Satva Pariksha - 11 in Marathi Love Stories by Shalaka Bhojane books and stories PDF | सत्व परीक्षा - भाग ११

Featured Books
Categories
Share

सत्व परीक्षा - भाग ११

भाग ११
अनिल आणि रुचिरा तर वेगळ्याच विश्वात होते. दोघांची पण एकमेकांच्या नातेवाईकांशी ओळख करून देणे चालू होते. हळूहळू एक एक करून सगळे नातेवाईक जायला लागले. दोघांसाठी मग त्याच्या मित्राने प्लेट आणून दिली.

अनिकेत चा मित्र, " खायचं विसरले वाटतं दोघे. "

दुसरा मित्र, " अरे त्यांना भूक नाही लागणार आता. त्याचं पोट भरले असेल. "

असे अनिकेत च्या मित्रांचे संवाद चालू होते. मित्र नसले तर कुठल्याच फंक्शन ला मजा नाही.

रुचिरा, " खाण्याचं लक्षातच आलं नाही ना. "

अनिकेत, "हो ना माझ्या पण नाही लक्षात आलं. खरचं भूक लागली नाही. "

रुचिरा आणि अनिकेत एकमेकांकडे पाहून हसत होते. सगळे गेल्यावर फक्त घरचेच राहतात. घरच्यांची आवरा आवर चालू असते. अनिकेत आणि रुचिरा दोघे एका बाजूला बसून एकमेकांशी गप्पा मारत होते. सगळ्यांच आवरून झालं तरी त्यांचं लक्ष च नसतं. सगळे त्यांना बघून हसतात तरी त्यांचं लक्ष नसतं. शेवटी अनिकेत चे काका अनिकेत ला म्हणतात, " अनिकेत चल आता. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. " दोघेही लागतात आणि सगळे हसायला लागतात.
सगळे एकमेकांचा निरोप घेत असतात.

रुचिरा चे बाबा अनिकेत च्या काकांना आणि वडिलांना म्हणतात, " काही चुकले असेल काही करायचे राहिले असेल तर माफी असावी. "

अनिकेत चे काका, " अहो दादा तुम्ही असे काय बोलताय? काही कमी राहिली नाही. आता हे आपल्या दोन्ही कुटुंबाचे शुभकार्य आहे. त्यात रुसवे फुगवे कशाला करायचे. उगीचच छोट्या गोष्टीं साठी कशाला शुभकार्याला गाल बोट लावायचे. चला आता येतो आम्ही भेट आता होतच राहिलं. "

रुचिरा चे बाबा, " तुमच्या सारखी समजूतदार माणसं माझ्या लेकिला मिळाल्यावर मला कसली च चिंता नाही.

अनिकेत आणि त्याचे नातेवाईक जायला निघाले.

घरी पोहोचल्यावर रुचिरा चे बाबा निश्वास टाकतात

रूचिरा चे बाबा"चला साखरपुडा व्यवस्थित पार पडला. अनिकेत रावांच्या घरच्यांना सगळे आवडले. "

रुचिरा च आई, " अहो, चांगलीच माणसे आहेत ती. काही चुकलं तरी सांभाळून घेणारी. रीतीभाती जरी महत्वाच्या असल्या तरी त्यासाठी रुसून बसून कार्यात मिठाचा खडा टाकणारी नाही आहेत. कार्य हे दोघांचे असते त्यामुळे रुसण्या फुगण्या पेक्षा एकमेकांना समजून दोघांनी मिळून ते कार्य चांगल्या रितीने आनंदने पार पाडणे महत्वाचे असते. नाही का? अनिकेत रावांच्या घरचे अगदी मस्त आहेत. मान पान पैसा अडका यात अडकलेले नाही त. "

रुचिरा चे बाबा, " हो ना खरचं खूप चांगली माणसे आहेत. रुचिरा त्य्यांना कधीच दुखवू नकोस. आता ती सर्व माणसे तुझी होणार आहेत.. "

रुचिरा, " नाही बाबा तुमचे संस्कार आहेत माझ्यावर. तुमची मान मी कधीच खाली जाऊ देणार् नाही. "

रुचिरा ची आई, "माझी लेक पण गुणाची आहे. त्या घराला आपलसं करेल. "

सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पसरले होते. घर पाॅझीटिव वाईबस् नी पसरले होते. म्हणून च तर भारतीय संस्कृती चा सगळे हेवा करतात. लग्न म्हणजे एक सण एक सोहळा च असतो ना. आता त्यांची खरी लगीन घाई सुरू होणार होती. कारण लग्नाला महिना च राहिला होता. त्यामुळे कपड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी चालू होणार होती.
दुसऱ्या दिवशी अनिकेत ला आशुतोष चा फोन आला.

आशुतोष, " हॅलो अनिकेत. अरे मला जरा तुझ्या शी बोलायचं होते. आज संध्याकाळी भेटू शकशील का? "

अनिकेत, " अरे बोल ना मग. "

आशुतोष, " नाही, असं फोनवर बोलता येणार नाही. "

अनिकेत, " ठिक आहे. संध्याकाळी घाटकोपर स्टेशनला भेटू. "

आशुतोष, " ओके, मी येतो संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालेल ना. "

अनिकेत, " चालेल, ओके बाय. "

आशुतोष, " बाय. "

अनिकेत ला थोडाफार अंदाज होताच आशुतोष काय बोलेल याचा. तो पण ऑफिस ला निघून गेला. तो त्याचं काम शांत पणे पण पटापट करत होता. कामाच्या वेळी काम असं त्याचं म्हणणं होतं. रुचिरा चे मेसेजेस वॉटस् अप वर चालू असायचे. संध्याकाळी तो ऑफिस मधून निघाला.
अनिकेत घाटकोपर स्टेशन ला आला. आशुतोष स्टेशन बाहेर च उभा होता. दोघांनी एकमेकांना हाय केले.

अनिकेत, " काय रे असं अचानक काय काम काढलसं? "

आशुतोष, "बसून बोलूया का? "

अनिकेत, " चालेल , चल. "
दोघेही एका हॉटेल मध्ये गेले.


दोघे काय बोलतात ते बघुया पुढच्या भागात.
हा भाग तुम्हाला कसा वाटला? ते तुमच्या प्रतिक्रियेतून
नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या साठी खूप मोलाच्या आहे त.
हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरू नका.