Koun - 3 in Marathi Thriller by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 3

Featured Books
Categories
Share

कोण? - 3

भाग – ३

त्याच श्रेणीत एक दिवस सावली तिचा घरी बसलेली असतांना तिचा फोनची घंटी वाजली. तिने फोन बघितला तर तिला अनोळखा नंबर दिसला. तिने तरीही तो कॉल उचलला आणि ती म्हणाली, “ हेलो कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला.” तेव्हा समोरून काहीच आवाज नाही आला तर तिने पुन्हा तोच प्रश्न केला. परंतु या वेळेस सुद्धा समोरून काहीच प्रतिक्रिया झाली नाही. म्हणून मग सावलीने शेवटी त्रासून तो फोन कट केला आणि ती म्हणाली, “ कोण बावळट आहे तर माहित नाही. सारखा फोन करतो आणि काहीच बोलत नाही, मूर्ख कुठला.” असे म्हणून ती फोन तेथेच ठेवून उठून चालली गेली. ती जाऊन तिचे काही आवश्यक गृह कार्य करत असतांना तिला पुन्हा फोन आला तर सावलीने फोन बघितला. पुन्हा तोच नंबर होता यावेळेस मात्र सावलीचा पारा आता चढला होता. म्हणून तिने फोन उचलला आणि जोरात ओरडून ती बोलली, “ कोण बोलत आहे रे नालायका, तुला काही काम धंदे नाही आहेत काय. तुला काय सगळे तुझ्याच सारखे रिकाम टेकडे वाटले काय. पुन्हा यानंतर फोन करून काही बोलला नाहीस तर याद राख मी पोलिसांत तुझी तक्रार करेन.” असे म्हणून तिने फोन कट केला.
सावली ओरडून बोलत होती तेव्हा तिची आवाज ऐकून तिची आई तेथे आली आणि तिला बोलली, “ काय झाले बाळा, कुणाशी एवढी चीढून बोलती आहेस.” तेव्हा सावली म्हणाली, “ काही नाही ग आई, न जाणे कोण आहे जो वारंवार फोन करतो आणि काही बोलत नाही वैतागून गेलेले आहे मी.” मग आई बोलली, “ अग मग पोलिसांत तक्रार का बर करत नाहीस.” सावली म्हणाली, “ आई मी आता त्याला तेच म्हणाले कि मी पोलिसांत तुझी तक्रार करती आहे म्हणून.” असे म्हणून ती तिचा रूमकडे निघून गेली. तिचा पाठोपाठ तिची आई सुद्धा तिकडे गेली आणि म्हणाली, “ आताचा आता तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याची तक्रार करून टाक कोण जाणे आहे तरी कोण तो मनुष्य आणि त्याला हवे तरी काय.” मग सावली बोलली, “ हो आई मी कॉलेजला जातांना आधी पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि तक्रार करून मग पुढे जाणार आहे.” असे म्हणून ती घराचा बाहेर निघाली. ती तिचा घराचा कुंपणाचे गेट उघडत असतांना रस्तावरून एक दुचाकी आली आणि त्यावर स्वार असलेल्या एक नकाब परिधान केलेल्या व्यक्तीने काहीतरी सावलीचा दिशेने फेकले. ती वस्तू येऊन थेट सावलीचा छातीला धडकली आणि फुटली. ती वस्तू एक रंगाने भरलेला पाण्याचा फुगा होता जो आता सावलीचा अंगावर फुटला होता आणि ती रंगीत पाण्याने संपूर्ण भिजून गेली होती. त्याचबरोबर त्याने एक दुसरी वस्तू सुद्धा फेकली होती. ती वस्तू सावलीचा घराचा आवारात जाऊन पडली होती.
अनयासपणे झालेल्या त्या कृत्यामुळे सावली जरा घाबरली होती सोबत सोबत ती चकित सुद्धा होती. ती तशीच पलटून घराकडे जाण्यास निघाली तोच तिचा फोन पुन्हा वाजला. सावलीने फोन बघितला तर पुन्हा तोच नंबर होता. सावलीने फोन उचलला तर तिचा बोलण्याचा अगोदरच समोरून आवाज आला, “ होळीचा तुम्हाला खूप खूप सुभेच्छा.” मग सावली अडखडत बोलली, “ कोण बोलतेय.” पुढून आवाज आला, “ ओळखलं काय मला तुम्ही मिस्स सावली.” सावली उत्तरली, “ नाही मी नाही ओळखले आणि हा काय प्रकार आहे.” तेव्हा पुढून आवाज आला, “ अस कसं चालणार मिस्स मला विसरून, अहो तुम्ही तर जरी प्रसिद्धीचा शिखरावर जाऊन बसल्या असला तरी तुमचा प्रशंसकाला असे विसरून चालणार नाही. मी तुमचा खूपच मोठा प्रशंसक आहे.” मग सावली बोलली, “ कुठला आणि कसला प्रशंसक आहेस, हि काय पद्धत झाली काय कुणा स्त्री सोबत वागण्याची. तू कोण आहेस ते स्पष्ट सांग आणि माझ्यावर हा पाण्याचा फुगा का बर फेकलास ते सांग.” तेव्हा तो समोरील व्यक्ती म्हणाला, “ अरे हे काय घडले माझ्या हातून, तो फक्त पाण्याचा फुगा होता काय. माफ कराल यानंतर मी नक्की लक्षात ठेवेल कि पुढचा वेळेस पाण्याचा ऐवजी त्यात गंगाजल असेल.”

मग सावली उत्तरली, “ गंगाजल काय बोलतोस बावळट माणसा अरे काही वेडा तर नाही झाला आहेस ना तू. मला कशाला पाहिजे गंगाजल तुझ तूच ठेव आणि लवकर मोक्ष प्राप्त कर.” मग समोरून तो बोलला, “ मोक्ष तर तुला मिळणार आहे मिस्स सावली. म्हणूनच तुझासाठी आता मी गंगाजल पाठवणार आहे आणि बावळट मी नाही तू आहेस गंगाजल म्हणजे ऐसिड जे मी तुझा चेहरयावर टाकणार आहे. जेणेकरून तुझा सुंदर चेहरा कुरूप होईल आणि तू कुणालाच तोंड दाखवण्याचा लायकीची राहणार नाहीस.” सावली तशी घाबरणारी मुलगी नव्हती तिने मोठ्या धाडसाने त्याला म्हटले, “ तू काय मला गंगाजल पाजणार आहेस रे नामर्दा तुझ्यात एवढी सुद्धा हिम्मत नाही कि एका मुलीशी समोरा समोर येऊन बोलावे म्हणून. तू तर कायरासारखा या फोनचा मागे चेहरा लपवून सारखा बोलतोस. तुझ्यात खरच दम असेल तर कधी आमोरा समोर येऊन माझ्या मुकाबला करून बघ मग तुला कळेल माझ्यात आणि तुझ्यात किती दम आहे. मी तुझ्या धमकीला घाबरत नाही आता तर मी पोलिसात जाऊन तुझ्या विरुद्ध तक्रार नक्की नोंदवणार आहे. ”
शेष पुढील भागात..................