Nagarjun - 1 in Marathi Love Stories by Chaitrali Yamgar books and stories PDF | नागार्जुन - भाग १

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

नागार्जुन - भाग १

" नगमा ,छोरी हुआ कि नहीं...आज तेरे जॉब का पहिला दिवस है...और तू अभी एसी ही बैठी है...." एक पन्नाशीच्या वयातील बाई एका मुलीला पाहत ओरडत होती..जिचं वय अवघे वीस वर्ष होतं..
 
" अम्मा..." म्हणत ती पाठमोरी असलेली नगमा...आपल्या आईकडे वळते...जी दिसायला इतकी ही चांगली नसली तरी इतकी ही वाईट ही नव्हती दिसायला...केस खांद्यापर्यंत रूळलेले..जे सरळ होते...ज्याला वेगळीच चमक दिसत होती...भुवया मस्त कोरीव होत्या...रंग निमगोरा असल्याने आणि विशेष म्हणजे सिंपल च रहायला आवडत असल्याने चेहर्यावर कसलाही मेकअप छापला नव्हता...बस लिपस्टिक आणि साधी पॉंडस पावडर होती ,डोळ्यांत काजळ ही नव्हते...पण तरी ही ते कोरीव वाटत होते...दिसायला जितकी गोड होती...तितकीच नाजूक ही होती...
 
" काय अम्मा अम्मा...जा पहले अपने कानों में बाली पहन और ए क्या ..." त्या तिच्या गळ्याकडे पाहत म्हणतात, " तेरा गला ईतना रूखा सुखा क्यू है...जा मंगळसूत्र घाल...आणि हो मांग भी भर लेना... और आखों में काजल‌भी..." अम्मा तिला वॉर्ड रॉबजवळ असल्येल्या आरशासमोर ढकलत ढकलत च पाठवते...
 
" अम्मा...तुझे पता है ना...हे मंगळसुत्र वैगेरे मी आता घालणार‌ नाही म्हणून मग का मला रोज यावरून आग्रह करत असते..." ती तोंड वाकडं करत कानात रिंगा मोठ्या मोठ्या घालत बोलते..
 
" अच्छा...तुझे पसंद नहीं है तो शादी कायकू हमारे परमिशन न होकर भी उस लडके से कि जो हिंदू है...." त्या ही आता जरा चिडल्या आणि वॉडरोबच्या ड्रोवर मधील एक डायमंड मंगळसुत्र काढतात आणि तिच्या हातात कोंबत रागात बोलतात..
 
" अम्मी..." ती ही पाय आपटत बोलते, " हो मला माहित आहे माझी चूकी झाली कि मी परमिशन नसतानाही भारतात जाऊन पुढचं शिक्षण घेतलं आणि तिथंच कॉलेज च्या एका प्रिन्स च्या प्रेमात पडल्याने शादी पण केली...पण अम्मी,तूच म्हणायची ना ,प्यार करना गुनाह नहीं होता..." ती ही आता थोडी हिरमुसली होती..
 
" चल चल अब मेरी ही सीख मुझे मत सिखा....जा जल्दी आज तेरे ऑफिस का पहिला दिवस है..." त्या ही तोंड वाकडं करत म्हणतात..ती ही मग गुपचुप गळ्यात मंगळसूत्र ईच्छा नसुनही आई समोर आपल्या घालते...मनात काहीतरी विचार करते आणि हसते...
 
" अम्मी आते है..." म्हणत ती पर्स घेऊन जाते ही...तिची अम्मी नाष्टा घेऊन आली होती पण मॅडम तर घराच्या बाहेर कधीच पडल्या होत्या...
 
" मिसेस पंडित ..ओके ..तुमचा प्रोफाइल आमच्या कडच्या रिक्त पदी व्यवस्थित बसत आहे...तरी आजपासुन च तुम्ही जॉईन व्हाल अशी माझी अपेक्षा आहे..." ती तिच्या नव्या ऑफिसमध्ये आलेली ...आणि आपल्या बॉसच्या केबिन मध्ये बसुन जॉब करावा कि नाही या विचारातच ती होती कि तिचा बॉस तिला बोलतो...
 
" एक्सक्यूज मी सर...आय ॲम नॉट मॅरिड...ॲन्ड वन करेक्शन प्लीज....आय ॲम नगमा शेख..." ती त्यांची चूक सुधारून बोलते...मुद्दाम आपल्या लग्न झालं नाही याला व शेख सरनेम ला जोर लावते...
 
" अर्जून, तुला एक गोष्ट सांगायची होती...मी अरे आताच नगमा वहिनींना बाहेर पाहिलं..." तोच एक मुलगा तिच्या बॉसच्या केबिनमध्ये येत घाईघाईत बोलतो...पण अर्जून,तिचा बॉस त्याला नजरेने च खुनावत असतो...आधी त्याच तिकडे लक्षच नसतं..पण अचानक तिच्या हातातील बांगड्यांच्या त्या कणकण आवाजामुळे तो भानावर येतो...
 
" नगमा वहिनी...ओह ..तुम्ही..." तसा तो तिच्याकडे एक नजर टाकतो...ती ही त्याच्याकडे खाऊ कि गिळू या नजरेनेच पाहत असते...
 
" सर ॲम नॉट वहिनी...ॲम हिअर ऑन्ली नगमा शेख...तुमच्या बॉसच्या कंपनीत आजच मला हायर केलं आहे..." ती त्याला रिस्पेक्ट देत उभी राहत ,डोळे बारीक करत म्हणते...
 
" याह...यू आर राईट...नगमा शेख..." तो तिच्यासमोर हात करत म्हणतो पण ती त्याच्या हाताकडे पाहते आणि हात जोडून नमस्कार करते...
 
 
" मिस्टर अर्जून पंडित...मी तुमच्या ऑफिस मध्ये यापुढे काम नाही करू शकत...सो मी आजच तसा रिझाईन माझा आणून देते..." ती चेहर्यावर उगाच ताणून मंद मंद स्मितहास्य करत बोलते आणि ताड ताड आपले सॅंडल्स वाजवत जाते ही बाहेर...त्याला काही बोलायला चान्स ही देत नाही...
 
तर ही होती आपल्या कथेची झलक ...आता ओळख करून घेऊयात आपल्या कथेचे नायक नायिकांची...नायक अर्थात आपला अर्जून पंडित हे लक्षात आलं असेलच तर नायिका नगमा शेख ही सुद्धा समजली असेल ...आणि आता त्याच्या केबिनमध्ये जो होता तो त्याचा धाकटा भाऊ, मित्र ,सहकारी सर्व काही असा रोहित पंडित ..जो अर्जून च्या काकांचा मुलगा आहे...आपली नायिका ही मुळची पाकिस्तान ची,पण सध्या दिल्लीत आपल्या आई बरोबर राहत होती... आणि आपला कथेचा नायक भारताचा,दिल्लीचा रहिवासी...हे कुठे कसे भेटले,लग्न झालं आहे तरी असे का वेगळे हे असे अनेक प्रश्न आले असतील मनात पण त्या साठी जाणून घ्यायला लागेल त्यांचा भुतकाळ...जो मी कथेत असं च मध्ये मध्ये आणत जाईल... त्यामुळे काय असेल भुतकाळ हे जाणून घेण्यासाठी तुम्हांला कायम कथा वाचत रहावीच लागेल....
 
" नगमा... क्यू गुस्सा कर रही है...और ये क्या ..इतनी जल्दी वापस कैसे आयी...." तिची अम्मा तिच्या मागे मागे येत बोलत असते...अर्जून च्या तोंडावर रिझाईन फेकत ती तणतणतच घरी आली होती आणि येताच आपल्या बेडरूममध्ये,तिने आपल्या बेडरूमचा कबाड खाना केला होता...हातातल्या त्या बांगड्या,गळ्यातील मंगळसूत्र तिने गादीवर रागात फेकून दिले होते...आणि तशी च बेडवर डोक्याला हात लावून बसली होती..
 
" बता क्या हुआ है नगमा...क्यू इतना परेशान हो रही है...तेरा वो तो नही दिखा ना..." तिची अम्मी तिच्या शेजारी बसुन तिच्या कपाळावरचा हात काढून आपल्या हातात घेत बोलते...तशी ती आपल्या अम्मीकडे एक नजर टाकते...आपल्या अम्मीला कसं काय कळालं याच तिला आश्चर्य वाटतं होतं..
 
" अरे ऐसे आँखें क्यू दिखा रही है...??" अम्मी तिला प्रेमाने विचारते, " ईसका मतलब मैं जो सोच रही हू..." अम्मी भांबावून जाते बोलता बोलता..
 
" हो तू जे विचार करत आहेस ना अम्मी ,तेच घडलं आहे...तो नालायक माझा पती अर्जून पंडित माझा बॉस निघाला आणि तो त्याचा भाऊ कम शत्रु रोहित ,तो ही तिथेच होता..." ती जोरात ओरडत बोलत होती...किती वेळचा दाबुन ठेवलेला राग आता कुठे जाऊन उफाळून आला होता तिचा... ज्यामुळे स्वतः वर कंट्रोल च राहिला नव्हता...
 
" ओह..शेवटी ज्याचं डर होतं तेच झालं तर...." अम्मी ते ऐकून हैराण झाली होती...काय बोलावं ते तिलाही कळत नव्हतं ..." ठिक आहे नगमा, चल आपण आता लगेच ही दिल्ली सोडून जाऊ...." अम्मी थोडावेळ विचार करत बोलते...
 
" आणि कुठे जायचं...?? हिथे आपल्या ओळखीच कुणीच नाही आहे अम्मी...आणि म्हणे दिल्ली सोडू...." जाम वैतागली होती नगमा...
 
" हिथे कशाला आता थांबायचं आहे...?? आता आपण आपल्या मायदेशी परतायचं ...आपला देश,आपलं शहर पाकिस्तान...." अम्मी सुद्धा आता ठणकावून बोलते...
 
" पाकिस्तान...?? आपला देश ,आपल शहर...??" ती वैतागत म्हणते, " अम्मी तू विसरली‌ आहेस वाटतं कि भारतात येऊन आपल्याला पाच वर्ष झालीत त्यामुळे आपण आता भारत देशाच नागरिकत्व स्विकारल आहे...आता तिथे तरी आपल्याला कोणी घेईल का...??" ती तिरसटपणे बोलते...तशी अम्मी सुद्धा शांत बसते...दोघीही परिस्थिती समोर हतबल झाल्या होत्या...
 
" ती हिथे काय करत होती...?? का तिला आपल्या ऑफिसमध्ये घेतलंस तू...??" अर्जून चे डॅड अर्जून ला ओरडत होते , संध्याकाळी घरी आल्यावर ...तर तो कशाला ह्यांना सांगितलं असं एक्स्प्रेशन देत रोहित कडे पाहत होता...रोहित मात्र एकदा अर्जून कडे तर एकदा त्याच्या चाचांकडे पाहत होता...
 
 
क्रमशः