□□□□□□□□□□□□□□□□□
. // भाग 24
लेखक -जयेश झोमटे
महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !
लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..
धन्यवाद
कथा सुरु
काहीवेळा अगोदर.....
जंगलातल्या कच्च्या रस्त्यावरून ती स्कुटी जय होती.
स्कुटीच्या हेडलाईटचा प्रकाश समोर रसत्यावर -
आणी दोन्हीतर्फे असलेल्या झाडांवर पडत होता .
हेडलाईटच्या प्रकाशाने झाडांच्या आकृतीची काळी सावली , पुढे दैत्यासारखी मोठी होऊन पडत होती.
जर त्या काळ्या सावल्यांच्यात जिव असता तर? त्यांनी मार्ग रोखल.असता ना?
स्कुटीवर ड्राईव्हसीटवर पिया बसली होती-
आणी तिच्या मागे आवडी बसलेली .
तिच्या चेह-यावर चिंता- काळजी हे संमीश्रित भाव उमटले होते .
"पिये ..गाडी जरा फ़ास्ट चालव ना ? वाटलंच तर पेट्रॉलचे पैसे देईल मी !"
संथगतीने स्कुटी जात होती- काळ्या पाषाणी अंधाराला हेडलाईट चिरून समोर जाण्याचा मार्ग दाखवत होती.
" आवडे जंगलात गाडी चालवायची पहिलीच वेळ आहे माझी ! " पिया..
" अंग पन आपण वेळेत पोहाचयला हव ना ! "
"ए आवडे! तुला तर एवढी घाई झालीये ,जस की तिथे जाऊन निळ्या सोबत मारामारी करणार आहेस !"
जाडी पिया पून्हा खीखी करत खांदे हळवत हसू लागली..
तेवढ्यात तिच हेंन्ड़लवरून कंट्रॉल सुटल.. गाडी वाकडे तिकडे वळन घेत बाजुच्याच एका झाडावर आदळण्यासाठी निघाली..
" आssssssss!"पिया किंचाळली..
गाडीचा हेडलाईटचा प्रकाजब समोर असलेल्या झाडाच्या खोडावर पडलेला आणि आणि गाडी त्याच झाडावर आदळण्यासाठी जात होती-
" आssssssss!" पियाने तोंडाचा आ- वासला
होता - वासलेल्या तोंडातून तो ओरडण्याचा आवाज
अद्याप बाहेर येतच होता.
पळल्या पळल्याने गाडी झाडापर्यंतच अंतर कापत निघाली होती.. कोणत्याहीक्षणी गाडीची धडक झाडाला बसणार होती-
अचानक पियाच्या खांद्यामागून एक हात आला ,
आणि त्या हाताच्या पंज्याने ब्रेक दाबल..
तस गाडी .. जागेवर थांबली.. !
गाडी थांबली तस पियाने लागलीच सुटकेच श्वास सोडल..
" हुश्श्श्श!" कपाळावर जमा झालेले घामाचे द्रव बिंदू तिने पुसले..
आणी हळूच मागे वळून पाहिल....तर तिच्या चेह-यावरचे भावच बदल्ले..मागच्या सीटवर बसलेली आवडी.. ..भुवया ताणून तिच्याकडे पाहत होती..
तिच्या त्या जळजळीत नजरेला नजर भिडवण..
पियाला काही जमल नाही..
" ए बावळट! " ती खेकसली." गाडीला ब्रेक आहे की नाही ? की फक्त .म्हशीसारख ओरडत रहायचंच माहीतीये !"
" सॉरी ... सॉरी !"
" आणि हो पिये? आता जर वापस हसलीस ना? तर आईशप्पथ ! तुझे हे पुढे आलेले दात डायरेक्टघशात घुसवीन !"
पियाने घाबरतच आपल्या तोंडावर हात ठेवला..
आणी नाही -नाही करत मान नकारार्थी हलवू लागली..
ह्या दोघींचीही नौटंकी सुरु होती- की त्यात अचानक ..हा मोठा बंदूकीचा बार फुटल्याचा आवाज आला.
" ठणsssss!"
बंदुकीच्या ह्या आवाजाने जंगलातली निद्रेस गेलेली शांतता पुन्हा भंग पावली...
झाडांवर झोपलेले पक्षी -पाखरे रात्रीच्या अंधारात भितिपोटी घरटे सोडून आकाशात सैरभैर उडाले..
फड फड पंख-पंख फडफडण्याचा, आणी पक्ष्यांचा चिचि ,चिचि .. आवाज त्या थरथराट रात्री आकाशात घुमत होता.
" आवडे हा ..ह..आवाज !"
पिया काफ-या स्वरात बोलत होती.
" गोळी झाडल्याचा आवाज आहे का ?"
XXXXXXXXX
अण्णाने M24 स्नाईपर रिफील मधुन गोळी झाडली होती- परंतु त्याचवेळेस अचानक जीपच टायर एका खड्डयातून गेल -आणि निशाणा चुकला..
निळ्याच्या कानाजवळून ' ..सुई ' आवाज करत गोळी जाऊन थेट झाडाच्या खोडात घुसली..
मरणाच्या भीतिपोटी निळ्याने
झाडाच्या फांदीवरून खाली उडी घेतली..
अमोल- सोपान दोघांनीही त्याला जमिनीवर तोंडावर पडण्यापासून सावरल..
" आई शप्पथ निळ्या , हा आपल्याला मारायला आला का काय? " सोपान मागे पाहत म्हंणाला..
मागून जीप वेगाने ह्या दोघांच्या दिशेने येत होती.
" मारायलाच आलाय तो आपल्याला - पळ इथून पळा.. !"
निळ्याने पटकन तिथून धुम ठोकली..
त्याच्या मागोमाग सोपान- अमोल दोघे धावले..
झाडांच्या काळ्यांसावळ्यां मधोमधून , खाली जमिनीवर पडलेला पाळा पाचोळा तुडवत तिघेही
जिवाच्या आकांताने धावत सुटले होते.
" निळ्या- अमोल समोर कंपाउंड आहे !"
सोपान ओरडून म्हंणाला.
समोर वीस पावलांवर एक कंपाउंडची भींत होती. आणी त्या क्ंपाउंड पल्याड होत -श्रापीत मृत्यूच कब्रस्तान .
तिघेही धावत भिंतीजवळ पोहचले .
समोर असलेली भिंत - जेमतेम -नऊ फुट उंच होती..
आणी ह्या तिघांची शारीरीक उंची पाच साडे पाच फुट होती.
कंपाऊडच्या भिंतीची उंच जास्त असल्याने भिंतीवर चढ़ायचं कस हा मोठ प्रश्ण त्या तिघांसमोर उभा राहिला होता.
पन त्या प्रश्नावर विचार करण्यासाठी तिघांकडे वेळ शिल्लक नव्हता -कारण अण्णा ह्या तिघांच प्राण हरण करण्यासाठी कोणत्याही क्षणी ईथे पोहचणार होत.
" आईशप्पथ ! ही भिंत तर लेय उंच आहे रे ?
कस जायचं वर ?" धावून धावून सोपानल धाप लागली होती- त्याच हापत्या स्वरात तो म्हंणाला.
" निळ्या लवकर कायतरी आईडीया काढ
तो डेमोन अण्णा कधीपण इथ पोहचल..!"
अमोल रडवेल्या स्वरात म्हंणाला.
मरणाच्या भीतिने त्याची पार पळता भुई थोडी झाली होती.
निळ्या जमिनीकडे पाहून डोळे डावीकडून उजवीकडे फिरवत , काहीतरी आईडीया सुचवत होता. ...तोच त्याच्या डोक्यावर बत्ती पेटली..
" आईडीया !' निळ्याचा स्वर.
" काय?काय आईडीया..!" अमोलचा स्वर.
" अमोल ,तू खाली वाक ! आम्ही तुझ्या पाठणावर चढतो आणि वर पोहचताच तुलाही वर घेतो..!" निळ्या...
" भुर्र्रर्र्र " जीपच्या इंजीनचा आवाज ह्या सर्वाँच्या कानांवर पडला आणि लागलीच बंद झाला.
" औह शट, औह शट!" सोपान बोलत होता..
" तो आला, तो आला..! अमोल लवकर वाक, लवकर वाक..!"
अमोल पटकन पाठणावर वाकला ..
" सोपान तू जा !" निळ्या..म्हंणाला.
सोपानने अमोलच्या पाठणावर उभ राहीला...
आणी कंपाऊंडच्या भिंतीवर चढला..
" निळ्या लवकर, ये लवकए ये ..!"
जीपच्या दोन चाकांमधला एक चंदेरी व्हीलचा चाक दिसत होता - त्या बाजुला दोन पाय-या होत्या..
त्या पाय-यांवरून एक काळ बूट घातलेला पाऊल हळके हवेतून खाली जमिनीवर आला..
त्या बुटांपासून वर एक काळ्या रंगाचा पायजमा होता -आणि त्या पायजम्याच्या वर एक काळ्या रंगाचा शर्ट घातलेला , असा हा अण्णा जीपमधुन खाली उतरला होता...
बाजुला असलेल्या सीटवरून त्याने M24 नामक बंदूक ऊचल्ली.
आणी मोठमोठ्या ढेंगा टाकत हे तिघे ज्या दिशेने गेले होते - ज्या दिशेने निघाला..
त्याच्या डोक्यात त्याचा डिवचलेला अहंकार
विंचवासारखा नांग्या मारत होता.
राग डोक्यावर इतक चढ़ला होता - की डोळे लालबुंद झाले होते. ..
ते लालबुंद झालेले डोळे ह्या तिघांना शोधत होते.
अण्णाच्या डोक्यावर खुनी सवार झाला होता ..
ह्या तिघांना जो पर्यंत तो मरण देणार नव्हता तो पर्यंत त्याच्या अहंकारच्या आगीने धकधकणा-या काळजाला
थंडावा मिळणार होता.
अमोलच्या पाठवणार निळ्या उभा राहिला - सोपानने त्याला हात देत हळूच वर खेचल..
दोघेही कंपाऊडच्या भिंतीवर पोहचले होते.
आता फक्त अमोल खाली राहिला होता.
" अमोल ये हात दे !" निळ्या आपला एक हात खाली वाढवत म्हंटला.
निळ्याचा हात वर होता -त्या हाताला पकडण्यासाठी अमोलला जागेवरून उडी मारायला लागणार होती-
तस त्याने उडी मारली सुद्धा , परंतु पहिल्या वेळेस मात्र हाताला हात स्पर्श झाला.. ! दुस-यांदा सुद्धा तसंच झाल, तिस-यांदा सुद्धा प्रयत्न व्यर्थ गेल..
परंतू चौथ्यांदा मात्र हात हातात बसला..
" खेच , खेच , निळ्या खेच !"
सोपान म्हंणाला.
निळ्या पुर्ण जोर लावून अमोलला वर खेचत होता.
' ठणssssss ' बंदुकीच्या गोळीचा हा दुसरा बार फुटला.
निळ्याच्या डोळ्यांसमोर अमोलच्या खांद्यात
फट आवाज करत गोळी घुसली - फुगा फुटाव आणि पाणि बाहेर उडाव तस खांद्यातून रक्ताचा एक फुगा फुटला - सर्व रक्त निळ्याच्या चेह-यावर उडाल..
" आsssssss!"
अमोल वेदनेने विव्हळला- ती वेदना शब्दांत वर्तवण्या पलीकडची होती.
गोळीच्या माराने अमोलच अर्धजिव तिथेच मेला होता -
निळ्याने पकडलेला अमोलचा हात हळके हळके करत खाली खाली जात .. सुटला..!
निर्जीव वस्तू प्रमाणे अमोलच देह' धप्प '
आवाज करत खालच्या मातीवर आदळल..
निर्जीव निपचीत प्रेतासारख पडुन राहिल.
" अमोलssssssss!"
निळ्या ओरडला त्याची ती हाक पुर्णत जंगलात घुमली.
" आवडे निळ्याचा आवाज!"
टूव्हीलरवर ड्राईव्हसीटवर बसलेली - पिया म्हंणाली.
" हो ऐकल मी , तू लवकरच आवाज इकडूनच आल आहे !" आवडी काळजीच्या सुरात म्हंणाली.
तिचा चेहरा ,भीती, चिंता , काळजी मिश्रित भावांनी भरून निघाला होता .
" अमोलssss!"
निळ्याच्या डोळ्यांतून घळा घळा आसवे बाहेर पडू लागली. आपल्या मित्राच्या खुन्याला तो आता असंच थोडीना सोडणार होता? त्याने एक.जळजळीत कटाक्ष
अण्णावर टाकला -अण्णा बंदुकीच्या गोळ्या भरण्यात व्यस्त होता.
सोपानने ते पाहील, लवकरात लवकर गोळ्या बंदूकीत भरण्या अगोदर जर इथुन पसार झालो नाहीतर, हकनाक बळी जाणार होता.
" निळ्या. निळ्या चल इथून ! त्याच्याकडे बंदूक आहे , आपण काहीही करू शकत नाही त्याच्यासमोर -चल लवकर !"
सोपान ओरडूनच म्हंणाला.
त्याचे शब्द अमृतासारखे निळ्याच्या डोक्यात घुसले होते.
अण्णाकडे शस्त्र होत - आणि हे दोघे निशस्त्र होते. ह्या दोघांचा त्याच्यासमोर काहीच निभाव लागणार नव्हता - ही वेळ डोक्याने विचार करण्याची होती- एक चुक कायमच आयुष्य संपवून टाकणारी होती.
निळ्याने होकारार्थी मान हळवली.
" ह्या कंपाउंड पलिकडे उडी टाकुयात - तिथे एक घर आहे , आणी मला एक माणुस दिसल आत जाताना - त्या मांणसाकडून काहीतरी मदत नक्की भेटेल- चल!"
निळ्या सोपान दोघांनीही एकापाठोपाठ कंपाउंडच्या भिंतीवरून खाली उड्या टाकल्या.
अण्णाने बंदूकीमध्ये गोळया व झटकन तीची नळी त्या दोघांच्या दिशेने केली-परंतु आता तिथे कोणीही नव्हत.
" पळाले साले , पन पळून पळून पळणार कुठ?
नरकात जरी लपलात ना , तरी शोधून काढीन तुम्हाला एक तर मेला - आता दोघांची पन चित्ता रचतो."
अण्णा अमोलच्या निर्जीव प्रेताकडे कुत्सिक हसत पाहत म्हंणाला.
xxxxxxxxxx
कोहराम कब्रस्तानच्या भल्यामोठ्या गेटबाहेर
बाळ्या उभा होता.
जागेवरच उभा राहून कब्रस्तानात पाहत होता.
त्याच्या नजरेला कुठे लहान लाकडी कबरी दिसत होत्या ,
तर कुठे उंच - उंच स्टाईलसच्या कबरी दिसत होत्या -
त्याच कबरींजवळून पांढरट धुक वाहत होत...त्या धुक्याने जणू पुर्णत कब्रस्तानाला मगर मिठीच मारली होती.
कब्रस्तानात पसरलेली ही सुनसान शांतता एक फसव रुप होत -
ह्या शांततेच्या खोलात किती भयंकर कारस्थान सुरु आहे - हे अद्याप गुलदसत्यात होत.
ती अमानवीय -अलैकीक शक्ति अद्याप नजरेआडून खेळ खेळत होती- जेव्हा ती समोर येइल तेव्हा ख-या मौतेच खेळ सुरु होणार होत..रक्त मांसाचा नुस्ता चिखल पडणार होता. कोरड्या मातीला रक्ताने भिजवल जाणार होत -हिरव्या गवतावर रक्ताचा आभिषेक चढणार होता.
भित्र्या बाल्याची पाऊले कब्रस्तानाच्या आत घुसायला काही तैयार होत नव्हती - भीतिने अंग थरथर काफत होती-
कोहराम कब्रस्तानाबद्दल लहानपणापासून ऐकलेल्या त्या अभद्र बाता , त्याच्या मेंदूत घुसल्या होत्या - ही भीति डोक्यात घुसलेली भीति होती .
जस एका लहान मूलाला अंधाराची भीति वाटते
आणी तो मोठा होईपर्यंत त्या अंधाराला घाबरत राहतो ..जो पर्यंत त्याची भीती जात नाही.. तशीच भीती बाळ्याच्या मनात होती !
त्याने गळ्यात घातलेल्या काळ्या दो-याला हात लावल .
" महादेवा रक्षा कर , बाबा !"
अस म्हंणतच -त्याने कब्रस्तानाच्या आत पाऊल ठेवल.
त्याच्या ह्या एका क्रियेने न जाणे काय घडल!
चमत्कारीक, अमानवीय,अतर्कनिय , अघोरी, तामसी कृल्पती शक्ति ह्या कलियुगात अद्याप सुद्धा आस्तित्वात आहेत - ह्याची प्रचिती देणारा हा देखावा होता.
बाळ्याने जस कब्रस्तानाच्या आत , खाली असलेल्या तपकीरी मातीवर कोल्हापुरी चपलेचा पाय ठेवला -त्याचवेळेआ त्याच्या कोल्हापुरी चपलेखालची ती तपकीरी माती , विस्तवासारखी तापून उठली-
बाल्याने पायाखाली पाहिल..खालून पांढरट रंगाच धुर निघत होत..
" बाबो..!" त्याच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला -डोळे मोठे झाले -तोंड चेंडू तोंडात जाईल
एवढ़ा वासला होता.
त्याच अवस्थेत त्याची नजरपुढे गेली , समोरच दृष्य पाहताच तो बाहुल्यासारखा एक जागीच खिळून राहीला.
आजुबाजुला पसरलेला धुका वाफेसारखा एका ठिकाणी येऊण कसलातरी आकार घेत होता.
प्रथम एक वळवळणारी शेपटी तैयार झाली, मग त्या शेपटीवरच आकार प्राप्त होऊ लागल..
बाळ्या हा भलताच प्रकार , पूरताच चक्रावला होता. पन त्याच आता पक्क विश्वास बसल होत की ही जागा , हे क्षेत्र आपल नाही , ह्या त्यांच क्षेत्र हे जे बळीसाठी आसूसले आहेत !
काहीवेळातच त्या धुक्यापासून एक पांढरट रंगाची हवेत उडणारी -ना धड आकार असलेली , ना उकार असलेली -
एक अमानवीय धुक्याची उडणारी सावळी तैयारी झाली.
खाली सापासारखी पांढरट वळवळणारी शेपटी- आणि एका मानवाच्या कंकाळाची - कवटी !
" खिखिखिखिखिखी!"
ती कवटी बत्तीस दातांची बत्तीशी वाकडीतिकडी हळवत हसली.
तीच ते हसण पाहून ,बाळ्या रडकूंडीला आला.
" याह्ह्हह्ह्ह्ह्ह " किन्नरी आवाजात ओरडत
ती बाळ्याच्या दिशेने उडत आली- तिचा वेग अफाट होता, त्याहून त्या सैतानाने दिलेली धडक जबरदस्त होती- त्या धडकेने बाल्या गेटपासून थेट पाच फुट मागे हवेत उडाला खाली जमिनिवर कोसळला..
भीतिने वेदनाकाही जाणवली नाही , तसा तो जमिनिवरून ऊठला..
".....सैतान...आला..सैतान...आला..! "
मोठ मोठ्याने तो ओरडू लागला..आणी तसाच हायवेपुढे असलेल्या जंगलात घुसला..
बाल्याच्या गळ्यात , दैवी शक्तिचा गोंडा होता..
आणी दैवी शक्तिना ह्या असल्या अभद्र स्थळी थरा नसतो - बाळ्याच्या गळ्यात असलेल्या दैवीगोंड्याने
ती शक्ति काहीक्षण सक्रिय झाली होती- दैवी शक्तिच्या स्तोत्रांना तिच्या जागेत मुळीच प्रवेश नव्हता- म्हंणून तिने बाळ्याला कब्रस्तानात प्रवेश करण्यापासून रोखल..होत.
काहिवेळाने
बाळ्याची फटफट करणारी जुनी टूव्हीलर कब्रस्ताना बाहेरच उभी दिसत होती...
त्याच टूव्हीलरच्या हेंन्ड़ल पुढून हाईवेचा काळा रस्ता दिसत होता -
त्याच रस्त्यावरून एक एम्बुलेंस
धावत आली..एम्बुलेंसचा सायरणचा आवाज अभद्रपणे वाजत होता.
लाल, निळा, पिवळा प्रकाश आजुबाजुला पडत होता.
एम्बुलेंसने हळुच एक उजव टर्न घेतल.. व कोहराम कब्रस्तानच्या उघड्या गेटसमोर येऊन..
थांबली...
क्रमश :