Kouff ki Raat - 22 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग २२

The Author
Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

खौफ की रात - भाग २२


□□□□□□□□□□□□□□□□□


सीजन 1

....


लेखक :जयेश झोमटे..


// 22


लेखक -जयेश झोमटे


महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी


फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏


ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!


सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !


लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..


धन्यवाद


रामपूर ... गावात


रात्री साडे दहा वाजता


एक सफेद रंगाची भिंतीवर दुकानाची पाटी लावलेली दिसत होती- त्यावर काळ्या रंगाने मोठ्या अक्षरात नाव लिहिलेल दिसत होत -आवडे किराणा आणि जनरल स्टोर.



आता काहींना हा प्रश्ण पडन साहजिकच आहे , की दुकानाची सगळे नावे इंग्रजित लिहिली आहेत , मग तो मध्ये असलेला अँड इंग्रजीत का लिहिल नाही , आणि च का लिहिल ?


तर ते मला सूद्धा माहीती नाही ! खोट नाही ओ खरच बोलतो आहे मी !


दुकानाच्या पाटीखाली एक वर खेचलेल शटर दिसत होत -


शटरखाली


बालाजी वेफरसच्या लाल,निळ्या,प्लास्टीक कव्हर असलेल्या चिप्स, तर कुठे कुरकरे दिसत होत्या .


त्याखाली एक लाकडी टेबल होत - टेबलावर प्लास्टीकच्या बरण्या ठेवल्या होत्या - त्या बरण्यांमध्ये कुठे विविध प्रकारचे चौकलेटस ठेवले होते - तर कुठे लाडू , बर्फी, काजूच्या चिक्या,लॉलीपॉप- चणे शेंगदाणे, अश्या विविध बरण्या सुद्धा तिथे होत्या.


टेबलाखाली पारदर्शक काच होती- आत एकावर एक अंतर सोडून फळ्या रचलेल्या दिसत होत्या- त्यांवर वह्या-पुस्तक ठेवलेल्या दिसत होत्या.


टेबलाजवळूनच बाहेर व आत जाण्यासाठी एक मार्ग दिसत होता - तिथे एक फळी होती, जी वर उचलून बाहेर -व आत जाता यायचं.


दुकानात दोन तीन एल: ई: डी टाईपच्या पांढ-या ट्यूब पेटल्या होत्या.


त्याच प्रकाशात टेबलापुढे असलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीत एका तरूणीची आकृती बसलेली दिसत होती, आणि त्या आकृतीच्या मागेच एक दरवाजा होता - जो की दुकानातून आत घरात घेऊन जायचा -कारण हा दुकान घराला लागून होता ना ?




दुकानात टेबलापुढे खुर्चीत बसलेलय त्या तरूणीच्या अंगावर एक हिरव्या रंगाचा, आणी त्यावर सोनेरी रंगाच्या चांदण्यांची डिझाईन असलेला ड्रेस होता - खाली एक गुलाबी रंगाचा पायजमा घातला होता.


गौरवरर्ण समोरच्याला मोहित करणारा चेहरा , फुलपाखरासारखे काळे डोळे , पापण्या अगदी जाड- टपो-या दुधाळ डोळ्यांना सोबत होत्या , लाल रंगाची लिपस्टिक लावलेले ओठ-वरचा भाग लहान, आणी खालचा जरास मोठ होत - त्या खालच्या ओठांवर दोन काळ्या रंगाचे तिल दिसत होते.


डोक्यावरचे काळेशार केस मागे वेणी घालून बांधले होते.


मित्रहो ही आहे आवडा नागराज हिसाळके उर्फ आवडी- निळचंद्रची होणारी बायको ! आवडीच वय एकवीस वर्ष आहे , ती बारावी शिकलेली आहे. पुढे अजुन शिकायचं तीच मन होत - पन तिचा बाप नागराज एक नंबरचा कप्टी माणुस , बारावी शिकलीस तेवढ पुरे - जास्त शिकून काय दिवे लावणार आहेस? हे त्याच नेहमीचंच डायलॉग आवडीच तोंडपाठ झाल होत - मित्रहो ही आवडी म्हंणजे अगदी प्रेमळ स्वभाव असलेली मुलगी, मोठ्यांचा मान -मतराब राखून बोलणारी, कधीही कोणाला उलट न बोलणारी- पन जर कधी कोणी तिचा अहंकार दुखावला, वाईट वागल ( आई- वडिल सोडून) तर मात्र तिचा रग उफाळून यायचा -अक्षरक्ष काळी माताच तिच्या देहात प्रवेश करायची , परंतु तेवढीच ती प्रेमळ सुद्धा होती.आताच्या युगातल्या अटीट्यूड, ईगो असलेल्या छपरी मुलींसारखी तिची राहणीमाणी नव्हती - अभ्यासात हुशार असून सुद्धा तिला त्याचा गर्व नव्हता .


पन गंमतशीर आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी होती - की आठवी पास असलेल्या निळचंद्र सारख्या टपोरी मुलाला ही सोन्यासारखी आवडी पटली तरी कशी ? असो त्याच उत्तर पुढे भेटेलच !


आता कथेकडे वळूयात.


आवडीच्या हातात एक काळ्या र्ंगाचा स्मार्टफोन होता , जास्त महागडा ही नव्हता , जेमतेम सात - आठ हजारांचा होता- जो की दिवसातून चार - पाच वेळा हेंग व्हायचा - तिच्या कंजूस बापाने तिला दहा - वीस हजाराचा फोन घेऊन देण्यास सक्त नकार दिला होता, का तर म्हंणे,


" फोन घेऊन काय मोठे दिवे लावणार आहेस !"


आवडीच्या स्मार्टफोन स्क्रीनवर एक एप्लीकेशन दिसत होती- जिथे खुपसा-या भयकथा दिसत होत्या,

तो एक भयकथेंचा प्रोफाईल पेज होता - त्यावर नाव होत.


' जयेश झोमटे '

त्या प्रोफाईल पेजवर पुढीलप्रमाणे भयकथा दिस होत्या,


कोहराम - कब्रस्तान, समर्थ कृणाल आणी सैतान येहूधी -- भयकादंबरी ड्रेक्युला, रामचंद x क्रामचंद ,

द अमानवीय आग्यावेताळ, शश्श्श कोण आहे !

कित्येकरी भयकथा तिथे होत्या - सर्व भयकथा अगदी मनस थरकाप होइल , भीतिने जिव जाईल इतक्या भयानक होत्या.


आवडीला जयेश झोमटे ह्या लेखकाच्या भयथा खुप आवडायच्या, दिवसभर ती त्या लेखकाच्या भयकथा वाचायची - जयेश झोमटेच्या भयकथा वाचुन ती त्या लेखकाची खुप मोठी फेण झाली होती.

इतकी की निळ्या जेव्हा जेव्हा तिच्यावर रागवायचा तेव्हा ती हेच म्हंणायची,


' जर तू आता माझ्या बोल्ला नाहीस ना , तर मी झोमटे सरांशी लग्न करेल हा!" (😁)



तिच ते वाक्य ऐकून निळ्या लगेचंच राग विसरून तिच्याशी बोलायला लागायचा -


असो कथा पाहूयात.


झोमटे क्रीएशन प्रस्तुत 2022 ह्या वर्षी प्रकाशित झालेल्या ड्रेक्युला कादंबरीशी लिंक असलेली पुढील कथा समर्थ कृणाल आणि सैतान येहूधी, ही नुकतीच प्रकाशीत झालेली कथा ती वाचत होती .


" आवडे, ...आवडे..!"

प्रथम दोन हाक आल्या - मग एक आवडीच्याच

वयाची मुलगी दुकानाबाहेर धापा टाकत आली.



ती मुलगी म्हंणायला फक्त आवडीच्या वयाची

दिसत होती - बाकी शरीरयष्टीने कलिंगडासारखी फुगलेली होती.


" काय ग पिया ? काय झालं ? एवढी धाप का टाकतीयेस ?"


प्रिया उर्फ पिया आवडीची बेस्ट फ्रेंड बर का ! प्रिया उर्फ पियाचा बाप बेकरी चालवायचं, ज्याकारणाने पियाच तोंड नेहमीचंच चालू असायचं,

म्हंणूनच ही प्रिया नावाची लाकडासारख नाव असलेली पोरगी अशी नाजुका सारखी झाली होती.

असो प्रिया बदल्ल एवढच ठिक ! तसंही प्रिया पाहूण कलाकार आहे.

आवडी प्रिया समवेत सर्व शेयर करायची, खाण्यापासून ते तिचे व्यक्तिगत विचार सुद्धा !

एकंदरीत पाहता दोघींची जिवाभावाची मैत्रीच होती.

आवडीने बाजुची एक बिसलेरी बॉटल फोडुन ती प्रिया दिली.


प्रियाने ती बॉटल हातात घेऊन गटागटा पिऊन सुद्धा टाकली, आणी उर्वरीत रिकामी बॉटल पुन्हा आवडीकडे दिली.


" आवडे निळ्या ..!" पिया पुढे बोलणार तोच मध्ये अचानक हा खवचट आवाज आला.


" पाण्याची बाटली फुकाट दिली , का पैशे घेतल ह्या म्हशीकडून !"


आवडीच्या खांद्यामागे दाराची उघडी चौकट होती.


त्या चौकटीत एक जाड्या मांणसाची आकृती उभी दिसत होती.


ती आकृती म्हंणजेच आवडीचा बाप नागराज होता.


वरच अंग उघड आणि - खाली एक लंगोट गुंडाळल होत -


पुर्णत रामपूर गावाला माहीती होत , की नागराज वाणी किती कंजूस स्वभावाचा आहे ते , घरात , आणि गावात कुठेही जर काही कार्यक्रमा व्यतिरीक्त शूल्लक-साधस काम असेल तर नागराज वाणी नेहमीच असा उघडा हिंडायचा -

अस उघड हिंडताना त्याचे छातीवरचे पांढरे व काळे मिश्रित केस आणि वाढलेली ढेरी पाहून गावातली लहान पोर त्याला पोटलीबाबा म्हंणून चिडवायची..

पन कंजूश्या नागराज वाण्याला त्याच काहीच वाटत नसायचं!


" शुश्श्शsssss !" आवडीने तोंडावर बोट ठेवून पियाला गप्प बसायला सांगितल .


" अप्पा !" आवडीने अगोदर मागे पाहिल.

मग पुढे पाहत , खाली असलेल्या ड्रॉव्हरला उघडून त्यातून वीस रूपये काढुन वाण्याला दाखवत म्हंणाली.


" दिलेत तीने पैसे !"

ते पैसे पाहतच नागराज वाण्याने वाढलेली खांजल्ली.


" बर बर, टाक गलल्यात ! आणि ह्या म्हशीला हाकल इथून , दिवसभर काय बोलून दिव लावत्यात काय माहीत."


नागराज वाण्या आल्या पावळे ढेरी खांजळत निघुन गेला.


" आवडे तुझ्या ह्या बापाला सांगून ठेव हा? मला म्हैस बोलायचं काम नाही ! "

नागराज वाणी आत जाताच , पिया आपला राग व्यक्त करत म्हंणाली.


" पिया अप्पा कसे आहेत तुला माहीतीये ना! "


" मलाच नाही अक्ख्या गावाला माहितीये तुझा अप्पा कस आहे ते?" पिया जरा कुत्सिक स्वरात पटक म्हंणाली.


" बर बाई , ते सोड तू निळ्या बद्दल काय म्हंणत होतीस ते सांग पाहू आधी!"


" अंग निळ्या !" अस म्हंणतच , पियाला पुन्हा धाप लागली.


" आवडे , आवडे !"


" अंग सांग ना , बोल !"


" अंग निळ्या ना !" पिया एकदम नॉर्मल झाली, तिचे वाढलेले श्वास स्थिर झाले.


मग तीने आपल्या हातात असलेल्या फोनवर चार पाच वेळा टच केल आणि स्क्रीन आवडीच्या चेह-यासमोर धरली.


स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले झाली होती.

त्या व्हीडीओ मध्ये सोपान , अण्णा ,आणी जय-या असे तिघेजण दिसत होते.


अण्णाने सोपानचा शर्ट धरला होता - आणी दैत्यासारखा दिसणारा अण्णा मोठ-मोठ्याने हसत होता.


तोच अचानक एक टूव्हीलर मागच चाक खाली आणी पुढच चाक हवेत असलेल्या अवस्थेत वेगाने आली आणि वर असलेल्या चाकाने अण्णाच्या छातीवर एक धडक दिली, त्या धडकेने अण्णा जय-याच्या अंगावर कोसळला-


" निळ्या !" टूव्हीलर ड्राइव्ह सीटवर निळ्या बसला होता - त्याला पाहूनच आवडी काळजीच्या स्वरात म्हंणाली.


स्क्रीनवर व्हिडिओ मध्ये सोपान गाडीवर बसला - आणि गाडी सरळ जंगलात घुसली..

व्हिडिओ अद्याप येवढ्यावरच थांबली नव्हती-

अण्णा त्याच्या जीप मध्ये बसला होता - आणि त्याच्या बाजुच्या सीटवर ती एम-24 नामक स्नाईपर रिफील सुद्धा होती.


" नाय एक एकाच्या डोक्यात गोळी घातली तर नाव सांगणार नाय अण्णा!"

अण्णाची जीप सुद्धा जंगलात घुसली.



तशी स्क्रीनवर प्ले झालेली व्हिडिओ संपली.


" बघितलंस काय केल ह्या निळ्याने ! नुसतीच उठाठेव करायची काही गरज आहे का ?"

पिया जरा रागात म्हंणाली. मग लगेचंच तिच्या रागीट आवाजात बदल झाला व ती पुढे म्हंणाली.


" आवडे मी माझ्या पप्पांकडूज ऐकलय , की अण्णा एक गुंड माणुस आहे , आणि जाम डेंजरस आहे ! चार -पाच जणांचे खून सुद्धा केलेत त्याने"


" काय!" आवडी जरा मोठ्यानेच म्हंणाली.

पन त्या सुरार काळजी मिश्रित भय होत.


" पिये , मला निळ्याची खुप काळजी वाटतीये ग , जर त्या अण्णा त्याला काही केल तर!"

आवडी एवढ बोलूनच थांबली.


" आवडे मग तर तू लग्न न करताच विधवा होशील ग !" पिया पटकन म्हंणाली. मग स्व:शीच वेड्यासारखी तोंडावर हात ठेवत हसू लागली.


" पिये तुला काही अक्कल वगेरे आहे का, ग ? कोणत्या टाईमला काय बोलाव ते तरी कलत का ?

आवडीच्या वाक्यावर सुद्धा ती अद्याप हसतच होती.

मग जरा वेळाने ती नॉर्मल झाली, तस आवडी म्हंणाली.

.


" पिये माझ एक काम करशील !"

आवडीने पियाचे दोन्ही हात हातात घेतले.


" मला तुझी स्कूटी देशील का ? मी जो पर्य्ंत

निळ्याला डोळ्यांसमोर सुखरूप पाहत नाही ना , तो पर्य्ंत माझ्या मनाला थंडावा नाही मिळणार बघ !"


" काय ? काय म्हंणायचं काय तुला?, की तू इतक्या रात्री एकटीच जंगलात जाशील!"


" मी एकटी? " आवडी जराशी हसली


" मी एकटी नाही ग , तू सुद्धा !"


" कायssss!" पियाला एकदम धक्काच बसला.

" तू ..तू ..येडी झाली आहेस का , ह्या वेळेला अस जंगलात वगेरे भटकायला , मला नाही जमणार बाबा.मी आताच जयेश सरांची होर्रर ट्रिप वाचलीये..!"


" अंग ते सगळ खोट असत ग! पन तुला माहीतीये का? आपल्या रामपूर जंगलात सुद्धा एक झपाटलेली जागा आहे , जिच नाव आहे कोहराम कब्रस्तान , तिथे म्हंणे रात्री भुत निघतात."


" काय..ख..ख..खरच..!"


" हो, तुला पाहायचं? "

पिया जरी भीत्रि असली तरी तिला भुत पाहायचं म्हंटल्यावर ती नेहमीच तैयार व्हायची.


मानवाला असलेली एक वाईट सवय

ती म्हंणजे जिज्ञासा -ओढ! विषाची परिक्षा..घेणे होय.


" हो..हो..मला पहायचं भुत !"

पिया जराशी भीत भित म्हंटली.


आवडीला ठावूक होत - की पिया आपल्यासोबत अशी येणार नाही, तिला खोटी भुल - आशा दाखवावी लागेल. आणि ते तिने केल होत्ं.. पन तिला हे ठावूक नव्हत , की नियतीने तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवल आहे !


पिया जंगलात सोबत येण्यासाठी तैयार झाली तस आवडीने लागलीच दुकानाच शटर ओढुन दुकान ब्ंद केल-


भुत पाहायला मिळेल ह्या आनंदाने पिया खुप खुश झाली होती, काहीवेळातच आपली गुलाबी रंगाची स्कुटी घेऊन ती आवडीच्या घरामागे आली-

आवडीच्या घरची लवकरच झोपत असत त्यामुळे तिला अडवणार कोनी नव्हत , नाही विचारणार!


पिया ड्राइव्हसीटवर बसला होती आणि तिच्या मागच्या सीटवर आवडी बसली होती.


" चल , पिया चल लवकर!"


" हो , हो!" अस म्हंणतच पियाने की मार्फत गाडी स्टार्ट केली. आणि मागची लाईट दाखवत गाडी जंगलाच्या दिशेने निघाली...


क्रमश :



नियतीच कृर खेळ तरी पाहा मित्रहो!


एकाच रात्री कितीतरी मानवी जिव त्या कोहराम कब्रस्तानाच्या दिशेने निघाले आहेत.

आता वेळच ठरवेल की कोण जिवंत राहणार आणि कोण जिवाशी मुकणार!...


..