातून वर आला होता. तो झरा सततधार आणि तीव्र होता. तो झरा एवढा तीव्र स्वरुपाचा होता की त्या झ-याचं पाणी पृथ्वीवरुन वाहायला लागलं. त्यातच ते पाणी वाहत असतांना त्यानं दिशा पकडली. एवढंच नाही तर त्या झऱ्याची पुढे नदीच झाली. तो झरा ज्या ज्या भागातून पुर्वीची सरस्वती नदी जात होती. त्याच भागातून वाहू लागला. लोकं जणू त्यालाच सरस्वती नदी समजू लागले आणि म्हणूही लागले.
तो झरा. त्या झ-याचं पाणी गोड होतं. ते पाणी पिताच मन अगदी शांत होवून जात असे. त्या झ-यामधून एवढं पाणी निघालं की त्या झ-याची पुढं नदी बनली होती. ही नदी हिमालयातून हरयाणा, पंजाब मार्गे राजस्थान व गुजरातला जात होती नव्हे तर ही नदी पुढे अनेक राज्यात. या नदीला जेथून जेथून वाट भेटेल तेथून तेथून ती वाहात होती. ती नदी विदेशातूनही वाहायला लागली होती. ही देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी नदी होती. लांबी आणि रुंदीनेही मोठी. पावसाळ्यात या नदीला दुथडी भरुन पाणी असायचं.
एक लहानसा झरा व तो झरा एवढा विस्तारीत व्हावा. त्या झ-यामधून एवढं पाणी निघावं की त्याची विशालकाय नदी बनावी. ती एवढी विशालकाय नदी बनावी की तिचं पाणी संपूर्ण देशातच नाही तर विदेशात पसरावं नव्हे तर ती जगातील एक विशालकाय नदी बनावी. हे एक आश्चर्यच होतं. जणू विधात्यानंच वा सृष्टी निर्मात्यानंच या पृथ्वीतलावरील सृष्टीची दया घेवून या पृथ्वीतलावरील समाप्त होत चाललेल्या पाण्याच्या स्रोताला या नदीरुपानं नवं जीवन दिलं काय असं वाटत होतं. जणू तो एक विधात्याचा चमत्कारच होता.
तो झरा........तो झरा जेथून जेथून वाहात होता. तेथून तेथून त्या झ-यानं नदी बनून आत्मीयता निर्माण केली होती. तसंच त्या झ-यानं नदी बनून तेथील जमीन सुपीक केली होती. आज त्याच त्याच झ-यानं नदीरुपात राजस्थानचा वाळवंटी भागही सुपीक व समृद्ध केला होता नव्हे तर राजस्थानातील काही शेतकरी याच नदीचं पाणी घेवून आपल्या राज्यातील रेताड जागेत टरबूज, खरबूज, वाळकं व डांगरु पिकवीत होते. काहीजण आपल्या शेतीत दोडके व दुधीही पिकवीत होते. एकंदरीत सांगायचं झाल्यास राजस्थानातील लोकांसाठी ही नदी म्हणजे एक वरदान ठरली होती. कारण आता तिथं वाळवंट नव्हतं तर त्या वाळवंटी प्रदेशातही सोनं पिकत होतं.
राजस्थानचा तो रेताड भाग. एकेकाळी त्या वाळवंटात जिकडं नजर जाईल, तिकडं रेतीच रेती दिसायची. सर्व भागात रेती. पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यानं या भागात उन्हाळ्यात लोकांची दैन्यावस्था असायची. ऊन लंबरुप पडत असल्यानं रेताड जमीन एवढी तापायची की कोणीही ऊन्हात प्रवास करु शकायचा नाही आणि प्रवास केल्यास तो यमसदनी पोहोचल्याशिवाय राहायचा नाही. त्यामुळंच लोकं रात्रभर प्रवास करायचे व सकाळ झालीच तर सावलीच्या कडेला जिथं काही पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणी अधिवास करायचे. अंगातील पाणी सुकू नये म्हणून जाड व सुती कपडे घालायचे नव्हे तर असे जाड व सुती कपडे कितीही घातले तरी अंगातील पाणी सुकायचंच. कधीकधी तहान एवढी तीव्र लागायची आणि दूरवर पाणी नसायचं, तेव्हा आपल्या लेकरागत पाळलेल्याच ऊंटाला कापावं लागायचं. त्या ऊंटाला........ज्या ऊंटाच्या पोटातील चरबीत भरपूर पाणी असल्यानं ते पिवून आपली तहान भागवता येईल.
अशा या वाळवंटी भागात पुर्वी एके काळी एका नदीचं वरदान होतं. ती नदी म्हणजे सरस्वती. परंतू कालांतरानं ती सरस्वती नदी अस्तीत्वात नव्हती. म्हणतात की ती कोण्यातरी शापानं लुप्त झाली होती.
आज हा वाळवंटाचा भाग या नवीन वाहणा-या सरस्वती नदीनं समृद्ध झाला होता. या नवीन वाहणा-या नदीनं राजस्थानाचंही नंदनवन केलं होतं. आता राजस्थानला पाण्यासाठी कुणावरही अवलंबून राहावं लागत नव्हतं. ते आता सुखानं झोपू शकत होते आणि सुखानं आपलं जीवन व्यथीतही करु शकत होते.
अमोलनं सरस्वतीचा जणू शोधच लावला होता. सगळीकडेच त्याचा जयजयकार होत होता. मात्र तो आजही अंतर्मनातून दुःखीच होता. ते त्याच्या अंतर्मनात दुःख होतं, ते दुःख कोणी ओळखू शकत नव्हतं. ते दुःख राजस्थानातील त्या जुन्या शुष्क वाळवंटासारखंच होतं. आज तो वाळवंटी भाग समृद्ध झाला असला तरी आपल्या आयुष्यातील पत्नीविरहाचं वाळवंट केव्हा दूर होईल याचा विचार त्याला क्षणोक्षणी यायचा. परंतू ज्याप्रमाणे त्यानं सरस्वतीचा शोध लावतांना उपाय केला होता. म्हणूनच सरस्वती त्याला नव्या रुपानं अस्तीत्वात आणता आली होती. तसा जीवनातल्या या दुःखाच्या अंताचा त्याला शोध लावता येत नव्हता. त्यावर उपायही करता येत नव्हता. त्यामुळंच त्याच्या जीवनात दुःखरुपी वाळवंट होतं. त्याचा त्याला तिटकारा येत होता. तसंच या जीवनप्रवाहात कोणतीच सुखमयी मरुद्यानं सापडत नव्हती.
जुन्या सरस्वतीचं पाणी जसं गोड होतं प्यायला. तसंच नवीन सरस्वतीचंही पाणी प्यायला गोडंच होतं. मात्र जुन्या सरस्वतीला सतलज व यमुना या नद्यांचा संगम होता. तशा या नव्या सरस्वतीला त्या नद्या मिळत नव्हत्या. शिवाय जुन्या सरस्वतीचं पाणी हे लाल होतं. कारण ती वाहात असलेल्या प्रदेशातील जमीन लाल होती. परंतू ह्या नव्या स्वरुपात उदयास आलेल्या सरस्वतीचं पाणी लाल नव्हतं. परंतू जसं जुन्या सरस्वतीचं पाणी गोड होतं, तसंच हिचंही पाणी गोडच होतं. तशीच जुनी सरस्वती फक्त हिमालय, हरयाणा, पंजाब, राजस्थान व गुजरातलाच पाणी देत होती आणि ही.......ही तर जणू संपूर्ण जगालाच पाणी देत होती. या नव्या स्वरुपात अस्तीत्वात आलेल्या नदीतून देशीय लोक विदेशी लोकांना पाणीही पुरवीत होते. कारण त्याही लोकांना पाण्याची किल्लतच होती. एवढं मुबलक पाणी या नदीत होतं. देशीय लोकं आता आपल्या देशातील पाणी विदेशी लोकांना पुरवीत होते आणि विदेशी लोकं आता आपल्या देशातील पेट्रोलियम पदार्थ देत होते देशीय लोकांना. पाण्यावरुन देवाणघेवाण वाढली होती. जग जवळ आलं होतं. पाणी प्रश्न संपूर्णपणे मिटला होता. कारण जणू विधात्यानंच संपूर्ण जगावर उपकार करण्यासाठी अमोलच्या हातातून सरस्वतीच्या निर्मीतीचं नाही तर योगदानाचं कार्य घडवून आणलं होतं. हा जणू सृष्टीनिर्मात्यानं पृथ्वीवासीयांसाठी केलेला चमत्कार होता.
सरस्वती मागील काळात एका शापानं लुप्त झाली होती. कारण त्यावेळेस सत्ययुग होता. जणू ती पृथ्वीतलावर प्रकट होवून काही कालानंतर परत गेली होती स्वर्गात. असंच वाटत होतं. परंतू ती परत कलीयुगात आली होती शापमुक्त होवून. जणू पृथ्वीतलावरील लोकांची अविरत, निष्काम सेवा करण्यासाठी. आज जणू ती शापमुक्त झाली होती. संपूर्ण शापातून.
गंगाही आता डौलानं वाहात होती. आता तिचंही देशानं अमोलच्या नेतृत्वात शुद्धीकरण केलं होतं. ती आता सरस्वतीचा द्वेष करीत नव्हती. तिचा बदला पुर्ण झाला होता. कारण तिच्याच शापानं सरस्वतीनं बरंच भोगलं होतं. जणू ती अज्ञातवासात गेल्यासारखी.
सरस्वती आता महान ठरली होती आपल्या कर्तृत्वानं. ती आता हेवादावा न करता व स्वतःच्या मनात द्वेषभावना न ठेवता वाहात होती.
अमोल म्हातारा झाला होता. तरीही पदावर होता. कारण राजकारणात म्हातारपणाला वाव नव्हतं. त्याला राजकारणातून संन्यासही घ्यावासा वाटत होता. परंतू त्याला विचार होता. संन्यास घेतल्यास हे म्हातारपण खायला धावेल. घरंही खायला धावेल व घराच्या भिंतीही. कारण आज त्याच्याजवळ जवळचं असं कोणीच नव्हतं. अंबिकाही नव्हती.
अमोलनं सरस्वतीला मुर्त रुप दिलं होतं. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. टिव्हीवरही आल्या होत्या. त्या बातम्या अंबिकेनं वाचल्या होत्या. त्या बातम्या वाचून ती गदगद झाली होती. मनात वाटत होतं की त्याला एकदा भेटून त्याचं अभिनंदन करावं. त्याला शुभेच्छा द्याव्यात. परंतू तो तिचा विचार मनात आलेला. तशी भेटायची हिंमत होत नव्हती.
एक दिवस तिनं विचार केला. आपण भेटायचंच त्याला. आपल्या मनातील इच्छा पुर्ण करावी. तशी ती एक दिवस त्याला भेटायला आली. तसं ती भेटायला येताच त्याला एका शिपायाकडून माहिती मिळाली.
ती माहीती. ती माहिती मिळताच अमोलनं शिपायाकरवी तिला आतमध्ये पाठवून द्या असा निरोप पाठवला. तशी ती आतमध्ये गेली. म्हणाली,
"ओळखलंत? मी अंबिका."
"हो ओळखलं. कशी आहेस?"
"ठीक आहे. आपण?"
"बरा आहे." तो म्हणाला. तशी ती म्हणाली,
"आपलं अभिनंदन. आपण फार मोठं कार्य केलं. पण एक विनंती. आपण एकांतात गोष्टी कराव्यात का?"
तिचा प्रश्न. तसा तो विचार करु लागला. परंतू ती त्याची पत्नीच होती. त्याला वाटलं की ती पत्नी असल्यानं काही गोष्टीसाठी तिला एकांतवास हवा असेल. म्हणूनच ती म्हणतेय की आपण एकांतात गोष्टी करुयात.
तो त्याचा विचार. तसं त्यानं आपले अंगरक्षक हटवले. तशी ती बोलकी झाली.
"मला फार पश्चाताप झालाय तुम्हाला सोडून. माहीत आहे किती भोगलं मी?"
"आणि मिही."
"खरंच."
"होय. अगदी शंभर प्रतिशत खरं. सारखी तुझीच आठवण येत होती. राहावंसं वाटत नव्हतं. तुला भेटावयास यावंसं वाटत होतं. पण काय करु. चूक माझी नव्हती आणि माझी हिंमतही होत नव्हती तुला भेटावयास यायसाठी."
"मग मीच चुकले. तुम्हाला समजू शकले नाही. मी तुम्हाला समजून घ्यायला हवे होते. परंतू काय करु? माझी बुद्धीच चालेना. शेवटी मी हारले आणि मला जेव्हा ते कळलं, तेव्हा वेळ बराच झाला होता."
"आता आहे ना वेळ बराच. मलाही राजकारणाचा कंटाळा आलाय. सोडून द्यावंसं वाटतं राजकारण. विचार करतोय की सोडून द्यावं .परंतू जर मी राजकारण सोडून दिलू तर जगणार कसा? कोणासोबत बोलणार. एकटंच राहावं लागेल ही भिती आहे माझ्या मनात. का तू येतेस राहायला?"
"या म्हातारपणात. ज्या म्हातारपणात नातवंड खेळवायचं वय असते. त्या म्हातारपणात आपण एकत्र यायचं! लोकं काय म्हणतील? लोकं आपल्यावर शिंतोडे उडवतील. आपल्यावर हसतील लोक. म्हणतील की हे लोकं म्हातारपणात वेडे झाले की काय? आतापर्यंत जवळ नाही आले आणि आता? या वयात एकत्र आले. माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच हसतील."
"का हसतील? तू माझी पत्नीच आहेस ना आणि हं, सोडचिठ्ठी झाली कोर्टातून झाली. परंतू तुला माहिती असेलच की या विवाहाच्या विवाहगाठी विधाताच तयार करुन पाठवतो वरतून. मग हे न्यायालय, ह्या पंचायती कोण आहेत या गाठी तोडणा-या. जर तुझ्या मनात असेल तर आताही आपण या उतारवयात एकत्र होवू शकतो. फक्त यावर तुझ्या एका होकाराची गरज आहे. बोल. राहायला तयार आहेस का तू माझ्यासोबत?"
त्याचा प्रश्न. जीव लावणारा प्रश्न. परंतू तिच्या मनात तर द्वेषच भरला होता त्याचेबद्दल. त्यानं लावलेला सरस्वतीचा शोध. त्यानं सरस्वतीला मुर्त रुपात आणणं. त्याचं गंगेचं शुद्धीकरण करणं नव्हे तर तो राजकारणात यशस्वी होणं. पंतप्रधान पदापर्यंत जाणं या सा-याच गोष्टी तिला बोचत होत्या. तसं पाहता ती त्याच द्वेषभावनेनं त्याला भेटावयास आली होती. परंतू काही करण्याची हिंमत होत नव्हती. तो बोलत होता तिच्याशी आणि तिही बोलत होती त्याचेशी. त्यामुळंच तिचा निर्धार बदलत चालला होता. तशी ती उभी झाली व म्हणाली,
"निघते आता. मला परवानगी द्या."
"निघतेस. अशीच मला एकाकी सोडून."
तो बोलला. तशी ती पाठमोरी झाली व चालायला लागली. तशी दाराजवळ जावून ती म्हणाली,
"होय. निघावं लागेल की नाही. वेळ बराच झालेला आहे."
"मग विचार कर आणि ये माझ्यासोबत राहायला. आपण या म्हातारपणात का होईना एकत्र राहू."
त्याचं बोलणं. तोच ती पाठीमागं वळत म्हणाली,
"होय. आपण याच भुमीत एकत्र राहू. जीवनभर नाही राहिलो तरी. आता म्हातारपणातच मरणानंतर एकत्र राहू. आपण यानंतर तरी एकत्र राहू. अमोल सावधान. आपण या जगी नाही तर मेल्यानंतर तरी एकत्र राहू."
असं म्हणत तिनं बंधूक काढली व सपासप अमोलला सावरण्यापुर्वीच आणि सावधान होण्यापुर्वीच त्याचेवर गोळ्या झाडल्या आणि दोन गोळ्या आपल्यावरही. तसे ते दोघंही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. तसा तो म्हणाला,
"काय केलंस अंबिका, आपण म्हातारपणात तरी एकत्र राहिलो असतो."
त्याचं ते बोलणं. तशी ती म्हणाली,
"नको तुझा सहवास. अगदी जीवनभर तुझा सहवास नव्हता मला आणि आता म्हातारपणात? म्हातारपणातही कशाला हवा होता तुझा सहवास? माहीत आहे तू.......तू पुढे गेला आणि मी मागं. मागंच नाही तर बरीच मागं. एवढी मागं की तू वळूनही पाहिलं नाहीस माझ्याकडं. पुढेच चालत राहिलास एकटाच. सरस्वतीला मुर्त रुप दिलंस ठीक केलं. परंतू मला मात्र दुःख सहन करण्यासाठी सोडून दिलंस. आता एक ऐक. जर कदाचीत पुढचा जन्म झालाच तर परमेश्वराला म्हण की मी पुढील जन्मात अंबिकेला अंतर देणार नाही. तिला जीवनभर सोबत ठेवीन." असे म्हणत ती मरण पावली. तो मात्र माझं काय चुकलं याचा विचार करीत दोन तीन दिवस रुग्णालयात भरती होता.
तो बंधूकीचा आवाज. त्या आवाजानं परीसर हादरला. तसा तो दरवाजा क्षणात तोडला गेला. तसा दरवाजा उघडताच सा-यांनी पाहिलं की तो आणि ती जखमी झालेले आहेत. हा घातपात आहे. तसा वेळ न दवडता त्या दोघांनाही रुग्णालयात भर्ती केलं गेलं. ती आधीच मरण पावल्यानं डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. तो मात्र वाचला होता.
चुकलं तिचंच होतं. तीच राहिली नव्हती त्याचेजवळ आणि तीच सोडून गेली होती त्याला द्वेषभावनेनं आणि तिनंच आता अंतिम समयीही त्याला दोषी ठरवत द्वेषभावनेनं मारलं होतं. ती वेगळी नक्कीच राहिली असेल जीवनभर. दोष तिचाच होता. परंतू ती त्याचेवरच आपले दोष टाकून त्यालाच दोषी ठरवत त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता तिनं आणि स्वतःच मरण पावली होती.
तो दोन तीन दिवस रुग्णालयात होता. त्यानंतर त्याला बरं वाटलं. तशी त्याला रुग्णालयातून सुट्टी झाली. कालांतरानं तो ठणठणीत बरा झाला. जणू ती गंगामाई व सरस्वती माईची कृपा होती नव्हे तर तो त्यानं केलेल्या चांगल्या कार्याचा परीपाक होता.
आता तो राजकारणातून निवृत्त झाला होता. त्याचं म्हातारपणातील जीवन अगदी सुखात जात होतं. जणू तो सुखात लोळतच होता. परंतू आताही कधीकधी तो घडलेला थरार आठवायचा आणि विचार करायचा की नेमका दोष कोणाचा माझा की तिचा. दोष तिचाच होता. परंतू द्वेषभावनेनं तिनं त्याचेवरच दोष थोपविण्याचा प्रयत्न करुन त्याला मारुन टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तो प्रसंग आठवला की त्याला दुःख वाटत असे. त्यावेळेस तो सरस्वती नदीच्या काठावर जाई. तिच्या काठावर जाताच त्याचं मनंही शांत होई. ते दळभद्री विचार गळून पडत व तो नवीन विचार करायला सुरुवात करीत असे. जणू ते त्याचे मनात नवविचार येणंही त्या सरस्वती माईचीच कृपा होती.