a well in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | एक विहीर

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

एक विहीर

शिकण्यासाठी मी व माझी मैत्रीण श्वेता गावातून शहरात आलो होतो, तिथे एक खोली आम्ही भाड्याने घेतली आणि राहू लागलो आमचं कॉलेज नियमितपणे सुरू झालं. आमची खोली घरमालकाच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बाजूला होती,त्या खोलीला लागूनच एक मोठ्ठी विहीर होती. त्या विहिरीला ग्रील चं झाकण होतं.
रात्री आम्ही लवकर झोपून जायचो आणि सकाळी उठून अभ्यास करायचो.
दिवसा बऱ्याच वेळा आम्ही त्या विहिरीच्या कठड्यावर बसून अभ्यास करायचो.

आमच्या मैत्रिणी बरेचदा आमच्या रूम वर येत असत तेव्हा त्या विहिरीच्या कठड्यावर बसूनच आम्ही गप्पा मारत असू. एकदा अशाच दोन मैत्रिणी आमच्या कडे अभ्यासासाठी आल्या होत्या कारण दुसऱ्यादिवशी कॉलेज ची परीक्षा होती.

त्यातली एक मैत्रीण रात्री अचानक खिडकी जवळ उभी राहून बाहेरच्या विहीरी कडे बघू लागली.

"ऐ! रक्षा! काय झालं? का उभी आहेस तिथे?",मी विचारलं

तर ती डोळे विस्फारून म्हणाली,"ऐ! तिथे कोणीतरी बाई हिरवं लुगडं नेसून पाठमोरी बसलीय विहिरीच्या कठड्यावर!",हे सांगताना ती घशात आवाज अडकल्यासारखी बोलली.

"क्काय! खरंच!",असं म्हणून मी तिथे जाऊन बघितलं पण मला काहीच दिसलं नाही,मी तसं श्वेता आणि स्मिताला सांगितलं, हे ऐकल्यावर त्या दोघी खो खो हसत सुटल्या, काहीही गम्मत करते , उद्या परीक्षा आहे, अभ्यास कर असं त्या दोघी रक्षाला म्हणाल्या, तेव्हा ती अभ्यास करण्याला आली पण तीचं मन लागत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी रक्षाने पेपर मध्ये काहीच लिहिलं नाही, ती आजारीच पडली. काही दिवसांनी तिला बरं वाटू लागलं.

मी माझ्या मैत्रिणीला श्वेताला विचारलं,"रक्षा एवढी का आजारी पडली असेल इथे त्यादिवशी तिने पाहिलेलं खरं असेल का गं? "

"मला नाही वाटत तसं,आपण नेहमीच त्या विहिरीच्या कठड्यावर बसतो, आपल्याला काही झालं का कधी? किंवा काही दिसलं का? कधीच नाही!,रक्षाला परीक्षेचं टेन्शन आलं असेल म्हणून तिने काहीतरी गम्मत केली असेल.",माझी मैत्रीण म्हणाली

त्या दिवशी रात्री लवकर आम्ही झोपलो पण मला रात्री बारा वाजता हुंडक्यांचा आवाज ऐकू आला म्हणून मी कानोसा घेतला, तर आवाज विहिरीच्या बाजूनेच येत होता. माझी पाचावर धारण बसली, मी माझ्या मैत्रिणीला उठवून जागं करू लागली पण ती कुंभकरणा ची शिष्या, ती कसची उठते, मग मीच हळूहळू जाऊन खिडकीतून बघितलं पण मला काहीच दिसलं नाही. त्यानंतर काही आवाज आला नाही पण माझी झोप मात्र उडाली.

दुसऱ्या दिवशी मी मैत्रिणीला सांगितलं,"श्वेता काल मी हुंडक्यांचा आवाज ऐकला,तो आवाज विहिरीकडूनच येत होता,तिथे नक्कीच ती हिरवं लुगड्यातली बाई रडत असणार!"

"काहीतरी च काय बोलते,अगं तुझ्या मनात तेच विचार सुरू होते न म्हणून तुला भास झाला असेल",श्वेता म्हणाली

"ठीक आहे, मला वाटते तुला स्वतःला जोपर्यंत अनुभव येणार नाही,तोपर्यंत तू विश्वास ठेवणार नाहीच",मी म्हंटल

दुसऱ्या दिवशी रात्री जेवताना श्वेता म्हणाली," अरे माझा डबा बाहेरच राहिला, फोन आल्या मुळे मी बोलत बोलत आत आली आणि डबा बाहेरच विसरली,थांब मी घेऊन येते"

थोड्यावेळात लगेच येऊन ती मला म्हणाली,
"हे काय ,तू अशी पण गम्मत करणं सुरू केलं की काय,माझा डबा रिकामा आहे, तू खाल्ला न! मला माहित आहे!"

"मी कशाला खाईल तुझा डबा? मला माझा डबा नाही का? कुठे ठेवला होता तू डबा?",मी म्हंटल

"त्या विहिरीच्या कठड्यावर",श्वेता म्हणाली

"बघ मी म्हंटल होतं न विहिरीत हडळ आहे ,तीच त्यादिवशी रक्षाला दिसली होती",असं मी म्हंटल पण श्वेताला त्यावर विश्वास बसला नाही तिला वाटत राहिले की मीच तिचा डबा खाल्ला म्हणून.

शहरातच माझ्या आत्ये बहिणीचं सासर होतं,तिने तिच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मला बोलावलं होतं म्हणून मी तिथे गेली,दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कॉलेज चा प्रश्न नव्हता.

रूम मध्ये माझी मैत्रीण श्वेता च एकटी होती,मी तिला दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला सोबतीला बोलावून घे किंवा माझ्यासोबत चल असं सांगितलं पण तिला पटलं नाही, मी एकटीच राहते असं ती म्हणाली, वरून मी काय भित्री भागूबाई थोडीच आहे असेही ती म्हणाली.

दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी मी माझ्या आत्येबहिणी कडून रूम वर परतली आणि बघते तर काय माझी मैत्रीण तापाने फणफणली होती. तिला बोलण्याची सुद्धा शक्ती नव्हती. मी घरमालकिणीच्या मदतीने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तापेचं औषध लिहून दिलं. तिला औषध दिलं पण लवकर तिला आराम पडला नाही. मग तिच्या वडिलांनी तिला गावी नेलं.

मी पण काही दिवस गावी जाऊन येते असं घरमालकिणीला सांगितल आणि आमचं चंबू गबाळ आवरलं आणि धूम ठोकली गावाकडे.

गावी गेल्यावर काही दिवसांनी मैत्रिणीला बरं वाटलं तेव्हा मी तिला विचारलं की तू आजारी का पडलीस? तर तिने मला सांगितलं,"त्या दिवशी तू तुझ्या आत्ये बहिणीकडे गेली होती त्या शनिवारच्या रात्री मी दहा वाजता झोपी गेली, पण झोप व्यवस्थित लागली नाही,रात्री मला बारा वाजता कोणीतरी रडतेय, मोठमोठ्याने हुंदके देऊन रडतेय असा आवाज आला.

म्हणून मी खिडकीतून बाहेर बघितलं तर मला हिरवं लुगडं नेसलेली पाठमोरी बाई विहिरीच्या कठड्यावर बसलेली दिसली. तेव्हा मला काहीच वाटलं नाही म्हणून मी खोलीचं दार उघडून बाहेर गेली व त्या बाईला तिच्या रडण्याचं कारण विचारलं तर त्या बाईने पूर्ण मान वळवून माझ्या कडे बघितलं. तिचा तो निस्तेज चेहरा बघून माझी तर भीतीने बोबडीच वळली आणि तिच्या पायाकडे माझं लक्ष गेलं तर तिचे पाय चक्क उलटे होते. ते बघताच मी रूम मध्ये धावत आली. दार खिडकी बंद करून घेतली. आणि अंथरुणात पडून राहिली. हळूहळू मला कापरं भरू लागलं. आणि मला ताप चढू लागला. माझ्यातली शक्ती निघून गेल्यासारखं मला वाटू लागलं म्हणून मी कोणाला फोन ही करू शकली नाही. तू जेव्हा आली तेव्हाच तू घरमालकिणीला सांगितलं नाहीतर तोपर्यंत कोणालाच माझ्या अवस्थेचा पत्ता नव्हता.

जेव्हा दुसरी रूम मिळाली तेव्हाच मी व माझी मैत्रीण परत शहरात आलो आणि दुसरी रूम शोधताना तिच्या जवळपास विहीर नसल्याची खात्री आम्ही आवर्जून करून घेतली.

*****समाप्त******